Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लॉकडाऊन:- बारावा दिवस.

अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/05/2020 - 05:11
🗣 65 प्रतिसाद
लॉक---डाऊन! खरंच आपल्यापैकी कुणालाही वाटलं नसेल अस म्हटलं तर अभूतपूर्व म्हटलं तर चिंताजनक जीवन सध्या आपण जगत आहोत. अर्थात मला ह्यामध्ये फारसा फरक वाटत नाही. कारण पौरोहित्यात चांगले एक एक दोन दोन महिने मोकळे दरवर्षी येतात. पण तरीही इतर गोष्टींसाठी मेंदू मोकळा असतो,तो आता नाही हे मात्र खरं ! रोजचं आयुष्य घरात परिपूर्ण वेळ देता येत नसे,तो आता देता यायला लागला(च) आहे. त्यातूनही माझ्या मुलाला (वय वर्षे 3) माझ्याबरोबर धुडगूस घालायला भारी आवडतो तो त्याला आता पूर्ण मिळतो आहे,म्हणून तो मेंदूने होम क्वॉरनटाईन होण्यापासून बराचसा बचावलेला आहे. नाही म्हणायला त्याला एकट्याला खेळून खेळून कंटाळा आला की मग मला येऊन ढुश्या मारत खेळण्यासाठी उकसावतो. शिवाय ब्याचलर लाईफ जगताना स्वयंपाक व घरकामादी हरकाम करत होतो त्याचा सौला आत्ता फायदा होतो आहे. म्हणजे कांदा टोमॅटो भाज्या इत्यादी (तिला हव्या तश्या!) चिरून देणे.धान्य निवडकाम,शेंगदाणे ,रवा इत्यादी भाजणे. स्वच्छता करत राहणे. बालकास अं-घोळ-घालणे. खायला देणे, गाई गाई करवणे. ह्यात दिवस सहज निघून जातो. तिच्यावरचा ताण कमी झाल्यानी ती बहुशः सुखावली असावी असा माझा आपला (एक) अंदाज! पौरोहित्याची पुढील बरीचशी कामं रद्द झालेली असली तरी काही ऑन लाईन चालू आहेत पण अगदी कमी. मला मुख्य अनुभव लिहायचाय तो माझ्या आपोआप (म्हणजे मी कुठलेच कष्ट न घेता!) बदललेल्या सवयींचा! पहिली गोष्ट म्हणजे पान, सुपारी इत्यादी गोष्टी मिळत नसल्यामुळे बंद झाल्या. गायछाप काल रात्रीपासून बंद राहिली आहे.. ते हळूच मिळणाऱ्या दुकानवाल्याकडला माल काल सकाळीच संपला आहे. व आता आमच्या अखिल परिसरात अन्यत्र तो कुठेही मिळत नाही. पान सुपारी बंद झाल्याने मला होत असलेले शाररीक व मानसिक त्रास सम्पले. अर्धी लढाई शत्रू नसल्याने जिंकलीं. अर्धी किंवा पुढे शिल्लक असलेली मलाच प्रयत्न पूर्वक जिंकावि लागणार आहे. अर्थात स्वतःच्या व्यसनी मनासमोर शरणागती देऊन ! त्यासाठी समुपदेशनाची मदत दिनांक 24 पासून सुरू ठेवली आहे. मला आता या अपघातानी थांबलेल्या व्यसनामुळे स्वतःतला नाकर्तेपणा जाणवू लागलेला आहे. अजून बरीच मजल गाठायची आहे. आणि मुख्य म्हणजे जगलो वाचलो (या कोरोनारूपी संकटातून) तर पुन्हा या तंबाखू पान कुळातील एकाही गोष्टीला मन बळी न पडू द्यायची तयारी करत रहायची आहे. दुसरा अनुभव आहे साखर थांबल्याचा. डायबेटीसची अंधुक शक्यता 4महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्याचा तेंव्हापासून परिणाम इतकाच झाला होता की गोड पदार्थ खाण कमी झालं होतं. पण लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी एक निमित्त घडलं. मी एकदम किराणा उचलायचा म्हणून जवळच्या दुकानात गेलो. वेटिंग होतं म्हणून बसलो पण लोक जवळ जवळ येऊ लागले म्हणून बाहेर उन्हात खुर्ची टाकली व चांगला 15/20 मिनिट बसून राहिलो.. 12ची वेळ होती. चटका बसत होता,पण मनात येत होतं, एक जण चिकटलाय मगाशी असलाच कोरोनावाला तर आत्ता उन्हात-बसल्यानी आपल्याला फायद्यात जाईल. (कोरोनाविषयक तयार झालेल्या दिव्य ज्ञानाचा परिणाम! ;) ) झालं इतकंच की मला घरी आल्यावर दुपारहुन ताप सुरू झाल्याची जाणीव झाली.तो उन्हात बसल्यानीच आलेला आहे हे कळत होतं,पण तरीही मन घाबरल. दुसऱ्याच दिवशी सरकारी दवाखान्यात औषध घेतलं. त्या डॉक्टरांनी मला 'हे नॉर्मल आहे' वगैरे समजावलं. पण आम्हा एडीक्ट व्यक्तींचे शंकासूर साधे नसतात. मी पुढे 3 दिवस घरात बाजूला बसलो. मुलाला जवळ येऊ देईना . मन खिन्न करवून घेतलेलं. ताप खोकला वगैरे दुसर्याच दिवशी गायब झालं, पण मन मात्र 105 डिग्री धरून बसलेलं. त्यात मग तरतरी यायला ors घे. सरबत पी. असले प्रकार सुरू झाले .. व टेन्शन आणि ors , सरबत यांनी पोटात गेलेली जादा साखर यांनी खेळ केला. चक्कर येते ,हलकं वाटतय.. अस बोलू लागलो. ही तर वैतागली,थोडी घाबरलीही! मग मी पुढे 2 दिवस अजिबात गोड काहीही पोटात जाऊ दिल नाही. व शरीर एकदम रिफ्रेश झालं. त्यानन्तर आज आत्ता पर्यंत एकदम नॉर्मल आहे. भय आणि नकारात्मकता एकत्र आली तर काय घडू शकतं? हे या कोरोना टेंशनीच शिकवलंय. म्हणूनच मन आता म्हणतंय, "झालाच कोरोना तर को? रोना? अब सर्फ डरो ना... फिर जरूर भाग जाएगा कोरोना! -----------------------------------------------------------------

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32995 views

🗣 चर्चा (65)
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 15:09 नवीन
मला वाटलं की, फक्त ९ मिनीटींची विश्रांती असेल. हम्म्. वेळेची सुरवात बरोबर आहे. शेवट चुकला!!!!! :)
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 04/05/2020 - 14:35 नवीन
करोनामुळे तंबाखू सुटु शकतो ही चांगली बातमी आहे. भर दुपारी रस्त्यावर मोर फिरताना दिसायला लागले, माझ्या सोसायटीत कबूतरांचा त्रास वाढला. जी गोष्ट अशा वाघ, हत्ती अशा प्राण्यांना करता आले नाही ते सूक्ष्म विषाणूने करुन दाखविले. आज कुठेतरी वाचले गंगा नदी शुद्ध व्हायला लागली कारण सर्व इंडस्ट्री बंद आहेत. दारु न मिळल्याने लोक वेडावल्यासारखे करायला लागले असे वाचले होते. माझा एक मित्र म्हणाला लगातार एकवीस दिवस ड्राय डे हा विक्रम असेल. फ्रासंमधे मूलभूत गरजांमधे दारु आहे असे वाचले होते. कधी नव्हे ते रविवार असूनही आज ऑफिसमधे जावेसे वाटले. सायकलचे दोन्ही चक्के पंक्चर आहेत पण दुरुस्त कशासाठी करायचे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 15:24 नवीन
बाकी संध्याकाळी टेरेसवर फिरताना पक्ष्यांचे निरीक्षण करताना पण मौज वाटते. बुलबुल, शिंजिर टिव टिव करत वायरींवर बसलेले असतात, शिंपी पक्षी जोरजोरात चिवचिवत कॉल देत असतो. पोपट क्याक क्याक करत उडत जातात, बगळ्यांचा थवा एरोडायनमिक आकार निर्माण करून उडत जातो आणि त्यातला एकेक बगळा पुढच्याची जागा घेत राहतो. घारी उंच आकाशात फेर मारत राहतात. मौज वाटते हे बघताना. पूर्वी इथल्या टेल्को कंपनीत वटवाघळांची खूप मोठी वस्ती होती, संध्याकाळी अक्षरशः हजारो वटवाघळांनी आकाश भरून जायचे. आता कंपणीतली झाडं तोडली का वाघळांनी वस्ती बदलली काय माहीत, हल्ली अजिबात दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 04/05/2020 - 16:03 नवीन
१२ दिवस संपले. ०९ राहीले. लाॅकडाउन घोषित होण्याच्या ४ दिवस अगोदर गावी कोकणात आलो होतो आणि अचानक लाॅकडाउन घोषित झाल्याने परतीचे सर्व दोर कापले गेले. पहीले दोन दिवस आपण तुरुंगातच आहोत असे वाटत होते. आता थोडी सवय झालीय. टिव्हीवर , उन्हातान्हात लहान मुले व सामान घेऊन चालत जाणारे मजूर हे चित्र पाहून आपल्याकडे किती मोठी लोकसंख्या ह्या लाॅकडाउन मधे भरडून निघेल ह्याची कल्पनाच करवत नाही. ह्या लोकांची पहिल्या दिवसापासूनच ते आहेत तिथे सोय केली जाणे अत्यावश्यक होते. वर्क फ्राॅम होमला मान्यता असल्याने आवश्यक असलेल्या गोष्टी जसे की लॅपटाॅप, टोकन नेहमी जवळ बाळगतोच. जिओच्या वर्क फ्राॅम होमच्या पॅकमधले रोजचे २ जिबी आणि रेग्युलर मिळणारे १.५ जिबी असा रोजचा ३.५ जिबीचा डेटा कामासाठी पुरतो. त्यामुळे कार्यालयीन कामावर शून्य परिणाम झालेला आहे. बाकी रस्त्यावरची स्मशान शांतता, अपवादाने जाणारे एखादे वाहन हे पाहून 'बहुसंख्य माणसं गचकली असावीत' असा पशुपक्ष्यांचा समज झाला असेल. १४ तारखेला हा देशव्यापी लाॅकडाउन उठावा अशी मनोमन ईच्छा आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 04/05/2020 - 16:03 नवीन
चालताना तलत महमूद यांची ८ युगलगीते ऐकली। नेहां राजपाल हिचे नव्या ढंगातले पण रिमिक्स चा आचरट पणा नसलेले शुक्रतारा मंदवारा हे गीत ऐकले. भीमसेन यांची मिया मल्हार रागाताली द्रुत एकतालातील चीज वाजवून पाहिली @ बुवा , ते ऑनलाइन पौरहित्य प्रकरण आहे. म्हणजे तुम्ही चेपू वर पूजेचा विडिओ टाकायचा व यजमानाने पूजा करायची ? ते दक्षिणेच सगळ ऑ न लाइन ठीक पण गुरुजीना दूध केळे , खिचडी ऑन लाइन कशी काय ? सिक्थ जनरेशन तंत्र ? )))))))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/05/2020 - 16:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/05/2020 - 16:34 नवीन
अरे, हळू. खिचडी दूध सांडेल ना!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 16:18 नवीन
हे आलंय कायप्पावर. खरं आहे का ते तज्ञच सांगू शकतील. फेक असेल तर ही पोस्ट उडवावी अशी प्रशासकांना विनंती. फक्त घरी बसा !! तेवढं पुरेसं आहे. हेच आवाहन सध्या जगभर प्रत्येक आरोग्य संस्था, शासन लोकाना करीत आहेत. पण आश्चर्य म्हणजे जगभर लोकांना ह्याचं महत्वच समजत नाहीये. हे सगळं होत असताना ह्याबाबतीत ३५० वर्षांपूर्वी घडलेली एक विलक्षण घटना आठवते, आणि आज त्या घटनेपासून आपण योग्य तो धडा घेणं खूप गरजेचं आहे. Ringa RInga Roses… ह्या बडबडगीताची पार्श्वभूमी असलेली ही अद्भुत घटना आहे तरी नेमकी काय? Ringa Ringa Roses Pocket full of Posies Hushaih Bushaih We all fall down..! हे गाणं गात फेर धरून नाचणे हा खेळ आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी खेळला असेल. हे गाणं बडबडगीत म्हणून जगभर प्रसिद्ध असलं तरी हे मूळ गाणं बडबडगीत नसून एक शोकांतिका आहे, आणि ती घटना आजच्या परिस्थितीमध्ये जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याचं कारण म्हणजे ती घटना घडली तेंव्हा देखील आजच्यासारखीच परिस्थिति निर्माण झाली होती. इसवी सन १६६५! इंग्लंडमध्ये ब्युबोनीक प्लेगची साथ आली होती आणि त्यांचं राजधानीचं शहर लंडन हे त्या साथीच्या झपाट्यात आलं होतं. तब्बल १० लाख बळी गेले होते तेंव्हा. प्लेगवर औषध तर सोडाच तो नेमका कशामुळे होतो हे देखील लोकांना माहिती नव्हतं, त्यामुळे सगळं ख्रिस्ताच्या भरवशावर चाललं होतं. सुदैवाची बाब म्हणजे त्यांचं दुसर मुख्य शहर मँचेस्टर हे अजून बऱ्यापैकी सुरक्षित होतं. लंडन इतकी भीषण परिस्थिति तिथे नव्हती त्यामुळे अजून तरी तिथे धोका नव्हता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर लंडन पासून १४० मैलावर पण मँचेस्टरपासून जवळ ९०० इतकी लोकसंख्या असलेलं एक खेड होतं, Eyam नावाचं. ह्या खेड्यात एका शिंप्याकडे लंडनहून काही धागे आले होते. आले तेंव्हा ते थोडेसे ओलसर होते म्हणून त्याच्या नोकराने ते वाळवण्यासाठी घेतले आणि प्लेगच्या जिवाणूंना एक नवीन शरीर मिळालं. त्या धाग्यांमार्फत Eyam मध्ये प्लेगने प्रवेश केला. बघता बघता त्या खेड्यातली परिस्थिति भीषण झाली आणि अनेक कुटुंब तिथून निघून गेली. काही दिवसांपूर्वीच त्या गावात नवीन सरपंचाची नेमणूक झाली होती. फक्त २७ वर्षे वयाच्या त्या सरपंचाविषयी गावातल्या लोकांचं मत काही चांगलं नव्हतं. मुख्यत्वे सधन कुटुंब गावातून निघून गेली होती आणि आता फक्त ३५० इतकीच काय ती लोकसंख्या शिल्लक राहिली होती. उरलेल्या लोकांपैकी बरेचसे अगदी गरीब वगैरे होते. त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते. कुठे जायचं म्हटलं तरी ते शक्य नव्हतं. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत त्या सरपंचाच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे गांव सोडून जाणारं प्रत्येक कुटुंब हे सोबत प्लेग घेऊन जातं आहे,आणि त्यांना जवळ होतं ते मॅन्चेस्टर! आजूबाजूच्या इतर गावात प्लेग अजून आला नव्हता. त्यामुळे Eyam हाच एक स्रोत होता प्लेगचा. त्याने एक धाडसी निर्णय घेतला,सर्वांनी गावातच राहण्याचा. अगदी प्लेग झाला तरी सुद्धा. तो काही डॉक्टर नव्हता. पण इतरांसारखं त्याला इतकंच माहिती होतं की प्लेग हा रोग्याच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो. आधी लोक घाबरले पण त्याने लोकाना समजावलं की हे किती गरजेचं आहे. आपल्या सर्वांचं विलगीकरण झालं तरच हा रोग आटोक्यात येऊ शकतो. देशासाठी आपल्याला हे बलिदान द्यावंच लागेल. लोक तयार झाले आणि मग सुरू झाली एक लढाई जी १४ महिने चालली आणि २० वर्षांचा गावातला शेवटचा मुलगा जेव्हा प्लेगमुळे मृत्युमुखी पडला, तेव्हाच संपली. गावातील कोणीही शेवटपर्यंत गांव सोडून गेलं नाही. ह्या १४ महिन्यात काय झालं, त्याच्या नोंदी ह्या सरपंचाने आणि त्याच्या बायकोने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या आहेत. गावातल्या निरोगी लोकांमध्ये प्लेग पसरू नये म्हणून त्यांनी प्लेगमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना त्यांच्या घराच्या अंगणात किंवा परसामध्ये पुरत असत. त्यांच्या अंत्यविधीला कोणीही येत नसे. इतर लोक दुरून ते बघत असत. ह्यातली एक मन सुन्न करणारी घटना म्हणजे एलिझाबेथ नावाच्या एका स्त्रीवर एकाच आठवड्यात नवरा आणि तिची सहा मुलं ह्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली, आणि तिने एकटीने ते सगळं केलं. ह्या ७ जणांची थडगी आजही एका दगडी गोलाकार जागेत गावाच्या स्मशानापासून दूर पाहायला मिळतात. आजूबाजूच्या गावातील लोकांनी Eyam वासीयांना शक्य ती सर्व मदत केली. पण शेवटी गावातील २६० लोक प्लेगला बळी पडले, आणि ८३ लोकांचे प्राण वाचले. ह्या घटनेचं वर्णन एका कवितेत खूप दिवसांनंतर आलं ती कविता म्हणजेच हे बडबडगीत होय. मूळ गीत असं आहे.. Ring-a-ring of rosies Pocketful of posies Achoo! Achoo! We all fall down. ह्यातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे rosies म्हणजे प्लेगमुळे रोग्याच्या छातीवर आलेले व्रण तर posies चा अर्थ होतो की लहान फुलांचा गुच्छ ज्यामुळे प्लेगला कारणीभूत असणाऱ्या वाईट शक्ति दूर जातात. Achoo हा प्लेगमुळे येणाऱ्या सर्दी सदृश्य लक्षणांचा आवाज. शेवटची ओळ अर्थात सर्वजण मृत्युमुखी पडले आहेत. पण कालांतराने हे गाणं बडबडगीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालं आणि त्यात काही बदल देखील झाले. असं असलं तरी Eyam च्या लोकांनी quarantine ही संकल्पना यशस्वी करून दाखवली. त्यांच्या दुर्दैवाने बहुतेक लोकांना वैद्यकीय मदत मिळाली नाही. पण त्यांच्या ह्या कृत्याने प्लेग नियंत्रणात आला, इतकं नक्की सांगता येतं. त्या गावात आज तिथे प्रत्येक घरात एक संग्रहालय आहे आणि ही घटना जपून ठेवली आहे. आज वैद्यकीय क्षेत्र त्या काळापेक्षा कितीतरी पटीने प्रगत झालं आहे. आपल्याला हवी ती मदत मिळू शकते, फक्त गरज आहे ती Eyam च्या लोकांनी बनवलेल्या वाटेवर चालण्याची! मुळात Quarantine ही संकल्पना १४ व्या शतकात इटलीत जन्माला आली आणि आज त्यांनाच त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. त्याकाळी व्हेनिस शहरातून येणाऱ्या मालवाहू जहाजांसोबत प्लेग येतो ह्या समजुतीने ही जहाजं ४० दिवस किनाऱ्यावरच थांबवून ठेवत. त्यानंतरच त्यातला माल आणि इतर लोकांना उतरण्याची परवानगी असे. तसेच lockdown ही संकल्पना १९१० मधली. चीनचा एक डॉक्टर Wu-Lien-Teh (हे नाव मराठीत लिहिणं कठीण आहे) ह्याने प्रथम राबवली. हा मलेशियात असताना तिथे देखील प्लेगमुळे लोक हैराण झाले होते. त्यावेळेस ह्या डॉक्टरने Harbin ह्या शहराचा संपर्क इतर जगाशी तोडून टाकला. रशिया आणि जपान इथे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवली. त्यामुळे प्लेग आटोक्यात आला. आज ही संकल्पना चीनने यशस्वीपणे राबवली आहे. इतर देश देखील ह्या काळात आपापली शहरं lockdown करीत आहेत. ह्या दोन घटना अतिशय महत्वाच्या आहेत. इतिहास अशा प्रकारे शिकवत असतो. Social Distancing, quarantine ह्याची आज तीव्रतेने गरज आहे. Eyam चा धडा त्यासाठीच महत्वाचा आहे. कधी कधी भूतकाळातच महत्वाचे दुवे सापडतात. ज्यांनी आपलं भविष्य आधीच सुरक्षित केलेलं असतं. गरज असते ती फक्त डोळसपणे भूतकाळात डोकावण्याची.
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ Mon, 04/06/2020 - 10:41 नवीन
चांगली आहे माहिती, घरात बसून असणाऱ्यांचे मनोबल वाढवणारी माहिती आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 16:48 नवीन
दिवे बंद करायच्या प्रकरणाला जपान, जर्मनी व आॅस्ट्रेलियाचे समर्थन. अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांग्लादेश पण सहमत. अरे काय चाललंय काय? ;)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 16:49 नवीन
पाकिस्तान व चीन घरातले सगळेच्या सगळे दिवे लावणार अशी बातमी यायची राहिलीय फक्त. ;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/05/2020 - 19:33 नवीन
चीन ने त्यांच्या परम प्रिय मित्राला अंडर वेअर पासुन बनवलेले मास्क दिले आहेत ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 04/05/2020 - 19:36 नवीन
त्यात काही प्रॉब्लेम दिसत नाही मला. व्हायरस को व्हायरस ही मार सकता है :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/03/2020 - 05:32 नवीन
मध्यमवर्गीय माणसाच्या मनाची घालमेल, व्यसनापासून दूर राहिल्याने वाढलेले मानसिक बळ चांगले दाखवले आहे.. लिहीत रहा.. वाचत आहे..
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/13/2020 - 15:24 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा