Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भाजपचे दिल्लीत पानिपत ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/09/2020 - 07:44
🗣 79 प्रतिसाद
राम राम मंडळी. गेली काही दिवस ज्या निवडणुकांचे बिगूल वाजत होते ज्याची अतिशय चर्चा होत होती अशा नवी दिल्लीतील भाजपने प्रतिष्ठेच्या केलेली लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पुन्हा विजयाकडे वाटचाल करतील असा मतदानोत्तर चाचण्यांचा कल दिसत आहे. भाजपचे केंद्रात सरकार असल्यामुळे साम दाम दंड भेद नितीचा वापर करुन या निवडणूकीत काही चमत्कार करता येईल का असा एक प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तसेही इतर पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. एकही जागा नसलेली काँग्रेसपक्षाला अजूनही सावरता आलेले नाही. मात्र अनपेक्षितपणे दिल्लीच्या मोठ्या एका आंदोलनानंतर राजकीय प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीने दोनदा ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले आणि त्यांनी दिल्लीकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, नवीन बदल केले एक आश्वस्त करणारा प्रचार केला. वीज,पाणी, शाळा, पर्यावरण, रस्ते शासकीय योजनांचा योग्य उपाययोजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवल्या म्हणूनच तिसर्‍यांदा लोकांनी त्यांना निवडले आहे असे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसत आहेत. दुसरीकडे भाजपने नेहमीप्रमाणे धार्मिक ध्र्वीकरण ज्यात हिंदु-मुस्लीम गट तट करुन पाहिले. काही राष्ट्रीय मुद्द्यांना दिल्लीत टाकून पाहिले. संघपरिवाराने सव्वालाख कार्यकर्त्यांना प्रचारात लावले. (संदर्भ दैनिकातल्या बातम्या) काही खासदारांना मतदारसंघ वाटून निव्वळ त्याच मतदारसंघावर फोकस करण्याचा सांगण्यात आले. साधन संपत्तीचा योग्य उपयोग करुन त्यांना प्रचाराला जुंपले तरीही दिल्लीकरांनी या सर्व गोष्टींना नाकारुन आपवरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीवर टीका करुनही त्यांच्या विकासाच्या मार्गाला कोणीही रोखू शकलेले नाहीत असे वाटायला लागले आहे. मंडळी, राजकारणात सतत कोणीही आम्हीच सरकारात असू असे स्वप्न पाहू शकत नाही. जनतेचे प्रश्न कोणते, प्राधान्याने कोणते प्रश्न सोडवायला हवेत. यावर भर दिला की लोक योग्य पर्याय निवडतात असे वाटते. येत्या काळात जनता दिल्लीचा प्रवास कसा असेल ते बघणे रोचक असेल. अजूनही निश्चित कोणाची सत्ता येईल हे जरी गुलदस्त्यात असले तरी भाजपचे पानिपत होऊन मतदानोत्तर चाचण्या आपच्या पदरात कल टाकत आहेत असे दिसते. मंडळी, या सर्व निवडणू़कीत अजून काय मुद्दे होते ? दिल्ली विधानसभेतील बलाबल काय असेल ? संभाव्य वाटचाल आणि इतर दिल्ली राजकारणा विषयी आपापली मतं संदर्भासहीत, कोणाचाही व्यक्तीगत द्वेष न करता, शांतपणे काही वैचारिक चर्चा पुढे घेऊन जाता येईल काय, त्यासाठीचा हा काथ्याकूट. आपलं स्वागत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 37145 views

🗣 चर्चा (79)
ग
गवि Sun, 02/09/2020 - 07:56 नवीन
जनतेने जागरूकपणे मतदान करून कोणालाही निवडून आणले तरी आनंद आहे. मी लोकशाहीच्या बाजूने आहे. मोदी किंवा रागा किंवा अके यांच्या नव्हे. 'आप'चे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 02/09/2020 - 08:43 नवीन
चांगल्या शाळा/रुग्णालये की हिंदू-मुस्लिम तणाव्,जिन्ना,सावरकर,पाकिस्तान.. दिल्लिकरानी विचारपुर्वक मत दिले असेल अशी अपेक्षा. केजरीवाल ह्यानी मोदीविरोधात बोलावे, गोदी मिडियाने त्याचे भांडवल करावे व 'केजरीवाल कसे अहिंदू आहेत्,कसे सुडो-लिबरल आहेत' अशी मध्यम्वर्गात चर्चा व्हावी. आतापर्यण्तचा हा ठरलेला पॅटर्न होता. ह्यावेळी मात्र आम आदमी पक्षाने त्या समजास तडा दिला. हनुमान मंदिरात जाणे, हनुमान चालिसा म्हणण्याबरोबर बुनियादी मुद्द्यांवरच मतदारांचे लक्ष राहील हे 'आप'ने पाहिले. त्यामुळे आता अमित शहांची 'चाणक्य'निती किती यशस्वी होते ते मंगळवारी कळेल.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 02/09/2020 - 10:07 नवीन
समजणे महत्वाचे आहे. माझ्या दिल्लीतील वासतव्यात आलेला अनुभव हे सांगतो मेजोरिटी दिल्लीकरांना फुकट हवे असते, तो झोपडीतला असु देत कि डिफेन्स काॅलनीतील, त्यामुळे केजरिवालने दाखवलेल्या फुकट बस, फुकट लाइट, फुकट औषधे, फुकट शाळा, यामागे मिनिओन्स गेले असतीलही, मंगळवारी नेमके कळेल.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Sun, 02/09/2020 - 11:20 नवीन
फुकट दिल्याने दिल्ली राज्य दिवाळखोरीत गेले आहे का? नसेल गेले तर वाईट काय आहे?
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 02/09/2020 - 11:57 नवीन
सहमत उलट त्याच राज्यातील लोकांनी भरलेला कर आणि अन्य रीतसर उत्पन्नाचे मार्ग / वाटा यांतून सर्वांना मोफत सुविधा देऊ शकत असतील तर भ्रष्टाचार / पैशाचे लीकेज अत्यंत आटोक्यात आणलं आहे असं म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 02/10/2020 - 08:46 नवीन
दिल्ली हि देशाची राजधानी असल्यामुळे तेथे मिळणाऱ्या करांचे प्रमाण (केंद्राचे आणि राज्यांचे) भरपूर आहे.शिवाय त्या राज्याचे क्षेत्रफळ फारच कमी आहे. महारष्ट्रात गडचिरोली गावात रस्ता बांधण्यासाठी वीज पुरवण्यासाठी येणाऱा दरडोई खर्च हा दिल्लीतील एखाद्या वस्तीला रस्ता बांधण्यासाठी येणारा खर्चाच्या दसपट किंवा वीस पट आहे आणि त्यातून मिळणारा महसूल हा एक पंचमांश आहे. मग गडचिरोलीच्या खेड्यातील माणसांना एस टी चा किंवा विजेचा दर दहा पट लावणार का? दिल्ली राज्याने बहुसंख्य पायाभूत सुविधा केंद्रशासित असल्यापासून आंदण म्हणून फुकटात मिळवल्या आहेत. त्या मुळे कोणतेही कर्जाचे हप्ते नसताना भरपूर कर मिळवून आयजीच्या जीवावर बायजी उदार म्हणून मतांसाठी जनतेला फुकटेपणाची सवय लावण्याची हि वृत्ती शेवटी देशाच्या मुळावर येईल. दिल्ली काही केजरीवाल यांनी उभी केलेली नाही. दिलीत विजेचा एक खाम्ब टाकायला दहा हजार रुपये खर्च येतो तर गडचिरोलीला २५ हजार येतो. आणि गडचिरोलीलाला एका वस्तीला वीज पुरवायची असेल तर १०० खांबांची गरज पडत असेल तर दिल्लीत दहा खांबात ते काम होतं. गडचिरोलीला त्या वस्तीतून मिळणाऱ्या विजेच्या बिलातून पुढची १०० वर्षे तरी हा भांडवली खर्च निघणार नाही. मग गडचिरोलीला वीजच पुरवायची नाही का? हि वीज पुरवण्यासाठी महारष्ट्रातील जनतेच्या करातून हा पैसा पुरवावा लागेल यामुळे दिल्ली "राज्याला" बरीच गोष्टी फुकट देणे परवडते.पण महावितरणला १४९०० कोटींचा तोटा असताना हे महाराष्ट्राला परवडेल का? आता महाराष्ट्रात मतांसाठी पण १०० युनिट पर्यंत फुकट वीज द्यायचा बेत चालू आहे https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/maharashtra-plans-free-power-for-those-who-consume-up-to-100-units/articleshow/74021095.cms एकदा लोकांना फुकट मिळायची सवय लागली कि तो हक्क होऊन जातो आणि हि फुकट द्यायची सवय शेवटी जनतेच्या मुळावर येते. धीरूभाई अंबानी याना भ्रष्टाचार बद्दल विचारले असता त्यांनी अशी मखलाशी केली होती कि माझे काम केल्याबद्दल मी त्या कर्मचाऱ्याला खुशीने चार पैसे दिले तर त्याच्या मुलाबाळांचे कल्याण होते. याचा परिणाम म्हणजे ज्या माणसाला असे पैसे देणे परवडत नाही त्याचे काम होत नाही आणि सर्वात वाईट म्हणजे त्या कर्मचाऱ्याला पैसे मिळवण्याची सवय होते.
  • Log in or register to post comments
व
वगिश Tue, 02/11/2020 - 03:42 नवीन
पण पण पण...... तुमचे सामान्य ज्ञान गेले चुलीत.. मला मोदी आवडत नाही... मी भाजप विरोध करणारच.मग ते देशविघातक असुदे नाहीतर इतर काही..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/11/2020 - 05:09 नवीन
१००% सहमत.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sun, 02/09/2020 - 18:27 नवीन
दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांचं ट्विट वाचा. सगळ्या एक्सिट पोल्स मध्ये आप चा विजय दर्शवल्या नन्तर तिवारींनी हे ट्विट केले आहे. 'ये सभी एग्ज़िट पोल होंगे fail.. मेरी ये ट्वीट सम्भाल के रखियेगा.. भाजपा दिल्ली में ४८ सीट ले कर सरकार बनायेगी .. कृपया EVM को दोष देने का अभी से बहाना ना ढूँढे.' ०८/०२/२०
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/10/2020 - 04:24 नवीन
धाग्याचा आत्माच काढून घेतला तुमच्या प्रतिसादाने. आता मंगळवारची वाट पाहणे आले. इतरवेळी एक्झिट पोलवर विश्वास ठेवणारे किंवा जनतेच्या मनात योग्य कल भरणारे जेव्हा कल विरोधात जातोय असे वाटत आहे तेव्हा एक्झिट पोल फेल होईल अशी 'चमत्काराची' भाषा करू लागतात तेव्हा काही तरी 'झोल' आणि 'संभ्रम'करण्यात भाजपचा आणि त्यांच्या मिडियाचा कोणी हात धरु शकणार नाही. माझा अशा कोणत्याही 'झोल'वर विश्वास नाही. एकूण ही सर्व मते मतांतरे पाहता भाजप ०३ सीट्सवरुन १२ ते १५ सीट्सवर जाऊ शकेल कारण अरविन्द केजरीवाल आणि त्यांच्या वास्तवदर्शी विकासाच्या मुद्याला भाजपा पराभूत करू शकणार नाही अशी माझी धारणा आहे. उद्या काय होईल ते कळेलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 02/10/2020 - 06:23 नवीन
पंजाब मधील शेवटच्या विधानसभा निवडणुकीत एक्सिट पोल प्रमाणे आप ला १०० जागा मिळणार होत्या. पण प्रत्यक्षात मिळाल्या वीस. आप ने त्यामळे इ व्ही एम विरुद्ध खूप बोंबाबोंब केली. आता अकरा तारखेस काय होते ते पहायचे.
  • Log in or register to post comments
व
वगिश Tue, 02/11/2020 - 03:45 नवीन
आपण काय विचार करून हा प्रतिसाद दिला आहे, 2019 लोकसभे चे exit पोल इतक्या लवकर विसरलात?? ( AAP हरणार असे मी म्हणत नाही पण तुमच्या मनातील भाजपा विरोधामुळे निर्माण झालेला भूलभुलैया सोपा करण्याचा प्रयत्न)
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Sun, 02/09/2020 - 19:48 नवीन
भाजपला बहुमत मिळणार. ४.३० नंतर मतदानात २८-३०% वाढले आहे. एक्झिट पोल मध्ये ४.३० पर्यंतचेच आकडे विचारात घेतलेत. त्यामुळेच भाजपा आणि शहा एवढे ठाम आहेत. आणि सातही एक्झिट पोलमध्ये आप ला बहुमताचा अंदाज व्यक्त केला असतानाही केजरीवालने एक्झिट पोलवरती शंका व्यक्त केली आहे. असे पहिल्यांदाच होत असेल. विजयाचा अंदाज व्यक्त करुनही पक्षाचा नेता साशंक आहे. आपच्या बहुमताचे अंदाज देणारे पोल काल ६.३० सुरु झाले. ७ वाजता आपची तातडीची बैठक बोलावली होती. 'हरणाऱ्या' भाजपाची बैठक मात्र रात्री १० वाजता सुरु झाली
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Sun, 02/09/2020 - 19:58 नवीन
केजरीवाल सरकारवर दिल्लीकर नाराज होण्याचे कारण कोणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 02/10/2020 - 06:14 नवीन
केजरीवाल यांच्यावर त्यांचे गुरु अण्णा हजारे आणि समाजात स्वच्छ प्रतिमा असलेले योगेंद्र यादव, प्रशांतभुषण आणि कुमार विश्वास यांच्या सारखे साथीदार हे का नाराज आहेत हे कोणी सांगू शकेल का ? राज्यसभेतील आप च्या वाटेला आलेल्या तीन जागा पैकी दोन जागा राजकारणाशी सुतराम सम्बन्ध नसलेल्या आणि ख्याती नसलेल्या दोन गुप्तांना का दिल्या हे कोणी सांगू शकेल काय ? त्यांनी अब्रुनुकसानीच्या किती खटल्यामध्ये माफी नामे लिहून तुरुंगात जाण्याचे टाळले हे कोणी सांगू शकेल का ? हि यादी आणखी बरीच वाढवता येईल पण सध्या एवढे पुरे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 02/10/2020 - 07:14 नवीन
"केजरीवाल सरकारवर दिल्लीकर नाराज होण्याचे कारण कोणी सांगू शकेल का?" दिल्लिकर अनेक वर्गात विभागला गेला आहे रे ऋतुराजा. गरीब व निम्नमध्यम वर्गाचा पाठिंबा 'आप'ला नक्किच असेल. पण व्यापारी वर्ग्,लब्धप्रतिष्ठित्,उच्च मध्यम वर्ग.. ह्यातील अनेक लोकाना कथित राष्ट्रवादाचे आकर्षण असते. तर काहीना धर्माचे असते. आपल्या शहरातील सरकारी शाळा सुधारल्या ह्याचे ह्यावर्गाला कौतुक असेलच असे नाही. पण सरकारने रस्त्यावर नमाज पढायला बंदी केली ह्याचे त्या वर्गाला कौतुक असेल. ह्यातील कोणत्या वर्गाने कसे मतदान केले आहे ते उद्या समजेल.
  • Log in or register to post comments
ज
जोन Mon, 02/10/2020 - 10:09 नवीन
कि पानपता नन्तर सुद्धा मराठा राज्य ५० वर्स भारतातिल सर्वात मोठे राज्य होते.....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/11/2020 - 04:05 नवीन
सकाळी सकाळी देशात एक चांगली बातमी जावी, देशभरात विकासाच्या वाटचालीचा पाया रचणारे, विधायक दृष्टी असणारे अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी राज्यभिषकाकड़े वाटचाल करी आहे असे सुरुवातीच्या अंदाजावरुन दिसत आहे. आप ४९ भाजप १३ इतर -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वगिश Tue, 02/11/2020 - 04:46 नवीन
अजूनही राजेशाही जपणारी गुलाम मानसिकता.. भक्त सगळेच असतात, प्रत्येकाचा देव वेगळा असतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/11/2020 - 04:55 नवीन
मंडळी, दिल्ली विधानसभेचे अंदाज पाहता अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीम ५० + पुढे जाईल असे दिसत आहे. आणि देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना प्रचारात उतरुनही १५ च्या पुढे जाता येत नै ये असे दिसते. लाजीरवाना पराभव नसला तरी आम आदमी पार्टी यांच्या विजयाची कारणे आणि भाजपंचं पानिपत यावर सविस्तर प्रतिसाद लिहिनच. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमला सत्तेसाठी शुभेच्छा देतो. आणि ज्यांचा पराभव होत आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे सुचवायला हरकत नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे (दिल्लीच्या जनतेचं कौतुक वाटलेला)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/11/2020 - 04:58 नवीन
अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमला सत्तेसाठी शुभेच्छा देतो. आणि ज्यांचा पराभव होत आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे सुचवायला हरकत नाही असे वाटते. हेच आत्मपरिक्षण २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेला का नाही केलंत म्हणे?
  • Log in or register to post comments
श
शेखर Tue, 02/11/2020 - 06:02 नवीन
तुम्हाला सुसंगत उत्तर मिळो ही केजरीवाल चरणी प्रार्थना.....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/11/2020 - 06:47 नवीन
लोकसभेत का पराभव झाला त्याचं आत्मपरीक्षण केलंच असणार कारण लोकसभा दिल्लीकरांच्या विकासात काय हातभार लावू शकेल हा मनोमन विचार दिल्लीकरांनी नक्कीच केला असणार. तेव्हा वातावरण ढवळू निघालेले होते. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल असं ते युद्ध लढवले गेले. ''आप''ला दिल्लीकरांनी या लढाईत दूर ठेवलं. भाजपा नेतृत्वाने भावनिक आवाहान केले. पुलावामा अटॅक, ऊरी आणि बालकोट येथील घटनांचा राष्ट्रप्रेमाचा अर्थ असा लावला आहे की मोदी असतील तरच पाकिस्तान घाबरून राहील नाही तर पाकिस्तान आपल्यावर दहशत माजवेल. याबाबतीत काही लोक अशा विषयांच्या बाबतीत पूर्णपणे आहारी गेलेले दिसून येतात. निवडणूक काळात विविध सोशियल मिडियावर ट्रोलांनी केलेली वातावरण निर्मिती या धामधूमीतून आप बाहेर पडले. लोकांना वाटत असलेली भीती की जर पुन्हा भाजपा सत्तेवर नाही आले तर या देशाचं काय होईल या अनामिक भीतीने भाजपला लोकसभेत तारले आणि म्हणूनच ज्यांच्या बुद्धिचा काहीही सबंध नसलेले (अपवाद असतीलही) स्वामी,साध्वी, बाबा लोक निवडणुकी उभे राहतात आणि ते निवडून येतात. दिल्लीकरांनी बेगड्या देशप्रेमाला प्राधान्य देऊन विकास आणि तत्सम गोष्टीला वेटींंगवर ठेवलं आणि योग्य वेळ येताच त्यांच्या पदरात माप टाकलं असेल असं मला वाटतं. सध्या आम आदमी पार्टीच्या विजयाचा सर्वांनी मनमुराद आनन्द घ्यावा कारण ही लोकशाही आहे, लोक योग्य वेळी योग्य बदल करत असतात असा तो ध्वन्यार्थ. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/11/2020 - 07:33 नवीन
दिल्लीकरांनी बेगड्या देशप्रेमाला प्राधान्य देऊन विकास आणि तत्सम गोष्टीला वेटींंगवर ठेवलं आणि योग्य वेळ येताच त्यांच्या पदरात माप टाकलं असेल असं मला वाटतं दिल्लीकरांनी वीज, पाणी अशा फुकट मिळणार्‍या गोष्टींना भुलून केजरीवाल सरकारला तारलं असं मत आहे. दिल्लीचा खर्‍या अर्थाने विकास झाला तो शिला दिक्षित ह्यांच्या कारकिर्दित. आपण शिला दिक्षितांना ह्याचे श्रेय दिल्याचे कुठे आढळले नाही. सुदैवाने मला तेव्हा दिल्लीला जायची संधी मिळाली होती. स्वच्छ रस्ते, मेट्रोचे व्यापक जाळे. कुठूनही कुठेही सहज जाता येणे ही खासियत. बाकी दिल्लीचा काही भाग आजही गलिच्छ आहे हे सांगणे न लगे. बाकी केजरीवालांना मनापासून शुभेच्छा आहेतच.
  • Log in or register to post comments
व
वगिश Tue, 02/11/2020 - 05:38 नवीन
भाजप च कौतुक वाटत आहे, कुठलेही फुकट देण्याचे आमिष न दाखवता मागील (2015) 3 जागांवरून 20 वर घेतलेली झेप नक्कीच अभिनंदनीय आहे.
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Tue, 02/11/2020 - 05:44 नवीन
नैतिक विजय साजरा करायला मोकळे :)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 02/11/2020 - 14:24 नवीन
मारली ओ मालक!100% घसघशीत वाढ आहे जागांमध्ये! काय पानपत अन काय !! :-D
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/11/2020 - 06:55 नवीन
मला गम्मत वाटते कि काँग्रेसी लोक स्वतःला एकही जागा मिळत नसताना केवळ भाजप निवडून येत नाही याचा आनन्द व्यक्त करत आहेत. हे म्हणजे आपलं पोरगं नापास झालं तरी चालतंय पण शेजाऱ्याचा मुलगा पहिला न आल्याचा आनंद साजरा करत आहेत. गम्मतच आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/11/2020 - 07:05 नवीन
आणि सध्या आपलं अपयश झाकून ठेवण्यासाठी बरेच काँग्रेसी "तात्पुरते" आपटार्ड झालेले आहेत. म्हणजे कसं भाजपला हरवल्याबद्दल वाकुल्या दाखवता येतात आणि काँग्रेसी म्हणून टीका हि सहन करावी लागत नाही. भंपक मनोवृत्ती.
  • Log in or register to post comments
फ
फुटूवाला Tue, 02/11/2020 - 07:41 नवीन
ईव्हीएम यंत्रणा सुटली :)
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/11/2020 - 08:22 नवीन
केजरीवाल व आम आदमी पक्षाचे मनापासुन अभिनंदन. हिंदु-मुस्लिम, सुडो लिबरल,टुकडे टुकडे..अशा विविध पण बोगस मांडणी लोकप्रिय करणार्या भाजपाला हरवणे व सत्ता कायम ठेवणे सोपे नव्हते. "जे आम्हाला विरोध करतात ते सगळे देशद्रोही व पाकिस्तान पुरस्कृत" अशा धाटाची मांडणी मे २०१९ ला चालली पण ह्यावेळी दिल्लिकरानी भाजपाचा कावा ओळखलेला दिसतो. आता पुढे बिहारमध्ये निवडणूक आहे. बिहारची सामाजिक परिस्थिती पाहिली तर 'हिंदू खतरे मे ' म्हणत हिंदू-मुस्लिम विभाजन करणे हा भाजपा-संघाचा पुढचा कार्यक्रम असेल.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 02/11/2020 - 09:57 नवीन
दिल्लि मे हिंदुत्व के भेजेमे गोलिमारि है देश्द्रोहियोने. हिंदुस्तान खतरेमे है. हिंदु के राजा मोदि जि को ईसे हल्केमे नहि लेना चाहिये. सिर्फ अयोध्यामे हि नहि अभि तो हर चौक पर प्रभु राम का मंदिर होना हि चाहिये. चाहे तो होस्पिटल,स्कुल मत बनाव लेकिन मंदिर होना हि चाहिये. चाहे तो विकस मत करो लेकिन ईन देश्द्रोहियो से हिंदुस्तान को बचाओ.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 02/11/2020 - 10:27 नवीन
३७०, ३५ए व सीएए च्या नंतर झालेली पहिलीच निवडणूक. जबरदस्त धृविकरण झालेले दिसून येतयं. आप व भाजपा दोघे मिळून ९२% मते मिळवत आहेत. केजरीवालांना १% टक्काच मते कमी पडलेली म्हणजे त्यांनी गेल्यावेळची मते टिकवली असे म्हणता येईल. तसेच या धृविकरणाचा फारसा परिणाम केजरीवालांना मिळालेल्या मतांवर झालेला दिसून येत नाही. मात्र १९९३ च्या अयोध्या यात्रेनंतर प्रथमच भाजपाची मत ३९% पर्यंत वाढलेली दिसत आहेत. मागच्या वेळेपेक्षा ७% जास्त मत मिळालेली दिसत आहेत. भाजपाला धृविकरणाचा जबरदस्त फायदा झालेला दिसून येत आहे. सरासरी ३४.५०% च्या भोवती फिरणारी मतांच्या संख्येतून भाजपा बाहेर पडलेली दिसतीय. धृवीकरणाचे फायदे असेच मिळायला लागले तर भाजपा समान नागरी कायदा आणण्याचे प्रयत्नपण करायला लागू शकेल. पक्ष १९७७ १९८३ १९९३ १९९८ २००३ २००८ २०१३ २०१५ २०२० जनता दल ५२.६० - - - - - - - - काँग्रेस ३६.१० ४७.०५ ३४.०५ ४७.०८ ४८.०१ ४०.०३ २४.०७ ९.७० - भाजप - ३७.०० ४२.०८ ३४.०० ३५.०२ ३६.०३ ३३.०३ ३२.०३ ३९.००- आप * - - - - - - ५४.५ ५३.००
  • Log in or register to post comments
M
mayu4u Fri, 02/14/2020 - 08:19 नवीन
भारी विश्लेशण!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/11/2020 - 11:36 नवीन
विकासाच्या मुद्दयांवर निवडणूक लढवून जिंकता येते हे आप ने दाखवून दिले आहे. त्यांचे अभिनंदन. बाकी आजकाल वेळ नसल्याने येथे येता येत नाही. नाहीतर जे फुकट दिले म्हणून वोटिंग केले गेले असे भासवत आहे त्यावर नक्कीच उत्तर देता आले असते. बजेट, कर या वाढलेल्या पैस्यातुन जर कोणते सरकार त्याच लोकांना पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य यात हातभार लावत असेल तर आपण नावे ठेवायची काय? असो. फुकट मला hi कधीच पसंद नाही.. परंतु कर्ज घेऊन फुकट आणि बजेट आणि कर रक्कम सुधारून फुकट यात फरक आहेच. असो.. --अवांतर.. माझा 5 वर्षा पूर्वीच्या धाग्याला रिप्लाय देणार होतो. पण हा धागा दिसला सो येथेच रिप्लाय योग्य. पण जुने रिप्लाय वाचून मज्जा आली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/11/2020 - 11:40 नवीन
सरकार मीडिया पोसतंय हे माहिती होतं, पूर्वीही असल्या दूकानदा-या चालू असतील पण आज वार्तांंकन करतांना त्यांनी नेहमीप्रमाणे कळस गाठला. एकीकडे एक्सिट पोलने 'आप' ५५+ आकडे दाखविल्यानंतर ''आज जो रुझान आ रहे है उससे २१ सीटोपर भाजपा आगे चल रही है'' असे Abp न्यूज वाजवत होते. आणि भाजपच्या उमेदवारांपेक्षा त्या एंकरचा तेथील बीजेपी एक्सपर्टचा उत्साह बियरमधून बाहेर पडणा-या फेसाप्रमाणे फसफसत होता. ते पाहून हसायला येत होतं. आत्ता ६३ आप आणि भाजप ०७ दाखवल्यावर उसनी चर्चा बघुन गम्मत वाटत होती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 02/11/2020 - 12:15 नवीन
इ.व्ही एम. अशीच भाजपा विरोधकांच्या सोयीने नीट काम करत राहोत
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 02/11/2020 - 18:19 नवीन
गेल्या निवडणुकीपेक्षा दुपटीहून जास्त जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळालेल्या भाजपाचे आणि त्यांच्या समर्थकांचे हार्दिक अभिनंदन! असेच यश निरंतर मिळत राहो ही मोटाभाई आणि नमोचरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/11/2020 - 18:28 नवीन
खोडसाळपणा गेला नै तुमचा अजुन असे मत व्यक्त करून थांबतो. ;)(कपाळ ठोकणारी स्मायली) -दिलीप बिरुटे (आजानुकर्णाचा जालशाळा सोबती) ;)
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/11/2020 - 21:06 नवीन
(बिरुटे सरांच्या मैत्रिपुर्वक आग्रहा खातर एक पिंक टाकत आहे :) ) सर्वप्रथम "भाजपचे दिल्लीत पानिपत?" असे शिर्षक दिल्याने, त्यात अरविंदरावांचि तुलना नकळत अहमदशहा अब्दालीशी झाली आहे. हे सरांचे अभ्यासपूर्ण प्रामाणिक मत आहे का खोडसाळपणा आहे ते काही मला माहीत नाही... फक्त आमच्या लक्षात आले आहे इतके सांगू इच्छितो ;)  आता माझी काही निरीक्षणे: भले दिल्ली बाहेरच्या पब्लिकला काही वाटोत, पण आप ने काम केले आहे असे जर दिल्लीतल्या बहुमताला वाटत असेल तर आप ला बहुमत मिळाले हे योग्यच झाले. जसे मोदी सरकारला नुसते बहुमतच नाही तर आधी पेक्षा अधिक जागा भारतीय जनतेने दिल्या ते योग्य झाले तसेच. दोन्ही संदर्भात दोघांच्याही विरोधकांनी बोटे मोडत बसण्याचे काही कारण नाही...  स्थानिक (म्हणजे राज्यस्तरीय) निवडणुकांसंदर्भात जर स्थानिक जनता राज्याच्या कारभार संदर्भात विचार करूनच सरकार निवडत असली तर उत्तम आहे. असेच झाले पाहिजे. आशा करतो की दिल्लीतल्या जनतेने केवळ फुकट मिळणाऱ्या सरकारी गोष्टींवर डोळा ठेवून हे केलेले नाही. कारण आज ना उद्या ते अर्थसंकल्पात दिसणार आहे.  केजरीवाल आणि त्यांच्या चमूने "भारतमाता की जय", "वंदे मातरम" वगैरे घोषणा देऊन तसेच, देवळात जाऊन, हनुमान चालीसा वगैरे वाचून आपण हिंदू असणे कमी लेखत नाही आणि आपण कमी "भारतीय" नाही हे दाखवून दिले. त्याआधी त्यांनी राज्यसभेत ३७० काढून टाकण्यास पाठिंबा देखील दिला होता. मला वाटते आज जरी दिल्लीत भाजपचा पराभव झाला असला तरी भाजपने केलेल्या विचारमंथनामुळे काही माध्यमे/विचारवंत म्हणत आहेत त्याप्रमाणे स्वतःचे सॉफ्ट हिंदुत्व जाहीर दाखवणे आता कमीपणाचे वाटत नाही. किंबहुना बदलत्या काळाबरोबर आपण कधी हिंदू झालो हे देखील त्यांना कळले नसले तर तो भाजपचा मोठ्ठा वैचारिक विजय आहे. मेरा देश बदल रहा है! ;)  दिल्लीत आज काँग्रेसने, जे गेल्या निवडणुकीत विश्वातून शून्य तयार केले होते त्यात भर म्हणून की काय, ६३ जागांवर अनामत रक्कम जप्त करायला लावून काँग्रेसने जनतेला खात्री करून दिली... "काळजी करू नका आम्ही नाही येत". त्याचबरोबर खोट्या धर्मनिरपेक्ष राजकारणाचा वापर करत वाढलेल्या काँग्रेसी वृत्तीला दिल्लीत स्थान मिळालेले नाही. त्या अर्थाने संख्या आणि विचार या दोन्हीसाठी दिल्ली काँग्रेसमुक्त झालेली आहे. त्यामुळे दिल्लीकरांचे अभिनंदन! यातून इतर पक्षांनी काही बोध घेतला तर ते त्यांच्यासाठी आणि जनतेसाठी चांगले ठरू शकेल...  थोडक्यात नेतृत्वाचा चेहरा नसल्यास, असलेल्या नेतृत्वासच आम्ही स्थानिक प्रश्नांवरून परत निवडून देणार हा भाजपाला संदेश मिळाला. तर राष्ट्रप्रेम, हिंदूपणाची लाज न वाटून घेणे यातून काही राजकीय तोटा होत नाही हे आप ला समजले. म्हणून माझ्या लेखी समंजस होऊ पाहणाऱ्या आणि स्वतःच्या हिंदू  संस्कृतीशी नाळ न तोडणाऱ्या लोकशाहीचा हा विजय आहे.  एकीकडे भाजपाला विचार करायला लावणारा आहे... आणि दुसरीकडे प्रमुख नेता, पक्षाध्यक्ष, मुख्यमंत्री अशी सगळी पदे स्वतःकडेच ठेवण्याच्या वृत्तीमधून दिल्लीच्या सीमा ह्या कुंपण करून रमणार्या "आप" ला जर त्या दिल्लीच्या विहिरीबाहेर विहार करायचा असेल तर संघटनात्मक दृष्टीने खूप विचार करायला लावणारा हा निकाल आहे. तो विचार केजरीवाल कसा करणार यावर त्यांचे आणि पक्षाचे पुढे कसे होणार ते ठरणार आहे...  तूर्तास आप, भाजप आणि दिल्लीकरांना मन:पूर्वक शुभेच्छा! 
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 02/12/2020 - 00:29 नवीन
स्वतःचे सॉफ्ट हिंदुत्व जाहीर दाखवणे आता कमीपणाचे वाटत नाही. किंबहुना बदलत्या काळाबरोबर आपण कधी हिंदू झालो हे देखील त्यांना कळले नसले तर तो भाजपचा मोठ्ठा वैचारिक विजय आहे. मेरा देश बदल रहा है!
काय सांगता. गांधीजींना सांगायला पाहिजे! बिचाऱ्यांना कल्पनाही नसेल की त्यांच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा विचार (त्यावेळी अर्ध्या चड्डीतही नसलेल्या) भाजपाच्या वैचारिक भूमिकेतून आला आहे ते. गेलाबाजार नेहरूंना सांगू की त्यांनी पंतप्रधान होताना काशीला केलेल्या पूजेची प्रेरणा (त्यावेळी अर्ध्या चड्डीतही नसलेल्या) भाजपाच्या वैचारिक भूमिकेतून आली होती ते. जाता जाता आजन्म काँग्रेसी राहिलेल्या सरदार पटेलांना सांगू की (त्यावेळी अर्ध्या चड्डीतही नसलेल्या) भाजपाच्या वैचारिक भूमिकेतून प्रेरणा घेऊन त्यांनी सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण करण्यात मोठा वाटा उचलला. भाजपाचे जे काही आहे त्याचा हिंदुधर्मातील चांगल्या गोष्टींशी काही संबंध नाही. उगीच पडलो तरी नाक वर असा आव नको ब्वा. वैष्णव जन तो तेने कहियेजे, पीड परायी जाने रे!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 02/12/2020 - 03:54 नवीन
खरेच की! आणि जनेउधारी राहुल गांधिना पण विसरलो होतो! :D
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 02/12/2020 - 15:16 नवीन
त्यावेळी अर्ध्या चड्डीतही नसलेल्या
या सतत आलेल्या वाक्प्रयोगातील "अर्धी चड्डी" म्हणजे काय? नक्की अर्धी चड्डी कोण घालयचे?
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले गुरुवार, 02/13/2020 - 09:52 नवीन
आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी बॅरिस्टर झाल्यावर पूर्ण पॅन्ट (पूर्ण चड्डी) घालत असत.नंतर मात्र ते फक्त पंचा नेसत. आता लांबून पाहिल्यानंतर काही जणांना ते अर्धी चड्डी घालत असल्याचा भास होत असावा कदाचित.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 02/12/2020 - 16:59 नवीन
जे नाही जो वैष्णव जन तो तेने कहिये जो
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/13/2020 - 08:14 नवीन
विकास सर, राजकीय सामाजिक चर्चेत तुम्ही आले पाहिजे असे नेहमी मला वाटते, साधक बाधक चर्चेतून लवचिक असलेली मतं बदलायला, घट्ट करायल मदत होते. मॅच्युरीटी येते. वेगवेगळ्या अँगलने या सर्व गोष्टीकडे पाहता येते. आपण मैत्रीखातर प्रतिसाद लिहिण्यासाठी आलात. थँकू व्हेरी मच. बाकी, पानिपत शीर्षकाबद्दल काही मतं प्रामिणिक तर मिपाच्या स्वभावाला जागून काही खोडसाळपणा आहे, हेही नम्रपणे नमुद करतो. ;) बाकी प्रतिसादात आपण आपचं पोटभर कौतुकही केलं नाही आणि भाजप चुकलं असेही म्हणाला नाहीत, असे एक निरिक्षण नोंदवतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 02/13/2020 - 12:13 नवीन
तर मिपाच्या स्वभावाला जागून काही खोडसाळपणा आहे वोरिजिनल मिपाकर आहे... ;) बाकी प्रतिसादात आपण आपचं पोटभर कौतुकही केलं नाही आणि भाजप चुकलं असेही म्हणाला नाहीत, असे एक निरिक्षण नोंदवतो. निवडणूक जिंकले म्हणून पोटभरून कौतुक मला वाटते मी कुणाचेच केलेले नाही. कोणी हरल्याचा अधिक आनंद झाला नक्की असेल (त्यातही विशेष करून डावे आणि डावे विचारवंत! ;) ). माझा प्रतिसाद परत वाचाल तर समजेल की माझ्या द्रुष्टीने भाजप ला कुठली चूक भोवली ते लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 02/11/2020 - 21:38 नवीन
आप पक्षाच्या विजयावरून त्याच्या राष्ट्रीय पातळीव परिणामावर करणाऱ्यानी हे ध्यानात घ्यावे की अधिकाराच्या दृष्टीने पाहिले तर ही केवळ एक महानगरपालिका आहे. दिल्लीचे बजेट मुंबई महानगरपालिके पेक्षा कमी आहे. तेथील मुख्य मंत्री, मंत्री , विधानसभा सदस्य या नामकरणावर जाऊ नये.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 02/12/2020 - 00:34 नवीन
तर ही केवळ एक महानगरपालिका आहे.
कोल्ह्याला द्राक्षे आंबट? अहो तुमच्या आमच्यासारख्याला जे कळतं ते देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्या आणि गृहमंत्री आलेल्या व्यक्तीला कळू नये? जरा फीडबॅक द्या! नाहीतर उद्या मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला येतील प्रचाराला. त्या आदित्यनाथला घेऊन!
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/13/2020 - 08:51 नवीन
अहो तुमच्या आमच्यासारख्याला जे कळतं ते देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्या आणि गृहमंत्री आलेल्या व्यक्तीला कळू नये?
बरोबर आहे..
नाहीतर उद्या मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला येतील प्रचाराला. त्या आदित्यनाथला घेऊन!
याचीही शक्यता नाकारता येत नाही. देशाच्या पंतप्रधानाकडे निवडणूक प्रचाराकरिता भरपूर वेळ असतो.. कमाल आहे..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा