इंधन, खरे काय?
1994 साल, वर्ल्ड धिस वीक म्हणून एक कार्यक्रम यायचा दूरदर्शनवर. जगातील घडामोडीवर एक चांगला माहितीपर कार्यक्रम होता हा .
तर या कार्यक्रमामध्ये तेव्हा जपानने केलेल्या एका संशोधनावर बातमी आली होती. जपानने पाण्यावर चालणारी कार बनवली आहे, यात ईंधन म्हणून पाणी वापरले जाईल व प्रदूषण कमी होईल असे. आजतायगत या कारची वाट पहात आहे.
सन 1986 मधे होंडा मोटरसाइकिलने 100 सीसीची एक मोटरसाइकिल भारतात दाखल केली. काही जनांस म्हणजे काही मोड़ेलनी 100 किमी प्रति लीटर माइलेज दिला होता , कंपनीचा दावा 80 किमीचा होता. होंडा कंपनीने या अशा माइलेज देण्यार्या गाड्या तपासणी करून परत घेतल्या होत्या , त्याबदल्यात त्या ग्राहकाना नवीन गाडी व भरलेले पैसे परत केले होते. त्यानंतर 100 किमीचा माइलेज देणारी गाडी मार्केटमधे बघितली नाही. 100 चा दावा बजाजची प्लाटिना करते , पण 70च्या आसपासच जाते.
गाडीचा शोध लागून आज सव्वाशे वर्षे झाली. गाड्या आलीशान झाल्या पण कमी ईंधन पिणाऱ्या गाड्या तितकयाशा बनल्या नाहीत. मला म्हणायचे आहे की इंजिनमधे पाहिजे तेवढे संशोधन झाले नाही, पण गेल्या एकदोन वर्षात अचानक संशोधनाने जोर पकडला आणि नवनवीन शोध पुढे येऊ लागले आहेत. नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही.
जाणकार , अभ्यासू मिपाकर अजुन प्रकाश टाकतील काय?
🗣 चर्चा
(134)
ग
गतीशील
Wed, 09/18/2019 - 05:47
नवीन
भंकसजी बाबाजी, इंटरनेटवर असंख्य लेख जरी उपलब्ध असले तरी त्यात काय लिहिलं आहे हे कळणे महत्वाचे आहे. खालील मी २ इमेज टाकल्या आहेत, वाचून काय लिहिलंय हे समजतंय का बघा.
माझं ज्ञान हे इंटरनेटवर बसून आले नसून मी स्वतः एका वाहन उद्योग कंपनी मध्ये काम करतो आणि turbocharger वगैरे गोष्टी रोज बघतो, वापरतो. काही turbocharger आहेत जे ताकद आणि मायलेज असे वाढवणारे आहेत, पण ते खूपच महाग आणि सध्या गाड्या, ट्रक याना न परवडणारे आहेत. तुम्ही BMW, Mercedes असल्या कंपन्या काही संशोधन करत असलेले लेख वाचून सरसकट सगळे turbo तसेच असतात असा समज करून घेऊ नका.
बरे विषय ज्या मुद्द्यावर होता तो सोडून तुम्ही बाकी सर्व लिहिले आहे जे येथील बहुतेक लोंकानी मांडले आहे: माझा कोणता मुद्दा आहे जो विषयाला सोडून होता हे सांगितले तर बरे होईल. आपण मूळ धाग्यात लिहिलेल्या सर्व मुद्द्यांना मी स्पर्श केला आहे शिवाय अजून काही नवीन माहिती पण टाकली आहे असं मला वाटलं. जर माझी माहिती भरकटलेली असेल तर माफ करा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/18/2019 - 06:24
नवीन
माझ्या अल्पमतीप्रमाणे
टर्बो चार्जर मध्ये आत येणारी हवा निमुळत्या होत जाणाऱ्या नळकांड्यात(VENTURI) हवा पंख्याने दाबाने ढकलली जाते. यामुळे इंजिनच्या ज्वलन कक्षात इंधनाचे अधिक चांगल्या तर्हेने ज्वलन होते आणि न जळलेल्या इंधनाचे प्रमाण बरेच कमी होते. यामुळे उपलब्ध इंधनाचा संपूर्णपणे वापर होतो.
एकाच आकाराच्या इंजिनात ( उदा २ लिटर) टर्बो चार्ज असलेले इंजिन साध्या इंजिनापेक्षा जास्त कार्यक्षमतेने काम करते( जास्त सरासरी मिळेल)
परंतु हे तत्व इतके साधे नाही. कारण सुरुवातीच्या त्वरणात( ACCELRATION) दोन्हीत तितकेच इंधन जळेल. परंतु एकाच वेगाने (उदा. ताशी ४० किमी) सपाट रस्त्यावर ब्रेक न मारता गाडी चालवली तर टर्बो चार्ज्ड इंजिनात इंधन कमी जळेल.
टर्बो चार्जिंग चा जास्त फायदा हा लहान आकाराच्या इंजिनातुन जास्त शक्ती मिळवता येते हा आहे. इंधन कार्यक्षमता थोडीशी वाढते हि वस्तुस्थिती.
पूर्वी डायरेक्ट इंजेक्शन (डिझेलचे) ची इंजिने असत ज्यात डिझेल थेट ज्वलन कक्षात पाठवले जात असे ज्याने इंधन कार्यक्षमता चांगली मिळत असे पण त्या इंजिनांचा आवाज आणि थरथरणे(VIBRATIONS) खूप जास्त असते. उदा टाटा स्पेशिओ (टाटा सुमो ची धाकटी बहीण). महिंद्राच्या जीप MM ५४० इ. यामुळे
यात सुधारणा म्हणून IDI इन्डायरेक्ट इंजिने आली. ज्यात हा आवाज आणि थरथरणे(VIBRATIONS) बरंच कमी झालं.
याचा पुढचा अवतार म्हणजे CRDI ज्यात डायरेक्ट इंजेक्शन असले तरी डिझेल अतिशय सूक्ष्म अशा कणात (ATOMIZE) विभागून १६०० बार प्रेशरला इंजेक्ट केले जाते यामुळे इंजिनाचा आवाज कमी झाला तसेच त्यांची कार्यक्षमता बरीच वाढली.
उदा टाटा स्पेशिओ चे इंजिन २६०० मिली चे असूनही त्याची शक्ती फक्त ६० बी एच पी आहे MM ५४० या महिंद्राच्या जिपचे इंजिन २१०० सीसी असून त्यात ६२ बी एच पी शक्ती निर्माण होते. या दोन्ही गाड्या १६-१७ ची सरासरी (आदर्श स्थिती मध्ये) देत असत जी त्या काळात खूप चांगली समजली जात असे
याउलट स्विफ्ट किंवा इंडिका व्हिस्टा चे CRDI इंजिन फक्त १२४८ मिली चे इंजिन ७४ बी एच पी शक्ती निर्माण करते आणि एवढे असून २४-२५ किमि एक लिटर डिझेल मध्ये (आदर्श स्थिती मध्ये) जाते. हेच १२४८ सीसी इंजिन मांझा किंवा फियाट लिनिया वेगळ्या ट्युनिंगमुळे मध्ये ९० बी एच पी शक्ती निर्माण करते.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Wed, 09/18/2019 - 06:32
नवीन
मला अपेक्षित होते , ह्या क्षेत्रात तितकेसे संशोधन झाले नाही. किंवा जे झाले ते लोंकासमोर येत नाही. या सर्वाच्या पाठीमागे क़ाय आहे हे खोदने, पण चर्चा ईंधन बचत या मुद्द्यावर अडून राहिली. अगदी उदाहरण द्यायचे म्हटले तर कंप्यूटरचा शोध 50च्या दशकातला, मात्र त्याने अल्पावधित पुष्कळ मोठी मजल मारली. गाड्या तर अस्तित्वात येऊन शंभर वर्षाचा काळ लोटला. त्यासुधा आधी इंजिन अस्तित्वात होते. मी होंडा दुचाकीचे 88च्या मॉडलचे उदाहरण दिले. ज्याच्याकडे ह्या मोडलची ओरिजनल दुचाकी , जिच्या इंजिनवर होंडा अशी नोंद आहे( हिरो होंडा नव्हे) अजुन कार्यरत आहे त्याला तुम्ही विचारु शकता. आता हा योगायोग म्हणावा की कारस्थान , किहोंडा कंपनी व पाण्यावर चालणारी गाड़ी यांचे उगमस्थान जपान असावे, आणि त्या गोष्टीला उणीपुरी 30 वर्षे निघुन गेली तरी काहीच दृष्टिपथात नसणे!
तुम्हाला जरा डिवचून प्रतिसाद दिला याबद्दल माफी! पण यामुळे तुम्ही थोड़ी खोदाखोद केली हे पण सत्य!
टर्बोबाबत , याचा उद्देश्य जे ईंधन ज्वलन होत नाही त्याला परत ज्वलनासाठी ढकलून जास्त पॉवर व माइलेज मिळवने हाच होता. मला नक्की आठवत नाही पण 80च्या एका मर्सिडीज गाडीत मी ही सिस्टीम बघितली होती
- Log in or register to post comments
ग
गतीशील
Fri, 09/20/2019 - 07:35
नवीन
Turbocharger विषयी खुलासा करणे महत्वाचे आहे. बहुतेक लोकांची अशी समजूत आहे कि न जळालेले इंधन turbo द्वारे पुन्हा जाळण्यासाठी वापरता येते. ते तसे नाहीये. जेव्हा इंजिन मध्ये ज्वलन होऊन धूर (exhaust ) बाहेर ढकलला जातो तो धूर turbo च्या पात्यांना (turbines ) फिरवतो. turbo च्या एका दांडक्यावरती दोन वेगवेगळी पाती असतात. जेंव्हा एका बाजूच्या पात्याला बाहेर जाणारा धूर फिरवतो तेव्हा दुसऱ्या बाजूचे पाते आत येणाऱ्या हवेला (fresh air sucking through breather) कॉम्प्रेस करते. जेणेकरून ज्वलनासाठी जास्तीत जास्त हवा आणि त्याचबरोबर जास्ती oxygen, जो ज्वलनाला मदत करतो, असे दोन्ही मिळून आत जावे. म्हणजे turbo नसताना समजा २ युनिट हवा आत खेचली जात असेल तर turbo असताना २.५ किंवा ३ युनिट हवा आत जाते. त्याच्यामुळे आत जे ज्वलन म्हणजेच एक छोटा स्फोट होत असतो तो थोडा मोठा स्फोट होतो आणि गाडीला जास्ती ताकद मिळते.
Turbocharger हा गाडी सुरु केली कि लगेच सुरु होत नाही. काही ठराविक RPM (परिवलन वेग) नंतर चालू होतो. (उदा. १२०० ते १४०० RPM ). डॉ. खरे यांनी वर सांगितल्याप्रमाणे काही ठराविक स्पीड ला ठराविक तऱ्हेने गाडी चालवली तर अतिशय नगण्य अशी इंधन बचत होते. पण मूळ उद्देश turbo चा हाच आहे कि छोट्या इंजिन मधून मोठ्या इंजिन एवढी ताकद बाहेर काढणे.
तुम्ही जे १९८० साली Mercedes च्या गाडी मध्ये बघितलं आहे ते आता जवळपास सगळ्या डिझेल गाड्या आणि काही पेट्रोल गाड्यांमध्ये गेले ५-७ वर्षे झाली सर्रास वापरले जातात, आता त्यात नावीन्य काहीही राहिलेले नाहीये.
होंडा असे लिहिलेल्या इंजिन बद्दल तुम्ही जे सांगितले आहे त्याच्यावर माझे उत्तर असे आहि कि आता होंडा हि स्वतः एक वेगळी कंपनी आहे. जर तेव्हा होंडाला हे जमलं होत तर आता सुद्धा जमायला काहीच अडचण नसावी. मी पुन्हा एकदा सांगतो, १०० कि.मी.प्रति लिटर सरासरी हि अशक्य गोष्ट आहे.
पाण्यावर चालणाऱ्या गाड्या बनवणे अवघड काहीच नाहीये. फक्त किंमत आणि त्या गाडयांना लागणारी जागा हा खूप मोठा प्रश्न आहे. टाटा ने हायड्रोजन वर चालणारी बस बनवली सुद्धा आहे ज्याची किंमत जवळपास ३ करोड रुपये आहे. मला सांगा कोण घेईल हि बस?
प्रत्येक गोष्टी मध्ये काहीतरी मोठा आंतरराष्ट्रीय कट आहे असे conspiracy theory च्या मानसकितेमधून आता लोकांनी बाहेर पडले पाहिजे. मी आधी लिहिल्या प्रमाणे e -vehicles ला भविष्यात पर्याय नाही. आणि सुदैवाने सर्व कंपन्या त्या दृष्टीने पावले उचलत आहेत. कालचीच बातमी आहे, Mercedes benz बनवणारा Daimler ग्रुप आता डिझेल इंजिनच्या संशोधनामध्ये कोणतीसुद्धा गुंतवणूक करणार नाहीये. टाटा मोटर्स ने Ziptron हा त्यांचा e-vehicle चा प्लॅटफॉर्म कालच सादर केला. त्यामुळे आता डिझेल, पेट्रोल, पाणी, इथेनॉल याविषयी सर्वानी आवरता हात घेतलेला आहे.अल्कोहोल, व्हिस्की, रम हे सगळं फक्त बसल्यावर उपयोगी येणार आहे, गाडी चालवायला नाही.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 09/22/2019 - 19:50
नवीन
रेवा या भारतातल्या सर्वप्रथम इलेक्ट्रिक कार बनवण्यार्या कंपनीने 1995 साली आपली कार बाजारात आणली. त्यानन्तर त्यांना ना आपल्या कारमधे काही बदल करावेसे वाटले वा नवीन मॉडल आणावे असे वाटले.
महिंद्राने मला नक्की आठवत नाही पण 2003 साली बिजली या नावाने दहा आसानी इलेक्ट्रिक रिक्शा दाखवली , मी दाखवली हा शब्द वापरला कारण ही रिक्शा भारतीय रस्त्यावर फक्त प्रायोगिकरित्याच धावली. 2003 साली चर्चगेट रेल्वे स्टेशन ते विधानभवन अशी फुकट राइड या कंपनीने दिली होती. जवळजवळ महिन्याभरासाठी ही सेवा जनतेला उपलब्ध करून दिली होती. आता कुठे आहे ती बिजली?
ड्रोन तंत्रज्ञान हे अगदी अलिकडील! आता फिल्म इंडस्ट्रीत, स्पोर्ट इवेंट, इवेंट मैनेजमेंट, वन्यप्राणी चित्रीकरण, डिलीवरी या कामासाठी ड्रोन वापरले जातात. इतक्या जलदगतिने हे तंत्रज्ञान विकसित झाले कि ते वापरणे हा पोरखेळ झाले आहे. आता तर त्याला सरकारी लायसेंस मिळवून कोणीही वापरु शकते पण जेव्हा परवानगी नव्हती तेव्हा पण लोक वापरत होते.
या सगळ्या गोष्टी क़ाय सूचवतात? तरीही तुम्ही बोलत आहात की अशी कोणतीही चाल बड्या तेलउत्पादक देशानी खेळली नसेल!
गाडीमधील जे ईंधन न जळता बाहेर पडते तेच जर कोणी शंभर टक्के वापरायचे तंत्रज्ञान विकसित केले तर आज लोक यूरेकायूरेका करून वाहवाह करतील, पण इतक्या वर्षात हे विज्ञानाला जमू नये?
- Log in or register to post comments
ग
गतीशील
Mon, 09/23/2019 - 14:15
नवीन
रेवा हि कंपनी चेतन मैनी यांनी सुरु केली होती आणि नंतर तिला महिंद्राने विकत घेतली. महिंद्राने रेवा नवीन स्वरूपात सादर केली e2O या नावाने. बिजली नावाने जी रिक्षा दाखवली ती आता सुप्रो (e -Supro ) या नावाने चालू आहे.
ड्रोन तंत्रज्ञान हे खूप विकसित झाले आहे असे तुमचे म्हणणे असेल तर आपले वाचन वाढवा असाच सल्ला देईन. आज उपलब्ध असलेले सहज घेता येण्याजोगे ड्रोन हे जास्तीत जास्त २० मिनिटे काम करू शकते. जास्ती कालावधी साठी लागणारी ड्रोन हि लाखो रुपये किमतीची आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांचं मूळ प्रश्न हा आहे कि त्यांनी एका चार्जिंग मध्ये जास्तीत जास्त अंतर कसे कापता येईल. आत्ता महिंद्राची e -Verito & टाटांची e -Tigor या दोन्ही गाड्या व्यावसायिकदृष्ट्या (for commercial use only) वापरासाठी उपलब्ध आहेत. दोघांची एका चार्जिंग मधली range १२०-१३० किमी आहे. आणि चार्जिंगला लागणार वेळ ६ ते ८ तास आहे. दोन्ही गाड्यांची किंमत १२ ते १३ लाख आहे. मी तरी घेणार नाही अजून या गाड्या कारण त्या व्यावहारिक नाहीयेत. टेस्ला (Tesla) ४०० ते ५०० कमी चालू शकते एकदा चार्जिंग केल्यावर, पण तिची भारतातील किंमत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ती मला घ्यायची कितीही इच्छा असेल तरी घेऊ शकणार नाही.
तुमचा शेवटचा मुद्दा हा तुम्ही तंत्र जगतापासून खूप दूर आहेत हे दर्शवत आहे. आज पर्यंत माणसाला १००% कार्यक्षमता असलेले कोणतेही यंत्र बनवता आलेले नाहीये. आपल्या माहितीत किंवा आपण बनवले असले तर कृपया त्यावर प्रकाश टाकावा, अखिल मानवजात आपली आभारी असेल. एका इंधनावर चालणाऱ्या गाडीमध्ये साधारण ५००० ते ७००० हलणारे भाग असतात (moving parts). यात घर्षण, ज्वलन, हवेचा प्रतिरोध, दर्जा अश्या असंख्य गोष्टींवर त्या गाडीची कार्यक्षमता अवलंबून असते. आणि या सर्वाना नियंत्रित करणारा एका महत्वाचा घटक म्हणजे किंमत!! गाडी बनवताना किंमत आणि कार्यक्षमता याचा ताळमेळ साधूनच बनवावी लागते. अति कार्यक्षम गाडी बनवत बसलो तर त्याची किंमत अव्वाच्या सव्वा होऊन बसेल जिला कोणीच घेणार नाही.
इलेक्ट्रिक गाड्यांचे, विशेषतः बॅटरीवर आता खूप संशोधन होत आहे, आणि यातूनच आपल्या conspiracy theory ला उत्तर मिळेल.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 09/23/2019 - 16:39
नवीन
रेवा ही गाडी तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेली दिसत नाही , शिवाय महिन्द्राची ई वेरिटो देखील!
रेवा अंत्यत छोटी कार होती , रिक्षाच्या जवळपास जाणारी तर वेरिटो मारूतिसारखी दिसनारी!
आता येऊया टेस्ला या अमेरिकन कंपनिकडे !
एका बातमीपत्रात वाचलेले स्मरते की मर्सिडीज बेंज ही कार जर्मनित बनवताना जेवढा लेबर द्यावा लागतो त्यापेक्षा थोड्या अधिक किमतीत भारतात ती बनून तयार होते. तेव्हा भारतात मर्सिडीज टाटाबरोबर गाड़ी बनवत होती. मग टेस्ला सारखे उत्तम टेक्नोलॉजी असणारे भारतात का येत नाही ? त्यांना पण गाडी स्वस्तात बनवून मिळेल ना? उत्तर असे आहे की ते येणार! पण अमेरिकेचे व इतर देशांचे हित बघुनच. सध्या तरी पेट्रोलचा व खनिज तेलाचा खप कमी होणे यांना परवडनारे नाही , जेव्हा अमेरिकेने नवीन टेक्नोलॉजी शोधून काढली आहे तेल शोधण्याची!
गमतीची गोष्ट म्हणजे आपण इलेट्रिक कारकडे जात असताना सरकार दुसरीकडे जुन्या गाड्यासाठी स्क्रैप पॉलिसी आणत आहे, जऱ तीनचार वर्षात आपण इलेक्ट्रिक कारकडे वळणार असलो तर पुढच्या वर्षी ही पॉलिसी आणायची गरज काय? तीन वर्षात तर गाड्या इलेक्ट्रिक होणारच आहेत ना? इतकी वर्षे थांबलो मग अजुन दोनतीन वर्षे!
- Log in or register to post comments
ग
गतीशील
Tue, 09/24/2019 - 06:01
नवीन
भंकस दादा, माझी विनंती आहे कि मी काय लिहिलंय ते नीट वाचा आणि मग त्याला काहीतरी प्रतिसाद द्या . रेवा या गाडीला महिंद्राने e2O या नावाने पुन्हा आणली होती असं लिहिलं आहे मी. e -verito आणि रेवा चा काहीही संबंध नाहीये. आणि तुमच्या म्हणण्यानुसार e-verito हि मारुती सारखी म्हणजे कशी? मारुती हि एक कंपनी आहे कारचे मॉडेल नाही. e -verito हि compact sedan या प्रकारात मोडते (<४ मी) आणि रेवा हि hatchback या प्रकारात मोडते. थोडे नीट वाचायचा प्रयत्न करा आणि मग तुमचे मत मांडा
आणि तुमचा मुद्दा काय आहे ते पण एकदा नीट सांगा. कधी म्हणता १००% इंधन वापरू का शकत नाही, कधी म्हणता टेस्ला भारतात का येत नाही. एखाद्या गाडीचा कारखाना टाकायचा म्हणजे प्रचंड मोठी गुंतवणूक असते. आणि त्याची business case तेवढी मजबूत असावी लागते. भारतात अजून e -vehicle ला लागणाऱ्या चार्जिंगच्या पायाभूत सुविधा नाहीयेत. आणि ती गाडी ही अत्यंत महागड्या प्रकारात आहे, जी अजून अमेरिकन लोकांना सुद्धा महाग वाटते ती भारतात मोठ्या प्रमाणावर विकणे शक्य नाही, म्हणून टेस्ला भारतात येत नाही.
तुम्हाला माहिती नसेल,Mercedes जेवढ्या गाड्या एका वर्षात विकते, तेवढी मारुती सुझुकी हि कंपनी ३ दिवसात विकते. त्यामुळे व्यवसायासाठी लागणारे आकडे नवीन कारखाना टाकायला पुरेसे नाहीयेत.
स्क्रॅप ची जी policy येणार आहे तिचे एकमेव कारण म्हणजे पर्यावरण हे आहे. १५ वर्षांपूर्वी भारतात BS -I मानक होते, आता BS -VI येणार आहेत एप्रिल २०२० पासून. मग जुन्या गाड्या ज्या प्रचंड प्रदूषण करतील त्याच्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढेल म्हणू त्या स्क्रॅप करायच्या आहेत.
जगात सगळीकडे हे चालू आहे.
असो. एकदा डोक्यात conspiracy theory पक्की झाली कि कितीही समजावलं तरी समजून घेणार नाहीत. चंद्रावर माणसाने पाऊल ठेवलंच नाही असं मानणारे या जगात कमी नाहीयेत. त्यामुळे हा माझा या विषयावर शेवटचा प्रतिसाद.
काही मनाला लागेल असे बोललो असेल तर माफी असावी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 09/24/2019 - 06:53
नवीन
टेस्ला भारतात का येत नाही?
भारतात १ कोटी रुपयाच्या गाडीची उत्पादन १५ लाख होईल का? शक्य नाही. अगदी ओढून ताणून कमीत कमी ३५ लाख. ३५ लाख रुपयाची गाडी घेणारे लोक एका शहरात किती असतील? या सर्व लोकांना तेथे शोरूम पासून सर्व सुविधा देणे आणि सर्वात महत्त्वाचे कार चार्ज करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मूलभूत सुविधा जोवर उपलब्ध होत नाहीत तोवर कोणताही उद्योजक असा आत्मघाती प्रयोग करणार नाही.
बाकी आजमितीस बॅटरीची क्षमता हा एक फार मोठा मुद्दा इलेक्ट्रिक कार बद्दल आहे. शिशाच्या बॅटरीचे वजन अफाट असते. त्यामुळे लहानशा गाडीतील शिशाची बॅटरी ३५० किलो इतकी जड आहे. ती केवळ पुढे किंवा मागे ठेवता येत नाही तर त्याचे वजन सर्व विभागात विखरून ठेवावे लागते
त्याशिवाय लेड ऍसिड बॅटरीत सल्फ्युरिक आम्लाच्या वाफा निघतात त्यापासून माणसे बसतात ती केबिन वेगळी काढण्यासाठी अतिरिक्त कष्ट आणि साधने वापरावी लागतात.
बाकी लिथियम आयन किंवा लिथियम पॉलीमर साठी लागणाऱ्या लिथियम पैकी ५० % च्या वर लिथियम सध्या तरी चीन कडे आहे.त्या शिवाय त्यात लागणाऱ्या कोबाल्टवर सुद्धा चीनने आपली पोलादी पकड मजबूत केलेली आहे. आपण तंत्रज्ञान तयार करायचे आणि चीनने त्याची चोरी करायची या भीतीने बऱ्याच कंपन्यांनी आपले संशीधन पुढे नेले नाही किंवा गुप्त ठेवले असावे.
लिथियमचे उत्खनन /उत्पादन आता इतर देशात चालू झाल्यामुळे या बॅटरीच्या तंत्रज्ञानामध्ये संशोधनास चालना मिळाली आहे.
https://thediplomat.com/2019/02/china-rushes-to-dominate-global-supply-of-lithium/
गेल्या २ दशकात बॅटरीच्या तंत्रज्ञानात जितकी प्रगती झाली आहे तितकी अगोदर कधीही झालेली नव्हती.
अगोदर च्या बॅटरी मध्ये निकेल मेटल हायड्राईड बॅटऱ्या किंवा निकेल कॅडमियम बॅटऱ्या होत्या ( आपण ज्या छोट्या रिचार्जेबल बॅटऱ्या वापरात असू त्या) पण वजन आणि आकारमान विरुद्ध त्यात साठवली जाणारी ऊर्जा यांचे प्रमाण व्यस्त होते. याशिवाय या बॅटऱ्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक होत्या
https://en.wikipedia.org/wiki/Nickel%E2%80%93metal_hydride_battery
https://en.wikipedia.org/wiki/Nickel%E2%80%93cadmium_battery
त्या मानाने लिथीयमच्या बॅटऱ्या स्वस्त, जास्त ऊर्जा घनता असणाऱ्या आणि पर्यावरणासाठी तेवढ्या घातक नाहीत. हे बॅटरी तंत्रज्ञान जेवढे लवकर प्रगत होईल तेवढ्या इलेक्ट्रिक कार लवकर रस्त्यावर येतील.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 09/24/2019 - 06:55
नवीन
https://qz.com/1292202/china-now-effectively-controls-half-the-worlds-lithium-production/
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 01/10/2021 - 17:56
नवीन
धागा पुनर्जीवित करण्याचे कारण की हल्लीच बातमी वाचली की टेस्ला भारतात येत आहे. पण त्या बातमीवर धागा जिवंत करण्याची इच्छा झाली नाही. बातमी अशी लागली की बॅटरीसाठी लागणारे लिथियम आता भारत अर्जेंटिनाकडून आणणार आहे जे प्रथम आपण चीनवर अवलंबून होतो. अमेरिकेचे आणि लॅटिन अमेरिकेचे संबंध तितकेसे चांगले नाही. पण भारताचे आहेत ह्याचा फायदा टेस्लाने घेतला नाही तर नवल! शिवाय टेस्लाचा रोख युरोपीय मार्केटकडे असावा असा माझा अंदाज आहे.
तुम्हालाच विनंती करतो की थोडे अजून खोदकाम करून माहिती पुरवा
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Tue, 09/17/2019 - 15:56
नवीन
काल यूट्यूबवर एक व्हिडीओ पहिला, ज्यात पेट्रोल ऐवजी वैद्यकीय अल्कोहल टाकून एकाने दुचाकी दामटली.
हा ऑपशन कसा वाटतो यावर कोणी प्रकाश टाकेल कांय ?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Tue, 09/17/2019 - 16:15
नवीन
फार पूर्वी मी एक प्रयोग बघितला होता , येझदी बाइकला केरोसीनवर चालवत असलेला बाबाजी मी बघितला होता. गाडी स्टार्ट करताना पेट्रोलवर करून नंतर केरोसिन चालू करायचे. तशी पेट्रोल टैंकला जोडनी करून घेतली होती त्याने! गाडी सातआठ महीने चालली , नंतर बाबाजी ढगात गेल्यावर घरच्यानी ज्याला विकलि त्याने कंटाळून भंगारात काढली. बाकी बावा दर रविवारी खोलून बसायचा गाडी! गाडीचा एकएक स्क्रू माहित होता त्याला! आम्ही गमतीने म्हणायचो त्यात थोडे डास मारायचे ओषधि टाक , म्हणजे महापालिकेला कळवायला नको डास झालेत म्हणून! जाम धुर सोडायची त्याची गाडी
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Tue, 09/17/2019 - 16:34
नवीन
फार पूर्वी मी एक प्रयोग बघितला होता , येझदी बाइकला केरोसीनवर चालवत असलेला बाबाजी मी बघितला होता. गाडी स्टार्ट करताना पेट्रोलवर करून नंतर केरोसिन चालू करायचे. तशी पेट्रोल टैंकला जोडनी करून घेतली होती त्याने! गाडी सातआठ महीने चालली , नंतर बाबाजी ढगात गेल्यावर घरच्यानी ज्याला विकलि त्याने कंटाळून भंगारात काढली. बाकी बावा दर रविवारी खोलून बसायचा गाडी! गाडीचा एकएक स्क्रू माहित होता त्याला! आम्ही गमतीने म्हणायचो त्यात थोडे डास मारायचे ओषधि टाक , म्हणजे महापालिकेला कळवायला नको डास झालेत म्हणून! जाम धुर सोडायची त्याची गाडी
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 09/17/2019 - 16:39
नवीन
अल्कोहोल मुळे रबर व प्लॅस्टिकच्या भागांची गास्केट इ गोष्टींची वाट लागते आणि इतर इंजिनच्या भागांना गंज लवकर लागतो.
- Log in or register to post comments
र
राजे १०७
Wed, 09/18/2019 - 15:27
नवीन
माझ्या पल्सर गाडीत या अल्कोहोल युक्त पेट्रोलचे पाणी आणि पेट्रोल वेगळे होते. पाणी जड असल्याने रिझर्व्ह लागला की गाडी बंद पडते. वारंवार टाकी कोरडी करावी. पाणी टाकीत जावू नये म्हणून कितीही खबरदारी घेतली तरी हे होतंच.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 09/20/2019 - 05:37
नवीन
गाडीचा खप कसा वाढेल हे लक्षात ठेवून वाहन उत्पादक कंपन्या एंजीन वापरतात त्यामुळे संशोधनाचा उपयोग पुढे पोहोचत नाही.
- Log in or register to post comments
र
राजे १०७
Sun, 09/22/2019 - 07:39
नवीन
https://m.facebook.com/home.php#
- Log in or register to post comments
र
राजे १०७
Sun, 09/22/2019 - 07:42
नवीन
एकानं पल्सर गाडीचं इंजिन लावून पस्तीस किमी मायलेज देणारी कार बनवली तिची लिंक दिली होती पण दिसत नाही. कृपया संपादक मंडळ हा प्रतिसाद उडवा.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 09/23/2019 - 16:14
नवीन
पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे.
त्यात वाढ करणे आता शक्य होणार नाही .दुसरे इंधन शोधून त्या वर संशोधन करणे गरजेचे आहे
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 09/24/2019 - 07:11
नवीन
पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे
हे गृहीतक चूक आहे.
कारण घर्षणरहित अवस्थेत तुम्ही एखादी गोष्ट ढकलली कि अव्याहतपणे पुढे जात राहील. जसे अवकाशातील यान पुढे जातच राहते.
म्हणजेच आपण जर दुचाकी लोखंडी रुळावर आणि लोखंडी चाकांवर चालवली तर ती २००-२५० किमी सुद्धा सरासरी देऊ शकेल.
सध्या रस्ते, टायर,क्लच, ब्रेक, वंगण ( किंवा त्याची कमतरता) इ मुळे बरीच ऊर्जा घर्षणाद्वारे फुकट जाते. शिवाय जर इंजिनात जळणारे इंधन जितके जास्त कार्यक्षमतेने जाळता येईल तितकि जास्त सरासरी तुम्हाला मिळवता येईल. सध्या पेट्रोल ची इंजिने २० ते २५ % कार्यक्षमतेने काम करतात. बाकी सर्व ऊर्जा हि उष्णतेच्या स्वरूपात फुकट जाते. हे २० टक्क्याचे प्रमाण नुसते ३० % केले तरी ६०-७० सरासरी देणारी बाईक १०० च्या वर जाईल.
आपण केवळ एकाच पिस्टन इंजिनचा विचार करतो आहोत. वँकेल इंजिन हा एक असा वेगळा विचार होता. तो फार यशस्वी झाला नाही तरी आता हैड्रोजन सेल किंवा इलेक्ट्रिक कार मध्ये रेंज एक्सटेंडर म्हणून परत त्याचा विचार होतोय.
https://en.wikipedia.org/wiki/Wankel_engine
जिज्ञासूंनी वाचून पाहावे
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Tue, 09/24/2019 - 11:06
नवीन
पेट्रोल आणि डिझेल इंजिन ची 1 ltr मध्ये कार्य करण्याची जी क्षमता आहे ती आता सर्वोच्च आहे. हे मला मान्य आहे.
त्यामुळेच भारतीय लोक कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त उत्पन्न जमा करण्याचे प्रयत्न करतात. उदा. ७ आसनी गाडीत १४ जण कोंबणे, ३५०४ प्रवासी नेण्याची क्षमता असणार्या लोकल ट्रेन मधे त्याच्या दुप्पट प्रवासी वाहून नेणे, मुंबई च्या एकून क्षेत्र फळात जेव्हढी लोकसंख्येची घनता राहू शकते त्यापेक्षा कैकपटीने अधिक नागरीक राहणे ही सगळी क्षमता वाढविण्याचीच उदाहरणे आहेत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 09/24/2019 - 07:16
नवीन
एका काळी वातानुकूलन यंत्रात रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर होते ती जागा आता सर्व रोटरी कॉम्प्रेसरने घेतली आहे.
उद्या अशी स्थिती wankel इंजिन करू शकेल?
इंजिनियर लोक उत्तर देऊ शकतील
- Log in or register to post comments
ग
गतीशील
Tue, 09/24/2019 - 08:49
नवीन
डॉ. खरे साहेब, वेंकेल इंजिन, जे वेंकेल या त्याच्या शोधकर्त्याच्या नावावर आहे त्यालाच इंजिनीरिंग भाषेत रोटरी इंजिन म्हणतात . वरकरणी जरी हे इंजिन खूप मोठा चमत्कार (breakthrough) वाटत असले, तरी प्रत्यक्षात तसे नाहीये. त्याचे काही ठळक तोटे आहेत
१. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे ते इंधन खूप खाते. रेसिप्रोकेटिंग इंजिन आणि रोटरी इंजिन सारख्याच आकाराचे असतील तर रोटरी इंजिनची सरासरी रेसिप्रोकेटिंग च्या निम्मी असेल!!
२. दुसरे म्हणजे, त्याच्यात असलेल्या मूळ त्रुटींमुळे (Design flaws), खूप सारे इंधन न जळताच बाहेर पडते. सारख्या आकाराच्या रेसिप्रोकेटिंग इंजिन आणि रोटरी इंजिनमध्ये, रोटरी इंजिन हे जवळपास दुप्पट प्रदूषण करते
३. या इंजिन मधून जास्ती ताकद (torque) मिळत नाही. जर जास्ती ताकद पाहिजे असेल तर इंजिन मोठे बनवावे लागेल, ते जास्ती जागा खाणार मग ते गाडी मध्ये बसवताना त्रास होणार हे सर्व ओघानेच आले
४. वंगण (lubricating oil ) प्रचंड प्रमाणात खर्च होते (रेसिप्रोकेटिंग इंजिनच्या तुलनेत)
५. जेव्हा गाडीचा वेग हा कमी असतो तेव्हा हे इंजिन नियंत्रित करणे कठीण असते. अशक्य असते असं नाहीये, पण कठीण असते
हे इंजिन वापरणारी माझ्या माहितीत एकच गाडी आहे. Mazda RX-7 त्या गाडीच्या exhaust pipe मधून अक्षरशः आग निघत असते. (कारण अर्धवट जळालेले इंधन!!)
गाड्यांचे जे वेडे लोक आहे (ते petrolheads असे म्हणतात स्वतःला- त्यात मी सुद्धा आहे) त्यांना हे इंजिन प्रचंड आवडते. याचे कारण म्हणजे त्या इंजिन चा सुंदर आवाज.
थोडक्यात हे इंजिन व्यावहारिक नाहीये आणि प्रदूषणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 09/24/2019 - 15:02
नवीन
मी हे इंजिन हायड्रोजन वर चालवण्याच्या दृष्टीनं लिहिलंय. ज्यात प्रदूषण नगण्य आहे.
बाकी आपण लिहिलंय ते तोटे मी दिलेल्या विकीच्या दुव्यात खाली लिहिलेले आहेतच.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 09/24/2019 - 10:10
नवीन
सर्व प्रकारचे घर्षण,हवेचा विरोध,टायर आणि रस्त्या मधील घर्षण,खराब रस्ते हे गृहीत धरूनच विचार करावा लागेल .
गाडी आपल्याला रस्त्यावर चालवायची आहे प्रयोग शाळेत नाही
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 09/24/2019 - 10:10
नवीन
सर्व प्रकारचे घर्षण,हवेचा विरोध,टायर आणि रस्त्या मधील घर्षण,खराब रस्ते हे गृहीत धरूनच विचार करावा लागेल .
गाडी आपल्याला रस्त्यावर चालवायची आहे प्रयोग शाळेत नाही
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 09/24/2019 - 15:00
नवीन
बरं बुवा
आपण म्हणता तेच खरं
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Tue, 09/24/2019 - 18:31
नवीन
मी बोलतो तेच खरे आहे असे मी नाही समजत.
- Log in or register to post comments
र
राजे १०७
Wed, 09/25/2019 - 12:02
नवीन
राजेश मोठा शास्त्रज्ञ माणूस आहे हं. सल्ले मनावर घेत चला हं.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 10/03/2019 - 18:05
नवीन
स्वयंपाकाचे वापरलेले तेल वापरून ईंधन बनवायचा प्रयोग सरकार करते आहे. ह्या तेलावर गाड्या धावतील असा दावा केला गेला आहे .
वास्तविक परदेशात हा ट्रेंड फार जूना आहे. तिथे हे प्रयोग झाले आहेत पण ते व्यावसायिकदृष्ट्या नाही , हा प्रयोग जनतेला बरोबर घेऊन संपन्न होणार आहे
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Fri, 10/18/2019 - 17:09
नवीन
तुम्हाला उद्देशुन हा प्रतिसाद टाकत आहे.
पुण्याच्या सिम्बोयसिस या संस्थेमधे एका युवकाने जवळजवळ 250 किमी प्रतिलीटर धावणारी स्कूटर बनवली आहे. पण ही स्कूटर पारंपारिक इंजिन वापरून नाही तर त्याबरोबर बैटरी वापरून चालवली जाते. या शोधाच्या पेटंटसाठी पण अर्ज गेला आहे.
टाटा पुढच्या वर्षी एका चार्जमधे 300 किमी धावणारी चारचाकी गाडी बाजारात उतरवत आहे, जिची किंमत 12 ते 15 लाख आहे. ही गाडी 60 मिनिटात 80% चार्ज होईल.
सांगण्याचा मुद्दा असा की आता तेल कंपन्याचे तेल निघणार आहे. जऱ टाटाच्या गाडीच्या संलग्न गाड्या निघाल्यास उद्या ज्या लॉबिने संशोधन दड़पले होते तीच लॉबी असे संशोधन बाजारात उतरवण्यास पुढे येईल कारण 100चा एवरेज देणारी पेट्रोल गाड़ी तुलनेने 300 चा एवरेज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार पेक्षा स्वस्त असेल
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Fri, 10/18/2019 - 17:09
नवीन
तुम्हाला उद्देशुन हा प्रतिसाद टाकत आहे.
पुण्याच्या सिम्बोयसिस या संस्थेमधे एका युवकाने जवळजवळ 250 किमी प्रतिलीटर धावणारी स्कूटर बनवली आहे. पण ही स्कूटर पारंपारिक इंजिन वापरून नाही तर त्याबरोबर बैटरी वापरून चालवली जाते. या शोधाच्या पेटंटसाठी पण अर्ज गेला आहे.
टाटा पुढच्या वर्षी एका चार्जमधे 300 किमी धावणारी चारचाकी गाडी बाजारात उतरवत आहे, जिची किंमत 12 ते 15 लाख आहे. ही गाडी 60 मिनिटात 80% चार्ज होईल.
सांगण्याचा मुद्दा असा की आता तेल कंपन्याचे तेल निघणार आहे. जऱ टाटाच्या गाडीच्या संलग्न गाड्या निघाल्यास उद्या ज्या लॉबिने संशोधन दड़पले होते तीच लॉबी असे संशोधन बाजारात उतरवण्यास पुढे येईल कारण 100चा एवरेज देणारी पेट्रोल गाड़ी तुलनेने 300 चा एवरेज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार पेक्षा स्वस्त असेल
- Log in or register to post comments
ग
गोंधळी
Sun, 10/20/2019 - 11:33
नवीन
पाणि, हवा व धातु (aluminium & graphene) चा उपयोग करुन वाहन चालवण्यावर एक स्टार्टअप कंपनी संशोधन करत आहे.
ह्यामध्ये बॅटरी चार्ज करण्याची आवश्यकता नाही तर पाणि व मेटल प्लेट बदलावी लागणार आहे व बॅकप १००० किमी असणार आहे.
पण बॅटरी साइज खुप मोठी आहे. अर्थात अजुन संशोधन चालु आहे. बघु पुढे काय होत.
https://www.youtube.com/watch?v=1DZY7xXaHxI
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3