ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष
"ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" हे अनेक अंकी दीर्घ नाटक आहे.
ते जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणत नेले जाईल. त्या कालखंडाचा उपयोग गांधी घराण्याच्या पायाखाली आपले स्वत्व अंथरण्यासाठी थोडासाही विरोध कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी केला जाईल (व त्यांचा नि:प्पात केला जाईल)... आणि सरतेशेवटी अध्यक्षपदाची माळ कोण्या एकाच्या गळ्यात घातली जाईल.
त्या उमेदवारीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत...
१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.
२. राहूल गांधी हे तसेही राजकारणासाठी तयार असलेले/होऊ शकणारे व्यक्तिमत्व नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आपले हितसंबंध राखण्यासाठी जमा झालेल्या स्वार्थी कोंडाळ्याने जबरदस्तीने बोहोल्यावर उभे केलेले आणि त्यांच्या पढवणूकीप्रमाणे नाचणारे बाहुले बनण्याचा पुरेसा अनुभव घेतल्यावर, हे आपले काम नाही हे त्यांना समजले असावे. त्यामुळे, त्यांना अध्यक्षपदाचा खरोखरचा कंटाळा आला असणे शक्य आहे. उगा पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा फास सतत गळ्याभोवती ठेवण्याऐवजी; स्वच्छंद, जगभ्रमंतीचे, राजकारणतापहीन पण त्याचबरोबर पक्षामुळे मिळणारे फायदे ओरपण्याचे; सुखासिन पूर्वायुष्य त्यांना खुणावत असल्यास आश्चर्य वाटायला नको.
पण तरीही, कॉन्ग्रेस पक्षामुळे मिळणार्या मोठेपणा, सत्ता व अर्थकारणाची चावी दुसर्यांच्या हाती पूर्णपणे सुपुर्द करण्याइतके ते खुळे नाहीत... आणि त्यांनी तसे करावे म्हटले तरी, त्यांच्या 'मासाहेब' त्यांना तसे करू देणार नाहीत. याशिवाय, ज्यांना स्वबळावर महापालिकेची निवडणूकही जिंकणे शक्य नाही व ज्यांचे सर्वस्व गांधी घराण्याच्या चाकरीवरच अवलंबून आहे असे, 'मासाहेबांचे+युवराचांचे जवळचे शिलेदार', त्यांनी तसे करू नये यासाठी जिवाची बाजी लावतील, हे सांगायलाच हवे काय?
तर मग, युवराज नाही तर पक्षाध्यक्ष कोण होईल? याचे दोन पर्याय होऊ शकतात...
... २.अ) रागांना मनविण्याचे सर्व उपाय थकल्यावर, खुद्द मासाहेबांना गळ घातली जाईल.
* या पर्यायाला रागांचा किंवा जवळच्या शिलेदारांचा विरोध असण्याचा संभवच नाही (काय हिंमत आहे शिलेदारांपैकी कोणी विरोध करण्याची?!). पक्षाध्यक्षपद खुद्द आईच्या हाती असल्यावर, पूर्वीप्रमाणेच दाराआडून पक्षाच्या सत्ता आणि अर्थकारणामध्ये रागांची पाचही बोटे बुडालेली असतीलच !
... २.आ) मासाहेबही थकल्या असल्यास, शिलेदारांपैकी जो सर्वात इमानी, सर्वात नम्र आणि सर्वात मुका (आणि आई-बेटा सोडून इतरांसाठी बहिरासुद्धा) असेल असा एकजण निवडून, त्याला बोहोल्यावर चढवून, रिमोटकंट्रोलने चालवला जाईल. यासाठी, सचीन पायलट, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे, शीला दिक्षित, मीरा कुमार, ए के अॅथनी, इत्यादी अनेक नावे चर्चेत आहेत (पहिल्या वाक्यात दिलेल्या अटी पूर्ण करणार्यांची कमी कॉन्ग्रेसला कधीच भासलेली नाही ;) ) यापैकी, ए के अँथनी, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे हे तिघेही, अनेक कारणांमुळे, गांधी घराण्याशी (खुद्द गांधी परिवारपेक्षा जास्त) इमानी आहेत. त्यांच्यापैकी एक (त्याक्रमाने) निवडला जाईल अशी माझी अटकळ आहे. :)
* या पर्यायालाही मासाहेबांचा किंवा रागांचा विरोध असण्याचा संभव नाही (इतर शिलेदरांच्या विरोधाला विचारतोय कोण?). पक्षाध्यक्षपद रिमोट कंट्रोलने चालणार्या बाहुल्याच्या हाती असल्यावर, युपिए१+२ प्रमाणेच दाराआडून, पक्षाची सत्ता आणि अर्थकारण मायलेकांच्याच ताब्यात असेल ! शिवाय, "यश तेवढे आपले आणि अपयश मात्र दुसर्याचे" या नेहमीच्याच यशस्वी कॉन्ग्रेसी नाटकाचे प्रयोग, भविष्यातही यशस्वीपणे चालवता येतील, हा फार मोठा फायदा नजरेआड करून चालणार नाही. :)
======
अजून काहीसा चर्चेत असलेला तिसरा पर्याय म्हणजे, प्रियांका गांधी-वाद्रा.
* प्रियांकाशी निष्ठा वाहीलेल्या गटाचे जोरदार प्रयत्न चालू असले तरी, त्यांची ताकद फार कमी आहे आणि त्यांची डाळ शिजणार नाही. याशिवाय, त्या नावाला कॉन्ग्रेसमध्ये महत्व देण्यास खुद्द रागांचा विरोध असल्याचे मागील काही वर्षांच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय, जावयाच्या विक्रमी उपक्रमांमुळे वाद्रा या नावामागे असलेली वादग्रस्तता आड येईल, हेवेसांन. तसेच, गांधी नाव मागे पडून वाद्रा नाव पुढे येण्याची आणि पुढेमागे गांधी मायलेकांचीच गच्छंती होण्याची शक्यता, मायलेकांना (आणि त्यांच्या हुजर्यांनाही), परवडणारी नाही. तेव्हा माझ्या मते हा पर्याय सुरुवातीलाच बाद आहे.
१. पक्षाला टांगणीला लावून, पक्षाध्यक्ष रागा त्यांच्या रिवाजाप्रमाणे, परदेशात निघून गेले आहेत.-- राहूल गांधींना परदेशात जायची इतकी घाई झाली होती, की काल खासदारपदाची शपथ धेतल्यानंतर सही करायला देखील त्यांच्याकडे वेळ नव्हता. .....'लोकशाहीच्या भल्यासाठी एक भक्कम विरोधी पक्ष असायलाच हवा' असा सतत गळा काढणार्या 'तथाकथित' विचारवंतांना किंवा इतर पक्षांच्या नेत्यांनाही त्याबद्दल काय म्हणावे हे सुचत नाही आणि ते तोंडात गुळणी धरून बसल्याचे नाटक करत आहेत. इतर कोण त्याबाबत काही बोलले तर, 'तो पक्षाचा अंतर्गत मामला आहे' हा हुकुमाचा एक्का असलेला मुद्दा आहेच ! मात्र तो मुद्दा मांडताना, (अ) कॉन्ग्रेस स्वतःला राष्टिय स्तरावरचा पक्ष आहे व (आ) सद्या लोकसभेत खासदारांच्या संखेनुसार दुसर्या क्रमांकाचा पक्ष आहे... त्यामुळे कोणत्याही भारतियाला त्या पक्षाच्या अवस्थेबद्दल (किंबहुना, दुरावस्थेबाबत) बोलायचा आणि काळजी व्यक्त करायचा हक्क आहे, हे ते महोदय (सोईस्कररित्या) डोळ्याआड करत आहेत.हे इतक्या लौकर इथे मिपावरही सिद्ध होईल असे वाटले नव्हते. =)) सजग नागरिकांनी सरकारवर नजर ठेवून त्याला सरळ मार्गावर राहण्यास जेवढे भाग पाडायचे असते, तेवढेच विरोधी पक्षांना त्यांच्या वैधानिक जबाबदार्यांची जाणीव करून देण्याची गरज असते. मुख्य म्हणजे, "निवडणूक हरले म्हणून आता विरोधी राजकीय पक्ष आराम आणि मजा करायला मोकळे झाले, आता त्यांच्यावर काहीच जबाबदारी नाही. त्या बिच्च्यार्यांना पाच वर्षे मोकळे सोडा." असा (वेडगळपणे किंवा (विरोधी पक्षाच्या पाठिराख्यांनी) हेतुपुर्रसर चलाखपणे) विचार न करता, "विरोधी पक्षांवर आता सकारात्मक कृती करून सरकारला सरळ मार्गावर ठेवण्याची जबाबदारी आहे", हा विचार जेथे रुजलेला असतो, तेथेच उत्तम लोकशाही व्यवस्था बनते. पूर्णविराम. मात्र, ती जबाबदारी म्हणजे, केवळ "विरोधी पक्षांनी बेजबाबदार आणि खोटी विधाने/कृती करून सरकारला जेरीस आणणे" नव्हे, हे सुद्धा नागरिकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे... नाहीतर देशाच्या विकासाला खीळ लावण्याचे पाप, विरोधी पक्षांइतकेच, नागरिकांच्याही माथी असेल.गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर राहुल गांधींनी मला तर काश्मिर प्रश्ना संबंधात बोलवण्यात आले होते हे सांगुन थांबले असते तर राहुल गांधी कसले त्यांनी काश्मिर मध्ये हिंसक घटनेच्या बातम्या असल्याची पाकीस्तान्यांना शोभेलशी संतापजनक भाषा वापरली.हे सुद्धा नेहमीचे झाले आहे. रागांनी एखाद्या मुद्द्यावर पाकिस्तानची तळी उचलली नाही तर ती "अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट" असेल. त्यांचे हे पाकिस्तानला सोईचे बोलणे/वागणे, राजकिय विरोधाच्या सीमा ओलांदून जाणारे आहे... त्याबद्दल काही प्रवाद आहेत, पण ते बोलायची ही वेळ व स्थळ नाही.