महाराष्ट्रातील चालू घडामोडी
आज निवडणुकीचे वातावरण सर्वत्र असताना निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्राला व मराठी समाजाला काय मिळेल हा महत्त्वाचा विषय आहे. ह्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला काय मिळाले होते? आपल्या महाराष्ट्रातून चार पाच खासदार मंत्री झाले म्हणून महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती झाली असा काही ईतीहास आहे का? महाराष्ट्रातून तीनचार मंत्री मध्ये दोन ते तीन हमखास अमराठी असल्याने त्यांना महाराष्ट्र व मराठी बद्दल किती आपुलकी असेल हे शंकास्पद आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून उभ्या असलेल्या उमेदवाराला आपण महाराष्ट्रासाठी व मराठी समाजाला काय मिळवून देणार हे विचारले पाहिजे किंबहुना महाराष्ट्र व मराठी साठीच काम करेल अशा उमेदवाराला निवडून देउ असे खडसावले पाहिजे
लांगोट काढून नागडे होण्या एवढे नक्कीच नसावे .हेच तत्व, इतर कोणताही मुद्दा (उदा : तुम्ही मांडत असलेला) मांडताना, लक्षात ठेवण्याजोगे आहे, नाही का?! :) ;)महाराष्ट्रात व मुंबईत जे पोषक वातावरण मराठी माणसाने निर्माण केले तसे उर्वरित भारतात कोठेच नाही आहे.-- तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही भारत फिरलाच नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल.