Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

स्वयंपूर्ण भारत: कोरोनापश्चात संकटातील संधी

व
वामन देशमुख
Tue, 05/12/2020 - 19:45
🗣 123 प्रतिसाद
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे. त्यांनी नवीन युगाचे पंचस्तंभ- अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, ऊर्जावान जनता, पुरवठा-व्यवस्था यांचे महत्त्व विशद केले.‌ भारत देशाला स्वावलंबी बनविण्याची क्षमता आपल्यात आहे हे त्यांनी वाइटूके आणि पीपीई किट्स् अशा उदाहरणातून सांगितले. स्थानिक उत्पादने खरेदी करून, लोकप्रिय करून, त्यांचा जागतिक ब्रँड बनवणे हा त्यांच्या भाषणातील बहूधा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता. कोरोना आणि त्यानंतरच्या संकटातील संधी यावर इथे चर्चा करूयात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 69938 views

🗣 चर्चा (123)
भ
भीमराव Tue, 05/12/2020 - 21:14 नवीन
एक आयडीया देऊ का? उद्या उठुन समोर दिसणारी प्रत्येक वस्तु कागदावर लिहायची. भारतात बनलेली आहे का चीन मधे हे त्याच्या समोर लिहायचं. तुम्ही जीथे जाल तिथे हा प्रयोग करू शकता. यातून काय मिळणार? यादी मिळनार भावांनो यादी. भन्नट गोष्टींची. आपण काय काय करू शकतो याची.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/13/2020 - 07:31 नवीन
उद्या उठुन समोर दिसणारी प्रत्येक वस्तु कागदावर लिहायची.
काही वस्तू सहजच आठवल्या - डास मारण्याची बॅट मोबाइल चार्जर (आणि बहुतेक सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू) स्क्रू, नट-बोल्ट्स (आणि इतर कंझ्यूमेबल्स) हातोडी, पाना, पक्कड (आणि इतर टूल्स) विनाइल, पीवीसी, पॉलीथीन, पोलीस्टिरीन इ. पासून बनलेल्या वस्तू प्लास्टिक, धातू, रबर इ.ची खेळणी डम्बेल्स, बारबेल्स, त्यांची जड रबराची वजने आणि व्यायामाची इतर साधने बैठ्या खेळाची साधने - बुद्धिबळ, ल्युडो, व्यापार इ. . . . औद्योगिक उत्पादने - machinery, equipment, tools and consumables ... खरंच खूप मोठी संधी आहे, टॅप करण्याची गरज आहे. रच्याक, जगातल्या कुठल्यातरी भागात एखादी वस्तू (उदा. वाढदिवसाला वगैरे रंगीत कागदाचे छोटे तुकडे उडवणारा बॉम्ब) तयार होते, ती ट्रक/ रेल्वेमधून तिथल्या बंदरात जाते, जहाजातून भारतात (उदा विशाखापट्टणमला) येते, तिथून ट्रकमधून होलसेल गोदामात येते, तिथून रिक्षा / छोट्या ट्रकमधून कोपऱ्यावरच्या किरकोळ दुकानात येते आणि तरीही मला ती वस्तू पाच-पन्नास रुपयांना मिळते! कुठल्याही विशेष तंत्रज्ञानची गरज नसलेल्या अश्या वस्तू खरंतर गावोगावी तयार व्हायला हव्यात.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/13/2020 - 00:52 नवीन
स्थानिक उत्पादने खरेदी करून, लोकप्रिय करून, त्यांचा जागतिक ब्रँड बनवणे १००+ जगातील अनेक उद्योग "चीन वर आता अवलंबून असणे कमी करावे" याचाच विचार करीत आहेत तेव्हा भारताने आपली पोळी भाजून घावी.. पण ते फक्त आई टी क्षेत्रात नव्हे तर उत्पादन क्षेत्रात हि.. पाया भक्कम आहे पण वाढव्लि पाहिजे ति इमारत . पण त्यासाठी उद्योग आणि सरकार यांनी मिळून परदेशात जोरदार गाजावाजा केला पाहिजे तरच होईल .. निर्यात दौरे ( शोकेस ) इत्यादी उपक्रम राबवले पाहिजेत .. आहे हरी तर देईल खाटल्यावरी असे करून उवयोग नाही जर्मनी किंवा छोटेखानी सिंगापोर सारखे देश स्वतःला value added exporter म्हणून कसे जगासमोर आणतात ते पहा ( आणि अर्थतच "मोदींनी घोशना केली म्हणजे टीका केलीच पाहिजे" या तमाम ग्यांग नि काही चांगले करता येत नसेल तर निदान गप्प तरी बसावे " गांधीनीच म्हणले होते ना कि "कच्चा माल देऊ नये आणि पक्का माल घेऊ नये" त्याच्या उलट करावे .. मग या ग्यांग नि पूज्य गांधींचे तरी ऐकावे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/13/2020 - 07:39 नवीन
जगातील अनेक उद्योग "चीन वर आता अवलंबून असणे कमी करावे" याचाच विचार करीत आहेत
ही भारतातील आणि ही अमेरिकेतील बातमी #स्वावलंबी_भारत हे भारत सरकारचे धोरण पुढच्या दोन-तीन वर्षांत कितपत यशस्वी होते हे पाहायचे यात आपला वाटा काय आणि किती राहील ते आत्ता ठरवायचे !
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 05/13/2020 - 05:18 नवीन
जागतिक ब्रँड बनविणे गेले खड्ड्ड्यात निदान आपल्याला हवे ते तरी आपण तयार केले पाहिजे . आता इस्र्रो ला विसरा व सी टी स्कॅन , एम आर आय मशीन , अधिकाधिक सरकारी रुग्नालये देशात औषध निर्मितीस प्रोत्साहन संगणकातील हार्ड वेअर ,सर्व नागरिकास सक्तीचा आरोग्य विमा शेतीत सहकारी संघाची स्थापना ,वैयक्तिक शेतीवर पूर्ण बंदी ,सरकार तर्फे जमीन ,हवा पाणी ,शेतकी वस्तुचे जीवनावश्यक यादीतील स्थान ई चा विचार करून पीक नियोजन ई अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत . पण समाजवादापासून जग इतके आता दूर गेले आहे की ...... यातले काहीही होणार नाही.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/13/2020 - 07:03 नवीन
सरकार तर्फे जमीन ,हवा पाणी ,शेतकी वस्तुचे जीवनावश्यक यादीतील स्थान ई चा विचार करून पीक नियोजन ई अनेक गोष्टी
तेलंगण शासनाने या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. या हंगामात, ५० लाख एकरांवर भातपिकाची नियंत्रित लागवड करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तेलंगण सोना या भाताच्या वाणाची लागवड दहा लाख एकरांवर, डाळींची लागवड दहा लाख एकरांवर आणि कपाशीची लागवड ५० लाख एकरांवर करण्यात येईल. कुठल्या भागात, कोणती पिके, किती प्रमाणात घेण्यात यावीत याचा निर्णय घेण्याची घोषणा करण्यात आली. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/13/2020 - 12:58 नवीन
समाजवाद असो नाहीतर भांडवलशाही .. काही म्हणा आयातीं पेक्षा निर्यात करणे हे कधीही चांगलेच असते , असे करून आपला देश समृद्ध होऊ शकतो अर्थात अंतर्गत बाबीत हि त्याचा फायदा होतोच... स्वातंत्र्य नंतर मेक इन इंडिया हे धोरण होते म्हणून उद्योग निर्माण झाले आणि देशांतर्गत विविध तंत्रण्याना निर्माण झाले . आता तेच धोरण निर्याती साठी वापरून देशाला फायदाच नाही का होणार? मग त्याला धुडकावून कशाला देता.. हा असे म्हणा हवे तर कि आधी स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रन्यान विकसित करा आणि मग निर्यात .. करा
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/13/2020 - 13:09 नवीन
अहो आज भारतीय घरात जेवढया मेड इन इंडिया गोष्टी दिसतात तेवढया इतर देशात त्यांचं त्यांचं देशात बनलेल्या दिसत नाहीत ... त्यामुळे भारताचाच अभिमान वाटलं पाहिजे भारताची नागरिकांना .खड्यात कशाला घालताय कल्पना.. आज महिंद्रा आणि टाटा भारतीय बनावटीची गाडी बनवतात ... इथे ऑस्ट्रेलियात इंजिनेर लोकं रडली.. यावर्षी शेवटची ऑस्ट्रेलियन बनावटीची होल्डन गाडी बनवली गेली... एकेकाळी टोयोटा फोर्ड, निसान , होल्डन असे ५ उद्योग होते हळू हळू बंद पडले..कायमचे ते तंत्रण्याना देशातून संपून गेले...
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 05/14/2020 - 12:42 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 05/13/2020 - 12:48 नवीन
चांगली चर्चा https://misalpav.com/node/46666 इथेही हि चर्चा सुरु केली होती वेगळा धागा काढल्याने बरे झाले
  • Log in or register to post comments
ब
बन्डु Wed, 05/13/2020 - 16:34 नवीन
परदेशी बनावटी च्या मोबाईल / लॅपटॉप वर स्वदेशीच्या गप्पा?
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Wed, 05/13/2020 - 16:41 नवीन
q मार्केट रिसर्च हे स्वत: एक मोठं क्षेत्र होऊ शकतं. उदाहरणार्थ- नागपंचमी ला पुजला जानारा नागोबा, गणपती, सुगड्या, बैल, आकाश कंदील, छ. शिवाजी महाराजांचे फोटो काढलेली jakets, हा माल सुद्धा चायना वरून येतो. मग मला प्रश्न पडला, तिथल्या लोकांना कसं समजलं असेल भारतात, महाराष्ट्र नावाचं राज्य आहे तिथे अमुक सण साजरे होतात, त्या साठी अमुक वस्तू लागतात? बाहेरचे देश राहुद्या, आपल्याला किती माहिती आहे तामिळनाडू च्या उत्सवांची? उद्योगाच्या संधी शोधून आणनं एक मोठा उद्योग आहे. विचार करा मित्रांनो, आपण मिसळपाववर घरच्या गणपतीच्या सजावटीचे फोटो घेतले होते, त्यावेळी Do it yourself चं वारं होतं, मग अशा परिस्थितीत मखर तयार करण्यासाठी लागणारा कागद, साहित्य एकाएकी बाजारात उपलब्ध झालं. हा कागद आपल्या घोटीव कागदापेक्षा वेगळा होता. अधीक आकर्षक होता. हि टूम सुरू झाली तेव्हा आपल्याकडे boycott china मोहीम चालू होती. चायनीज सजावटीचे सामानाचा विरोध म्हणून आपण मोहीम चालू केली आणि याला संधी मानुन परत चायनावालेच त्यांचं सामान विकुन गेले. एखाद्या देशात चाललेल्या एखाद्या ट्रेंडचं विष्लेशन करुन व्यावसायिक उपयोग करण्यासाठी किती कार्यक्षम मार्केट रिसर्च व्यवस्था लागेल?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 05/14/2020 - 09:55 नवीन
एखाद्या देशात चाललेल्या एखाद्या ट्रेंडचं विष्लेशन करुन व्यावसायिक उपयोग करण्यासाठी किती कार्यक्षम मार्केट रिसर्च व्यवस्था लागेल?
अ‍ॅक्चुअली, आणि चीन ते फार इफेक्टिव्हली राबवतो. शिवाय नुसता प्रॉडक्टवरचा मेड इन चा शिक्का ग्राहक पाहतो ते डायरेक्ट उत्पादनात. काही गोष्टी अशा असतात की थोड्याश्या लोकांना डायव्हर्ट केलं की ते त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या लोकांना/ग्राहकांना सुंदर डायव्हर्ट करतात. हे मार्केटिंग खूप मस्त लेव्हलवर चालते. दोन सिंपल उदाहरणे. नॉकाऊट बीरचा खप वाढ्वण्यासाठी वेटरला त्याने दिलेल्या एका नॉकाऊट बीरच्या ढक्कनला ५ रुपये दिले जात. वेटर मग ग्राहकाने इतर कोणतीही बीर मागीतली की थंड नाहीये, ग्यास कमीय, नॉकाऊट कशी भारी ह्याचे गुणगान गात ती खपवत. अगदीच कट्टर असणार इतर ब्रॅन्ड्चे चाहते सोडले तर इतर लोक आपोआप नॉकाउट कडे डायव्हर्ट झाले. दुसरे म्हणजे प्रिंटिंग प्रेस क्षेत्रात आधी कागदाच्या कंपन्या मर्यादित. बरेच स्पेशल कागद परदेशातून येत. पण इथे ग्राहक कोण तर प्रेसवाले. मग चीनी कंपन्यानी त्यांना हाताशी धरले. काही जास्त बिझनेस असणार्‍या प्रेसवाल्यांना चीनच्या ट्रीपा करवून आणल्या. मोठ्या मोठ्या क्रेडीटच्या ऑफर दिल्या गेल्या, ते भारतात परतेपर्यंत त्यांचा स्टॉक रेडी प्रिंट आणि पॅक एक्झिबिशनमधे हे हंटिंग केले गेले. काही विशिष्ठ कागद (आर्ट कार्ड) इतक्या कमी रेट मध्ये भारतात ओतला गेला की भारतातल्या कंपन्यांचा तो कागद खपणे तर कमी झालेच शिवाय इतर काही त्याच्या जवळपासचे कागदाचे प्रकार वापरणारेही चीनी आर्ट कार्ड कडे डायव्हर्ट झाले. बर छापून घेणार्‍या ग्राहकाला कधीच हे कळत नाही की हा कागद चिनी आहे की भारतीय. ते असा आग्रह धरु शकत नाहीत. प्रेसवाले थोडे असतात पण ते असे मार्केट चेंज करतात. अर्थात त्यांना ह्याचा मोबदला प्रचंड मिळतो. सर्व ग्राहकांना शहाणे करण्यापेक्षा अशे ड्रायव्हिंग फोर्स पकडणे सोपे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/13/2020 - 16:48 नवीन
लोकांना स्वदेशी वस्तूंची हौस असेल तर जास्त पैसे मोजायची तयारी ठेवली पाहिजे. ती फारच थोड्या जणांची दिसते. सध्या मी मुळ धंदा बंद असल्यामुळे कॉन्टक्टलेस थर्मल टेम्प्रेचर गन, सॅनिटायझर स्प्रे असल्या वस्तू विकायचा प्रयत्न करत आहे. लोकांचा पहिला प्रश्न असतो की आम्हाला चायना चा माल नकोय. तसेच त्यांना वस्तू स्वस्तात ही हवी आहे. आज मार्केट मधे कोणताच सप्लायर इतर देशातून आलेली टेम्प्रेचर गन विकत नाहिये कारण त्या मुळात उपलब्धच नाहीत. असतीलच तर चायना च्या भावात विकूच शकत नाही. चीन देखील हुशार झाला आहे. आता बराच माल 'मेड इन चायना' न लिहिताच येत आहे. आमचे डिलर्स आणि आम्ही नाईलाजास्तव तोच माल तैवान वरुन इम्पोर्ट केला आहे असे सांगून विकतो. ग्राहक पण मग सगळे माहित असून खोटा खोटा खुश होत तो माल विकत घेतो. त्यामुळे चीन ला टक्कर देण्याच्या बाता म्हणजे सध्या तरी नुसत्याच गप्फा आहेत. आपल्या लोकांना अधूनमधून स्वदेशी चा झटका येत असतो. थोड्या दिवसाने लोक सगळे विसरून जातात.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 05/13/2020 - 21:32 नवीन
काहि दिवस हा खेळ चालेल. मग सगळं शांत.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Wed, 05/13/2020 - 17:03 नवीन
रेट काय आहे इन्फ्रारेड टेंपरेंचर मेजरमेंट उपकरणाचा? वैयक्तिक संदेश पाठवा.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/13/2020 - 17:52 नवीन
रेट काय आहे इन्फ्रारेड टेंपरेंचर मेजरमेंट उपकरणाचा?
इथंच सांगा हो.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/13/2020 - 19:45 नवीन
३ ते ६ ह्जारपर्यंत कोणत्याही भावात उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 05/13/2020 - 18:20 नवीन
आपल्या देशात देशात स्वतः च्या देशाविषयी अभिमान नाही आणि प्रेम पण नाही. देशात आत्म् निर्भर होण्याची पूर्ण क्षमता आहे पण त्याची जाणीव च देशात आणि देश वासिया मध्ये नाही. शेती उत्पादन देशात प्रचंड आहे भाज्या,टोमॅटो,दूध भाव मिळत नाही म्हणून फेकून द्यावे लागते उत्पादन भरपूर आहे . तिथे फक्त कोणती पीक कोणत्या प्रमाणात घेण्याची माहिती शेतकऱ्यानं पर्यंत पोचणे गरजेचे आहे. शेती वर मालकी हक्क सरकार नी सांगायची गरज नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती उद्योग घरगुती उद्योग म्हणून उभा करता येईल. देशात असंख्य लोक बेरोजगार आहेत त्यांना छोट्या वस्तू बनवण्याचे काम दिले तर चीन पेक्षा स्वस्त वस्तु इथे निर्माण केल्या जातील आणि रोजगार पण.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 05/13/2020 - 18:41 नवीन
मी सहसा चर्चा विषयांमध्ये भाग घेत नाही पण हा धागा विषय महत्वाचा आहे. टीका होईल पण त्याची पर्वा करू नका! सद्य परिस्थितीत केंद्र सरकार जी पावलं उचलतय, ज्या योजना जाहीर करतंय त्याचे स्वागत आहेच. पण तरीही एक कोडं मात्र मला कायम पडलेल आहे की अर्थमंत्रीपदी निर्मला सितारामन सारख्या व्यक्तीला मोदी साहेबांनी का बसवलं ? अशी काय थोरवी आहे त्यांची? मागच्या टर्म मध्ये त्या MCA च्या मंत्रीपदी होत्या, तेव्हा त्यांनी केलेले उपद्व्याप अजून निस्तरले गेले नाहीयेत. भाजपा विषयी किंवा कुठल्याच राजकीय पक्षाविषयी काडीमात्रही आपुलकी नसूनही रोखठोक - कर्तव्यतत्पर अशा मोदी साहेबांविषयी आदर असल्याने हा प्रश्न पडला आहे. सदर विषयावर सविस्तर प्रतिसाद देईनच! तूर्तास एवढेच.
  • Log in or register to post comments
श
शेखरमोघे Wed, 05/13/2020 - 20:44 नवीन
छान लेख - पण त्यातून निर्माण होणारे मुद्दे "कुठला पक्ष बरोबर" हे ठरवण्याकरता सोपे नाहीत. लोकांना स्वदेशी वस्तूंची हौस असेल तर जास्त पैसे मोजायची तयारी ठेवली पाहिजे.: "बाहेरून (मुख्यत्वेकरून चीन किन्वा भारत) औषधे आणण्यापेक्षा अमेरिकेतच औषधाना आवश्यक रसायने (Active Pharmaceutical Ingredient API)) का बनवू नयेत?" हा सध्या अमेरिकीत चालू झालेला वाद, काही कारणाने मी अभ्यासत आहे. अशी औषधाना आवश्यक रसायने अमेरिका बनवू शकत नाही अशातला भाग नाही पण ही रसायने अनेक वर्षान्पासून अमेरिकेत बनवणे खर्चिक ठरत गेल्याने - कामगारान्चा पगार, एकूण खर्च, पर्यावरणाच्या दृष्टीने पाळायला कठीण नियम अशा अनेक कारणानी - हळू हळू अमेरिकेत बनवून वापरण्यापेक्षा चीन किन्वा भारतातून बनवून आणणे स्वस्त पडेल हे जसे लक्षात येत गेले तसे अमेरिकेतली या रसायनान्ची आयात वाढत गेली. आता API चीन किन्वा भारतातून निर्यात करण्याकरता निर्बन्ध आल्यामुळे अमेरिकेत सुरू झालेला "स्वदेशीचा विचार" त्याकरता लागणारा वेळ (काही वर्षे), अशा उद्योगान्करता लागणारी काही हजार कोटीन्ची गुन्तवणूक आणि तरीही त्यातून निर्माण होणारी उत्पादने जास्त खर्चिक ठरण्याची शक्यता हे सगळे लक्षात घेता हा पर्याय अव्यवहारी ठरेल हा सूर वाढता आहे. मी चीनमधील उद्योगधन्द्यान्ची प्रगतीआणि त्याकरता लागणार्‍या सोयीसवलती साधारण १९८२पासून पहात आहे. भारतातील उद्योग जर "एका छपराखाली काही हजार कामगार आणि/किन्वा काही एकर" या स्तरावर केला जात असेल तर चीनमध्ये तोच उद्योग "एका छपराखाली काही लाख कामगार आणि/किन्वा काही हेक्टर (२.५ एकर)" या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळे भारतातील cost competitive रहाणे कठीण होते. इतरही अनेक अडचणी भारतातील उद्योगाला मागे खेचतात - उदा. निर्यातीकरता तयार माल भरलेला Truck जेव्हढ्या वेळात सगळे कागदपत्र मिळवून, वेगवेगळ्या ठिकाणच्या तपासण्यानन्तर जेव्हा पुण्याहून मुम्बई/न्हावा शेवा इथे फक्त जहाजाजवळ पोचतो तेव्हढ्या वेळात चीनमध्ये त्याच अन्तराकरता जवळच्या बन्दरातला आयात माल कारखान्यात पोचतो आणि (त्याच Truck मधून) निर्यात करण्याचा माल जहाजावरही चढतो. अशा लाल फितीत "आत्मनिर्भर"वगैरे प्रचार देखील हळूहळू दिसेनासा होणे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/14/2020 - 01:35 नवीन
मेक इन इंडिया चे दोन भाग आहेत एक स्थानिक बाजारपेठे साठी आणि दुसरे निर्याती साठी त्यातील निर्याती संबंधी बोलत आहे येथे ईश्वरदास "एखाद्या देशात चाललेल्या एखाद्या ट्रेंडचं विष्लेशन करुन व्यावसायिक उपयोग करण्यासाठी किती कार्यक्षम मार्केट रिसर्च व्यवस्था लागेल?" अगदी बरोबर आणि त्यासाठी , श्रम लागतात तसा विचार करावा लागतो... १) तो करण्याची भारतीय उद्योगांची तयारी असतेच असे नाही उदा: आज भारतातील दोन स्थानिक गाड्या बनवणारे उद्योग येथे ऑस्ट्रेलियात त्यांचं निर्यात करतात पण जाहरितीवर पैसे करताना दिसत नाहीत मग धंदा वाढणार कसा? तेच कोरियन कंपनीय करतात !) २) सरकार चे धोरण पण त्याला पूरक असावे लागते ते हि बरेचदा घिसाडी घाई .. मागे एकदा नॅस्कॉम अंतरार्स्थत्रीय प्रदर्शनात ला विचारले कि इंजिनीरिंग क्षेत्रात जे डिझाईन करून देण्याचे निर्यात काम होते ते जरी बाकी आय टी तील कामापेक्षा कमी असले तरी महत्वाचे आहे त्यासंबंधी काही माहिती आहे का? तर शून्य माहिती होती ) धर्मराजमुटके: "त्यामुळे चीन ला टक्कर देण्याच्या बाता म्हणजे सध्या तरी नुसत्याच गप्फा आहेत" अगदीच खोटे नाही पण सध्या इतर देश जर चीन ला पर्याय शोधात असतील तर भारतासारख्याला हि संधी आहे आणि दुसरे असे कि मला वाटते आपण "चिनी मालाची भारतातील आवक आणि त्याविरुद्ध मेक इन इंडिया " यावर बोलता आहात.. आणि मी :मेक इन इंडिया फॉर एक्स्पोर्ट" यावर बोलत आहे असो मला भारतातील परिस्थिती १००% माहित नाही पण २ मुद्दे या संधर्भात " चीन मधील माल म्हणजे कचकड्याचा हा काळ गेला आज येथे $८० ला आणि नामांकित ब्रँड चा $२०0-३०० ला मिळणार एअर फ्र्यार दोन्ही चीन मध्ये बनलेला दिसतो.. आणि नियम कडक असल्यामुळे दोन्ही ला हि हे घोषित करावेच लागेल कि माल "मेड इन चीन बनलेला आहे" ते आणि कमीत कमी १२ म्हणायची खात्री दव्यावीच लागते.. भारतात हे नियम कदाचित नसतील किंवा पाळले जात नसतील म्हणून भारताला वाईट अनुभ येत असेल याशिव्या स्वतः कडे तंत्रन्यान असताना कशाला चीन या प्रतिस्पर्ध्याच्या चे जेहें हि भावना हि असू शकते काहीच चुकीचे नाही त्यात आम्हला इथे स्वदेशी करायला इनमीन २.७ कोटी त्यात काय करणार आणि शिवाय जगापासून दूर त्यामुळे दृशीतकोण वेगळा आहे थोडा शेखरमोघे आपला हा अभ्यास निश्चितच रोचक आहे त्यात स्थानिक सरकारी धोरण वैगरे अनेक मुद्दे येतत् अजून त्यावर जरूर लिहा किंवा व्यनि करा . मी थोड्या प्रमाणात हे अनुभवला आहे असे प्रोजेक्ट होते कि युरोपी बाजारासाठी ऑस्ट्रेलियात रचना अकेलेले ,मलेशिया मध्ये बनवलेलं आणि सुट्टे भाग चीन ते जर्मनी पर्यंत विविध देशातील आपल्याला माहिती असेलच कि अनेक कारणासाठी उद्योग उत्पादन "स्वदेशी " ठेवतात यात सरकारी धोरण, स्वालंबीत पणा , गुप्तता, मुख्य बाजारपेठ कुठली इत्यादी अनेक मुद्दे असतात एक उदाहरण देतो: फिशर अँड पायकेल हा फारसा माहिती नसलेले पण यशस्वी वॉशिंग मशीन चा ब्रँड त्यांनी छोट्या न्यू झीलंड मधून बाहेर पडताना जवळच्या ऑस्ट्रेलिया मध्ये फ्रीझ आणि वॉशिंग मशीन बनवण्याचा कारखाना काढलं तो हळू हळू बंद केला आधी त्यातील वॉशिंग मशीन उत्पादन थांबवले आणि ते कोठे इतर देशी नेलं ? कुठे? चीन ला असणार ? असे सगळे म्हणाले तर नाही मेक्सिको ला कारण अमेरिकन बाजारपेठ जवळ आणि वॉशिंग मशीन किंवा मोठ्या फ्रीझ मध्ये जेव्हा कारखानयातून ग्राहक पर्यंत तो नेला जातो यात उद्योगाला "घनफुटाचे" पैसे मोजावे लागतात वजनाचे नाही ते काहीसे कारण पण होते मी असं ऐकलय कि Apple ने आपला मॅकबुक चे उत्पादन पूर्वीच चीन मधून काढून परत अमेरिकेत आणले ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 05/14/2020 - 03:16 नवीन
प्रधामन्त्री आज बोलले की लगेच उद्या पासून बदल होणार नाही. आणि दुसरी गोष्ट ही फक्त सरकार ची इच्छा असून फायदा नाही जनतेत पण जिध्द हवी. पहिली नकरमक्त विचार सोडून दिले पाहिजेत. स्वतःची ताकत ओळखता आली पाहिजे त्याची जाणीव झाली पाहिजे. आपल्या देशाला हे जमणार हे विचार सोडून दिले पाहिजेत. सर्व क्षेत्रात एकदम स्वदेशी होण्या पेक्षा अशी क्षेत्र निवडली पाहिजेत जिथे आपण आत्मनिर्भर होवू शकतो. आणि त्याच क्षेत्रात प्रयत्न केले पाहिजेत यश नक्की मिळेल. आपल्या कडे ज्ञान आणि कष्ट करणाऱ्या माणसाची कमी नाही. सरकारी पातळीवर ज्या अडचणी आहेत ते त्या सोडवतील . पाहिले मनाने तरी तयार व्हा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/14/2020 - 04:33 नवीन
सहमत... जिथे शक्य आणि उपयोक्त असेल तिथे स्वदेशी.. उगाच उर बडवून घेण्यात अर्थ नाही हे हि खरे आणि ज्याला निर्यात करायची आहे त्याला आयात बद्दल तक्रार करता येणार नाही आणि मी जे म्हणतोय ते म्हणजे स्वदेशी बनवून निर्यात करा ( आणि ती उत्पादने कदाचित स्थनिक देशासाठी नसतील हि ) आज जसे डिझाईन मध्ये काही वैद्यकीय उपकरणे भारतात डिझाईन होतात ती भारतीय बाजारपेठेसाठी नसतात सुद्धा) पण लोक काय करता आहेत कि "हा केली मोदींनी घोषणा केली ना मग करा सुरु करा विरोध आंधळे पणे .. दुर्दैव दुसरे असे कि मेक इन इंडिया हि जरी आजची घोषणा दिसत असली तरी मूळ नेहरूंच्या काळात सुद्धा त्यांनी भारतीय उद्योग वाढण्याला मदत केली ते हि मेक इन इंडियाचं होते ( अर्थात पुढे त्या धोरणाचे अति झाले फक्त पद्मिनी आणि हिंदुस्थान मोटार आणि बजाज स्कुटर ला १0 वर्ष वेळ लागायचा $९०० डॉलर दिले तर १ वर्षात मिळायची तो काळ) म्हून आज भारतात घड्याळे. मशीन टूल, गाड्या, अर्थ मूव्हर्स आणि एक्स रे मशीन बनतात ... तेवहा काँग्रेस च्या लोकांचा का याला विरोध ते कळत नाही
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 05/14/2020 - 06:55 नवीन
आणि दुसरी गोष्ट ही फक्त सरकार ची इच्छा असून फायदा नाही जनतेत पण जिध्द हवी. मी ६ वर्षे सरकारी व २२ वर्शे खाजगी नोकरी केली .आता सुखवस्तू जीवन जगत आहे. आम्हा दोघांनाही भिकार पगार होते पण मी गर्वाने म्हणू शकतो की माझ्या पातळीवर मी एक उत्तम अर्थतज्ञ आहे . फायनानस एक्स्पर्ट व इकॉनॉमिस्ट यातील फरक मी नीट समजावून घेतला . मी इकॉनॉमिस्ट आहे . इकॉनॉमिस्ट तो असतो जो आपल्या गरजांची उत्तम मांडणी तरुण वयातच करतो व आपले सर्व रिसोर्सेस त्या पद्धतिने वापरतो.आज भारतात माझया दोन नोकर्यांचच्या अनुभवाने मी नक्की म्हणू शकतो की सायबाची घंटी हलवा व प्रमोशन मिळवा ही संस्कृती जोपर्यंत भारत देशात आहे तोवर नेमंकी चुकीची माणसे वरिष्ठ पदी येत राहाणार व चुकीचे निर्णय घेणार ! आपण अगदी निर्दय प्रोफेशनल व्हायची गरज नाही पण भारतातील माणसे सर्व थरावर अत्यंत अकार्यक्षम व अप्रामाणिक आहेत.अशाना घराचा रस्ता दाखविणारे कायदे झाले पाहिजेत. ओव्हर टाईम न देता फक्त मसाला डोसा देऊन तीन तीन तास फुकट काम करून घेणारे उद्योगपती तुरुंगात गेले पाहिजेत. कामचुकार कर्मचारी कामगार व जुलमी मालक यांना ढेर करता आले तर सगळे ठीक होईल .जिथे तीन फुटाचे अंतर ठेवा म्हटले तर पोलिसांना मारहाण होते. व तीन फुटाचे अंतर ठेवून ही मोंर्निग वाक वाल्या ना पोलिसाकडून मारहाण होते त्या देशात कशाची अपेक्षा करावी ?
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 05/14/2020 - 12:30 नवीन
मी इकॉनॉमिस्ट आहे . इकॉनॉमिस्ट तो असतो जो आपल्या गरजांची उत्तम मांडणी तरुण वयातच करतो व आपले सर्व रिसोर्सेस त्या पद्धतिने वापरतो. बरोबर आहे.. आता तारूण्यात चुका झाल्या म्हणूनच आज वयाच्या ७३ व्या वर्षी भारत अजून विकसनशील देश आहे. त्या त्या वयाला देशाच्या विकासाचे योग्य नियोजन केले असते तर कशाला अशी वेळ आली असती.... बरं.. झाल्या चुका.. मग आता काय करायचे..? कुठूनतरी सुरूवात केली पाहिजे ना..? का जाऊदे सगळे खड्ड्यात आणि आपण हातावर हात ठेऊन "असेल माझा हरी.." अशी भूमीका ठेवायची..?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 05/14/2020 - 13:54 नवीन
क्रिकेट्पटू जर नीट खेळत नसेल तर लोक म्हणतात रणजी खेळ .... बेसिक्स कडे परत जा . आपली ऑफ स्टम्प कुठे आहे हे बोलरकडे तोन्ड केल्यावर ही समजून घे ... आपला स्टान्स ....आपली ग्रीप ..वगरे .. तद्वत .. मला इथे नक्की काय हवे आहे .... पाण्याचा सर्वत्र सारखा पुरवठा ... नदीजोड --- कारण धरणास योग जागांचा अभाव मला इथे गुन्हेगारी कमी हवी आहे.... लवकर न्याय .. लाम्बलचक ब्रिटिश पद्धत बंद , मला जास्त वहातुक वगरे नको आहे.... सर्वजनिक वहातुकीस प्राधान्य मला स्कूल बस संस्क्रुती नको आहे ----- जवळची शाळा कम्पलसरी ( चांगली शाळा चांगले कॉलेज या कंसेप्टना मूठमाती ) कमीतकमी 25 वर्शे एका ठीकाणी रहाण्याची शाश्वती,, अर्थात बदलीवर जवळ जवळ बंदी निवडणूक सुधारणा -- पक्ष व अपक्ष असे दोनच प्रकारचे उमेदवार उभे करणे लोकानी पक्षास व अपक्षास मत देणे पक्ष निवडून आला की मग त्याच्या प्रतिनिधीची घोषणा करणे यातील अनेक सूचना आजच्या जातीय धर्मीय वातावरणात अनेकांच्या शेपटीवर पाय देणार्या ठरतील पण सर्वजनिक शांतता, सुख हवे असेल तर कशाची तरी आहूती द्यावीच लागेल.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 05/14/2020 - 14:04 नवीन
जगात अति महत्वाकाँक्षी माणसे जोपर्यत मर्यादित असतील तोवरच जग सुखी राहील. कम्पनीत प्रत्येकालाच प्रमोशन मिळत नसते. खाजगी आयुश्यात सर्वानाच सुरेख बायको मिळण्याची सोय नाही. सर्व साधारण सुखी आयुश्यासाठी नागरिकाला काय लागते याचा समाजाने म्हणजेच सरकारने शोध घेतला पाहिजे व तसा विचार करणारेच निवडून दिले पाहिजेत. निवडणुकीत पैसा गोळा करायचा व तो त्या कम्पनीला सोयिस्कर असे धोरण ठेवायचे व दुसर्या बाजूला फुकट्पणाची खिरापत दरवर्शी वाटत सुटायचे हा कसला आला आहे विकास ?? म गाधी यानी म्हटले आहे " जगात सर्व माणसास पुरेल इतकी सामग्री या जगात नक्की आहे ! नीट पहा आजूबाजूला ! "
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 05/14/2020 - 14:17 नवीन
आपण खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर बोलत आहोत. त्यामुळे सद्यपरिस्थिती काय आहे हे आजिबात लक्षात न घेता आज अशा स्वप्नाळू अपेक्षा चिंतून उद्या त्या प्रत्यक्षात याव्यात अशी कांही अपेक्षा असेल तर "हा एक सुंदर निबंध आहे" इतकेच म्हणेन.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 05/14/2020 - 14:24 नवीन
सध्या आपाप्ल्या परीने मोलकरणीस ,वाचमेन झाडू काम करणार्या बाया याना मदत चालू आहे !
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 05/30/2020 - 17:59 नवीन
खाजगी आयुश्यात सर्वानाच सुरेख बायको मिळण्याची सोय नाही लोल... असो. आत्मनिर्भर व्हावे, कसे?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 05/17/2020 - 19:18 नवीन
>>> बरं.. झाल्या चुका.. मग आता काय करायचे..? कुठूनतरी सुरूवात केली पाहिजे ना..?
ठळक भाग हा कळीचा मुद्दा आहे, आणि चर्चेचा उद्देशही तोच आहे. अर्थात, ही सुरुवात म्हणजे आजपासूनच सुरुवात असं काही नाही; सुरुवात आधीच झाली आहे, २०१४ साली, १९४७ साली, १८५७ साली, १६०० साली...
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 05/14/2020 - 06:14 नवीन
राजकीय / सामाजिक नेते मंडळी ही विरोध / समर्थन करत राहतील. एक सामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योजक, self employed professional, इ. म्हणून आपण या संधींचा लाभ करून घ्यायला हवा. वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत. डोळसपणे पाहिलं तर त्या दिसतील.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव गुरुवार, 05/14/2020 - 13:57 नवीन
लॉकडाऊन मधे आमच्या मातोश्रींनी दोन वाकळा शिवल्या. सहज बघता बघता लक्षात आलं, असेच लहान सहान छंद परत पुढे जाऊन मोठ्या उद्योगांना जन्म देतात. या संदर्भात कोणी काय आधी केलं आहे का, हे शोधताना नेट वर तळोजा आणि पालघर येथील गोधडी व्यावसायाची माहिती मिळाली. आपण कृत्रीम ब्लॅंकेटच्या मागे असताना तिथल्या बायका गोधड्या शिऊन युरोपात विकतायत. कंपणी च्या हमाल्या सोडून तुम्हाला इतरही काही तरी छंद असायलाच हवा.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 05/14/2020 - 14:35 नवीन
चांगली चर्चा. संधी तर आहेच. सध्या चीनच्या विरोधात बड्या देशांची बडबडही चालू आहे [कारणं काय हा वेगळा राजकीय अन्वेषणाचा विषय आहे]. त्यामुळे बरेच देश तसे प्रयत्न सुरु करताहेत. भारतात तसं नाही झालं तरच नवल. करोनामुळे काही मुख्य समस्या निर्माण होणार आहेत - - बर्‍याच उद्योगांवर ताण येणार आणि त्याची परिणती रोजगारावर होणार - छोटे उद्योग जवळपास बसले आहेत किंवा त्या मार्गावर आहेत. सरकार त्यासाठी प्रयत्न करेलच पण परत उभं होण्यासाठी वेळ हा लागणारच. - बेरोजगारी खूप वाढल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केंद्र व राज्य सरकारची धोरणे खूप महत्त्वाची ठरतील. - नवीन उद्योग लगेच उभे राहू शकणार नाहीत. त्याला इन्फ्रा सपोर्ट लागणार, जो सध्य लॉकडाऊन मुळे बसलाय. - सर्व कंपन्या परत नफा कमावण्याच्या पातळीवर पोहोचेतोवर बराच वेळ लागणार. त्याचा परिणाम सरकारी तिजोरीवरही पडणारच. - बरेचसे बाहेरचे देश करोनामुळे आयात हळूहळू वाढवतील. त्यामुळे माल स्वदेशातच विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे सरकारचं मुख्य काम असणार. त्यासाठीच सध्या धोरणं आणि त्यांची मांडणी यांवर काम सुरु आहे. - केंद्र सरकारच्या पॅकेजमधे काय डायरेक्ट आहे आणि काय इन-डायरेक्ट आहे हे बघावे लागेल. त्याअनुषंगाने बाजारात खेळता पैसा किती आणि कधी येईल हे अवलंबून असेल. ते प्रमाण वाढवणे हेही मुख्य काम आहे. . . . आणिकही बरेच मुद्दे आहेत/असू शकतात... सगळ्यांचा नीट विचार करून पुढील ५-१० वर्षांच्या दृष्टीनं आत्ता पायाभूत बाबींवर लक्ष केंद्रीत करणे प्राथमिक गरज आहे. सोबत उद्योग पूरक कायदे, लाल फितीला लगाम, उत्पादन उद्योगांना जमीन उपलब्ध करून देणे वगैरे देखील प्राथमिक गरजांतच येतात. स्वदेशीची बाजारपेठ तयार करणं आणि त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांचा उद्योग वाढवणं या दोन्ही एकत्र उघडाव्या लागणार्‍या महत्त्वाच्या आघाड्या आहेत.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 05/17/2020 - 19:20 नवीन
>>> स्वदेशीची बाजारपेठ तयार करणं आणि त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांचा उद्योग वाढवणं या दोन्ही एकत्र उघडाव्या लागणार्‍या महत्त्वाच्या आघाड्या आहेत.
अगदी खरं आहे. स्वदेशी (म्हणजे ज्यांची मूळ मालकी भारतीय नागरिकांची आहे) अश्या कंपन्यांना खूप वाव आहे. विशेषतः कपडे, पादत्राणे, प्रसाधने यांत भारतीय कंपन्या अग्रस्थानी असायला हव्यात. अर्थात, त्यांना हे साध्य करण्यासाठी सरकारच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीची खरंच गरज आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2020 - 14:42 नवीन
मेक इन इंडिया टू आत्मनिर्भर भारत हा सर्व प्रवास रोचक आहे. मेक इन इंडिया काय होते ते आपण विसरुन गेलो. काल मार्केट थोडंसं उसळलं आणि तितक्याच वेगाने खाली बसलं तेव्हाच लोकांना अंदाज आला की सिर्फ नाम बदला है बोतल वही है... आज निर्मला सीतारमण बोलल्या तेव्हाही लक्षात आलं की ही बोलाची भात आणि बोलाचीच कढ़ी आहे. माझा भारत खुप स्वप्नाळु आहे. लोकांचे अजुन पंधरा लाख खर्च झाले नव्हते की, इतके मोठे पॅकेज आले, भारत आत्मनिर्भर होणे वगैरे रोचक आहे. आज मंत्रीमहोदयाच्या घोषणा ओझरतं ऐकलं. १) शेतक-यांचं कर्जावरील व्याज माफ़. धन्यवाद. आणि २) शहरतल्या घर नसलेल्या मजुराला तीन वेळा जेवण देणार ? ३) ४) साहेब, मुद्रालोन घ्यायला एकदा ब्यांकेत जा आणि मग सांगा. काय परिस्थिती असते. आत्मनिर्भरतेच्या गप्पा चांगल्या असतात. प्लॅनिंग काय ? चर्चा वाचतोय. १) मेक इन इंडिया २) आत्मनिर्भर भारत -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 05/14/2020 - 16:17 नवीन
भारत आत्मनिर्भर होणे वगैरे रोचक आहे. व्वा. काल योजना मांडली आणि आज इतकी जळजळ व द्वेष. इतक्या लगेच इतका त्रास होतोय म्हणजे योजना योग्यच असणार. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2020 - 17:19 नवीन
थोडंसं वाचन वाढवा, अभ्यास वाढवा, म्हणजे मळमळ होणार नाही. मेक इन इंडिया काय होतं आणि आत्मनिर्भर भारत काय आहे हे दोन्हीही साहेबांचे दुवे दिले आहेत. आज मंत्रीमहोदय काय बोलले तेही समजून घ्या, तसेही समजून न घेता आक्रस्ताळपणा करणे आणि व्यक्तिगत होणे भक्तांचे लक्षण आहे आपण तरी अपवाद कसे. चालू ठेवा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 05/14/2020 - 17:44 नवीन
मळमळ कुणाला झाली आहे ते वर स्पष्ट दिसत आहेच आणि ओढून ताणून कोण टीका करत आहे हे ही उघड आहेच. असो. मोठे होण्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 05/15/2020 - 01:47 नवीन
मेरा भारत खरच महान आहे :)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 05/18/2020 - 12:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 05/15/2020 - 01:52 नवीन
प्राध्यापक साहेब आपला मेक इन इंडिया ( देशातील बाजारासाठी आणि निर्यातीसाठी) आणि त्याचे सरकारने ( कोणत्याही पक्षाचा असेना का)केलेलं विपणन याला विरोध दिसतोय?नक्की काय ? मी एवढे पोटतिडिकीने लिहितोय याचे कारण माझे काम "रचना आणि उत्पादन" या क्षेत्रात आहे त्यामुळे या विषयबद्दल आत्मीयता तर आहेच पण अनुभव पण म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून भारतीय निर्यातीला थोडासा हात भर लागला आहे म्हणून वाटते लिहावेसे असो मी ज्या देशात राहतो त्याला अनेक गोष्टी आयात लागतात मग त्या तैवान मधून घेतलाय काय किंवा भारतातून घेतलाय काय आणि जेव्हा दोन्ही माल सामान दर्जाचा असतो तेव्हा भारताला प्राधान्य देता येईल का हे मी बघतो.. तेव्हा माझ्यावर येथे पक्षपाती पानाचा आरोप हि होऊ शकतो आणि त्याचे रूपांतर वर्णद्वेषधात हि होऊ शकते हि माहिती असून सुद्धा. मग आपण भारतात राहणारे एवढया चांगल्या गोष्टीला का हो असा कडू विरोध करता.. बरं विरोध नसेल पण विरोधी सूर दिसतोय अहो आज भारतात मोल्डेड बॅग पासून ते रेल्वे इंजिन पर्यंत बनते ,, सरकार, भाजप सीतारामन आणि मोदी गेले खड्यात आपण जिथे राहता तिथे उत्पादन होणाऱ्या वास्तूचे मुल्याकंन वाढवून ( दूध नाही साठवता येत तर चीज , टोमॅटो सडतात तर सून ड्राईड टोमॅटो करून निर्यात इत्यादी उदाहरणे ) टायचे विपणन होते का असह्य गोष्टींवर ऊर्जा घालव्यायची कि टीका नुसती तुम्हाला सांगतो खाण्याच्या क्षेत्रात काजू उत्पादनात भारत अग्रेसर आहे .. त्यावर ऑस्ट्रेलिया चा डोळा आहे येथे काजू उत्पादन करून ( फळ इथे वाळव्याचे चीन ला सोलायचे चीन ला आणि जगभर निर्यात ) असे लांबीचे धोरण आखात आहेत तुमचे विरोधक ( निर्यत क्षेत्रातील विरोधक या अर्हताःने ) तेवहा मोकळ्या मानाने मेक इन इंडिया ला हात भर लावा क्षमा वयक्तिक पद्धतीने लिहिलंय पण यात या मुद्यामागील गुण मांडण्याचा हेतू आहे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 05/17/2020 - 19:21 नवीन
>>> माझा भारत खुप स्वप्नाळु आहे. लोकांचे अजुन पंधरा लाख खर्च झाले नव्हते की, इतके मोठे पॅकेज आले, भारत आत्मनिर्भर होणे वगैरे रोचक आहे.
ठळक भागाचा संदर्भ कळला नाही.
>>> ही बोलाची भात आणि बोलाचीच कढ़ी आहे.
म्हणजे भारत सरकार जे काही करूया असं सांगतंय तसं करायचं आहे की नाही? धागा काढण्यामागे मागे माझा हेतू, कोरोना दरम्यान आणि तत्पश्चात संकटात व्यावसायिकांना कोणकोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतील याची चर्चा करणं असा आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 06/03/2024 - 19:13 नवीन
लोकांचे अजुन पंधरा लाख खर्च झाले नव्हते की, इतके मोठे पॅकेज आले
कोणते पंधरा लाख रुपये?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/15/2020 - 06:28 नवीन
बोलणा-याचे खडेही विकले जातात न बोलणा-याचे गहुही विकले जात नाही अशी एक म्हण आहे. देशाचे पंतप्रधानांचा अविर्भाव गेली अनेक वर्ष हाच राहीलेला आहे, असे असूनही काही लोक खड्यांना गहू समजत आहेत. आपलं काम आहे, वास्तव समजून घेण्याचे. कोरोना नंतर देशाचं कसं होईल अशा प्रचंड अविर्भावात व्यक्त केलेल्या मतांचं भाषण ऐकून हसुन हसुन पुरेवाट झाली. गम्मतच वाटते हल्ली त्यांची. कोरोनापूर्वीचा भारत हा गेली सहा वर्षात सुजलाम सुफ़लाम करुन टाकलेला होता आणि आता महामारीने- बीमारीने जसं काही सर्व मोडून पडलं म्हणून केलेल्या आर्थिक पॅकेजची गोळी जनतेला दिलेली नशेची गोळी आहे. आत्मर्निभरता ही भारतीयांना दिलेले एक दिवास्वप्न असून कर्तव्यापासून पळ काढणारी ती एक पायवाट आहे. अतिशय कंटाळवाण्या प्रास्ताविकानंतर वैश्विक गप्पांची फेरी मारुन झाल्यावर वसुधैव कुटुंबकम आणि भारताचा इतर जगावर पडणारा प्रभाव वगैरे गोलगोल फिरवल्यानंतर ज्या दोन गोष्टी होत्या त्यात एक होती स्वदेशी चळवळ आणि दुसरं होतं आर्थिक पॅकेज. भविष्यात अशी संकट येऊ नये म्हणूनच्या त्या उपाययोजना. उद्योगांना प्रोत्साहन आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करायचं. ज्या काही पाच पिलरच्या गोष्टी सांगितल्या त्या काही सांगायच्या गोष्टी नाहीत तर प्रत्यक्षात आणून दाखवायच्या गोष्टी आहेत. लघूद्योग, गृहउद्योग, या गोष्टी अनेक वर्षांपासून सुरुच आहेत त्यांना प्रोत्साहन देणे हेही अनेक वर्षापुर्वीच्या अनेक सरकारांनी केलेच आहे यांचं नवं काय आहे आत्तापर्यंत दिलेल्या सोयी नेहमीच अपूर्ण राहीलेल्या होत्या आजही तीच परिस्थिती आहे. परिस्थिती बदललेली नाही. अर्थमंत्री यांनी काल ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यात मुद्रा योजना अंतर्गत कर्ज घेणार्‍यांना दोन टक्क्यांची मदत. बचत गटांना प्रोत्साहन. शेतीवर कर्ज व्याजदरावर सूट, मजूर शेतकरी यांना आर्थिक पॅकेज यात नवीन काय होतं ? सरकारची ही नित्य कामच आहेत. पूर्वीची सरकारंही हेच करायचे. लोकांना व्यवसायपुरक शिक्षण देणे, व्यवसाय करण्यास पाठबळ देणे कर्ज देणे यात नवीन काहीच नव्हतं. रेशन कार्डवर देशात कुठेही धान्य मिळेल. साहेबांना हे माहिती नसेल की धान्यदुकानदार असलेल्या गावात रेशन धान्यावर धान्यपुरवठा करीत नाहीत देत नाहीत तिथे देशभर केव्हा रेशन मिळणार. मुळात ज्या व्यवस्थेत बदल करायचे त्यात कुठेच बदल करायचे नाहीत त्यावर नियम कायदे नाहीत ते आवश्यक आहेत. मजूर,शेतकरी, फेरीवाल्यांना म्हणे आत्मनिर्भर करणार त्यांच्यासाठी पॅकेज देणार, एकदा ती उद्योगधंद्यांना कर्ज देणारी व्यवस्था सुधारा म्हणावे एकदा मग आत्मर्निर्भरतेच्या गोष्टे करु. अचानक लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या स्थलांतरामुळे स्त्री-पुरुष लहानमुलांना जीव गमवावे लागले. उन्हातान्हात प्रचंड हाल झाले . त्यावर काहीही न बोलता त्याची कोणतीही जवाबदारी न घेता लोकांचं लक्ष वळविण्याचे हे नवे नाटक इतकेच. अर्थमंत्र्याची घोषणा केवळ घोषणा नसते तर ती व्यवस्था पूर्ण करण्याची सरकारची जवाबदारी असते, अशाच जवाबदारीतून भारताने आत्तापर्यंत वाटचाल केली आहे, त्यात नवीन काही नसतं त्यात उद्घोषणा करण्यासारखे काहीही नसते परंतू लोकांना प्रसिद्धीची सवय लागलेली असल्यामुळे सारखं लोकांपुढे येऊन बोलावे लागतं असलेलं अपयश, लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची ही नवी निती आहे. स्वातंत्र्यापूर्वी स्वदेशी चळवळीचा नारा ज्यांनी लावला त्यांच्या विचारधारेला विरोध करुन जे सत्तेवर आले आज त्यांना स्वदेशी चळवळ राबवाबी असे म्हणावे लागले यात तो विचार किती प्रबळ होता हेच आता लक्षात येते. सरकारला जनतेला गोल गोल फिरवण्यासाठी शुभेच्छा आहेतच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 05/15/2020 - 07:01 नवीन
विषय काय.. मांडणी काय... असो. ठीक आहे. तुम्ही म्हणता तसं बरोबर म्हणू.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 05/15/2020 - 07:48 नवीन
+१ राघव
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/15/2020 - 08:50 नवीन
मूळ चर्चा प्रस्ताव- ''श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे'' पॅकेज काय आहे त्या अनुषंगाने वरील तपशीलवार प्रतिसाद लिहिला आहे, आपणास मांडणी आवडली नाही असे वाटते. तरीही आपण प्रतिसाद लिहून कळविले आभार...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sun, 05/17/2020 - 19:22 नवीन
>>> मूळ चर्चा प्रस्ताव -
मूळ चर्चा प्रस्ताव - कोरोना आणि त्यानंतरच्या संकटातील संधी यावर इथे चर्चा करूयात. हा आहे. याव्यतिरिक्त इतर काही अर्थ निघत असेल तर तो माझा लेखनदोष आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा