Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अंदाज तुमचा, आमचा, मिपाकरांचा.

य
यशोधरा
गुरुवार, 04/18/2019 - 15:29
🗣 217 प्रतिसाद
आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा. स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं? बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद! माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल. शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा. तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 129815 views

🗣 चर्चा (217)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/19/2019 - 16:02 नवीन
बीजेपी २८७ टू ३०० काँग्रेस १३० + १५० इतर...१४० केदारनाथबाबा की जय... ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 05/19/2019 - 18:41 नवीन
सहन होत नाही, सांगता ही येत नाही !!
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 05/19/2019 - 19:31 नवीन
मग कळेलच ना? by the way तुम्ही काय शिकवतात? junior का senior महाविद्यालयात?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 05/19/2019 - 18:56 नवीन
NDTV वरचा Exit Poll बघत होतो !! Exit Poll वरचा कार्यक्रम ईतका विनोदी होउ शकतो ? रबिश कुमार : NDA ला ३०० + जागा मिळत आहेत !! का ? कश्या ? एक्सपर्ट : ह्या सरकारने काहीही काम केलेले नसताना सुद्धा जनतेने NDA ला मत दिले कारण पुर्वीच्या नाकर्त्या सरकार पेक्षा हे सरकार चालेल !! NDTV has Lost their mind !!
  • Log in or register to post comments
स
समीरसूर Mon, 05/20/2019 - 14:02 नवीन
एग्झिट पोल आल्यानंतर सगळ्ञांच्या बोलण्याचा सूर बदललाय. मटामध्ये लिहिणारे सुनिल चावके काल एका कार्यक्रमात 'भाजपाची सरशी होणार' हे निसंदग्धपणे सांगत होते. मागचे एक वर्ष मटामधून त्यांनी 'मोदी निष्प्रभ, भाजपचे सरकार अपयशी, लाट गायब, पवार ग्रेट, काँग्रेस महाग्रेट, भाजपचे सरकार आतापर्यंतचे भयानक अयशस्वी सरकार...' वगैरे फालतू लेख लिहून लिहून वैताग आणला होता. काल संध्याकाळी त्यांचा बदलेला स्वर बघून आपले राजकीय निरीक्षक किती फाल्तू आणि निर्बुद्ध आणि आपमतलबी आहेत हे लक्षात आले. फेसबुकवर मनोरंजन म्हणून विश्वंभर चौधरी या तथाकथित समाजसेवकाचे आणि राजकीय निरीक्षकाचे पोस्ट्स बघा. हसू आल्याशिवाय राहत नाही इतके विनोदी लिहितात ते. बालिशपणाचा कळस! केवळ मोदीद्वेष! गेल्या पाच वर्षात भाजपाची कामगिरी नि:संशय उजवी आहे. पण हे त्यांना पाण्यात पाहणार्‍या तथाकथित निर्बुद्ध पुरोगाम्यांना बघवत नाही. मुग्धा कर्णिक ही अशीच भयंकर विनोदी लिहिणारी व्यक्ती आहे. ठासून भरलेला मोदी द्वेष! स्वतःची राजकीय अक्कल शून्य! मी वर २८०-३१० चा एनडीएचा अंदाज खूप आधीच दिला आहे. तो खरा ठरणार असं दिसतंय बहुतेक. गुड फॉर इंडिया!
  • Log in or register to post comments
आ
आदेश007 Wed, 05/22/2019 - 13:24 नवीन
मला वाटतं की Third Front चा एखादा काँग्रेसचा पाठींबा घेऊन पंतप्रधान होणार. भाजपा आघाडी 235 ते 245 काँग्रेस आघाडी 120 ते 140 सपा+बसपा+ममता + इतर 140
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Wed, 05/22/2019 - 13:42 नवीन
तुमच्या अंदाजाचा आदर आहे पन एवढा आशा कि निराशावादी असू नै मतदारान. उद्या कळेलच कि काय ते.
  • Log in or register to post comments
ढ
ढब्ब्या Wed, 05/22/2019 - 22:31 नवीन
घोडा मैदान जवळ आलयं :) बघु कुणाचा घोडा बाजी मारतोय ..
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन गुरुवार, 05/23/2019 - 09:05 नवीन
तुमचा अंदाज बर्‍यापैकी खरा ठरतो आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 05/23/2019 - 12:02 नवीन
भाजप स्वबळावर ३०० गाठत आहे. _/\_
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा गुरुवार, 05/23/2019 - 15:28 नवीन
अचुकतेकडे जाणारे विश्लेषण अभिनंदन
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 05/23/2019 - 19:11 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 05/23/2019 - 20:16 नवीन
तुमचे विश्लेषण योग्य ठरले
  • Log in or register to post comments
ढ
ढब्ब्या Sat, 05/25/2019 - 21:48 नवीन
उत्तम विश्लेषण भागवत साहेब ... प्रचंड मेहेनत घेतली तुम्ही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/24/2019 - 08:06 नवीन
अशा प्रकारे कमळ फुललेले आहे! Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 05/26/2019 - 11:12 नवीन
बघा, लोकांचा विश्वास बसत नव्हता पण आमचा अंदाज जवळ जवळ खरा ठरला... फक्त भाजप ऐवजी एनडीएला ३५० जागा मिळाल्या. ;) असूद्या, येत्या पाच वर्षांत भरपूर काम करून मोदीजी ती कसर पुढच्या वेळेस दामदुपटींनी भरून काढतील अशी अपेक्षा आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/26/2019 - 08:30 नवीन
मिपा अंदाज अपना अपना धाग्यात मजा आली. सर्वांचे आभार...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा