Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात citizenship amendment Bill 2019

C
chittmanthan.OOO
Fri, 12/13/2019 - 13:15
🗣 153 प्रतिसाद

रामनाथ कोविंद यांनी केलेल्या सहिने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता सर्व देशात हा कायदा लागू होईल. जसे इतर कायदे परित होतात तसाच हा कायदा देखील परीत झाला पण याला मिळणारा प्रतिसाद काहीसा नकारात्मक असाच होता. वर्तमानपत्राची पानेच पाने भरून येत आहेत. हिंसाचाराच्या बातम्या हेडलाईन्स बनत आहेत. त्यामुळेच याबद्दल तुमच्याशी बोलायच ठरवलं आहे.

हा कायदा नक्की काय आहे हे समजावून घेऊ. या कायद्याद्वारे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतामध्ये अवैधपणे स्थलांतरित झालेले व सध्या भारतात वास्तव्यास असणारे मुस्लिमेतर लोक म्हणजेच हिंदू , शीख, बौद्ध धर्मीय नागरिक म्हणून गणले जातील. त्यांच्या स्थलान्तर मागे त्यांच्या पूर्वीच्या देशात झालेला धार्मिक हिंसाचार याला कारण मानून हेच नागरिकत्व देण्यासाठीच पाया ठरवला गेला.

एखाद्या देशात धार्मिक हिंसाचार होत असेल व त्या कारणाने अल्पसंख्याक समाज दुसऱ्या देशात स्थलांतर करत असेल तर त्याला नागरिकत्व देणे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे योग्य की अयोग्य? या कायद्याला संपूर्ण देशात विरोध केला जातोय.प्रत्येकाचे विरोध करण्याचे कारण व मार्ग वेगळे आहेत.विरोधी पक्षांनी बिल पारित झालेल्या दिवसाला काळा दिवस असे संबोधले . काहींनी तर हा धर्मभेद्यांचा विजय असा मानला गेला . उर्दू लेखक शिरीन दळवी यांनी अवॉर्ड वापसी केली.

सगळ्या विरोधाचे प्रखर केंद्रबिदू ठरले ते आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्ये. इतर वेळी ही राज्य मुख्य प्रवाहापासून दूर आपल्याच नादात शीळ घालत जाणाऱ्या स्वछंद्याप्रमाने वाटतात.पण तीच राज्य सर्वात जास्त पेटलेली दिसत आहेत. पोलिस गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. आसाममधील इंटरनेट सुविधा तर कालपासून बंद केली गेली आहे .आज सकाळीच माननीय प्रधानमंत्र्यांच आसामला शांततेसाठी संबोधित करणारे ट्विट आले. आता इंटरनेट नसताना हे ट्विट लोकांपर्यंत कशी पोचणार आणि त्याला लोक कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

फक्त विरोध करून उपयोग नाही तर त्यामागची कारणे देखील आपल्याला जाणून घेतली पाहिजेत.

सगळ्यात पहिला आरोप जो विरोधकांकडून केला जातोय तो म्हणजे हा कायदा संविधान विरोधी आहे. खरंच तस आहे काय? आपल्या संविधानाने समान व सर्वसमावेशक नागरिकत्वाची तरतूद केली आहे . त्यामुळे मुस्लिमांना वगळून इतर धर्मियांना नागरिकत्व देणे म्हणजे ह्या तरतुदीचा भंग आहे का हे तपासले पाहिजे .

ह्याच मुद्द्याला धरून खूप सरी मते प्रदर्शित होतात. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांडून ह्याला देशहिताचा व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा कायदा मानला जातो. ह्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलतात असाही आरोप केला जातो.विरोधक या गोष्टीला मतपेटीचे राजकारण मानतात. मुस्लिमांना वंचित ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना खुपसा फरक पडत नसल्याने हा अन्याय चालवला असा आरोप आहे. तसाच विरोधकांवर सुध्दा मुस्लिम मतासाठी घाणेरड्या राजकारणाचा आरोप होतो.

त्याच्या पलीकडे जाऊन काहीसा वेगळा मतप्रवाह आहे जो सर्वच धर्मातील अवैध स्थलांतराचा विरोध करतो व नागरिकत्व न देण्याची मागणी करतो. त्यामध्ये ईशान्येकडील राज्ये अग्रेसर आहेत.काही लोक असाही म्हणतात की ज्या मुस्लिमेतर लोकांना भारतात यायचं होत ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थलांतरित झाली त्यातले एक पंतप्रधान पण झाले(मनमोहन सिंह यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला). आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं.

काही लोक या कायद्याला आसाम कराराचा भंग मानतात. कारण या कराराने १९७१ पूर्वीच्या स्थलांतर करणाऱ्यांना नागरिकत्वाची तरतूद केली होती.आता नागरिकत्व कायद्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्थलांतर नागरिकत्वाासाठी पात्र ठरवला गेला.

१९७१ असे किती लोक स्थलांतरित झाले असतील असा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येते की बांगलादेशातून आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये लाखो हिंदू स्थलांतरित झाले ज्यामुळे मूळचे असामी बोडो व इतर आदिवासी अल्पसंख्याक झाले. त्यामुळे आपल्यावर हिंदू संस्कृती लादली जाईल व आपली मूळची संस्कृती आणि भाषा नामशेष होतील अशी भीती त्यांना जाणवते .

आत्ता आणि एक प्रश्न पडला तो म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मधून मुस्लिम का भारतामध्ये स्थलांतरित झाले? त्यावेळी अस लक्षात येत की या देशात असलेल्या शिया सुन्नी मधल्या जीवघेण्या संघर्षाला कंटाळून अनेक मुस्लिमांनी भारतात स्थलांतर केले .तसेच म्यानमार व चीन यासारख्या मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या देशातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले . चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दोन्ही बाजू ऐकल्यावर आपण संभ्रमात पडतो की नक्की याला समर्थन द्यायचे की नाही. ह्याचे उत्तर काय? मला अस वाटत की जेव्हा भारतातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर भारताच्या हिताच्या दृष्टीने हवे असेल तर पुन्हा एकदा गांधी नावाच्या देशभक्ताचा प्रेमात पडावे लागेल व त्याचा मानवतेचा मंत्र घेवून संपूर्ण देशातच नव्हे तर जगात धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लढले पाहिजे . इतर देशातील धार्मिक शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील . तसेच आपल्या देशातील सामाजिक सलोखा नीट ठेवावा लागेल जेणेकरून कोणत्याही कारणाने अवैध स्थलांतर होणार नाही व ज्यांचे शोषण झाले त्यांना त्यांच्या देशातच न्याय मिळेल.

मानवता परमो धर्म !!


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 47138 views

🗣 चर्चा (153)
म
मुक्त विहारि Fri, 12/13/2019 - 13:25 नवीन
आपण कधी आसाम मध्ये गेला आहात का? किंवा आपण कधी एखाद्या बांगलादेशी हिंदू नागरिकाला भेटला आहात का? किंवा आपण कधी बांगलादेशी मुस्लिम नागरिकांना भेटला आहात का? किंवा आपण कधी पाकिस्तानी मुस्लिमांना भेटला आहात का?
  • Log in or register to post comments
C
chittmanthan.OOO Fri, 12/13/2019 - 13:32 नवीन
भेटलो नाही याचा अर्थ काही प्रतिक्रिया द्यायची की नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/13/2019 - 15:31 नवीन
थोडे अजून फिरा. अगदीच नाही जमले तर "कुराण" नक्की वाचा. तेही नाही जमले तर, दार अल इस्लाम, दार अल हरब, ह्या बद्दल माहीती घ्या....
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 12/13/2019 - 17:18 नवीन
अवश्य शेअर करा
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Wed, 12/18/2019 - 19:10 नवीन
वरचे प्रश्न, कुराण, दार अल इस्लाम, दार अल हरब इत्यादींचा धाग्यात मांडलेल्या मुद्द्याबरोबर कसा संबंध आहे समजले नाही. ते दार अल इस्लाम, दार अल हरब तर कधि ऐकलेले सुद्धा आठवत नाही.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 12/18/2019 - 20:07 नवीन
माझे दोन अणे असे, दार उल अमुक तमुक हे विशिष्ट लोकसंख्या असलेल्या जमिनीला संबोधले जाते
  • Log in or register to post comments
श
शकु गोवेकर Sat, 12/14/2019 - 23:39 नवीन
हा विशय घाइ घाइ ने हाताळला आहे असे वाटत आहे कारण नागर्रिकत्व कायदा लागु केला तर बाकि समस्या ना तोड द्यावे लागेल्
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 12/15/2019 - 18:57 नवीन
प्रत्येक प्रश्नाकडे 'हिंदू-मुस्लिम' चषम्यातुन पहायची सवय लागलेले सत्ताधारी. "स्थानिक लोकाना बाहेरील राज्यातील लोक आलेले नको आहेत" हे सांगण्याची धमक नसलेले विरोधक व स्थानिक पक्ष. आणी ईशान्येतील लोकाण्च्या स्थानिक भावना तीव्र आहेत .. त्या त्यानी आटोक्यात आणल्या पाहिजेत हे सांगण्याची हिंमत नसलेला मिडिया..
  • Log in or register to post comments
झ
झेन Wed, 12/18/2019 - 17:16 नवीन
ढोंगीपणा नुसता आपल्या नसानसात भिनला नाही तर आता आपले DNA मॉडीफाय झाले आहेत. आपल्याला जनता कींवा मतदार म्हणून पण कुठल्याही प्रश्नांची खरी उत्तरे नकोत फक्त तात्पुरती झिंग..नशा पाहिजे आणि सगळ्या पक्षांचे नेते मिडिया ती नशा आपल्याला नियमित पुरवतात. मज्जानी लाईफ. बाकी "ईशान्येतील लोकाण्च्या स्थानिक भावना तीव्र आहेत" +१ त्याचे रंगीबेरंगी पदर बाहेरच्यांना कळणार पण नाहीत. "स्थानिक त्यांची अस्मिता आणि बाहेरचे" हा मुद्दा खमंग भाजून त्यावर एका कुटुंबातील अनेक पिढ्यांची दुकानदारी चालवणारे तर जवळ जवळ प्रत्येक राज्यात आहेत.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 12/19/2019 - 03:50 नवीन
Okay, my conclusion on CAA and NRC 1) if it was religiously persecuted people govt was trying to give relief to, they should have added ahmadia at least. This would have been a small measure to avoid allegations of Islamophobia. Whereas modi and shah repeatedly threw numbers in crores of people who would get benefit, is just 33000 Hindus Sikhs etc. Total ahmadia in Pakistan are 16 lakhs. How many refugees in India since 2014 ? I don't think that number would be big enough for government to spare another thought. So what I can conclude is this is a ploy to make the Islamophobia known. 2) Despite clarification from government, NRC + CAA will be used in discriminating between Indian Hindu and Indian Muslim. Suppose Ram doesn't have any documents to prove Indian citizenship, he can prove that he has been here from before 2014. And since he doesn't have documents, he is an immigrant. And logical conclusion will be that he is from Bangladesh/Pak. Thus he will get a citizenship under CAA. If Rahim can't, he'll be sent to a detention camp. 3) it took 10 years and 1200 cr to implement NRC in Assam. It will be much costlier on nation wide scale. So I'd think that this will be worth persuing only if the return (decrease in cost incurred on illegal immigrants) are worth it. 3) They must have brainstormed a lot to make it sound logical while doing it only for MOSTLY Hindus. Why only religiously persecuted ? - cause we want only Hindus. Because other immigrants were also Indians once and they are persecuted in other ways, hence they are coming to India. वरील लेखात म्हणल्याप्रमाणे शिया सुन्नी वादात भरडलेल्या मुस्लिमांचे काय ? एका मित्राला आधीच दिलेला reply आहे. मराठीत नाही टंकला, माफी असावी.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 12/19/2019 - 14:15 नवीन
ठीक आहे, पुढच्या वेळी मराठीत लिहावं. पाकिस्तानची निर्मिती ही मुस्लिम विरुद्ध काफिर या सुत्राने झाली. नागरिकता सुधारणा कायदा हा काफिरांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. हा कायदा तार्कीक, न्यायोचित आणि मानवतावादी आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 12/19/2019 - 19:11 नवीन
म्हणजे जे रंजले गांजले आहेत धर्माधारावर, त्यांना मदत नाही करायची, तर फक्त काही निवडक जातींना करायची आहे, बरोबर ?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 12/19/2019 - 19:15 नवीन
माझ्या प्रतिसादात मी बरेच मुद्दे आणखी मांडलेत, जे मला विचित्र किंवा आक्षेपार्ह वाटतात. एकदा त्यांचाही परामर्ष घ्या आणि तुमच मत नक्की कळवा.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 12/22/2019 - 10:34 नवीन
with intent to coverup underground ?
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Mon, 12/23/2019 - 17:56 नवीन
मी काय आहे आणि काय नाही यावर मी मांडलेले मुद्दे बरोबर किंवा चूक ठरतं अस तुम्हाला वाटतं असेल तर मग ठीकच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/19/2019 - 14:18 नवीन
लोकहो, दोन सत्य घटना सांगतो. कन्हैय्यालाल तलरेजा हे सिंधवासी हिंदू सिंधी वैदिक विद्वान होते. फाळणीनंतर जिनांनी जाहीर केलेलं की अल्पसंख्याकांचं रक्षण केलं जाईल. त्यावर विसंबून तलरेजांनी आपली मातृभूमी सिंध मध्येच राहायचा निर्णय घेतला. पुढे काही वर्षांनी हिंदूंचा व्यवस्थित छळ सुरू झाला. तरी ते त्याला तोंड देऊन कणखरपणे उभे राहिले. पण एके दिवशी निरोप आला की त्यांना टपकावण्यात येणार. तेव्हा सगळं सोडून रातोरात भारतात पळून आले. ठीके. अशा अनेक कथा आपण ऐकल्या असतील. पण नंतर काय झालं ते हिंदूंचे डोळे उघडणारं आहे. हे सगळं घडल्यावर जवाहर नेहरू भडकला. वैदिक विद्वान असल्याने औरंग्या कसा भडकलेला त्याच्या मोठ्या भावावर? आठवतेय दारा शुकोहची काय गत झालेली (मुद्दा क्रमांक ७)? अगदी तस्साच जवाहरही भडकला. तलरेजांना घुसखोर ठरवून तो त्यांना परत पाकिस्तानात धाडायला निघाला. यावर बराच गदारोळ झाला. अगदी संसदेतही वादविवाद झाले. मग थोर उपकार केल्याच्या अविर्भावात तलरेजांना भारतात राहायला परवानगी दिली. नागरिकत्व सुधार कायद्याची काय गरज आहे हे यातून कळतं. ही होती पश्चिम पाकिस्तानातल्या एका हिंदूची कथा. आता पूर्व पाकिस्तानातल्या हिंदू दलिताची कथा पाहूया. घटना जरा मोठी आहे. त्यामुळे तिचा फक्त जालनिर्देश देतो : http://swatidurbin.blogspot.com/2019/12/blog-post_11.html सांगायचा मुद्दा काये की वैदिक हिंदू विद्वान असो वा दलित हिंदू असो, काफीर तो काफीरंच ! लेखावर भाष्य स्वतंत्र प्रतिसादात करेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 12/19/2019 - 15:47 नवीन
मोदी एकापाठोपाठ ज्या रितीने अत्यंत संवेदनशील ज्वलनशील विषयांवर निर्णय घेत आहेत. ते निर्णय योग्य आहेत की अयोग्य हा विषय बाजुला ठेवला. तर किमान असे निश्चीतपणे म्हणता येते की. ज्या एक एक प्रचंड व्यापक निर्णयाने उदा. ३७० अगोदर आणि आता सीएबी एनआरसी संपुर्ण समाज हादरणार आहे या निर्णयामुळे दिर्घ़काळ समाजसरोवर ढवळुन निघुन त्यावर असंख्य तणावतरंग निर्माण होणार आहेत. याची मोदी सरकारला सुस्पष्ट कल्पना असुनही. पहील्या निर्णयाचे पडसादही जोवर थांबत नाही तो विषय अजुन विझत नाही तोवरच दुसर्‍या निर्णयाचा बॉम्ब टाकण्याची सरकारची ही उतावळी अपरीकक्व बेपर्वाइ दर्शक घाई अत्यंत चुकीची आहे इतकेच म्हणायचे आहे. आणि ज्वलनशील विषयांपेक्षाही अगत्याचे असणारे आर्थिक प्रश्न आर्थिक विषय मागे पडत आहेत हे अधिकच चिंताजनक आहे. ३७० चा निर्णय वा सीएबी चा निर्णय योग्य आहे की अयोग्य हा विषयच वेगळा यावर सध्या काहीच मत नाही पण ही जी शो ऑफ ची शैली आहे ती भयावह आहे. यात सरकारची या निर्णयांचा जनतेवर होणारा परीणाम आटोक्यात आणण्यासंदर्भातली संवेदनशुन्यताच दिसुन येते. तुम्ही कितीही मेलात तरी चालेल आम्ही एकामागोमाग निर्णय घेतच राहु समाज कितीही टोकाचा अस्थिर झाला तरी निर्णय रथ थांबणार नाही असे दिसते. सरकारच्या या संवेदनशुन्य बेपर्वा उतावळ्या निर्णयशैली वर मान्यवरांची मते जाणुन घ्यायची उत्सुकता मला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 12/20/2019 - 04:27 नवीन
मारवाजी नियंत्रणात आणणे म्हणजे काय ते जर स्पष्ट करता का?
  • Log in or register to post comments
N
NiluMP Fri, 12/20/2019 - 19:29 नवीन
We do pest control before painting our house. Not other way round, right? Same thing is happening in My Country Now. Thank you Govt of INDIA.
  • Log in or register to post comments
स
सचिन Mon, 12/23/2019 - 15:43 नवीन
१००% सहमत - प्रचन्ड संवेदनशील असलेले विषय इतक्या हलगर्जीपणे हाताळणे चालू आहे हे अत्यन्त चिंताजनक आहे. सामान्य जनता यात भरडली जाते. आर्थिक प्रश्न अधिक महत्त्वाचे असूनही प्रत्येक गोष्ट "देशभक्ती" आणि "देशद्रोह" यांच्या पारड्यात तोलायची सवय लागली आहे.अश्या मोठ्या निर्णयांच्या साठी आवश्यक असणारी "चेंज मॅनेजमेंट" भाजपला अजिबात जमली नाही .. कधीच !! चुकांमधून काहीही शिकत नाहीत ! संपूर्ण देशाने एवढा सपोर्ट दिल्यानंतर हे देशाला चक्क ग्रुहीत धरायला लागलेत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/12/2024 - 04:34 नवीन
आपलय भावना कळत आहेत . पण असा हि विचार येतो मनात कि गेली ७० हुन अधिक वषे जनतेने " काँग्रेसे शिवाय " कोणतीही विचारसरणी रुजू दिली नाही.... नुसतीच रुजू दिली नाही तर तिला जाणून बुजून बदनाम केले.. मग आता लोकांना जर या "इतर" विचारसरणी ला पाठिंबा मिळतोय तर त्यानं संधी नको द्यायला... लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत ना? बर तसे बघितले तर जगात राष्ट्रीयत्व वाढ्ते आहे मग भारताने काय घोडे मारलाय ... आणि उगाचंच "देशात आता अल्पसंख्यांक पूर्ण नामशेष होणार" वैगरे जो अप्रेचर गेली १० वर्षे चालू आहे त्याचा काय ? च्या मारी हिंदूनं स्वतःच्याच देशात या गांधीगिरी मुले तोंड दाबून बुक्यांचा मर एवढे वर्षे सहन करावं लागला त्याचा काहीच नाही ? ( यःची अनेक उदाहरने आहेत ) तर या "इतर " विचारसनी च्या काळात काही चुकीचे निर्णय होणार/ काही फसणार ... ते सोसा .... काँग्रेस, ब्रिटिश आणि मुघल राज्यात सोसले ना गपचूप
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/12/2024 - 05:42 नवीन
ऑस्ट्रलियात पाऊस पाणी कसा आहे ? सामाजिक समस्या वगैरे कशा आहेत ? नळाला पाणी येतं का रेग्युलर ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 03/12/2024 - 07:09 नवीन
सहमत आहे. संभाजीनगरात वाईट हाल आहेत. बिअर आहे पण पाणी नाही. वक्ते आहेत पण श्रोते नाहीत. प्रोफेसर आहेत पण विद्यार्थी नाहीत. पगार आहेत पण कामाप्रती निष्ठा नाही वगैरे इत्यादी. एम आय एम शिवाय प्रगति अशक्य
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/12/2024 - 12:49 नवीन
विषय कशाला बदलताय प्रोफेसर ? काय लिहलंय ते बघ कोणी आणि कुठे राहणार्याने त्याचा काय संबंध
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 03/12/2024 - 16:55 नवीन
ऑष्ट्रेलियात हागनदारीची कशी व्यवस्था असते ? इकडे ग्रामीण भागात आजही रस्त्याच्या दोन्ही बाजुने गाडीची टायरं भरतील की काय अशी परिस्थिती असते. भल्या पहाटे हातात डबे घेऊन जाणारे नागरिक तिकडे दिसतात का ? मुलभूत प्रश्नांची काय परिस्थिती आहे ? हे विचारायचं होतं. आपण भारतीय राजकीय प्रश्नांच्या बाबती जागरुक असतात म्हणून म्हणुन काही सामाजिक प्रश्न विचारावे वाटले. आपण दुखावला असाल तर दिलगिरी व्यक्त करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 03/12/2024 - 17:28 नवीन
एक नंबर गुगली टाकली डाॅक.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/13/2024 - 04:57 नवीन
तुमचा हे विचारण्याचाच मूळ हेतू येवडः सरळ नाही हे कळायला काय येडे आहोत का? भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय माणसाने ( भारताला नावे ना ठेवता) भारतीय राजकारण बद्दल काह्ही नॉलले कि लागसह तुम्ही बाहेरचे हे पालुपद म्हणजे पळवाट मुद्य्याला मुद्ययने उत्तर द्या उगाच "हागंदारीची" वाट का धरताय
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/13/2024 - 05:29 नवीन
काही लोकांची सध्या इतकी जळजळ होते आहे कि विचारू नका

ए टी एम चा फुलफॉर्म आयेंगे तो मोदी

ही असा झाल्यापासून हे लोक आता ए टी एम मध्ये पैसे काढायला सुद्धा जात नाहीत. मोंगलाना जसे संताजी धनाजी दिसत तसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना मोदीच दिसत असतात. २०२९ पर्यंत वाट पाहणे नशिबी आले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/13/2024 - 06:39 नवीन
ए टी एम चा फुलफॉर्म आयेंगे तो मोदी ही असा झाल्यापासून हे लोक आता ए टी एम मध्ये पैसे काढायला सुद्धा जात नाहीत. हे भारी होतं. काही नतद्रष्ट युपीआय चालू झाल्यामुळे सोक एटीएम मधून पैसे काढत नाहीत अशी अफवा पसरवतात. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/13/2024 - 07:03 नवीन
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा डॉक्टर साहेब. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/13/2024 - 08:13 नवीन
लै तर लैच जळजळ होते आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/13/2024 - 11:15 नवीन
अगदी मनापासुन शुभेच्छा. मोठे व्हा. नाव कमवा. सार्वजनिक संस्थळावर चांगलं लिहा-बोलायला शिका. याच शुभेच्छा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/13/2024 - 16:15 नवीन
मोदी येऊन दहा वर्षे झाली तरीही तुम्ही सुझलाम सुफलाम भारतात बिरुटे सर भुजबळांनी सुद्धा मान्य केलंय कि १० वर्षात भारत सुजलाम सुफलाम झालाय आणि तुम्ही बघा शिका काही तरी बालादपि सुभाषितं ग्राह्यम !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/13/2024 - 16:24 नवीन
भुजबळांनी सुद्धा मान्य केलंय कि १० वर्षात भारत सुजलाम सुफलाम झालाय ख्या ख्या ख्या. सुझलाम सुफलाम असतं तर चौकस साहेब कशाला ओस्ट्रेलीयात असते? प्यार्या मोदीजींच्या भारतात नसते का??
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/14/2024 - 00:36 नवीन
आम्ही कधी म्हणले होते का कि मोदींमुळे सुजलाम सुफलाम झाले कि परत येणार? आणि कशाला यायचे? इथे राहून शुद्ध भारताचे चांगलेच चिंतले जातंय , खारीचा वाट का असेना निर्यातीला / मेक इन इंडिया ला हातभार दिला तराही तुमचे रडगाणे ! माझ्य सारखया कायमचं बाहेर राहणाऱ्यांचे सोडा आखाती देशात काही वर्ष राहून भारतात भरपूर पैसे पाठवणाऱ्यानी का परत यायचे का? काय वाटेल तो तर्क तुम्हाला मुद्दा सुचला नाही कि हे भारताबाहेरचे भारतीय हे तुणतुणं सुरु करता !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/14/2024 - 04:52 नवीन
स्वदेश सिनेमा पहा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/14/2024 - 08:04 नवीन
बहुबलि महाशय स्वदेश ३ वेळा पाहिलाय , सिनेमा म्हणून ठीक आहे पण प्रत्येकाने काही त्या स्वदेश च्या हिरो सारखे येऊन "देशसेवाचा केली " पाहिजे ? तरच ती बहरत सेवा होते का? बर मी काही काही तेवढे हुशार पण नाही .. त्यामुळे भारतातून बाहेर गेल्याने भारताचे काह्ही नुकसान झालेले नाही परत एकदा सांगतो उगाच वयक्तिक होतंय.. मी भारताला व्यापार / प्रवास द्वारे किती चिंचोक्यांची मदत केली हे तुम्हाला काय माहिती? तुम्ही काय उगाच वाद घालायचा म्हणून घालताय का , कि भाजप द्वेषाबरोअबर परदेषस्थ भारतीय द्वेष पण ठासून भरलाय
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/14/2024 - 10:11 नवीन
परत एकदा सांगतो उगाच वयक्तिक होतंय.. मी भारताला व्यापार / प्रवास द्वारे किती चिंचोक्यांची मदत केली हे तुम्हाला काय माहिती? तुम्ही काय उगाच वाद घालायचा म्हणून घालताय का , कि भाजप द्वेषाबरोअबर परदेषस्थ भारतीय द्वेष पण ठासून भरलाय
+१ परदेशी लोक गेल्याने कोणते फायदे होतात खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते. मला हे फायदे आठवत आहेत. १. परदेशातीन ज्ञान भारतात येते. जगात बाहेर काय चालले आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. विचारांची घुसळण होऊन सुधारणा होते. २. परदेशातील नवीन तंत्रज्ञान भारतात येते, स्पर्धा निर्माण होते. ३. भारतातील एक माणुन परदेशी गेल्याने भारतातील एक जागा रिकामी होते, अप्रत्यक्षरित्या रोजगारनिर्मिती होते. ४. परदेशातील भारतीयाने भारतात पैसे खर्च केल्याने बाहेरील पैसा भारतात येतो. अजुन बरेच काही लिहीता येइल.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 03/14/2024 - 12:46 नवीन
खरे तर ह्यावर एक चांगला धागा आणि चर्चा होऊ शकते.
ह्या विषयावरच्या तुमच्या धाग्याचे आगाऊ स्वागत करतो 👍 वरती दिलेले ४ मुद्दे फुलटॉस बॉल प्रमाणे आहेत, असे अधिक मुद्दे आल्यास वेळात वेळ काढुन त्यांचे 'पोस्टमॉर्टेम' करायला नक्कीच मजा येइल 😀 आणि हो, त्या भावी धाग्यावरील चर्चा फक्त मिपाच नाही, तर अन्य संस्थळांवर असले गैरसमज बाळगणाऱ्यांच्याही उपयोगी पडेल अशा शुभेच्छा! नव्या धाग्याच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 03/15/2024 - 08:21 नवीन
  • Log in or register to post comments
T
Trump Fri, 03/15/2024 - 08:22 नवीन
ह्या विषयावरच्या तुमच्या धाग्याचे आगाऊ स्वागत करतो
धन्यवाद. दुर्देवाने कार्यबाहुल्यामुळे धागा काढण्याइतका आणि त्यावर चिकाटीने चर्चा करण्याइतका वेळ नाही. तुम्ही धागा काढा, मला जमेल अश्या प्रतिकिया देतो. इतर लोकांनी काढलेले काही धागे येथे डकवतो. हवेतर त्यावर जाऊन लिहा. परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय? https://www.misalpav.com/node/36341 परदेशी गेलेले भारतीय https://www.misalpav.com/node/49953 "इकडचे" आणि "तिकडचे".. https://www.misalpav.com/node/15794 फक्त अनिवासी भारतीयांसाठी - नवा धागा https://www.misalpav.com/node/8853 फक्त अनिवासी भारतीयांसाठी http://www.misalpav.com/node/8846 परदेशात नोकरी कराविशी वाटते..काय करावे.. https://www.misalpav.com/node/4644 स्वदेशात/परदेशात नोकरी न करण्याची खंत जाणवते का? https://www.misalpav.com/node/25263 परदेश प्रवासाकरीता मार्गदर्शन https://www.misalpav.com/node/25580 IIT आणि USA https://www.misalpav.com/node/32006
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 03/15/2024 - 01:04 नवीन
Trump आपले बरोबर आहे पण येथे मिपावर साधक चर्चा ना करता काही लोकांना काही सुचले नाही कि लिहिणारा काय लिहितोय या पेक्षा कोण कुठे राहतो वैग्रे उचापतत्या असतात आणि मग त्यातून अश्या ओकाऱ्या बाहेर पडतात - नाशिक ची द्राक्षे - हगीनदारी - तिकडचे नागरिकत्व मिळाले कि नाही - भारत सुजलाम झाला मग तुम्ही का इकडे का आला नाहीत - देशप्रेम वैगरे असो
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/15/2024 - 05:43 नवीन
तिकडचे नागरिकत्व मिळाले कि नाही मिळाले की नाही सर?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/15/2024 - 06:36 नवीन
ऑष्ट्रेलियात नळाला रेग्युलर पाणी येतं का ? ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 03/16/2024 - 07:52 नवीन
औरंगाबाद ला येतं का रोज पाणी? त्याकडे लक्ष द्या जरा उगाच एम आय एम चा खासदार निवडून दिलाय. तो काय दिवे लावतोय तेही पाहून घ्या
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 03/16/2024 - 08:10 नवीन
जसं भाजपचा खासदार जिथे जिथे निवडून दिला गेलाय तिथे रोजच नळाला पाणी येतं. नाही?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 03/16/2024 - 08:14 नवीन
अरेरे !! २४ तास सुद्धा निश्चय टिकला नाही तर.... https://misalpav.com/comment/1177016#comment-1177016
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 03/19/2024 - 15:37 नवीन
जसं भाजपचा खासदार जिथे जिथे निवडून दिला गेलाय तिथे रोजच नळाला पाणी येतं. नाही? हो आमच्याकडे येतंच. संभाजीनगरला येत नाही ना म्हणून बिरुटे सरांना विचारलं
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 03/16/2024 - 08:16 नवीन
>>>औरंगाबाद ला येतं का रोज पाणी? सुधारणा - . छत्रपती संभाजीनगर म्हणा. पाणी आलं नाही तर काही फरक पडत नाही. होल वावर इज अवर. कागद वापरतील.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 03/16/2024 - 08:17 नवीन
>>ऑष्ट्रेलियात नळाला रेग्युलर पाणी येतं का ? ;) असुरालयातील नळाचे पाणी जातच नाही असे ऐकले आहे. तेथील काही भागात आता नियमित बिअर आणि वाईन सुद्धा नळाने देणार आहेत. आपल्या इथलया स्मार्ट सिटी बनवणा-या कंपन्यांना खास कंत्राट देणार आहेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा