Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

[कविता' २०२०] - देता निरोप तुजला

स
साहित्य संपादक यांनी
Tue, 05/19/2020 - 06:57  ·  स्पर्धा
स्पर्धा

देता निरोप तुजला

देता निरोप तुजला, स्मरले क्षणात काही..
सांगायचे तुला जे, विरले मनात काही..

तू घाव जे दिलेले, सारे भरून गेले.
व्रण मात्र खोल त्याचे, उरले उरात काही..

मन थांबता जरासे, सुख सापडून गेले.
जे शोधण्या उगा ते, फिरले दिशात दाही..

मिळते म्हणे प्रसिद्धी, सफलतेच्या कथांनी
मम बर्बादीचे किस्से, फिरले जनात काही..

करण्या उजाड मजला, ढग संकटांचे आले.
बरसून काही गेले, विरले नभात काही..

ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही,
सोसावयास नाही, उरले जगात काही..

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}


वाचनखूण लावा
| 8349 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 8349 views

म
मनिष Tue, 05/19/2020 - 10:28 नवीन
+१ फारंच सुरेख आहे ही !!
ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही, सोसावयास नाही, उरले जगात काही..
  • Log in or register to post comments
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/19/2020 - 19:48 नवीन
+1
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 05/20/2020 - 08:30 नवीन
+ 1 फार सुरेख!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 05/21/2020 - 03:44 नवीन
पुलेशु! सहजचः दोन उरले, दोन फिरले, दोन विरले ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंद Mon, 05/25/2020 - 19:28 नवीन
खरं सांगायचं तर काफिया कडे लक्ष देता देता याकडे लक्ष गेलेच नाही. तुम्ही सांगितल्यानंतर मला हे लक्षात आले. आता थोड आश्चर्य वाटतंय याचं. पण आपले प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 06/01/2020 - 18:05 नवीन
काफिया पुन्हा-पुन्हा वापरण्यास काही हरकत नाही. >>>करण्या उजाड मजला, ढग संकटांचे आले. बरसून काही गेले, विरले नभात काही..>>> इथे मात्र दोनही ओळींत एक मात्रा अधिक आली आहे. >>सफलतेच्या >> लघू-गुरु क्रम बदलला गेल्याने लय अडखळली. >>फिरले दिशांत दाही >> रदीफ पाळल्या गेली नाही! खयाल कधी-कधी इतका मोहक वाटतो की निदान कसली सूट घेवून तरी,शेर लिहावाच! पण गझलेचा साज आणि बाज सांभाळणे ही देखिल आपली जबाबदारी असावी. >>सोसावयास नाही उरले जगात काही>> ही ओळ खासंच! पुलेशु!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 05/22/2020 - 08:04 नवीन
+1
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 05/23/2020 - 08:19 नवीन
ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही, सोसावयास नाही, उरले जगात काही..
असं काही नसतं. कल्पनेपलीकडील संकटे घडण्याची वाट बघत थांबलेली असतात.
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंद Mon, 05/25/2020 - 19:29 नवीन
हो खरंय
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/24/2020 - 05:55 नवीन
ही जिंदगी कश्याचे, देते धडे अजुनही, सोसावयास नाही, उरले जगात काही.. +1
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 35 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 40 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा