मिसळपाव वर टिंगलटवाळी करण्यावर मात कशी करावी
चर्चा ह्या सत्रात मुळ विषयावर न लिहता टिंगलटवाळी करणाऱ्या वर मिसळपाव चे काही बंधन नाही आहे का? काही जण केवळ शुद्ध लेखनावरून मुळ विषयाला बाधा आणतात. तर काही जण धागा च कापून टाकावा असे लिहितात. मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती चा विषय काठला की विरोध करतात. महाराष्ट्रात संस्कृती व भाषा टिकण्यासाठी लिहिल्यास विरोध करतात म्हणजे हे नेमके आहेत तरी कोण?शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापने आधी अशाच विरोध झाला होता. पण आता महाराष्ट्राच्या प्रगती साठी हे मावळे आई भवानी ची शप्पथ धेऊन मुळीच घाबरणार नाहीत.
🗣 चर्चा
(62)
व
विजुभाऊ
गुरुवार, 05/02/2019 - 09:00
नवीन
थट्टा , चेष्टा , खिल्ली , टिंगल टवाळी या एकाचा भावाच्या शब्दांना वेगवेग्ळ्या अर्थछटा आहेत.
थट्टा माफक असते , चेष्टा खिल्ली या जिव्हारी लागू शकतात.
मात्र टिंगल किंवा टवाळी या निव्वळ एखाद्याचे खच्चीकरण करण करणयासाठीच असतात
मिपावर थट्टा चेष्टा मस्करी या होतातच.
मात्र त्या करताना वैयक्तीक मानहानी न होता माफक हसू यावे या प्रकारची असएल तर काहीच हरकत नाही.
टिंगल किंवा खिल्ली उडवताना मात्र त्याची परिणिती वैरभावात होउ नये याचे भान राखून करावी.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 05/02/2019 - 09:33
नवीन
मिपावर टींगलटवाळी होत नाही... प्रत्येकाला आपआपले मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे... वाचकांचे आपआपले निकष असतात... एखादी गोष्ट नाही पटली तर त्यावर व्यक्त होण्याचा त्यांना अधिकार आहेच... अर्थात तोही सभ्य भाषेत... जर कोणी असभ्य भाषेत तुमच्यावर टीका टीप्पणी केली असेल तर असा धागा काढायचा तुमचा अधिकार अबाधित आहे...
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 05/02/2019 - 09:47
नवीन
तुम्ही चालू ठेवा.धागे काढत रहा..
उडतील ते कावळे, राहतील ते मावळे.
- Log in or register to post comments
स
स्वामि १
गुरुवार, 05/02/2019 - 13:20
नवीन
आम्ही मराठी माघे हटणारच नाही
धन्यवाद
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 05/02/2019 - 13:33
नवीन
साहेब,
इथे सगळेच मराठीच लोक येतात.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 05/02/2019 - 17:40
नवीन
आम्ही मिपाकर मागे हटणारच नाही
धन्यवाद !
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 05/02/2019 - 10:02
नवीन
मला वाटलं :
मिसळपाव वर टिंगलटवाळी करून घेण्यावर मात कशी करावी ?
असा धागा आहे.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 05/02/2019 - 10:19
नवीन
तुम्ही चालत रहात तर लवकरच धागे काढणारे शतकवीर बनाल.
शुद्धलेखनाच्या चुका नाहीत हो या, कधी मोकळा होतो धागा काढून एकदाचा असे होते तुम्हाला, अन्यथा आपले लिहिलेले एकदा तपासायचे तरी कष्ट घ्याल तुम्ही!
असो , तुम्हाला शुभेच्छा
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 05/03/2019 - 11:53
नवीन
व्यवहारात पण जुलाब लागला की असेच होते की हो
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
गुरुवार, 05/02/2019 - 10:30
नवीन
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
गुरुवार, 05/02/2019 - 10:30
नवीन
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
गुरुवार, 05/02/2019 - 10:30
नवीन
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
गुरुवार, 05/02/2019 - 10:32
नवीन
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
गुरुवार, 05/02/2019 - 10:34
नवीन
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
गुरुवार, 05/02/2019 - 10:43
नवीन
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
गुरुवार, 05/02/2019 - 11:10
नवीन
असे अजुनही काही बरेच आहे. :)
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/02/2019 - 11:27
नवीन
सोप्पय !
दुर्लक्ष.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 05/02/2019 - 11:58
नवीन
थोडे विचार पूर्वक लिहावे .
ज्या धाग्यावर चर्चा होते त्या धाग्यावर प्रतिसाद
जे देतात त्यांची एक पद्धत असते ती समजून घ्या.
पहिला ते धागा वाचतात पण धागा नावडता असेल तर पूर्ण न वाचताच प्रतिसाद दिला जातो त्याचा सुर टिंगल करण्याचा असतो .
दुसरे धाग्यातील चुका फक्त शोधल्या जातात आणि प्रतिसाद दिला जातो त्याचा सुर टवाळी च असतो .
आणि शेवटी धागा वाचला पण जातो समजून पण घेतला जातो आणि चुका काय आहेत ह्याचा सुधा विचार करून प्रतिसाद दिला जातो.
तो प्रतिसाद तुम्हाला न दुखवता तुमच्या चुका दाखवून देण्या कडे कल असणारा असतो .
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 05/02/2019 - 12:00
नवीन
बरं .. तुमच्याकरिता शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करुयात.. आता ठीक ?
...काय म्हणताय ? आशयाकडेही दुर्लक्ष करायचं का ? बरं .. ..ते ही करुयात..
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 05/03/2019 - 09:19
नवीन
धागा विषय, शुद्धलेखन, वाक्यरचना,आशय,अपेक्षा,चर्चा हेतू,मिपाकर लेखकू (असामान्य),प्रतिसादी मिपाकर (सामान्य) आणि फक्त वाचनमात्र मिपाकर (अतिअतिसामान्य) यांच्याकडेच दुर्लक्ष केले पाहीजे.....
अखिल मिपा उन्हाळी धागा भुईमूग लागवड आणि सदाबहार पापड, कुरडई सांडगे कुटीरोद्योग संघाचे "मिपाचे आंगण, हक्काचे वाळवण" या निवेदनातून साभार
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 05/02/2019 - 12:29
नवीन
मिपावर सर्वसाधारण शुद्ध मराठीत, सरळ भाषेत, तर्कदृष्ट्या योग्य लेखन केले तर, टिंगल-टवाळी न होता, उत्तम चर्चा होते, असा अनुभव आहे. मिपावर आहात तर स्वतःचे सोडून इतर लेखन व त्यावरचे प्रतिसाद वाचत असालच... नसाल तर जरूर वाचा... त्यामुळे मिपाचा/मिपाकरांचा स्वभाव कळेल. चांगल्या लेखनाची मिपावर नेहमीच उत्तम दखल घेतली जाते व स्तुतीही केली जाते, हेसुद्धा कळेल.
निष्काळजीपणे अशुद्ध भाषा वापरलेले, अतर्क्य/बेछूट दावे असलेले, एकांगी दावे असलेले, इत्यादी लेखनाचा सतत मारा केल्यावर, मिपावरच काय इतर कोणत्याही मंचावर टिंगल-टवाळी झाली नाही, तरच आश्चर्य असेल. :)
तेव्हा, वरील वस्तूस्थिती ध्यानात ठेवा आणि टिंगल-टवाळी टाळा.
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 05/02/2019 - 14:10
नवीन
जर आपण स्वतःच्या लेखनात सुधारणा करत गेलो, तर मिपाकर उत्तम प्रतिसाद देतात असा माझाही अनुभव आहे. फक्त स्वतःच्याच धाग्यांवर नव्हे, तर इतर धाग्यांवर सुद्धा. अगदी जशास तसंही मिळतं! इतरांचं जुनं लेखन उघडून बघीतलं तर भरपूर विदा मिळेल! :-)
आणि नाव मिसळपाव आहे. ते थोडं का होईना ते झणझणीत असणारच!!
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 05/02/2019 - 17:42
नवीन
+१००१
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 05/02/2019 - 14:43
नवीन
स्वामी म्हाराज व्हा तुम्ही पुढे, कापा करंगळी थोडीशी ह्या मिपापेश्वराच्या माथ्यावर, घ्या शपथ.
घुमु दे नाद मराठी आंजाच्या कानाकोपर्यात, थरथरु दे सार्या मराठी सायटींचे बुरुज, थरकाप उडू दे ह्या दिग्गज पातशाह्यांचा. दिल्लीचे तख्तही हादरु दे तुमच्या रणगर्जनेने. बंगाल, माळवा दोआब न बुंदेलखंडाच्या सार्या गनिमांना पळवून लावायचेय आपल्याला. पार लोटून टाकू त्यांना ह्या नर्मदेपार. तुमच्या कीबोर्डाच्या एका की ला लाभू दे बळ मुलुखमैदान तोफेचे, माउसाच्या क्लिकला धार येऊ दे त्या भवानी तलवारीची. जमा करा आपले थोडेसे सैन्य. त्याचाच सेनासागर होणार आहे एक दिवस. तुमचे सगळे मावळे एक मुखाने गर्जतील "हरहरस्वामीम्हादेव"
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 05/02/2019 - 15:44
नवीन
अहो ह्या प्रीत्यर्थ अजुन डजनावारी धागे यायचे.
मग अभ्याभाऊ तुम्हीच गोंधळून जाल की कोणत्या आघाडिवर लढु .
आताशी महाराष्ट्र धागा 1 चालू आहे, धागा 25 आला की आपण आपआपल्या घरी तुतारी फुंकुन रौप्यमहोत्सव साजरा करू.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 05/02/2019 - 17:43
नवीन
:-) हा .... हा ... हा ....
अभ्या.. _/\_
- Log in or register to post comments
उ
उपयोजक
Sat, 05/04/2019 - 04:58
नवीन
हे असं काहीतरी तिरकस लिहिता अन् स्वामिंना प्रेरणा मिळते.
:(
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 05/09/2019 - 06:05
नवीन
अभ्या , तुला अमोल कोल्हे डसला काय ?.... )))
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
गुरुवार, 05/02/2019 - 15:33
नवीन
तुमच्या अशुद्धलेखनाला विरोध आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापने आधी झालेला विरोध ह्यांचा परस्परसंबंध उलगडता का जरा.
माझी ह्या धाग्यावरून निवृत्ती.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
गुरुवार, 05/02/2019 - 15:49
नवीन
खाली उरलीया लंगोटी
काखेत कासोटी
हाती घेऊनिया करवंटी
मुखे बोलतो मराठी
कोण खेचतो त्याला ओढू खाली
वाहुनिया शिव्यांची लाखोली
दोन लावूनी कानाखाली
थेट बनावे मवाली
सोडूनि द्या बाणा सनातनी
जरी नाव लेवूनीया ते स्वामी
ऐसे सुचवितो एक मिपाकर
ओळखावा अंदाज पुरोगामी
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 05/02/2019 - 15:51
नवीन
कोणतीही ध्येयासाठीची तळमळ येश देते.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
गुरुवार, 05/02/2019 - 16:57
नवीन
मूळ धाग्यापेक्षा सर्व प्रतिसादात मजा आली. धागाकर्त्याने या सर्व प्रतिसादांची योग्य दखल घेऊन आत्मपरिक्षण करावे आणि काळजीपूर्वक, विचारपूर्वक, बालीशपणा टाळून समजूतदारपणाने धागे लिहावेत आणि काहीही प्रकाशित करण्यापूर्वी अनेकदा वाचून सर्व चुका दुरुस्त करून मगच प्रकाशित करावे म्हणजे आपोआपच टिंगल वगैरे बंद होइल.
निंदकाचे घर असावे शेजारी.
या निमित्ताने ओपी नय्यर यांचे " अगर वो मुझसे रूठे है तो मेरीही खता होगी" ही ओळ असलेले हे गाणे ऐका:
https://www.youtube.com/watch?v=AZjPVYxvlrk

- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 05/02/2019 - 17:59
नवीन
मस्करी खूप झाली आता मूळ पोस्ट चा
अर्थ लावून त्याची उत्तरे द्या.
मोडक्या तोडक्या भाषेत सुधा काही अर्थ
आहे त्या विषयी सुधा बोलायचे कष्ट
घ्या .
तावडीत सापडल कोण म्हणून जास्त
तुटून पडायची गरज नाही
ह्या राज्याच्या समस्या ज्या निर्माण
झाल्या आहेत आणि त्याला परप्रांतीय जबाबदार आहेत त्या साठी बुध्दीचा वापर करा
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 05/02/2019 - 19:27
नवीन
तुमचा दूसरा अवतार स्वामी तर नाहीं ना?
फक्त तुम्ही आणि तुम्हीच स्वामींचे चाहते आहात , म्हणून विचारले.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 05/02/2019 - 19:45
नवीन
असं इचारतायसा जणू की लगीच त्येनी म्हणनारेत "व्हय मीच त्यो"
तुमच्या भाषेत पाकिस्तान आर्मी आणि आयएसआय हैत ते.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 05/02/2019 - 20:17
नवीन
यक डाव सपष्ट झाल्ल तर आपला गोलपोस्ट नक्की होतो, नायतर आपुन फिरताव मैदानाला चक्करा मारित
एक संका
या धाग्यावर नक्की चर्चा करायची का?
नाय तुमासनी अनभव दांडगा महुंन ईचारले!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 05/02/2019 - 20:43
नवीन
पण चर्चा बिर्चा काय नाय करायची.
त्येनी म्हणतेत टिंगल टवाळीवर मात कशी करायची,
आधी हु तर द्यावी टिंगल टवाळी शिस्तीत. मग ते मात बित बघता यील.
काय म्हनता?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 05/02/2019 - 19:41
नवीन
लेखनात चुका असतील ,आकडेवारीत चुका असतील पण भावणे मध्ये कधीच चुका नसतात.
हा धागा स्वामी नी का काढला इतिहास बघा .
मूळ गंभीर विषय सोडून कोण शुद्ध लेखनावर टोमणे मारत आहे .
कोण आकडेवारी वर कोटी करत आहे .
ठराविक मर्यादे पर्यंत योग्य आहे .
पण स्वामी चा मूळ प्रश्न दुर्लक्षित करणे सर्व
आशय समजून हे काही पटत नाहि
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Fri, 05/03/2019 - 08:07
नवीन
तर सगळे दावे बुडीत खात्यात जातात.
लेखन स्पष्ट आणि शुद्ध नसले तर भावणा पन पोचत नाही. ति शूद्धलेखनात हरपते.
मग भावणा आनी आकडे, हे सगळेच जर वाचकाने शोधायचे; तर लिहायचे तरी का कष्ट घेता??
स्वतःचा लेख (४ ओलीच तर असतात) पारकाशीत कारण्याआधी एकदा वाचला तरी चुका दस्तूर करता येतात.
तळटीप : आक्षराला हासो नये आणि भावना पोचवून घ्या.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 05/03/2019 - 10:13
नवीन
मस्त... प्रतिसाद आवडला..
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
गुरुवार, 05/02/2019 - 23:00
नवीन
टवाळा आवडे विनोद असे समर्थांनी म्हटले आहे. तरी जेहत्ते प्रत्येक मिपाकरानी स्वतः कोण ते ठरवावे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 05/03/2019 - 06:31
नवीन
मला एक राहून राहून प्रश्न पडत आला आहे कि सर्व जण मावळेच का व्हायची जिद्द धरतात.
आपण शिवाजी महाराज व्हावे हि जिद्द का धरत नाहीत? ( इंग्रजीत म्हण आहे NOT FAILURE BUT LOW AIM IS CRIME)
इथेच आमची गुलामी वृत्ती दिसते आहे?
आम्ही कुणाचे तरी चाकरच होण्याची जिद्द धरतो आहोत.कुणीतरी आम्हाला हुकूम द्यायचा कि मग आम्ही शिर तळहातावर ठेवून लढणार?
- Log in or register to post comments
झ
झेन
Sat, 05/04/2019 - 14:12
नवीन
मराठी लोकांची प्रतिमा एकनिष्ठ सेवक अशी होण्याला आपणच कारण आहोत. बहुतेक सराठी लोक उच्चपदावर ,परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न बघतात स्वतः मालक बनण्याचे नाही.
जसवंतसिंहांच्काया पुस्तकात राजस्थान मधील लोकगीतांबद्दल वाचलं होतं, गर्भवतीला उद्देशून त्या स्त्रिया गातात की गुणवानाला जन्म देवू नकोस थनवानाला दे कारण धनवानाच्या दारी दहा गुणवान असतात.
आज जगभर जेवढे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, केरळी लोक व्यवसाय करतात तेवढे मराठी नाही दीसत. बाकी शिवाजी महाराज जन्माला यावे, पण शेजारी हे आहेच.
- Log in or register to post comments
स
स्वामि १
Wed, 05/08/2019 - 06:12
नवीन
आज जगात किंवा भारतात ज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे त्यांचेच वर्चस्व आहे. मराठी माणसाने महाराष्ट्र व मुंबईत असलेल्या प्रचंड पैशाच्या उलाढालीत लक्ष केंद्रित करायला हवे, आपला व्यवसाईक पातळी ऊच्चावली पाहिजे.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 05/04/2019 - 17:41
नवीन
शिवाजी महाराज ऑलरेडी आहेतच, "लाव रे तो व्हिडियो" वाले. कमी आहे ती मावळ्यांची. बाकी शुद्धलेखन वगैरेवाले बाजारबुणगे ढिगाने सापडतील, असे 'ह्यांचे' म्हणणे.
-- माईसाहेब मावळेगावकर.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 05/08/2019 - 13:22
नवीन
हा .... हा ...... हा ....
- Log in or register to post comments
र
रविकिरण फडके
Fri, 05/03/2019 - 19:27
नवीन
"काही जण केवळ शुद्ध लेखनावरून मुळ विषयाला बाधा आणतात"
पण धागाकर्ता जेव्हा इतकं अशुद्ध लिहितो की मूळ विषयालाच बाधा येते - खड्यांनीच जेवण नकोसं व्हावं तसं - तेव्हा वाचकांनी काय करावं, हेही कृपया प्रस्तुत लेखकाने सांगावं.
दुसरं म्हणजे, मिपा हा मराठी कट्टा आहे, निदान तिथे तरी मराठीची बूज राखावी, ही अपेक्षा गैर आहे का?
असो! शुद्धलेखनाचा आग्रह धरणं हेही आता कुठल्यातरी वर्चस्ववादाचे लक्षण आहे, विनाकारण दोष काढणे वा टिगलटवाळी करणे आहे, त्याचा उद्देश विषयाकडून लक्ष दुसरीकडे वळविणे आहे, असा जर काही लोकांचाही समज असेल, तर ह्यापुढे काही न लिहिणे हेच योग्य.
- Log in or register to post comments
स
स्वामि १
Sat, 05/04/2019 - 07:08
नवीन
मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती हा विषय आहे तो फिरून फिरून प्रतेक धाग्यात येत राहीलच
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 05/04/2019 - 05:55
नवीन
एक दिवस तुम्हालाच या टिंगल टवाळीचा कंटाळा येईल व तुम्ही दूर जाल.मग मात कशी करावी प्रश्नच उरणार नाही.
- Log in or register to post comments
स
स्वामि १
Sat, 05/04/2019 - 07:03
नवीन
सर्व चर्चेत आमचा मुळ धागा मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती हाच आहे व ती साध्य झाल्या शिवाय मराठी माणसे थांबणार नाहीत. आपण ही प्रगती साठी उपाय सुचवावेत.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »