स्वयंपूर्ण भारत: कोरोनापश्चात संकटातील संधी
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे.
त्यांनी नवीन युगाचे पंचस्तंभ- अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, ऊर्जावान जनता, पुरवठा-व्यवस्था यांचे महत्त्व विशद केले.
भारत देशाला स्वावलंबी बनविण्याची क्षमता आपल्यात आहे हे त्यांनी वाइटूके आणि पीपीई किट्स् अशा उदाहरणातून सांगितले.
स्थानिक उत्पादने खरेदी करून, लोकप्रिय करून, त्यांचा जागतिक ब्रँड बनवणे हा त्यांच्या भाषणातील बहूधा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता.
कोरोना आणि त्यानंतरच्या संकटातील संधी यावर इथे चर्चा करूयात.
मी इकॉनॉमिस्ट आहे . इकॉनॉमिस्ट तो असतो जो आपल्या गरजांची उत्तम मांडणी तरुण वयातच करतो व आपले सर्व रिसोर्सेस त्या पद्धतिने वापरतो.बरोबर आहे.. आता तारूण्यात चुका झाल्या म्हणूनच आज वयाच्या ७३ व्या वर्षी भारत अजून विकसनशील देश आहे. त्या त्या वयाला देशाच्या विकासाचे योग्य नियोजन केले असते तर कशाला अशी वेळ आली असती.... बरं.. झाल्या चुका.. मग आता काय करायचे..? कुठूनतरी सुरूवात केली पाहिजे ना..? का जाऊदे सगळे खड्ड्यात आणि आपण हातावर हात ठेऊन "असेल माझा हरी.." अशी भूमीका ठेवायची..?भारत आत्मनिर्भर होणे वगैरे रोचक आहे.व्वा. काल योजना मांडली आणि आज इतकी जळजळ व द्वेष. इतक्या लगेच इतका त्रास होतोय म्हणजे योजना योग्यच असणार. ;)