Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

स्वयंपूर्ण भारत: कोरोनापश्चात संकटातील संधी

व
वामन देशमुख
Tue, 05/12/2020 - 19:45
🗣 123 प्रतिसाद
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे. त्यांनी नवीन युगाचे पंचस्तंभ- अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, ऊर्जावान जनता, पुरवठा-व्यवस्था यांचे महत्त्व विशद केले.‌ भारत देशाला स्वावलंबी बनविण्याची क्षमता आपल्यात आहे हे त्यांनी वाइटूके आणि पीपीई किट्स् अशा उदाहरणातून सांगितले. स्थानिक उत्पादने खरेदी करून, लोकप्रिय करून, त्यांचा जागतिक ब्रँड बनवणे हा त्यांच्या भाषणातील बहूधा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता. कोरोना आणि त्यानंतरच्या संकटातील संधी यावर इथे चर्चा करूयात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 69938 views

🗣 चर्चा (123)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/22/2020 - 11:46 नवीन

लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य म्हणजे लोकशाही अशी एक लोकप्रिय व्याख्या राज्यशास्त्रात आहे. लोकशाही व्यवस्थेत सरकारात असलेले लोक हे जनतेचे प्रतिनिधी असतात आणि सामान्य जनतेचेच सरकार असते. भारतीय राज्यघटनेत सरकारच्या काही जवाबदा-या निश्चित केलेल्या आहेत. सरकारसाठी काही मार्गदर्शक तत्वेही असतात.  ”सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी १. म्हणून सरकारच्या ज्या जबादा-या आहेत त्या सरकारला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून तर निवडणूकीत विविध पक्ष नेते जनतेला काही आश्वासने देत असतात आणि त्या आश्वासनाची पूर्तता करणे त्या त्या सरकारांची जबाबदारी असते. नागरिकांची काही कर्त्यव्य आहेत.  आणि नागरिक कायद्यांचा पालन करीत असतात, आपण नागरिकशास्त्रात नागरिकांचे काही हक्क आणि कर्तव्य शिकलो आहोत.नागरिकांचे विविध कर्तव्यही आहेत.२ म्हणून सरकारकडे असलेल्या जवाबदारीतून सरकाळ पळ काढू शकत नाही. सरकारच्या वतीन आज रात्री आठवाजेपासून पाचशेची नोट बंद होईल, उद्या रात्रीपासून लॉकडाउन राहील असे म्हणून सरकारला थांबता येत नाही तर त्याची उत्तरदायित्व ही त्यांची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी आहे म्हणून ते रोजगार, उद्योगधंदे यांना प्रोत्साहित करणार्‍या विविध योजना आणत असतात. आणि नागरिक म्हणून आपण त्यात सहभागी होत असतो. सरकारला सरकारची कामे करु दिली पाहिजेत. आणि दिलेया आश्वासनांच्या पूर्ततेसाठी नागरिकांनी विरोधी पक्षांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे असेही वाटते 

 

१. सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे २. नागरिकांची कर्तव्य एक लेख
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/22/2020 - 15:39 नवीन
नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं आहे हो. पुढे काय?
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 05/22/2020 - 17:22 नवीन
पुढे काय? १५ लाखाची वाट बघणे आणि ते मिळाले नाही म्हणून शक्य होईल तिथे ओढून ताणून मोदींवर टीका करणे. ;)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 05/23/2020 - 14:30 नवीन
नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं आहे हो. पुढे काय?
क्या सॉलिड मारा!!!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 05/24/2020 - 04:55 नवीन
पुढे काय? पुढे काहीच नाही - मूळ प्रश्नाला बगल मारून तिसरेच काही तरी डकवणे - सतत सरकारने काय करावे हि चर्चा - नाकारघंटा,, मग कोणतीही योजना किंवा उपाय देशहिताचा असला तरी केवळ ना आवडणाऱ्या पक्षाचे आणि त्यांचं लोकवादात्या नेत्याने केली म्हणून फक्त विरोध - प्रत्यक्ष काम सोडून द्या काही कल्पना तरी द्यायच्या आपल्या वयसायातील.. ते हि नाही ( मेक इन इंडिया वर शिक्षण क्षेत्रात तरी प्राध्यपक साहेब काहीतरी सकरात्मक बोलतील असे वाटले होते ते पण काही नाही!) याशिवाय तारे तोडणारे इतर आहेक्ट "थोडांत " वैगरे गुऱ्हाळ चालू असणार
  • Log in or register to post comments
उ
उज्वल कुमार Sat, 05/30/2020 - 12:24 नवीन
भारत आणि चीन ची तुलना होणे थोडी अवघड आहे कारण दोन्ही कडच्या राज्यपद्धती वेगळ्या आहेत आपल्याकडे लोकशाही तिथे एकाधिकारशाही कुठलाही निर्णय तिथले सरकार आपल्या मर्जीने घेऊ शकते विरोधकांची काळजी नाही सर्वात महत्वाचे जमीन अधिग्रहण आणि पर्यावरण खाते जो आपल्याकडे सर्वात भयंकर प्रकार आहे तो तिथे नाही ( जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरे तिथेच आहेत तो विषय वेगळा ) कुठलाही नवीन उपक्रमकितीही मोठा असला तरी त्याला कुठलीही परवानगी मिळवण्यासाठी जास्त कष्ट लागत नाहि पोलीस भाई गुंडगिरी इत्यादी प्रकार फार कमी किंवा नाहीच अत्यंत कमी वेळेत सर्व परवानग्या लवकरात लवकर मिळतात कारण सर्व अधिकार एकवटले आहेत कॉम्युनिसीम असल्यामुळे कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी सरकार घेत असते।। तिथले सगळे उद्योग येणार नाहीत पण थोडआले तरी भरपूर आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/30/2020 - 17:17 नवीन
कॉम्युनिसीम असल्यामुळे कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी सरकार घेत असते. कुटुंबाच्या खाण्यापिण्याची सोय होते सोडले तर बाकी सरकार म्हणेल तेंव्हाच सुटीवर जायचे. एके काळी शांघाय सारख्या शहरात जर जोडप्याने राहायचे असेल तर बायकोला नोकरी करणेच आवश्यक होते आणि बायकांना पगार पुरुषांपेक्षा अर्धा (यामुळे भरपूर स्वस्त कामगार उपलब्ध होत असत). आताची स्थिती माहिती नाही. बहुसंख्य मोठ्या आणि लहान कंपन्या सरकारी मालकीच्या असल्यामुळे त्यात कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेतेच अधिकारी म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याची अजिबात सोय नाही. सदा सर्वकाळ देशहितासाठी तुम्ही त्याग केला पाहिजे. विरुद्ध बोलले तर देश द्रोहाच्या आरोपाखाली गोबी वाळवन्टात उंटांच्या पिसवांवर संशीधन करण्यासाठी बढतीवर नियुक्ती केली जाते. त्यानंतर त्या माणसाचे काय होते हे उंट नाहीतर पिसवांचं जाणोत. चीनमधील उद्योग हे अक्षरश कामगारांच्या रक्तमांसावर उभे आहेत. भारतात चीन सारखे उद्योग उभे करणे हि कर्मकठीण गोष्ट आहे. ज्यांना भारतीय उद्योगांचे असे का होते हे जाणून घ्यायचे असेल त्यांनी दादरी किंवा तिलैय्या येथील अति प्रचंड ऊर्जा प्रकल्पांचे (UMPP) काय आणि का झाले ते गुगलुन पाहावे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 06/02/2020 - 06:48 नवीन
भारतात चीन सारखे उद्योग उभे करणे हि कर्मकठीण गोष्ट आहे.
सुदैवाने (आणि दुर्दैवानेही) ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 05/31/2020 - 04:40 नवीन
पहिले मुद्दे पटले पण "..कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी सरकार घेत असते।" हे काही हजम नाही होत भय्या " आज भांडवलषयी जर्मनी किंवा निम भांडवलशाही ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंड मध्ये "तळागाळातील" कामगाराला जास्त हक्क आहेत , - ४-६ आठवडे सुट्टी - राष्ट्रीय विवाद्यकीय सुविधा - ग्लोबल फिअन्ननसिल क्रायसिस आणि सध्याचे कोविद यात कामगारांना दिलेली मदत ( हुजूर पक्ष असून)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 05/30/2020 - 14:58 नवीन
तिथले सगळे उद्योग येणार नाहीत पण थोडआले तरी भरपूर आहे अगदी बरोबर , जे तिसऱ्या देशातील वयवसाय , ज्यांना बाहेरून घेण्याशिवाय पर्याय नाही त्यानं चीन काय आणि भारत काय ! चिन कडून माल घेत आहेत ते काही सर्व लगेच भारता कडे येणार नाहीत कारण चीन यात फार पुढे गेलेला आहे.. ( मी काही असे प्रकलक हाताळलेले आहेत कि वस्तू होती पाश्चिमात्य बाजारपेठेसाठी परंतु उत्पादन आशियात त्यावेळी चीन आणि भारत यांचे गुण आणि दोष दोन्ही प्रत्यक्ष बघता आले त्यावरून लिहितो) परंतु काही उद्योग स्वतःच्या सुरक्षितेसाठी तरी चीन बाहेरील उत्पादक शोधतील यात शंका नाही ,या वेळीस भारताने जर प्रयत्न केले तर काहीतरी पदरात पडेल हि शक्यता आणि त्यासाठी सरकार आणि छोटे मोठे उद्योग यांनी प्रयत्न केला पाहिजे ...हेच मेक इन इंडिया पुढे रेटण्याचा ध्येय असावे असे वाटते .. पण विरोधासाठी विरोध करणाऱ्यांना ते समजून घ्यायचेच नाही तर काय करणार !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 05/31/2020 - 05:33 नवीन
Milind Soman Uninstalls TikTok, Joins Sonam Wangchuk's 'Boycott Chinese Products' Movement

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek Din Teri Raahon Mein... :- Naqaab
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 05/31/2020 - 07:55 नवीन
चौकस साहेब, तुमच्या कीबोर्डला काही झालंय का? :)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 06/01/2020 - 15:00 नवीन
का बरे? मी इसकाळ वर टंकलेखन करतो आणि ते येथे चिकटवतो.. पण फार अर्थाचे अनर्थ करणाऱ्या चुका होतात आणि मिपावर परत एडिट करता येत नाही देवनागरी टंकलेखनाचे सोपे कसे करायचे कळत नाही + आळस
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 06/02/2020 - 06:42 नवीन
देवनागरी टंकलेखनाचे सोपे कसे करायचे
इथे लिहा आणि मग मिपावर पेस्ट करा - https://www.google.co.in/inputtools/try/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/01/2020 - 14:26 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kum
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 06/02/2020 - 06:45 नवीन
दोन्ही व्हिडिओज आवडले, अगदी timely आहेत, धन्स!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/07/2020 - 16:45 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalte
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/01/2020 - 23:34 नवीन
माझे दोन पैसे - ८५-९०% वर मार्क असणाऱ्या प्रत्यके मुला -मुलीला मेडिकल ला ऍडमिशन मिळाली पाहिजे. आपल्याला, आणि एकूण जगालाच भरपूर डॉक्टर्स, नर्सेस ची गरज आहे. जसा भारतातून जगभरात आयटी साठी मनुष्यबळ जातं तसंच डॉक्टर्स, नर्सेस सुद्धा गेले पाहिजेत आणि तेवढेच भरपूर भारतात पण उपलब्ध झाले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 06/02/2020 - 06:46 नवीन
जसा भारतातून जगभरात आयटी साठी मनुष्यबळ जातं तसंच डॉक्टर्स, नर्सेस सुद्धा गेले पाहिजेत आणि तेवढेच भरपूर भारतात पण उपलब्ध झाले पाहिजेत.
१००% सहमत!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/02/2020 - 08:14 नवीन
भारतात ६०,०००( साठ हजार) डॉक्टर्स ची आणि १० लक्ष नर्सेसची कमतरता आहे. https://economictimes.indiatimes.com/industry/healthcare/biotech/healthcare/india-facing-shortage-of-600000-doctors-2-million-nurses-study/articleshow/68875822.cms?from=mdr#:~:text=In%20India%2C%20there%20is%20one,shortage%20of%20two%20million%20nurses. There are 272 Medical MBBS Colleges in India, which will offer total 41,388 government seats in 2020, in which you will be able to take admission through NEET UG 2020 score. And in total there are 531 medical colleges in India and 78,348 medical seats are available as on today through NEET UG score in 2020. https://getmbbsadmission.com/government-medical-seats/#:~:text=There%20are%20272%20Medical%20MBBS,NEET%20UG%20score%20in%202020. हि सद्य स्थिती आहे. सरकार वैद्यकीय शिक्षणावर आणि वैद्यकीय सेवेवर पैसे खर्च करू इच्छित नाही. यामुळे केवळ कायद्याचा बडगा दाखवून डॉक्टरांकडून कामे करून घेण्याचा सोपा मार्ग सरकार निवडत आहे. सरकारी रुग्णालयातून डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात एक वर्ष नोकरी करायची त्यानंतर नीटची परीक्षा द्यायची त्यातून पदव्युत्तर पदवी मिळवली कि २ वर्षे परत सरकारची वेठबिगारी करायची. ग्रामीण भागात सेवा देण्याबद्दल अनमान नाही परंतु हाच न्याय वकील सी ए इंजिनियर आय आय टी या सर्व व्यवसायांना हाच नियम का लागू हात नाही. समानता या मूलभूत न्यायालय हरताळ फासला गेला आहे. याच बरोबर अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दरात मिळाली पाहिजे या मनस्थितीतील भारतीय जनता असे असल्यामुळे अनेक डॉक्टर एम बी बी एस झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय ऐवजी इतरत्र पैसा मिळवण्यासाठी जाताना दिसतात. भारतात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १.६ % हा आरोग्यावर खर्च केला जातो दरवर्षी दरडोई रुपये १६५७. याउलट अमेरिकेत हाच त्यांच्या सकल उत्पन्नाच्या १८ % खर्च केला जातो. दरवर्षी दरडोई रुपये ७७,०००/- . भारतात आरोग्य विम्यावर केलेला खर्च हा फुकट जातो अशीच मानसिकता आहे. मुळात वैद्यकीय उपचारावर केलेला खर्च हाच फुकट जातो अशी मानसिकता आहे. तेंव्हा हे असेच चालायचे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 06/02/2020 - 12:04 नवीन
समानता या मूलभूत न्यायालय हरताळ फासला गेला आहे. सहमत. याच बरोबर अमेरिकेच्या दर्जाची वैद्यकीय सेवा बांगला देशाच्या दरात मिळाली पाहिजे या मनस्थितीतील भारतीय जनता असे असल्यामुळे अनेक डॉक्टर एम बी बी एस झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय ऐवजी इतरत्र पैसा मिळवण्यासाठी जाताना दिसतात. डॉक्टरांनी फक्त तपासायचे ७०० रू. घेतले , अनावश्यक चाचण्या करायला सांगितल्या, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टर लुटतात असे अनेक सुशिक्षीत लोकही म्हणू लागलेत. जिवापेक्षा पैसा महत्वाचा वाटू लागलंय लोकांना.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/03/2020 - 08:15 नवीन
ग्रामीण भागात सेवा देण्याबद्दल अनमान नाही परंतु हाच न्याय वकील सी ए इंजिनियर आय आय टी या सर्व व्यवसायांना हाच नियम का लागू हात नाही. समानता या मूलभूत न्यायालय हरताळ फासला गेला आहे.
समानता या मुद्द्याशी सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/02/2020 - 21:09 नवीन
उत्तम होमिओपॅथी आयुर्वेद सिद्ध अशाच पॅथी कडे वळा. स्वस्तात उत्तम काम होईल. जाता जाता- काल माझा इन्व्हर्टर बिघडला दुरुस्तीचे 1500 रुपये. तंत्रज्ञाची शैक्षणिक अर्हता माहिती नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा