Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

इंधन, खरे काय?

भ
भंकस बाबा
Tue, 09/03/2019 - 17:28
🗣 134 प्रतिसाद
1994 साल, वर्ल्ड धिस वीक म्हणून एक कार्यक्रम यायचा दूरदर्शनवर. जगातील घडामोडीवर एक चांगला माहितीपर कार्यक्रम होता हा . तर या कार्यक्रमामध्ये तेव्हा जपानने केलेल्या एका संशोधनावर बातमी आली होती. जपानने पाण्यावर चालणारी कार बनवली आहे, यात ईंधन म्हणून पाणी वापरले जाईल व प्रदूषण कमी होईल असे. आजतायगत या कारची वाट पहात आहे. सन 1986 मधे होंडा मोटरसाइकिलने 100 सीसीची एक मोटरसाइकिल भारतात दाखल केली. काही जनांस म्हणजे काही मोड़ेलनी 100 किमी प्रति लीटर माइलेज दिला होता , कंपनीचा दावा 80 किमीचा होता. होंडा कंपनीने या अशा माइलेज देण्यार्या गाड्या तपासणी करून परत घेतल्या होत्या , त्याबदल्यात त्या ग्राहकाना नवीन गाडी व भरलेले पैसे परत केले होते. त्यानंतर 100 किमीचा माइलेज देणारी गाडी मार्केटमधे बघितली नाही. 100 चा दावा बजाजची प्लाटिना करते , पण 70च्या आसपासच जाते. गाडीचा शोध लागून आज सव्वाशे वर्षे झाली. गाड्या आलीशान झाल्या पण कमी ईंधन पिणाऱ्या गाड्या तितकयाशा बनल्या नाहीत. मला म्हणायचे आहे की इंजिनमधे पाहिजे तेवढे संशोधन झाले नाही, पण गेल्या एकदोन वर्षात अचानक संशोधनाने जोर पकडला आणि नवनवीन शोध पुढे येऊ लागले आहेत. नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही. जाणकार , अभ्यासू मिपाकर अजुन प्रकाश टाकतील काय?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 75528 views

🗣 चर्चा (134)
त
तमराज किल्विष Tue, 09/03/2019 - 17:38 नवीन
अॅव्हरेज चा दावा कंपन्या सांगताना आदर्श परिस्थिती मध्ये असा अर्थ असतो. गियर कमीत कमी बदलून, क्लच व ब्रेकचा अत्यंत कमी वापर करून दिडशे पर्यंत मायलेज मिळवणारे स्पर्धकांविषयी मागे वाचल्याचं आठवतं. ऐंशी रुपयांत साठ सत्तर किलोमीटर खूप परवडेबल आहे असे म्हणतो.
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष Tue, 09/03/2019 - 17:41 नवीन
दलिंदर लोकं अॅव्हरेजचा विचार करून अजून दलिंदर पणा करतात. बुलेट सारख्या गाड्यांचे मालक पेट्रोलच्या किंमती विषयी फालतू टेंशन घेत नाहीत. भारतीय मानसिकता म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणं.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 09/03/2019 - 18:16 नवीन
माझ्या प्रश्नाचा रोख हा ईंधन बचतीचा नसून संशोधन न होण्यावर आहे. बुलेट घेणारा माइलेज बघत नसेल, पण एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी बुलेट हा पांढरा हत्ती असतो. वापरून बघा
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष Tue, 09/03/2019 - 19:02 नवीन
इथंच इंडिया मार खाते. आपल्याकडं स्थावर जंगम मालमत्ता किती आहे, किती पोरं होऊ दिली तर सर्व गरजा भागून टेचीत जगता येईल याचा कोणताही विचार करायचा नाही.‌ लग्नाच्या वयाचे झाले की द्यायचं गळ्यात घोंगडं अडकवून. मग महागाई च्या नावाने बोंबा मारायच्या. अवांतराबद्दल क्षमस्व. मी बुलेट वापरली आहे. आता वयोमानामुळे स्कुटी चालवतो.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 09/03/2019 - 20:00 नवीन
विषय सोडून भलतिकडे भटकत आहात. मला म्हणायचे आहे की आतापर्यंत जी काही संशोधन झाली ती व्यावसायिक तत्वाने वापरली गेली नाही. मला आठवते तेव्हा बजाज चेतक फॉर्म मधे होती. त्यावेळी काही लोकल मैकेनिक त्या गाडीला होंडा 100 सीसीचा कार्बुरेटर बसवायचे व माइलेज वाढवायचे. असे संशोधन बजाजने केल्याचे आठवत नाही, उलटे काइनेटिकने जेव्हा बिना गियरची स्कूटर बाजारात आणली तेव्हा हे हमारा बजाजवर अटकुन चेतकमधे कोणतीही सुधारणा करत नव्हते. परिणाम चेतकच क़ाय तर सर्व गियरवाल्या स्कूटर कालबाह्य झाल्या. नवीन संशोधन म्हणजे चेतकचा एवरेज पस्तीसचाळीसच्या पुढे कधी गेला नाही.
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष Wed, 09/04/2019 - 02:31 नवीन
मला तरी वाटते की आय सी इंजिनाला मर्यादा आहेत. लोकांना जास्त बिएचपी असणाऱ्या, जोरात पळणाऱ्या गाड्यांचं आकर्षण जास्त आहे. गरीब लोक जे चैन करु शकत नाहीत ते प्लॅटिना सारख्या गाड्या घेतात. संशोधन नक्कीच झाले आहे. टू स्ट्रोक इंजिन जे खूप प्रदुषण करायचे ते आता बादच झाले आहेत. बजाज चेतक ला दुसरा कार्बोरेटर बसवल्यानं लोड खेचण्याची ताकद कमी पडत होती आणि इंजिनवर ताण येऊन घसारा वाढत होता. हाच प्रकार बुलेट बरोबर पण काही लोकांनी केला होता. पुर्वी राजदूत गाड्या ग्रामीण भागात बहुतेक रॉकेल टाकून चालवायचे लोकं.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 09/03/2019 - 19:43 नवीन
1853 का 54 साली भारतात पहिली रेल्वे धावली त्या गाडी साठी वाफेच्या इंजिन चा वापर केला होता . बोरीबंदर ते ठाणे हे अंतर तिने एक तास चोवीस मिनिटात पूर्ण केले .14 coach ची गाडी होती आणि तिला sion ला पाणी भरण्यासाठी थांबावे लागले होते आता तेच अंतर विद्युत इंजिन असलेल्या गाड्या 30 मिनिटात पूर्ण करत आहेत आणि इंजिन सुद्धा सुटसुटीत आहे म्हणजे खूप बदल तर झालाच आहे . इंधन हे आता आर्थिक विषय झाला आहे खूप अर्थकारण त्या वर अवलंबून आहे . त्या आसपास सहज मिळणाऱ्या घरगुती पदार्थ इंधन म्हणून वापरणे शक्य असले तरी आर्थिक स्वार्थ तसे होवून देणार नाही . इंधन ची मालकी एकाच बलाढ्य उद्योगपती किंवा सरकार कडेच राहील ह्याची पूर्ण काळजी घेतली जाईल . विजेवर चालणारी वाहन जरी आली तरी वीजनिर्मिती हे मोठे उद्योगच करतील . घरात वीज निर्मिती करण्यापासून बरेच अडधाळे निर्माण केले जातील . ह्याचे उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मिती करणे नुकसानीचा व्यवहार ठरेल असेच प्रयत्न होत आहेत. त्या मध्ये अधिक संशोधन होवून उत्पादन खर्च कमीतकमी करण्याचे प्रयत्न नगण्य आहेत
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 09/04/2019 - 12:12 नवीन
एक महत्त्वाच्या मुद्द्यावर लिहेल्याबद्दल धन्यवाद.. भारतात देखील सरकार आणि टाटा मोटर्स संयुक्तरीत्या 'हायड्रोजन' ला इंधन म्हणून वापरण्याच्या दिशेने संशोधन करत होते. मी २००७-०८च्या दरम्यान ह्याबद्दल वाचल्याचे आठवते. (त्यावर तेव्हा एका CSE Mains च्या पेपरमध्ये प्रश्न आल्याचेही धुसरपणे स्मरतंय.) त्यात एक मोठी समस्या हायड्रोजनची प्रचंड ज्वलन /विस्फोटक्षमता, व त्याचमुळे त्याच्या स्टोरेज/ वाहतूक इत्यादीमध्ये येणार्‍या अडचणी ही होती. हायड्रोजनचा वापर केल्यास धूर म्हणून केवळ वाफ/पाणी बाहेर पडेल. ह्यावर गुगलले असता, आता टाटाने एक हायड्रोजन सेल फ्युलवर चालणारी एक स्टारबस आणली आहे, असे कळले. मात्र अजूनही त्याबाबतीत फार काही झाल्याचे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 09/04/2019 - 13:38 नवीन
धन्यवाद. ब्राजील व अर्जेंटीनामधे पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, असे वाचल्याचे स्मरते. माझे मत असे आहे की सरकारच ह्या गोष्टीकडे लक्ष पुरवत नाही कारण खनिज तेलाच्या माध्यमातून सरकारला बराच वित्तीय पुरवठा होतो. शिवाय खनिज तेलावर प्रक्रिया करून त्याचे फिनिश प्रॉडक्ट सरकार निर्यातदेखील करते , या सर्वावर कोण सुखासुखी पाणी सोडेल?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/05/2019 - 04:35 नवीन
@कारण खनिज तेलाच्या माध्यमातून सरकारला बराच वित्तीय पुरवठा होतो. - ब्राब्बार बोलला बगा . Cng मंजि उसाच चिपाड! पर त्ये बी 11:50 रूपे किलो नि सुरू करून आता 56 रुपयावर निउन ठिवलय! दुष्ट दुष्ट सरकार!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/05/2019 - 08:35 नवीन
परवा मोटारीत पेट्रोल भरले तेंव्हा पंपावर त्यात १० % पर्यंत इथेनॉल आहे अशी नोटीस वाचली जालावर खोदून पहिले तर हि सुरुवात झालेली आहे असे समजते https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/ethanol-blending-in-petrol-rises-to-record-6-2/articleshow/69962324.cms https://www.mycarhelpline.com/index.php?option=com_easyblog&view=entry&id=699&Itemid=91
  • Log in or register to post comments
इ
इरामयी गुरुवार, 09/05/2019 - 07:54 नवीन
संशोधन होत आहे. काही वर्षांत वीजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि कार्स मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतील. छोटेखानी सूर्य नावाचा मोठा प्रकल्प आज सुरू आहे. तोसुद्धा काही वर्षात पूर्ण होईल. श्री. गडकरी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर काही काळात छोट्या प्रमाणावर जागोजागी जैविक इंधन निर्मितीचे प्रयत्न सुरू होतील.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 09/05/2019 - 08:16 नवीन
भला मोठा सूर्य आहे ना फुकटचा त्याचा पहिला पूर्ण शमतेने वापर करायचा सोडून छोट्या सूर्याचा विलासी हट्ट कशा साठी . उसाची मळी आहे ना जैविक इंधन त्याचा वापर करा ना मोठ्या प्रमाणात
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 09/05/2019 - 08:52 नवीन
ही बघा पाण्यावर (Hydrogen Cell) चालणारी बस आपल्या टाटा मोटर्स बनवलेली https://www.financialexpress.com/auto/car-news/tata-motors-indianoil-corporation-flag-off-countrys-first-hydrogen-fuel-cell-powered-bus/1096895/
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/05/2019 - 15:24 नवीन
मी लेखाच्या सुरूवातीलाच म्हटले आहे की 1994 मधे ही टेक्नोलॉजी जपानने वापरली होती, पण तिला प्रत्यक्षात यायला इतका वेळ? ती सुद्धा आली नाही अजुन!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 09/05/2019 - 15:58 नवीन
चांगला धागा आहे .. सकारत्मक चर्चा झाली तर बरेच काळेबेरे बाहेर येऊ शकते .. मला वाटत , मिपासारख्या प्रगल्भ मंचावर मान्यवरांची आणि हुशार अभ्यासू लोकांची वानवा तर मुळीच नाही आहे .. माझे वैयक्तिक मत किंवा अनुभव म्हणा हवं तर मी इथे या धाग्यात नोंदवू इच्छितो .. साधारण तीनेक वर्षांपूर्वी माझ्या मावशीच्या मिस्टरांनी मला भेटायला बोलावले होते .. बरेच मागे लागल्यावर मी वेळ काढून तिथे गेलो .. त्यांच्यासोबत एक महाशय तिथे आधीच स्थानापन्न होते . त्यांनी मला एका स्कीमबद्दल सांगण्यास सुरुवात केली .. मला या मल्टीलेव्हल मार्केटिंगचा आधीच कंटाळा आहे त्यामुळे मी थोडेफार दुर्लक्ष करूनच ऐकत होतो .. मग त्यांनी मला माझ्याकडे असलेल्या गाड्यांची माहिती विचारली .. माझ्याकडे एक जुनी होंडा सिटी ( टाईप २ मॉडेल ) आणि वॅगन आर होती असे मी त्यांना सांगितले .. ते म्हणाले तुम्ही मला जर कुठलीही एक गाडी माझ्याकडे असलेले इलेक्ट्रोड लावायला दिलीत आणि तर ती तुम्ही पंधरा दिवसांनी मला त्या गाडीच्या मायलेजमधला फरक सांगा .. तुम्ही स्वतःच हा सेट बोलाल त्या किमतीत विकत घ्याल .. मी कुतूहलापोटी मग सविस्तर वाचायला घेतले .. नीट वाचल्यावर कळले कि ती व्यक्ती जे काही बोलत आहे त्यात खोत तर बिलकुल नाही आहे .. साधं लॉजिक वापरलेले होते .. जे पण इंधन गाडीच्या इंजिनात उतरेल त्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देणे जेणेकरून त्याचे कमीतकमी १०० % वापर होईल .. फक्त एक गोष्ट होती ती म्हणजे तो इलेकट्रोडचा सेट लावायला जरा जागा लागणार होती आणि तीही बोनेटमध्येच कुठेतरी .. त्यामुळे ते माझ्या होंडामध्ये जास्त इंटरेस्टेड होते .. मी त्यांना मग त्यांनी कुठे हा सेट लावला आहे का त्याबद्दल विचारणा केली .. त्यांनी तात्काळ मला त्यांच्या स्वतःच्या टाटा सफारीमध्ये लावला आहे म्हणून सांगितले .. मग मी त्यांना पूर्वीचा आणि आताचा मायलेज विचारला , त्यांनी सांगितले पूर्वी ती ११ ते १२ द्यायची आता चक्क ४५ ते ५० देते .. मी चाट पडलो .. मी हिच्याशी सल्लामसलत केली पण हीच स्पष्ट नकार होता आणि तिला थोडी धास्तीही होती त्यामुळे ते प्रकरण बारगळले .. पण सांगायचं मुद्दा हा कि इंजिनातले इंधन जर जास्तीत जास्त वापरले गेले तेही कमी कार्बन उत्सर्जन करून तर मायलेज नक्कीच वाढू शकतो ..
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/05/2019 - 16:19 नवीन
पुष्कळ धन्यवाद अशाच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित होता. अजूनही सुहास म्हात्रे सर व खरे सराचे प्रतिसाद आले नाहीत, ते जेव्हा येतील तेव्हा चर्चा खरी रंगेल. टाटा मोटर्सने फक्त हवेवर चालणारी गाडीचा देखील शोध लावला होता. ही गाडी हवा ईंधन म्हणून नाही तर पिस्टनला धक्का मारून चालवण्यासाठी वापरली जाईल. हवा प्रेशरने पिस्टनवर जाईल व जे काम स्पार्कप्लगवर पेट्रोल जाऊन करते तीच सिस्टम वापरली जाईल, पण इथे हे प्रेशरने होईल ना कि इंधनाच्या ज्वलनाने! नेमके कुठेतरी पाणी मुरत आहे, त्यामुळे ही संशोधने बाहेर येत नाहीत.
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष गुरुवार, 09/05/2019 - 18:02 नवीन
मला तरी ही रमर पिल्ले टाइप गोष्ट वाटते. दोन पाच किलोमीटर जरी मायलेज वाढत असतं तर कंपन्यांनी पाहिजे तेवढे पैसे देऊन तंत्रज्ञान विकत घेतले असते. फेकाफेक वाटतं. ऑक्सिजन जास्त मिळावा म्हणून टर्बो जोडतात आता.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/05/2019 - 18:37 नवीन
टर्बो हा प्रकार काय आहे ते आधी जाणून घ्या, जे ईंधन जळत नाही ते सायलेंसरमार्फत बाहेर टाकले जाते, तेच पुन्हा इंजिनकडे वळवून इंधनाची बचत करतात. जट्रोफा, मोगली एरंड या झाडापासुन बायोडिझेल तयार करतात. त्यामुळे रामन पिल्ले तोतया संशोधक असेल पण त्याची थियरी खोटी असू शकत नाही
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/05/2019 - 18:48 नवीन
टाटाच्या नावाने सर्च मारा गुगलवर, त्यांच्या हवेवर चालणाऱ्या गाडीविषयी माहिती मिळेल. थोडा अभ्यास करून प्रतिसाद टाका, नाही टाकले प्रतिसाद तर कोणी काही बोलणार नाही तुम्हाला.
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष गुरुवार, 09/05/2019 - 19:24 नवीन
माझा प्रतिसाद त्या इलेक्ट्रोड ला होता. त्या माणसांचा नाव पत्ता द्या म्हणावं.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे गुरुवार, 09/05/2019 - 20:00 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे इंजिनच्या इनटेक पाईपमधील हवा atmospheric प्रेशरला आणण्यासाठी अधिकचा कॉम्प्रेसर वापरतात. हा पाईप इंजिन कम्पार्टमेंटमध्ये वाकडातीकडा बसवला असल्याने हवेचे प्रेशर कमी होते त्यामुळे सिलिंडर मध्ये इंधन पूर्ण एफीसीएनसिने जळत नाही. हा अधिकचा कॉम्प्रेसर बाहेर पडणाऱ्या एक्झॉस्ट ग्यासच्या प्रेशरने चालवतात.
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष गुरुवार, 09/05/2019 - 20:23 नवीन
Barobar
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 09/07/2019 - 14:27 नवीन
तुम्हाला जो प्रकार दाखवला गेला त्याला एचएचओ किट असे म्हणतात. त्यात पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करुन हायड्रोजन आणी ऑक्सिजन वेगळे केले जाते. ते इंजिनात वापरून इंजिनचे मायलेज वाढते असा या लोकांचा दावा असतो. ३०० रुपड्याच्या स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या एका प्लास्टिक बॉक्समध्ये पॅक करुन १२००० हजारला हे मलम वाले विकतात. तेव्हा सावधान. एचएचओ किट स्वतः वापरले नसल्याने त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती देणे मला शक्य नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 09/12/2019 - 06:08 नवीन
जे पण इंधन गाडीच्या इंजिनात उतरेल त्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देणे जेणेकरून त्याचे कमीतकमी १०० % वापर होईल
एरवीही सगळंच इंधन जळतं ना? अगदी १०० % ? कि काहि इंधन धुरांड्यातुन बाहेर पडतं ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/23/2019 - 17:45 नवीन
इंटर्नल कंबश्शन इंजिनाची इंधन वापराची कार्यक्षमता (thermal efficiency): पेट्रोल इंजिन : सर्वसाधारणपणे २० ते जास्तीत जास्त ३८% डिझेल इंजिन : जवळ जवळ ४०% इंधनाची बाकीची टक्केवारी मुख्यतः, न जळलेले इंधन व उष्णतेत फुकट गेलेली उर्जा, यांच्या स्वरूपात वाया जाते. https://www.greencarreports.com/news/1091436_toyota-gasoline-engine-achieves-thermal-efficiency-of-38-percent इंटर्नल कंबश्शन इंजिन, हे मानवाने शोधलेल्या अतीव अकार्यक्षम प्रणाल्यांपैकी एक आहे. खनिज तेल अत्यंत स्वस्त असण्याच्या काळात त्याचा विकास झाला व मानवी/पशूशक्तीपेक्षा खूप जास्त कार्यक्षम असल्याने त्याचा इतका जम बसला की नंतर त्याला पर्याय शोधणे व त्या पर्यायाला व्यावहारीकरित्या यशस्वी (मेनस्ट्रिम) करणे अशक्य झाले. जे काही पर्याय होऊ शकले असते त्यांना तेलाशी हितसंबंध असलेल्या कंपन्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरून 'अयशस्वी' केले/ठरवले गेले. सद्या, (अ) तेलाच्या सतत वर असलेली किंमती आणि (आ) जागतिक स्तरावर पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वाढलेला दबाव, या दोन गोष्टींमुळे खनिज तेलाचा उपयोग करणार्‍या इंटर्नल कंबशन इंजिनाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न जोमाने चालू झाले आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाले तरी ते व्यवहारात आणून, अनेक दशके खोलवर पाय रोवून बसलेली व अनेक ट्रिलियन डॉलर्सचे असेट्स असलेली, तेलावर आधारलेल्या वाहन व अर्थव्यवस्थेला टक्कर देण्यासाठी सबळ, स्वस्त, सहज उपलब्ध असलेला पर्याय होण्यासाठी, नवीन पर्यायांना एक-दोन दशके तरी जातील.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 09/23/2019 - 18:26 नवीन
तुमच्याकडूंन अजुन थोडे खोदकाम झाले तर हा धागा काढण्याचा उद्देश्य सफल होईल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/23/2019 - 18:34 नवीन
या विषयाला जागतिक अर्थकारण, राजकारण व इतिहासाचे इतके पदर आहेत की त्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांचा गोषवारा सांगायचा तरी लेखमाला होईल. सद्या व्यस्त असल्याने इतका वेळ व श्रम शक्य नाहीत, त्यामुळे क्षमस्व.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/23/2019 - 18:43 नवीन
वीजेवर चालणार्‍या गाड्यांचा आणि प्रदुषण यांचा विचार करताना एक गोष्ट नेहमी विसरली जाते... ती म्हणजे गाडी चालवण्यासाठी वापरण्याची वीज तयार करताना निर्माण होणारे प्रदुषण. कारण, सद्या उपलब्ध असलेले अपारंपारिक उर्जास्त्रोत (तेलावर किवा कोळशावर अवलंबून नसलेले वीजनिर्मिती प्रकल्प) एकतर महागडे आहेत आणि/किंवा (तेलाला पर्यायी होतील इतक्या) पुरेशा प्रमाणात वीजनिर्मिती करत नाहीत. हे महत्वाचे मुद्दे विसरून व्यावहारिक पर्याय निर्माण करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 10/02/2019 - 05:03 नवीन
दिव्याखाली इतका अंधार आहे होय :(
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 09/05/2019 - 16:21 नवीन
त्या इलेक्ट्रोड्सची किंमत काय सांगितली होती?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 09/05/2019 - 16:38 नवीन
१२००० फक्त
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Fri, 09/06/2019 - 00:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 09/06/2019 - 10:53 नवीन
आर ओ आय म्हणण्यापेक्षा आपण याला मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणू .. मी स्वतः ते उत्पादन विकत घ्यायचं आणि दुसरं गिर्हाईक आणलं कि त्या गिर्हाईकाच्या पैश्यातले २००० रुपये मला मिळणार .. जेव्हढी गिर्हाईक आणाल तेव्हढा नफा मिळत जाईल ..
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष गुरुवार, 09/05/2019 - 19:18 नवीन
https://www.facebook.com/1640332436233275/posts/2372100536389791/
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 09/05/2019 - 21:01 नवीन
आपण फक्त तर्क मांडू शकतो तांत्रिक बाजू मला तरी माहीत नाहीत. इंजिन साठी इंधन आणि हवा ह्यांचे ठराविक प्रमाणात मिश्रण आवशक्य असते त्याचा बंदिस्त जागेत नियंत्रित स्फोट केला जातो आणि इंजिन चालू होते . ह्या मध्ये हवेचा रोल हा ऑक्सीजन पुरवणे हाच असावा कारण ज्वलन ला ऑक्सीजण ची गरज असतेच.होणारा स्फोट हा इंधनाचाच होतो ..स्फोट ची तीव्रता जेवढी जास्त तेवढी इंजिन ची ताकत जास्त . म्हणजे जिथे चढ आहे किंवा गाडीला वेग द्यायचा आहे हवेचा विरोध झुगारून तिथे इंधन जास्त लागणार . ते वाचवण्यासाठी त्याची मात्रा कमी केली तर इंजिन ची ताकत सुधा कमी होणार .. एकतर इंधन वाचू शकत किंवा इंजिनची ताकत कमी करू शकतो आपण दोन्ही एकावेळेस साध्य होणार नाही .
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष Fri, 09/06/2019 - 11:06 नवीन
स्विफ्ट या गाडीचं डिझेल इंजिन फारच उत्कृष्ट आहे. आवाज,कंपन एकदम स्मूथ पेट्रोल इंजिन प्रमाणे आहे. आता या इंजिनाची सर्व बाबतीत सारखी पण अर्ध्या आकाराची इंजिनं बनवली तर नॅनो, अल्टो, रिक्षा सारखी वाहनं आरामात चालतील व इंधन बचत होऊन प्रदुषण देखील कमी होईल.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 09/06/2019 - 11:49 नवीन
प्रतिसाद इंग्रजीतून देत आहे कारण अनेक शास्त्रीय व्याख्या मराठीतून लिहिणे अवघड आहे there are many Pneumatic tools running on Compressed air. But this compressed air is not prime mover. It is used as means of energy transmission. In other words, compressed air needs to be generated first using some prime mover (again a IC engine) also to travel say 100 KM, how much compressed air will be needed? where to store that? . So this is commercially nonviable Please read the article on following link which will tell more about compressed air vehicles. https://www.livemint.com/Industry/DqLFO06I5l39RDqhiWBzSN/Tata-Motors-working-on-airrun-cars.html
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 09/06/2019 - 13:23 नवीन
तुमचे मत वाचले. ज्या गाड्या कॉम्प्रेस एयरवर चालणार त्यांना नक्कीच हवा स्टोर करावी लागणार, पण ही हवा त्यांना अतिशय स्वस्तात कुठेही म्हणजे, पंक्चर काढण्यार्याकडे उपलब्ध होईल. किंवा आजकाल हवा भरण्यासाठी छोटे इलेक्ट्रिक पंप मिळतात ते पण उपयोगात येऊ शकतात. इथे गोम अशी आहे की अशा गाड्या याव्यात अशी इच्छाच कोणी व्यक्त करीत नाही आहे. नितिन गडकरी इलेक्ट्रिक गाड्याची वार्ता करतात. पूर्ति नावाची त्यांची एक कंपनी अशा रिक्शा बनवते.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 09/06/2019 - 15:55 नवीन
पूर्ती इलेक्ट्रिक रिक्षा बनवते असे मला तरी माहित नाही .. कृपया लिंक द्यावी .. बाकी इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल बोलायाचे तर तेच भविष्य आहे. शासनाची इलेक्ट्रिक वेहिकल पॉलिसी खरंच उत्तम आहे. मागील वर्षी भारतात फक्त ८००० इलेक्टिक कार्स विकल्या गेल्या आणि त्या सर्व महिंद्रा ने बनवल्या होत्या बाकी युरोप मध्ये इलेक्टिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम धोरण आहे जसे : टॅक्सेस कमी आहेत , वेगळे पार्किंग स्लॉट्स चार्जेर सह , बस च्या लेन मधून जाण्याची परवानगी वगैरे तेंव्हा इलेक्टिक वेहिकल आणि पूर्ती चा संबंध जोडू नका ही विनंती
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 09/06/2019 - 16:17 नवीन
पूर्तिच्या नावाने चांगभल! गुगलवर सर्च मारले तर ही कंपनी बायोफ्यूएलच्या धन्द्यात आहे. कोलपासून ईंधन बनवण्यावर संशोधन चालू आहे. बघा लिंक लागते आहे का? गड़करिनि काही महिन्यापूर्वी केलेली भाषणे आठवा. त्यांनी असे म्हटले होते की देशभरात मिथेनॉलला पाठिंबा देऊन त्यावर आधारित गाड्या आल्या पाहिजेत. मिथेनॉल हे कोळशापासून तयार होणारे ईंधन आहे, व ते पेट्रोलमध्ये 15 टक्के टाकायचे घाटत आहे. पूर्ति या कंपनीचा पहिला उल्लेख मी जेव्हा दिल्लीमधे एका ईरिक्शावाल्याने एका अपघातात एका लहान मुलाला तेलाच्या कढ़ईत उडवले होते तेव्हा वाचला होता, तेव्हा या कंपनीचे नाव घेतले गेले होते, पण क्षमस्व मला आता तरी आन्तरजालावर काही माहिती मिळत नाही आहे. यापुढे नक्की माहिती उपलब्ध असली तरच पोस्ट टाकीन
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Fri, 09/06/2019 - 16:23 नवीन
एकदा नक्की ठरवा ... इलेक्ट्रिक वेहिकल का बायो फ्युएल .... बाकी माझी कमेंट इलेक्ट्रिक कार्स बद्दल होती ... बायो फ्युएल बद्दल सविस्तर लिहितो वेळ मिळाला कि
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 09/06/2019 - 16:45 नवीन
ज्या अनुषंगाने धागा काढला आहे त्यात हि सर्व संशोधन कोणाला तरी नुकसान होते वा फायदा होतो हे उलगडून काढण्यासाठी आहे. इलेक्ट्रिक वेहिकल हा विषय नाही तर ईंधन हा आहे. संशोधन का पुढे येत नाही हा मूळ विषय आहे. कृपया अजुन काही माहिती जी तुम्हाला माहित आहे अशी येउद्या. जसे काही वर्षापूर्वी एक रसायन बाजारात आले होते. ते पेट्रोलमध्ये टाकल्यावर एवरेज वाढतो अशी अफवा होती. मी पण वापरून बघितले, काहीही फरक पडला नाही. पण भारतीयाची मानसिकता एवरेज कितना देती है ही असते. असो. त्या रसायनाऐवजी तितक्या किमतीचे पेट्रोल टाकले असते तर जास्त फायदा झाला असता.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 09/07/2019 - 14:38 नवीन
आसाम मध्ये एकाने कॉम्प्रेस्ड एयरवर चालणारी जीप बनवली होती. पण त्याची लिंक सापडत नाहीये.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 09/06/2019 - 11:54 नवीन
आज मी जाट्रोपाबद्दलच लिहिणार होतो पण तुमचा प्रतिसाद वाचला आणि हायसे वाटले .. मला वाटत आता कुठे या महत्वपूर्ण धाग्याला धार चढायला लागलीय .. हा विषय इथेच सोडू नये .. कारण ह्या पेट्रोल कंपन्या आपला स्वार्थ शेवटपर्यंत सोडणार नाहीत .. सर्वप्रथम रामा पिल्ले बद्दल बोलूया .. तो माणूस नक्कीच वेडा नव्हता .. पण दुर्दैवाने आज त्याला खरोखरच वेडा करून टाकलं आहे .. माझा दुसरा अनुभव मी इथे पुन्हा टंकत आहे .. मागे जवळजवळ दहाएक वर्षांपूर्वी एम एस सी आणि पी एच डी साठी रुईया महाविद्यालयात प्रवेश केला .. तेथे बरेच प्रकल्प राबवले जायचे .. नाविन्यपूर्ण आणि आव्हानात्मक .. आजही राबवले जातात .. मी नोकरी सोडून तिथे प्रवेश घेतलेला त्यामुळे सर्वजण माझ्यापासून चार हात लांबच राहायचे .. कोण कुणास ठाऊक सर्वजण मला जणू वाळीत टाकल्याप्रमाणे ठेवलं होते .. त्यामुळे माझ्याकडे फारसं काही काम नसायचं . अश्यातच एक संधी चालून आली आणि ती आयतीच मला मिळाली .. सौराष्ट्र विद्यापीठातून कुणीतरी बडी हस्ती आपल्या रुईयात येणार आहे असे मला सरानी सांगितले .. ती हस्ती म्हणजे दुसरी कुणी नसून डॉक्टर नागर होते . त्यांनी सौराष्ठ्र विद्यापीठात जेट्रोपा या वनस्पतीवर काम केलेलं होत .. रुईया महाविद्यालयाने या प्रकल्पासाठी त्यावेळेस परशुराम घाटात डोंगराळ जागा घेतली होती .. फक्त या वनस्पतीच्या लागवडीसाठी .. मला नागर यांच्यासोबत बर्याच विषयांवर चर्चा करायला मिळाल्या .. मी , माझा मित्र अभिजित आणि नागर आम्ही सर्व जण त्या घाटात गेलो .. साधारण सकाळी १०.३० च्या सुमारास पोहोचलो .. डॉ नागर एकदम बिनधास्त माणूस .. आम्हाला जमिनीचा सामू घेण्यासाठी पंधरा फूट अंतर सोडून चारी दिशेला कमीत कमी ८ असे खड्डे मारायला सांगितले आणि माती गोळा करायला सांगितली .. हे साहेब ११ च्या सुमारास जे त्या निर्बीड जंगलात गायब झाले ते थेट संध्याकाळी मावळायच्या आधी उगवले .. आम्हाला वाटलं कि त्यांना कुणी खाल्लं कि काय .. असो .. तर त्या माणसाने जेट्रोपाबद्दल बरीच माहिती दिली .. स्वतः सरकार जेट्रोपा बिया खरेदी करते . जेट्रोपा वनस्पतीची लागवड कुठेही करता येते .. तिच्या बिया येण्यास साधारण दीडेक वर्ष लागते पण एकदा का बिया धरायला सुरुवात झाली कि मग उत्पन्न सुरु होते .. पूर्वी मशाली पेटवायला जास्त करून याच बियांचा वापर व्हायचा .. तर एकूण असे प्रकरण आहे सर्व .. हे सर्व मोठे गौडबंगाल आहे , असे वाटतंय .. मला वाटत सकस चर्चा झाली आणि तीही अनुभवांची जोड देऊन तर एक साचेबध्ध अनुभवसंपन्न मत तयार होऊ शकते ..
  • Log in or register to post comments
त
तमराज किल्विष Fri, 09/06/2019 - 12:34 नवीन
रमर पिल्लेने थियरी पण चोरलेली असेल. बेमालूम पणे तो लोकांना उल्लू बनवत होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घरगुती प्रमाणात जैविक डिझेल बनवण्याचे यंत्र बनवलं आहे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 09/06/2019 - 13:36 नवीन
होय , अशाच चर्चेने काही माहिती मिळाली तर उत्तमच आहे. जट्रोफा लागवडीसाठी सरकार काही अनुदान पण देते. पण हे पिक कमी पावसाच्या प्रदेशातील आहे. मला स्मरते की राजस्थानमध्ये याची व्यावसायिक लागवड झाली आहे. मधे एकदा या जट्रोफापासुन तयार झालेले डीझेल वापरुन रेल्वेचे इंजिन चालवले होते हे वाचल्याचे आठवते. दिल्लीच्या आसपास इंडियन ऑयल कंपनीने हे केले होते. मध्यंतरी स्पाइसजेट या विमान कंपनीने बायोफ्यूलवर विमान उडवल्याचे वाचले होते, पण या गोष्टीला म्हणावी तशी प्रसिद्धि मिळाली नव्हती. फक्त बायोफ्यूएल असे मोघम उल्लेख होता पण ते कशापासुन बनले आहे वा त्याचे प्रमाण काय याचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 09/06/2019 - 15:47 नवीन
तेलावर जागतिक राजकारण आणि युद्धे चालतात... तेल कंपन्यांचा बाजार उठेल असे संशोधन इतक्या वर्षात पुढे येउ न देण्यास तेल कंपन्यांनीच हातभार लावला असावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माझा बाप्पा नाचु लागला... :- (Sanket wadekar)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 09/07/2019 - 14:53 नवीन
हेच खरे आहे. जर का गाड्या पेट्रोल डिझेलएवजी शाश्वत इंधनावर धावू लागल्या तर यांचे दिवाळेच निघतील.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 09/06/2019 - 17:33 नवीन
काही संशोधन होत नाही हे अनुमान का काढले? तर प्रोटोटाईप मॉडेल दाखवले जाते पण ते व्यापारी उत्पादनात दोन पाच वर्षांत येत नाही म्हणून. १) हिस्ट्री चानेलवरच्या शिपमेंट वॉरमध्ये ट्रकवाले स्पेंट ओईल वापरताना दाखवतात. २) लिपु अँड पिटबुलमध्ये कारची एचपी वाढवण्यासाठी टर्बो लावताना दाखवतात. मग हखच टर्बो कार बनवणारे कगोदरच का लखवत नाहीत? आता यामध्ये काही तांत्रिक/आर्थिक अडचणी असणार. त्या ओळखून कार बनवणारा वापरत नसणार.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा