Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य ?

क
कंजूस
Fri, 06/28/2019 - 10:26
🗣 77 प्रतिसाद
रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य? किती कार्यक्षम? एखाद्या ठिकाणचे पर्जन्यमान/ पाऊस मिलिमिटर्स अथवा सेंटिमिटर्स यांमध्ये मोजतात. रोजचा पाऊस किती झाला हे मिलिमिटर्समध्ये सांगणे सोयीचे असले तरी एखाद्या भागातला वर्षभरांत एकूण पाऊस किती हे सेंटिमिटर्स मापात सांगितल्यास तुलना करणे सोपे जाते. उदाहरणार्थ - ठिकाण - पाऊस - माप जैसलमेर - २० सेंटिमिटर्स पुणे - ४० सेंटिमिटर्स बंगळुरू - ८० सेंटिमिटर्स चेन्नई - १०० सेंटिमिटर्स कोलकाता - १५० सेंटिमिटर्स तिरुवनंथपुरम १६० सेंटिमिटर्स मुंबई - २०० सेंटिमिटर्स गोवा - २०० सेंटिमिटर्स कोची - ३५० सेंटिमिटर्स ((महाबळेश्वर - ८०० सेंटिमिटर्स मेघालय - १२०० सेंटिमिटर्स)) एक सेंमि पाऊस म्हणजे १२.५ मिलिलिटरस पाणी १२.५ चौ सेंमि (square cms area) क्षेत्रफळावर जमा होते. एका प्लॉटवर एक छोटे घर एक फुट बाइ एक फुट जागेवर साधारण नउशेतीस मिलिलिटर्स पाणी गोळा होईल. घरची गच्ची ५०० चौ फुट असेल तर एक सेंमि पावसाने ४५० लिटर्स पाणी मिळेल. वर्षभराच्या ४० सेंमि पाऊस होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी गोळा केल्यास १८००० लिटर्स पाणी मिळेल. वापर एका कुटुंबात चार जण धरून रोजचा पाण्याचा खप ५०० लिटर्स धरुया. हे १८००० लिटर्स पाणी त्या कुटुंबास ३६ दिवस पुरेल. म्हणजे वर्षभराच्या वापराच्या दहा टक्के पाणी रेन हार्वेस्टिंगने मिळाले. हे एक मध्यम पावसाच्या ठिकाणाचे उदाहरण झाले. जिथे यापेक्षाही कमी पाऊस पडतो तिथेच खरी गरज आहे. पण तेवढा पाऊस पडत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे रोजचा वापर २५० लिटर्सही केला जाईल तर तर दोन महिने पुरेल. साठवण ८ फुट बाइ ८ फुट लांब रुंद आणि ६ फुट खोल टाकी बांधल्यास त्यात ९ ते १० हजार लिटर्स पाणी साठवता येईल. अशा दोन टाक्या लागतील. प्लॉट जमिनीचा आकार ७५ फुट बाइ ६० फुट प्लॉटमध्ये १०/१०/१०/१५ फुट जागा सोडून २५ बाइ २०फुटी घर (५०० चौ फुट) ही एक आदर्श स्थिती झाली. त्यात कडेला या दोन टाक्या व एक संडासची टाकी बांधावी लागेल. मोठ्या इमारती , हौझिंग सोसायटीतील गरज तळ मजला अधिक त्यावर तीन मजले आहेत असे धरल्यास गच्चीवरच्या प्रत्येक पाचशे चौ फुट भागातील गोळा झालेले पाणी खालच्या चार रहिवाशांत वाटायचे आहे. वरच्या उदाहरणातील पाणी अर्थातच एका ब्लॉकला आठ दिवस पुरेल. अधिक मजले असतील तर आणखी वाटप कमी होईल. बाकी त्या टाक्या बांधणार कुठे हा एक प्रश्नच ठरतो. टाक्या बांधण्याचा खर्चही आहेच. केवळ टाक्या बांधणे, पाऊसपाणी साठवणे बंधनकारक केले म्हणून नागरीक ते करतीलच. गावागावांत जी पाणी अडवा जिरवा/ साठवा मोहिम अमलात आणत आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सर्वच उघड्या जमिनीवरचे पावसाचे पाणी गोळा करून साठवतात. तसे सोसायटीच्या/इमारतीच्या आवारातील गोळा केले जाईल असे नाही वाटत. तुमचे अंदाज आणि सूचना मांडा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45472 views

🗣 चर्चा (77)
R
Rajesh188 Fri, 06/28/2019 - 11:23 नवीन
सर्वांनी पाणी रेन हार्वेस्टिंग करून पाणी वाचवलं तर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या सुटेल . फक्त एक महिन्याला एका कुटुंबाला पाणीपुरवठ्ासाठी किती पाणी लागत ह्याची तुम्हाला जाणीव आहे . मग ११ महिने करोडो कुटुंबाला पाणी आणि शेती आणि फॅक्टरी ल पाणी लागत ते कसं आणि कुठून पुरवायचे
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 06/28/2019 - 12:39 नवीन
मुंबईसारख्या शहरात आहे. जिथे गाड्या धुवायला, गार्डनमधे पाणी मारायला, सोसायटया धुवायला अफाट पाणी वापरले जाते जे शुद्ध असते. ह्या पाण्यावर अनेक प्रक्रिया करून पिण्यायोग्य बनवलेले असते, शिवाय शहरे आपले पाणी फार लांबवरुन आणतात. ह्यामुळे होईल काय तर पाणीपुरवठा विभागावर ताण पडणार नाही व पाण्याची बचत होईल.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 06/28/2019 - 12:40 नवीन
मुंबईसारख्या शहरात आहे. जिथे गाड्या धुवायला, गार्डनमधे पाणी मारायला, सोसायटया धुवायला अफाट पाणी वापरले जाते जे शुद्ध असते. ह्या पाण्यावर अनेक प्रक्रिया करून पिण्यायोग्य बनवलेले असते, शिवाय शहरे आपले पाणी फार लांबवरुन आणतात. ह्यामुळे होईल काय तर पाणीपुरवठा विभागावर ताण पडणार नाही व पाण्याची बचत होईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/28/2019 - 13:12 नवीन
गाड्या धुवायला, गार्डनमधे पाणी मारायला, सोसायटया धुवायला अफाट पाणी वापरले जाते
यासाठी हे पाणी वापरले पाहिजे. ते किती लागते याचा काही अंदाज?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Fri, 06/28/2019 - 18:58 नवीन
गाड्या धुवायला उच्चभ्रू सोसायटीमधे स्पेशल मानसे ठेवलेली असतात. शिवाय आजकाल मोठ्या शहरात कार स्पाचे वेड फोफावत आहे. आजकाल हिरवळ लावणे हे एक फैड झाले आहे. मुंबईसारख्या शहरात एकवेळ झाडाना विहिरीचे पाणी वापरतील पण हिरवळीवर स्वच्छ पाणीच लागते. सोसायटया धुवायला लागणारे पाणी महापालिकेचेच वापरले जाते, टैंकर आणून सोसायटी धूणे हि चैन अगदी मुकेश अंबानी पण करत नसावा
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Fri, 06/28/2019 - 13:14 नवीन
बोअरवेल चार्जिंग साठी पर्जन्यजल साठवणीचा उपयोग होऊ शकतो. पण शहरी भागात इमारतीचा पाया खचणार नाही ना अशी भीती लोकांत आहे . सिविल इंजिनिअर यावर प्रकाश टाकू शकतील
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 06/28/2019 - 13:55 नवीन
शहरी भागात इमारतीचा पाया खचणार नाही ना अशी भीती लोकांत आहे
प्रमाणाच्या बाहेर सक्शनने जर पाया खचत नसेल तर तो रिचार्जमुळे खचणार नाही असे माझे तुटपुंज्या कॉमनसेन्सने म्हणणे आहे. . शहरात असे बरेच पार्ट असतात की जेथून पावसाचे व अन्य बरे स्वच्छ्होणेबल पाणी वाहत जाते, उदा. रस्ते, त्याच्या कडेच्या बाजू तेथे वाहून जाणारे पाणी प्लानिंगने कंटूरिंग करावे व जिरवावे अन्यथा मोकळी मैदाने, नदीकाठ, ओढे अशा ठिकाणी जिरवावे. अजून एक थोडासा जहाल मार्ग म्हणजे जर मनपा म्हणत असेल की पुरवतो ते पाणी अगदी परफेक्ट पिणेबल आहे तर सगळ्या हायफाय वॉटरप्युरीफायरवर (युव्हीआरव्हीअ‍ॅक्वागार्ड्लिव्ह्प्युअरकेंटादी) तिप्पट कर लावून तो पैसा पाणी वितरण व्यवस्थेवर खर्च करावा.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 06/28/2019 - 15:01 नवीन
फक्त पिण्यासाठी वापरले तर एक हजार चौ.फुट गच्ची चार माणसाच्या कुटुंबासाठी वर्षभराचा साठा देते ते ही without harmful chlorine. and with fortified minerals. सिमेंट कंपन्यांच्या कचेरीत चौकशीकेलीकी माणुस पाठवुन estimate देतात. Ambuja, ACC वगैरे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/28/2019 - 15:47 नवीन
त्यांचं पन्नास/शंभर सेंमि पाऊस आणि हजार स्क्वेअर फुट गच्चीचं पाणी जमण्याचं गणित काय? इथे उदाहरणात ५०० स्क्वेअर फुट गच्ची धरली आहे. २५ बाइ ४० फुट गच्चीला ( = हजार स्क्वेअर फुट) सर्व बाजूने पाच फुट छप्पर वाढवले तर १७५०-१०००= ७५०ने कलेक्शन एअरिआ वाढतो. ७५ टक्के. शिवाय ४० सेंमि पावसाच्या शहरातून २०० सेंमि भागात गेल्यास आठपट फरक होईल. वापर ५००वरून २५० लिटरस धरल्यास एक वर्षाचे पाणी टाक्या कोणीही बांधल्यातरी देतीलच.
  • Log in or register to post comments
स
सुखी Sat, 06/29/2019 - 02:30 नवीन
हे पाणी सरसकट पुनर्वापर करण्या योग्य असते का? माझ्या मते नाही. हे पाणी टाकीत साठवून परत वापरावे का? आपण कृत्रीम सौंदर्याच्या मागे लागून सोसायट्या सिमेंट paver blocks no पूर्ण झाकून टाकल्या आहेत. एखादा निचरा खड्डा करून त्यात पाणी सोडल्यास ते सर्वांना (आस पास च्या वॉटर टेबल ला वाढवण्यात) मदत करतील. इथे कोतेपणाने विचार करून चालणार नाही की माझ्या घराला/society la direct फायदा दिसत नाही तर मी का करू?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 06/29/2019 - 05:05 नवीन
ठाण्या मध्ये मीटर बसवण्याचे काम जोरात चालू आहे. Prepaid पद्धत वापरून पाणी पुरवठा करायचा हा विचार त्या पाठीमागे असू शकतो. त्या नंतर वीज बिला प्रमाणे पाण्याचे महिन्याचे बिल ठरवले जातील . कमी वापर कमी भाव लिटर la आणि जास्त वापर जास्त दर लिटर ला. आणि ते काळानुसार योग्य सुद्धा आहे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 08:20 नवीन
पुनर्वापर - ज्याचे स्वत:चे घर आहे तो गच्ची स्वच्छ ठेवेल. किंवा पहिल्या आठवड्याचे पाणी बाहेर सोडून नंतरचे टाकीत घेईल. सोसायटी वाले किती जागरुक राहून काळजी घेतात त्यावर अवलंबून आहे. गच्ची गळतात म्हणून वर छप्पर घालू लागले आहेत त्याच्या पन्हाळीचे पाणी गोळा करता येईल फिल्टर टाकून. छपरावर तर कुणी जात नाही आणि गल्वनाइज्ड पत्र्यांऐवजी सिमेंटचे असतील तर किंवा त्यात आणखी चांगले पत्रे वापरून स्वच्छ पाणी मिळेल. राजमाचीला मागच्या महिन्यात एक टाकी दिसली. थोडी ऊंच बांधली आहे आणि वर छपराला उलट उतार दिल्याने पन्हाळीचे बरेच पाईप वाचवले आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 08:22 नवीन
एखादा निचरा खड्डा करून त्यात पाणी सोडल्यास ते सर्वांना (आस पास च्या वॉटर टेबल ला वाढवण्यात) मदत करतील.
- सुखी. अगदी नेमकं.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 06/29/2019 - 11:11 नवीन
बऱ्याचदा बोरिंगसाठी मारलेले खड्डे पाणी न लागल्यामुळे तसेच ठेवले जातात. हेच खड्डे सरकारकडून अनुदान घेऊन पावसाचे पाणी पुनर्भरण करण्यास वापरले तर जमिनीतिल पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होईल. तसा खर्च पण जास्त नाही आहे, पण लोंकाची मानसिकता अशी असते की मला क़ाय फायदा तर मी खर्च करू. असो हा एक साधा उपाय अजून का अमलात आणत नाही हे समजत नाही. आपल्याकडील कोणी प्रकाश टाकेल काय?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 06/29/2019 - 11:11 नवीन
बऱ्याचदा बोरिंगसाठी मारलेले खड्डे पाणी न लागल्यामुळे तसेच ठेवले जातात. हेच खड्डे सरकारकडून अनुदान घेऊन पावसाचे पाणी पुनर्भरण करण्यास वापरले तर जमिनीतिल पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होईल. तसा खर्च पण जास्त नाही आहे, पण लोंकाची मानसिकता अशी असते की मला क़ाय फायदा तर मी खर्च करू. असो हा एक साधा उपाय अजून का अमलात आणत नाही हे समजत नाही. आपल्याकडील कोणी प्रकाश टाकेल काय?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 06/29/2019 - 18:56 नवीन
पहिले पाणी लागलेल्या बोअर वेल विषयी: प्रत्येक ठिकाणच्या मातीच्या थराची उंची वेगवेगळी असते, त्यामुळे जमिनीत किती फुट खाली कातळ लागेल हे स्थानानुरूप बदलते. भूगर्भातील कातळाला पडलेल्या भेगा हा बोअर वेलला लागणाऱ्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असतो. बोअर वेल खणताना/ड्रील करताना किती फुट खाली पाणी लागेल हे त्या ठिकाणच्या भूजलपातळी वर अवलंबून असते. एखाद्या ठिकाणी पावसाळा संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर -नोव्हेंबर मधे ८ ते १० फुट खोलावर पाणी लागू शकेल तर त्याच ठिकाणी मार्च - मे महिन्यात १०० ते २५० फुट खोल खणल्यावर लागू शकेल. त्यामुळेच खात्रीशीर पाण्याच्या उपलब्धतेसाठी पावसाळ्यापूर्वी भूजलपातळी कमीत कमी असल्याने शक्यतो मे -जून मधे बोअर वेल खणल्या जातात. एखाद्या ठिकाणी १०० फुट खोलवर (झरा) पाणी लागले तर प्रती दिवशी पाण्याची गरज किती त्यावरून तेवढ्या पाण्याच्या साठवणुकीसाठी आणखी किती खोल खणायचे ह्याचे गणित केले जाते. उदा. दर दिवशी पाण्याची गरज ५०० लिटर्स असेल आणि बोअर चा व्यास ६ इंच असेल तर १०० + १५० = २५० फुट खोल खणली जाते. साधारणपणे ६ इंच व्यास x १ फुट उंची = ३.८ लिटर ह्या हिशोबाने ३.८ x १५० = ५७० लिटर्स. आता पाणी न लागलेल्या बोअर वेल विषयी: (झरा) पाणी न लागलेली बोअर वेल हि एखाद्या काचेच्या वा सिरामिकच्या बरणी प्रमाणे असल्याने पाणी जमिनीत जिरवण्यासाठी ती निरुपयोगी ठरते. तिच्या सभोवताली रिचार्ज करण्यासाठी खड्डा खणला तरी तिची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता पूर्ण झाल्यानंतर पावसाचे पडलेले पाणी रिचार्ज खड्डा पूर्ण भरल्यावर जमिनीच्या पृष्ठभागावर साठून तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. स्वखर्चाने किंवा सरकारी अनुदान घेऊन अगदी फुकटात पडला तरी आपल्या घर, इमारत वा शेतात (अल्प कालावधीसाठी का होईना पण) असा तलाव निर्माण करणे सयुक्तिक ठरणार नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 11:28 नवीन
तुमचा प्रश्न पाणी जिरवण्याचा आहे. त्यासाठी बोअरिंगचा खड्डा उपयोगाचा नसतो. शोषखड्डा खणून ( एखाद्या विहिरीसारखा खणून त्यात माती ऐवजी विटा, धोंडे घालून पोकळ भरतात. वरचा भाग दोन भोके ठेवून बंद करून त्या भोकात पावसाचे पाणी सोडायचे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 06/29/2019 - 15:56 नवीन
अजिबात सहमत नाही , कित्येक वेळा दुरदर्शनवर बोरिंगवेल पुनर्भरणविषयी बघितलेले आहे. पावसाचे पाणी बोरिंगमधे सोडा म्हणून. ते पाणी शोषखड़यामार्फत फिल्टर केले पाहिजे, नाहीतर पाण्यातील कचरा बोरिंगमधे जाऊन बसेल
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 16:22 नवीन
असलेला पण पाणी न मिळालेला बोअरिंगचा खड्डा - तीसेक सेंमि मोठा पण शंभरेक मिटरस खोल असू शकतो. तो फक्त वापरायचा आहे. त्यात पावसाच्या पाण्याबरोबर गाळ माती न गेल्यास नक्कीच काम करेल. पाणी जिरवत राहील. जर का मुद्दामहून पाणी जिरवण्याचा खड्डा मारायचा झाल्यास खोल करण्यापेक्षा रुंद करणे योग्य. ते बरेचदा शेती कार्यक्रमातही दाखवतात. मुंबई ठाण्याचे ( किनारपट्टीचा भाग) बोलायचे झाल्यास जमिनीखाली दहा फुटांवर पाणी लागू शकते. खोल खड्डे नाहीच.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 11:29 नवीन
रेनवॉटर हार्वेस्टिंग करा असं नगरपालिका नगरातल्या नागरिकांना, सोसायटीतील रहिवाशांना सांगत आहेत. त्या निमित्ताने त्या भागात किती पाऊस पडतो आणि किती जागेत किती पाणी जमा होऊ शकते ते प्रथम थोडक्यात मांडलं आहे. ते साठवण्यासाठी किती जागा लागेल व रहिवाशांना किती दिवस पुरेल याचाही विचार केला आहे. सर्वात शेवटी म्हणजे कोणत्याही वस्तूचा येणारा खर्च आणि परतावा पटला नाही तर निष्फळ खटाटोप होतो. त्याची थोडीफार कल्पना आली अगोदर तर निर्णय घेण्यास सोपे जाते. आता दरवर्षी उशिरा सुरू होणारा पावसाळा, कमी किंवा विनाभरोसा पाऊस, शहरांत वाढत्या वस्तीमुळे ( टॉवरस) कमी पडत जाणारा तलावांंतला पाणीसाठा निरनिराळ्या उपायांचा विचार करण्यास भाग पाडत आहे. कुठे या रेनवॉटर हार्वेस्टिंगची चर्चा होत असेल तर लेखातल्या काही मुद्यांचा उपयोग व्हावा अशी इच्छा आहे. मिपाकर यामध्ये भर घालतीलच, सुचनाही करतील याची खात्री आहे. ********** रेनवॉटर हार्वेस्टिंगचा विचार करताना या टप्प्यांनी विचार करा - १) आपल्या घराच्या शहरात किती सेंमि पाऊस पडतो? २) पाणी जमा ठरण्यासाठी किती चौरस फुट गच्ची / जागा आहे? ३) क्रमांक एक आणि दोनचा वापर करून जास्तीतजास्त किती पाणी गोळा होईल ते वरच्या गणिताने कळेल. [ शंभर चौ फुट जागेत एक सेंमि पावसाला साधारणपणे ९३ लिटर्स पाणी मिळते. ] ४) तेवढे पाणी साठवण्यासाठी किती फुटी टाकी लागेल ते पाहणे. [ १ फुट लांब, १ फुट रुंद आणि १ फुट खोल टाकीत २८ लिटर्स पाणी राहातं. टाकी जेवढी खोल तेवढी अधिक मजबूत बांधावी लागते. ] टाकीच्या मापाची जागा इमारतीच्या आवारात कुठे आहे ते ठरवणे. ५) साठवलेले पाणी किती लोकांना/ब्लॉक्सना किती दिवस कशासाठी पुरणार आणि टाक्या बांधायचा येणारा खर्च हे याचा विचारही महत्त्वाचा आहे. ६) नगरपालिकेने "रेनवॉटर हार्वेस्टिंग" हे प्रत्येक नवीन सोसायटी/घरास अत्यावश्यक केले तर करावेच लागेल. तरीही क्रमांक ५ च्या मुद्दयातून या ची कार्यक्षमता /व्यवहारीता अगोदरच माहीत होणार आहे. भ्रमनिरास होणार नाही.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 06/29/2019 - 16:00 नवीन
आपल्याकडे जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते. आपल्याकडील जाणकार अजून प्रकाश टाकतीलच
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 06/29/2019 - 16:29 नवीन
वापरानुसार पाणीपट्टी भरणाऱ्या शहरी/निमशहरी भागांमध्ये अशा पद्धतीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवहार्य आणि कार्यक्षम नाही! नगरे व महानगरांमधील वाढत जाणारी लोकसंख्या आणि तिच्या मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यावर येणाऱ्या मर्यादा ह्यांमधील दरी कमी करण्यासाठी (मर्यादित उपलब्धता पण बेसुमार वापरामुळे वारंवार करावी लागणारी पाणीकपात टाळण्यासाठी) नगरपालिका/महानगर पालिकांनी केलेला हा एक उपाय आहे. निमशहरी /शहरी भागात काही प्रमाणात पाण्याची मागणी कमी करण्यास हा उपाय उपयुक्त असला तरी एकंदरीत प्रकल्पाच्या बांधणीसाठी येणारा खर्च (छप्पर,पन्हाळी,भूमिगत कॉंक्रीटच्या वा प्लास्टिकच्या टाक्या, त्यांची देखभाल) आणि यील्ड ह्यांचा विचार करता ते व्यवहार्य नाही. तसेच मागणी प्रमाणे पुरवठा करण्यासाठी (साठवणुकीतील मर्यादा, गळती, आणि उपसा करण्यासाठी पंपावरील पर्यायाने विजेवरील अवलंबित्व ह्यामुळे) कार्यक्षमहि नाही. पण उत्पादन/ उत्पन्नासाठी पाण्यावर अवलंबून असणारी शेती आणि शेती पुरक व्यवसायांसाठी मात्र शेततळे, लागवडीखाली नसलेल्या जागेवर उदा: गायी,म्हशी, शेळ्यांचे गोठे, प्रक्रिया गृहे, गोदामे इ. खाली बांधलेल्या भूमिगत टाक्यांद्वारे केलेले रेन वॉटर हार्वेस्टिंग नक्कीच व्यवहार्य आणि कार्यक्षम ठरते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 06/29/2019 - 16:48 नवीन
पाणी वाचिण्यासाठी किंवा साठवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याचा मूळ उध्येश आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर ती हाताळण्यासाठी एक पूर्व तयारी हा आहे. सोसायटी आर्थिक दृष्ट्या कमजोर असेल तर सरकारी योगदान दिले जावे . पण रेन हार्वेस्टिंग व्यवहारिक आहे का ह्याच उत्तर पैसा हे माध्यम वापरून होवू शकत नाही . भीषण स्थिती मध्ये पैसे देवून सुद्धा पाणी मिळणार नाही . सर्वात मोठं उदाहरण २० रु. पये ltr नी १ ltr बिसलेरी पाणी व्यवहारिक आहे का? मुळात त्या बिसलेरी पाण्याचा दर्जा महानगर पालिकेच्या पाण्यापेक्षा खूप खालचा असतो . तेव्हा बिसलेरी महाग आहे असे कोणालाच वाटतं नाही
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 06/29/2019 - 17:22 नवीन
मुळात त्या बिसलेरी पाण्याचा दर्जा महानगर पालिकेच्या पाण्यापेक्षा खूप खालचा असतो . तेव्हा बिसलेरी महाग आहे असे कोणालाच वाटतं नाही
अफाट निरीक्षण.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 06/29/2019 - 17:26 नवीन
खरे आहे तुम्ही स्वतः पाणी चेक करा आणि पाण्या विषयी जे माहिती गार आहे त्यांचा सल्ला घ्या
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 06/29/2019 - 17:14 नवीन
जी सोसायटी रेन हार्वेस्टिंग करेल त्याचा फायदा तिलाच मिळेल . इथे जो खर्च होणार आहे तो स्वतःच्या गरजेसाठी . पाणी तुम्ही साठवा आणि ते पाणी बाकी लोकांना ध्या असी जबरदस्ती नाही . होवू नाही पण असे झाले पावूस अगस्त मध्ये चालू झाला .पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार असमर्थ झाले . एका कुटुंबाला ५०० ltr पाणी लागत बिसलेरी २० रुपये ltr आहे (त्या वेळी १००रुपये असेल) म्हणजे दिवसाला १०००० लागतील . महिन्याला तीन लाख रुपये खर्च करण्याची ताकद १ percent लोकांकडे सुद्धा नाही
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/29/2019 - 17:35 नवीन
पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापर (रेन वॉटर हारवेस्टिंग) आणि गृहनिर्माण संस्थांतील कचरा व्यवस्थापन, यासारखे महत्वाचे विषय केवळ कायदे करून गृहनिर्माण संस्थांच्या डोक्यावर थापण्याने खालीलपैकी एक किंवा अनेक गोष्टी होत आहेत... १. राजकिय नेत्यांनी आपली जबाबदारी जनतेच्या माथी मारून स्वतःची कातडी बचावण्याचे धोरण स्विकारले आहे. या दोन्ही विषयांत, आराखडा बनवणे आणि तो अंमलात आणणे यापैकी कोणतेही शास्त्रिय कौशल्य आणि/किंवा अनुभव सामान्य नागरिकांना असणे शक्य नाही. अर्थातच, काही सन्माननिय अपवाद वगळता, ते प्रकल्प पूर्णपणे फसून बंद झालेले आहेत किंवा रडतखडत कसेबसे चालू आहेत... दोन्ही बाबतीत ना नागरिकांची सोय, ना योग्य खर्च-व्यय गुणोत्तर... म्हणजेच, अश्या बहुसंख्य प्रकल्पांत, जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि जनतेची गैरसोय, हे दोन परिणाम सोडता इतर काही फायदा मिळत आहे असे दिसत नाही. २. हे प्रकल्प जनतेच्या माथी मारण्याचे अनेक राजकिय फायदे असे आहेत... ...२.अ) प्रकल्प करण्याचा कायदा केल्याने आपण काहीतरी केले याचे श्रेय राजकारण्यांना मिळते. ...२.आ) प्रकल्प अयशस्वी होण्याचा दोष जनतेच्याच डोक्यावर बसतो, राजकारणी बिनबोभाट सुटतात. ...२.इ) पर्यावरणाबद्दल सक्रिय/उत्साही नागरिकांच्या डोक्यावर काम आणि/किंवा अपयश टाकल्याने त्यांचा त्रास कमी होतो. ...२.ई) अश्या छोट्या छोट्या प्रकल्पांचे बजेट कमी असल्याने, त्यांत राजकारण्यांना मुळातच रस नसतो. हे प्रकल्प जनता स्वतः करत असल्याने इतक्या कमी पैशांच्या व इतर झालेल्या/न झालेल्या शक्य गैरव्यवहारांच्यासंबंधी ठपका आपोआप टाळला जातो. इ, इ, इ. ३. असा दूरगामी महत्वाचे प्रकल्प सरकारने तज्ज्ञांच्या सहकार्याने, विचारपूर्वक, एक मोठी मोहीम आखून बनवणे आणि नंतर लोकप्रतिनिधींनी+प्रशासनाने व जेथे तो अंमलात आणायचा आहे तेथील लोकांना सहभागी करून संयुक्तपणे अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यांच्या आराखड्यात, योग्य व्यक्तींमध्ये, योग्य तेवढे कौशल्य निर्माण करणे आणि सरकारने त्यांना योग्य ती सल्लागार व आर्थिक प्रकारची मदत पुरवून प्रोत्साहन देणे; यासाठी स्पष्ट व सहजसाध्य तरतूदी कायद्यात करणे जरूरीचे आहे. अन्यथा, प्रत्येकजण आपल्या बकुब व आवडीप्रमाणे, जमेल तसा प्रकल्प राबवेल, आणि मग त्यामध्ये यशापेक्षा अपयशाचीच जास्त खात्री असेल. या प्रकल्पाचे महत्व गृहनिर्माण संस्थांमध्ये केल्या जाण्यार्‍या सौरऊर्जा प्रकल्पांइतकेच मोठे आहे, हे सांगायलाच हवे काय? "पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापर (रेन वॉटर हारवेस्टिंग)" यासाठी केले जाणारे स्थानिक छोटे छोटे प्रकल्पसुद्धा तितकेच दूरगामी आणि लोककल्याणकारी महत्वाचे आहेत... केवळ कायदा करून त्यांची जबाबदारी जनतेच्या माथ्यावर थापणे योग्य होणार नाही. दुर्दैवाने, सद्या हा प्रकल्प, वरच्या ३र्‍या क्रमांकाच्या मुद्द्याच्या बाबतीत, अनाथावस्थेत व म्हणूनच अनावस्थेत आहे. :(
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 17:49 नवीन
क्र १ आणि २अ विशेष.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/29/2019 - 17:52 नवीन
अजून काही खूप महत्वाचे... "पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापर (रेन वॉटर हारवेस्टिंग)" या मोहिमेतील गृहनिर्माण संस्थांच्या छोट्या प्रकल्पातही सरकारचा सहभाग हवाच. कारण, या प्रकल्पांमुळे, प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या वैयक्तिक उद्येशांबरोबरच, "सर्वसाधारण स्थानिक भूगर्भातील जलपातळी" वाढवण्याचा उद्येशही समाविष्ट करणे शक्य होईल. हा मुद्दा, या प्रकल्पांना गाव/शहराच्या जनतेच्या सामाईक उपयोगाचे आणि दूरगामी फायद्याचे बनवेल... अर्थातच, सरकारची भूमिका स्पष्ट होऊन, यशापयाची जबाबदारी सरकार व जनता यांच्यामध्ये, योग्य प्रकारे विभागली जाईल. असे केल्यास, प्रकल्पांच्या यशाची खात्रीसुद्धा वाढते, असा जगभराचा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 09:16 नवीन
आपली ही चर्चा चालू आहे आणि योगायोगाने, नुकतेच सरकारनेही पाणी संरक्षण (water conservation) व पाणी पुनर्वापर (water reuse) याबाबतीत मोहीमा हाती घेतल्याचे व त्यामध्ये जनसहकारासाठी आवाहन केल्याच्या, बातम्या माध्यमांत येत आहेत... PM Modi calls for Swachh-like water conservation mission In cities, recycle, reuse to be Jal Shakti Abhiyan’s mantra
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/01/2019 - 09:35 नवीन
खाजगी कंपन्यासुद्धा रेन वॉटर हारवेस्टिंगसाठी काही प्रकल्प घेऊन येत आहेत. त्यापैकी, अंबुजा सिमेंटचा एक प्रकल्प खालील चलतचित्रात पहायला मिळेल... यासंबंधीची अजून काही चलतचित्रे...
  • Log in or register to post comments
च
चष्मेबद्दूर Sat, 07/06/2019 - 06:57 नवीन
या अशाच कारभारामुळे ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याच्या प्रक्रियेला खीळ बसते. मनपा ला खत निर्मितीत कसलाही इंटरेस्ट नाही आणि नागरिकांना वेठीला धरण्याचे प्रकार मात्र करण्यात आघाडीवर.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 17:46 नवीन
बिसलेरी न म्हणता 'बॉटलमधले मिनरल पाणी' म्हणुया. ------ समजा सहा लाख रु खर्च करून बांधलेल्या टाक्यातले साठवलेले पाणी सोसायटीत आठ दिवसही पुरले नाही तर किती आरडा ओरड होईल ते लक्षात घ्या.
पण उत्पादन/ उत्पन्नासाठी पाण्यावर अवलंबून असणारी शेती आणि शेती पुरक व्यवसायांसाठी मात्र शेततळे,~~~~~"
- हे यशस्वी झालेले दिसते कारण जागेची उपलब्धता, कमी खर्च, पूर्णपणे त्या पाण्यावर अवलंबून राहता येण्याची शाश्वती.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/29/2019 - 17:52 नवीन
जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते.
- भंकस बाबा. - नेमकेच.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 06/29/2019 - 18:06 नवीन
जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते.
गटारे तुंबत असावीत, ज्यामुळे त्यांचे प्रयोजनच धोक्यात येईल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/29/2019 - 18:08 नवीन
जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते. धोका !!! हे आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोक्याचे आहे. भारतात (अ) पावसाचे पाणी, (आ) घरातले संडासासकट सर्व सांडपाणी, इ वाहून नेण्यास वेगवेगळ्या व्यवस्था नाहीत. असे मिश्र पाणी जमीनीत जिरवल्यास जमीनीतील सर्वच जल दूषीत होईल... अर्थातच, यामुळे, 'सांसर्गिक रोगांच्या साथींना' आणि 'पाण्यांत विषारी रसायनांचा स्तर वाढल्यामुळे होणार्‍या रोगांना', आमंत्रण दिल्यासारखे होईल. भारतात, बहुतेक/बर्‍याच ठिकाणी अश्या मिश्र पाण्याचे शुद्धीकरण न करता, ते जवळच्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले जाते. हे सुद्धा गैरच आहे व त्यानेही भूमीतील जलसाठ्यांचे काही प्रमाणात प्रदूषण होतेच आहे. यासंबंधीचे दुष्परिणाम आपण सतत माध्यमांत ऐकत असतोच. उदा : नुकतेच पुण्याशेजारच्या नदीत हजारोंच्या संखेने मरून तरंगणारे मासे. गटारांना शोषखड्डे बनवण्यामुळे, गाव/शहरभर प्रदूषित पाणी भूजलसाठ्यात मिसळून, त्या प्रदूषणाला आपण स्वतःहून घरापर्यंत येण्यासाठी मार्ग मिळवून दिल्यासारखे होईल.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/30/2019 - 06:47 नवीन
इथे मी जे गटार बोलत आहे ते पक्के बांधलेले असावे व रहिवासी भागात असावे. पुण्यासारख्या शहरात बोरिंगचे पाणी फार कमी प्रमाणात पिण्यासाठी वापरले जात असावे हा माझा तर्क. इथे जऱ ही कल्पना राबवली तर भूजलपातळी वर येऊन पिण्याव्यतिरिक्त पाण्याची गरज कमी होऊन धरणातील पाणीसाठयावर कमी दबाव येईल . मी उघड़यावर वाहणाऱ्या नाल्याची गोष्ट करत नाही आहे. आता हिच गोष्ट मुंबईत करून फायदा नाही कारण मुंबई समुद्रसपाटीवर वसलेले शहर आहे. इथे 15 ते 20 फुटावर पाणी लागते. पण मुंबईकर असे कर्मदरिद्री आहेत की त्यांना हा फुकट पर्याय नको असतो. महापालिकेवर मोर्चे काढायला मात्र हे आघाडिवर असतात. तुम्ही म्हणता सरकार जबाबदारी झटकते, पण सरकार कुठे कुठे पूरे पडेल? चार माळ्याच्या झोपडपट्याना राजकीय दबावाखाली पाणी पुरवावे लागते. आम्ही शेकुलर( हा शब्द मी शिवी म्हणूनच वापरतो) असल्यामुळे मुंबईतील सर्व अनधिकृत मशिदिना पाणी पुरवणे ही सरकारची जबाबदारी असते. मी रहात असलेल्या मालवणी मालाड भागात शंभरच्या वर अनधिकृत वा अधिकृत मशिदि आहेत. सर्वाना भरपूर पाणी आहे. हा विषय धर्मिकतेकड़े वळवायचा नाही आहे पण विचार करा मशिदिकडे येणारी पाइपलाइन तिच्या आसपासच्या भागाला जो अनधिकृतच फैलावला असतो त्याला पण समृद्ध करतो, आणि मशिदिकडून पुढच्या भागाला कमी दाबाने पाणी जाते. करोडो रुपये जऱ मशीद बाँधण्यासाठी खर्च करू शकतात तर दोनतीन लाखात बसणारी विहिर वा बोरिंग का बांधू शकत नाही?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/04/2019 - 15:18 नवीन
भंकस बाबा साहेब. इथे मी जे गटार बोलत आहे ते पक्के बांधलेले असावे व रहिवासी भागात असावे. गटार कोठेही बांधलेले असले तरी त्यातले पाणी जमीनीत मुरल्यावर ते सर्व भूजलात मिसळून त्याला दुषित करेल, नाही का ? शिवाय पाणी जमिनीत मुरेल असे गटार वरून पक्के असले तरी भूजलात मुरणार्‍या पाण्याबाबत त्याने काही फरक पडत नाही. तेव्हा, मुख्य प्रश्न आपण कोणत्या प्रकारचे पाणी जमीनीत जमीनीत मुरवायचे आहे, हा आहे. जेथे, दुषित (मलमुत्र किंवा इतर रोग निर्माण करू शकणरे पदार्थ मिसळलेले) आणि इतर प्रकारचे पाणी यांची व्यवस्था वेगळी आहे, तेथे (अ) दुषीत नसलेले आणि (आ) प्रक्रिया करून (ट्रिटेड) निर्धोक पाणी, या दोन्हीही प्रकारचे पाणी जमिनीत मुरवायला हरकत नाही. जेथे अशी व्यवस्था नाही (जे भारतात बहुतेक भागात आहे) तेथे "मिश्र" पाणी जमिनीत मुरविल्यास सर्व पाणी दुषित होऊन धोकादायक बनते. केवळ दुषित पाण्याच्या पिण्यानेच आजार होतात असे नाही तर, त्याच्या प्रक्रिया न केलेल्या (विशेषतः मलमुत्र किंवा रसायनांमुळे) दुषित पाण्याच्या वापरानेही (उदा : बागेसाठी वापर, इ) आजार अथवा इतर प्रकारचे धोके उदभवू शकतात... हे सुद्धा या बाबतीत ध्यानात घ्यायला हवे. बाकी, मंदीर-मशिद बांधण्यासाठीचा खर्च वगैरे मुद्दे फार वेगळे आहेत आणि त्याबाबत तत्वतः सहमती आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 06/29/2019 - 18:54 नवीन
शेतकरी असू ध्या नाही तर शहरी नागरिक ठराविक टक्के जमीन ही जलसर्धनासाठी ठेवलीच पाहिजे . बेफिकीर पना मोठे संकट निर्माण करेल. शासनाचा सहभाग असलाच पाहिजे तो सुद्धा सुलभ रित्या . आर्थिक मदत सरकारनी करावी . योजनेला संरक्षण शासनाने द्यावे . नियोजन शासनाने करावे . जे नियम तोडतील त्यांना पाणी किती जीवनावश्यक असले तरी ते तोडण्याचा अधिकार शासनाला असलाच पाहिजे . भारतात जबरदस्ती केल्या शिवाय कोणतीच योजना राबवता येईल असे वाटत नाही
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 06/29/2019 - 19:37 नवीन
राज्य पातळीवर सरकारनी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करावी . तिला पूर्ण अधिकार असावेत पण मनमानी करू नये म्हणून कठोर नियम आसवेत . जी संस्था असेल त्या संस्थे तील कर्मचाऱ्यांना चुकीच्या कामासाठी न्यायालयाचे कमीत कमी संरक्षण असेल . चूक करणारे आणि त्यांना मदत करणारे कठोर शिक्षेला पात्र असतील . ह्या संस्थेच्या अधिकारात पाणी नियोजन ,पाण्याचे योग्य वाटप आणि जलसंवर्धन हे विषय असतील . वर्षाला जेवढे पाणी वापरणार त्याच्या नुसार किती पाणी जमा करायचे किंवा जमिनीत मुरवायचे ह्या विषयी नियम हवेत . आणि त्याचा अभ्यास करून त्या योजना सरकारी खर्चाने सक्तीने राबवणे हे ह्या संस्थेचे काम असेल
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 06/30/2019 - 02:16 नवीन
गच्चीवरच्या छपरावरचे पाणी गोळा करून बंद टाकीत साठवल्यास चांगल्या पाण्याची खात्री राहील पण तशी साठवण जागा सोसायटी/बंगल्यात तळ मजल्यावर अगोदरच करावी लागेल. सध्या पार्किंगने त्याचा ताबा घेतला आहे. १० बाइ १० ची एक खोली टाकी म्हणून केल्यास एका कारचे पार्किंग जाईल आणि त्याबदल्यात २८००० लिटर्स चांगले पाणी हार्वेस्ट होईल. ही सोय इमारत बांधतानाच केली असल्यास स्वस्तात होईलच आणि पुढेमागे नगरपालिकेने आवश्यक केल्यास सभासदांना चिंता राहणार नाही. टाकीस पंप न लावता नळ ठेवून ते पाणी गाड्या धुण्यासाठी किंवा शहराचा पाणी पुरवठा बंद झाल्यास वापरता येईल.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 06/30/2019 - 13:08 नवीन
मला एक समजत नाही, घरं किंवा सोसायट्या हार्वेस्टिंग करून असे कितीसे पाणी मिळणार आहे ? आणि हे पाणी भूजल पुरेसे रिचार्ज करू शकेल का ? घरे आणि सोसायटीच्या छतावरील पाण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी शहरे आणि गावे यांच्या आजूबाजूला पावसाळ्यात पडून धोधो वाहून जाते. ते बांध, तलाव, कंटूरिंग , जंगले जोपासणे इ. द्वारा अडवले तर भूजल पातळीत कमालीची वाढ होईल आणि ती टिकूनही राहील. https://www.youtube.com/watch?v=8z_q3hNemxE
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/30/2019 - 14:02 नवीन
रेनवॉटर हार्वेस्टिंगबद्दल बरीच चर्चा झाली. आपल्याकडे साठवलेल्या पाण्याचे जे बाष्पिभवन होते त्याबद्दल काहीही चर्चा होताना दिसत नाही. एका यूट्यूब वीडियोत बघितले होते की प्लास्टीकचे चेंडू करून त्याचा थर पाणीसाठयावर दिल्यास बाष्पिभवनाचा वेग मंदावतो. पण हा उपाय एका मध्यपूर्व देशात बघितला होता. आपल्याकडे प्लास्टिक वापरणे किती आर्थिकदृष्टया सोईचे असेल? शिवाय चोरीची भिती ती वेगळी!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 06/30/2019 - 14:02 नवीन
रेनवॉटर हार्वेस्टिंगबद्दल बरीच चर्चा झाली. आपल्याकडे साठवलेल्या पाण्याचे जे बाष्पिभवन होते त्याबद्दल काहीही चर्चा होताना दिसत नाही. एका यूट्यूब वीडियोत बघितले होते की प्लास्टीकचे चेंडू करून त्याचा थर पाणीसाठयावर दिल्यास बाष्पिभवनाचा वेग मंदावतो. पण हा उपाय एका मध्यपूर्व देशात बघितला होता. आपल्याकडे प्लास्टिक वापरणे किती आर्थिकदृष्टया सोईचे असेल? शिवाय चोरीची भिती ती वेगळी!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 06/30/2019 - 18:18 नवीन
पाण्याच्या पुनर्वापराबद्दल ज्यांना खूपच कळकळ आहे ते त्याबाबत स्वतः काही ना काही प्रयोग करत असतात, इतर काही जण चर्चा करत असतात, बाकीचे 'हे माझे काम नाही' असे समजून सरळ दुर्लक्ष करतात. त्यापैकी पहिल्या प्रकाराचे एक उदाहरण... Noida: A green household that reuses to reduce waste
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 06/30/2019 - 18:32 नवीन
पर्यावरण रक्षण . पाणी स्तोत्र वाढवणे . पाण्याचा योग्य वापर ही सर्व समाजाची जबाबदारी आहे . शहरात आणीबाणीच्या वेळी १ महिना तरी पुरेल एवढं पाणीसाठा लोकांकडे असावा त्यांच्याच safty साठी कधी वेळ आली तर पाण्या वाचून जीव जावू नये म्हणून . जो ग्रामीण भाग आहे तिथे मोठी जबाबदारी आहे जनावरे ,शेती,आणि स्वतः माणूस ह्यांची पाण्याची गरज भागवण्यासठी प्रयत्न करायचे आहेत . त्या साठी वृक्ष लागवड (झाडं chya सावली मुळे तापमान नियंत्रण होते आणि मुळे पाणी मुरव ने आणि धूप थांबवणे हे काम करतात) आणि हे तुमचे जीवन आणि जीव वाचविणार आहे अजुन तरी पैसे देवून जीव परत येत नाही
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 07/01/2019 - 03:50 नवीन
मी या विषयावरील सर्व माहिती देणारे एक पुस्तक लिहिले आहे. https://www.amazon.com/Harvesting-Sustainable-Supply-Environment-Development/dp/8170337526
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 07/01/2019 - 05:58 नवीन
आहे त्या इमारतीत नवीन टाक्या कुठे बसवायच्या? हा प्रश्न असणार त्यावर काही सुचलेले - इमारतीला बाहेरून भिंतीला चिकटून सपाट आकाराच्या ( आणि एकावर एक) तसेच "ब्लॅडर" प्रकारच्या सपाट टाक्या ? - नाहीतरी जमिनीत टाकी केली तरी परत पंपाने ते पाणी वर न्यावे लागेल मग गच्चीतच का नाही अजून टाक्या बसवायच्या ? अर्थात हे इमारतीला धोकादायक नसेल तर - सार्वजनिक : खर्चाचे पण शक्य , आहे त्या मोकळ्यमैदानात खणून टाकी आणि परत वरून जमीन आहे तशी करणे! हि कल्पना सिंगापुर सारखया ठिकाणी आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी , नवीन नाही ) https://www.straitstimes.com/singapore/bidadari-to-house-singapores-first-underground-service-reservoir विचार करा पुण्यात स प महाविद्यालय, नव इंग्लिश शाळा , भावे शाळा, नेहरू स्टेडियम इत्यादी
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 07/01/2019 - 16:10 नवीन
छतावरील पावसाचे पाणी टाकीत साचवले तरी ते पिण्यायोग्य नसते. त्यात कोणतेही मिनरल नसल्याने पाण्याचा TDS कमीच असणार . मुंबई सारख्या शहरात प्रदूषणामुळे पावसाचे पाणी अॅसिडिक होते जे शरीराला अपायकारक असते.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 07/01/2019 - 17:48 नवीन
छतावर पडणारा पहिला दुसरा पाऊस हा टाकित न सोडता तो वाहून जाऊ देतात.त्यामुळे छतावरील पक्षी विष्टा, कचरा व या पावसातील आमल्पणा, हे टाकीत साठवलेल्या पाण्यात येत नाहीत. तसेच टाकीतले पाण्यात सूर्य किरणांचा प्रवेश शक्यतो टाळावा कारण पाण्यात वनस्पति उगवण्यासाठी किरणे आवश्य असतात. मिसळपाव सदस्यांना इतर काही प्रश्न असल्यास त्यांनी मला खरडवहीत किंवा या चर्चेत विचारले तर मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा