Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष

ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/29/2019 - 11:46
🗣 67 प्रतिसाद
"ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" हे अनेक अंकी दीर्घ नाटक आहे. ते जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणत नेले जाईल. त्या कालखंडाचा उपयोग गांधी घराण्याच्या पायाखाली आपले स्वत्व अंथरण्यासाठी थोडासाही विरोध कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी केला जाईल (व त्यांचा नि:प्पात केला जाईल)... आणि सरतेशेवटी अध्यक्षपदाची माळ कोण्या एकाच्या गळ्यात घातली जाईल. त्या उमेदवारीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत... १. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील. २. राहूल गांधी हे तसेही राजकारणासाठी तयार असलेले/होऊ शकणारे व्यक्तिमत्व नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आपले हितसंबंध राखण्यासाठी जमा झालेल्या स्वार्थी कोंडाळ्याने जबरदस्तीने बोहोल्यावर उभे केलेले आणि त्यांच्या पढवणूकीप्रमाणे नाचणारे बाहुले बनण्याचा पुरेसा अनुभव घेतल्यावर, हे आपले काम नाही हे त्यांना समजले असावे. त्यामुळे, त्यांना अध्यक्षपदाचा खरोखरचा कंटाळा आला असणे शक्य आहे. उगा पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा फास सतत गळ्याभोवती ठेवण्याऐवजी; स्वच्छंद, जगभ्रमंतीचे, राजकारणतापहीन पण त्याचबरोबर पक्षामुळे मिळणारे फायदे ओरपण्याचे; सुखासिन पूर्वायुष्य त्यांना खुणावत असल्यास आश्चर्य वाटायला नको. पण तरीही, कॉन्ग्रेस पक्षामुळे मिळणार्‍या मोठेपणा, सत्ता व अर्थकारणाची चावी दुसर्‍यांच्या हाती पूर्णपणे सुपुर्द करण्याइतके ते खुळे नाहीत... आणि त्यांनी तसे करावे म्हटले तरी, त्यांच्या 'मासाहेब' त्यांना तसे करू देणार नाहीत. याशिवाय, ज्यांना स्वबळावर महापालिकेची निवडणूकही जिंकणे शक्य नाही व ज्यांचे सर्वस्व गांधी घराण्याच्या चाकरीवरच अवलंबून आहे असे, 'मासाहेबांचे+युवराचांचे जवळचे शिलेदार', त्यांनी तसे करू नये यासाठी जिवाची बाजी लावतील, हे सांगायलाच हवे काय? तर मग, युवराज नाही तर पक्षाध्यक्ष कोण होईल? याचे दोन पर्याय होऊ शकतात... ... २.अ) रागांना मनविण्याचे सर्व उपाय थकल्यावर, खुद्द मासाहेबांना गळ घातली जाईल. * या पर्यायाला रागांचा किंवा जवळच्या शिलेदारांचा विरोध असण्याचा संभवच नाही (काय हिंमत आहे शिलेदारांपैकी कोणी विरोध करण्याची?!). पक्षाध्यक्षपद खुद्द आईच्या हाती असल्यावर, पूर्वीप्रमाणेच दाराआडून पक्षाच्या सत्ता आणि अर्थकारणामध्ये रागांची पाचही बोटे बुडालेली असतीलच ! ... २.आ) मासाहेबही थकल्या असल्यास, शिलेदारांपैकी जो सर्वात इमानी, सर्वात नम्र आणि सर्वात मुका (आणि आई-बेटा सोडून इतरांसाठी बहिरासुद्धा) असेल असा एकजण निवडून, त्याला बोहोल्यावर चढवून, रिमोटकंट्रोलने चालवला जाईल. यासाठी, सचीन पायलट, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे, शीला दिक्षित, मीरा कुमार, ए के अ‍ॅथनी, इत्यादी अनेक नावे चर्चेत आहेत (पहिल्या वाक्यात दिलेल्या अटी पूर्ण करणार्‍यांची कमी कॉन्ग्रेसला कधीच भासलेली नाही ;) ) यापैकी, ए के अँथनी, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे हे तिघेही, अनेक कारणांमुळे, गांधी घराण्याशी (खुद्द गांधी परिवारपेक्षा जास्त) इमानी आहेत. त्यांच्यापैकी एक (त्याक्रमाने) निवडला जाईल अशी माझी अटकळ आहे. :) * या पर्यायालाही मासाहेबांचा किंवा रागांचा विरोध असण्याचा संभव नाही (इतर शिलेदरांच्या विरोधाला विचारतोय कोण?). पक्षाध्यक्षपद रिमोट कंट्रोलने चालणार्‍या बाहुल्याच्या हाती असल्यावर, युपिए१+२ प्रमाणेच दाराआडून, पक्षाची सत्ता आणि अर्थकारण मायलेकांच्याच ताब्यात असेल ! शिवाय, "यश तेवढे आपले आणि अपयश मात्र दुसर्‍याचे" या नेहमीच्याच यशस्वी कॉन्ग्रेसी नाटकाचे प्रयोग, भविष्यातही यशस्वीपणे चालवता येतील, हा फार मोठा फायदा नजरेआड करून चालणार नाही. :) ====== अजून काहीसा चर्चेत असलेला तिसरा पर्याय म्हणजे, प्रियांका गांधी-वाद्रा. * प्रियांकाशी निष्ठा वाहीलेल्या गटाचे जोरदार प्रयत्न चालू असले तरी, त्यांची ताकद फार कमी आहे आणि त्यांची डाळ शिजणार नाही. याशिवाय, त्या नावाला कॉन्ग्रेसमध्ये महत्व देण्यास खुद्द रागांचा विरोध असल्याचे मागील काही वर्षांच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय, जावयाच्या विक्रमी उपक्रमांमुळे वाद्रा या नावामागे असलेली वादग्रस्तता आड येईल, हेवेसांन. तसेच, गांधी नाव मागे पडून वाद्रा नाव पुढे येण्याची आणि पुढेमागे गांधी मायलेकांचीच गच्छंती होण्याची शक्यता, मायलेकांना (आणि त्यांच्या हुजर्‍यांनाही), परवडणारी नाही. तेव्हा माझ्या मते हा पर्याय सुरुवातीलाच बाद आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 36715 views

🗣 चर्चा (67)
श
श्वेता२४ Wed, 05/29/2019 - 12:26 नवीन
पृथ्वीराज चव्हाण होतील का? ते इथे सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 06/01/2019 - 20:01 नवीन
वा वा .. तुम्ही पण माझ्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थक आहात असे दिसते.. आता खुद्द चव्हाणांची महत्वाकांक्षा कधी जागी होते ते बघायचंं, यावेळी त्यांनी लोकसभा लढवण्यात रस नाही असं सांगितलं..
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Wed, 05/29/2019 - 12:33 नवीन
प्रियांका वडेरा पुढील अध्यक्ष होण्याची पुरेपूर संधी आहे ..
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 05/29/2019 - 13:52 नवीन
वर उल्लेखलेल्या इतर नावाना पक्षातंर्गत विरोध आहे. शिवाय आत्ताच आलेल्या बातमीनुसार रॉबर्ट वाड्राला पोटात ट्यूमर असल्याची माहिती पुढे आलेली आहे. देशसेवा करताकरता आमच्या ह्यांना हा जीवघेणा आजार झाला असा आक्रोश करायला बाईना बरे पडेल. तरीही रागाला पायउतार नाही होऊ देणार कॉंग्रेसी असेच वाटते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 05/29/2019 - 14:10 नवीन
२. राहूल गांधी हे तसेही राजकारणासाठी तयार असलेले/होऊ शकणारे व्यक्तिमत्व नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे.
हे विधान खुप आवडलंय. लेख आणि समस्या परफेक्ट मांडलीय काँगीचा यंग लीडरशिप डेव्हलोपमेंट बद्दल काहीच धोरण नाहीय. आणि याच वेळी भाजपने कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज वापरत, मोदी कार्ड पुढे केले होते, आता कर्नाटकात तेजस्वी सूर्यासारखा तरणाबांड धडाडीच्या युवकाला संधी देऊन पक्षाची कॉर्पोरेट रोडमॅप आखणी केलीय ! या डायनॅमिक्स मुळे इतर पक्षातले नेतृत्व सुद्धा भाजपाची दारं ठोठावत आहेत. आता काँगी लोक असला विचार तरी करू शकणार आहेत का ? बरं, कन्हैया छाप सारखे लोक देखील काही प्रभाव पाडू शकलेले नाहीत ! एकंदरीत अशीच ढकल गाडी चालू ठेवतील अन काही कालावधी नंतर काँग्रेस नामशेष होईल यात काही शंका नाही.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 05/29/2019 - 14:21 नवीन
आमेन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 05/29/2019 - 14:31 नवीन
२.अ) खुद्द मासाहेबांना गळ घातली जाईल. हा पर्याय व्यवहार्य वाटत नाही. कारण कर्करोगासारख्या जीवघेणा आजार झाल्यामुळे मासाहेब फारशा बाहेर पडत नाहीत. तेंव्हा एवढी मोठी जबाबदारी घेण्यास त्यांना वैद्यकीय दृष्ट्या परवानगी मिळेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Wed, 05/29/2019 - 14:39 नवीन
काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये विलीन करून टाकावी आणि पवार साहेबांना अध्यक्ष करावे. मम्मी : अरं पप्या बाळा, तू पार्टीबद्दल कायी विचार केलायस का न्हायी? पप्या : अगा आये, आत्ताच आपुन हरलो आणि लगोलग पार्टी करनं बरं दिसलं व्हय ! भाजप (मनात विचार करताना) : अगं गुनाचं बाळ त्ये रावल्या ! तूच राह बरं का अध्यक्ष परत. लै ह्यूमरस हाईस... म्हात्रे सर, हा रिडंडंट धागा काढण्याचे काय प्रयोजन. त्यापेक्षा मस्तपैकी झक्कास प्रवासवर्णन येउद्या.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/29/2019 - 17:14 नवीन
पूर्वेतिहास आणि आपापली विचारशक्ती वापरून विश्लेषण करून मिपाकरांनी आपापले भविष्यासंबंधीचे होरे बांधावे आणि इथे मांडावे. व्यवहारात ती घटना घडल्यावर आपल्या निर्णयप्रक्रियेचे आणि निर्णयाचे विश्लेषण करावे... हा मस्तं अनुभव असेल आणि तो भविष्यात अनेक वैयक्तिक व सामाजिक निर्णय करताना कामी येईल. इतकाच सीमीत हेतू या धाग्यामागे आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 05/29/2019 - 16:27 नवीन
काँग्रेसचे पुढील अध्यक्ष श्री. रेहान गांधी असतील. आदरणीय राहूल गांधीजी लग्न करणार नाही आणि आपले भाचे मा. श्री. रेहान वाड्रा यांना दत्तक घेतील आणि त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवतील.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/30/2019 - 06:58 नवीन
काँग्रेससारख्या पक्षावर हि वेळ येणारच होती. बर्‍या-वाईट अश सर्वच समाजघटकांच्या प्रचंड मंथनातुन ह्युमन रिसोर्सचा पुरवठा करणारी (रा.स्व.संघाचं योगदान असलेली) यंत्रणा वापरणारी भाजपाची प्रतिस्पर्धी कोण? तर एका परिवाराची लिमीटेड कंपनी असलेली काँग्रेस. सामना या वळणावर येणारच होता. एकानुचालकवर्तीत सिस्टीमची प्रगती आणि अधोगती सारख्याच वेगाने होत असते. भाजपची मातृसंस्था एकानुचालकवर्तीत असली तरी तिच्या शिर्शस्थ स्थळावर पोचायला प्रचंड कस लागतो. किंबहुना हेच तिचं बलस्थान आहे. ते गुण आपोआप भाजपात उतरतात. काँग्रेसची स्थिती नेमकी उलट. कुठल्यातरी स्वरुपात सेवादल टाईप संस्थेचं पुनरज्जीवन झाल्याखेरीज काँग्रेसला गत्यंतर नाहि.
१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.
सध्यातरी हाच पर्याय निवडला जाईल असं वाटतय.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/30/2019 - 06:58 नवीन
काँग्रेससारख्या पक्षावर हि वेळ येणारच होती. बर्‍या-वाईट अश सर्वच समाजघटकांच्या प्रचंड मंथनातुन ह्युमन रिसोर्सचा पुरवठा करणारी (रा.स्व.संघाचं योगदान असलेली) यंत्रणा वापरणारी भाजपाची प्रतिस्पर्धी कोण? तर एका परिवाराची लिमीटेड कंपनी असलेली काँग्रेस. सामना या वळणावर येणारच होता. एकानुचालकवर्तीत सिस्टीमची प्रगती आणि अधोगती सारख्याच वेगाने होत असते. भाजपची मातृसंस्था एकानुचालकवर्तीत असली तरी तिच्या शिर्शस्थ स्थळावर पोचायला प्रचंड कस लागतो. किंबहुना हेच तिचं बलस्थान आहे. ते गुण आपोआप भाजपात उतरतात. काँग्रेसची स्थिती नेमकी उलट. कुठल्यातरी स्वरुपात सेवादल टाईप संस्थेचं पुनरज्जीवन झाल्याखेरीज काँग्रेसला गत्यंतर नाहि.
१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.
सध्यातरी हाच पर्याय निवडला जाईल असं वाटतय.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/30/2019 - 06:58 नवीन
काँग्रेससारख्या पक्षावर हि वेळ येणारच होती. बर्‍या-वाईट अश सर्वच समाजघटकांच्या प्रचंड मंथनातुन ह्युमन रिसोर्सचा पुरवठा करणारी (रा.स्व.संघाचं योगदान असलेली) यंत्रणा वापरणारी भाजपाची प्रतिस्पर्धी कोण? तर एका परिवाराची लिमीटेड कंपनी असलेली काँग्रेस. सामना या वळणावर येणारच होता. एकानुचालकवर्तीत सिस्टीमची प्रगती आणि अधोगती सारख्याच वेगाने होत असते. भाजपची मातृसंस्था एकानुचालकवर्तीत असली तरी तिच्या शिर्शस्थ स्थळावर पोचायला प्रचंड कस लागतो. किंबहुना हेच तिचं बलस्थान आहे. ते गुण आपोआप भाजपात उतरतात. काँग्रेसची स्थिती नेमकी उलट. कुठल्यातरी स्वरुपात सेवादल टाईप संस्थेचं पुनरज्जीवन झाल्याखेरीज काँग्रेसला गत्यंतर नाहि.
१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.
सध्यातरी हाच पर्याय निवडला जाईल असं वाटतय.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/30/2019 - 07:03 नवीन
आमच्या प्रतिसादाची इतकी दखल का घेतय मिपा? चक्क तीनदा पडला प्रतिसाद :ड सं.मं, कृपया डुप्लीकेट प्रतिसाद डिलीट करावे.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 05/30/2019 - 07:10 नवीन
म्हणतात ते हेच, आपण संघाचे मूल्य मापन करताना केवळ एका घरातल्या म्हणून नेतेपदी निवडला जातो असं नाही हेच सूचकपणे सांगितले त्याबद्दल कौतुक. नाहीतर संघ कसा विटाळ असल्यासारखे अस्पर्ष आणि त्याज्य ही भूमिका मांडण्यासाठी मिपावर अहमहमिका लागली असं वारंवार पाहिले आहे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 05/30/2019 - 07:38 नवीन
अरे काय लावलंय, संपल्या की निवडणुका. काय गरज आहे काँग्रेसने कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायला पाहिजे त्याची चर्चा करायची आणि एकूणच काँग्रेस कशी एका कुटुंबासाठीच राबते हे सांगायची? इलेक्शनमध्ये काँग्रेस आली असती तर निदान त्यांचा अध्यक्ष पंतप्रधान बनुन आपल्या आयुष्यावर परिणाम करता झाला असता. त्यांची लायकी जनताजनार्दनाने दाखवली आहेच की. नीट विरोधी पक्षनेतेपदही मिळायची बोंब. हे म्हणजे माधुरी दिक्षीतने आता कुणाला सेक्रेटरी निवडावे पिक्चर मिळवण्यासाठी अशी चर्चा झाली. संपला तो काळ. कुणीही काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरी फारसा लगेच दिसणारा फरक पडणार नाहीये आणि त्याचा परिणाम आपल्यावर व्हायला तर अजुन वेळ लागणार आहे. जनतेचा कौल मागायचाच असेल तर जनतेने ऑलरेडी त्यांना दिलाय. अजुन कशाला त्यांना सल्ले? काही जणांना सशक्त लोकशाहीसाठी सशक्त विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच हवी असा फुकट कळवळा आलाय. अरे जनतेनेच नाकारलीय ती व्यवस्था तर आता काय उरावर बसवता काय? आणि मिपावर कशाची अहमहिका कधी दिसली नाही? सध्या चाललीय ही कशाची अहमहिका आहे? बाकी ज्या अस्पर्श संघाचे गुणगान गायले जाते त्याच्या सर्वोच्चपदाच्या नेमणुकासंदर्भात झालीय का कधी चर्चा, किंबहुना ऐकू तरी आलीय का? कोण निवडते त्यांना? कशा बेसिसवर? प्रथम आणि द्वीतीय वगळता बाकी सरसंघचालकाबाबत दहा दहा ओळींचा निबंध लिहिता येईल इतकी तरी माहिती आहे का? आणि निघाले तळी उचलायला. प्रचार अजुन डोक्यातून उतरायला तयार नाहीये किंवा काही अजुन अपेक्षा आहेत इतकाच अशा धाग्यांचा मतितार्थ. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/31/2019 - 06:10 नवीन
अभ्या लेका, २०२४ च्या वरातीत सुद्धा प.नेहरू टू राहुल गांधी आणि साठ वर्षात गाजलेली बिनाका गीत मालातीलच गाजलेली गाणी वाजवल्या जातील. आणि लोक त्याही वरातीत नागीन डॅन्स करुन 'यही बजा' 'हेच लाव' 'बस एवढं एकच गाणं' 'कैसा नै लगाता' 'चल बजा' म्हणतील अशा वेळी तुम्ही कितीही वरातीची गाडी पुढं घ्या म्हटलं तरी गाडी एक इंचही पुढं सरकत नसते. कारण तो उन्मादच तसा असतो .. अशा वेळी आपण गप्प मंडपात जाऊन बसलं पाहिजे असं म्हणावे वाटतं. ता.क. अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगीरी आहेच. -दिलीप बिरुटे (उन्हाळ्यातल्या पै पाहुण्याच्या लग्नातला त्रस्त पाहुणा)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 05/31/2019 - 06:25 नवीन
काँग्रेसच्या वरातीत राहुलबाबाच जर गुढग्याला बाशिंग बांधुन नवरदेव म्हणुन घोडीवर बसला तर नगिन डान्स नक्की होईल. त्यांच्या वरातीत लाईटींग वगैरे धरायला काहि ठरावीक लोकांची मांदियाळी असतेच. तेवढीच करमणुक.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sat, 06/01/2019 - 10:04 नवीन
अभ्या लेका दंडवत घे, जबरदस्त प्रतिसाद. मेलेल्याला अजून मारायच्या वृत्तीची मनापासून चीड आली, त्यात मिसळपाव वरील मोजक्या आदर असलेल्या व्यक्ती सामील बघून तर अजून जास्ती खेद वाटला साला.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/01/2019 - 11:06 नवीन
@उपेक्षित (कोणत्याही) घराणेशाहीत एवढी भावनिक गुंतवणूक कशी होते ? ( हा प्रश्न दुसर्‍या धाग्यातून्ही माझ्याकडून उपस्थित केला गेलाय त्याच्या पुनरावृत्तीसाठी क्षमस्व) आणि अभ्या रावांसाठी
...संघाचे गुणगान गायले जाते त्याच्या सर्वोच्चपदाच्या नेमणुकासंदर्भात झालीय का कधी चर्चा..,
संघाच्या सर्वोच्चपदावर सर्वजाती धर्मांना समान संधी असावी असे माझ्याकडून एका मिपा धाग्यात मांडून झाले आहे. इतरांचे माहित नाही पण संघ भाजपाने याचा विस्तार करावा आणि रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ? असे धागेही माझ्याकडून काढून झाले आहेत .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 06/01/2019 - 16:43 नवीन
@माहीतगारसाहेब, उपेक्षितरावांसाठी विचारलेला प्रश्न आणि मला दिलेला रेफरन्स ह्या दोन्हीबद्दल मला वाटते ते लिहितो. कमीजास्तीबद्दल अग्रिम माफी. (कोणत्याही) घराणेशाहीत एवढी भावनिक गुंतवणूक कशी होते ? एखादा माणसाच्या मताला इतके पोलराईज्ड करण्याचा हा आपला अश्लाघ्य प्रयत्न आहे, खासकरुन त्या प्रतिसादाआधीच उपेक्षितरावांचा प्रतिसाद आला असताना. अगदी भांडणे चालू असताना एखादा जखमी होऊन हार पत्करता झाला तर प्रतिस्पर्धी किंवा त्याचे पाठिराखे त्याच्यावर परत हल्ला करत नसतात. किंवा त्या जखमी पराभुताबद्दल जे कुणी बोलतात, बाजू घेतात ती त्याखेळाडूबद्दल गुंतवणूक नसते. एक साधा माणुसकीचा प्रकार असतो. आणि मी, उपेक्षितराव तेच म्हणताहोत. मेलेल्याना मारणे आहे हा धागा म्हणजे. किंबहुना असे जे कुणी करणार नाहीत ते एका घराण्यालाच निष्ठा वाहिलेले आहेत असे मत व्यक्त करणे म्हणजे सरळ सरळ आरोप आहे. त्याशिवाय का असा प्रश्न येतो? बाकी आपल्या त्या दोन उपरोल्लेखित धाग्यामध्ये माझे मत चार पाच प्रतिसादात आहेच. ते परत वाचल्यास आपणास माझ्या मताचा अंदाज येईल आणि पुनरावृत्ती टाळली जाईल. अजुन एक गोष्ट नमूद करु इच्छितो, त्या दोन्ही धाग्यात आपण म्हणता तसे "संघाच्या सर्वोच्चपदावर सर्वजाती धर्मांना समान संधी असावी" ह्या एका मुद्द्यावरच काही निष्पन्न झालेले तथ्य असेल तर कृपया ते थोडक्यात इथेच विषद करावे ही नम्र विनंती. . . अवांतर टाळण्याबद्दल, लिंका न देण्याबाबत, गोल गोल फिरुन मुख्य उत्तर टाळण्याबद्दल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादातून माझा राजकीय कल न ठरवण्याबद्दल अग्रिम धन्यवाद.
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sun, 06/02/2019 - 10:16 नवीन
अगदी मनातील बोललास अभ्या, साला आम्हाला कधी जमायचं काय माहित इतके मुद्देसूद मांडणी कारण. बाकी अभ्या उपेक्षित राव नको म्हणूस राव म्हातारा झाल्यासारखं वाटतंय :) आपण एका जहाजातीलच आहोत लेका वायीस पुढ माग असू :) आता वळूयात माहितगार यांच्याकडे, माहितगार साहेब थोड अवांतर उत्तर देतोय पण गोड मानून घ्या. सर्वात आधी मला एक कळत नाही कि नेत्यांच्या मुलांनी राजकारणाकडे करियर म्हणून पहिले तर काय बिघडले ? अहो साधे उदाहरण एखाद्या माणूस business करतोय तर अहजीकच त्याची पोर (सरसकट नाही) पुढे धंद्यात येतातच आणि असू दे कि घराणेशाही (जोवर ती नुकसान करत नाही तोवर) काय बिघडतंय त्याने. आताशा पक्षनिष्ठा/ विचारसरणी या गोष्टी हास्यास्पद आहे आता पक्ष म्हणजे खाडी कंपनी असते चांगले प्याकेज द्या / पोस्ट द्या नायतर म्या चाललो शेजारच्या कंपनीत अस चाललंय बघा. आत्ताची BJP पहिली तर तिला मी नाव देईन "भारतीय जनता पक्षातील #राष्ट्रवादी #खान्ग्रेस" बघा पटतंय का. अभ्या लेका ते राव च बघ काय ते पुढच्या पोष्टीच्या वेळी. :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 06/02/2019 - 11:50 नवीन
बसू एकदा भावा ;) जरा मुद्देसूद मांडणी करू आणि ठरवू. काय म्हणतो?
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Wed, 06/05/2019 - 10:33 नवीन
चालतंय कि पंढरीला भेटू सोलापुरास्न काय जास्ती लांब नाही पंढरपूर, नाहीतर तू पुण्याला आलास कि नक्की मेसेज टाक.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 06/02/2019 - 12:47 नवीन
बघा पटतंय का.
*कसं काय पटायच ? :) * = प्रत्यके गोष्टीवर !
आत्ताची BJP पहिली तर तिला मी नाव देईन "भारतीय जनता पक्षातील #राष्ट्रवादी #खान्ग्रेस"
आता समजा उपरोक्त किंवा अशा प्रकारची टिका समजा BJP भाजपा काळाच्या ओघात जेव्हा केव्हा हारेल त्यानंतर तुम्ही केली तर तुमचे टिका करण्याचे स्वातंत्र्य नाकारायचे का ? घराणेशाहीची बाजू अभ्यारावांनीही घेतली त्यावर आपण 'चीड', 'खेद' वगैरे भावनांची फोडणी सुद्धा दिलीत. बरे या सर्व भावना निवडणूकीत शब्दशः मृत्यूमुखी पडलेल्या (कोणत्याही/सर्व पक्षीय) सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी उतू जाताहेत असेही नाही. थोरामोठ्यांच्या पोराने जरासा अबोला धरलेला आणि त्यात नाटकबाजी किती हेही माहित नाही अगदी मैदान सोडून पळालाय असेही नाही. धागा लेखकाने लेख लिहून ४८ तासही झालेले नाही मातोश्रीच संसदीय दलचे नेतृत्व करतील याची बातमी येते! एकवेळ कम्यूनीस्ट पक्षाची निवडणूकीत पार वाताहात झाली किंवा या निवडणूकीत राजकीय कारकीर्द संपलेल्या डझनभर वयस्कर नेत्यांची नावे पत्रकार शेखर गुप्तांनी वाचली. जन्मतःच जनतेच्या लाडकेपणाचा जन्मसिद्ध हक्कघेऊन जन्मलेल्यापैकीच असलेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना आणखी सहा-आठ लोकसभा लढवण्याची संधी आहे. मिपावरील धागा किंवा प्रतिसाद लेखकाच्या टिकेने कोणाच्या राजकीय कारकिर्दी बनत नाहीत आणि संपत नाहीत की त्यांच्या लेखन आणि विचार स्वातंत्र्यावरच आक्षेप नोंदवावेत. उपेक्षितसाहेब आपण स्वतःच नोंदवता की विचारसरणीं शुद्ध स्वरुपात शिल्लक नाही मग आपल्या भावनातून जी काही बांधली जाते ती केवळ व्यक्ती आणि घराणे पूजा नव्हे काय. कोणत्याही व्यक्तिंच्या कृती आणि विचार अथवा घराणी कोणतीही पुस्तके कोणतेही राजकीय पक्ष आपण म्हणतातसे अगदी इतिहासात अस्तंगत झाले तरी टिकेच्या बाहेर का असावेत ? आणि जे खर्‍या अर्थाने अद्याप राजकीय दृष्ट्या अस्तंगत झालेलेच नाहीत त्यांच्या एखाद दोन माघारिंनी लगेच अश्रू ढाळून अहो त्यांना असे कसे म्हणताहो ? घराणेशाहीतील एखाद्या व्यक्तीचे समर्थन वेगळे आपल्या दोघांच्या प्रतिसादानंतरही मला यातील भावनिक गुंतवणूकीचा उलगडा झालेला नाही. मोहनदास गांधींच्या नेतृत्वा खालील काँग्रेसला जनतेचा पाठींबा मिळाला कारण त्यांनी काँग्रेसपक्ष आणि त्याची उद्दीष्ट्ये सर्वसामान्याम्ची आणि लोकशाहीच्या आश्वासनासहीत दिली. लोकशाहीची बेसिक व्याख्याच लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य अशी आहे. ज्या क्षणी लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य या व्याख्येस तडा जातो त्या क्षणी लोकशाहीत सहभागी व्यक्तींचा आणि लोकशाही संकल्पनेचा घोर अपमान होत असतो. व्यापार किंवा संपत्तीतील इनहेरीटन्सशी तुलना करून राजकारणातील घराणेशाहीचे समर्थन हे मागच्या दाराने केलेले सरंजामशाही आणि राजेशाहीचे मागच्या दाराने केलेले समर्थन असते. जन्माने झालेला राजा आणि लोकांनी निवडलेला राजा यात राजेशाही आणि लोक्शाहीतील फरक असतो. लोक जन्माने असलेल्या राजपुत्रासच राजाची माळ घालत राहीले तर लोक्शाहीचा उद्देश संपलेला असतो. मग उघड डोळ्याने सरंजामशाही आणि राजेशाहीच राबवा लोकशाहीचे नाटक वठवण्याची मुदलात गरजच काय. एखादी व्यक्ती सर्वसामान्यामध्ये जन्मून सर्वसामान्यांच्या सोबत टक्के टोणपे खाल्ली नसेल बहुसंख्य सर्वसामान्यांची संस्कृती सर्वसामान्यांमध्ये राहून जगली नसेल अशा व्यक्तिस सर्वसामान्यांबद्दल समजा खरा कळवळा आहे तरीही प्रत्येक बारकावा प्रत्येक भावना कशी समजू शकेल. जे आमच्या बांधवांसोबत सर्वसामान्य टक्के टोणपे खात वाढलेच नाहीत त्यांनीच आमच्या देशाचे निर्णय घ्यायचे तर इंग्रजही वाईट नव्हते, १९४७ मध्ये घालवलेले सरंजामदार राजवाडेही वाईट नव्हते, बाबरही वाईट नव्हता आणि अलेक्झांडरही. पण एव्हाना भारतातील लोक्शाहीने अद्याप दम तोडलेला नाही. आमच्या देश चालवलेल्या, चालवणार्‍या आणि चालवू शकणार्‍या राजकीय पक्षाचे अधिकृत कार्यकर्ते आम्ही भले नसू आमचा देश चालवण्याची त्यांची इच्छा होती किंवा असेल एवढ्या एवढ्या एका कारणाने त्यांच्या राजकीय योग्यतेची यथासांग चिकित्सा करणे एक भारतीय नागरीक म्हणून प्रत्येक भारतीय नागरीकाचा जन्मसिद्ध अधिकारच नव्हे तर कर्तव्य सुद्धा आहे, आणि या अनुषंगाने लेखन स्वातंत्र्यावर पडद्या आडूनही मर्यादा आणण्याची साधी इच्छाही व्यक्त केलीगेली तरी त्यातील तार्कीक उणीवांची चिकित्सा आम्ही अशीच परत परत करू अशी संधी देण्यासाठी आपल्या दोघांचेही अनेक आभार.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 06/02/2019 - 13:16 नवीन
"संघाच्या सर्वोच्चपदावर सर्वजाती धर्मांना समान संधी असावी" ह्या एका मुद्द्यावरच काही निष्पन्न झालेले तथ्य असेल तर कृपया ते थोडक्यात इथेच विषद करावे ही नम्र विनंती.
रा.स्व.संघांचे निर्णय मला अथवा मिपाकरांना विचारून होत नाहीत (मी रास्वसंघ कार्यकर्ताही नाही) तरीही आपल्याला आंनददायक अशी शेअर करण्याची माहिती म्हणजे रा.स्व. संघाचे सर्वोच्चपद यापुढे देताना जातीधर्माचा विचार केला जाणार नाही याचे सुस्पष्ट आश्वासन सध्याच्या सरसंघचालकांनी दिल्याचे मी मागेच वाचले आहे. (शिवाय त्यांच्या पुर्वाश्रमींच्या समुहलक्ष्य द्वेषभावनेपासून दूर जात असल्याचेही सुतोवाच सरसंघचालकांनी केल्याचे माझ्या वाचनात आले आहे.) या गोष्टी खरे म्हणजे संघ आणि भाजपा समर्थकांनी चर्चेत येऊन नोंदवायच्या. त्यांच्या कार्यकर्ता मंडळींची खरी अडचण सुधारणा तर स्विकारायच्या पण काचकुच करत अंगिकारायच्या , पण स्वतःच स्विकारलेल्या अंगिकारलेल्या सुधारणावादाचे समर्थन करायचे नाही . त्यामुळे संघीष्टांनी बर्‍याच परंपरागत गोष्टीवर माघार घेतलेली असते. त्यांनी माघार घेतलेल्या बाबतीतही पुन्हा पुन्हा मारण्याचा प्रकार संघ आणि भाजपा विरोधक करताना दिसतातच. आणि असे एकमेकांवर राजकिय दबाव बनवण्यातूनच सुधारणा नकळत आणि सावकाशीने घडत असतात. काहीतरी कारणे देऊन टिकाच करू नयेत या भूमिकांबद्दल रास्त विरोधी भूमिका नोंदवणारा माहितगार
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/06/2019 - 06:20 नवीन
घराणेशाही बद्दल "आपला तो बाब्या" हे बऱ्याच वेळेस दिसून आलं आहे. बापाच्या गादीवर बसणे चूक आहे असे मुळीच नाही परंतु त्याला काही तरी नियम, जनाची नाही तरी मनाची लाज, नीतिमत्तेची चाड असावी लागते. सर्जनाचा मुलगा सर्जन होण्यात चूक काहीच नाही परंतु त्याला साडे पाच वर्षाचे एम बी बी एस पास करावे लागते त्यानंतर ३ वर्षे सर्जरीत एम एस करावे लागते यानंतर काही वर्षे अनुभव घ्यावा लागतो. न्यायाधीशांचा मुलगा न्यायाधीश होतो हे मान्य आहे. उदा. सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचा मुलगा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाला आहे ( न्या.. धनंजय चंद्रचूड. परंतु त्याला सुद्धा एक तीन वर्षाची पदवी घ्यावी लागते त्यानंतर तीन वर्षे एल एल बी करावे लागते. यानंतर बरीच वर्षे वकील म्हणून काम केल्यावर त्यांना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमले आणि नंतर बढतीने ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. नौदल प्रमुख जयंत नाडकर्णी यांचा मुलगा राजेश नाडकर्णी नौदलात सब लेफ्टनंट म्हणून भरती झाला आणि बढती मिळत आता रिअर ऍडमिरल या पद पर्यंत पोचला आहे. यापैकी कोणावरही "मोठेपणा" लादलेला नाही. राहुल गांधी राजकारणात आले आणि काही वर्षात काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी नंतर उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष झाले प्रियांका गांधी २०१९ मध्ये राजकारणात आल्या आणि लगेच जनरल सेक्रेटरी पण झाल्या. १९७८ ते १९९१ आणि १९९८ ते २०१९ या

३४ वर्षात काँग्रेसचे अध्यक्ष पद केवळ इंदिरा गांधी आणि त्यांचे वंशज यांच्यातच आहे.

आणि हे म्हणे काँग्रेसमध्ये घराणेशाही नाहीच तरी बरं ज्या काँग्रेसचा वारसा हे लोक सांगतात ती काही यांच्या "बापाने" स्थापन केलेली नाही. ( निदान हा वारसा तरी सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील) १३५ कोटी भारतीयांत गांधी परिवार सोडला तर नेते नाहीतच का?

लांगुलचालन आणि वैचारिक दिवाळखोरीची परिसीमा आहे

  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 06/06/2019 - 02:49 नवीन
या धाग्यावरचे अभ्या..चे सगळेच प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/30/2019 - 07:58 नवीन
चूक विश्लेषण सबळ विरोधी पक्ष असणे हे आवश्यक आहे अन्यथा सत्ताधारी पक्ष कुणालाच जुमानेनासा होऊ शकतो. यास्तव राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतो त्याचीच चर्चा होणार. द्रमुक किंवा तृणमूल मध्ये कोण अध्यक्ष होतो याबद्दल कोणी चर्चा करताना का आढळत नाही? विरोधी पक्ष म्हणून दुसरा कोणता पक्ष आपल्या नजरेसमोर आहे ? सपा, बसपा, राजद, तृणमूल, राष्ट्रवादी, द्रमुक, अण्णा द्रमुक, ज द (से), ते रा स, तेलगू देसम, एम आय एम यापैकी एक तरी पक्ष राष्ट्रीय पातळीवर आहे का? आपला रा स्व संघाबाबत "आकस" मात्र यातून स्पष्ट दिसून येतो
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 05/30/2019 - 09:20 नवीन
हे आले लेबल भाद्दर. कुठे दिसला हो आकस तुम्हाला? प्रत्येक पक्षाची, संघटनेची पध्दत असते ती विषद केली आहे. बाकी जनप्रतिनिधी म्हनून जे निवडले जातात त्यांची निवड ऑलरेडी झालेली आहे. भाजपा, संघ (हेही उदाहरण माझ्या प्रतिसादात आलेय कारण त्याचे गुणगान त्यावरील प्रतिसादात आहे) हे त्यांचा अध्यक्ष निवडतात ती पध्दती त्यांचा प्रश्न आहे, त्यात ढवळाढवळ शक्यच नाही आणि करुही नये. कुणी त्या पधदतीविषयी नुसते बोलले तरी काय लेबले लावली जातात हे तुम्हीच दाखवून दिले आहे. सो काँग्रेसने काय करावे हा त्यांचा प्रश्न झाला. आणि त्यामुळे संघाबद्दलचा आकस किंवा प्रेम अशी लेबले तुम्ही लावायची गरजच नाहीये. आता सशक्त विरोधी पक्ष पाहिजे म्हणून नक्राष्रु ढाळण्यापेक्षा जनतेनेच केले असते ना काँग्रेसला सशक्त. निदान विरोध करण्याइतके. बाकी सशक्त विरोधी पक्ष म्हनजे काय? पार्लेमेंटात संख्याबळाने? की गुणात्मक? कि पक्षांतर्गत काही निर्णय घेऊन ते राबवायचे? पार्लमेंतातली संख्या तर आता वाढू शकणार नाही, तो चान्स २०२४ लाच. गुणात्मक म्हनले तरी निवडून आलेले गिनेचुने काय करतील ते त्यांचेवर. अगदी दोनचार सहकार्‍यासह अटलबिहारी लोकसभा गाजवायचे तो काळ आणि तशी माणसे आता नाहीत. राहता राहिले पक्षांतर्गत निवडीने. तर तो निवडायला चाराणे सदस्य तरी असायला पाहिजे. तो निर्णय त्यांचा. आपण चर्चा करुन काय होणार. कॉंग्रेसवाल्यांचे गणित जर चुकतेय असे त्यांना स्वतालाच वाटले तर करतील उपाययोजना, नसल्यास शकले होऊन नष्ट होतील. हाकानाका. ज्यांना खरी गरज आहे सशक्त विरोधी पक्षाची त्यांनीच हे काम केले पाहिजे आणि जनतेने ते करुन दाखवले आहे. आता ते तसे झाले नाही म्हणून संपूर्ण लोकशाही पध्दतीविषयीच आपल्याला आकस आहे असे म्हणावे का?
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sat, 06/01/2019 - 10:12 नवीन
मला अजून एक काळात नाहीये कि मोदीला विरोध म्हणजे खान्ग्रेस समर्थक हे गणित अन्डून लोक का मोकळी होतात ? मधला मार्ग नाही का कोणता/? च्यायला आम्हाला मोदी - शहा सारखी हुकुमशाही जोडगोळी नको आणि ओ पप्पू राहुल्या बी नको. अटलबिहारी वाजपेयीनसारखी सर्वसमावेशक माणसे खर तर आत्ता पाहिजे होती, त्यांच्याबद्दल वेगळाच आपलेपणा वाटायचा राव.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 06/01/2019 - 20:11 नवीन
माझे अगदी हेच विचार आहेत
आम्हाला मोदी - शहा सारखी हुकुमशाही जोडगोळी नको आमची घोषणा : भाजप चालनको, मोदी नको ; काँग्रेस चालेल, रागा नको
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 06/01/2019 - 20:19 नवीन
आमची घोषणा : भाजप चालनको, मोदी नको ; काँग्रेस चालेल, रागा नको
अरेरे .. विंडोज ७ मधून टाकलेलं हे काहीतरी गंडलंय हे असं वाचावं आमची घोषणा : भाजप चालेल मोदी नको ; काँग्रेस चालेल, रागा नको
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 06/01/2019 - 20:14 नवीन
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जोडीने मी दुसरं नाव घेईन ते नरसिंह राव नरसिह रावांचं नाव आदराने / कौतुकाने घेईल तो भाजपवाला आणि वाजपेयींना आदर देईल तो काँग्रेसवाला हे केवळ कल्पनेतच भेटतील का ? मनाचा मोठेपणा दाखवणारे राजकारणी लोक संपलेत का ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/30/2019 - 09:52 नवीन
हे आले लेबल भाद्दर. कुठे दिसला हो आकस तुम्हाला? ज्या अस्पर्श संघाचे गुणगान गायले आणि निघाले तळी उचलायला. प्रथम आणि द्वीतीय वगळता बाकी सरसंघचालकाबाबत दहा दहा ओळींचा निबंध लिहिता येईल इतकी तरी माहिती आहे का? दुसऱ्यांच्या माहितीबद्दल इतके छातीठोक पणे कसे बोलता येते? इतकी जळजळ का होते आहे?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 06/01/2019 - 16:52 नवीन
दुसऱ्यांच्या माहितीबद्दल इतके छातीठोक पणे कसे बोलता येते? कारण जी माहिती मला आहे त्याबद्दलच छातीठोकपणे बोलतो, आणि लिहिलेले खोटे ठरवायचे काम संबधिताने केलेलेही नाही त्यामुळे तो पक्का असणारच. जगातल्या सगळ्या गोष्टींची माहीती मला आहे असा माझा समज बिल्कुल नाही, तो करुन घ्यायची इच्छाही नाही. इतकी जळजळ का होते आहे? टिपिकल निरर्थक शेरा आहे हा. इतक्या वर्षात असे शेरे कधी येतात ते चांगलेच कळलेले आहे, सो...नमस्कार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 06/01/2019 - 17:13 नवीन
लिहिलेले खोटे ठरवायचे काम संबधिताने केलेलेही नाही आपल्याला अनुल्लेखाने मारायचे असेल किंवा आपण त्यांच्या खिजगणतीतही नसाल किंवा आपल्याला खोटे ठरवायची त्यांना गरजच वाटत नसेल. पण "मीच बरोबर" म्हणून तुम्ही त्यांच्या वर निवाडा देऊन मोकळे होताय. बाकी चालू द्या आपले आत्मकुंथन
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sun, 06/02/2019 - 11:23 नवीन
अहो तुम्ही स्वतः कुंथत आहात आणि दुसर्याला अक्कल कशाला शिकवताय ? इतके दिवस आदर दाखवत होतो पण तुम्हाला तो मानवतच नाहीये बहुतेक कारण जरा विरोध दिसला कि पिसाळलेसारखे धावून येत अंगावर. इथे बाकीचे पण BJP समर्थक आहेत पण ते तुमच्या इतके कधी डेस्परेट होऊन वयक्तिक हल्ला / विषारी भाषा वापरत नाही, असो बाकी तुमचे लांगुलचलन चालू द्या.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन गुरुवार, 05/30/2019 - 11:24 नवीन
अभय दादा' सुबोध साहेब. शांती शांती.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/30/2019 - 14:31 नवीन
अगं अगं म्हशी ( किंवा म्हसोबा) म्हणत मोठी घरवापासी होणार वाटतं! अध्यक्षपदावर डोळा ठेवून की काय?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 05/30/2019 - 14:36 नवीन
लक्षणे तर अशीच दिसत आहेत. अजुन एक भरकटलेले तरुण देखील मानसन्मान विसरून चाटुगिरी करायला येऊन मिळतील वाटते.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 05/30/2019 - 19:38 नवीन
अत्यंत स्वभिमानी असल्यानेच फक्त तीनदा बाहेर पडून दोनदाच पाय पकडले आहेत.बाहेरून,आतून, सोबतीने पाठींबा देताना परकीय नागरिकत्व मुद्दा सोयीस्कर दुर्लक्ष झाला होता आता किमानपक्षी माजी अध्यक्ष हा टिळा लागला तर लागला विश्र्वासघातकी इच्छाशक्ती आणि अत्यंत जातीय विद्वेष यामुळेच ही अवस्था करून घेतली आहे आणि तरीही शहाणपण येत नाही हीच शोकांतिका आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 05/31/2019 - 07:13 नवीन
कालच्या शपथविधी सोहळ्यात, आमच्या महाराष्ट्राचे लाडके, जाणता राजा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना पाचव्या रांगेत स्थान देऊन त्यांचा अपमान केल्याबद्दल नवनिर्वाचीत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध ! -- - महाराष्ट्र हा अपमान कधीच विसरणार नाही. दिल्लीश्वर बादशहा आलमगीर औरंगजेबाने जसे छत्रपती शिवरायांना स्वत:च्या वाढदिवसाला दिल्लीला बोलावून, दरबारात तिसर्‍या की पाचव्या रांगेत उभे करुन त्यांचा अपमान केला होता अगदी तसाच अपमान पंतप्रधान मोदी नामक आधुनिक दिल्लीश्वरांनी आमच्या जाणत्या राजाचा केला आहे. दिल्लीश्वरांनो लक्षात ठेवा तुमच्या ह्या कृत्याचा बदला महाराष्ट्रातील प्रजा येणार्‍या विधानसभा निवडणुकीतून घेईल.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/31/2019 - 07:20 नवीन
जाणत्या राजाच्या नावाचा याहून मोठा अपमान नसेल. हे नाव इतके वापरून वापरून गुळगुळीत झाले आहे की बास! मूळ जाणता राजा पण वैतागला असेल एव्हाना.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 05/31/2019 - 10:23 नवीन
NDA सरकारच्या सत्ताकाळात सिवसेनेला नेहमी 'अवजड उद्योग मंत्रालय' हेच खाते का दिले जाते, हा एक प्रश्नच आहे. . . . . . . -- . -- [खातच अस दिलेय, की काईच खाता येत नाही.] इती : मक्या अनासपूरे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 06/01/2019 - 10:52 नवीन
:))
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 05/31/2019 - 11:45 नवीन
कुमार केतकर हे आपले नाव ग्याजेट मध्ये कुमार गांधी असे करून घेतील. बायोलॉजिकली गांधी घराण्याच्या बाहेरचा हा राहुल यांचा हट्ट पुरा होईल , कुमार उघडपणे सी डब्लू सी च्या बैठकीत मोदीना शिव्या देण्याचा ठराव आणत्तील व हा गांधी नावाच्या माणसाने आणला म्हणून खर्गे , शिंदे, गुलाम नबी ,अहमद,, ऍंथोनी सगळे धन्य होतील. दुसरा असाच पर्याय पुण्याचे विश्वंभर चौधरी हे बिशंभर नेहरू असे नाव बदलतील व वरील प्रमाणे सर्व होईल .
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 06/01/2019 - 05:18 नवीन
कल्पांत मांडला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडवाया | कैपक्ष घेतला देवी |आनंदवनभुवनी ||२७|| बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्थान बळावले | अभक्तांचा क्षयो जाला |आनंदवनभुवनी || २८|| पूर्वी जे मारिले होते | ते ची आता बळावले | कोपला देव देवांचा | आनंदवनभूवनी ||२९ || त्रैलोक्य गांजिले मागे |ठाउके विवेकी जना | कैपक्ष घेतला रामे | आनंदवनभुवनी ||३०|| भीम ची धाडिला देवे | वैभवे धाव घेतली | लांगूल चालिले पुढे | आनंदवनभुवनी ||३१ || येथून वाढला धर्मू | रमाधर्म समागमे | संतोष वाढला मोठा | आनंदवन भुवनी ||३२ || बुडाला औरंग्या पापी | म्लेंच संहार जाहाला | मोडली मांडली छेत्रे | आनंदवनभुवनी || ३३ || बुडाले भेदवाही ते | नष्ट चांडाळ पातकी | ताडिले पाडिले देवे | आनंदवनभुवनी ||३४ || गळाले पळाले मेले |जाले देशधडी पुढे | निर्मळ जाहाली पृथ्वी | आनंदवनभुवनी ||३५ ||
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 06/02/2019 - 07:50 नवीन
प्रथम प्रामाणिकपणे तळवे चाटण्याची परिक्षा घेतली जाईल आणि त्यात जो सगळ्यात जास्त गुण मिळवेल तो अर्थातच...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू शायर है मैं तेरी शायरी, तू आशिक़ है मैं तेरी आशिकी... :- Saajan
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 06/03/2019 - 12:22 नवीन
निवडणुकीत रिजेक्ट केलं तर केल... .. ज्यायला राजीनामा पण रिजेक्ट (इति. श्री. रा. रा. गांधी)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा