भाजपचे दिल्लीत पानिपत ?
राम राम मंडळी. गेली काही दिवस ज्या निवडणुकांचे बिगूल वाजत होते ज्याची अतिशय चर्चा होत होती अशा नवी दिल्लीतील भाजपने प्रतिष्ठेच्या केलेली लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पुन्हा विजयाकडे वाटचाल करतील असा मतदानोत्तर चाचण्यांचा कल दिसत आहे. भाजपचे केंद्रात सरकार असल्यामुळे साम दाम दंड भेद नितीचा वापर करुन या निवडणूकीत काही चमत्कार करता येईल का असा एक प्रयत्न झाल्याचे दिसून येते. तसेही इतर पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. एकही जागा नसलेली काँग्रेसपक्षाला अजूनही सावरता आलेले नाही. मात्र अनपेक्षितपणे दिल्लीच्या मोठ्या एका आंदोलनानंतर राजकीय प्रवेश केलेल्या आम आदमी पार्टीने दोनदा ज्या पद्धतीने सरकार स्थापन केले आणि त्यांनी दिल्लीकरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, नवीन बदल केले एक आश्वस्त करणारा प्रचार केला. वीज,पाणी, शाळा, पर्यावरण, रस्ते शासकीय योजनांचा योग्य उपाययोजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवल्या म्हणूनच तिसर्यांदा लोकांनी त्यांना निवडले आहे असे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसत आहेत.
दुसरीकडे भाजपने नेहमीप्रमाणे धार्मिक ध्र्वीकरण ज्यात हिंदु-मुस्लीम गट तट करुन पाहिले. काही राष्ट्रीय मुद्द्यांना दिल्लीत टाकून पाहिले. संघपरिवाराने सव्वालाख कार्यकर्त्यांना प्रचारात लावले. (संदर्भ दैनिकातल्या बातम्या) काही खासदारांना मतदारसंघ वाटून निव्वळ त्याच मतदारसंघावर फोकस करण्याचा सांगण्यात आले. साधन संपत्तीचा योग्य उपयोग करुन त्यांना प्रचाराला जुंपले तरीही दिल्लीकरांनी या सर्व गोष्टींना नाकारुन आपवरच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीवर टीका करुनही त्यांच्या विकासाच्या मार्गाला कोणीही रोखू शकलेले नाहीत असे वाटायला लागले आहे.
मंडळी, राजकारणात सतत कोणीही आम्हीच सरकारात असू असे स्वप्न पाहू शकत नाही. जनतेचे प्रश्न कोणते, प्राधान्याने कोणते प्रश्न सोडवायला हवेत. यावर भर दिला की लोक योग्य पर्याय निवडतात असे वाटते. येत्या काळात जनता दिल्लीचा प्रवास कसा असेल ते बघणे रोचक असेल. अजूनही निश्चित कोणाची सत्ता येईल हे जरी गुलदस्त्यात असले तरी भाजपचे पानिपत होऊन मतदानोत्तर चाचण्या आपच्या पदरात कल टाकत आहेत असे दिसते.
मंडळी, या सर्व निवडणू़कीत अजून काय मुद्दे होते ? दिल्ली विधानसभेतील बलाबल काय असेल ? संभाव्य वाटचाल आणि इतर दिल्ली राजकारणा विषयी आपापली मतं संदर्भासहीत, कोणाचाही व्यक्तीगत द्वेष न करता, शांतपणे काही वैचारिक चर्चा पुढे घेऊन जाता येईल काय, त्यासाठीचा हा काथ्याकूट. आपलं स्वागत आहे.
🗣 चर्चा
(79)
ज
जोन
Wed, 02/12/2020 - 08:10
नवीन
निदान सर्व ठिकाणि फिरुन आणि काम करुन घेतायत ना....नुस्ते कामाचा दिखवा करत गान्धिन्चे नाव घेत २ २ महिने थायलन्ड मधे "ध्यान" तर करत नाहित!
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 02/12/2020 - 19:19
नवीन
वैष्णव जन तो तेने कहियेजे, पीड परायी जाने रे!
कमाल आहे !! आयुष्यभर हे भजन गाणार्या महात्म्याला फाळणीनंतर पाकिस्तानात मागे राहीलेल्या हिंदु समाजाची (ज्यात मोठा भाग "हरीजन" होता,) पीड कळली नाही !! पण मुर्ख समाज मात्र त्यांना महात्माच समजत राहीला !!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 02/13/2020 - 02:20
नवीन
यावरून हे आठवले - हरीजनांचा भ्रमनिरास - नेते वाचले, अनुयायांचे काय? http://swatidurbin.blogspot.com/2019/12/blog-post_11.html?m=1
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 02/13/2020 - 05:40
नवीन
पाकिस्तानातील पीडीत हिंदुना भारतीय नागरिकत्व देण्यास विरोध नाही. मुस्लिमाना का वगळले हा मुद्दा आहे. तेथे खोजा मुस्लिम हेही पीडीत आहेत, शिया मुस्लिम पण पीडीत आहेत. हे लोक पण ७२ वर्षपुर्वी हिंदुस्तानीच होते ना ? आसाममधील मोजणीत बाहेरून आलेले हिंदू जास्त आढळले तर मुस्लिम कमी आढळले.
https://www.thehindu.com/news/national/over-19-lakh-excluded-from-assams-final-nrc/article29307099.ece
Speculation had been rife that out of the 19 lakh people excluded from the NRC in Assam, as many as 14 lakh were Hindus.
https://www.telegraphindia.com/india/assam-final-nrc-boomerangs/cid/1720790
त्याना मग सामावुन घेण्यासाठी ही 'आधुनिक चाणक्यनीती"
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
गुरुवार, 02/13/2020 - 06:52
नवीन
पाकिस्तानातील पीडीत हिंदुना जबरदस्तीने मुस्लिम बनवत आहेत, त्यांना धार्मीक स्वातंत्र्य नाही, म्हणुन भारतात त्यांना अग्रकमाने नागरीकत्व देण्यात येणार आहे.
पाकीस्तानातील पीडीत मुसलमानांना धर्मबदल करावा लागत नाही, त्यामुळे त्यांना अग्रक्रम देण्यात आलेला नाही. कायदेशीर प्रक्रीया पार पाडुन ते भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज करु शकतात.
या कायद्याविरुद्ध भारतीय नागरीकानी दंगेधोपे करण्यासारखे काय आहे?
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 02/13/2020 - 06:44
नवीन
मग तुमचा म्हण्णा काय? कि बांगलादेशातील सुन्नी मुसलमानांना पण द्यावा आश्रय ? आहे कि त्यांना जायला सौदी किंवा हिरवागार इंडोनेशिया ...जगात इतरत्र उघडपणे किंवा चतुर पद्धतीने विविध देश "आपल्या" माणसांना परत येण्यास मदत करतात मग भारताने जर जवळपासच्या आणि ते म्हणजे इस्लाम धर्मावर आधारित मुस्लिम बहुल देशातील हिंदू, शीख जैन (असतील तर) बुद्ध आणि ख्रिस्ती सुद्धा अल्पसंख्याकांना अश्या पद्धतीने मदत केली तर "भारतातील नकाश्रू ढोंगी सर्वधर्मवाद्यानं का एवढे झोंबते?
- सौदी सीरियातील लोका ना जर्मनी मध्ये मशीद बांधायला पैसे देतो ते चालत!
- मलेशिया आपल्या "उम्मा " तीळ मियांमार मधील रोहिंग्यांचं नावाने अश्रू गाळतो ते चालत !
- हाँग कोन्ग जेवहा चीन ला परत दिले गेले तेव्हा सिंगापोर , हाँग कोन्ग मधील ( प्रामुख्यने हान चिनी वंश ) लोकांना पायघड्या घालून बोलवते
- इस्राएल जगातील सर्व जु ना अवो जावो घर तुम्हारा असे म्हणते ते चालते
पण ग्यानबाची मेख अशी कि भाजप ने हे केलं म्हणून पोटशूळ ( कि जे करण्याची काँग्रेस ची हजार वषात धमक होणार नाही, )
दुसरे असे कि असा कांगावा केलं जातो कि जणू काही हे सरकार भारतीय नागरिक असलेल्या मुसलमानांना सुद्धा हाकलणार आहे? किती खोटं बोलार्णार हे अति डावे!
हिंदूंना . शिखांना , जैनांना भारत हाच एक मुख्य देश आहे मग केले असे नियम तर कोणाच्या पिताश्रींचे काय जाते?
भारत हा सर्वधर्मी संभावी राहावा हीच बहुसंख्यांक हिंदूंची इच्छा आहे .. पण डावे ज्या पद्धतीने विरोध
करीत आहेत तो खरंच किळसवाणा आहे ,
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/13/2020 - 08:04
नवीन
मंडळी, चर्चेचा एक दर्जा राखल्याबद्दलम, संयमाने चर्चा केल्या, सहभाग नोंदवला त्या समस्त गट तट आणि विचारांचा आग्रह धरणार्या मिपा मंडळींचे आभार.
अरविंद केजरीवाल यांची आप टीम ज्या मुद्यांवर लढली ते मुद्दे शाळा, दवाखाने, वीज, पाणी, दिल्लीसाठीचं योग्य बजट, रस्ते, विकास यावर त्यांनी भर दिला आणि ते जिंकले. तीनशे सत्तर कलमाला पाठींबा देऊन, देशाचे पंतप्रधाने माझेही पंतप्रधान आहेत असे म्हणून विरोधी मुद्याची हवा काढून घेतली. हनुमान चालीसा, गोलीमारो या मुद्द्यांवरही ते शांत राहीले. केंद्र आणि मुद्यांना अरविंद केजरीवाल आणि टीमने बगल दिली. सुरुवातीची दोनेक वर्ष त्यात त्यांनी वाया घातली यात हाती काही लागणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून या प्रचारात त्यांच्यावरची टीका टाळली असे म्हणावे लागेल. आतंकवादी म्हणने, देशद्रोही म्हणने असा विखारी प्रचार भाजपाने केला तरी अरविंद आअणि टीमने विकासाच्या मुद्यावरुन फोकस हटू दिला नाही. हिंदु-मुस्लीम, पाकिस्तान, शाहीनबाग, मंदिर, मशीद या मुद्यांवर भाजपा लढली आणि त्यांच्या पदरात काय पडले ते आपण पाहतोच आहोत.
मंडळी, एक चर्चेत मुद्दा आला फूकटचा त्यात अरविंद आणि टीमने वीज, पाणी, आणि काही गोष्टी मोफत दिल्या. सरकारला झेपलं म्हणून त्यांनी ते केलं असं म्हणता येईल. भाजपनेही यंव फूकट देऊ आणि त्यंव फू़कट देऊच्या घोषणा केल्याच होत्या पण दिल्लीकरांनी त्यांच्या घोषणांना हवा दिली नाही आणि मतंही दिले नाही. वीज मोफत देऊ, पाणी मोफत देऊ या घोषणा भाजपच्या होत्याच पण अजून काय फ्री देऊच्या घोषणा केल्या हेही आपणास माहिती असेलच ज्यात नववी उत्तीर्ण झालेल्या मुलींना सायकली मोफत देऊ, कॉलेजला जाणार्या मुलींना स्कुटी देऊ अशा घोषणा होत्या. दिल्लीकरांनी या फूकटछाप घोषणा का स्वीकारल्या नाही त्याचाही विचार केला पाहिजे.
लालूच दाखवून दिल्लीकरांची मतं आपने मिळवली या मुद्द्यात तसा दम राहीला नाही असे वाटते. मा.मोदींनी शेतकर्याच्या खात्यात दहा हजार देऊ ही घोषणाही तशी होतीच आणि ते शेतकर्यांना मिळालेही होते तेव्हा ही लालूच होती असे म्हणायचं का, असा प्रश्नही उरतोच. दिल्लीकरांचे मोदीवरही प्रेम आहे, हे दिल्लीकरांनी लोकसभेतील सातही शीट्स देऊन ते सिद्ध केले. सातही खासदारांचा या निवडणूकीत किती इनव्हॉल्व होते त्यांचा किती प्रभाव पडला हेही दिसून आले. दिल्लीची निवडणूक ही हिंदूस्थान विरुद्ध पाकिस्तान अशी लढवायचा भाजपचा प्रयत्न होता तो सपशेल फसला. मनोज तीवारीसारखा सटकलेला भोजपूरी नेता दिल्लीत नेतृत्व करीत होते, त्यात अजिबात दम नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. खरी दारोमदार होती ती शहा आणि मोदीयांच्यावरच. दोनशेच्या जवळ सभा घेणारे शहा यांचाही प्रभाव पडला नाही. भाजपाचा अजेंडा धर्म तर आपचा कर्म होता म्हणून आपला ही संख्या गाठता आली. अर्थात काँग्रेसचं निवडणूकीतून अर्ध्यातून माघार घेणे हेही आपच्या पथ्यावरच पडले. या निवडणूकीत काँग्रेसने अधिक तयारी केली असती तर नुकसान आपला झाले असते आणि भाजपचा फायदा झाला असता त्यामुळे शुन्यातली काँग्रेस शुन्यात राहिली मला वाटतं हा आपला सत्तेत राहण्यासाठी काँग्रेसने मदत केली पण एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाची धुळधान हाही विषय आहे. पण भाजपला रोखणे यात तेही यशस्वीच झाले असे म्हणावे लागेल.
अरविंद केजरीवाल आणि त्यांची टीमने काही धार्मिक मुद्दे चातुर्याने इग्नोर केले तर काहींना बोल्ड केले. मला वाटतं सध्या तरी अरविंद केजरीवाल खर्या अर्थाने विकासाचा हिरो ठरले आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी ज्या काही मुद्द्यांची गरज असते त्या मुद्यांवर आधारित ही निवडणूक झाली म्हणून ही निवडणूक वेगळी वाटते. भाजपा या निवडणूकीतून काही शिकेल अशी अपेक्षा करुया आणि अरविंद केजरीवाल आणि टीमचं कौतुक करुन त्यांना दिल्लीच्या अधिकाधिक विकासासाठी शुभेच्छा देऊन थांबतो.
ता.क. : काही मुद्दे राहीले असतील तर वेळ मिळेल तसा प्रतिसाद टंकायला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. : )
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 02/13/2020 - 08:37
नवीन
उत्तम प्रतिसाद. आता तरी भाजपावाले बुनियादी मुद्द्यांवर निवडणूक लढवतील अशी अपेक्षा करूया.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 02/13/2020 - 09:13
नवीन
काही वर्षांपूर्वी "आप" पक्ष शून्यातून निर्मण करून दिल्ली मध्ये काँग्रेस आणि भाजप ला एक पर्याय निर्माण केला हि खरंच भारतीय लोकशाहीत अभूतपूर्व घटना होती असे नक्कीच म्हणता येईल पुढील प्रवासात विकास आणि चांगले प्रशासन यावर खास करून दिल्ली शहरी माणसाला ज्यात स्थानिक पातळीवर ज्यात स्वारस्य आहे त्यावर केलेलं काम म्हणून यश मिळाले यात शंका नाही...अभिनंदन
या विजयाचया आनंदात पण काही मुद्दे "काहीही करा पण भाजप नको" ग्यांग नि लक्षात घेतले तर बरे होईल
१) दिल्ली ची निवडणूक म्हणजे कदाचित सर्वात छोट्या राज्याची निवडणूक असावी त्याचा वापर करून आता "भाजप किंवा काँग्रेस सारखया राष्ट्रीय पक्ष संपला आणि सगळी कडे आत आप निर्मण होईल असल्या संभ्रमात कोणी असेल तर गम्मत च आहे
२) इतर राज्यांप्रमाणे दिल्ली वर सत्ता करणाऱ्याला शेती, दळवलनाचे मोठे जाळे इत्यादी ला सामोरे फारसे जावे लागत नाही
३) दिली राजधानी असल्यामुळे तिथे बराचसा मूलभूत सोईं वर खर्च केंद्र सरकार करते तेव्हा तो बोजा कमी,
४) भाजपनं कदाचित राष्ट्रीय मुद्दे नको इतके ताणले असतील , ते त्यांना भोवले हे मान्य
५) काँग्रेस आणि भाजप पुढे राज्यस्तरीय पक्षांचे आव्हान कसे पेलायचे हा मात्र प्रश्न दिवसन्दिवस वाढत आहे त्यात काँग्रेस मरगळलेली .. भाजप शिखरावर जाऊन आता "फार पटकन खाली घसरणार कि काय?" या विवंचनेत .. एकूण काय फुटकळ पक्षांचे अच्छे दिवस
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 02/13/2020 - 12:18
नवीन
"भाजप किंवा काँग्रेस सारखया राष्ट्रीय पक्ष संपला आणि सगळी कडे आत आप निर्मण होईल असल्या संभ्रमात कोणी असेल तर गम्मत च आहे"
तशा संभ्रमात कोणी असेल असे वाटत नाही. बुनियादी/कळीचे मुद्दे कधी चालतात तर कधी चालत नाहीत मात्र समाजात फूट पाडून धृविकरणाचे फायदे अनेक्वेळा यश देतात असे दिसुन आले आहे. फक्त भारतातच नाही तर अनेक देशात राजकीय पक्षाना धृविकरणाचा फायदा होतो.
creating minority complex in majority of people असल्या प्रयोगाना अनेकवेळा यश मिळते असे दिसुन आले आहे.
"मुसलमान जेव्हा तुमच्या घरात शिरुन काफिर म्हणून हाकलून देतील तेव्हा तुम्हाला मोदींचे महत्व समजेल" कालच वॉट्स अॅपवर फिरणारा संदेश होता.
- Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू
गुरुवार, 02/13/2020 - 12:00
नवीन
धागा आणि त्यावरची आप समर्थक, आप विरोधक, भाजप समर्थक, भाजप विरोधक, मोदि-शहा समर्थक व विरोधक अशा सर्वांची मते वाचली. एका महत्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले. तो म्हणजे मधल्या काही काळात सरकारने घेतलेले काही अति धाडसी व अंमलबजावणी करण्यास महाकठीण निर्णय ज्यांची सर्वसामान्य जनतेला झळ सोसावी लागली. उदा. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारला जाणारा भरमसाठ दंड आणि सर्व राष्टीय महामार्गांवरच्या टोलनाक्यांसाठी fast tag अनिवार्य.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आकारला जाणार्या भरमसाठ दंडाला तर खुद्द पंतप्रधानांच्या राज्यातहि विरोध झाला. त्यातून किती दंड वसूल होऊन सरकारी तिजोरीत जमा झाला व किती रक्कम वाहतूक पोलिसांच्या खिशात गेली असेल हा अभ्यासाचा विषय असला तरी नागरीकांच्या खिशाला भरपूर चाट लागली. fasttag चे हि तसेच! सरळमार्गी लोकांनी दिलेल्या मुदती आधी आगाऊ रक्कम जमा करून ते घेतले. नंतर मुदतवाढ झाल्यावर अनेकांनी घेतले पण अजूनही सर्व ठिकाणी रोख पैसे देऊन टोल स्वीकारला जातोच. fast tag अनिवार्य करण्या मागे टोल नाक्यांवर होणारा विलंब टाळण्यासाठीचे कारण सांगितले गेले होते पण अजूनही तिथे लागलेल्या लांब रांगांमुळे खोळंबा होत असल्याने ज्यांनी fast tag लावले आहेत त्यांना किती मनस्ताप होत असेल. मधल्या काळात दिल्लीला गेलेल्या लोकांनी हे बघितले असेल कि हे दोन्ही भयानक अनुभव उर्वरित देशातील जनतेपेक्षा दिल्लीकरांना जास्तच आले असल्याने त्यांनी आपला निषेध मतपेटीतून दाखवून दिला असावा.
बाकी चर्चा चालुद्या! मजा येत आहे वाचायला.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 02/13/2020 - 13:21
नवीन
दिल्लीत लहान मोठे व्यापारी हे पारंपारिक पणे भाजपा समर्थक आहेत. मात्र जी एस टी मुळे आता पूर्वी सारखा धंदा करणे शक्य नाही तसेच नवीन पद्धत अजून बदलत आहे परिणामी, त्यांनी आप ला मते दिली नसली तरी मते देण्यापासून दूर राहिलेले असू शकतात.
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sat, 02/15/2020 - 06:48
नवीन
दिल्लीतील निकालांचे विश्लेषण माझ्या मते खालीलप्रमाणे !
१. भाजपाचा पराभव NRC, CAA ह्या मुद्यांमुळे नाही. तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत न करणे हे आहे. "मिनाक्षी लेखी" ह्यांच्यासारख्या एखाद्या स्त्रीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करणे गरजेचे होते. स्थानिक नेतृत्व कोण करणार हा मुद्दा लोकसभा वगळता अगदी सरपंच ते विधानसभा ह्या सगळ्या निवडणूकांना लागु होतो.
२. मोदी नको तर राहुल गांधी चालेल काय ? अशा प्रश्नाचे उत्तर जेव्हा तीव्रतेने नकारार्थी येते त्याचप्रमाणे केजरीवाल नकोत तर मग कोण चालेल ? याचे उत्तर दिल्लीतील जनतेला मिळाले नाही.
३. केजरीवालांनी अगोदर चुका केल्यात मात्र बर्याच बाबतीत त्यातून बोध आपला स्वभाव बदलला आहे किंवा बदलल्याचे भासवले आहे. पहिल्यांदा जेव्हा उठसूठ मिडीयात जाऊन बरळायचे ते कमी केल्यामुळे त्याचा फायदा प्रतिमा सुधारण्यात होतो. त्याउलट बीजेपी नेत्यांनी जी भडकाऊ भाषणे केली ती त्यांच्या विरोधात गेली. माणसाने / पक्षाने आपली विचारधारा सोडायची गरज नसते पण त्यावर सातत्याने आणि अति आक्रमक न होता काम करणे गरजेचे असते.
उथळ वक्तव्ये करणारे बोलभांड नेते भाजपा को ले डुबेंगे !
सध्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना देखील याची गरज आहे. रोज उठून ठाकरे सरकारवर निशाणेबाजी केल्यामुळे काहीही साध्य होणार नाही. फडणविसांनी पाच वर्षात जे काही कमावले ते माजी सौ. मुख्यमंत्री ट्विटरवरुन गमावत आहेत. शेलार, पाटील आणि फडविणांनी योग्य ठिकाणी तोंड उघडले तर जनता पाठींबा देईल नाहितर रोज मरे त्याला कोण रडे अशी गत होईल.
४. आता बरेचसे लोक केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला बघत असतील तर त्यांनी हुरळून त्या गाडीत बसू नये. दिल्लीत बसून अजून बरेच काही करण्यासारखे आहे. पंतप्रधान पदासाठी अजूनही मोदींची लोकप्रियता शाबूत आहे.
५. काँग्रेसने भोपळा फोडला नाहिच मात्र जवळजवळ ६३ ठिकाणी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. तरीही बेगाने की शादी मे चिदंबरम दिवाना झाले होते. शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांना डोस दिला हे बरेच झाले. काँग्रेसची बरीचशी मते आपला गेली आहेत. मात्र टक्केवारीचे विश्लेषण पाहता दिल्लीत भाजपाची मतांची टक्केवारी बर्याच अंशी वाढली आहे. त्यांनी योग्य नियोजन केले तर ही टक्केवारी अजून वाढत राहण्याचा संभव आहे. मात्र स्थानिक नेतृत्त्व विकसीत होणे अतिशय गरजेचे.
६. केजरीवालांनी काही कामे केलीही असतील. मी तेथे राहत नाही त्यामुळे केवळ वर्तमानपत्रांवर अवलंबून मत बनविणे योग्य नाही. मात्र तेथील खराब हवा आणि ट्राफिक हे अत्यंत गंभीर मुद्दे आहेत त्यावर अजून उपाय निघाला नाहीये हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. किमान प्रदुषित हवेवर तरी तातडीची उपाय योजना झाली पाहिजे. केजरीवालांनी ऑड-इव्हन चा प्रयोग करुन पाहिला. त्याचे परीणाम काय होतील यावर बरेच जणांनी विरोध केला मात्र लोकांना काहीच निर्णय न घेणार्या उच्चविद्याविभुषित व्यक्तीपेक्षा चुकीचा का होईना निर्णय घेणारा व्यक्ती आवडतो. निर्णय चुकला तरी त्यात सुधारणेला वाव असतो मात्र समस्या अनिर्णित ठेवण्याने काहिच साध्य होत नाही.
७. शपथविधीला इतर राज्यांचा मुख्यमंत्र्यांना आमंत्रण न देणे हा केजरीवालांचा अतिशय योग्य निर्णय ! फालतूची नाटके टाळणे जमले ज्याला जमले तो माणूस नक्कीच पुढे जाणार !
केजरीवालांचे अभिनंदन ! भाजपासाठी पुढील निवडणूकीसाठी शुभेच्छा आणि कॉंग्रेसला सांत्वनाचे दोन शब्द (गरज आहे काय ?)
विनोदी ता.क. : भाजपाचा काँग्रेसमुक्त भारत चा अजेंडा राबवून केजरीवालांनी दिल्लीत काँग्रेसला नेस्तनाबूत केले त्यामुळे त्यांना भाजपाची बी टीम म्हणावे काय ?
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Sat, 02/15/2020 - 08:56
नवीन
४. आता बरेचसे लोक केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला बघत असतील तर त्यांनी हुरळून त्या गाडीत बसू नये.
बारामतीवाल्या काकांचा नंबर यात सर्वात वर असणार. श्री. केजरीवाल यांचा खांदा यांची बंदुक आणी पंप्र पद.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/16/2020 - 07:28
नवीन
पटण्यासारखं आणि महत्वाचं. आपनेही प्रचार करतांना भाजपनेही मुख्यमंत्र्याचं नाव घोषित करावे असे म्हणाले. खासदारांची छायाचित्रे लावून यातलं मुख्यमंत्री कोण हे आपने विचारलं. आणि आपचा हा मुद्दा दिल्लीत चालला.
बाकी प्रतिसादात मते मतांतरे होतीतल पण तोही उत्तमच.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Sun, 02/16/2020 - 09:19
नवीन
अंत्यत उत्तम विश्लेषण ! _/\_
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/16/2020 - 07:24
नवीन
दिल्लीच्या पराभवावर भाजपात काय चिंतन मंथन करते यावर काही दिवसापासून लक्ष ठेवून आहे, पण पराभवाचं विशेष कारण असे ठोसपणे पक्षाच्या वतीने सांगता येतांना दिसत नाही. जय पराजय निवडणूकीत होत असला तरी एवढ्यावरुन भाजपा संपला वगैरे असे समजायचे कारण नसते आणि एवढ्यावरुन अरविंद केजरीवाल आणि टीम देशभरात नव्या उत्साहात पदार्पण करेल असेही नसते.
अमित शहा अ म्हणाले की, भाजपाच्या नेत्यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे दिल्ली निवडणूकीत हानी झाले असे ते म्हणतांना दिसतात,एवढ्यावरुन दिल्लीत इतकी मोठी हार झाली असे मला वाटत नाही. बरं भाजपचं 'संकल्प पत्र' वाचल्यावर लक्षात येतं की त्यांचं संकल्प पत्रही जोरदार होतं. पाणी, वीज, (फूकट देऊ) मुद्दे होते त्याच बरोबर दहा नवे कॉलेजेस, २०० नव्या शाळा याबरोबर सायकल, स्कूटी (फूकट देऊ) हे मुद्दे असूनही, दिल्लीकरांनी त्या संकल्प पत्रावर दुर्लक्ष केलेले दिसते. सीएएच्या या मुद्द्याला हवा दिली नाही. मतदारांनी मतं का दिली नाहीत त्याचं मूळ कारण दिल्लीकरांनी आपवरच टाकलेला विश्वास हेच मूख्य कारण आहे, असे मला वाटते.
अजून काय काय भाजप पक्षाच्या वतीने समोर येतं, दिल्लीत पुढे त्यांची काय वाटचाल राहील हे पाहात राहू. आपचं काय धोरण राहील, ते येत्या काळातही जोखत राहू. तब तक के लिये. जय हिंद जय महाराष्ट्र.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/16/2020 - 17:14
नवीन
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष दारोदार चिठ्या वाटत होते. तरी सुद्धा दिल्लीवाल्यानी इतका जोरदार दणका दिला. सध्या आत्मपरीक्षणा पेक्षा मनस्थिती सावरण्यात सर्व गर्क आहेत.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/16/2020 - 17:01
नवीन
एकंदरीत मोदी सोडले तर भाजपचे नेतृत्व प्रत्येक राज्यात एक एक पप्पूच करतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Sun, 02/16/2020 - 17:16
नवीन
रिंकिया के पापा हिहीहीही हांसदे
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/16/2020 - 17:50
नवीन
कच देनी मार देली खिचके तमाचा....
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/16/2020 - 17:58
नवीन
कच देनी मार देली खिचके तमाचा....
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 02/17/2020 - 01:04
नवीन
"एकंदरीत मोदी सोडले तर भाजपचे नेतृत्व प्रत्येक राज्यात एक एक पप्पूच करतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले."
हल्लिच्या काळात "अमूक तमूक पदाचा चेहरा कोण? नेतृत्व द्या" अशा प्रकारची मागणी होताना दिसते. मतदार मत देतात ते फक्त चेहरा/नेत्रुत्व पाहून नाही तर सत्ताधारी पक्षाने/सरकारने केलेल्या कामाचा विचार करूनही. मे २०१९ मध्ये मोदी सरकार निवडून आले ते फक्त चेहरा व नेत्रुत्व नाही तर काही अंशी तळागाळात पोचलेले काम. विविध सरकारी योजनांचा लोकाना झालेला लाभ.. हे मुख्य कारण होते.
दिल्लीतही साधारण असेच झाले. 'आप'चा फोकस फक्त त्यानी केलेल्या कामांवरच होता.
- Log in or register to post comments
ज
जोन
Mon, 02/17/2020 - 03:34
नवीन
बाकी तमाचे तमाशे, मिपा वर परत येइन वगैरे हरलेल्या मनोवृत्ती ची लक्शणे आहेत!"विघ्नसंतोशी" हा योग्य शब्द.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 02/17/2020 - 06:18
नवीन
केजरीवाल यांच्या यशात श्री अरुण जेटली यांचा थोडासा तरी वाटा आहे.
बेफाट वक्तव्ये केल्याबद्दल न्यायालयात माफी मागायला लावून त्यांनी केजरीवालांना तोंड बंद ठेवण्याचे शहाणपण शिकवले.
ते झाले नसते तर केजरीवाल कदाचित अशीच बेफाट वक्तव्ये आणि माकडचेष्टा करत राहिले असते आणि कदाचित हरले असते.
न्यायालयातील माफी हा केजरीवाल यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरले आणि त्यांनी त्यानंतर बडबडीपेक्षा विकासाकडे जास्त लक्ष दिले असे एकंदर इतिहास सांगतो.
बाकीच्या गोष्टी समोर आहेतच. उदा. मिपावरील काँग्रेसी लोक आपल्या ६३ जागी अनामत रक्कम जप्त झाली याबद्दल दुःख करायच्या ऐवजी भाजप हरला म्हणून आनंद व्यक्त करत आहेत (आपलं पोरगं नापास झालं तरी चालतंय पण शेजाऱ्याचा मुलगा पहिला न आल्याचा आनंद साजरा करत आहेत).
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Mon, 02/17/2020 - 08:39
नवीन
याच न्यायाने प्रधानसेवकांच्या यशात नेहरुंचा वाटा आहे असेही म्हणता येईल. निवडणुका आल्या की "पिछले साठ सालोंमे कुछ् नही हुआ"चा साक्षात्कार त्याना होतो.
जे शहाणपण केजरीवालाना सुचले तेच भाजप आणि तथाकथित प्रधानसेवकाना सुचले तर आगामी निवडणुकात काही धङगत आहे अन्यथा फक्त पराभवाचे विश्लेषण करणे आणि "अस बोलायला नको होत, ते वक्तव्य करायला नको होत" वगैरे कबुली देत बसायची वेळ येणार नाही.
मजा आहे नाही ?भाजपने मार खाल्यानंतर लोकाना दिल्ली विधानसभा हि महानगरपालीकेच्या आकाराची आहे असे साक्षात्कार झाले.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/17/2020 - 08:52
नवीन
एकंदरित केजरीवलांचा विजय विकासकांमुळे झालेला नाही. हे सिद्ध करन्याचा आटोकाट प्रयत्न चाललाय. कारण उद्या इतर राज्यातील लोकांनी केजरीवालांच उदाहरण देऊन भाजपकडे पायाभूत सुविधा मागू नयेत. त्यांनी पाकिस्तान, कश्मीर, 370 हुतच व्यस्त रहावं.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 02/17/2020 - 06:49
नवीन
मनोवृत्तीतील फरक
खालील प्रश्न ३ जणांना विचारला tar
तुला कोणाची सत्ता चालेल?
१) संघ भक्त : कोणाची हि कारण कि "हंम रहे ना रहे भारत ये रहना चाहिये " आणि ते सुद्धा सत्ता आज नाही उदय नाही पर्वा .. मन वळवू ( म्हणजे जवळ जवळ गांधीवादीच , फटाके खाऊ पण आधी मन वळवू मन वळवू )
२) काँग्रेस भक्त : आमचीच ( आणि ते सुधाच नेहरू घराणे असेल तर उत्तम) पण नसले शक्य तर कोणाचीही फक्त संघ नको ( त्यांची मदत चालेल मात्र)
३) अति दावे : आमची कधीच येणार नाही पण कोणाचीही आलाय तरी आम्ही देशाला सुखी जगू देणार नाही काड्या घालत राहू मग देश गेला चुलीत...
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 02/17/2020 - 06:56
नवीन
माफ करा "फटके" म्हणायचं होतं ( शिंचं मराठी चांगलं आहे पण टंकलेखन करताना गोंधळ आणि त्यात मिपावर एडिट नाही )
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2