Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

महाराष्ट्रातील चालू घडामोडी

स
स्वामि १
Sun, 04/21/2019 - 05:45
🗣 60 प्रतिसाद
आज निवडणुकीचे वातावरण सर्वत्र असताना निवडणूकीच्या निकालानंतर महाराष्ट्राला व मराठी समाजाला काय मिळेल हा महत्त्वाचा विषय आहे. ह्या आधी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला काय मिळाले होते? आपल्या महाराष्ट्रातून चार पाच खासदार मंत्री झाले म्हणून महाराष्ट्र व मराठी माणसाची प्रगती झाली असा काही ईतीहास आहे का? महाराष्ट्रातून तीनचार मंत्री मध्ये दोन ते तीन हमखास अमराठी असल्याने त्यांना महाराष्ट्र व मराठी बद्दल किती आपुलकी असेल हे शंकास्पद आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून उभ्या असलेल्या उमेदवाराला आपण महाराष्ट्रासाठी व मराठी समाजाला काय मिळवून देणार हे विचारले पाहिजे किंबहुना महाराष्ट्र व मराठी साठीच काम करेल अशा उमेदवाराला निवडून देउ असे खडसावले पाहिजे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26526 views

🗣 चर्चा (60)
उ
उपयोजक Sun, 04/21/2019 - 05:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sun, 04/21/2019 - 07:04 नवीन
प्रचंड वाढती लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आपला जिव गुदमरला जातो. फक्त सुशिक्षित समाज कुटुंब नियोजन करतो. त्यामुळे अशिक्षित जनता वाढत आहे. तर एक विशिष्ट समाज भारतावर वर्चस्व मिळण्यासाठी आपली लोकसंख्या मुद्दामून वाढवत आहे व दुर्दैवाने आपल्या देशात लोकसंख्या चा विषय कोणीच गांभीर्याने घेत नाही
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Mon, 04/22/2019 - 07:57 नवीन
सर्तक रहा!! आपल्या महाराष्ट्रातील विविध शहरात प्रचंड गर्दी असते. निवडणूक दरम्यान आपल्या कडे ही घातपात होउ शकतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 04/22/2019 - 08:06 नवीन
सर्तक रहा सरतक रहा कि सरकत रहा मुळात "सतर्क" हा मराठी शब्द आहे का? आणि त्याचा मूळ अर्थ तर्कासहित असा होईल असे वाटते. सावधान किंवा दक्ष हे शब्द मराठी आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Mon, 04/22/2019 - 08:35 नवीन
धन्यवाद खरे साहेब, पुढील वेळेस योग्य शब्दात लिहेन. ईथे edit करता येते का माहित नाही, असल्यास कसे करावे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 04/22/2019 - 09:00 नवीन
तुम्ही एक काम करा, संपादक मंडळात सामिल व्हा. तुमचा वर दिलेला बॉब पाहुन मी फुटलो हो!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/22/2019 - 09:16 नवीन
कृपाशंकर सिंह सारखा जौनपूर हून आलेला माणुस महाराष्ट्राचा गृहहराज्य मंत्री बनू शकतो, सम्जय निरुपम सारखा माणुस ( या माणसाला राजकारणात शिवसेनेने पुढे आणले) या लोकांना लोकप्रतिनीधी म्हणून आपल्यावर लादणार्‍या पक्षांना धडा शिकवला पाहिजे त्याहूनही महत्वाचे म्हणजे शिवछत्रपतींचा वारसा सांगत निवळ्ळ गुम्डगिरी करणार्‍यानाही त्यांची जाग अदाखवून दिली पाहिजे
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Mon, 04/22/2019 - 15:01 नवीन
विजूभाउ बरोबर बोललात, परप्रातीयांचे मतदार वाढल्यास परप्रातीय ही मंत्री होतात आपण गाफील राहुन चालणार नाही. परप्रातीयांच्या गुप्त कारस्थान ओळखा. मराठी माणसांना मुंबईत हेतुपूर्वक नोकरी धद्यामधे टाळले जात आहे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 04/22/2019 - 12:41 नवीन
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी देऊन योग्य केले का ? कोर्टाने जामीन दिला असला तरी दहशतवादाच्या आरोपातून मुक्त केले नाही तरिही भाजपाने तीला तिकिट देऊन चूकीचा पायंडा पाडला आहे का ?
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Mon, 04/22/2019 - 15:31 नवीन
राजकारणात हे चालतच म्हणून त्याला पाठिंबा मुळीच नाही, भारतीय राजकारण असेच आहे. महाराष्ट्राने भारतीय लोकशाहीतुन बाहेर पडावे व शिवाजी महाराजा प्रमाणे स्वराज्य स्थापन करावे. काही वर्षापुर्वी मॅचफिंकलिग करणाऱ्या अजरउद्दिला ही टिकिट दिलेच होते
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 04/22/2019 - 18:42 नवीन
तुम्ही ठीक आहात ना? नाही आजकाल उन्हाचा ताप वाढलाय, म्हणून विचारले. काहीतरी थंड घेत जा , बर असतं शरीराला
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Tue, 04/23/2019 - 04:09 नवीन
धन्यवाद, भंकस बाबा आपण डोक थंड ठेवण्यास सांगितले. आपण मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी उपाय सुचवावेत
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 04/23/2019 - 04:41 नवीन
आपण टाकलेले प्रतिसाद क़ाय सूचवत आहेत? घरात ढेकुन झाले म्हणून क़ाय कोणी घराला आग लावतात? भारतीय लोकशाहितून बाहेर पडायच्या गोष्टी करता आपण, ज्या महाराष्ट्र राज्याने मुंबई आपल्याबाहेर पडू नये म्हणून 105 हुतात्मा दिले त्या राज्याला तुम्ही स्वतंत्र होऊ सांगता?
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Tue, 04/23/2019 - 14:43 नवीन
१०५ हुतात्मा झाले मुंबई महाराष्ट्राला मिळाली आज ही मुंबई महाराष्ट्रात आहे पण अर्थसत्ता परप्रातीयांच्या हातात आहे. व रोज शेकडो संख्येने परप्रातीय मुंबई व महाराष्ट्रात येतात. ह्या वर आपण उपाय सुचवावेत
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Tue, 04/23/2019 - 15:11 नवीन
उपाय हाच आहे की, मराठी माणसाला उत्तम स्ट्रीट फूड बनवायला शिकवा. भेलपुरी खायला आपण भैयाकड़े जातो.मसाला डोसा खायला अन्नाकड़े. रस्त्यावर कितिजणाना तुम्ही विचारता की बाबा तुम्ही मराठी आहात क़ाय? जर नसेल तर तुम्ही पुढच्या गाडिवर जाता क़ाय? रस्त्यावर चाललेल्या बांधकामाला दक्षिणी मजूरच का असतात. त्या कामात मराठी मजूर का दिसत नाहीत? फार वर्षापूर्वी मराठी लोकांना रोजगार मिळावा म्हणून झुणकाभाकर केंद्र सुरु झाली होती. मी जेव्हा मुंबईत ह्या केंद्रावर जातो तेव्हा झुणकाभाकर सोडून तिथे सर्व मिळते. आणि देणारा हमखास दक्षिणी असतो. तुम्ही स्वतालाच विचारा तुम्ही बाहेर खायला जाता तेव्हा कधी पोहे, शिरा, थालीपीठ हे पदार्थ मागितले आहेत क़ाय? मुंबईत मिळणारी मिसळ देखिल वाटान्याची मिळते. तुम्ही अशी मिसळ खाऊन कधी तक्रार केली आहे का? तुम्ही बदला , जग बदलेल
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Tue, 04/23/2019 - 15:00 नवीन
१०५ हुतात्मा झाले मुंबई महाराष्ट्राला मिळाली आज ही मुंबई महाराष्ट्रात आहे पण अर्थसत्ता परप्रातीयांच्या हातात आहे. व रोज शेकडो संख्येने परप्रातीय मुंबई व महाराष्ट्रात येतात. ह्या वर आपण उपाय सुचवावेत
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 04/23/2019 - 20:40 नवीन
तुम्ही हिंदी बोलायला सुरुवात करा. आपोआप तुम्ही 'इतर भाषक' व्हाल व अर्थसत्ता तुमच्या ताब्यात येईल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 04/23/2019 - 15:34 नवीन
" रोज शेकडो संख्येने परप्रातीय मुंबई व महाराष्ट्रात येतात. ह्या वर आपण उपाय सुचवावेत" जालिम उपाय म्हणजे अमराठी उद्योगपतीना उद्योग उभे करण्यास मज्जाव करणे. म्हणजे नविन उद्योगधंदे येणारच नाहीत, पर्यायाने परप्राण्तिय पण येणार नाहीत. "आम्हाला परप्रांतिय उद्योगपती(रांका,रहेजा,बजाज्,गोयल,मेहता) पाहिजेत पण त्यांच्या राज्यातले चाकरमानी मात्र नकोत.. परप्रांतिय व्यावसायिकाकडे फक्त आम्हीच ९ ते ६ पाट्या टाकणार" असे कसे चालेल?
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Tue, 04/23/2019 - 18:08 नवीन
परप्रातीय उद्योजक आपल्याच राज्यात उद्योग चालू करावेत व तेथील कामगारांना तेथेच काम मिळेल. बोलायला सोप्पे आहे पण महाराष्ट्र सारखे पोषक वातावरण व मराठी माणसासारखी सहिष्णुता इतर राज्यात नाही आहे. पण ह्या मराठी माणसाच्या सहिष्णुता चा फायदा परप्रातीयानी घेतला. व दुर्दैवाने मराठी माणूस महाराष्ट्रात पोरका झाला
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 04/24/2019 - 09:30 नवीन
महाराष्ट्र सारखे पोषक वातावरण व मराठी माणसासारखी सहिष्णुता इतर राज्यात नाही आहे.
ह्यासाठी काही विदा? भोपाळ,इण्दौर, वडोदरा, दिल्ली, बेंगळुरु,उज्जैन,बेळगाव येथे लाखावर मराठी आहेत. अगदी ५० हून अधिक वर्शे वास्तव्य आहे.
परप्रातीय उद्योजक आपल्याच राज्यात उद्योग चालू करावेत व तेथील कामगारांना तेथेच काम मिळेल.
मग ईतर ठिकाणी उद्योग आहेतच. अनेक मराठी लोकाना महाराष्ट्राबाहेर काहीच नसते असा एक गोड गैरसमज असतो. पुर्वी पु.ल. म्हणायचे तसे खरेदीसाठी मुंबईकराला "रानडे रोड" पलिकडे काही मिळू शकते ह्यावर विश्वास बसत नाही.. वा पुणेकरास 'लक्ष्मी रोड".. https://en.wikipedia.org/wiki/Category:Companies_based_in_Chennai https://en.wikipedia.org/wiki/List_of_companies_based_in_Gurgaon https://en.wikipedia.org/wiki/Category:Companies_based_in_Ahmedabad
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 04/27/2019 - 10:54 नवीन
पूर्ण देशाचा कोण्ही द्वेष करत नाही फक्त युपी, बिहार, बंगाल ह्या तीनचार राज्यातील लोकांना महाराष्ट्र वैतागला आहे . त्या राज्यातून अजून वीज , नळाचे पाणी सुधा नाही सर्वांना . सामाजिक अवस्था तर भीषण नच आहे अजुन 100 वर्ष तरी ते सुधारतील ह्याची खात्री नही
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Wed, 04/24/2019 - 09:57 नवीन
काय उचलली जीभ लावली टाळ्याला? ग्वालेर, इंदूर, बडोदा येथील तर संस्थानिकच मराठी होते मग काय तिथल्या स्थानिक लोकांनी काय बंड केलं का? झालंच तर आपला रजनीकांत गायकवाडसारखा मराठी माणूस साऊथ मध्ये सुपरस्टार झाला. तिथल्या लोकांनी असं म्हटलं का की तो मूळचा मराठी आहे इथून त्याला बाहेर हाकला? महाराष्ट्रात पोषक वातावरणापेक्षा मुंबई उत्तम सारखे बंदर आहे आणि ब्रिटिश काळापासून बनलेलं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्यामुळे इथे उद्योजक आकर्षित होतात. आता हे यूपी किंवा बिहारमध्ये अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण त्याची भौगोलिक रचनाच त्यासाठी पूरक नाहीये. आपला मुद्दा रेटण्यासाठी काय वाट्टेल ते लिहाल काय?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 04/27/2019 - 11:13 नवीन
गुजरात आणि राजस्थान मधील काही जतीचेच लोक उद्योग व्यवसायात अग्रेसर आहेत . ह्यांच्यात एक खास गुण आहे ज्या राज्यात जातील तिथल्या जनतेत हा समाज मिसळतो . स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो आणि स्थानिक राजकारणात लुडबुड करत नाही . दुसरे आपले दक्षिण भारतीय बांधव हे सुधा स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात आपले काम आणि आपण असेच ह्याचे वागणे असते स्थानिक राजकारण काय चालय ह्याचे त्यांना काही देणेघणे नसते . त्या मुळे हे तिन्ही समाज परके वाटतं नाहीत .आणि ते स्थानिक रीतिरिवाज सुधा शिकतात. पण ह्याच्या उलट हिंदी भाषक लोकांचे वागणे असते . एक गैरशिस्त रक्तात bhinleli असते . कायदे न पाळणे हा ह्यांचं आवडता छंद असतो . स्थानिक राजकारणात खूप हस्तक्षेप करतात वर त्यांचे नेते इथे येवून स्थानिक लोकांनाच शाहणपण शिकवतात स्थानिक भाषा शिकत नाहीत उलट स्थानिक भाषा आणि संस्कृती चा अनादर करतात . त्यामुळे महाराष्ट्र च नाहीतर देशातील सर्वच राज्य ह्या लोकांचा द्वेष करतात
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Mon, 04/29/2019 - 06:26 नवीन
स्थलांतरित येणाऱ्या वर कुठलेच बंधन नसल्याने कोण गुन्हेगार व कबाड जनता येत आहेत त्याची कल्पना स्थानिकाना नसते. राज्यकर्ते सर्वाना भारतीय म्हणून बघतात किंभवना ते हेतुपूर्वक दुर्लक्ष करतात. हे मराठी माणसाचे दुदैवं आहे
  • Log in or register to post comments
न
नमकिन Mon, 04/29/2019 - 13:07 नवीन
गरीबांना शिक्षण, संस्कार, जुनाट अंधश्रद्धा रीतिरिवाज, अनारोग्य, कुपोषण, भविष्य निर्वाह बेफिकीर वृत्ती, जातिव्यवस्था चातुर्वर्ण्य फूकाचा अभिमान यात गुरफटून गेले असते. यातूनच पुढे लोकसंख्या वाढली की अजून दारिद्र्य रेषेखाली जीवन. मग शहरात सर्व सोयी उपलब्ध (झोपडपट्टी) नळाला पाणी, २४तास वीज, पालिकेच्या मोफत शिक्षण, आरोग्य योजनेची अंमलबजावणी मग लोंढे येणारच, बरं रोखण्यासाठी काही निकष लावू म्हटलं की डोळ्यासमोर राज'कीय विरोध. ही सर्व प्रगत राज्य सरकार तसेच जनतेचा अनुभव आहे मागील २५-३०वर्षातला. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र..... सर्वत्र चित्र सारखेच आहे. यावर उपाय एकच भूमिहीन/भूमिपुत्र नौकरी धंदा यात ८०% प्राधान्य दिले तर सुटकेचा मार्ग सापडेल नक्कीच. कधीतरी कुठेतरी कुणीतरी सुरूवात करायला हवी. कायदेशीर अंमलबजावणी केली तरच फरक दिसेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 04/29/2019 - 13:45 नवीन
आता पर्यंत फक्त maharshtra झळ सोसत होता पण आता सर्वच प्रगत राज्यांना उत्तरेच्या बेशिस्त लोकांची झळ पोचू लागली आहे . आणि काही राज्यात विरोध पण झाला उदा .पंजाब,कर्नाटका, गुजरात, आसाम,महाराष्ट्र. तामिळनाडू. त्यामुळे एक दिवस सर्व प्रगत राज्य मिळून ह्या समस्येचा विरोध नक्की करतील आणि तो दिवस जवळ आला आहे
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Mon, 04/29/2019 - 19:10 नवीन
आपली संस्कृती नष्ट होण्याच्या आधीच आपण आपली भांडणे दुर ठेऊन ह्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. आपण एकत्र आल्याशिवाय राज्यकर्ते ह्यात लक्ष घालणार नाहीत.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Tue, 04/30/2019 - 16:33 नवीन
महाराष्ट्रातील जिल्हातील व आजुबाजुच्या शहरात नवनवीन इमारती होत आहेत व त्यासोबत रस्ते दुकाने व इतर अनेक नवनवीन इमारती वाढत आहेत व सिमेंट ची जंगले वाढत आहेत. ह्या वाढत्या इमारती ना सुधारणा म्हणता येईल का? सुधारणा म्हणजे नक्की काय? सायंस व टेकनाॅलाॅजी झपाट्याने मानवी जीवन बदलत आहेत. ह्यालाच सुधारणा म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 04/30/2019 - 19:19 नवीन
देश प्रेम किती असावे लांगोट काढून नागडे होण्या एवढे नक्कीच नसावे . मूर्ख मराठी आपलेच बांधव देश देश करतात पण up Bihari Marathi Lok कमजोर होण्याची वाट बघत आहेत. एकदा ताकत कमी झाली की मराठी लोकांचं भारतीयत्व पण नाकारलं जाईल
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Tue, 04/30/2019 - 23:42 नवीन
स्वतःला जप. हे पाच शब्द बोलून मी खाली बसतो. आणि खाली बसून प्रश्न विचारतो : देशप्रेमाचे परिमाण काय आहे हो?
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Wed, 05/01/2019 - 04:31 नवीन
राजेश 118 बोलतात ते बरोबर आहे. मराठी माणसाने देश प्रेम करायचे म्हणजे आपली भाषा व संस्कृती नष्ट करायची व परप्रातीयांना आपल्या घरात प्रवेश द्यायचा. असले देश प्रेम मराठी नष्ट करेल
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 05/01/2019 - 04:23 नवीन
भारतीयत्व नाकारले जाईल. अहो पण हेच तर तुम्हाला पाहिजे आहे ना? म्हणजे बघा, तुम्ही कामानिमित्त दिल्लीला चालले आहात. रेल्वे स्टेशनवर तुम्ही जाऊन पहिल्यांदा सिक्युरिटी चेकच्या रांगेत उभे राहणार, मग तुमचा पासपोर्ट तपासला जाईल . आता यात तर वेळ जाइलच, कारण तपासणी अधिकारी मराठी असेल ना? याचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठल्याही पोस्टऑफिसमध्ये जाऊन पाच रूपयाचे स्टैम्प घेऊन बघा. मग दिल्लीमधे परत सिक्युरिटी चेक! तुमची तर कसुन चौकशी होणार, कारण तुम्हीच मराठी कारण आहात ना? म्हणजे चार ते पाच तास तुम्ही या कार्रवाईसाठी घालवणार. पण या सगळ्यानंतर तुमच्या तोंडावर ब्रम्हानंद झळकत असणार, कारण याचसाठी तर तुम्ही अट्टाहास केला होता.
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Wed, 05/01/2019 - 04:38 नवीन
आपापसात वाद करण्यापेक्क्षा मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती कशी होईल ह्या वर लिहा ही विनंती
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/01/2019 - 08:10 नवीन
लांगोट काढून नागडे होण्या एवढे नक्कीच नसावे . हेच तत्व, इतर कोणताही मुद्दा (उदा : तुम्ही मांडत असलेला) मांडताना, लक्षात ठेवण्याजोगे आहे, नाही का?! :) ;)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 05/01/2019 - 08:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 05/01/2019 - 08:16 नवीन
पहिली संख्या कामी होती तेव्हा घटनेचा हवाला दिला जायचा . आता संख्या वाढली आहे तर आमचा Maharashtra chya साधन संपत्तीत हिस्सा आहे अशी भाषा बदलली आहे . मध्ये गुजरात मध्ये जे काय घडलं तेव्हा सुधा आमचा गुजरात मध्ये हिस्सा आहे आणि तो मिळवायला आम्ही तिथे जातो अशा प्रतिक्रिया होत्या . डोळे ,कान उघडे ठेवले तर हे स्थितंतर लक्षात येईल . मग धोका किती मोठा आहे ह्याची जाणीव होईल . आपण देशप्रेमाची कोषातून बाहेरच येत नाही .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 05/03/2019 - 12:41 नवीन
तशी ही मुंबईत मराठी माणसाची अवस्था "मुंबई तुमची, भांडी घासा आमची" अशीच आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 05/03/2019 - 13:26 नवीन
तुम्ही म्हणता तशी अवस्था नाही . पण मुंबई चे उदाहरण समोर घेवून पुढची धोरण ठरवली पाहिजेत. पाणी मुंबई ल पाणी पुरवण्यासाठी नवीन धरण बांधली जावू नयेत . मुंबई वर सरकारनी जास्त पैसा खर्च करू नयेत . नवीन शहर जेव्हा उभे राहते तेव्हा परप्रांतीय लोकांशी फटकून राहवे . अशी काळजी पुढे घेतलीच पाहिजे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 05/03/2019 - 13:54 नवीन
कोणत्या हि शहराची प्रगती होण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी लागतात 1) पाणी २) वीज आणि रस्ते ३) कायदा सुव्यवस्था आणि शांतता. आणि ह्या तिन्ही बाबतीत मुंबई देशात १ नंबर ल आहे . महाराष्ट्र आणि मुंबई व्यतिरिक्त देशातील कोणतंच राज्य मुंबई सारखे उत्तम infrastructure पुरवू शकत नाही त्याचाच फायदा घेवून इथे येवून लोक करोडपती झाले . मुंबई मध्ये आले नसते तर कधीच करोडपती झाले नसते आणि ह्याचे सर्व श्रेय महाराष्ट्र चे उत्तम प्रशासन आणि उत्तम राजकीय नेतृत्व आणि संयमी मराठी जनता ह्यांचं च आहे. त्यामुळे व्यापार तुमच्या ताब्यात नाही असे कोण्ही हिनवू नये . तेच जर पाणी ८ दिवसातून एकदाच आले वीज दिवसातून ८ tasach आली . कायदा suvyavshe चा बोरा उडाला. मुंबई चे वातावरण अशांत झाले तर आज करोडो ची वार्ता करणारे हजारात सुधा कमवू शकणार नाहीत हे सुधा सत्य आहे . आणि देशातील कोणतंच राज्य अशी सुविधा देण्यासाठी capable नाही. आज करोड रुपयाचा फ्लॅट फुकट सुधा कोण्ही घेणार नाही . त्या मुळे हिनवू नका तुमच्या मुळे आम्ही नाही आमच्या मुळे तुम्ही सुखात आहात ह्याची जाणीव असावी
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Fri, 05/03/2019 - 19:48 नवीन
महाराष्ट्रात व मुंबईत जे पोषक वातावरण मराठी माणसाने निर्माण केले तसे उर्वरित भारतात कोठेच नाही आहे. ह्याच मराठी माणसाला आज मुंबईतून बाहेर काढले जात आहे. वेळीच आपण जागे नाही तर महाराष्ट्रत ही मुंबई सारखी दशा होईल
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 05/04/2019 - 16:46 नवीन
महाराष्ट्रात व मुंबईत जे पोषक वातावरण मराठी माणसाने निर्माण केले तसे उर्वरित भारतात कोठेच नाही आहे. -- तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही भारत फिरलाच नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 05/04/2019 - 17:59 नवीन
मुंबई ची जी लोकसंख्येची घनता आहे अशी कोणतीही जागा पूर्ण भारता मधील जिथे वीज 24 तास आहे पाणी सर्व घरात नळाने येते लोकल ट्रेन ची सुविधा स्थानिक लोकांचा हिंसक विरोधाची तीव्रता कमी आहे अत्यंत सुरक्षित वातावरण जिथे रात्री ,2 ला सुधा स्त्रिया रस्त्यावर दिसतात अशी एकच जगा सांगा तिथे जावून मी 10 दिवस राहीन किंवा google search Karin फक्त एकच जागा सांगा माझे तुम्हाला आव्हान आहे समजा
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 05/03/2019 - 20:39 नवीन
महाराष्ट्र chya जीवावर भारतीय लष्कर पोसले जाते . महाराष्ट्र वजा केला तर बंदुकीच्या गोळ्या सुधा देश खरेदी करू शकणार नाही. डॉक्टर,engenner,aani shikshit लोकांना १०० रुपये रोजवर काम करायला लागेल उद्योगपती लोक दुकान चालवताना दिसतील गल्ली बोळात
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 05/03/2019 - 21:29 नवीन
तुम्ही जे लिहिलंय ते एखाद्या सभेत जोशात बोलले तर टाळ्या खेचेल, कारण ती गर्दी आहे. पण इथे लिहिताना, संबंधित आणि योग्य विदा द्यावा हि विनंती.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 05/04/2019 - 18:32 नवीन
गुजरात ची राजधानी गांधी नगर आणि राजस्थान ची जयपूर ह्यांची तुलना मुंबई ,पुणे सोडा नाशिक शी सुधा होणार नाही . आणि उर्वरित देश तर हिधोबतच नाही
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/04/2019 - 18:35 नवीन
हा धागा आता वास्तवतेची मर्यादा ओलांडून बेजबाबदार दाव्यांकडे पोचला आहे. अतिशयोक्ती अनेकदा विनोदाचा पाया असते असे म्हणतात... त्या तत्वावर हा धागा आणि अनेक प्रतिसाद (अतिशयोक्तीचा अतिरक असलेले आणि म्हणून विचित्र विनोदी असलेले, पक्षी : लेखकांचे हसे करणारे) विनोद म्हणता येतील. :) अश्या धाग्याची आणि प्रतिसादांची खिल्ली उडवली गेली तर मग त्यांच्या लेखकांना, "टिंगल-टवाळी का होते आहे?" असा प्रश्न विचारायचा हक्क राहत नाही, हे सांगायलाच हवे काय ?! एक प्रकारे हा धागा त्या प्रश्नाचे चपखल उत्तरच आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 05/04/2019 - 18:53 नवीन
लोकसंख्येची घनता आर्थिक व्यवहार 24, तास वीज घरोघरी नळाचे पाणी भाषा फ्रेंडली इथे unconfirt नसतो सर्व प्रकारचे जेवण हॉटेल मध्ये उपलब्ध लोकल रेल स्त्रिया रात्री 2, पण रस्त्यावर असतात असे एकच शहर भारता मधील सांगा आणि नंतर बिनबुडाचे कमेंट ध्या
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/04/2019 - 19:04 नवीन
भारतात दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूरू, इत्यादी अनेक ए-ग्रेड शहरे आहेत त्यांचा जरासा अभ्यास करा. जालावर सगळे सहज सापडेल... आणि मग मत परत एकदा सांगा. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय, केवळ 'मला वाटते म्हणून तसे असेल' या समजूतीने केलेल्या विधानांना बेजबाबदार (किंवा तुमच्या भाषेत बिनबुडाची) विधाने म्हणतात. बाकी यानंतर मी प्रतिसाद दिला नाही तर, ते करण्यात "फायदा/श्रम गुणोत्तर" फार तोट्याचे असल्याने केला नाही असे समजा. मी काय म्हणतो आहे ते तुमच्या ध्यानात यावे अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 05/04/2019 - 19:21 नवीन
Mi तुम्ही suchvleli देल्ही बंगलोर कलकत्ता मद्रास ह्या शहरांची आणि मुंबई ची तुलना खालील पॉइंट वर गूगल वर शोधतो आणि रिझल्ट copy pest Karun इथे कमेंट देतो 1) लोकसंख्येची घनता २) २४ तास वीज ३)नळाने पाणीपुरवठा ४) सर्व भाषिक लोकांना comfort वाटणारी जगा ५)हॉटेल मध्ये देश विदेशात जेवण उपलब्ध ६), कायदा आणि सुव्यवस्था ७) swachta ८) लोकल रेल्वे ९) आर्थिक व्यवहार १०) शांतता ११)स्थानिक लोकांची गुंडगिरी
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 05/05/2019 - 09:14 नवीन
उत्तम ! या प्रतिसादाने तुम्ही कोणताही अभ्यास न करता भडक विधाने केली आहेत, हे मानले आहे. ही सुधारणा आहे. यासाठी तुमचे अभिनंदन ! कारण, कोणत्याही सुधारणेसाठी, प्रथम काहीतरी समस्या आहे हे कबूल करणे अत्यंत आवश्यक असते. यापुढे, "तथ्ये माहीत करून घेणारा बेसिक स्तराचा तरी अभ्यास करून मगच विधान करावे", हे मूलभूत तत्व लक्षात ठेवले तर तुमच्या लेख/प्रतिसादांना इतर लोक योग्य ते महत्व देतील. अन्यथा काय होईल ते दिसत आहेच. योग्य मुद्द्यांचाही पाठींबा चूक, असत्य किंवा अतिशयोक्त विधानांनी करणारे लोक, स्वतःच्याच मुद्यांचा पराभव करत असतात.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा