Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कट्टा - रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019

प
प्रशांत
Fri, 09/20/2019 - 15:44
🗣 120 प्रतिसाद
मिपा मालक नीलकांत ह्यांच्या पुण्यनगरीतील आगमनाप्रीत्यर्थ कट्टा आयोजित करण्यात आलेला आहे रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019 वेळः सकाळी १०:०० वाजता स्थळः आपले नेहमीचेच पाताळेश्वर, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. मिसळपाव मुक्त संस्थळ असल्याने यायचा जायचा आणि खादाडीचा खर्च प्रत्येकाने आपला आपला करावयाचा आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 54038 views

🗣 चर्चा (120)
ग
गवि गुरुवार, 09/26/2019 - 10:17 नवीन
कट्ट्याला काही खास मजा आलेली दिसत नाही. खाण्यापिण्याची काही खास मजा नाही. उन्हातान्हात, पावसात चांगलीच रखडपट्टी झाली असावी. फोटोही तेच तेच फिरवून छापावे लागलेले दिसतात. चर्चेचे विषयही काही फारसे चमचमीत वाटले नाहीत. एकूण विशेष मजा आलेली दिसत नाही. एकंदरीत पुणे येथील कट्टे ठाण्याप्रमाणे कितपत मनोरंजक, सकारात्मक आणि सामाजिक संदेश देणारे बांधिलकी दाखवणारे असतात याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते असे परखड मत नोंदवून मी खाली बसतो. कोण आयोजक होतं बरं यावेळी? धन्यवाद. (प्रशांत, पुढील दोनशे प्रतिसादांची सोय केल्याबद्दल अल्प शुल्क पेपालने स्वीकारतो)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/26/2019 - 10:27 नवीन
एकंदरीत पुणे येथील कट्टे ठाण्याप्रमाणे कितपत मनोरंजक, सकारात्मक आणि सामाजिक संदेश देणारे बांधिलकी दाखवणारे असतात याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते असे परखड मत नोंदवून मी खाली बसतो.
अगदी अगदी..!
कोण आयोजक होतं बरं यावेळी?
वल्लीशेठ होते म्हणे, पण ( नेहमीप्रमाणे कारणे दाखवून माघार) ऐनवेळी मग प्रशांतकडे जवाबदारी आली. पण कसे का असेना, प्रशांतसेठ निभावून नेतात. मग कट्टा असो, की सायकल प्रवास, की मित्र असोत. बाय द वे गविशेठ, मी जर आलो असतो तर मला तुमच्या शेजारी उभे राहुन फोटो घ्यायचा होता. काढू दिला असता की धुसफुस केली असती ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/26/2019 - 10:31 नवीन
वल्लीची लेणी पायपीट आयोजन वगळता इतरत्र धरसोड असतेच वृत्ती. पण अर्रर्र, आपले प्रशांतशेठ होते का फायनल आयोजक? दिलगिरी. एक उत्तम कट्टा. पुकप्र.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/26/2019 - 11:05 नवीन
एक उत्तम कट्टा. पुकप्र.
असेच म्हणतो. मिपाकट्टा म्हणजे तरी काय असतो. भेटणे, बोलणे, लिहिणे, प्रोत्साहन देणे. आणि जालीय आयडी-व्यक्तिमत्वांच्या मुखवट्यात प्रत्यक्ष काही क्षण सुखाचे. अरुण कोल्हटकरांची क्षमा मागून, त्यांच्या कवितेत बदल करुन लिहितो. ''माझ्या मिपाचा बोर्ड कोरडा नको ठेवू आमचे सर्वांचे प्रतिसाद पावसात भिजो, शाही फुटो, ही अक्षरं विरघळोत, आमच्या लेखनांचा लगदा होवो. या जालजगतात, आमच्याच मिपाच्या अंश सापडो.'' प्रशांतसेठ, छान झाला कट्टा. आता औरंगाबादला करु कट्टा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/26/2019 - 11:08 नवीन
''माझ्या मिपाचा बोर्ड कोरडा नको ठेवू आमचे सर्वांचे प्रतिसाद पावसात भिजो, शाही फुटो, ही अक्षरं विरघळोत, आमच्या लेखनांचा लगदा होवो. या जालजगतात, आमच्याच मिपाच्या अंश सापडो.''
तुमच्या या प्रतिभेपायी बाकी कसे का असेनात, आम्ही तुम्हाला वंदनीय मानतो. (अर्थात वय हाही एक भाग आहेच.)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/26/2019 - 11:11 नवीन
तुम्ही दोघेही 'दो हंसो का जोडा' आहात. एकाचा प्रतिसाद आला की दुसरा येतो, दुसर्‍याचा आला की पहिला येतो.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/26/2019 - 11:14 नवीन
+१०१ ये रिशता है बरसो पुराना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/26/2019 - 11:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/26/2019 - 11:09 नवीन
प्रशांतसेठ, छान झाला कट्टा. आता औरंगाबादला करु कट्टा.
वेरुळला केलात तर मी येईन.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/26/2019 - 11:20 नवीन
वेरुळला केलात तर मी येईन.
हा असेल तर पायपीट, वणवण वॉर्निंग देणं हे जनहितार्थ कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पण त्या लेण्यांशी एकरुप होण्याबाबत मात्र __/\__ एकदा कैलासाच्या दारात काहीजण उभे असताना अमुक पावले सरळ जाऊन डावीकडे पहा की तमुक मूर्ती. पुढे डावीकडे अमुक पावले तिथे अमुक क्रमाने या मूर्ती. तिथून किती पायऱ्या वर चढल्यावर नेमकं समोर काय येईल हे हा मनुष्य बसल्या जागेवरून त्यांना संदेश पाठवून सांगत होता.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/26/2019 - 11:23 नवीन
वेरुळला फारशी पायपीट, वणवण नाही. निवांतपणं होतं सगळं. तुम्ही या ना भो.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/26/2019 - 11:29 नवीन
तुम्ही तिकडेच वस्तीला असता का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/26/2019 - 11:32 नवीन
नै हो, अधीमधी जातो इतकंच.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत गुरुवार, 09/26/2019 - 10:31 नवीन
तुम्हि ठाण्याला कट्टा ठरवा आम्हि येवु. बर्‍याच लोकांना जेवणासाठी थांबणे शक्य नसल्याने यावेळी जेवणाचा बेत हुकला.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/26/2019 - 10:31 नवीन
तुमच्या प्रतिसादाच्या उप प्रतिसदाला किती कमिशन?
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 09/26/2019 - 10:33 नवीन
आधी ट्रान्सफर झालेले दिसूदेत डोळ्यांना. मग बघू.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/26/2019 - 10:38 नवीन
ओह, नुसतेच मुंकेस होते होय? =))
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 09/26/2019 - 10:31 नवीन
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/26/2019 - 12:44 नवीन
जसं बुद्धिबळ खेळणाऱ्याला आपल्यापेक्षा वरचढ /समतुल्य प्रतिस्पर्ध्याशी खेळायचं असतं तसं काही कट्टेकऱ्यांचही असतं बहुतेक. नाही तर ते टाळतात.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 09/29/2019 - 13:16 नवीन
अरे वा, छान झालाय कट्टा. काही नविन चेहरे दिसले. यशोताईंचे दर्शन झाले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा