Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कट्टा - रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019

प
प्रशांत
Fri, 09/20/2019 - 15:44
🗣 120 प्रतिसाद
मिपा मालक नीलकांत ह्यांच्या पुण्यनगरीतील आगमनाप्रीत्यर्थ कट्टा आयोजित करण्यात आलेला आहे रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019 वेळः सकाळी १०:०० वाजता स्थळः आपले नेहमीचेच पाताळेश्वर, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. मिसळपाव मुक्त संस्थळ असल्याने यायचा जायचा आणि खादाडीचा खर्च प्रत्येकाने आपला आपला करावयाचा आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 54038 views

🗣 चर्चा (120)
य
यशोधरा Mon, 09/23/2019 - 06:30 नवीन
काल कट्ट्यावर बोललो होतो ती परदेशवारी मालिका आज वाचून काढली! भन्नाट लिहिले आहे विलासरावांनी!
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/23/2019 - 06:45 नवीन
मित्रहो, कट्टा संयोजक प्रशांत हे आज कामात मग्न असल्याने त्यांच्या सूचनेनुसार आपल्यासमोर वृत्तांत सादर करतो. अर्थात फोटो त्यांचेकडेच असल्याने ते सवडीने इथे चढवण्याची जिम्मेदारी सर्वस्वी त्यांचीच आहे याची नोंद घ्यावी ! ...... शनिवारी पहाटे गावाहून आलो होतो. प्रवासात बुडालेली झोप आता सकाळी भरून नाही काढता येत. मग आन्हिके उरकली अन मिपाकडे धाव घेतली. सर्वात वरचा धागा पाहिला : मिपाकट्टा पुणे ! आता अंगात एकदम संचार झाला. मागच्या शनिवारवाडा कट्ट्याला दीड वर्ष उलटले होते. तेव्हा पुढच्या कट्ट्यासाठी मी आसुसलेलाच होतो. घरी हे कानावर घातले आणि थोडा विरस झाला. नेमके रविवारी दुपारी माझ्याकडेच पाहुणे जेवायला ठरले होते. पण, कट्ट्याची वेळ हा माझ्यासाठी सुखद आधार होता- सकाळी १०. तेव्हा मला गप्पाटप्पांचा आनंद लुटता येणार होताच. त्यातून खुद्द मालक मंडळी येणार याचाही आनंद होता. आपल्या सर्वांसाठी हे मनमोहक आणि मोफत संस्थळ उपलब्ध करून देणाऱ्या द्वयीन्ना प्रथम पाहण्यास मी जाम उत्सुक होतो. कट्ट्याचे स्थळ पाताळेश्वर हे देखील साद घालत होते. शालेय जीवनातील सहलीनंतर मी तिकडे कधी फिरकलो नव्हतो. हे जरी मिपाचे पारंपारिक कट्टास्थळ असले तरी मी मिपाकर झाल्यानंतरचा हा इथला पहिलाच कट्टा असावा. सकाळी सव्वादहाला मी तिथे हजर झालो. आत शिरता शिरताच एका दृश्याने लक्ष वेधून घेतले. एक ज्येष्ठ गृहस्थ मांडीत एका मांजरीला घेऊन कुरवाळत बसले होते. का कोण जाणे, पण असे वाटून गेले की असावेत हे मिपाकर ! मग गेलो जवळ अन टाकला खडा... अन बसलाही बरोबर ! एव्हाना तुम्ही ओळखलेच असेल की हे सद्गृहस्थ म्हणजेच आपले जानेमाने कंजूस ! मुंबईहून भल्या पहाटे निघालेल्या या तरुण तुर्काने इथे पहिला नंबर लावला होता! बरं, काल रात्रीच त्यांनी रेल्वे आरक्षण तट्ट असल्याचे जाहीर केले होते. आता मला प्रश्न पडला की यांना मांजरीसकट बरा ट्रेनमध्ये प्रवेश मिळाला ! मग त्यांनीच खुलासा केला की त्या मांजराचे आधारकार्ड मुंबईचे नसून पुण्याचेच आहे !! मग त्या मांजरीस अलविदा करून आम्ही दोघे अन्य मंडळींच्या स्वागतास सज्ज जाहलो. ( क्रमशः)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 09/23/2019 - 07:03 नवीन
Image removed. तुमच्या ताजमहालासारखा आमचा सुद्धा बिबि का मकबरा पुण्याचा कट्टा ठरतो आहे पाहून मला सुद्धा वाटायला लागले कि आपणही मिपाकरांना भेटायला पाहिजे. म्हणून शनिवारी मी "मिळून मिसळून" या मिपाकरांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप वर रविवारी सकाळी ठाणे येथे "मेतकूट" या हॉटेलात नाश्त्यासाठी कोणी येऊ शकेल का असा संदेश पाठवला. त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही चौघे जण सकाळी ९ वाजता मेतकूट मध्ये भेटलो. उजवीकडून डावीकडे मी, खटपट्या, मोदक आणि अत्रन्गि पाऊस असे चौघे भेटलो. सुरुवात कांदा भजीनी झाली मग भाजणीचे धिरडे, दडपे पोहे, अळू वडी आणि अपा यांची फर्माईश म्हणून बटाटा भजी असे सुग्रास खाऊन वर चहा कॉफी पिऊन भरल्या पोटाने आणि तृप्त मानाने मंडळी साडे अकरा वाजता रवाना झाली.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 09/23/2019 - 14:52 नवीन
कुठे सफरचंद, कुठे टोमॅटो. छया पूर्वीचे मिपाच राहिले नाही... ;)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/23/2019 - 07:56 नवीन
.... पुणे : भाग २ कंजूस आणि माझी ही प्रथमच भेट. आमची ओळखपाळख होत नाही तोवरच प्रचेतस हजर झाले. चला, दो से भले तीन ! मग आम्ही हळूच त्या ‘पाताळात’ प्रवेश केला. आता ही मोहक पुरातन लेणी पहायची आणि साथीला त्याचा इतिहास कोळून प्यालेले आपले प्रचेतस. दुधात साखरच म्हणाना. त्या प्रवेशद्वाराशीच असलेला शिलालेख मला तरी अदृश्यच होता. पण प्रचेतस यांनी त्यावर एक नजर टाकताच तो एकदम लख्ख दिसू लागला ! तिथल्या सुखद गारव्याचा आम्ही अनुभव घेतोय तोच मिपाचे मधल्या फळीतील दमदार फलंदाज (कप्तानासह) तिथे अवतरले. आतला शांत परिसर समीर यांच्या दमदार आवाजाने थरारून गेला ! गेली ११ वर्षे निव्वळ मिपावाचनमात्र असणारे हे चोखंदळ वाचक. ....... प्रिय कट्टेकरिंनो, या वृत्तांताची गाडी मी २ स्थानके चालवत आणली आहे. आता चक्रधराची जागा अन्य कोणी घेऊन ती फुडे हाकत रहावी ही इनंती !
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 09/23/2019 - 10:06 नवीन
एक नंबर लिवलंय.... याच्या पुढचेही तुम्हीच लिहावे ही इनंती!!
  • Log in or register to post comments
J
jamesrao bondpatil Tue, 09/24/2019 - 14:35 नवीन
भाऊ काइतर जबरदस्त लिहा, तुमच्या साठी आलोय मी ईथे..
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 09/23/2019 - 11:24 नवीन
वा! छान झाला की कट्टा... संपूर्ण वृत्तांत वाचायला आवडेल. @कंजूस काका -फोटो छान! @कुमार१ - वृत्तांताची छोटेखानी झलक आवडली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/23/2019 - 12:04 नवीन
जव्हेरगंज, टर्मिनेटर, समीरसूर आणि अन्य सर्व प्रतीसादकांचे आभार ****************************** भाग ३ : आता कट्टासंघातील ८ खेळाडू हजर झाले होते. नावे वर लिहिलीच आहेत. त्यातील प्रकाश घाटपांडे हे अजून एक तरुण तुर्क ! लेण्यांवर एक दृष्टीक्षेप टाकून आम्ही पाताळातून पुन्हा धरतीवर आलो ! आता नव्या भेटीगाठीनी खूप मस्त वाटत होते. गोलाकार उभे राहून गप्पा चालू असतानाच नववे खिलाडी लोथार मथायस दाखल झाले. हे आपले पुणेकर त्या जर्मन पायचेंडूपटूच्या इतक्या प्रेमात पडले की ते स्वताचेच खरे नाव विसरून गेलेत ! आता आम्ही सर्व ९ पुरुष मंडळी टवाळ होऊ लागणार इतक्यात यशोधरा अवतरल्या ! अशा तऱ्हेने कट्टा दशक पुरे झाले होते. आता थोडे आत येऊन काळ्या कातळावर जमेल तसे बूड टेकवून कट्टासभा सुरु झाली. ( क्रमशः)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/23/2019 - 12:08 नवीन
लोथार मथायस सगळ्यात शेवटी आले. येता येता ते पाताळेश्वराच्या कुंपणापलीकडून आपल्या घोळक्याकडे बघत होते, तेव्हा आपण म्हणालो सुद्धा की कोणी मिपाकर दिसताहेत! बाकीच्या मिपाकरांना शोधताहेत म्हणून. :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/23/2019 - 12:18 नवीन
चू भू दे घे ☺️
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 09/23/2019 - 12:09 नवीन
बर्‍याच दिवसांनी कट्ट्याविषयी वाचायला, ऐकायला मिळालं. बरं वाटलं
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 09/23/2019 - 13:06 नवीन
मस्तं वर्णन. वाचतेय.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 09/23/2019 - 13:19 नवीन
मस्त वृतान्त आणि त्यावरील प्रतिक्रिया. खासकरून उपस्थितांच्या, त्यातूनही भस्म न झालेल्यांची. मजा आली. वाचायला. पुढील कट्ट्याला शुभेच्छा, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/23/2019 - 13:56 नवीन
अहो, नुसत्या शुभेच्छांनी नाही भागणार सुधीरभाऊ. पुढच्या कट्ट्यास तुमची उपस्थिती आवश्यक ! आमाला आवडेल ना तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला आनि ते रंजन का गुंजन पुन्हा एकवार कराया !!
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Mon, 09/23/2019 - 15:49 नवीन
जल्ला मेला आज पायला धागा २ दिस आजारी होतो त्यामुळे. :( लयीच घाईत झाला पण एका धाग्यात झाला :) {उगाच बाहेरच्या लोकांनी अफवा पसरवाल्यात मेल्यांनी पुणेकरांबद्दल :) }
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/23/2019 - 16:08 नवीन
आता प्रत्येकाचा परिचय, इथले नाव, घरचे नाव, काय काय ‘उद्योग’ करतो....इ.इ. चे प्रांजळ कथन सर्वांनी केले. याची सांगता अर्थातच नीलकांत यांनी केली. या सर्व गोष्टींची नोंद मिपा आयोगासमोर ‘इन क्यामेरा’ झालेली आहे ! ती इथे जाहीर करण्यास मिपा घटनेनुसार सक्त मनाई आहे. फक्त पुढील कट्ट्यास उपस्थित राहणाऱ्यांनाच ती माहिती मिळू शकते ! तर मंडळी, असा हा परस्पर परिचय आणि स्नेह वाढविणारा सुरेख कट्टा. ‘श्रीगलेमा’च्या सुंदर मेजवानीनंतर मोजक्या मिपाकरांनी अनुभवलेला. मिपाला आता एक तप पुरे होऊन गेलेले आहे. आभासी जगाच्या इ-पडद्यावर आपण सगळे वावरत आहोतच. त्यातून एकमेकाबद्दल थोडीफार माहिती कळते, व्यक्तिमत्वाचा जरा अंदाज येतो खरा. पण, प्रत्यक्ष भेटीची सर या जालवावराला नाहीच. म्हणूनच भेटीगाठी आवश्यक. खादाडी झाली का, झाली असल्यास काय खाल्ले वगैरे गोष्टी गौण आहेत, नाही का? या संदर्भात माझ्या एका आवडत्या इंग्लीश अवतरणाने या वृत्तांताचा शेवट करतो: You can learn more about a person in an hour of play than in a year of conversation. कट्टा संयोजक, उपस्थित सभासद आणि इथले सर्व वाचक यांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 09/23/2019 - 16:23 नवीन
१००% सहमत... आभासी दुनियेतील व्यक्तिरेखा आणि प्रत्यक्ष भेटीतला अनुभव ह्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. रच्याक: मी मिपाकर झाल्यापासून मालक नीलकांत ह्यांचे काहीच लेखन वाचनात आले नाहीये, तेव्हा त्यांना नम्र विनंती की, कृपया ह्या कट्ट्याचा वृत्तांत त्यांनी शब्दबद्ध करावा....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/23/2019 - 16:17 नवीन
मस्त वृत्तांत हो डॉ. छान लिहिलेत.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 09/23/2019 - 19:56 नवीन
खूपच छान सुंदर मी रविवारी दिवस भर एका कार्यक्रमात होतो नाहीतर यायला खूप आवडलं असतं
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/24/2019 - 05:00 नवीन
कुमार१ ह्यांनी लिहिलेला वृत्तांत खूप आवडला. कंजूस काकांचे इतक्या लांबवर आल्याबद्द्ल खास कौतुक. काही क्षणचित्रे लेण्यांतील गप्पांत रमलेले मिपाकर डावीकडून कंजूस, कुमार१, महासंग्राम, प्रशांत, नीलकांत आणि समीर शेलार Image removed. हसरे मिपाकर Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 09/24/2019 - 05:47 नवीन
काढलेत प्रचेतस ! धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 09/24/2019 - 07:20 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 09/24/2019 - 12:53 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/24/2019 - 18:07 नवीन
नंबर एक. आवडेश. लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 09/24/2019 - 19:30 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 09/24/2019 - 07:36 नवीन
चलत्चित्र छान केले आहे. आवडले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/24/2019 - 11:08 नवीन
कशी आहे पाताळेश्वर लेणी? विडिओ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/24/2019 - 18:09 नवीन
कंजुसकाका, व्हिडीयो चित्रण आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 09/25/2019 - 08:05 नवीन
जव्हेरगंज, क्लिप एक नंबर ! वाह !
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 09/25/2019 - 08:18 नवीन
खुप दिवसांनंतर मिपाकरांना भेटता आले. मिपाकरांना भेटताना नेहमीच एक अनुभव येतो की चेहरा अनोळखी असतो माणुस मात्र ओळखीचा वाटतो. नेहमीच्या चर्चेने गप्पा करण्याइतपत सवयीचे अनोळखी चेहरे पाहून मजा येते. अर्थात त्यानंतर ते लोक आपले जवळचे होतात. कट्ट्याला कंजूस काका आले होते. थोडाच वेळ थांबता येईल हे माहिती असून सुध्दा ते एवढ्या दुरून आले हे विशेष वाटले. कुमार१ सरांशी भेट झाली. सोबतच महासंग्रामसोबत पेपरात काही देतोस का अशी विचारणा झाली मात्र पत्रकार काही ऐकेनात. ते आपले फक्त पाचशे वर अडून बसले. या निमीत्ताने फक्त ५० यांची सुध्दा आठवण निघाली. प्रशांत, वल्ली आणि यशोधरा यांच्याशी गलेमा आणि आगामी दिवाळी अंकाच्या गप्पा झाल्या. प्रकाश घाटपांडे काकांची अनेक वर्षांनी भेट झाली. लोथार मथायस नवीन होते त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. मला कटट्याची एक विशेष मदत होते ती म्हणजे मिपाबाबत प्रत्यक्ष फिडबॅक मिळतो. काय केलं पाहिजे. काय बदल हवाय असे नवनवीन समजते. समीर शेलार तसे नवीन होते पण ते एवढ्या लोकांना ओळखतात आणि श्रामो व बिकाच्या गप्पा झाल्या. एकंदरीत मजा आली. - नीलकांत
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 09/27/2019 - 17:35 नवीन
+१०, ००१ प्रत्यक्ष नीलकांत यांच्या लेखणीतून वृतान्त ! क्या बात हए ! नमस्कार नीलकांतसाहेब.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/25/2019 - 08:46 नवीन
संस्थळावर काही काळ वावरल्यानंतर आपण इथल्या एखाद्या व्यक्तीबद्दल मनात एक रेखाचित्र उभे करतो. ते अर्थातच काल्पनिक असते. ते पूर्णपणे आपले कल्पनारंजन असते. या कट्ट्याला मालकमंडळी येणार म्हणून उत्सुकता होतीच. प्रशांत यांचा फोटो आधीच पाहिलेला असल्याने प्रश्न नव्हता. आता नीलकांत हे कसे असतील याचे एक चित्र मनात रेखाटले होते. असा अंदाज केला होता की ते एक मध्यमवयीन, छानपैकी मिशा राखलेले करारी गृहस्थ असावेत ! वास्तव आता आपल्यासमोर फोटोच्या रूपाने आहेच ! उत्साहाने सळसळते तरुण, विनम्र आणि सर्वांच्या सूचना अगदी प्रेमाने ऐकून घेणारे असे. असा कल्पना आणि वास्तवदर्शन यात जो खूप फरक निघतो, तो देखील आनंददायी असतो !
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 09/25/2019 - 09:27 नवीन
हे कट्टे नेमकं काय प्रयोजनासाठी असतात ? कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ? तेथे काय उपक्रम असतात यावर अधिकृत सविस्तर माहिती हवी होती तसेच कट्टे मिपाच्या ध्येयधोरणात बस्तात काय आणि कट्याला मिपाची ध्येयधोरणे व आचारसंहिता लागु आहे काय ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 09/25/2019 - 14:13 नवीन
अटेंड करायचा अनुभव खुप छान असतो. एकदा आले की पुन्हा यावे वाटते. मिपातल्या दिग्गज सेलिब्रेटीना भेटून भारावून जायला होते. यावेळी कट्टा पुण्यात असून ही उपस्थित राहता आले नाही याचे वाईट वाटले ! एकदा योग जमवून आणा. पहा कसे वाटते. सांगा अम्हालाही अनुभव तुमचा !
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 09/25/2019 - 18:20 नवीन
ह्या कट्टा प्रकरणाने मनाची उत्सुकता फारच शिगेला पोहोचली होती. दर वेळी मिपा एक नवीनच सरप्राइज असते. मला आधी वाटले होते की फक्त सास, सम वगैरेंनाच कट्याची परवानगी आहे. पण इथे तर सामान्य वाचकही कट्यास उपस्थित राहून आपल्या आवडत्या मिपा लेखकाला/मिपाकरांना प्रत्यक्ष भेटून अत्यन्त सुखावून जात असला पाहिजे. अतिशय स्तुत्य उपक्रम _/\_
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 09/25/2019 - 09:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 09/25/2019 - 10:00 नवीन
देशातही कोणी कट्टा म्हणणार नाही
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/25/2019 - 10:26 नवीन
कट्टानुभव कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ? इथे आपण एखादा विषय मांडतो, चर्चा होते. काही जणांना आपल्या विषयाची आवड आहे हे कळतं. मग बरेच लेखन, खरड, वैयक्तिक निरोपही होतात. मग समजतं जवळपास राहात आहे. भेटून तो सभासद कसा आहे ते पाहतो. हीच गम्मत. दीड तासाच्या कट्ट्यात फारसे बोलणं होत नाही. पण तो उद्देश नसतोच. पुन्हा लेखनातून संवाद होतच राहतात. बाकी मिपाधोरण किंवा कोणत्याही छापील माध्यमास संयमित/मर्यादित/व्यक्त होण्याचे धोरण ठेवावेच लागते. मिपाकरांनी एकमेकास भेटून काही बोलणे वगैरे केले त्याचा थेट संबंध कसा लावणार? आचारसंहिता वगैरे प्रश्न मला कळला नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/25/2019 - 10:26 नवीन
कट्टानुभव कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ? इथे आपण एखादा विषय मांडतो, चर्चा होते. काही जणांना आपल्या विषयाची आवड आहे हे कळतं. मग बरेच लेखन, खरड, वैयक्तिक निरोपही होतात. मग समजतं जवळपास राहात आहे. भेटून तो सभासद कसा आहे ते पाहतो. हीच गम्मत. दीड तासाच्या कट्ट्यात फारसे बोलणं होत नाही. पण तो उद्देश नसतोच. पुन्हा लेखनातून संवाद होतच राहतात. बाकी मिपाधोरण किंवा कोणत्याही छापील माध्यमास संयमित/मर्यादित/व्यक्त होण्याचे धोरण ठेवावेच लागते. मिपाकरांनी एकमेकास भेटून काही बोलणे वगैरे केले त्याचा थेट संबंध कसा लावणार? आचारसंहिता वगैरे प्रश्न मला कळला नाही.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 09/25/2019 - 10:50 नवीन
आचारसंहिता वगैरे ...
आचारसंहिता वगैरे म्हणजे इथे व्यक्त होताना ती पाळली गेली नाही तर प्रतिसाद संपादित होतो, समज मिळते अथवा बॅनही होऊ शकतो. तसेच कट्ट्यावर व्यक्त होताना काही पथ्ये पाळायची असतात का व ती मिपाचेच रुल्स एक्सटेंड करतात की कसे ?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/25/2019 - 13:53 नवीन
मिपाचे नाहीत पण सार्वजनिक ठिकाणचे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/25/2019 - 14:54 नवीन
‘कट्टा’ या विषयाच्या अनुषंगाने मी एक आवाहन करतो. संस्थळावरील लोकांच्या गाठीभेटी याव्यतिरिक्तही अन्य प्रकारचे कट्टा-उपक्रम समाजात चालू असतात. आपल्यातील काही जण अशा उपक्रमांचे सभासद असू शकतील. तर त्याची माहिती /अनुभव स्वतंत्र धागा काढून लिहीता येतील. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील असे काही अनुभव देखील असू शकतात. नमुन्यादाखल माझ्या यासंदर्भातल्या एका जुन्या लेखाचा दुवा देतो: https://misalpav.com/node/40878 जर अशा काही माहितीचे संकलन झाले तर आपण ‘कट्टा’ या शब्दाकडे व्यापक दृष्टीने बघू शकू.
  • Log in or register to post comments
ट
टीपीके Wed, 09/25/2019 - 20:46 नवीन
सुंदर संकल्पना डॉक्टर . टोस्ट मास्टर पण अशा विषयावरती चालतो ना?
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/26/2019 - 03:07 नवीन
इतर कोणते कट्टे? संस्थळावरील लोकांच्या गाठीभेटी याव्यतिरिक्तही अन्य प्रकारचे कट्टा-उपक्रम समाजात चालू असतात. आपल्यातील काही जण अशा उपक्रमांचे सभासद असू शकतील. तर त्याची माहिती /अनुभव स्वतंत्र धागा काढून लिहीता येतील. दहा वर्षे नियमित चालू असलेला एक कट्टा मुंबईत आहे. आयोजक डॉ उषा देसाई (80) आणि रिनि व्यास (70) आहेत. दर महिन्याला एका रविवारी कट्टा मुंंबईतल्या एका पार्कमध्ये सकाळी साडेसात ते साडेनऊ वेळात होतो. झाडांची ओळख हा विषय. बागेत फिरून झाडांची माहिती घेतात. साधारणपणे पन्नास ते सत्तर लोक येतात. निम्मे पंचवीशीतील असतात. (फक्त सिनिअर सिटिझन हाफ तिकिट नाहीत). कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, खर्च नाही, अवडंबर नाही. मी या कट्ट्याला अधुनमधून जातो. एक लेखही लिहिला आहे -ठाण्यातला पाचू दत्ताजी साळवी उद्यान. याचे फेसबुक पेज Tree Appreciation Walks Mumbai - facebook public group page
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 09/26/2019 - 03:47 नवीन
मुंबईत फार्मास्युटिकल केमिस्ट्स असोसिएशन वर्षातून तीन कट्टे भरवीत असे. २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट. १००/१५० च्या आसपास लोक असत. बहुतेक सारे औषध कारखान्यात काम करणारे `अन्न आणि औषधे कायद्याखाली मान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी. स्थळ असे बोरिवली राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनीतले मॉडर्न बेकरी समोरचे क्रीडांगण वा असेच कोणतेतरी. न्याहारी, जेवण आणि केव्हाही मिळणारा चहा हे सारे वर्गणीत अंतर्भूत असे. मी औषध कंपनीतली नोकरी सोडल्यानंतरही मला चिटणिसांची आमंत्रणपत्रिका आणि दिवाळीचे शुभेच्छापत्र येत असे. माणसे जरी एवढी असली तरी कुठे ८-१०, कुठे २५-३० तर कुठे ४-५ असे अनेक वेगवेगळे गट बसत. नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, औषध नियंत्रण कायद्यातले फेरफार, कामगार कायदे इ. इ. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालत. काही जण फक्त पत्ते कुटत. कोणती चर्चा कुठे चालू आहे हे पाहून आपल्या आवडीप्रमाणे वा गरजेप्रमाणे कोणीही कुठेही घुसत असे. गाण्यांच्या कॅसेटसची देवघेव देखील गाणी उतरवून घेण्यासाठी होई. नवीन संशोधनाबाबत प्रशिक्षण देखील औषध प्रशासनाच्या साहाय्याने दिले जाई. हेपेटायटीस बी, लेप्टोस्पायरॉसिस, चिकुनगुनिया इ. रोगांबद्दल प्राथमिक माहिती आणि समाजजागृती अशा अनेक चांगल्या कार्यक्रमांची माहिती इथे मिळत असे. त्यातच एका फिल्म क्लबचा देखील कट्टा होत असे आणि त्या क्लबतर्फे दर्जेदार सिनेमे दाखवले जात. आपली आवड जाणून काही चित्रपटांना आपल्याला खास आमंत्रित म्हणून आमंत्रण दिले जायचे. 'बायसिकल थीफ'सारखे काही दर्जेदार सिनेमे मी खास आमंत्रित म्हणून पाहिलेले आहेत. अगदी पाचेक वर्षापूर्वी मला माजी सचिवांनी शास्त्रीय संगीताच्या काही डीव्हीडी स्पीड पोस्टने पाठवल्या होत्या. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषणबाजी टाळून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती सांगणे आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे अशा स्वरूपात ३०-४० मिनिटात देखील सैद्धान्तिक आणि अनुभवाचे बोल अशी मोलाची माहिती मिळे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/26/2019 - 09:18 नवीन
वा ! टीपी के, कंजूस व सुधीर, उपयुक्त माहिती. टी पी, हे टोस्ट मास्टर के असते ?
  • Log in or register to post comments
ट
टीपीके गुरुवार, 09/26/2019 - 12:33 नवीन
टोस्टमास्टर Toastmasters International is a US headquartered nonprofit educational organization that operates clubs worldwide for the purpose of promoting communication and public speaking skills. विकि जरा फॉर्मल क्लब किंवा कट्टा :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 09/26/2019 - 13:08 नवीन
छान कल्पना धन्यवाद
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 09/26/2019 - 09:37 नवीन
लोथार ला इंग्लंडला भेटलो होतो. भारतात कधी आलास. फोन्नंबर कळव
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा