Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात citizenship amendment Bill 2019

C
chittmanthan.OOO
Fri, 12/13/2019 - 13:15
🗣 153 प्रतिसाद

रामनाथ कोविंद यांनी केलेल्या सहिने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता सर्व देशात हा कायदा लागू होईल. जसे इतर कायदे परित होतात तसाच हा कायदा देखील परीत झाला पण याला मिळणारा प्रतिसाद काहीसा नकारात्मक असाच होता. वर्तमानपत्राची पानेच पाने भरून येत आहेत. हिंसाचाराच्या बातम्या हेडलाईन्स बनत आहेत. त्यामुळेच याबद्दल तुमच्याशी बोलायच ठरवलं आहे.

हा कायदा नक्की काय आहे हे समजावून घेऊ. या कायद्याद्वारे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतामध्ये अवैधपणे स्थलांतरित झालेले व सध्या भारतात वास्तव्यास असणारे मुस्लिमेतर लोक म्हणजेच हिंदू , शीख, बौद्ध धर्मीय नागरिक म्हणून गणले जातील. त्यांच्या स्थलान्तर मागे त्यांच्या पूर्वीच्या देशात झालेला धार्मिक हिंसाचार याला कारण मानून हेच नागरिकत्व देण्यासाठीच पाया ठरवला गेला.

एखाद्या देशात धार्मिक हिंसाचार होत असेल व त्या कारणाने अल्पसंख्याक समाज दुसऱ्या देशात स्थलांतर करत असेल तर त्याला नागरिकत्व देणे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे योग्य की अयोग्य? या कायद्याला संपूर्ण देशात विरोध केला जातोय.प्रत्येकाचे विरोध करण्याचे कारण व मार्ग वेगळे आहेत.विरोधी पक्षांनी बिल पारित झालेल्या दिवसाला काळा दिवस असे संबोधले . काहींनी तर हा धर्मभेद्यांचा विजय असा मानला गेला . उर्दू लेखक शिरीन दळवी यांनी अवॉर्ड वापसी केली.

सगळ्या विरोधाचे प्रखर केंद्रबिदू ठरले ते आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्ये. इतर वेळी ही राज्य मुख्य प्रवाहापासून दूर आपल्याच नादात शीळ घालत जाणाऱ्या स्वछंद्याप्रमाने वाटतात.पण तीच राज्य सर्वात जास्त पेटलेली दिसत आहेत. पोलिस गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. आसाममधील इंटरनेट सुविधा तर कालपासून बंद केली गेली आहे .आज सकाळीच माननीय प्रधानमंत्र्यांच आसामला शांततेसाठी संबोधित करणारे ट्विट आले. आता इंटरनेट नसताना हे ट्विट लोकांपर्यंत कशी पोचणार आणि त्याला लोक कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

फक्त विरोध करून उपयोग नाही तर त्यामागची कारणे देखील आपल्याला जाणून घेतली पाहिजेत.

सगळ्यात पहिला आरोप जो विरोधकांकडून केला जातोय तो म्हणजे हा कायदा संविधान विरोधी आहे. खरंच तस आहे काय? आपल्या संविधानाने समान व सर्वसमावेशक नागरिकत्वाची तरतूद केली आहे . त्यामुळे मुस्लिमांना वगळून इतर धर्मियांना नागरिकत्व देणे म्हणजे ह्या तरतुदीचा भंग आहे का हे तपासले पाहिजे .

ह्याच मुद्द्याला धरून खूप सरी मते प्रदर्शित होतात. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांडून ह्याला देशहिताचा व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा कायदा मानला जातो. ह्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलतात असाही आरोप केला जातो.विरोधक या गोष्टीला मतपेटीचे राजकारण मानतात. मुस्लिमांना वंचित ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना खुपसा फरक पडत नसल्याने हा अन्याय चालवला असा आरोप आहे. तसाच विरोधकांवर सुध्दा मुस्लिम मतासाठी घाणेरड्या राजकारणाचा आरोप होतो.

त्याच्या पलीकडे जाऊन काहीसा वेगळा मतप्रवाह आहे जो सर्वच धर्मातील अवैध स्थलांतराचा विरोध करतो व नागरिकत्व न देण्याची मागणी करतो. त्यामध्ये ईशान्येकडील राज्ये अग्रेसर आहेत.काही लोक असाही म्हणतात की ज्या मुस्लिमेतर लोकांना भारतात यायचं होत ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थलांतरित झाली त्यातले एक पंतप्रधान पण झाले(मनमोहन सिंह यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला). आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं.

काही लोक या कायद्याला आसाम कराराचा भंग मानतात. कारण या कराराने १९७१ पूर्वीच्या स्थलांतर करणाऱ्यांना नागरिकत्वाची तरतूद केली होती.आता नागरिकत्व कायद्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्थलांतर नागरिकत्वाासाठी पात्र ठरवला गेला.

१९७१ असे किती लोक स्थलांतरित झाले असतील असा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येते की बांगलादेशातून आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये लाखो हिंदू स्थलांतरित झाले ज्यामुळे मूळचे असामी बोडो व इतर आदिवासी अल्पसंख्याक झाले. त्यामुळे आपल्यावर हिंदू संस्कृती लादली जाईल व आपली मूळची संस्कृती आणि भाषा नामशेष होतील अशी भीती त्यांना जाणवते .

आत्ता आणि एक प्रश्न पडला तो म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मधून मुस्लिम का भारतामध्ये स्थलांतरित झाले? त्यावेळी अस लक्षात येत की या देशात असलेल्या शिया सुन्नी मधल्या जीवघेण्या संघर्षाला कंटाळून अनेक मुस्लिमांनी भारतात स्थलांतर केले .तसेच म्यानमार व चीन यासारख्या मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या देशातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले . चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दोन्ही बाजू ऐकल्यावर आपण संभ्रमात पडतो की नक्की याला समर्थन द्यायचे की नाही. ह्याचे उत्तर काय? मला अस वाटत की जेव्हा भारतातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर भारताच्या हिताच्या दृष्टीने हवे असेल तर पुन्हा एकदा गांधी नावाच्या देशभक्ताचा प्रेमात पडावे लागेल व त्याचा मानवतेचा मंत्र घेवून संपूर्ण देशातच नव्हे तर जगात धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लढले पाहिजे . इतर देशातील धार्मिक शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील . तसेच आपल्या देशातील सामाजिक सलोखा नीट ठेवावा लागेल जेणेकरून कोणत्याही कारणाने अवैध स्थलांतर होणार नाही व ज्यांचे शोषण झाले त्यांना त्यांच्या देशातच न्याय मिळेल.

मानवता परमो धर्म !!


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 47138 views

🗣 चर्चा (153)
च
चित्रगुप्त Fri, 03/15/2024 - 08:35 नवीन
मुद्दा ५. परदेशात स्थलांतरित झालेली मुले भारतातील पालकांसाठी भरपूर पैसे तर पाठवतातच, शिवाय इकडे घरे, फ्लॅट वगैरेत गुंतवणूक करतात. भारतीय बँकात खाती उघडून मोठ्या रकमेच्या एफडी करतात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/14/2024 - 10:25 नवीन
प्रत्येकाने काही त्या स्वदेश च्या हिरो सारखे येऊन "देशसेवाचा केली " पाहिजे ? तुमचे देशप्रेम कळाले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/14/2024 - 15:01 नवीन
भुजबळ बुवा स्वदेश सारखा आचरट, भंपक आणि तद्दन बाजारू सिनेमा दुसरा नसेल. नासा सारख्या प्रथितयश संस्थेत उच्च स्थानावर काम करणारा एक शास्त्रज्ञ गावात येऊन काय करतो तर एक काही किलोवॅटचे पाण्यावर चालणारे जनित्र लावून गावाला वीज पुरवतो. त्याने इसरो ला क्रायोजेनिक तंत्रज्ञान सारखे काही पुरवले असते तर गोष्ट वेगळी. त्यापेक्षा त्याने तेथून नुसते पैसे पाठवले असते तर अख्ख्या पंचक्रोशीला वीज पुरवठा करता आला असता. असले सवंग लोकप्रियतेच्या सिनेमावरून एखाद्याचे देशप्रेम ठरवता याबद्दल हसावे कि रडावे हेच कळत नाही
  • Log in or register to post comments
स
सिद्धार्थ ४ गुरुवार, 03/14/2024 - 17:27 नवीन
हा पिक्चर तद्दन फालतू आहे. तुम्ही बरोबर पिसं काढली आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 03/15/2024 - 01:02 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Fri, 03/15/2024 - 03:00 नवीन
>>>स्वदेश सारखा आचरट, भंपक आणि तद्दन बाजारू सिनेमा दुसरा नसेल. अगदी सहमत. ज्यावेळेस खान मंडळींबद्दल काही वावड्या (!) ख-या खोट्या माहीत नाही, उठल्या होत्या त्यावेळेस नेमके असले देशभक्ती चित्रपट आणून त्यांना देशभक्त सिद्ध केले जात होते. आठवा - सरफारोश, बजरंगी भाईजान, स्वदेस इत्यादी अर्थात काही जणांना त्याचे सोयरसुतक नसते. त्यांना फक्त काड्याप्रतिसाद देण्यात स्वारस्य !! मनोरंजन छान करतात असली छचोर मंडळी
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 03/15/2024 - 14:59 नवीन
स्वदेस चित्रपट कितीही आचरट, भंपक आणि तद्दन बाजारू सिनेमा असला तरी त्यातील गाणी श्रवणीय होती आणि गायत्री जोशी पण छान होती. वाईटातून माणसाने चांगले शोधावे हो :)
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Fri, 03/15/2024 - 15:02 नवीन
गायत्री जोशी बद्दल सहमत. अशा शिक्षिका ( म्हणजे तरुण, सुंदर वगैरे) असतील तर खेड्यात जायला हरकत नाही असे आमच्या मित्रमंडळींचे मत झाले होते. पण एकंदर डीएड, बीएड कालिजातील मॉब पाहिला आणि पिच्चर मधील शिक्षिका आणि वास्तवातील शिक्षिका यांच्यातला फरक खुप असल्याचे जाणवून महात्मा गांधीच्या " चला खेड्याकडे" आवाहनाकडे दुर्लक्ष केले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/13/2024 - 06:43 नवीन
भारताच्या विकासात काहीही योगदान न देता ओस्ट्रेलियाच्या विकासात योगदान द्यायचं नी भारताला नावे ठेवायची. भारी असतं हे पण. :)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/13/2024 - 06:59 नवीन
१) भारताला नावे कुठे ठेवली? भार्तीय राजकारणावर बोललो कारण मूळ भारतीय नागरिक रहिवासी असल्याने लिहिले २) भारताहय प्रगतीला हात भर लावण्याचा म्हणाल तर उत्पादन आणि दिझैन क्षेत्रात भारतात ऑस्ट्रिलियातून काम पाठवली आहेत तेवहा माहित नसताना उगाच वयक्तिक आरोप करू नका
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/13/2024 - 07:02 नवीन
हाहाहा. आता मोदी येऊन दहा वर्षे झाली तरीही तुम्ही सुझलाम सुफलाम भारतात न येता तिकडेच आहात. टिका मात्र काॅंग्रेसवर. चांगलंय. सर आम्ही पाहून घेऊ भारताचं. तुम्ही नका लोड घेऊ.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/13/2024 - 08:12 नवीन
मोदी येऊन दहा वर्षे झाली तरीही तुम्ही सुझलाम सुफलाम भारतात हायला मोदी आल्यावर भारत सुजलाम सुफलाम झालाय? हे भुजबळ बुवांकडून काय आलंय? सूर्य उत्तरेला उगवून दक्षिणेला मावळणार काय?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 03/13/2024 - 08:20 नवीन
चला मान्य केलेच तर. याला म्हणतात मोदी है तो मुमकीन है !!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 03/13/2024 - 11:24 नवीन
चला मान्य केलेच तर.
खिक्क!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/13/2024 - 10:19 नवीन
तुम्हाला मुद्द्दा सुचला नाही कि "भारताबाहेर राहता " हे पालुपद... एकतर मी भारताला कुठे नावे ठेवली आहेत माझीही जन्मभूमी आहे ती आणि तुम्ही परदेशी जाऊन तुमचं त्या पॅरिस चाय भटकंतीत काय दिव्य विधान केलेत तर " आय कम फ्रॉम स्टेट थत किल्लेद गांधी = महाराष्ट्र ) वाह रे वाह
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 03/13/2024 - 10:26 नवीन
बाहुबली , भारत सुजलाम सुफलाम झालं कि नाही माहित नाही पण झाला असला तरी बाहेर गेलेल्यांनी परत आलेच पाहिजे हे काय? एखाद माणूस खेड्यातून शहरात आला आणि पुढे काही कारणाने खेडे सुजलाम झाले तर त्याने परत खेड्यात आलेच पाहिजे हा कोणता तर्क ( हा आता भारत म्हणजे खेडे असा चुकीचा अर्थ घेऊ नका या विधानाचा ) भारतात राहून भारतीय अर्थ व्यवस्थेला जो काही हात भर लावू शकलो असतो तेवढा किंवा थोडा जास्त हात भारतातुन आयात करून / दरवर्षी / २ वर्षी घडणाऱ्या वारीतून अनेक परदेशी भारतीय करीत असतात तेव्हा उगाच हे नेहमीचे "एन आर आय ना भारताबद्दल काय समजत" वैग्रे फालतू गिरी बस्स झाली मुद्द्याचे बोलणार तर बोला
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 03/13/2024 - 10:47 नवीन
* भारतीय आयटी संबधित निर्यात - वर्ष २०२२ १९४ बिलियन डॉलर (https://www.statista.com/statistics/320753/indian-it-software-and-services-exports/) * परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे ११० बिलियन डॉलर (https://en.wikipedia.org/wiki/Remittances_to_India) जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत --
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 03/13/2024 - 13:06 नवीन
जवळपास ५७ टक्के आयटी निर्यातीच्या तुलनेत
माफ करा, पण 'भारतीय (केवळ) आयटी संबधित निर्यात' व 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले (एकूण) पैसे' ह्यांची तुलना आणि टक्केवारी (५७%) चा संबंध आणि त्या मागचे गृहीतक नीटसे समजले नाही, (कारण त्यातून काय दर्शवायचे असावे ह्याविषयी मी जो अंदाज बांधलाय त्यावरून हि तुलना साफ चुकीची वाटत आहे त्यामुळे) कृपया ते उलगडून सांगावे अशी विनंती!
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/14/2024 - 00:46 नवीन
मला वाटते कि ट्रम्प यांना असे म्हणायचे होते कि "परदेशी भारतीय जो काही आर्थिक परतावा करता तो नगण्य नाहीये " एवढेच आणि हे दाखवून द्यायचे कारण कि या धाग्यवर उगाचंच जी परदेशी भारतीय हा मुद्दा कारण नसताना काढला जातो ते
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 03/14/2024 - 10:06 नवीन
मला वाटते कि ट्रम्प यांना असे म्हणायचे होते कि "परदेशी भारतीय जो काही आर्थिक परतावा करता तो नगण्य नाहीये " एवढेच
+१ भारतात आयटीवाले भरपुर पैसा मिळवतात आणि आयटीचे अर्थव्यवस्थेत योगदान मोठे आहे असा समज आहे., त्यामुळे आयटी हा संदर्भ वापरला आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 03/14/2024 - 12:04 नवीन
त्यामुळे आयटी हा संदर्भ वापरला आहे.
येस्स...Trump साहेब, त्यासाठीच तो संदर्भ खटकला! तुम्ही वर म्हंटले आहे की "भारतात आयटीवाले भरपुर पैसा मिळवतात आणि आयटीचे अर्थव्यवस्थेत योगदान मोठे आहे असा समज आहे" लोकांचे काय वाट्टेल ते समज असतात हो 😀, पण तुमच्या 'भारतीय आयटी संबधित निर्यात' आणि 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे' ह्या दिशाभुल करणाऱ्या तुलनेमुळे असा गैरसमज पसरला जाऊ शकतो कि परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेल्या पैशांत आय.टी. क्षेत्राचा वाटा ५७% इतका मोठा आहे, आणि त्यामूळेच हा प्रतिसाद प्रपंच करावा लागला! बाकी ही तुलनाच साफ चुकीची वाटल्याने 'परदेशस्थ भारतीयांनी भारतात पाठवलेले पैसे = १९४ बिलियन डॉलर' पण त्याच्या पुष्ट्यर्थ तुम्ही दिलेल्या लिंक वर 'IT sector exports from India reached at about 178 billion U.S.' असे दिसत आहे, ते विचारात घेता ५७ ही टक्केवारी अजुनही वाढवता येईल किंवा दुसरे एखादे क्षेत्र निवडल्यास ती तुल्यबळ अथवा ११०%/१५०%/२००% इतकी फुगवुनही दाखवता येइल आणि भारताच्या GDP च्या ३-४% इतकी कमी करुनही दाखवता येइल, पण तिकडे दुर्लक्ष करत आहे 😀 ते असो, ह्या विषयावर भरपुर चर्चा करता येइल, पण तूम्ही दुसऱ्या एका प्रतिसादात नवीन धाग्याचा उलेख केला आहे त्यावर पुढचा प्रतिसाद देतो!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/13/2024 - 11:24 नवीन
>>>भारतात राहून भारतीय अर्थ व्यवस्थेला जो काही हात भर लावू शकलो असतो तेवढा किंवा थोडा जास्त हात भारतातुन आयात करून.... नाश्कातले द्रांक्षे नेतात काय तिकडे ऑष्ट्रेलियात विकायला. डबल टीबल नफा मिळत असेल. तपशीलवार माहिती नक्की द्या... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/13/2024 - 11:53 नवीन
नाश्कातले द्रांक्षे नेतात काय तिकडे ऑष्ट्रेलियात विकायला. हसून हसून वाट लागली. बिरूटे सर फूल्ल फार्मात आहेत. :)
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar गुरुवार, 03/14/2024 - 15:51 नवीन
काही जणांना याची तीव्रतेने गरज आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/14/2024 - 00:42 नवीन
नाशकातील द्राक्षे नाही ( बायो सेक्युरिटी मुळे भारतातही काय इतर फर्स्ट वर्ड देशातील फळे येथे आणत नाहीत आंबा आणण्याचा प्रयत्न होतो पण बरेचदा फसतो ) पण त्याची वारुणी निर्यात होते ... टाटा आणि महिंद्रा च्या काही गाड्या , टाटा चा चहा , हॉटेल ला लागणारी स्टील ची भांडी, चादरी कितीतरी इंजिनीरिंग च्या गोष्टी या शिवाय इंजिनीरिंग मधील डिझाईन चे काम अजून काही माहिती ? मेक इन इंडिया ला आमचयासारख्यानी पाठिंबा दिला तर तुम्हाला मात्र ती मोदींची घोषणा म्हणून पोटात दुखते आणि असेल प्रश्न विचारता प्रामाणिक पने विचारणार असाल ( हंगिन्दरी सारखे न बोलता ) तर नक्की माहिती देऊ कि
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 03/14/2024 - 01:13 नवीन
सगळेच मिपाकर सुजाण, सूज्ञ आहेत. खरेतर देश, जात, धर्म, पंथ वगैरे सगळ्या मानवनिर्मित कल्पना आहेत, तेंव्हा कुणाकडूनच अमूक देश, तमूक धर्म यावरून वाद होण्याचे कारण नसावे. एकासाठी जे सत्य, दुसर्‍यासाठी असत्य असू शकते. असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/14/2024 - 03:30 नवीन
>>>> देश, जात, धर्म, पंथ वगैरे सगळ्या मानवनिर्मित कल्पना आहेत, तेंव्हा कुणाकडूनच अमूक देश, तमूक धर्म यावरून वाद होण्याचे कारण नसावे. आपण परदेशात राहतो तेव्हा भारतात आपण पूर्वीची जी असतील त्या सरकारच्या आणि असतील त्या परिस्थितीत आपण या देशाकडून घडलो आहोत मोठे झालो आहोत. हा देश अठरा पगड़ जाती आणि विविध धर्म संप्रदाय भाषांनी नटलेला आहे. एकसंध असलेल्या भारतात परदेशात बसून इकडे धर्म द्वेषाच्या लेंड्या टाकू नये हीच अपेक्षा. आमचा भारत जसा आहे तसा आम्हास प्रिय आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/14/2024 - 04:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 03/14/2024 - 07:49 नवीन
आणि काय धर्म द्वेष्ट बोललोय हो? एक हिंदू म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही विषय अंगाशी अल्ल कि बसलाय फुसक्या ( आणि लेंड्या आणि हगीनदारी ) करत भारत सर्वधर्मी आहे यात दुमत नाहीच पण तुम्ची व्याख्या म्हणजे जो जे पाहिजे ते करेल देश गेला खड्यात
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 03/13/2024 - 11:37 नवीन
फालतू गिरी बस्स झाली मुद्द्याचे बोलणार तर बोला
ज्यांचं बरंचसं जालीय आयुष्यच गेलंय फालतू गिरी करण्यात त्यांना काय फरक पडतो? ते मुद्दे धरुन बोलणारच नाहीत. तार्किक, वस्तुस्थितीला धरून प्रतिवाद केला की पळ काढतात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 03/14/2024 - 05:20 नवीन
काही लोकांनी चुकीच्या घोड्यावर सट्टा लावला. आता ते घोडं मरतुकडं निघालं आणि प्रत्येक शर्यतीत मार खातंय. तरी आम्ही काय मूर्ख आहोत का? या दंभापायी त्याच घोड्यावर परत परत सट्टा लावत आहेत. परत परत मार खाल्ला तरी सुम्भ जळला तरी पीळ जात नाही या तत्वाप्रमाणे यांची स्थिती होते आहे. दुसरा उत्तम अश्व सतत जिंकत जातो आहे आणि पुढे हि जिंकणार हे स्वच्छ दिसते आहे. ते पाहून फार जळजळ होते. पण काय करणार? चालायचंच
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 12/19/2019 - 21:14 नवीन
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 12/20/2019 - 06:39 नवीन
याआधी अमेरिकन ग्रीन कार्डसाठी लोकांची धडपड, तडफड बर्‍याचवेळा बघितली होती. पण भारतीय नागरिकत्वाची किंमत काय आहे, हे आज ७२ वर्षांनंतर पहिल्यांदा कळतंय. -- जालावरुन साभार.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 12/24/2019 - 06:02 नवीन
भारतीय नागरिकत्वाला किंमत असेलच, पण आपल्या गुणवत्तेला आणि कौशल्याला वाव मिळावा या कारणाने कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून केलेले स्थलांतर आणि लोकसंख्येच्या विस्फोटाने बेजार झालेल्या देशात भ्रष्ट यंत्रणेचा 'आधार' घेत केलेली घुसखोरी यात मोठा फरक आहे.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 12/20/2019 - 10:49 नवीन
जोरदार निदर्शने झाली,सरकार विरोधात वातावरण तयार झाले की नेत्यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी गुप्तचर यण्त्रणा पसरवतात असा अनुभव आहे. त्याची प्रचिती परत आली- https://www.loksatta.com/desh-videsh-news/pakistan-based-terror-groups-can-target-narendra-modi-at-delhi-rally-intel-scsg-91-2041084/ असो . हरिश साळवे ह्यांचे स्पष्टीकरण ऐकले. "फकत चलाखी" ह्यापलिकडे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
N
NiluMP Fri, 12/20/2019 - 19:47 नवीन
Do you know why Britisher rule us 150 years? I have not heard any story where one britisher is betray by another britisher but there are so many stories where one Hindustani is betray by another Hindustani. Unfortunately same thing is still happening.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 12/20/2019 - 20:42 नवीन
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 12/21/2019 - 10:31 नवीन
>>>>>>नेत्यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी गुप्तचर यण्त्रणा पसरवतात असा अनुभव आहे.<<<<<< पसरवतात ? देशाच्या तिन पंत प्रधानांची हत्याच झालेली असताना ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/21/2019 - 15:00 नवीन
कोणतंही सरकार कोणाचं शंभर टक्के समाधान करु शकणार नाही पण सध्याच्या सरकारने देशाची शांतता घालवली आहे, स्वातंत्र्य, समता, सर्वधर्म समभाव, बंधुत्व या देशाच्या अभिमान वाटाव्यात अशा सुत्रांना मुठमाती द्यायचं काम पद्धतशीरपणे सुरु आहे. आपली मतपेटी आणि मतांसाठी आपला एक वर्ग घट्ट करुन ठेवायचा विडाच सध्याच्या सरकारने उचलला आहे. एक असाही वर्ग की सरकारच्या कोणत्याही निर्णयाला पवित्र मानून त्या निर्णयाला स्वत:च्या अंगाखांद्यावर शिंपडून आपलं घर आणि शेजारच्याचं घर पवित्र करुन घेत आहेत. त्यांच्या मनोवृत्तीची काही चूक नाही. केवळ मतांसाठी पाच पन्नास वर्ष ज्या सरकारांनी काही एका वर्गाची मतांसाठी हाजी हाजी केली त्यांचं सरकार तर गेलंच पण आता आपलं सरकार येऊन बरं यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत त्याचं एक आनंदाचं फिलिंग काही लोकांच्या मनात आहे. आपण तासभर नागडं राहू पण समोरचा कायम नागडा राहीला पाहिजे असा तो आनंद. बाकी, कोणाही व्यक्तीला आपण जेव्हा असुरक्षित वाटतो तेव्हा तो टोकाचा निर्णय घ्यायला प्रवृत्त होतो. रस्त्यावर उतरतो, बेधुंद होतो. तीनशे सत्तर, राम मंदिर, तिहेरी तलाक, या सर्व गोष्टी व्हायला हव्या होत्या खूप काळ या प्रश्नांनी भारतीय लोकांना सतत तिष्ठत ठेवलं होतं. पण याही निर्णयातून जो काय ठळक संदेश जायचा तो जात आहे. आपल्याला या देशातून आता केवळ हाकलून द्यायचंच बाकी राहीलं आहे, अशी टोकाची भावना काही असुरक्षित भारतीयांच्या मनात उमटत आहे, आणि ते भडक होत आहेत. रस्त्यावर उतरणा-यांनाही माहिती नाही की आपण रस्त्यावर कशासाठी उतरलो आहोत. आपले प्रश्न काय आहेत, आपण करतो काय आहोत याचं भान उरलेलं नाही. असं करणं चूक आहे. आपणही ज्यांना कधीच आपलं मानलं नाही, त्याही लोकांना भारत कधी कधी आपला वाटतो अशा द्वंदात्मक अवस्थेत सरकार एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेश भर घालत आहे असं माझं व्यक्तीगत मत आहे. जे चूकही असू शकतं. भारतीय नागरीकत्व सुधारणा कायद्यावर-विधेयकावर गेल्या काही वर्षापासून काम चालू आहे. एकदाचं त्याचं कायद्यात रुपांतर होत आहे. आज देशातील नागरिकांचे प्रश्न संपलेले नाहीत, बेकारी, महागाई, विविध कंपन्यांमधून बेकार होणारे नवउच्चविद्याविभूषित कर्मचारी, शेतकरी त्यांचे प्रश्न आणि सामान्य माणूस नोटबंदीच्या मारापासून सावरलेली नाही. किमान विकासाच्या योजना, पायाभूत सोयीसवलती अजूनही गाव-तांड्यावर पोहचल्या नाहीत. की निर्वासितांचा प्रश्न समोर येऊन उभा राहीला आहे. त्यांचं पूनर्वसन हे आव्हानात्मक काम असणार आहे. आमच्याच प्रश्नांनी आम्ही बेजार आहोत, सालं या नसत्या उचापतींची गरजच काय होती असे वाटायला लागते. चालू वर्तमानकाळातील प्रश्नांना दररोज सामो-या जनतेला यातून काय मिळणार आहे, हा सामान्यांचा प्रश्न असेल. आज काही ठिकाणच्या हिंसक आंदोलनात जे जे घडत आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे. भविष्यात देशासमोर काय काय भलं बुरं वाढवून ठेवलेलं असेल त्याचे आपण केवळ साक्षीदार व्हायचं. जाने दो... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 12/25/2019 - 13:31 नवीन
देवाच्या घरात उशीर आहे अंधार नाहीच.
एकमेकांबद्दल पराकोटीचा द्वेश भर घालत आहे असं माझं व्यक्तीगत मत आहे. जे चूकही असू शकतं.
नक्कीच. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत चूकही असू शकते
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 12/30/2019 - 03:24 नवीन
सरकारने देशाची शांतता घालवली आहे, स्वातंत्र्य, समता, सर्वधर्म समभाव, बंधुत्व या देशाच्या अभिमान वाटाव्यात अशा सुत्रांना मुठमाती द्यायचं काम पद्धतशीरपणे सुरु आहे. ....
नव-वर्षाचं स्वागत इतकं मस्त होईल असं वाटलं नव्हतं. =)) =))
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/12/2024 - 04:16 नवीन
पण सध्याच्या सरकारने देशाची शांतता घालवली आहे देशासमोर काय काय भलं बुरं वाढवून ठेवलेलं असेल त्याचे आपण केवळ साक्षीदार व्हायचं. मतदानाची दिल्ली दूर नाहीये,, हटवा कि मग हे असले सरकार कोणी थांबवलंय ? पण जर नाही हटवू शकलात तर एकांगी गरळ ओकणं बंद करा
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/12/2024 - 04:20 नवीन
आपणही ज्यांना कधीच आपलं मानलं नाही त्यांनी देश आधी कि धर्म आधी याचा उत्तर दयावे .. मग पुढचे बोलू चोराच्या उलट्या बोंबा बस झाल्या " म्हणे स्वीकरले नाही " हिंदू सर्वधर्मसमभावी आहे म्हणून आज पारशी ज्यू भारतात गुण्या गोविंदाने राहतात ,,, मग बाकीच्यांना काय झालाय? डोळ्यवारची हिंदू देवशाची झापडे काढा आधी महाशय
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 12/21/2019 - 16:41 नवीन
आपली मतपेटी आणि मतांसाठी आपला एक वर्ग घट्ट करुन ठेवायचा विडाच सध्याच्या सरकारने उचलला आहे. आधीचे सरकार हेच करत होते
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Sun, 12/22/2019 - 09:15 नवीन
बाकीचे प्रश्ण आहेत म्हणुन ७० वर्षांपासुन लटकलेले प्रश्ण सोडवायचेच नाहीत का? सर्व संवेदनाशील प्रश्ण एकापाठोपाठ एक सोडउन टाकले ते बरं केल. जास्त विचार करायची कुवत नसलेले लोक थोडाफार दंगा करतील, पण लाँग टर्म मध्ये शांतता व प्रगती होईल ज्या मुळे बाकी प्रष्ण सुटायलाही मदत होईल. आशावादी....!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 12/22/2019 - 09:25 नवीन
संपूर्ण जगात हिंदुस्थान हे ऐकमेव राष्ट्र आहे जिथे मुसलमान कोणत्याही भयाविना आणि संपूर्ण धार्मिक स्वातंत्रेचा उपभोग घेत मोठ्या आनंदाने आणि मुक्तपणे राहु शकतात आणि राहत देखील आहेत. महेश भट पासुन फरहान अख्तर, स्वरा भास्कर आणि इतर काही बॉलिवुड मंडळी फक्त प्रसिद्धीसाठी आणि स्वतःची वैचारिक दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी विधाने आणि मोर्चे करत बसले आहेत. मला तर जावेद जाफिरी ने देखील रंग बदलल्याचे पाहुन नवल वाटले आहे ! असो... राष्ट्रहितासाठी आणि भविष्यात हिंदुस्थानातील हिंदुच या राष्ट्रात अल्पसंख्यक होउ नये म्हणुन सरकार जे जे कायदे करेल त्याला सर्वच धर्मातील, समुदायातील लोकांनी समर्थन ध्यायला हवे. जाता जाता :- या कायद्याच्या होण्यामुळे एकंदर आपल्या राष्ट्रात असलेले बिनडोक, भेकड, विघातक, मुखवटेधारी हिंदु आणि इतर धर्मातील बिळात बसुन असलेले साप बाहेर आलेले पहायला मिळाले ते उत्तम झाले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shaitan Ka Saala... :- Housefull 4
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 12/23/2019 - 11:12 नवीन
सहमत आहे... माझ्या ओळखीत एक मुसलमान, भारतात "रोझे" पाळत न्हवता... पण "कुवैत" मध्ये मात्र, माझ्या बरोबर काम करत असतांना, त्याला जबरदस्तीने "रोजा" पाळायला भाग पडत होते. दुसरा परिच्छेद.... मुसलमान हा शेवट पर्यंत मुस्लिम हितासाठीच लढणार. कारण, इस्लामला राष्ट्रवाद मान्य नाही. त्यामुळे, प्रत्येक मुसलमान हाच एक राष्ट्र असतो. हा अनुभव आहे. त्यातही, बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमान, भारतीय जनतेचा वैयक्तिक पातळीवर द्वेषच करतात. त्यात ते गैर मुस्लिम सगळेच धर्म पकडतात. उदाहरणार्थ....अफगाणीस्तान मधील बौद्ध मुर्तींची विटंबना आणि श्रीलंका मधील चर्च वरील हल्ला....
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/12/2024 - 04:23 नवीन
अफगाणीस्तान मधील बौद्ध मुर्तींची विटंबना आणि श्रीलंका मधील चर्च वरील हल्ला.... अगदि .. पन "अति उदारमत वेड्यांना " ते दिसत नाही आता सुद्धा इस्राएल वर ओरड चालली पण आधी गाझा मधून हल्ला झाला ते विसरले जाईल ( गोध्रा हि असेच )
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 12/23/2019 - 12:53 नवीन
आर्थिक आघाडीवरील अपयशाकडुन , लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न. आर्थिक धोरणामुळे(नोटाबंदी वगैरे) न भरडले गेलेले , फारशी झळ न बसलेले लोकच अशा गोष्टींना पाठींबा देतात. आत्ता हे सर्व करायची काही एक गरज नव्हती. सगळे अर्थतज्ञ जे सांगत आहेत त्याकडे पुर्ण दुर्लक्ष केले गेले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 12/23/2019 - 15:18 नवीन
आपली आर्थिक स्थिती खराब असेल ( उदा आपण PMC बँकेत पैसे साठवले आहेत पण ते आता उपलब्ध नाहीत) तर आपण मुलीचे लग्न चार वर्षे लांबणीवर टाकाल का? किंवा आपल्या आईचा तातडीचा इलाज २-४ वर्षे पुढे ढकलाल का? काही गोष्टी वेळेत होणे आवश्यक असते. मुळात अर्थव्यवस्थेचा आणि या मुद्द्याचा संबंध काय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा