Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अनलॉक १.० ते ५.०

P
Prajakta२१
Tue, 06/02/2020 - 19:42
🗣 104 प्रतिसाद
प्रा डॉ बिरुटे सरांच्या सूचनेनुसार नवीन धागा काढत आहे धन्यवाद https://www.esakal.com/mumbai/mission-begin-again-start-maharashtra-chie... अनलॉक १.- हळूहळू सर्व सुरु करणार आहेत लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे अनलॉक १.- हळूहळू सर्व सुरु करणार आहेत लोकांनी स्वयंशिस्तीने वागण्याची फार गरज आहे स्वयंशिस्त १. मास्क वापरणे २. मास्क काढावा लागला तरी नंतर लगेच हात sanitize करणे ३. सार्वजनिक ठिकाणी without कव्हर न शिंकणे,न खोकणे ,न थुंकणे ४. गर्दी न करणे (whatsapp सारख्या माध्यमांचा उपयोग करून वार ठरवून घेणे सामान खरेदीसाठ,शक्यतो दुकानदारांना फोन करून जाणे) ५. ऑनलाईन ,घरपोच डिलिव्हरीला प्रोत्साहन देणे ,प्राधान्य देणे अवांतर - रुग्णसंख्या वाढत असताना देखील लोकडाऊन शिथिल करण्याच्या भारताच्या निर्णयावर जगात आश्चर्य व्यक्त होत आहे असे आज एका वृत्तवाहिनीवर (tv ९) सांगत होते आत्ता चक्रीवादळाची बातमी सारखी दाखवत आहेत चक्रीवादळामुळे परत त्या त्या ठिकाणी संचारबंदी आहे निसर्गच लोकडाऊन वाढवण्याचा इशारा तर देत नाहीये ना असे वाटले

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 50946 views

🗣 चर्चा (104)
व
वामन देशमुख Sun, 06/28/2020 - 20:53 नवीन
यावर मिपाकरांचे मत काय आहे ?
माझ्यामते, झाडूपोछावालीला सध्या तरी येऊ देऊ नये... किमान डिसेंबरपर्यंत तरी.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 06/29/2020 - 06:16 नवीन
मुळातच भारतात स्वतःचे काम स्वतः करण्याचे प्रमाण कमी ( खास करून पुरुष घरातील कामे कमी करतात) त्यामुळे या कोविद संकटातून जर एक गोष्ट शिकण्यासारखी असेल तर ती म्हणजे 'निदान घरात तरी स्वावलंबन' आणि यात स्वयंपाकापासून ते संडास धुण्यापर्यंत ..किंवा स्वतः कपड्यांना इस्त्री करण्यापर्यंत ) अर्थात यावर असेही म्हणले जाते कि १) सगळेच जर स्वतःची कामे करून लागले तर अनेक लोकांचाच रोजगार जाईल....आणि दुसरे कि जी लोक अगदी उच्च पदावर आहेत त्यांनी भांडी घासण्यात वेळ घालावा कि आपल्या जबाबदारीचे काम पार पडावे ( कार्यालयातील काम घरी करणे इत्यादी) दोन्ही बाजू खऱ्या आहेत ,त्यामुळे याचा सुवर्ण मध्य कसा गाठावयाचा ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/26/2020 - 08:56 नवीन
लॉकडाऊन ते अनलॉक वन चे फायदे कोणी समजावून सांगेल काय ? रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत आहेत, नशीब असे की रुग्ण बरेही होत आहेत ही त्यातली बरी बातमी असते अशात. बाकी, मृत्युचं प्रमाण कमी आहे तरी लॉकडाऊन वन ते अनलॉक वनमधेही आपण फिजिकल डिस्टेन्स पाळायचं हेच शिकत होतो आणि आता अनलॉकवन संपत असतांनाही तेच आहे, तर एकूण झालेला फायदा तपशीलवार विदा देऊन कोणी समजावून सांगेल काय ? बाकी, कोरोनाला आपण फार गंभीर घेत नै ये. भिती जरा कमी झाली आहे, हा फरक लॉकडाऊन ते आत्तापर्यंत वाटत आहे. तसेही, बरेच दिवस झालेत आदरणीय, माननिय, वंदनीय, यांनी एकदा टीव्हीवर येऊन सध्या काय परिस्थिती आहे हे सांगून एखादा सोपा 'टास्क' द्यायला पाहिजे असे वाटते. खूपच आठवण येत आहे. बाकी काय नाय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 07/06/2020 - 09:28 नवीन
अनेक ठिकाणी लॉक डाउन परत जाहिर झाला आहे, लॉक डाउन संबंधी उलट्या सुलट्या बातम्यांनी सामान्य नागरिक गोंधळुन जात आहे. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, अनेकांचा रोजगार उध्वस्थ झाला आहे तर अनेकांना एक वेळ जेवायला मिळायची भ्रांत झाली आहे. यात भर म्हणजे हॉस्पिटल सुविधांचा बोजवारा उडताना दिसत असुन अनेक हॉस्पिटल रुग्णांची लूट करत आहेत. अनेक डॉक्टर / पोलिस / आवश्यक सेवा पुरावणार्‍या लोकांचे प्राण सातत्याने जात आहेत. रोज नवी आकडेवारी डोळ्या समोर असते, कधी अमुक इतके रुग्ण बरे होउन गेले तर कधी अचानक बाधितांचा आकडा वाढुन यमलोकी पोहचलेल्यांची संख्या वाढताना दिसते ! यात भरीस भर म्हणुन सामान्य जनतेला वाढीव वीज देयकाचा शॉक बसला आहे. अर्थाजनाचे मार्ग खुंटताना महागाई मात्र भरमसाठ वाढताना दिसते, अगदी औषधांच्या दरा पासुन भाज्यांच्या दरा पर्यंत वाढच दिसत आहे.काही काळाने लोकांचा संयम सुटेल असे दिसते ! आठवड्याभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयातील धक्कादायक वास्तव मुंबईतील करोनाबाधित निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयाकडून तब्बल २५ लाखांचं बिल

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/02/2020 - 08:26 नवीन
अनलॉक ३.० च्या सर्वांना शुभेच्छा. काय नै आपण आपली काळजी घ्यायची. येता-जाता साबण-पाण्याने हात धुणे, फिजीकल डिस्टंनस, गर्दी टाळणे, बाजारात सारख्या वस्तू चिवडत बसणे टाळणे. भिती बाळगायची नाही, काळजी करायची नाही. रीलॅक्स राहावे. कुटूंबातल्या सदस्यांशी चीड चीड करायची नाही. वातावरण आनंदी, उत्साही ठेवायचं. तशी काही शंका आल्यास जवळच्या डॉक्टरांच्या सल्ला घ्यायचा. रुग्णालयात जाऊन रुग्ण बरे होतात. बाकी, आता सर्व परिस्थितीचे सिंहावलोकन केले असता असे लक्षात येते की प्रसार-माध्यमे आणि रात्रीच्या 'आकाशवाणीने' आपल्या मनात खुपच भिती निर्माण केली होती. आता आजूबाजूची परिस्थिती पाहता परिस्थिती तितकी भयंकर राहीलेली नाही. पण, येता जाता काळजी घ्यायची बस दुसरं काही नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 08/02/2020 - 08:36 नवीन
रात्रीच्या 'आकाशवाणीने' ->> हे आवडले
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/13/2020 - 10:27 नवीन
चिंता ये नही की करोना केस २३ लाखसे ज्यादा होग गए. चिंता ये है की साहब बता नही, रहे की अब बजाना क्या है. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/20/2020 - 07:06 नवीन
आजपासून जिल्हाअंतर्गत एसटी अर्थात लालपरी सुरु होत आहे, बावीस प्रवाशांना परवानगी प्रवासाची असेल. चला, हळुहळु जीवन करोना सोबत जगत जीवन पूर्वपदावर येत आहे, असे म्हणू या. पण, पायी चालत गेलेल्या, काही मरण पावलेल्या, आणि आयुष्यातून उद्ध्वस्त झालेल्या लोकांना असेच सोडले असते तर जे काही प्रश्न निर्माण झाले, ते झाले नसते असा विचार आज आला. सर्व प्रवाशांनी आपापली काळजी घेऊन प्रवास करावा. मास्क, सॅनिटायजरचा वापर, सारखं इकडे-तिकडे हातांचा स्पर्श टाळावे. नीट गपगुमान बसून राहावे. घरी गेल्यावर स्नान, कपडे वगैरे थेट साबणपाण्याने धुवायला टाकणे. आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायचीच. लशीचं काही नक्की होईपर्यंत आणि ती आपल्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला करोनासोबत वावरावेच लागेल. अर्थात करोना साथ जीना है, काळजी घ्यायचीच. दिवा-बत्ती आणि थाळ्या वाजवून काही होत नसतं, त्याच्या भरवशावर राह्यचं नै, त्याने काही होत नसतं. हॅव गुड्डे....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 08/20/2020 - 07:22 नवीन
हो. आज सकाळीच ही बातमी वाचली. निर्णय निश्चितच स्वागतार्ह. एकच समजले नाही, बस मधुन प्रवास करणार्‍यांना इपास ची गरज नाही. मग ट्रॅक कसा ठेवणार.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 08/20/2020 - 09:41 नवीन
तेच लॉजिक समजेना. Epass इतर सर्व खाजगी वाहनांना कम्पलसरी आहे आणि ST ने मात्र कुठेही फिरू शकता. यामुळे फक्त एवढंच समजतेय कि येन केन प्रकारे ST चालू करून सरकारकडे पैश्याचा ओघ सुरु करायचाय. ST ने फिरलेल्या लोकांचे ट्रॅकिंग कसे होणार त्यांना QUARANTINE चे काय नियम असणार, लक्षणे असणारे कसे ओळखणार? कंडक्टर आणि ड्राइवर यांच्या सुरक्षेचं काय? आणि मग प्रश्न उरतोच कि खाजगी वाहनांना आंतरजिल्हा प्रवासा करता e pass ची सक्ती का? कोणी ठाकरे भक्त किंवा सोनिया सेना मेंबर जरा या गोष्टी समजवून सांगेल का??
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 08/20/2020 - 10:44 नवीन
हेच कोड मलाही पडलंय. एसटीत २२ लोकंच असणार आहेत. त्यामुळे पैश्यासाठी एसटी चालू केली असेल असं वाटत नाही. गणपतीत एसटी बंद ठेवणे राजकीय दृष्ट्या सोयीचे नसावे. इपासमुळे वरकड कमाई होते असं वाचल्याच आठवतं. तेच तर कारण नसेल?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 08/20/2020 - 13:03 नवीन
तसेच ते लोक जिथे जातील तिथे त्यांनी विलगीकरणात रहायचे का नाही ते ही स्पष्ट नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 08/20/2020 - 07:32 नवीन
टाळ्या :)) :))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/30/2020 - 10:40 नवीन
नमस्कार, मित्रो, भाइयो और बहनो...अनलॉक चार शुन्यमधे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीने सावधगिरी बाळगून जगरहाटीचा प्रवास सुरु ठेवला तो पुढेही असाच सुरु ठेवावा लागेल. लशीचं अजून काही नक्की नाही. अधून मधून बातम्या येत असतात. पण, जेव्हा थेट लशीवाले आपल्या दारात येऊन टीका लगाना है क्या असे विचारतील तो पर्यंत आपण आपली काळजी घ्यायची. सॅनिटायजरचा वापर, येता-जाता साबणपाण्याने हात धुणे, मास्क लावणे, हँडग्लोवजचा वापर करणे. या सर्व गोष्टे आपल्याला बघायच्या आहेतच. Image removed.

आता यापुढे म्हणजे, २१ सप्टेंबर २०२० पासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर गर्दी संख्या १०० इतकी मर्यादेसह परवानगी देण्यात येईल. तथापि, अशा मर्यादित मेळावे अथवा गर्दीच्या ठीकाणी मास्क घालूनच परवानगी असेल. सामाजिक अंतर, थर्मल स्कॅनिंग आणि हात धुण्यासाठी किंवा सॅनिटायझरची तरतूद मागील पानावरुन पुढे सुरु राहील.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे की 30 सप्टेंबर 2020 पर्यंत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील आणि काही नियमित वर्ग अटी ठेवून चालू राहतील, जिथे आवश्यकता वाटल्यास तिथे . राज्ये / केंद्र शासित प्रदेश 50 % पर्यंत अध्यापन व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत एका वेळी ऑनलाईन शिकवणी, आणि संबंधित कामांसाठी बोलविण्याची परवानगी देऊ शकतात.

इयत्ता 9 ते 12 च्या विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या कंटेन्ट झोन बाहेरील भागात, त्यांच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याकरिता त्यांच्या शाळांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. हे त्यांच्या पालक / पालकांच्या लेखी संमतीच्या अधीन असेल. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मिशन किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर मंत्रालयांमध्ये नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उद्योजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी असेल.

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (एनआयईएसबीयूडी), भारतीय उद्योजक संस्था (IIE) आणि त्यांचे प्रशिक्षण घेणार्‍यांना देखील परवानगी दिली जाईल. केवळ संशोधन (पीएचडी) आणि प्रयोगशाळा, प्रायोगिक कामांची आवश्यकता असलेल्या तांत्रिक आणि व्यावसायिक प्रोग्रामच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था यांना एमएचएशी सल्लामसलत करून उच्च शिक्षण विभाग (डीएचई) परवानगी राहील.

केंद्र सरकारच्या सल्ल्याशिवाय-परवानगीशिवाय, कोणतेही स्थानिक लॉकडाउन (राज्य / जिल्हा / उपविभाग / शहर / गाव पातळी) राहणार नाही. आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परमिटची आवश्यकता नाही. अजून बर्‍याच गोष्टी आहेत, त्यासाठी अधिकृत केंद्रसरकारचे मार्गदर्शन पाहावे. (छायाचित्र इंडियाटूडेच्या सायटीवरुन साभार) -दिलीप बिरुटे

  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 08/30/2020 - 11:12 नवीन
आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परमिटची आवश्यकता नाही. प्रवास केल्यानंतर विलगीकरणाची गरज आहे किंवा नाही हे स्पष्ट नाही. बाकीच्या गोष्टी स्वागतार्ह.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/30/2020 - 12:05 नवीन
प्रवास केल्यानंतर विलगीकरणात राहीलं पाहिजे, असे काही दिसले नाही. कदाचित आज उद्या, महाराष्ट्र सरकार आपले अनलॉकच्या बाबतीत काही नवी मार्गदर्शक धोरणे जाहीर करतील त्यात तपशील येईल असे वाटते. सध्या तरी रुटीन नियमित नौकरीनिमित्त प्रवास करणार्‍यांना काही अडचण दिसत नाही, असे दिसते. आणि त्यांचा प्रवास सुरु आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/30/2020 - 12:40 नवीन
Image removed. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 08/30/2020 - 14:06 नवीन
Gym चालू होणार आहेत का? करोना गेल्या खड्ड्यात.. gym करा राव चालू..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/30/2020 - 14:24 नवीन
Gym चालू होणार आहेत का?
अनलॉक चार मधे जीमबद्दल स्पष्ट असे उल्लेख आढळत नाही. पण, २१ सप्टेंबरनंतर ज्या अर्थी सामाजिक उपक्रमांना (खेळ वगैरे) परवानगी दिली ज्यात शंभर लोकांपर्यंत परवानगी असेल तेव्हा त्याल जीमही खुले होईल असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/29/2020 - 12:43 नवीन
लॉकडाऊन मधे आदरणीय.... वेगवेगळे टास्क द्यायला सारखे अधुन मधुन यायचे पण सध्या जरा कमी झालंय असे मला वाटते, असे कोणाला वाटतेय का ? की एखादा मोठा ब्रेक घेऊन मोठा टास्क देतील. बाय द वे, तो विषय प्रतिसादाचा नाही. आत्ताच कुठे तरी वाचलं की आता लॉकडाऊन अजून तीव्र होणार तर आणखी एक बातमी लगेच दिसली की अनलॉक ०५ मधे उपहारग्रुहे खुले होण्याची शक्यता आहे, हॉटेल व्यावसायिकांना मा.मुख्यमंत्र्यांनी काही अटी ठेवून जसे की पन्नास टक्के आसनक्षमता ठेवून वगैरे हॉटेल सुरु ठेवायला परवानगी देणार असे वाचले. तसेच, आताशी देशात दुसरी लाट सुरु होत आहे, तीव्रता आणखी वाढणार असेही वाचले. तसे पाहता आता लोकांची भिती कमी झालेली आहे. जे बेफिकिर वागायचे ते वागतच आहेत आणि जे काळजी घेत आहेत त्यांच्यातील काही अधुन मधुन संक्रमित होऊन बरे झाल्याचे वाचनात येत आहे. करोनाला आता साताठ महिने होत आहेत तरीही करोना कशामुळे होतो, वाढतो, उपाय काय वगैरे हे सर्व अंधारात चालण्यासारखंच आहे. उपायच नव्हता तर लोक बरे होत आहेत. आता आपण लोक म्हणतो की वयस्कर आणि दुर्धर आजार असणा-यांना अधिक धोकादायक होऊ शकतो वगैरे आपले आपलेच हिशेब. आता अनलॉकमधे विद्यापीठाच्या परिक्षा सुरु होत आहेत. लोकांची ऑफीसेस सुरु झालेली आहेत. काहींचं वर्क फ्रॉम होम सुर आहे. सर्व परिस्थिती पाहता आता लॉकडाऊन आणि अनलॉकचा खेळ करीत बसू नये. लोकांना जितकं शहानपण यायचं तितकं पुरेसं आहे, असे वाटते. आपण आपलीच काळजी घ्यायची. माझं कुटुंब माझी जवाबदारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/01/2020 - 07:51 नवीन

काय काय सुरु होणार.

एक) राज्यातील रेष्टांरंट, बार पाच ऑक्टोंबरपासून सुरु होणार. दोन) लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु. तीन ) मुंबई एमएमआर क्षेत्रातील उद्योग सुरु. चार) पुणे विभागातील लोकल गाड्या सुरु. पाच) पूर्वी ज्या गोष्टींना मनाई होती त्या सर्व गोष्टींना ३१ ऑक्टोंबरपर्यंत मनाई असेल.

 काय काय बंदच राहणार.

एक) शाळा-महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोंबर पर्यंत बंद राहणार. दोन) जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, मॉल्स, व्यापारी संकूल बंद राहतील. ( आमच्याकडे सुरु आहे बिंधास्त) तीन) आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ( विशेष परवानगी दिलेले वगळून) बंद राहील. चार) मेट्रो बंद राहील. पाच) राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यकम, धार्मिक स्थळे बंद राहतील. मा. आदरणीय मोदीशेठ उगाच लॉकडाऊनच्या भानगडीत पडले. भारतीय जनता आज आकाशवाणीने भयभयीत झाली होती. ज्या त्या राज्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती. पण कोणत्याही गोष्टींचा इव्हेंट करायच्या नादात भलतेच काही तरी होऊन जातं. आणि मग आत्मनिर्भर व्हा म्हणून सोडून द्यावे लागते. पुनश्च एकदा हरिओम. माझे कुटुंब, माझी जवाबदारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 08:16 नवीन
मा. आदरणीय मोदीशेठ उगाच लॉकडाऊनच्या भानगडीत पडले. काय सांगताय? मग महा भकास आघाडी अजून लोकल, शाळा, कॉलेजे का सुरू करत नाहीये? सिनेमा हॉल ना परवानगी दिली पण नाट्यगृहांना नाही? मराठी संस्कृती कुठे गेली? अजून महाराष्ट्राचा लॉकडाऊन केंद्रापेक्षा जोरात का चालू आहे? महाराष्ट्रात सिनेमाला २०० लोक जाऊ शकतात पण लग्नाचा हॉल मध्ये ५० च लोकाना परवानगी? बंगलोर मध्ये १ जूनपासून रेस्टोरंट हॉटेले उघडली आहेत मग महाराष्ट्रात का नाही? तिथे केसेस जास्त वाढल्या नाहीत ना? ज्या त्या राज्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली असती. मग महाराष्ट्रात कुठे घोडं पेंड खातंय? द्वेष असला कि तरतम बुद्धी काम करत नाही याचे उत्तम हे उदाहरण आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/01/2020 - 11:18 नवीन
काय सांगताय?
खरं सांगतोय. आगा ना पिछा कोणताही काहीही हेतू नाही. आज रात्रीपासून सर्व सबकुछ बंद राहील, असे म्हणून सर्वसामान्य लोकांच्या पोटात गोळा आणायची गरज नव्हती, हे हजार वेळा सर्वांनी सांगून झालं आहे. महाराष्ट्र सरकारची जनजागृती सुरु होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हळुहळु बंद करणे सुरु होते. किमान महाराष्ट्राच्या जनतेने घाबरुन जाऊ नये, असे एक आश्वासक काम महाराष्ट्र सरकार करीत होते. एक सप्टेंबरपासून व्हेंटीलेटर, टेष्टींगकीट, पीपीइकिट, मास्क, आणि अशी सर्व मदत महाराष्ट्राला नाकारणे. सर्वाधिक जीएसटीचा कर महाराष्ट्र सरकारने केंद्राला दिला तरी महाराष्ट्राच्या वाट्याचे काहीएक हजार कोटी रुपय महाराष्ट्राला दिले नाही. सर्वात कर कमी कर मिळवून देणा-या उत्तरप्रदेश मध्यप्रदेश सरकारच्या तुलनेतही निधी दिला नाही. करोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने विविध योजनांसाठी निधी खर्च केला, करीत आहे. ती राज्यांचीच जवाबदारी असते. अशा वेळी केंद्रसरकार राजकारण करीत राहीले. करोनाच्या काळात जिथे माणसं मरताहेत, अशावेळी केंद्रसरकार महाराष्ट्राशी भेदभावाचे राजकारण करीत आहे, केंद्रसरका जसे वागणार तसेच भक्तमंडळी वागणार परंतु संकटाच्या प्रसंगी तरी राजकारण करु नये याचं भान ना केंद्रसरकारला नाही. महाराष्ट्राशी द्वेशाचं राजकारण केंद्रसरकार करीत आहे, आपण म्हणता ते खरं आहे. ”द्वेष असला कि तारतम्य बुद्धी काम करीत नाही” महाराष्ट्रातील जनतेशी केलेला भेदभाव महाराष्ट्र विसरणार नाही. योग्यवेळी, योग्य धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातील माणूस शांत बसणार नाही, याची मला जाणीव आहे. जय महाराष्ट्र. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 15:56 नवीन
सर्वाधिक जीएसटीचा कर महाराष्ट्र सरकारने केंद्राला दिला तरी महाराष्ट्राच्या वाट्याचे काहीएक हजार कोटी रुपय महाराष्ट्राला दिले नाही : Apr 09, 2020, Centre releases Rs 14,103 crore GST compensation to states; more to be released soon Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/centre-releases-rs-14103-crore-gst-compensation-to-states-more-to-be-released-soon/articleshow/75048328.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst New Delhi:28 July, 2020 8:29 am IST The Centre on Monday released Rs 1,65,302 crores as Goods and Services Tax (GST) compensation to states/Union Territories for the financial year 2019-20 against cess collection of Rs 95,444 crores. Maharashtra received the highest GST compensation from the Centre amounting to Rs 19,233 crores https://theprint.in/india/centre-releases-gst-compensation-of-over-1-65-lakh-crore-to-states-uts-for-fy-2019-20/469373/ सत्य काही निराळेच आहे असं दिसतंय. ”द्वेष असला कि तारतम्य बुद्धी काम करीत नाही” महाराष्ट्रातील जनतेशी केलेला भेदभाव महाराष्ट्र विसरणार नाही. योग्यवेळी, योग्य धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातील माणूस शांत बसणार नाही, याची मला जाणीव आहे. जय महाराष्ट्र. ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/01/2020 - 17:07 नवीन
केंद्रसरकारने मागील आर्थिक वर्षाचे २२ हजार कोटी रुपये, एप्रील, मे,जून,जुलै, ऑगष्ट पर्यंत महाराष्ट्राला दिले नव्हते, हे अर्थमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितले. ( लिंक निवांत पाहा. ) केंद्रसरकार आपल्या कर्माचे फळ भोगेलच. हजारो नागरिकांना बेघर केले, अनेकांच्या नौक-या गेल्या. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. गरिबांचा तळतळाट बरा नसतो. केंद्रसरकार महाराष्ट्राशी भेदभाव करीत आहे, हे महाराष्ट्राने पाहिलंच आहे. राज्यपाल कार्यालयाचे उंबरे झीजवून झीजवून थकले परंतु सरकार काही पडेना. चालायचंच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/02/2020 - 07:36 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 08:23 नवीन
आता पूर्ण नियमावली पाहिली सिनेमा हॉल्स ना परवानगी नाही. तेवढे वाक्य गाळून टाका पण "बार" ला आहे. म्हणजे समोरासमोर बसून दारू पिता येईल तेंव्हा कोव्हीड होणार नाही. पण दोन सीट टाकून पलीकडे बसलेल्या माणसाकडून तुम्हाला कोव्हीड होईल. बढिया है
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 10/01/2020 - 08:34 नवीन
वाचनालयांचे काय ? साधा उल्लेखही आढळला नाही. (बंदच रहातील म्हणुन सुध्दा). खिजगणतीतच नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/01/2020 - 08:36 नवीन
ते मोदीशेठ ना विचारा असल्या फडतूस गोष्टींसाठी कल्याणकारी सरकारला वेळ आहे का? काय तरी विचारणं तुमचं!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/01/2020 - 17:12 नवीन
असल्या फडतूस गोष्टींसाठी कल्याणकारी सरकारला वेळ आहे का?
मा.सेठची....दिवा-बत्ती, थाळीनाद-टाळ्या......अतिशय कल्याणकारी गोष्ट होती. आपल्याला बॉ मान्यच आहे.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/02/2020 - 07:39 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 10/03/2020 - 12:25 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/libraries-are-neglected-in-relaxation-of-lockouts-abn-97-2291727/ कोणीतरी आवाज ऊठवला हे बरे झाले घरात डांबुन रहायचा वेळ, सुसह्य करण्याचा, मनोरंजनाचा, ज्ञान वाढवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग हाच आहे. समाजाच्या सुसंकृतपणाचे वाचनालय हे एक निदर्शक आहे आणि त्याच कडे दुर्लक्ष ! (दारुच्या दुकाना एव्ह्ढी गर्दी तरी निश्चितच होणार नाही. )
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/05/2020 - 07:59 नवीन
मुळात वाचनालयात वाचनासाठी तासंतासं वाचन करायचा काळ आता मागे पडत चाललेला आहे, विद्यार्थी सोडले तर आता सार्वजनिक वाचनालयात सामान्य नागरिक वाचनालयात केवळ पुस्तक बदलायलाचा दिसतात. बाकी वाचनालये सुरु करुन वृद्ध साठीचे लोक वाचनालयाकडे ढकलणे सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही असे वाटते.
समाजाच्या सुसंकृतपणाचे वाचनालय हे एक निदर्शक आहे.
ओके....!
(दारुच्या दुकाना एव्ह्ढी गर्दी तरी निश्चितच होणार नाही. )
लो कल्ल्लो बात...! मद्य आणि पुस्तके हे दोन वेगवेगळे विषय आहेत, मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे अनेकांची साहित्यविषयक प्रतिभा बहरल्याची इतिहासात नोंदी आहेत, तो विषय वेगळा. आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातून मद्याने केवळ एक महिन्यात साठकोटी रुपये महसूल मिळून दिला. पुस्तके ज्ञान देणार, महसूल थोडी देणार.....? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 06:32 नवीन
मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे अनेकांची साहित्यविषयक प्रतिभा बहरल्याची इतिहासात नोंदी आहेत, तो विषय वेगळा काय बुद्धिवादी समर्थन आहे. मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याच्या कित्येक पट संख्येने कलावंतांची शतकानुशतके धूळधाण झाली हे मात्र लोक सोयीस्कर विसरतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/16/2020 - 07:19 नवीन
>>>>काय बुद्धिवादी समर्थन आहे. कसय डॉक्टर साहेब,माहिती नसेल काही तर गप्प बसलं पाहिजे, पण ते तुम्हाला शक्य नाही. आपल्या वाढत्या वयामुळे ते पुढेही शक्य नाही असे दिसते. घरात वयस्कर मानसं जशी नीरर्थक वटवट चालू ठेवतात तुमचं तसं सुरु जालावर सुरु असतं. सुरु ठेवा. मला आवडतं. ;) मराठवाड्यातल्या एका मोठ्या साहित्यिक उपक्रमाचा मी एक भाग आहे, थोरा-मोठ्यांचे किस्से अनेकदा तिथे ऐकतो, साहित्यव्यवहार पाहतो. >>>>मद्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याच्या कित्येक पट संख्येने कलावंतांची शतकानुशतके धूळधाण झाली हे मात्र लोक सोयीस्कर विसरतात. आपलं हे मत मान्यच आहे, डॉक्टर अंकल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 07:30 नवीन
माहिती नसेल काही तर गप्प बसलं पाहिजे, पण ते तुम्हाला शक्य नाही. आपल्या वाढत्या वयामुळे ते पुढेही शक्य नाही असे दिसते. घरात वयस्कर मानसं जशी नीरर्थक वटवट चालू ठेवतात तुमचं तसं सुरु जालावर सुरु असतं जळजळ जास्त होते आहे का? इनो घ्या
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/16/2020 - 07:48 नवीन
आपणास इनो आणि विश्रांतीची फार गरज आहे, काळजी घ्या. बाहेर पडू नका. येताजाता साबणपाण्याने हात धुत राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 10/15/2020 - 12:51 नवीन
चांगली बातमी. ग्रंथालय सुरु होणार. https://www.loksatta.com/mumbai-news/metro-service-from-monday-abn-97-2302006/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/10/2020 - 07:31 नवीन
”रोम जळत होते तेव्हा निरो बासूरी वाजवत होता, तसे देश करोनाच्या गर्तेत जात असतांना मोदी मोराला दाने खाऊ घालत होते” अशी टीका काँग्रेसने केली होती. हे काँग्रेसवाले आपलं मिपा वाचतात की काय अधुन-मधून. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 10/15/2020 - 13:09 नवीन
पंतप्रधानानी मोराला दाणे नसते खाऊ घातले तर देश करोनाच्या गर्तेतून आजपर्यंत बाहेर निघाला असता का ? तो मोर जर उपासमारीने मेला असता तर याच कॉंग्रेसने, 'मोदी एक मोर की जान नहि बचा सकता, तो देश के लोगो की जान क्या बचायेगा' अशी टिका केली नसती हे कश्यावरुन ? सध्या झालय काय की, या कॉंग्रेसकडे विरोध करण्याकरता कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने, पंतप्रधान 'फावल्या वेळात' काय करतात हाच मुद्दा घेऊन टिका करत राहातात. आता मोराला दाणे टाकणे व कोरोना महामारी याचा नक्की काय संबध आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/16/2020 - 07:46 नवीन
कॉंग्रेसकडे मुद्दे नाहीत किंवा असले तरी त्यांचे मुद्दे गोदीमिडिया समोर येऊ देत नाहीत तो भाग थोडा वेळ बाजूला ठेवू, आपण म्हणता तशी टिका झली असती. मोर उपासमारीने मरण पावला असता तर तेही दु:खदायकच ठरलं असतं. पण करोनाच्या काळात किती तरी लोक उपासमारीने मरण पावले, त्याची अधिकृत कोणतीही आकडेवारी नाही, अनेकांचा हातावरील रोजगार बुडाला, लोक मरणासन्न अवस्थेत पोहचले, असे असतांना अशावेळी अधिक वेगाने लोकांना तीव्र मदतीची अपेक्षा असतांना तुम्ही देशाचे लाडके पंतप्रधान आहात, तुम्ही मोराबरोबर फोटो सेशन करता, त्याच्याशी खेळत बसता, तुम्ही मोराला दाणे घालत बसतातुम्ही स्वतःला त्याला प्रसिद्धी देता, यावरुन तुमची भारतीय जनतेप्रती असलेली सहवेदना किती खोल आहे, ते दिसून येते. असंवेदनशीलतेचं प्रतिक मोराला दाणे खाऊ घालण्यात दिसते. निरो असाच लाडका होता, निरोच्या आईचा रोमवर अत्यंत प्रभाव होता. पुढे कालांतराने निरोची शक्ती वाढत गेली आणि रोममधील एक शहर जळत असतांना जुलमीपणा, कौर्य, असंवेदनशीलतेची मर्यादा ओलांडल्या गेलेली दिसते, तेव्हा निरो आपल्या वाड्यात फिडेल वाजवत जळणारे शहर पाहात होता. तेव्हापासून हे अप्रिय शब्द राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलता आणि अकार्यक्षमतेसाठी वापरले जात असतात म्हणून त्यांनीही तसा शब्द प्रयोग वापरला असावा असे वाटते इतकाच तो संबंध असावा असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 08:00 नवीन
हो ना मोराला दाणे घालायच्या ऐवजी कोमट पाणी पीत बसायला हवं होतं. काही जण त्यात ब्रँडी नावाचे द्रव्य सुद्धा घालतात ज्याने प्रतिभा उत्तुंग आणि अनावर होऊन साहित्य, कला, संस्कृती पाझरायला लागते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/16/2020 - 08:08 नवीन
काहींनी इथे ब्रँडी न घेता, करोना कसा होत नाही, कशामुळे होतो, अतिशय उच्च दर्जाच्या थापा मारल्या होत्या हे आम्ही मिपाकर अजूनही विसरलो नाही.....नंतर व्हू च्या नावावर खपवलं तेही आम्ही पाहिलंच आहे. डॉक्टरसाहेब, तुम्ही येता जाता नुसते हात पाय साबण पाण्याने धुवायचेच पण मनही धुवुन काढा, तुम्हाला त्याची फार गरज आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 08:12 नवीन
वैयक्तिक पातळीवर कशाला येताय?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/16/2020 - 08:13 नवीन

मुख्यमंत्री सहायता निधीतील ४३१ कोटी रुपये वापराविना

करोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी देणगी दिलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ या खात्यात ४३१ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्य शासनाकडून सातत्याने आर्थिक अडचणी असल्याचा पाढा वाचला जात असताना मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड १९ खात्यातील निधी वापरला जात नसल्याचा विरोधाभास अधोरेखित होत आहे. https://www.loksatta.com/pune-news/without-using-rs-431-crore-from-cm-assistance-fund-abn-97-2302951/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/21/2020 - 05:54 नवीन
आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान मा.मोदीसेठ यांनी काल सहा वाजता देशाला संबोधीत केले. करोना काळात त्यांची ही सातवी भेट होती. काय महत्वाचे बोलले ते आपणास माहिती असेल तरी आपल्यासाठी सांगून ठेवतो. १) करोना विषाणुचे संकट संपलेले नाही,त्याकडे थोडेसेही दुर्लक्ष झाले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. २)लॉकडाऊन संपला तरी करोना संपलेला नाही. ३) युरोप अमेरिका आणि इतर देशांमधे करोना रुग्णांची संख्या घटल्याचे पाहण्यात आल्यानंतर पुन्हा तिथे रुग्ण प्रमाण वाढल्याचे दिसते ४)करोना रोखण्यासाठी जी काळजी घ्यायची तीच गोश्ट थांबल्याचे दिसते, तुम्ही मास्क न वापरता इकडे तिकडे फिरणार असाल तुम्ही तुमच्यासह कुटुंबाची जोखीम वाढवत आहात. ५)लस जेव्हा केव्हा उपल्ब्ध होईल तेव्हा प्रत्येक भारतीयांपर्यंत लस पोहोचेल यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. ६) देशातील परिस्थिती सध्या स्थीर आहे, आपण ती बिघडू न देता काळजी घ्यायला हवी. एक गोष्ट खरी आहे, की रुग्णसंख्या कमी होत आहे, असे वाटल्यामुळे नागरिकांची बेफिकिरी जरा जास्त दिसून येत आहे, रुग्ण बरेही होत आहे, काहींच्या जीवावरही ह करोना उतरत आहे, तेव्हा काळजी घेत राहू या.... मास्क, साबण-पाण्याचा वापर, सॅनिटाइजरचा वापर, आणि सुरक्षित अंतर ही आपल्या सर्वांची जवाबदारी आहे. एकटे सेठ, कुठे कुठे पुरतील आपल्याला....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 10/22/2020 - 07:04 नवीन
लशी संबंधी इतक्या उलट सुलट बातम्या येत असतात की , लस खरेच मिळली आहे का नाही ह्या बाबतीत संभ्रम वाढला आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/23/2020 - 05:51 नवीन
बाजारात तुरी आणि..... अशी एक मराठी म्हण आहे, अजून त्या करोनावरील लशीचं कशात काही पत्ता नाही. आणि हे तिकडे बिहार मधे भाजपची सत्ता आली तर बिहारच्या जनतेला मोफत लस देऊ असे म्हणत आहेत. सत्ता आली नाही तर, लशीचे दर राज्यसरकारे ठरवतील. अरे यांना कोणी तरी आवरा रे......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/05/2020 - 04:41 नवीन
चित्रपट आणि नाट्यगृहे आजपासून खुली, तरणतलाव, योग संस्थांनाही परवानगी. पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि तरणतलावाचा वापर जलतरणपटूंना (सर्वसामान्यांसाठी नाही) करता येणार आहे. धार्मिक स्थळे योग्यवेळी खुली करु असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षपणे दिवाळीनंतर सुरु होणार आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/22/2020 - 07:11 नवीन
ब्रिटनमधील नव्या करोना व्हर्जनमुळे सर्व महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते ६ पर्यन्त संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतामुळे होणारी गर्दी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी आजपासून ते पाच जानेवारीपर्यन्त ही संचारबंदी असेल. दिवस आणि रात्र असा भेदभाव करोनाकडे नसतो असे वाटते. पण पब्लिक जर काळजी घेणार नसेल तर सरकार असे उलट पालट निर्णय घेणारच. आदरणीय मोदीसेठने घेतलेल्या निर्णयाची आपल्याला आठवण आहेच. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा