Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य ?

क
कंजूस
Fri, 06/28/2019 - 10:26
🗣 77 प्रतिसाद
रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य? किती कार्यक्षम? एखाद्या ठिकाणचे पर्जन्यमान/ पाऊस मिलिमिटर्स अथवा सेंटिमिटर्स यांमध्ये मोजतात. रोजचा पाऊस किती झाला हे मिलिमिटर्समध्ये सांगणे सोयीचे असले तरी एखाद्या भागातला वर्षभरांत एकूण पाऊस किती हे सेंटिमिटर्स मापात सांगितल्यास तुलना करणे सोपे जाते. उदाहरणार्थ - ठिकाण - पाऊस - माप जैसलमेर - २० सेंटिमिटर्स पुणे - ४० सेंटिमिटर्स बंगळुरू - ८० सेंटिमिटर्स चेन्नई - १०० सेंटिमिटर्स कोलकाता - १५० सेंटिमिटर्स तिरुवनंथपुरम १६० सेंटिमिटर्स मुंबई - २०० सेंटिमिटर्स गोवा - २०० सेंटिमिटर्स कोची - ३५० सेंटिमिटर्स ((महाबळेश्वर - ८०० सेंटिमिटर्स मेघालय - १२०० सेंटिमिटर्स)) एक सेंमि पाऊस म्हणजे १२.५ मिलिलिटरस पाणी १२.५ चौ सेंमि (square cms area) क्षेत्रफळावर जमा होते. एका प्लॉटवर एक छोटे घर एक फुट बाइ एक फुट जागेवर साधारण नउशेतीस मिलिलिटर्स पाणी गोळा होईल. घरची गच्ची ५०० चौ फुट असेल तर एक सेंमि पावसाने ४५० लिटर्स पाणी मिळेल. वर्षभराच्या ४० सेंमि पाऊस होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी गोळा केल्यास १८००० लिटर्स पाणी मिळेल. वापर एका कुटुंबात चार जण धरून रोजचा पाण्याचा खप ५०० लिटर्स धरुया. हे १८००० लिटर्स पाणी त्या कुटुंबास ३६ दिवस पुरेल. म्हणजे वर्षभराच्या वापराच्या दहा टक्के पाणी रेन हार्वेस्टिंगने मिळाले. हे एक मध्यम पावसाच्या ठिकाणाचे उदाहरण झाले. जिथे यापेक्षाही कमी पाऊस पडतो तिथेच खरी गरज आहे. पण तेवढा पाऊस पडत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे रोजचा वापर २५० लिटर्सही केला जाईल तर तर दोन महिने पुरेल. साठवण ८ फुट बाइ ८ फुट लांब रुंद आणि ६ फुट खोल टाकी बांधल्यास त्यात ९ ते १० हजार लिटर्स पाणी साठवता येईल. अशा दोन टाक्या लागतील. प्लॉट जमिनीचा आकार ७५ फुट बाइ ६० फुट प्लॉटमध्ये १०/१०/१०/१५ फुट जागा सोडून २५ बाइ २०फुटी घर (५०० चौ फुट) ही एक आदर्श स्थिती झाली. त्यात कडेला या दोन टाक्या व एक संडासची टाकी बांधावी लागेल. मोठ्या इमारती , हौझिंग सोसायटीतील गरज तळ मजला अधिक त्यावर तीन मजले आहेत असे धरल्यास गच्चीवरच्या प्रत्येक पाचशे चौ फुट भागातील गोळा झालेले पाणी खालच्या चार रहिवाशांत वाटायचे आहे. वरच्या उदाहरणातील पाणी अर्थातच एका ब्लॉकला आठ दिवस पुरेल. अधिक मजले असतील तर आणखी वाटप कमी होईल. बाकी त्या टाक्या बांधणार कुठे हा एक प्रश्नच ठरतो. टाक्या बांधण्याचा खर्चही आहेच. केवळ टाक्या बांधणे, पाऊसपाणी साठवणे बंधनकारक केले म्हणून नागरीक ते करतीलच. गावागावांत जी पाणी अडवा जिरवा/ साठवा मोहिम अमलात आणत आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सर्वच उघड्या जमिनीवरचे पावसाचे पाणी गोळा करून साठवतात. तसे सोसायटीच्या/इमारतीच्या आवारातील गोळा केले जाईल असे नाही वाटत. तुमचे अंदाज आणि सूचना मांडा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 45472 views

🗣 चर्चा (77)
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 07/01/2019 - 19:15 नवीन
५ पेक्षा कमी TDS असलेले पावसाचे पाणी पिण्यायोग्य कसे करता येईल?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 07/01/2019 - 19:40 नवीन
पावसाचे साठवलेले पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा अट्टाहास का बरे? इतर उपयोगासाठी आपण पावसाचे पाणी खुशाल वापरु शकतो.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 07/02/2019 - 04:09 नवीन
चौरस आहार असल्यावर पावसाच्या पाण्यात क्षार नसले तरी काही बिघडत नाही. ते शुद्ध असते हे महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 07/01/2019 - 19:49 नवीन
पावसाच्या साठवलेल्या पाण्याचे प्रमाण बघता ते इतर कामासाठी किती दिवस वापरता येईल?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/01/2019 - 20:18 नवीन
पावसाच्या पाण्याचा tds ५ पेक्षा कमी आहे? स्वतः चेक केला आहे का .कोणते पाणी पिण्यासाठी योग्य असते ते जरा tds सहित सविस्तर सांगावे . ज्यांनी पावसाचे पाणी पिण्यास योग्य नसतं असे मत व्यक्त केले आहे त्यांनी
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 07/01/2019 - 21:20 नवीन
हो पावसाच्या पाण्याचा TDS आणि pH मी अनेकवेळा चेक केला आहे. TDS नेहमीच ५ पेक्षा कमी आढळला, आणि pH ५-७ आढळला. पिण्यासाठी योग्य असते ते जरा tds सहित सविस्तर सांगावे . पिण्याच्या पाण्याचा TDS ५० पेक्षा कमी नसावा.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/01/2019 - 20:31 नवीन
भरपूर पाणी असताना ५०० ltr पाणी सुधा ४ माणसाच्या कुटुंबाला १ दिवस सुधा पुरणार नाही . आणि पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली की तेच ५०० ltr पाणी ४ माणसाच्या कुटुंबाला १० दिवस पुरेल .
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Mon, 07/01/2019 - 21:25 नवीन
आणि पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली की तेच ५०० ltr पाणी ४ माणसाच्या कुटुंबाला १० दिवस पुरेल . पिण्याकरता किती दिवस वापरता येईल?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 07/01/2019 - 22:16 नवीन
पावसाचे पाणी हे बाकी सर्व उपलब्ध पाण्यापेक्षा शुद्ध असतं . ह्या पाण्यामध्ये हवेतील धुळी चे कनच फक्त विरघळलेले असतात . तेच पाणी जेव्हा जमिनीवरून वाहत तेव्हा त्यात जमिनीवर असणारे असंख्य घटक विरघळतात . त्यात बरेच घटक हे शरीराला हानिकारक असतात . आणि पाणी अशुद्ध होते. Tds हे काही पाणी योग्य किंवा आरोग्यदायक आहे हे मोजण्याच एकक नाही . Tds मुळे फक्त पाण्यात किती क्षार आहेत ते माहीत पडत पण ते क्षार शरीरास घातक आहेत की फायदेशीर हे tds वरून ठरवता येत नाही . आणि दुसरी गोष्ट tds कमी असेल तर जास्त नुकसान होत नाही शरीराला आवशक्य असणारे क्षार आणि मिनरल स अन्ना मधून सुधा मिळतात . त्यामुळे कमी tds चा बावू करायची काही गरज नाही
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 07/02/2019 - 05:21 नवीन
आमच्या सोसायटीत एका इमारतीत एका मजल्यावर ५५० चौ फुटाचे आठ फ्लॅट आहेत. अशा पाच इमारती आहेत. आमच्या गच्चीचं एकूण क्षेत्रफळ ५५०*८*५= २२००० चौ फू आहे. ठाण्यात सरासरी १०० इंच (८ फूट ) पाऊस पडतो. म्हणजे गच्चीवर पडणारे पाणी १,७६,००० घनफूट असते किंवा जवळजवळ ५० लाख लीटर. इतके पाणी साठवून ठेवणे अशक्य आहे. तेव्हा ते जमिनीत जिरवणे हाच मार्ग राहतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 07/02/2019 - 06:04 नवीन
पिण्यासाठी साठी वापरले जाणारे सर्व पाणी हे पावसा पासूनच मिळते . मग पावसाचे पाणी हे पिण्यासाठी योग्य नाही असा लोकांचं गैरसमज का? पावसाचे पाणी हे पृथ्वी वरील सर्व पाण्या पेक्षा शुद्ध असते. पाण्याच्या साखळी मध्ये पावसाचे पाणी हे सर्वात वरच्या स्थानावर असते. सूर्या मुळे पाण्याचे बाष्पीभवन होवून पावसाचे पाणी मिळत(rainwater is pure distilled water evapourted from the sun) नळाचे पाणी Pipe- पाणी शुध्दीकरण प्लांट - तलाव - दऱ्याखोऱ्यंत वाहणारे पाणी आणि सर्वात वरती साखळी मध्ये पावसाचे पाणी . शुद्ध पाण्याची acidity ५-६ pH असते जवळ जवळ सर्व पावसाच्या पाण्याचा ph ५-६ च असतो . पावूस सुरू झाल्या नंतर (सुरवातीचा) २० मिनिट हवेतील प्रदूषित घटक पाण्यात मिसळतात ते पाणी सोडून द्यायचे. आपण रोज हे ज्यूस ,कोल्ड ड्रिंक्स,पितो त्याचा ph २-३ असतो .ते चालत आणि ६ ph असलेले शुद्ध पावसाचे पाणी हानिकारक असे समजून त्या पाण्याला अपायकारक समजतो .
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/02/2019 - 06:38 नवीन
१) पावसाचे पाणी शुद्धच असते. गच्चीचा वापर नसेल तरी पहिलं सोडून द्यायचं. २) टिडिएस म्हणजे विरघळलेले क्षार - क्याल्शम,आयन चे सल्फेटस,क्लोराईड,कारबोनेट्स. नसलले तर उत्तमच. ३) व्यवहार्य म्हणजे - खर्च केलेल्या पैशांत (एकदाच टाकी,पंपाचा खर्च येईल तो) साठलेले पाणी महिनाभर तरी पुरले पाहिजे. ४) आगामी काळात बिल्डरांनी सोसायटीच्या आवारात स्विमिंग पुलाऐवजी टाक्याच बांधल्या (आणि त्यावर मुलांची बाग) तर उपयुक्त. टाकीवरच्या बागा मुंबईत हँगिग गार्डन, बप्टिस्टा गार्डन डॉकयार्ड स्टेशनजवळ आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 07/02/2019 - 10:15 नवीन
गाडी मध्ये ज्या airbag असतात त्याची किंमत कार विकणाऱ्या कंपन्या ३० ते ६० हजार पर्यंत लावत असतील . अपघात होईल तेव्हाच त्या airbag cha उपयोग तोपर्यंत airbag cha कसलाच उपयोग नसतो . पण जेव्हा अपघात होतो तेव्हा त्या airbag chi किंमत लाखो रुपये असते(अशी किमत होवूच शकत नाही जीवाची किंमत अजुन ठरली नाही) तसेच रेन हार्वेस्टिंग च आहे जोपर्यंत पाणी मुबलक उपलब्ध आहे ती पर्यंत खर्च वाया गेला असं वाटतं . पण टंचाई मध्ये त्याच पाण्याची किंमत लाखो रुपये असते
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 07/03/2019 - 02:36 नवीन
ज्यांना शक्य आहे त्यांनी करायला हवेच.
  • Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर गुरुवार, 07/04/2019 - 13:30 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. गतवर्षी फेब्रुवारीच्या महिन्यात आमच्या बदलापूर स्थित १७६ फ्लॅट असलेल्या सोसायटी मध्ये वापराच्या पाण्याची फार बिकट परिस्तिथी होती. सोसायटी च्या आवारात ३ कूपनलिका होत्या, त्यातली एक फार पूर्वी कोरडी पडली होती, व बाकीच्या दोन १० ते १५ मिनिटांच्या अंतराने कोरड्या होत होत्या,एक कूपनलिका साधारण ५०० फुटापेक्षा खोल होती व दुसरी ७०० च्या आसपास. शेवटी सर्वानी मिळून ठरवले कि रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचे. प्लॅनिंग प्रमाणे दोन्ही कूपनलिकांच्या भोवती ६ बाय ६ फूट रुंद आणि १५ फूट खोल खड्डा खोदून त्यात ४ फूट व्यासाच्या एक फूट उंची च्या १५ काँक्रेट रिंग सोडल्या. याला रिचार्ज वेल म्हणतात. रिंग च्या बाहेर च्या बाजूने फिल्टरेशन मीडिया म्हणून कोळसा आणि पेबल्स टाकले. रिंग च्या आतल्या बाजूस ३ फूट नुसते पेबल्स टाकले. कूपनलिका २ च्या शेजारी २ बाय २ रुंद आणि ६ फूट खोल असे दोन पिट बनवले पिट १ मध्ये पेबल्स आणि कोळसा ३ फुटापर्यंत टाकला व पिट २ मध्ये सिलिका आणि जाडी रेती ४ फूट टाकली. दोन्ही पिट वरून एक फुटावर एका ६ इंच व्यासाच्या पीव्हीसी पाईप ने जोडले पाईप च्या मुखाशी नायलॉन जाळी लावली. पिट २ मधून एक ६ इंच पाईप रिचार्ज वेल च्या बाहेर सोडला . जेणेकरून नाळी वाटे वाहून आलेले पाणी पिट क्र.१ मधून फिल्टर होऊन पिट क्र. २ मध्ये जाईल व तिथे फिल्टर होऊन रिचार्ज वेल च्या बाहेर टाकलेल्या फिल्टरेशन मीडिया वर पडेल व दोन रिंग च्या मधल्या बारीक फटींमधून रिचार्ज वेल मध्ये पडेल व कूपनलिकेच्या मुळाशी पाझरेल. कूपनलिका १ च्या बाबतीत थोड्याफार फरकाने असेच केले परंतु पिट न बनवता टेरेस चे पाणी डायरेक्ट एक २००० लिटर च्या सिंटेक्स टाकी मध्ये आणले व तेथून ते एका बंदिस्त नाळी वाटे कूपनलिका एक च्या रिचार्ज वेल मध्ये सोडले. पावसाच्या आधी टेरेस ची सफाई करून घेतली व सोसायटी आवारातले सर्व गटार (जे फक्त पावसाचे पाणी वाहून नेतात) टँकर च्या पाण्याने साफ करून घेतले. त्यात पडलेली माती वर इतर कचरा काढून टाकला. हे सर्व काम साधारण १५ दिवस चालले. पावसाळयात नियमितपणे सिंटेक्स टाकी आणि पिट ची पाहणी होत होती. आश्चर्य म्हणजे या वर्षी जून २०१९ पर्यंत दोन्ही रिचार्ज वेल मध्ये ५ ते ६ फूट पाणी होते. पूर्ण वर्ष भर दोन्ही कूपनलिकांना भरपूर पाणी होते. याच्याच जोडीला आम्ही सोसायटी मध्ये १० झाडे लावली त्यात गुलमोहर निम आणि चाफ्याचा समावेश होता. ४ फुटाची झाडे आता १५ फुटाच्या वर गेलीयत. भूजलावर आपल्या सर्वांचा अधिकार आहेच पण त्याचे संवर्धन करणे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग खरंच व्यवहार्य आहे. प्रकल्प पाहायचा असेल तर संपर्क करावा
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/04/2019 - 14:37 नवीन
स्तुत्य उपक्रम ! भूजलावर आपल्या सर्वांचा अधिकार आहेच पण त्याचे संवर्धन करणे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. +१००० माझ्या सोसायटीने जमिनीत जिरवलेले पाणी फक्त माझ्याच सोसायटीला मिळाले पाहिजे. तसे होत नाही म्हणून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करण्यात अर्थ नाही, असे म्हणणे योग्य नाही. जेव्हा एखाद्या विभागातील सर्वजण आपापल्या सोसायटीत असे उपक्रम करत असतात, तेव्हा त्या सर्व विभागातील भूजलाची पातळी वर येते आणी सर्वांनाच त्याचा फायदा होतो. त्यात विचाराची सीमा केवळ, "माझा फायदा काय", इथपर्यंतच मर्यादीत करू नये. भूजलस्तर वाढविण्यासारख्या सगळ्या उपक्रम-प्रकल्पांकडे, "सार्वजनिक फायदा (कॉमन गुड)", असेच पाहिले पाहिजे आणि "एकमेका करू सहाय्य" अशी भावना मनात धरून कारवाई केली पाहिजे. ****** जरा पुढे जाऊन असे म्हणता येईल की, जरी केवळ स्वार्थी विचार करायचा झाला तर... विभागातल्या सगळ्या / बहुसंख्य सोसायट्यांनी स्वार्थी विचार करून भूजलसंवर्धन प्रकल्प करण्याचे टाळले तर, त्या विभागातल्या भूजलाचा स्तर खूप खाली जाऊन पाण्याची चणचण/अभाव निर्माण होऊन... अ) त्या विभागातील सगळ्यांनाच त्रासदायक परिस्थिती निर्माण होईल आणि आ) त्या विभागातील सगळ्याच सोसायट्यांतील सदनिकांची किंमत कमी होईल. इतर काही नाही तरी, केवळ वरचा स्वार्थी विचार करून तरी प्रत्येकाने हा उपक्रम करायला हवा, नाही का? :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 07/06/2019 - 07:00 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/04/2019 - 15:09 नवीन
आदर्श उदाहरण. फोटोंसह मिसळपाव साइटवर दिल्याने इतर कुणालाही माहिती कायमची उपलब्ध राहणार. @ रघुनाथ.केरकर तुमच्या सोसायटीने समंजसपणे केलेल्या आयोजनाचे फारच कौतुक वाटले. तुम्ही ही सर्व माहिती या लेखात प्रतिसाद म्हणून दिलीत परंतू हा एक स्वतंत्र लेख होऊन सर्वांचे लक्ष वेधण्यास नक्कीच मदत होईल. गुगलवर कुणी शोध घेतला तर तर ही माहिती समोर येईल असे ट्याग ( Tags) दिले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/04/2019 - 15:30 नवीन
आमच्या सोसायटीत एक विहीर आहे. त्याचे पाणी फिल्टर करून पिण्यासाठी योग्य होईल या क्षमतेचे आहे. आमच्या गच्चीत पडलेले पाणी आम्ही या विहिरीत सोडत आलो आहोत. हे पाणी आम्ही बाथरूम संडास मध्ये फ्लश साठी वापरतो. एका घरातील चार माणसे दिवसात पाच वेळेस लघवी आणि एकदा शौचास जातात हे गृहीत धरले तर रोज साधारण एका घरात ४५० लिटर पाणी नुसतेच वाया जाते. सोसायटीत ५६ फ्लॅट आहेत तेंव्हा रोजचे २५००० लिटर पाणी नुसतेच सांडपाणी म्हणून वापरले जात असे. १९७२ सालच्या दुष्काळापासून या विहिरीचे पाणी आम्ही फ्लश साठी वापरत आलो आहोत यामुळे एकतर महापालिकेने शुद्ध केलेले पाणी सांडपाणी म्हणून वापरणे थांबले. शिवाय एवढे पाणी कमी वापरल्यामुळे महापालिकेची पाणीपट्टी तेवढीच वाचते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मुंबईत सर्वत्र काँक्रीटने जमीन आच्छदित केल्यामुळे पावसाचे पाणी थेट गटारात उतरते. पूर्वी हेच पाणी अगोदर जमिनीत धरून ठेवले जात असे त्यामुळे पाऊस जोरात पडला तर लगेचच पाणी तुंबणे असे होत नसे. आता प्रत्येक सोसायटीमध्ये मोकळी जमीन जाऊन नुसते काँक्रीट आले आणि गटारे ताबडतोब तुंबतात. या दोन्ही कारणास्तव मुंबई सारख्या शहरात प्रत्येक पुनर्विकासासाठी पावसाचे पाणी साठवणे सक्तीचे केले आहे. या पाण्याचा वापर पिण्यासाठी करणे अजिबात आवश्यक नाही. परंतु याची टाकी वेगळी असे तर अत्यावश्यक परिस्थिती हे पाणी उकळून नक्कीच पिण्यासाठी वापरता येते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/04/2019 - 17:40 नवीन
आमच्या सोसायटीत एक विहीर आहे. त्याचे पाणी फिल्टर करून पिण्यासाठी योग्य होईल या क्षमतेचे आहे. आमच्या गच्चीत पडलेले पाणी आम्ही या विहिरीत सोडत आलो आहोत. हे पाणी आम्ही बाथरूम संडास मध्ये फ्लश साठी वापरतो. एका घरातील चार माणसे दिवसात पाच वेळेस लघवी आणि एकदा शौचास जातात हे गृहीत धरले तर रोज साधारण एका घरात ४५० लिटर पाणी नुसतेच वाया जाते. सोसायटीत ५६ फ्लॅट आहेत तेंव्हा रोजचे २५००० लिटर पाणी नुसतेच सांडपाणी म्हणून वापरले जात असे. +१०० महानगर पालिकेने शुद्धीकरण केलेले 'तुलनेने किमती पाणी' वाचवण्याचा हा पर्याय जास्त व्यवहार्य, कमी खर्चाचा, प्रकल्प म्हणून सोपा आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण निर्धोक आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/04/2019 - 17:05 नवीन
पुनर्विकास नसला तरी ज्यांना जागा आणि पैशांनी शक्य आहे त्यांनी सुरुवात करायला हवीच. सक्तीपेक्षा समजुतदारपणा दाखवायला हवा.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट गुरुवार, 07/11/2019 - 16:47 नवीन
भारी मांडला आहे विषय असा वेगळा विचार केल्याबद्दल आभार. मी पण पुण्याचे सरासरी पर्जन्यमान पाहीले.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट गुरुवार, 07/11/2019 - 17:03 नवीन
खालील लिंक वर पुण्यात एकूण किती पाऊस पडतो याची सरासरी आकडेवारी दिलेली आहे. http://www.pune.climatemps.com/precipitation.php महिन्याला सरासरी ६१.८ मिमी पाऊस पडतो असे यात म्हटले आहे. वर्षाला ७४१ मिमी. म्हणजे २९.२ ईंच. थोडक्यात अडीच फुटांच्या आसपास. आपण दोन फूट धरूयात. ५०० स्क्वेअर फूट गच्ची असेल तर वर्षभरात १००० घनफूट इतके पाणी जमा होईल. म्हणजेच २८३१६ लिटर्स. एका बंगल्याचं जर आपण बोलत असू तर अलिकडे पुण्याच्या भवतालच्या परिसरार सर्रास टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. याचे मोठे अर्थकारण देखील आहे. इथे ४००० लिटर्सचे टँकर्स चालतात. एका बंगल्याला दिवसाला साधारण ५०० लिटर इतके पाणी लागते. आपण जास्त गृहीत धरूयात. १००० लिटर्स धरू. याचा अर्थ ४ दिवसाला या कुटुंबाला ८०० रू खर्च येतो. तर त्यांचे एकूण सात टँकर्स वाचतील. म्हणजे रूपये ५६०० फक्त. जर दुमजली घर असेल आणि दोन कुटुंबे असतील तर निम्मे पैसेपचास्पच्। एखाद्या ११ मजली इमारतीमधे ५०० स्क्वे फूटाचे फ्लॅट्स एका विंगमधे असतील तर टॉपच्या फ्लॅटवर जेव्हढा एरिया आहे तो खालच्या फ्लॅटमधे विभागला जाईल. ( एकूण जेव्हढी टेरेस असेल त्या त्या खाली तेव्हढेच फ्लॅट्स सुद्धा असतील). म्हणजे आता हे ५६०० रूपये ११ कुटुंबात विभागले जातील. किंवा सात टँकर्स ११ कुटुंबात विभागले जात आहेत. अगदी ११ टँकर्स वाचले असे म्हटले तरी एका कुटुंबाने एक टँकर म्हणजेच प्रति फ्लॅट ८०० रूपये वाचवले असे म्हणता येईल. शासनाच्या दराने ४०० रूपये.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट गुरुवार, 07/11/2019 - 17:12 नवीन
आता दुस-या बाजूने विचार करूयात. आमच्या सोसायटीत एका इमारतीचे ८००० स्क्वे फूट क्षेत्र आहे. अशा दहा इमारती. म्हणजे ८०००० चौफूट. गुणिले २ फूट पाऊस. १६०००० घनफूट. = ४,५३,००० लिटर्स इतके पाणी आमच्या सोसायटीत जमा होऊ शकते. अशा किमान दहा मोठ्या सोसायट्या जवळपासच आहेत. यांचेच पाणी जवळपास ४५ लाख लिटर्स इतके होईल. आमच्या गल्लीचा विचार करायचा तर दुतर्फा अंदाजे विचार केल्यास ते १ कोटी लिटर्स. आमच्या भागातल्या मुख्य रस्त्याला अशा किती गल्ल्या आहेत याची कल्पना नाही. आमचा गल्ली क्र ८० आहे. म्हणजे ८० कोटी लिटर्स. पूर्ण शहराचे किती ? कल्पना नाही. एव्हढे पाणी वाचले तर धरणावर कमी ताण येईल. पाणी वर्षभर पुरेल किंवा वाचलेले पाणी खाली सोडता येईल.
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Sat, 07/20/2019 - 15:33 नवीन
पाणी वाचवणे/अडवणे या साठी प्रयत्नं करतांना लोकांना प्रश्नं पडतात कारण हे का? कितीसं पाणी वाचणार्/वाढणार आहे ? ह्या गोष्टी मनांमधे असतात. पण सोनं वाचवायला सांगीतले तर कोणी प्रश्न विचारीत नाही का? कारण एक ग्राम सोनं वाचवलं तरी रु.३००० मिळतात/वाचतात. जर पाण्ञाची किंमतही अशीच झाली तर आपोआप लोक स्वता पाणी वाचवण्याचे /साठवण्याचे मार्ग शोधुन काढतील. पाणी हे जीवन आहे त्याविना जगु शकत नाही तरी ते अत्यंत स्वस्त आहे . ईतर अनेक गोष्टी ज्यांच्या विना आरामांत जगु शकतो त्या पाण्ञाहुन महाग आहेत आणि गंमत म्हणते त्यातल्या कित्येक बनवण्यासाठी पाणी वापरले जाते. पाणी फुकट / नाममात्र किमतीत सरकारने जनतेला उपलब्ध करुन दिले पाहिजे हा समजच घातक आहे. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनामधे ढिसाळ्पणा आणि भ्रष्टाचार आला . जेवढा पैसा/श्रम पाणी उपलब्ध/शोधणे/ साठी लागतो तवढा लोकांकडुन मिळत नाही. म्हणुन ईतर कामे ज्यांतुन पैसा मिळतो त्यांना प्राथमिकता दिली जाते. काही वर्षांत जेंव्हा पाण्यासाठीमारामारी/युद्धे सुरु होतील तेंव्हा आपोआप पाण्ञाची बचत / रक्षण केले जाईल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 07/20/2019 - 17:08 नवीन
सामायिक वाटप, खप, मालकी ही तीन कारणे यामुळे दुर्लक्ष केलं जातं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 07/20/2019 - 19:47 नवीन
धन्यवाद....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा