Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लॉकडाऊन:- बारावा दिवस.

अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 04/05/2020 - 05:11
🗣 65 प्रतिसाद
लॉक---डाऊन! खरंच आपल्यापैकी कुणालाही वाटलं नसेल अस म्हटलं तर अभूतपूर्व म्हटलं तर चिंताजनक जीवन सध्या आपण जगत आहोत. अर्थात मला ह्यामध्ये फारसा फरक वाटत नाही. कारण पौरोहित्यात चांगले एक एक दोन दोन महिने मोकळे दरवर्षी येतात. पण तरीही इतर गोष्टींसाठी मेंदू मोकळा असतो,तो आता नाही हे मात्र खरं ! रोजचं आयुष्य घरात परिपूर्ण वेळ देता येत नसे,तो आता देता यायला लागला(च) आहे. त्यातूनही माझ्या मुलाला (वय वर्षे 3) माझ्याबरोबर धुडगूस घालायला भारी आवडतो तो त्याला आता पूर्ण मिळतो आहे,म्हणून तो मेंदूने होम क्वॉरनटाईन होण्यापासून बराचसा बचावलेला आहे. नाही म्हणायला त्याला एकट्याला खेळून खेळून कंटाळा आला की मग मला येऊन ढुश्या मारत खेळण्यासाठी उकसावतो. शिवाय ब्याचलर लाईफ जगताना स्वयंपाक व घरकामादी हरकाम करत होतो त्याचा सौला आत्ता फायदा होतो आहे. म्हणजे कांदा टोमॅटो भाज्या इत्यादी (तिला हव्या तश्या!) चिरून देणे.धान्य निवडकाम,शेंगदाणे ,रवा इत्यादी भाजणे. स्वच्छता करत राहणे. बालकास अं-घोळ-घालणे. खायला देणे, गाई गाई करवणे. ह्यात दिवस सहज निघून जातो. तिच्यावरचा ताण कमी झाल्यानी ती बहुशः सुखावली असावी असा माझा आपला (एक) अंदाज! पौरोहित्याची पुढील बरीचशी कामं रद्द झालेली असली तरी काही ऑन लाईन चालू आहेत पण अगदी कमी. मला मुख्य अनुभव लिहायचाय तो माझ्या आपोआप (म्हणजे मी कुठलेच कष्ट न घेता!) बदललेल्या सवयींचा! पहिली गोष्ट म्हणजे पान, सुपारी इत्यादी गोष्टी मिळत नसल्यामुळे बंद झाल्या. गायछाप काल रात्रीपासून बंद राहिली आहे.. ते हळूच मिळणाऱ्या दुकानवाल्याकडला माल काल सकाळीच संपला आहे. व आता आमच्या अखिल परिसरात अन्यत्र तो कुठेही मिळत नाही. पान सुपारी बंद झाल्याने मला होत असलेले शाररीक व मानसिक त्रास सम्पले. अर्धी लढाई शत्रू नसल्याने जिंकलीं. अर्धी किंवा पुढे शिल्लक असलेली मलाच प्रयत्न पूर्वक जिंकावि लागणार आहे. अर्थात स्वतःच्या व्यसनी मनासमोर शरणागती देऊन ! त्यासाठी समुपदेशनाची मदत दिनांक 24 पासून सुरू ठेवली आहे. मला आता या अपघातानी थांबलेल्या व्यसनामुळे स्वतःतला नाकर्तेपणा जाणवू लागलेला आहे. अजून बरीच मजल गाठायची आहे. आणि मुख्य म्हणजे जगलो वाचलो (या कोरोनारूपी संकटातून) तर पुन्हा या तंबाखू पान कुळातील एकाही गोष्टीला मन बळी न पडू द्यायची तयारी करत रहायची आहे. दुसरा अनुभव आहे साखर थांबल्याचा. डायबेटीसची अंधुक शक्यता 4महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्याचा तेंव्हापासून परिणाम इतकाच झाला होता की गोड पदार्थ खाण कमी झालं होतं. पण लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी एक निमित्त घडलं. मी एकदम किराणा उचलायचा म्हणून जवळच्या दुकानात गेलो. वेटिंग होतं म्हणून बसलो पण लोक जवळ जवळ येऊ लागले म्हणून बाहेर उन्हात खुर्ची टाकली व चांगला 15/20 मिनिट बसून राहिलो.. 12ची वेळ होती. चटका बसत होता,पण मनात येत होतं, एक जण चिकटलाय मगाशी असलाच कोरोनावाला तर आत्ता उन्हात-बसल्यानी आपल्याला फायद्यात जाईल. (कोरोनाविषयक तयार झालेल्या दिव्य ज्ञानाचा परिणाम! ;) ) झालं इतकंच की मला घरी आल्यावर दुपारहुन ताप सुरू झाल्याची जाणीव झाली.तो उन्हात बसल्यानीच आलेला आहे हे कळत होतं,पण तरीही मन घाबरल. दुसऱ्याच दिवशी सरकारी दवाखान्यात औषध घेतलं. त्या डॉक्टरांनी मला 'हे नॉर्मल आहे' वगैरे समजावलं. पण आम्हा एडीक्ट व्यक्तींचे शंकासूर साधे नसतात. मी पुढे 3 दिवस घरात बाजूला बसलो. मुलाला जवळ येऊ देईना . मन खिन्न करवून घेतलेलं. ताप खोकला वगैरे दुसर्याच दिवशी गायब झालं, पण मन मात्र 105 डिग्री धरून बसलेलं. त्यात मग तरतरी यायला ors घे. सरबत पी. असले प्रकार सुरू झाले .. व टेन्शन आणि ors , सरबत यांनी पोटात गेलेली जादा साखर यांनी खेळ केला. चक्कर येते ,हलकं वाटतय.. अस बोलू लागलो. ही तर वैतागली,थोडी घाबरलीही! मग मी पुढे 2 दिवस अजिबात गोड काहीही पोटात जाऊ दिल नाही. व शरीर एकदम रिफ्रेश झालं. त्यानन्तर आज आत्ता पर्यंत एकदम नॉर्मल आहे. भय आणि नकारात्मकता एकत्र आली तर काय घडू शकतं? हे या कोरोना टेंशनीच शिकवलंय. म्हणूनच मन आता म्हणतंय, "झालाच कोरोना तर को? रोना? अब सर्फ डरो ना... फिर जरूर भाग जाएगा कोरोना! -----------------------------------------------------------------

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32995 views

🗣 चर्चा (65)
क
कंजूस Sun, 04/05/2020 - 05:43 नवीन
गुरुजी नमस्ते। तुमचा भलताच अनुभव वाचून घाबरायला झालं.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 04/05/2020 - 10:06 नवीन
मीपण घाबल्ले ! आरोग्य सेतूवर जाऊन You are safe असं वाचल्यावर जीव भांड्यात पडला !
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 04/05/2020 - 05:52 नवीन
बुवा.. छान लेख. आपत्तीतूनही काहीतरी सकारात्मक. वाह. खरेच तंबाखूयुक्त पदार्थ सुटले तर मोठा फायदाच म्हणता येईल. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/05/2020 - 06:08 नवीन
hydroxychloroquine हे औषध करोनावर जालिम उपाय असल्याचे जालावर वाचन आणि श्रवणभक्ती केल्यावर समजले आहे. संदर्भ :- Dr. Vladimir Zelenko treated 699 coronavirus patients with 100% success Touting Virus Cure, 'Simple Country Doctor' Becomes a Right -Wing Star Trump requests Modi to release Hydroxychloroquine ordered by US

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 04/05/2020 - 06:52 नवीन
असे घाईने विधान करता येणार नाही. १. सध्या जवळपास एक डझन औषधांचे रुग्णांवर प्रयोग चालू आहेत. त्यांचे पुरेसे निष्कर्ष यायला काही महिने जावे लागतील. २. Hydroxychloroquine + azithromycin च्या बाबतीत ही अधिकृत तारीख 30 ऑगस्ट, 2020 आहे. ३. Hydroxychloroquine चा हृदयावर होणारा गंभीर दुष्परिणामही ध्यात घ्यावा असा इशारा American College of Cardiology ने दिला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/05/2020 - 06:55 नवीन
@Hydroxychloroquine चा हृदयावर होणारा गंभीर दुष्परिणामही ध्यात घ्यावा:--- एका डॉक्टर मित्राचं असच मत आत्ता ऐकलं होतं.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/05/2020 - 07:32 नवीन
१. सध्या जवळपास एक डझन औषधांचे रुग्णांवर प्रयोग चालू आहेत. त्यांचे पुरेसे निष्कर्ष यायला काही महिने जावे लागतील. ६९९ रुग १००% बरे झालेले आहेत. [ज्याची लिंक मी वरती दिलेली आहे. ] मी कोणताही निष्कर्ष काढलेला नसुन जी उपलब्ध माहिती आहे तीच दिली आहे. २. Hydroxychloroquine + azithromycin च्या बाबतीत ही अधिकृत तारीख 30 ऑगस्ट, 2020 आहे. hydroxychloroquine, the antibiotic azithromycin and zinc sulfate असे काँबिनेशन आहे. बाकी येत्या काळात या बाबतीत अधिक माहिती वाचायला हवी. ३. Hydroxychloroquine चा हृदयावर होणारा गंभीर दुष्परिणामही ध्यात घ्यावा असा इशारा American College of Cardiology ने दिला आहे. ओक्के.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye
  • Log in or register to post comments
झ
झेन Sun, 04/05/2020 - 07:03 नवीन
मंत्रोच्चार कर्मकांड यावरचा तुमचा विचार वाचल्यानंतर आदर लईच वाढला आहे. तंबाखू आणि बाकीच्या गोष्टी सुटण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, बाकी डायबिटीस म्हणाल तर तुम्ही नक्कीच कंट्रोल करू शकाल असा विश्वास वाटतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/05/2020 - 07:04 नवीन
प्रामाणिक अनुभव कथन आवडलं. सध्याचा काळ जरा संशयाचाही आहे, आपण कोणा अनोळखी व्यक्तीशी संपर्कात आलो किंवा कोणी एखाद्या वस्तूला स्पर्श केला असेल तर त्या स्पर्शाचा आपल्याला काही होणार तर नाही ना, असे वाटायला लागते, खरं तर असं काही नसतं. आपण योग्य काळजी घेत असतो त्यामुळे मनात असे काही विचार येऊ द्यायचे नाही. आपलं मन सध्या फ़ूलटाईम रिकामं झालंय. टीव्ही, गाणी, मनाला आवडेल अशा गोष्टींमधे मन रमवणे म्हणजे सकारात्मक उर्जा मनात निर्माण होत असते आणि आपोआपच एक उत्साह निर्माण होतो. बाकी, आपल्याला काही गोष्टींची सवय असते आणि ते मोडून गेल्याने आपली पंचायत होऊन जाते. आपण जरा पाय मोकळे करायला जावे तर कुठे जावे असे वाटते. उग रिस्क नकोच. खाणे आणि झोपणे सालं भयंकर शिक्षा आहे. कधी एकदा लॉकडाऊन संपून परिस्थिती सामान्य होईल असे वाटायला लागले आहे. चार-पाच मित्र जमवून मस्त हॉटेल नाय तर ढाब्यावर पार्टी करु आणि त्या चीनच्या मातोश्रीची आठवण करु. बाकी, किरकोळ किराणा सामान पॅक, साबण-पाण्याने धुन पुसुन पापडासारखं कडक उन्हात वाळत घातलं होतं. च्यायला, काहीही करावं लागतंय. बाकी, मिपावर पडीक आहेच. मिपाने खरंच एकटेपणात खूप चांगला सपोर्ट केला. मालक, चालक यांचे मनापासून आभार. बाकी, दीप प्रज्वलन करणार्‍यांना (दीपावलीच्या) शुभेच्छा आहेतच. योग्य काळजी घ्या, रस्त्यावर येऊ नका. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Sun, 04/05/2020 - 07:27 नवीन
ऐन लगनसराईत हे विघ्न आल्याने नुकसान आहेच. एप्रिल मधल्या तिथी जास्त होत्या लग्नाच्या. पण जगावर संकट आलेलं आहे असं स्वतःला समजावत शांत राहणेच योग्य(पर्यायच नाही). फक्त एक दिवस भाजीपाला आणायला गेलो होतो. तेव्हा तिथलं वातावरण आणि इटलीची बातमी पाहून ठरवलं की पुन्हा इथे यायचं नाही. बटाटे थोडे जास्त घेतले. सध्या भाजीपाल्यासाठी मरमर(माझ्या परिसरात तशी स्थिती आहे)केल्यापेक्षा डाळींवर ताव मारलेला आहे. कडधान्य मोड आणून काम चालवतोय. त्यात खोबऱ्याची आमटी हा एक माझा आवडता पदार्थ. त्यात अंडी टाकली की अंडा कर्री, शेव टाकली तर शेव भाजी आणि पापड टाकून काय म्हणतात माहित नाही पण आवडीची भाजी आहे. बायको खुश की तीला माझ्या हातची भाजी मिळतेय. मिपावर पडीक असतोच. अजून एक काम केलंय मी या काळात मिपा प्रशासनाला ना विचारता. चुकीचे वाटल्यास मोठ्या मनाने माफ करावे. मला एका व्हाट्सअप समूहात बोका-ए-आझम यांची मोसाद वाचायला मिळाली. लेखकाला कसलेच श्रेय ना देता व्हाट्सअप वर लेख फिरतोय हे पाहून वाईट वाटले. इथल्याच काही लेखकांना विचारून मी बोकोबांच्या नावासहीत मिपाचे हक्क दाखवत मोसाद ची एक पीडीएफ करून पाठवली. योगायोग असा की बोकोबांच्या वाढदिवशी(बहुतेक दुसऱ्या दिवशी)त्यांच्या आईला वाचायला मिळाली. त्यांच्या आईशी बोलणे सुद्धा झाले माझे इथल्या सदस्यामार्फत. छान वाटलं म्हणाल्या.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 04/05/2020 - 07:58 नवीन
सही लिहिलंत अतृप्त आत्मा ! बाकी हा कालावधी म्हणजे पोरांना आणि नवबापांना एकत्र वेळ घालवायला सुवर्णसंधीच आहे ! मी या संधीपासून मुकलो होतो, कारण आठवड्यात एकच साप्ताहिक सुट्टी आणि ती ही गुरुवारी. पोराबरोबर बालपण जगू शकलो नाही. तुम्ही घ्या चान्स मारून. सध्या एक बरंय, रोज 'लॉक डाऊनः अमुकावा दिवस" हे वाचून प्रतिसाद देतोय, काही तरी लिहितोय हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 08:30 नवीन
काळजी घ्या भो बुवा, मुख्य म्हणजे पॅनिक होऊ नका, आनंदात जगा. बाकी इथं वर्तमानपत्र कुणी घेत नाही म्हणून नेहमीच्या पेपरवाल्याने पेपर अंगावर पडतात म्हणून आजपासून पेपर टाकणं बंद केलं. मग जवळच्या स्टॉलवर जाऊन पेपर आणला. बाईक स्वच्छ पुसून काढली, चालू करून सोसायटीतल्या रस्त्यावर १०/१२ चकरा मारल्या. मग द फ्लॅशचा एक एपिसोड पाहिला आणि मग एक ऑनलाइन चेस मॅच खेळून रामायण आणि व्योमकेश बक्षी पाहिले. आता महाभारत. #मी मेणबत्त्या लावणार नै, मी दिवे बंद करणार नै.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 08:35 नवीन
ठीक आहे. निदान सुरू कधी करणार ते तरी सांगा. ९:०९ ला का? ;) रागवू नका भाऊ. तुमचा राग मला झेपायचा नाही. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 08:38 नवीन
दिवेलागणीला :) बाकी मी रागावत नै हो कधी, कुणालाही विचारा इथे ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/05/2020 - 08:57 नवीन
मी मेणबत्त्या लावणार नै, मी दिवे बंद करणार नै.
सहमत. आजच्या दिवस सहमत फक्त. तुम्ही प्रतिसाद लिहून जाता, मी तुम्हाला सहमत म्हणतो. तुम्ही वाचत बसता आणि मला निस्तरावे लागते. तुमची करा आरास अन् तुमचे तुम्हीच लावा दिवे तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी ! -सुरेश भट   -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 04/05/2020 - 10:08 नवीन
मोबाईल चा लाईट लावा सर तुम्ही, तो झंझावाताने विझत नाही:)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/05/2020 - 10:30 नवीन
आता आम्ही इतके दिवे लावले आहेत की आम्ही दिवे बंद केले तरी लोक दिवे लावाच म्हणून मागे लागतील. ;) बाय द वे, तुम्हाला काल लायटीच्या प्रकरणात अधिकृत माहितीसाठी मेसेज करणार होतो. पण, नंतर विसरुन गेलो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 04/05/2020 - 09:53 नवीन
जवळच्या स्टॉलवर जाऊन पेपर आणला. बाईक स्वच्छ पुसून काढली..
ही दोन सलग जोडून लिहिलेली वाक्ये वाचून असे वाटले की तुम्ही लोकसत्ता विकत आणला असावा.. म्हणजे फ्रंट पेजने हेडलाईट पुसायचा. जाहिरातींच्या पानाने टाकी.. कुबेरांच्या अग्रलेखाने फक्त टायरच पुसायचे - असे पण कांही ठरवले आहे का..? ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 10:45 नवीन
नाही हो, आम्ही लोकसत्ता फक्त ऑफिसात कॉम्प्युटरवर वाचतो:)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/05/2020 - 12:05 नवीन
असे वाटले की तुम्ही लोकसत्ता विकत आणला असावा.. म्हणजे फ्रंट पेजने~~~~~
या विनोदी वाक्यासाठी मोदकास दोन प्लेटी मिसळ चुकलो गुर्जींची आवडती शाबुदाणा खिचडी देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 04/05/2020 - 16:15 नवीन
कंजूस काका... पत्ता द्या. :D
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 04/05/2020 - 15:52 नवीन
करोना वरचा सगळा राग हत्ती काकावर काढ़ा ! स्माइलयाची फ़ौज सोडा त्याच्या कायपपा वर !!!
  • Log in or register to post comments
ब
बबु Sun, 04/05/2020 - 08:31 नवीन
गुरुत्वकर्शनाविरुधचे व्यायाम करणे हा साखरेची पातळी कमी करणेसाठी एक चान्गला पर्याय आहे. https://www.youtube.com/watch?v=DXMo8ZbPmu8
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 04/05/2020 - 09:11 नवीन
गुरुत्वाकर्षणाविरूद्ध कीतीही काहीही केलं तरी ते काय नष्ट होणार आहे का?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/05/2020 - 09:42 नवीन
गुरुजी आजचा दिवस तुमच्या सगळ्या ढिशाव ढिशाव स्मायली ओता करोणासाठी. वेडावणारी, डोके आपटणारी, बंदुक मारणारी,
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/05/2020 - 10:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/05/2020 - 12:06 नवीन
करुणाला हसून स्वागत?!!
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sun, 04/05/2020 - 10:20 नवीन
तंबाखू खाणे/चघळणे हे एक व्यसन आहे, याची जाणीव होणे आणि ते सोडण्याची इच्छा होणे, यात तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. हे वाक्य जरी एखाद्या समुपदेशकासारखे वाटले तरी मी कुणी समुपदेशक नाही. मात्र तंबाखू, मावा, गुटखा, पान(अर्थातच एकसोबीस तीनसो), सिगारेट या सर्वांचा अनेक वर्षे उपभोग घेऊन सध्या दहाहून अधिक वर्षे सर्व प्रकारच्या तंबाखू पासून पूर्णपणे अलिप्त आहे. थोडासा संयम आणि मनोनिग्रह या बाबींवर तंबाखू, पान, सुपारी नक्की सोडू शकाल. व्यसन मुक्ततेसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 04/05/2020 - 10:41 नवीन
१) लोकशाही आहे त्यामुळेसर्वांना दिवे / मेणबत्ती वैगरे ना लावण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण हे लक्षात घ्या कि हे सांगणारा माणूस अश्या हि समजुतीत किंवा अंधश्रेद्धेत नाहीये कि हे केल्यानी काही या साथीवर परिणाम होणार आहे . हे सर्व केवळ प्रतीकात्मक आहे हे जर समजूनच घायवयाचे नसेल तर काय बोलणार ... तुमचा अंधकार तुम्हाला लखलाभ ! २) आणि हो २१ दिवानांतर "मित्रांबरोअबर ढाब्यावर पार्टी करण्याचा अधिकार हि सर्वांनाच आहे... नाही का... पार्टी करणाऱ्यांनी हे विसरू नये कि जसे दिवे लावून karona जाणार नाहीये तसे २१ दिवस हा काही मंत्र नाही ... अजुन्हि जगभर रोगाचा आलेख हा वाढतच आहे flattening the curve हि संज्ञा ऐकली नसावी बहुदा या "पार्टी अनिमल्स" मंडळींनी
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 10:57 नवीन
चौकसजी, प्राडाॅ किंवा प्रचेतस नसते, तर आजचा ९ च्या कार्यक्रमाची चर्चा केव्हांच संपून गेली असती. तो विषय केव्हांच मागे पडला असता. विषय सतत जिवंत रहावा यासाठी त्यांच्या चाललेल्या धडपडीला तरी दाद द्या. मोदींच्या प्रत्येक गोष्टींची खिल्ली उडवणारी मंडळी नसती, तर मोदी त्यांचे विचार सर्व भारतभर कधीच पसरवू शकले नसते व २००२ पासून त्याच्या विजयाचा आलेख सतत उंचावू शकले नसते. माझे तर म्हणणे आहे की मोदी विरोधक गप्प बसले तर आपण त्यांना मुद्दामहून बोलते केले पाहिजे. अन्यथा मोदिंचे काही खरं नाही. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 11:08 नवीन
तुम्ही आम्हाला मोदी विरोधक समजता ह्याचा खेद वाटतो. मग आम्ही तुम्हाला मोदी भक्त म्हणालो तर कसे वाटेल? त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करणे मला शक्य नाही, तुम्हाला जसं दिवे लावणं योग्य वाटतं किंवा त्यांच्या ह्या कृतीचेही समर्थन करणं योग्य वाटतं तसंच मलाही त्यांच्या ह्या कृतीला विरोध करण्याचा हक्क लोकशाहीनेच दिला आहे. जे पटत नाही ते नाही पटत. मग भले तुम्ही मला विरोधक म्हणा. आजचा सकाळ मधला शेखर गुप्तांचा लेख वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 11:12 नवीन
म्हणा की. त्याने मला काय फरक पडतोय. मी फक्त चौकस यांच्या प्रतिक्रियेतील राग किंवा उद्वेग कमी करायचा प्रयत्न करतोय. पण त्यातून तुम्ही दुखावले गेले असल्यास क्षमस्व. _/\_
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 04/05/2020 - 11:23 नवीन
प्रचेतसजी इथे कोण कोणाचा भक्त आहे कि नाही हा मुद्दा नाही मी फक्त एक मुद्दा ठेवला होता कि "हे प्रतीकात्मक आहे.. त्यावर विषय टाळून , तर्क टाळून त्याची खिल्ली उडवणे हे मात्र योग्य आहे का ( मला वाटते डॉ खरे यांनी पण साधारण याच प्रकारचा तर्क सांगितलं ) मग तो आज मोदींनी वापरला , उद्या काँग्रेस ने वापरला तरी मी तेच म्हणेन .. आणि हे हि मानतो कि आंधळी भलावण करणाऱ्यांच्या विधानातील फोल पणा दाखवून द्यायचा हक्क तुम्हाला आहेच प्रश्न नाही, म्हणजे उद्या जर कोणी ९/९ चाय कृतीतून काहीतरी ऊर्जा येऊन विषाणू पळवून लावेल असे म्हणत असेल तर तो मूर्ख पानाचा आहे ( मग हे मोदींनी स दावा म्हणले तरी हि मी त्याला मूर्खपणाचा म्हणीन ) मी हि कोणाचा भक्त नाही उदाहरणार्थ मोदींनी जेव्हा त्या गुहेत जाऊन एकांतवास वैगरे केला त्याच जे इव्हेंट झाला ते सुद्धा मला तरी सयुक्तिक वाटलं नाही..दिखाऊ पण वाटलं... घ्या भक्त नाही याचाच छोटा पुरावा दुर्दैव असे कि सर्व मोदी या व्यक्ती भोवती कशाला फिरायला पाहिजे.. आज देश संकटात आहे जग संकटात आहे ... तेवहा तारतम्य बाळगून सर्वांनी प्रयत्न करावे हे उचित नाही का? मग सुचवणार कोणीहि असो
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 13:39 नवीन
खिल्ली कुठं उडवली गेली? जे मला हास्यास्पद वाटलं ते वाटलं आणि मी ते उघडपणे नमूदही केलं. हे सर्व प्रतिकात्मक जरी मानलं तरी त्या प्रतिकात्मकतेने विषाणू दूर पळू शकत नाही हे तर खुद्द मोदींनाही माहिती आहेच, तेव्हा असल्या भानगडीत न पडता त्यांनी काही ठोस उपायांचा, किंवा लोकांना नुसता धीर दिला असता तरी ते पुरेसं ठरलं असतं असं वाटतं. शाब्दिक बुडबुडयांपेक्षा धीराचे २ शब्द निश्चितच अधिक परिणामकारक ठरतात असे वाटते. दुर्दैव असे कि सर्व मोदी या व्यक्ती भोवती कशाला फिरायला पाहिजे.. हेच म्हणतोय, जरा कुठं थोडं विरोध केला तर बचावासाठी यायलाच हवं का?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 04/05/2020 - 13:54 नवीन
मोदींच्या बचावासाठी नाही तर केवळ त्या कल्पने मागचा थोडा तर्क सांगत होतो..तर केवळ त्या कल्पने मागचा थोडा तर्क सांगत होतो.. असो
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 14:24 नवीन
ओक्के, हरकत नाही.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 04/05/2020 - 19:26 नवीन
माझा मित्र जो चौकातला किराणा दुकानदार आहे, आणि सध्या भाजप समर्थक आहे. (आठ वर्षांपूर्वी मनसे चा समर्थक होता, दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा, थोडक्यात भेळ तिकडं खेळ टाईप). शिवाय त्याचा भाऊ राजकीय कार्यकर्ता आहे (वाऱ्याच्या दिशेप्रमाने झेंडा बदलतो). तर मला हे दिवेलागण प्रकरण ना पटल्याने लाइट्स चालू ठेवल्या होत्या. तर नऊला एक दोन मिनिट कमी असताना त्याचा फोन आला, अरे कर की बंद. मोदींनी सांगितलय ना की दिवे लावायचे. बालमित्र असल्याने मी त्याला झापू शकतो अन् त्यालाही हे माहिती आहे. ए गप, म्हणालो आणि लाईट चालू ठेवल्या. बाकी भक्तांना आंधळी भक्ती, सकारात्मक ऊर्जा, मानसिक शक्ती असं काही कारण चालतं. कारण त्यात डोक्याला त्रास देऊन विचार करायची गरज नसते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/05/2020 - 12:11 नवीन
याच कारणासाठी मी मोदींवर बाजूने (?)अथवा विरोधी(?) वक्तव्य करण्याचे इथे /कुठे टाळतो. बाकी वल्ली आणखी कोणकोणते खेळ खेळतात?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 04/05/2020 - 12:16 नवीन
खरं आहे. कारण नसताना गैरसमज होऊ शकतात. लेखन संन्यास घेतलेलाच बरा. असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/05/2020 - 12:53 नवीन
सन्यास नाही घ्यायचा. मतं पटो न पटो गप्पा करायच्या. कोणत्याही गटा तटाचा आपल्याला शिक्का मारला तरी त्याचा विचार नाही करायचा. आणि गैरसमज नै होऊ द्यायचे. येत राहा लिहित राहा. मी तुमचे दोघांचेही प्रतिसाद आवडीने वाचत असतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 13:39 नवीन
हेच म्हणतो. येत राहा, लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/05/2020 - 13:42 नवीन
पण आपण बोलणे आणि प्रसिद्ध पत्रकारांनी बोलणे ,टीका करणे यात फरक पडतो हो. मोदींच्या कामकाज पद्धतीची समीक्षा करणारा France 24 channel लेख
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/05/2020 - 14:36 नवीन
कंजुसकाका, आम्ही बोललो की वाईट वाटतं. विरोधी पार्टीचे किंवा काहीच्या काही बोलल्या जातं. आपण ते कै मनावर घेत नै पण तुम्हाला असलेलं सत्य बदलता येत नाही. प्रत्येक वेळी देशभक्त, देशप्रेमी अशी लेबलं लावून चुकीच्या गोष्टींवर पांघरुन टाकताही येत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 04/05/2020 - 15:19 नवीन
आपलं बोलणं आवडत नाही लोकांना. म्हणजे असं की मंत्री, मुमंत्री, पंप्रच्या निर्णयांची समीक्षाही करायची नाही. वाईट म्हटले की चिकमगळुर/वायनाड/रायबरेलीला पाठवतात.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 04/05/2020 - 13:15 नवीन
लेख वाचला आणि परतीकिर्या वाचायला घेतल्या पण डोक्याला शॉट लागेल अशी शंका आल्याने तो विचार ताबडतोब रहीत केला. बाकी, आज मीपण एका मित्रासोबत ऑनलाईन चेस खेळलो आणि चक्क जिंकलो. आजवर कधी लिंबू चमचातही न जिंकलेला मी बांगलादेशी प्लेयर्ससारखा नाचलो जिंकल्याच्या आनंदात. =)) window.addEventListener("message",e=>{e.data&&"6585098"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)}); सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/05/2020 - 13:26 नवीन
चांगला डाव. चांगले खेळले तुम्ही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 13:40 नवीन
गेम मस्त झाला. सुरुवातीच्या चाली अगदी शेम टू शेम झाल्या. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 14:28 नवीन
सरांबरोबर एक मॅच झाली, सर खूपच छान खेळले, माझा वजीर कोपच्यात पकडला. काय करावं ते मला सुचेना झालं. शेवटी तर ते अगदी जिंकता जिंकता राह्यले. वेळेअभावी त्यांना गेम गमवावा लागला. अन्यथा जवळपास पूर्ण डावावर त्यांचीच पकड होती. window.addEventListener("message",e=>{e.data&&"6585228"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/05/2020 - 14:41 नवीन
अभिनंदन, तुम्ही चांगले खेळले. टायमिंगवर का होईना तुमचा विजय होत आहे. विजय असा समीप दिसत होता. बस एक दोन चालीत तुमचा पराभव निश्चित होता. माझ्यासाठी हे निराशाजनक आहे. पण, मी सावरुन जाईन या धक्क्यातून.
अल्प विश्रांती मिसळपाव आज दिनांक ०५/०४/२०२० रोजी रात्री २१.०० वा. (भा.प्र.वे.) विश्रांती अवस्थेत जाईल. रात्री २२.०० वा. आम्ही आपला सेवेत परत येऊ.आपल्या संयमासाठी धन्यवाद.
वल्लीसेठ, काय आहे राव हे... जरा आपण मिपावर रमलो की आपल्या आनंदावर विरजन. नऊ मिनिटाचं ठीक होतं, यांनी तासभर कसर भरुन काढायचं ठरवलं वाटतं. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/05/2020 - 14:44 नवीन
अगदी अगदी. तासभर विश्रांती २४ तासांची न होवो म्हणजे मिळवली. बाकी तुमच्या विजयाची मी देखील आतुरतेने वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा