Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०१९

ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/03/2019 - 07:54
🗣 176 प्रतिसाद
India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता. त्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले होते आणि तीन अतिरेक्यांचा खातमा झाला होता.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 88757 views

🗣 चर्चा (176)
च
चामुंडराय Fri, 04/12/2019 - 00:59 नवीन
.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 04/05/2019 - 19:50 नवीन
सिनेमाचे ( विशेषत: हिन्दी) अर्थकारण पाहिल्यास या प्रचाराची सत्यता पटेलच.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 08:21 नवीन
पाकिस्तानचं F-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा खोटा - अमेरिकन नियतकालिक https://www.bbc.com/marathi/international-47829521 -- ही बातमी एक अफवा असल्याचे भारतीय वायुसेनेचे म्हणणे आहे. जर का वरिल बातमी अफवा असेल तर भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ १६ पाडल्याचे पुरावे जाहिर करुन, या अफवांना पुर्णविराम का देत नाही हा एक प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 04/06/2019 - 11:37 नवीन
भारतीय वायुसेना पाकिस्तानी एफ १६ पाडल्याचे पुरावे जाहिर करुन, या अफवांना पुर्णविराम का देत नाही अस करता येणार नाही कारण भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी एफ १६ पाडल पण ते पाकिस्तानच्याच भुमीत जाऊन पडल . ज्यावेळेला अभिनंदनच्या मिग २१ बायसन ह्या विमानाचा पाठलाग करत होते तेंव्हा पाकिस्तानी एफ १६ च्या मागोमाग मिग २१ बायसन सुद्धा पाकिस्तानी हद्दीत घुसल, ते मिग २१ बायसन विमानाच्या जुन्या तंत्रा मुळे वैमानिकाला समजु शकले नाही. अभिनंदन असेच समजत राहीला की तो भारताच्या हद्दीतच आहे. आता जर पाकिस्तानच्या विमानांचा पा ठलाग करावा लागला तर फारुख अब्दुल्ला सारख्या हलकट नेत्यांना मिग २१ बायसन विमाना च्या टपावर बांधुन घेऊन जावे लागेल. मग भारतीय वायुसेनेने शत्रुचे विमान पाडले की नाही ह्याचा आंखो देखा हाल त्या नेत्यांना उपलब्ध होईल
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 04/06/2019 - 13:24 नवीन
‘Not aware’: Pentagon on Pak F-16 count after Feb aerial dogfight with IAF एफ-१६ पाडले नाही असे प्रसिद्ध करणारे नियतकालीक अमेरिकन सरकार किंवा पेंटॅगॉनचे अधिकृत मुखपत्र नाही. आपल्याकडे जश्या सोईस्कर बातम्या "छापून आणल्या जातात" त्यातलाच हा अमेरिकन प्रकार आहे. भारतिय वायूसेनेने पेंटॅगॉनकडे, (अ) एफ-१६ची रडारवरची इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि (आ) पाकिस्तानी विमानाने सोडलेल्या AIM-120 AMRAAM मिसाईलचे भारतात पडलेले व क्रमांकासह असलेले अवशेष, असे दोन सज्जड पुरावे दिले आहेत आणि ते निर्विवाद आहेत. पेंटॅगॉनने पाकिस्तानला दिलेल्या एफ-१६ची मोजणी केली असली तरी त्यासंबंधी माहिती उघडपणे देणे त्यांना फार गैरसोईचे आहे. कारण, आजतागायत जगभरातून अनेक देशांकडून मागणी असूनही, अमेरिका हे विमान फार थोड्या देशांना आणी तेही वापरण्यासाठीच्या अनेक अटींवर देते. असे आधुनिक विमान ६०-६५ वर्षे जुन्या (आणि तेही रशियन) विमानाने पाडणे हे... (अ) अत्यंत मानहानीचे आहे व (आ) भविष्यातल्या एफ-१६च्या विक्रिच्या दृष्टीने मारक आहे. त्यामुळे, एखादे विकाऊ नियतकालीक पकडून अमेरिका दिशाभूल करू शकते. किंवा त्यापेक्षा जास्त शक्यता अशी आहे की, आपले नाक वाचविण्यासाठी पाकिस्तानने ही बातमी छापून आणली असावी. (बालाकोट हल्ल्यामध्ये काहीच नुकसान झाले नाही, अशी बातमीही छापून आणली होती हे आठवत असेलच. नंतर परदेशी वार्ताहरांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवू असे सांगून, भेट तीनदा पुढे ढकलून, शेवटी ती भेट बारगळली; आणि सत्य जगासमोर आलेच.) आता, पेंटॅगॉनने (मोजणी केली असली नसली तरी) अशी काही मोजणी केली नाही असे सांगून, त्या नियतकालिकातील बातमी फेक असल्याचे दुरान्वयाने सांगितले आहे. पण, एफ-१६ पडले की नाही याबद्दल मौन पाळले आहे. विमान पाडले असे कबूल केल्यास, ते प्रकरण अमेरिकन काँग्रेससमोर जाऊन अमेरिकेला पाकिस्तानवर बंधने (सँक्शन्स) घालावी लागली असती व ते करणे सद्यस्थितीत अमेरिकेला परवडणारे नाही. कारण, अफगाणिस्तानमधून पाय काढून घेण्यासाठी तालिबानशी चाललेल्या वाटाघाटींसाठी अमेरिकेला अजूनही पाकीस्तानच्या मदतीची गरज आहे... त्यातले महत्वाचे तालिबानी गट पाकिस्तानची अपत्ये आहेत.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Tue, 04/09/2019 - 07:36 नवीन
भारतीय एअर व्हाइस मार्शल RGK KAPOOR यांनी पत्रकार परिषदेत पुरावा दिला आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 04/09/2019 - 07:56 नवीन
त्यांनी मी वरच्या प्रतिसादाच्या तिसर्‍या परिच्छेदात लिहिलेले पुरावे दिले आहेत. हे पुरावे पेंटॅगॉनला, पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी, गोपनियरित्या अगोदरच दिले होते. मात्र, (अ) अमेरिकन नियतकालिकात, "पाकिस्तानमध्ये केलेल्या मोजणीत सर्व एफ१६ विमाने सुरक्षित आहेत असे दिसले", अशी दिशाभूल करणारी फेक न्युज पाकिस्तान (आणि ?पेंटॅगॉनने) छापून आणल्यामुळे आणि (आ) तिचे भारतिय राजकारणी आणि तथाकथित विचारवंत यांनी भांडवल करणे सुरू केल्यामुळे भारताला, अमेरिकेचा रोष झाला तरी त्याला झुगारून, पाकिस्तानला (आणि ?अमेरिकेला) उघडे पाडणे भाग पडले आहे. अमेरिकेला असे उघडे पाडण्यासाठी आणि तसे करताना एफ्१६ची बाजारातली किंमत करण्याचा निर्णय घेण्यासाठी, प्रचंड राजकिय इच्छाशक्ती व धाडस यांची गरज असते... ते सद्य सरकारने दाखवले, याचा सर्व भारतियांना सार्थ अभिमान वाटायला हवा.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Tue, 04/09/2019 - 08:06 नवीन
विद्यमान शासनाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हाच खरा मुद्दा आहे. विमान पाडलं, कारवाई केली, पुरावे दिले यापेक्षा शासनाचा जनतेला अभिमान वाटतो याचाच अनेकांना मस्तकशूळ आहे. तो वाटू नये यासाठीच हा सगळा गदारोळ सुरू आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 04/09/2019 - 08:23 नवीन
आंतरराष्ट्रिय राजकारणात, "तडक हल्ला करून सामर्थ्यवान राष्ट्राला न दुखावता आपले ध्येय साध्य करता येणे", हा सर्वात योग्य आणि जागतिक मान्यतावर्धक मार्ग समजला जातो... कारण, त्यामुळे जिथे जे संदेश पोचायला हवे असतात, ते तिथे पोचतात. :) सद्या भारताने स्विकारलेला मार्ग, शेवटचे सामंजस्यपुर्ण हत्त्यार असते. जेव्हा भारताने बालाकोटवर (पक्षी : पिओकेमध्ये नाही तर पाकिस्तानच्या सार्वभौम भूभागात ८० किलोमीटर आत जाऊन) हल्ला केला, पण तरीही, चीन व मुस्लिम राष्ट्रांसह एकाही देशाने भारताला दोष दिला नाही... तेव्हाच भारताने जागरिक स्तरावर पाकिस्तानवर मुत्सद्दी विजय मिळवला होता. आपले डावपेच उघड करण्याने (आंतरराष्ट्रिय स्तरावर) अधिक काहीच साध्य होणार नव्हते. पण, पाकिस्तानच्या आणि चुकार भारतियांच्या नाठाळपणाला उपाय म्हणून तसे करावे लागले. किंबहुना, ते डावपेच जाणण्याची सर्वात जास्त जिज्ञासा व गरज पाकिस्तानला आहे... व काही मूर्ख भारतीय, स्वार्थी हितसंबंधांसाठी, (व ते पाकिस्तानला कळले तरी बेहत्तर पण) ते उघड व्हावेत यासाठी गदारोळ करत आहेत. युद्धशास्त्रातला एक महत्वाचा नियम असा आहे : "आपल्या 'न केलेल्या' आणि 'यशस्वीरित्या केलेल्याही' कारवायांच्या डावपेचांचा सुगावा शत्रूला न लागू देता, त्याला सतत गोंधळात ठेवणे, म्हणजे अर्धे युद्ध जिंकण्यासारखे आहे."
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 04/10/2019 - 20:29 नवीन
....दुर्दैवाने एवढी सुबुद्धी अजुन काही लोकांना नाहीये.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 04/12/2019 - 06:52 नवीन
हे त्यांना चांगले माहीत असते, पण स्वार्थापुढे देश आणि स्वत सोडून इतर सर्व खड्ड्यात गेले तरी त्यांना त्याचे सोयरसुतक नसते. इतके निर्लज व निर्ढावलेले मन असल्याशिवाय, गरिबांच्या आणि इतर नागरिकांच्या विकासासाठी, इतकेच काय तर गरोदर स्त्रियांसाठी आणि कुपोषित बालकांच्या पोषणासाठी असलेला कराचा, पैसा सहजपणे खाणे कसे शक्य होईल ???!!!
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 04/06/2019 - 08:24 नवीन
पुण्यात एका युवा मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना पप्पू साहेब बरळले की न्याय योजनेला पैसा परदेशी पळालेल्या भगोडयाकडून आणून गरीबाना वाटला जाईल, धन्य त्या कोंग्रेस पक्षाची आणि रागा तर धन्य आहेच. पण कमाल एका गोष्टीची वाटली की पुण्यात तरुण वर्गाने असे भतुले ऐकून घेतले, एकाही श्रोत्याने यावर आक्षेप नोंदवला नाही? कारण नीरव मोदी, माल्या , चोक्षी असे किती पैसे घेऊन पळाले आहेत की या न्याय योजनेच्या अजगराला पूरे पडतील?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 04/06/2019 - 08:58 नवीन
https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/chai-pe-charcha-village-says-word-not-kept-will-use-nota-to-protest/articleshow/68747434.cms कोणीही आले तरी ह्या लोकांच्या आयुष्यात काही फरक पडेल का ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/06/2019 - 11:47 नवीन
चालू ठेवा. नेहमीचेच छान प्रतिसाद उत्तम करमणूक. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sat, 04/06/2019 - 13:49 नवीन
हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 14:23 नवीन
हि निवडणूक लोकसभेची आहे, मराठी व महाराष्ट्रा साठी जो जास्तीत जास्त काम व सुधारणा ची मागणी करेल त्याच उमेदवार ला मते द्या -- हा तर खूप जुना फंडा झाला. आता ज्या-ज्या पक्षाचा उमेदवार, मतदाराला दाबून पैसे देईल त्या सर्वांकडून पैसे घेऊन शेवटी मतदान ' नोटा' ला करायचे. :))
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 04/07/2019 - 02:27 नवीन
शाळेत नागरिकशास्त्र हा विषय ऑप्शन ला टाकला होता काय? लोकसभेची निवडणूक देशाचं नेतृत्व कोण करणार हे ठरवते. प्रादेशिक भाषा आणि राज्यासाठी प्रत्येक राज्य विचार करत बसलं तर कसं सरकार येईल याचा काही विचार केला आहे का? प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी विधानसभेच्या निवडणूक आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 04/08/2019 - 06:08 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
स
स्वामि १ Sat, 04/06/2019 - 14:08 नवीन
मराठी व महाराष्ट्रा वर परप्रातीयांचे आक्रमक झाले असून मराठी भाषा व संस्कृती संपण्याच्या मार्गावर आहे म्हणून जो मराठी भाषा व संस्कृती जपण्यासाठी कार्य करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 04/06/2019 - 14:26 नवीन
मराठी भाषा व महाराष्ट्राचे 'नवनिर्माण' करायची प्रतिज्ञा घेतलेला पक्ष यंदा निवडणुकच लढवत नाही आहे ना. नाहितर केले असते त्याला मतदान.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Sat, 04/06/2019 - 17:27 नवीन
हो ना.. मराठी चा ठेका घेतलेले आदरणीय ठाकरे साहेब हे यंदा बारामतीच्या काकांचा प्रचार करणार आहेत. तसें कॉन्ट्रॅक्ट साइन झालेय.. त्याबदल्यात आगामी विधानसभा निवडणुकीत काहीतरी सेटलमेंट करायची असेल.. असो. हेच राज ठाकरे छगन भुजबळ, अजित पवार, तटकरे इ विरुद्ध अगदी बेंबी च्या देठापासून बोंबलत होते.. आता त्याच लोकांना निवडून आणण्यासाठी सभा घेणार आहेत म्हणे. मनसे सैनिकांचा ( राज ठाकरे गुंड सेना ) मेंदू तपासून घेतला पाहिजे.. कारण ते अजूनही राज ठाकरे यांच्या माकड उड्यांवर टाळ्या वाजवतायत...
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 04/07/2019 - 06:52 नवीन
अहो त्यांच्या सभेला होणारी गर्दी मनसे ला मतदान करत नव्हती तर काँग्रेस आणि चलाख काका ला मतदान करील याची काही शाश्वती नाही. एका परिने राज जितके मोदींच्या नावाने बोम्बलतिल तितके भाजप सेने चे मतदारा वाढतील . कारण राज ठाकरे ला माणनारा वर्ग हा उजव्या विचारांचा , देश व धर्म यांना प्राधान्य देणारा , सुशिक्षित आणि आर्थिक दुष्टचक्रातून बाहर असलेला आहे , त्यामुळे राज नी जरी टोपी फिरवली तर राज ला फिरवायला या वर्गाला वेळ लागणार नाही . राजकारणात वाटचाल करताना जरी त्यांची व्यूवरचना चुकली असली तरी प्रतिमा खराब न होवू देता त्यांनी पुन्हा भरारी घेणे अपेक्षित होते , पण तसे न करता एखाद्या पाळीव प्राण्या सारखे काकांच्या ईशाऱ्या वर मोदिवर ओरडत सुटले आहेत . बर मोदींच्या विरोधात साथ कोणाची देत आहेत तर कुप्रसिद्ध काँग्रेस आणि रा कॉ ची ? या दोन पक्षा बद्दल राग असणारे राज च्या आवाहनावरुन कशा वरुन त्या दोन बदनाम पक्षाला मतदान करतील ? त्यांच्या या दुहेरी व्यक्तिमत्वचा धिक्कार करणारे मनसे चे कार्यकर्ते मनसे सोडून केव्हाच गेले आहेत .
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 04/06/2019 - 15:20 नवीन
सध्या भरतीय जनतेला २०१४ च्या मानाने कठीण परिस्थिती आहे. कमकुवत व स्क्शम नस्लेला (पुर्विचा भ्रष्टाचारी) विरोधी पक्ष तर दुसरीकडे बहुमत मिळुनही फारस काही करु न शकलेला (जुमलेबाज व फेक)सत्ताधारी पक्ष.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sat, 04/06/2019 - 16:02 नवीन
पप्पूच्या जाहिरनाम्याने पुष्कळ सोपी करून दिली आहे. जुमले परवडले पण हिरवळ नको.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sat, 04/06/2019 - 18:52 नवीन
जुमले परवडले????? सामान्य भारतीय जनतेला नाही परवडनार. तुम्ही असाल हो असामान्य. हिरवळ नको असेल तर त्यांना ग्रुहमंत्री करा पण पंतप्रधान नकोच.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 04/07/2019 - 04:05 नवीन
15 लाख न मिळाल्याचे दुःख तुमच्या प्रतिसादातून ओसंडून वहात आहे. हिरवळ फोफावण्याचे कारण आपल्या पप्पूच्या पार्टिची धोरण आहे हे तरी मान्य आहे तुम्हाला हे ही नसे थोडके! आता जरा रागाच्या जाहिरनामा तपासू. हे जे फुकटचे खैरात वाटायचे चालले आहे ते फार वर्षापूर्वी ग्रीस या देशाने करून बघितलेले आहे. परिणाम आज त्यांची अर्थव्यवस्था गंटागळ्या खात आहे. गोंधळी साहेब तुम्ही आयकर भरत असाल अशी अपेक्षा करून हे बोलन्याची हिम्मत करतो की तुम्हालाच पिळून हे खैरात वाटणार आहेत. राहिली गोष्ट तुम्हाला न मिळालेल्या 15 लाखानी तुमचे माझे काही नुकसान झालेले नाही. ( 15 लाख देणार हे मोदिनी कुठेही म्हटलेले नाही)
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Sun, 04/07/2019 - 08:10 नवीन
बहुधा तुमचा अभ्यास कमी दिसतो आहे़. जुमले - नोकरर्या देणे,उज्वला योजना,विमुद्रीकरण्,स्वच्छ भारत्,मुद्रा लोन्,मेक इन इंडिया,.......... अर्थव्यवस्थे बद्दल बोलता मग प्र.मं.आ.यो. अंतर्गत २लाख वाटले जातायत त्याचे काय? शेतकर्यांना ६ हजार वाटले त्याच काय? हे तुम्हाला पटते काय? RBI वर पैसे देन्यासठी दबाव का आणावा लागला? खर बोलणार्याला देशद्रोहि ठरवण्यात येत आहे. सरकारच चुका व अपयश दाखवणारर्या माध्यमांवर दबाव आणला जात आहे. सरकारच्या विरुद्ध जाणारी महिती बाहेर येउ दिली जात नाही आहे.खोटी महिती दिली जात आहे. आता ही विकास करनण्याबद्द्ल,.बेरोजगारि बद्द्ल काहीच बोलत नाहि आहेत. मी मान्य करतो की भारतीय जनता जास्त भावनाशील आहे.त्यामुळे आपल जास्त नुकसान झालेल आहे. पण आता फक्त मनाने विचार न करता बुद्धीला पटेल ते केल पाहिजे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 04/08/2019 - 03:51 नवीन
किती गोंधळ घालताय. नोकऱ्या देणे: एकच उदाहरण देतो, तुमच्या लाडक्या राफेल प्रकरणात रिलायन्सला एवढं मोठ्ठ कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्यांनी कंपनी स्थापन सुद्धा करून फाल्कन विमानाचे सुटे भाग तयार सुद्धा करायला सुरुवात केली. मग तिथे काय अनिल अंबानी आणि त्याचे कुटुंब स्वतः सगळी कामं करतेय का? नोकऱ्या तयार झाल्या नाहीत? बरं जिथे फॅक्टरी आहे तिथे वाहतूक करणारे, भजी तळून आणि चहा बनवून लोकांच्या खाण्याची व्यवस्था करणारे वगैरेंना रोजगार मिळाला नाही? अशी कितीतरी उदाहरणे देता येतील... अगदी गंगेतून होणाऱ्या जलवाहतुकीपासून सरदार पटेलांच्या पुतळ्यापर्यंत. दुसरी महत्वाची गोष्ट रोजगार देण्याचे आश्वासन देता येऊ शकते पण नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन कोणी कसे देऊ शकेल? मोदींनी २ कोटी "नोकऱ्या" देण्याचे आश्वासन दिले होते याचा काही पुरावा द्याल का? प्रधान मंत्री आवास योजना: २ लाख काय खैरातीसारखे वाटले जात नाहीयेत. जर निम्न उत्पन्न गटातील लोकांना जर स्वतःचे घर घ्यायला मदत मिळत असेल तर तुम्हाला काय वाईट वाटतंय? संपूर्ण घर फुकट देत नाहीयेत तर थोडी मदत करत आहेत. यात मोदी किंवा त्यांच्या मंत्र्यांपैकी कोणी घोटाळा केला असेल तर ते सांगा. बादवे प्रगत देशांमध्ये सुद्धा पहिले घर घेणाऱ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरकारी मदत मिळते. शेतकऱ्यांना ६ हजार: वर्षाला ६ हजार रुपये बीबियाणे आणि इतर खर्चासाठी मिळणार आहेत. हे सुद्धा सरसकट वाटले जात नाहीयेत. यात घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे द्या. कोण कोणाला देशद्रोही ठरवत आहे? खरं बोलणाऱ्याला म्हणजे कोणाला? जे तुम्हाला खरं वाटतंय ते मला नसेल वाटत तर? पण तरीही भाजप किंवा सरकारने असे "खरं" बोलणाऱ्यांवर काही कारवाई केली आहे का? का नुसते सोशल मीडिया वर कोणी तुम्हाला विरोध केला म्हणून तुम्ही ओरडताय? कुठल्या माध्यमांवर कोणी दबाव आणलाय याचे पुरावे तर द्या. उगाच काहीपण टायपायचे. बेरोजगारी वर बोलत नाही म्हणजे काय? विकास होत नसेल तर नोकऱ्या निर्माण होत नाहीत. कुठल्या पार्टीचे सरकार आहे ते बाजूला ठेवा, सरकारचे काम संधी तयार करायचे आहे. ते काही तुम्हाला बोटाला धरून नोकरी मिळवून देणार नाहीत. भांडवलाअभावी जे लोक छोटामोठा व्यवसाय करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मुद्रा योजना आहे, तर तुम्हाला त्यावरही आक्षेप असेल. नवीन व्यावसायिकांना कुठलीही ब्यांक दारातही उभं करत नाही हे स्वतः एकदा अनुभव घेऊन बघा. मग अश्या लोकांना सरकार मदत करत असेल तर ते पण रोजगार निर्माण करणेच नाही का? फुकट दरमहा ६-१२ हजार देण्यापेक्षा हे नक्कीच चांगले आहे. ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या मिळवण्यासाठी जे स्किल लागते ते मिळवणे, इंटरव्यू पास करणे हे प्रत्येकाला आपलेआपलेच मिळवावे लागणार आहे. त्यात सरकार काय करणार?
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 04/08/2019 - 05:26 नवीन
अहो नीट अभ्यास केला असता ना मी(10वीच्या बोर्डाचा)जाउदे! मुद्द्यावर येउया. स्वच्छ भारत - जरा मुंबईत येऊन फिरा, जागोजागी स्वच्छतागृह उभी राहिली आहेत. पुष्कळ स्वछतागृह ही कोंग्रेसच्या नगरसेवकानी वा आमदारानी उभारली आहेत. ही त्यानी समाजसेवा म्हणून नाही तर मोदींच्या भीतिने उभारली आहेत. ज्या भागात पाच वर्षापूर्वी स्वछतागृहाची निकड नव्हती तिथे अचानक स्वछतेचा का पूळका यावा? तर आपण नाही केले तर मोदी करतील या भीतिने! मग मारे त्यासाठी केंद्राकडून अनुदान घेतले असेल पण नाव मात्र या टिकोजीरावांचे, कोंग्रेसचे आमदार अस्लम शेख हे या बाबतीत आघाडिवर आहेत. नाहीतर या माणसाला फक्त अनधिकृत मशिदि बांधण्यासाठी निवडून दिले आहे असा संशय येतो, बाकी मतदारसंघात काही उल्लेखनीय कामगिरी नाही. गंगा स्वछता अभियान- फार वर्षापूर्वी गंगेचे फोटो यायचे वर्तमानपत्रात छापुन , तटावर जाळले गेलेले मृतदेहाचे अर्धवट जळलेले अवशेष गंगेत वाहत असलेले! अगदी गंगेचे घाट वेगेरे पार्श्वभूमीवर दाखवून. आता असे फोटो का नाही येत? मिशन फेल गेले आहे हे दाखवायला विरोधी पक्षाना बरे नाही का पडणार? बर जलवाहतुक, त्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर वेगेरे गोष्टी चर्चेला घेतल्याच नाहीत. मी ज्या कंपनित काम करतो त्या फ़र्मला मेडिकल ट्रांसक्रिप्टर या पदासाठी उमेदवार पाहिजे आहे, मिळतच नाही आहे. जे येतात ते असा पगार मागतात की आमचा मैनेजर खजिल होतो. कारण त्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या तेवढा पगार देतात. ही परिस्थिति सगळीकड़े आहे. कामे आहेत पण योग्य उमेदवार नाही, योग्य उमेदवाराला घेण्यासाठी कंपन्या टपलेल्या आहेतच. तर गोंधळी साहेब डोळे उघडा आणि आजुबाजुला बघा,
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Mon, 04/08/2019 - 07:41 नवीन
भंकसजी व ट्रेड मार्कजी जरा ही लिंक पहा - https://www.youtube.com/watch?v=wfF5Q17lYy4 मला फक्त एवठेच म्हणायच आहे की जे बरोबर आहे ते आहे पण जे चुक आहे किंवा खोट आहे त्याला चुकिचेच म्हटले पाहिजे. व्यक्ति पुजा न करता तटस्थ राहुन बघायला हवे. तरच दिखावा व सत्य काय आहे ते समजुन येइल.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 04/08/2019 - 08:56 नवीन
व्यक्ति पुजा न करता तटस्थ राहुन बघायला हवे. तरच दिखावा व सत्य काय आहे ते समजुन येइल. जरा कळ काढा येत्या मे मध्ये कळेलच काय दिखावा आहे आणी व सत्य काय आहे ते समजुन येइलच !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 04/08/2019 - 15:15 नवीन
मला सुद्धा भाजप चे सरकार आणि मोदी जुमलेबाज वाटतात !!!! अस वाटतं फेकून देवू भाजप ला अडगळीत!!! पण भाजप ला पर्यायी पक्ष लवकर आठवत नाही हो !! बर गठबंधन ला निवडून द्यावे तर किमान 2004 व 2009 सारखी परिस्थिति आता हवी होती , म्हणजे पंतप्रधान पद काँग्रेस ला भेटणार का ? भेटले तर काँग्रेसमध्ये 130 करोड़ लोकांचे नेतृत्व खंबीर / गंभीरपणे करणारा कोणी आहे का ? काँग्रेस ला पंतप्रधान पद देणे इतर पक्षानां मान्य असेल का ? आत्ताच पंतप्रधान पदावरुन त्यांच्यात एकमत नाही तर सुशिक्षित असलेल्या भाजपा विरोधकांनीं सत्तेची चावी कोणाला सोपवावी ? पंतप्रधान पदी भाजप व्यतिरिक्त कोणत्या पक्षाचा कोणता नेता योग्य वाटतो ? या विषयावर मला आपले विचार वाचायला आवडतील . 2009/ 2014 ला निष्कलंक ममो होते म्हणून ठीक , पण आता कोणत्या पक्षाचा कोणता नेता पंतप्रधान पदी योग्य वाटतो ? कोणते नेते सक्षम / योग्य वाटतात ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 04/08/2019 - 15:17 नवीन
गोंधळे साहेबांसाठी प्रतिसाद होता बरका !!!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/09/2019 - 02:52 नवीन
म्हणजे मोदींचे नाव घेतात म्हणून एबीपी सारख्या मोठ्या न्यूज चॅनेलच्या प्रक्षेपणात अडथळे आणू शकतात पण नंतर पु. प्र. वाजपेयींनी जे ब्लॉग लिहिले किंवा मुलाखती दिल्या व्हिडीओ पब्लिश केले त्यावर मात्र सरकारने काहीच केले नाही? एवढंच नव्हे तर ज्या ध्रुव राठीच्या तूनळी च्यानेलची लिंक तुम्ही दिली आहे त्याच च्यानेलवरून ध्रुव कितीतरी मोदीविरोधी गरळ ओकत असतो. त्यावर किंवा वायर वगैरे च्यानेल्स वर काहीच कारवाई होत नाही? असं कसं होत असेल बरं? अगदी एनडीटीव्ही वरून तसेच राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष वगैरे सगळे हाय प्रोफाईल पत्रकार तर अगदी २००२ पासून मोदींविरुद्ध बोलत आहेत, नाहीनाही ते आरोप करत आहेत त्यांचे च्यानेल नाही ब्लॉक झाले? मध्यंतरी रवीश कुमारने पण ब्लॅकआउट स्क्रीनचं नाटक केलं होतं हे आठवत असेल. मोदींनी किंवा सरकारने त्यांचे प्रोग्रॅम ब्लॅकआउट केले हे कशावरून? ध्रुव राठी सांगतो म्हणून? काय पुरावा आहे?
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 04/09/2019 - 07:41 नवीन
अगदी अपेक्षित प्रतिसाद दिलात. मुळ मुद्दा असा आहे कि त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगा. त्यांना पैसे देउन अस बोलायल लावले आहे का?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 04/09/2019 - 23:55 नवीन
कोणाचे काय काय लागेबांधे आहेत, कोणाची कुठे कुठे बोटं किंवा गळे अडकलेत, कोणाचे कसले साटेलोटे आहेत हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला कुठून कळणार? पण मी सगळ्या बाजूची मतं वाचतो/ ऐकतो. उदा. राफेलचा मुद्दा - मोदी, सीतारामन, जेटली यापासून ते रागा, पायलट, सिंदिया, पवन खेडा सगळ्यांची मतं ऐकली. फ्रांस सरकारने दिलेलं प्रेस रिलीझ वाचलं. त्यानंतर कॅग आणि कोर्टाच्या निर्णयानंतर माझं तरी मत असं बनलं आहे की या प्रकरणात घोटाळा झाला नसावा. या विषयावर समस्त पत्रकारांमध्ये फूट पडली आहे. अर्णब आणि काही प्रमाणात टाइम्स नाऊचे पत्रकार घोटाळा नाही म्हणतात तर राजदीप, बरखा ईई घोटाळा आहे हे ठासून सांगतात. त्यात तुम्ही ध्रुव राठीचे व्हिडीओ बघितलेत तर त्याने मांडलेल्या मुद्द्यनमध्ये फारसा दम वाटत नाही. ओढून ताणून संबंध लावणे अर्थाचा अनर्थ करणे हे बऱ्याच प्रमाणात दिसते. तुम्ही वर टाकलेल्या व्हिडीओ मध्ये जे प्रकरण आहे ते राफेलच्या मानाने छोटं आहे. पण राफेलच्या प्रकरणात सरकारविरुद्ध किंवा मोदींविरुद्ध जाहीरपणे बोलणाऱ्या कोणाला कुठल्या कारवाईला तोंड द्यायला लागलं आहे का? किंवा कुठल्या च्यानेलवर काही आडमार्गाने सुद्धा काही कारवाई झाली आहे का? त्या जाहिरातील मधिल लोक जे सांगत आहेत ते खोट कि खर आहे.ते सांगा ही जाहिरात आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. एक तर ध्रुव राठी राहतो जर्मनी मध्ये, तिथून फावल्या वेळात हे व्हिडीओ तयार करतो. त्याचे बरेच सबस्क्रायबर्स आहेत आणि हिट्स पण बऱ्यापैकी मिळतात. तूनळीवर जितके हिट्स त्याप्रमाणात पैसे पण मिळतात. जर हे लोक आम्ही तटस्थ आहोत असे म्हणतात तर एकतर्फी व्हिडीओ का शेअर करतात? यापैकी कोणीही सलग कुठले व्हिडीओ दाखवत नाहीत तर त्यांना सोयीस्कर असेल असे भाग कापून दाखवतात. मध्ये त्यांची मते सांगतात आधीचे आणि नंतरचे प्रसंग सरमिसळ करून त्यांना पाहिजे तसे नॅरेटिव्ह तयार करतात.
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud Wed, 04/10/2019 - 06:50 नवीन
हा ध्रुव राठी हे काँग्रेस च्या इको सिस्टिम ने मोठे केलेले प्रकरण आहे. ऑर्डर मिळाल्यासारखे याच्या ट्विट ला सागरिका घोष आणि तत्सम पत्रकार रिट्विट करायला लागतात. त्यानंतर लगोलग याला NDTV वर चर्चे बोलावणे येते. मग प्रिंट,वायर सारख्या वेबसाइट्स... ज्यातील बहुतांशी २०१४ नंतर जन्माला आल्यात त्या या ध्रुव राठी ला उचलून धरतात. एका ठराविक काळात त्याचे ट्विटर चे फॉलोवर्स लाखो ने वाढवले जातात. हे घडण्या पेक्षा घडवून आणले जात असते. https://www.youtube.com/watch?v=iMFCes4QDao
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Wed, 04/10/2019 - 10:42 नवीन
माफ करा ती जाहिरात नाही आहे. पं.प्र प्रत्यक्ष त्या लोकांशी संवाद करत आहेत. अस दाखवण्याचा प्रयत्न आहे कि शेतकर्यांच उत्पन्न वाढल आहे. पण त्याच लोकांना याबद्द्ल विचारल्यास ते तस नसल्याच सांगत आहेत. हे माझ्यासारख्या छोट्या माणसाला कुठून कळणार? तुम्हालाही या संबंधी ठोस माहिती नाहि. त्यामुळे माझ त्या व्हिडीओ बद्दलच मत बदलेल नाही. तुम्ही जर त्या व्हिडीओ मधल्या लोकांच खरच उत्पन्न वाढल आहे ह्या संबंधी माहिती दिलीत तर माझ मत बदलेल. मुळ मुद्दा महत्वाचा आहे बाकी हा असाच आहे तो तसाच आहे ह्या वादात मला पडायच नाही आहे. मुद्दा- उज्ज्वला योजनेनुसार गरीबी रेषाखालील जनतेला गॅस कनेक्शन व १६०० रु. ३वर्षांकरता देण्यात आले. जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/10/2019 - 14:52 नवीन
जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत? हीच स्थिती मोबाईल बद्दल १० वर्षांपूर्वी होती याची आठवण झाली. सध्या भारतात ७३ कोटी लोक भ्रमणध्वनी वापरतात. For 2017 the number of mobile phone users in India is expected to rise to 730.7 million. https://www.google.com/search?q=no+of+mobile+users+in+india&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=no+of+mobiles&aqs=chrome.2.69i57j0l5.7878j0j8&sourceid=chrome&ie=UTF-8 The World Health Organization (WHO) had said that IAP was claiming 500,000 lives in India every year, most of whom were women and children Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/17605667.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst .. हा आकडा २०१२ चा आहे. या पाच लाख स्त्रियांच्या आणि बालकांच्या आयुष्याची किंमत काय? दारू पिण्यासाठी पुरुषांच्या खिशात पैसे असतात पण गॅसचा सिलिंडर आणण्यासाठी पैसे नसतात हि भीषण वस्तुस्थिती आहे. आणि जर राहुल गांधी सत्तेत आले तर ६ हजार रुपये दर महिना असेच खात्यात येणार आहेत मग काय चांदीच आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Wed, 04/10/2019 - 17:40 नवीन
मी योजनेच्या विरुद्ध नाही आहे. तर साध्यते विषयी शंका आहे. https://www.livemint.com/Politics/oqLQDFKNuMdbmLEVL88krN/Indias-poor-are-not-using-LPG-cylinders-they-got-under-Ujjw.html https://www.thehindu.com/news/national/about-85-of-ujjwala-beneficiaries-in-four-states-still-use-earthen-stoves/article26763409.ece
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 04/10/2019 - 20:43 नवीन
मुद्दा- उज्ज्वला योजनेनुसार गरीबी रेषाखालील जनतेला गॅस कनेक्शन व १६०० रु. ३वर्षांकरता देण्यात आले. जर का गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे. याचे उत्तर अगदी सोप्पे आहे, ते फुकट द्यायला सांगू.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 04/11/2019 - 03:21 नवीन
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या OSD आणि इतर जवळच्यांकडे २८१ कोटी रुपये सापडले आहेत अशी बातमी आहे. पण जरा गुगलून बघा किती मुख्य वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन म्हणून आहे. तसेच किती न्यूज चॅनेल्स वर यावर ब्रेकिंग न्यूज म्हणून चर्चासत्र झडत आहेत. राफेल प्रकरणात सगळे मोदींना फक्त प्रश्न विचारात आहेत. पण ६०,००० कोटींच्या व्यवहारात ३०,००० कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिश्यात कसे टाकता येतील याचे स्पष्टीकरण राहुल गांधीला कोणीच विचारत नाही. राफेल वरचीच एक याचिका न्यायालयाने दाखल करून घ्यायला संमती दिली म्हणून सगळे लगेच त्यावर मोदींना मोठा झटका म्हणून ओरडायला लागले. पण राहुल आणि सोनिया ५००० कोटींच्या हेराल्ड प्रकरणात बेलवर बाहेर आहेत पण एकसुद्धा प्रश्न नाही? ध्रुव राठी, विनोद दुआ वगैरे स्वतःला तटस्थ समजणाऱ्यांनी या कुठल्या विषयावर राहुल/ सोनिया/ काँग्रेस/ प्रियंकाला गेलाबाजार काँग्रेसच्या एखाद्या मंत्र्याला व प्रवक्त्याला प्रश्न विचारणारे व्हिडीओ प्रदर्शित केलेत का? त्या व्हिडीओ संबंधी - त्या महिलेचं पाहिलं व्यक्तव्य होतं - माझं उत्पन्न दुप्पट झालं. मग त्यावर खोदून खोदून परत विचारण्यात आलं - आधी कुठली शेती करत होतात त्यातूनच झालं का? तर तिने नाही सांगितलं. तिथे क्लिप संपली. फक्त शेतीचं उत्पन्नच दुप्पट व्हायला पाहिजे असा आग्रह का? जर शेतीच्या जोडीने, सरकारच्या कुठल्या तरी योजनेमुळे/ साहाय्यामुळे, ती दुसरे व्यवसाय करून उत्पन्न वाढवत असेल तर चालणार नाही? गॅस रिफीलींगचे दर बघतले तर गरीबी रेषाखालील जनतेला ते कस परवडु शकत हा खुप मोठा प्रश्नच आहे. मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे केरोसीनचा काळाबाजार चालू रहाणार. माझा प्रश्न तर हा आहे की प्रत्येक योजना अशी सेपरेट का बघितली जातेय? सरकारच्या DBT, मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक वगैरे योजना आहेत ज्यामुळे बरेच लोक गरिबीरेषेच्या वर आले आहेत, येत आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी गुरुवार, 04/11/2019 - 11:51 नवीन
माझा मुद्दा हा आहे की ही योजनेचे जे लक्श होत ते साध्य झालेल नाही आहे.१ ला सिलेंडर वापरल्यानंतर तो परत रिफील करणार्यांच प्रमाण कमी आहे. ही सद्याची वस्तुस्थिती आहे. मग या लोकांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं, म्हणजे ते केरोसीन व लाकूड वापरत असतील तेच वापरू द्यायचं? म्हणजे तुम्हाला निदान सिलेंडर रिफीलींगचा मुद्दा मान्य आहे असे दिसते. तर या योजनेतील त्रुटी दुर केल्या पाहिजेत. तो पर्यंत जाहिरात बाजी न केल्यास ते योग्य राहील. मुद्दा :- डिमोचा मुळ उद्देश सफल झाला आहे असे दिसुन येत नाही आहे. किती ब्लॅक मनी पकडला त्याची आकडेवारी कोण देईल का? फेक नोटा सापड्ल्या पण आता ही २००० च्या फेक नोटा सापडत आहेत. https://www.businesstoday.in/current/economy-politics/demonetisation-rbi-warned-govt-black-money-fake-currency-claims-medical-tourism/story/289291.html
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी गुरुवार, 04/11/2019 - 12:07 नवीन
https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/demonetisation-all-cost-and-little-benefit/articleshow/65639832.cms
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/11/2019 - 17:09 नवीन
डिमॉनेटायझेशन मूळ उद्देश किती सफल झाला आहे हे राजकीय पक्षांची वक्तव्ये वाचलीत तर ०% पासून १००% पर्यंत एकदा येईल. परंतु लष्कर आणि निमलष्करी दले आणि गुप्तचर खाते याना विचारले तर त्या बऱ्याच गोष्टी ज्या बाहेर आल्या नाहीत त्या समजून येतील. माझ्या लषकरी गुप्तहेरखात्यातील मित्राशी सध्याच बोलणे झाले तेंव्हा त्याने सांगितलेली गोष्ट अशी आहे. १) महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगण या लागून असलेल्या नक्षलवादी भागात जे उद्योगधंदे आहेत त्यांच्याकडून नक्षलवादी खंडणी गोळा करतात हे उघड गुपित आहे. शिवाय शहरी नक्षलवादी सुद्धा त्यांना असेच पैसे पुरवत असतात. अधिकारीक तत्वावर कुणीच मान्य करणार नाही परंतु सर्वाना "माहित आहे." हा पैसा संपूर्ण रोख रकमेच्या स्वरूपात (५०० आणि १००० च्या नोटा) होता आणि या लोकांनी हा सर्वत्र जमिनीत पुरून ठेवलेला होता. यातून या लोकांच्या संघटनांचा खर्च चालत असे. एका फटक्यात हा पैसा निरुपयोगी झाला या लोकांनी उद्योगांना परत वेठीस धरण्याचा प्रयत्न केला परंतु उद्योगांकडे पण पैसे नव्हतेच त्यामुळे नक्षलवादी संघटनांची फार कुचंबणा झाली. शहरी नक्षलवादी एकदम आरडा ओरडा कोल्हेकुई करू लागले याचे हे कारण आहे. २) विविध जिल्हा बँकांना अन सहकारी पतपेढ्याना पैसे बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता परंतु त्यांनि आपल्या संचालक मंडळाचे कोट्यवधी रुपये बदलून दिले आणि हे पैसे त्यांच्या तिजोरीत पडलेले आहेत. रिझर्व्ह बँकेकडे वारंवार खेटे घालूनही बँकेने हे पैसे बदलून देण्यास नकार दिला आहे त्यामुळे एका बँकेत हे पैसे सडू लागल्याची बातमी आली आणि दुसऱ्या बँकेत उंदरांनी पैसे कुरतडल्याची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेचा हिशेब साधा सरळ आहे. हे पैसे घेऊन त्याची विल्हेवाटच लावायची आहे. मग आपण बदलून का द्या? या स्थिती मुळे या जिल्हा सहकारी बँका आणि पतपेढ्या डबघाईला आल्या आहेत. कागदोपत्री पैसे आहेत पण ते संचालकांना देऊन बसल्यामुळे प्रत्यक्षात पैसे नाहीत अशी स्थिती आहे. आता भागधारकांना पैसे/ कर्ज द्यायचे तर पैसे आणायचे कुठून? यामुळे सामान्य नागरिकांमध्ये याबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. यात एका राजकीय पक्षाचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांच्या लोकांची निवडणुकीला उभे राहायची तयारी नाही. दुसऱ्या एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने आपले काही पैसे (बाकी बरेच पैसे फार मोठी किंमत देऊन बदलून घ्यायला लागले) आपल्याच जातीच्या बँकेतुन बदलून घेतल्याची अफवा आहे. या बँकेची स्थिती यामुळे अजूनच वाईट झालेली आहे. आणि त्यांच्या वर रिझर्व्ह बँकेचे अजूनच निर्बंध आले आहेत. https://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/rbi-directs-mumbai-based-bank-to-restrict-withdrawals/articleshow/63819640.cms http://www.uniindia.com/ckp-bank-depositors-forum-urge-buying-of-unauctioned-attached-properties-of-fraudsters/business-economy/news/1202296.html काका मला वाचवा असा टाहो ऐकू आल्याचे काही लोक बोलताना ऐकू आलंय. दुवे काळजीपूर्वकी वाचा
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 04/12/2019 - 13:04 नवीन
नोटबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे चांगलेच मोडले होते. आता निवडणुकीदरम्यान त्यांचे हल्ले परत वाढलेत परंतु त्याची कारणे वेगळी आहेत. मधल्या काळात मोदींच्या आर्थिक धोरणांचा परिणाम म्हणून देशाची अर्थव्यवस्था चांगलीच वेगात धावायला लागली आहे. त्यामुळे लघु उद्योजक आणि शेतकरी यांच्याकडे चांगलाच पैसा खेळायला लागला आणि नक्षलवाद्यांना जीवदान मिळाले. त्यात अमोल पालेकर वगैरेंनी सत्तरच्या दशकात जो दाबून पैसा मिळवला तो आता त्यांनी शहरी नक्षलवादी म्हणून द्यायला सुरुवात केली आहे. पण काळजी नको. नवीन सरकार आल्यावर एक अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक तर होणारच. स्थलसेना प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वगैरेंच्या संपर्कात नसलेला ~ सर टोबी
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 04/12/2019 - 17:00 नवीन
एक गोष्ट लक्षात घ्या नक्षलवादी काही मूर्ख नाहीत. त्यांनी पण सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांच्या खात्यात पैसे जमा केलेच शिवाय लोकल कंत्राटदाराना सुद्धा दहमकावून आपली कामे केलीच तेंव्हा त्यांचा काही सगळाच्या सगळा पैसे वाया गेला असे नाही. शिवाय काही गोष्टी कुठेच आणि कधीच प्रसार माध्यमात येणार नाहीत. त्या म्हणजे एकाच नंबरच्या दोन नोटा छापल्या गेल्या होत्या आणि हे सर्व सरकार आणि टांकसाळीत तज्ञ लोक यांचे साटेलोटे होते. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि टाकसाळ यांच्या हिशेबात जरी १४ -१५ लाख रुपयांच्या नोटा होत्या तरी वेगवेगळ्या अंदाजा प्रमाणे प्रत्यक्षात अशा दुहेरी क्रमांकाच्या अतिरिक्त अशा एक लाख ते ४ लाख कोटी रुपयांच्या दुहेरी क्रमांकाच्या नोटा निर्माण केल्या गेल्या असाव्यात. म्हणजेच १५. ४ लाख कोटी अधिकारीक नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या होत्या त्यापैकी १५.३ लाख कोटी परत आल्या. पण यात या दुहेरी क्रमांकाच्या नोटा पण परत आल्या. आणि ज्या आल्या नाहीत त्यात दुहेरी आणि मूळ अशा १ ते पाच लाख कोटी रुपयांच्या नोटा वाया गेल्या आहेत. अर्थात यावर ज्यांनी या दुहेरी क्रमांकाच्या नोटा जारी केल्या ते हा गोष्ट कदापि मान्य करणार नाहीतच पण उच्च रवाने आरडा ओरडा पण करीत आहेत. निश्चलनीकरण आणि त्यानंतर नोटांचा छापच बदलल्यामुळे जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत. अर्थात अशीच स्थिती पाकिस्तानच्या आय एस आय ची पण आहे. त्यांचे पण जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत तेलगी यांचा असाच बनावट मुद्रांकाचा घोटाळा ३० हजार कोटींचा होता आणि हा घोटाळा ८ वर्षे चालू होता. घोटाळ्यात अनेक पोलीस आणि सरकारी अधिकारी यांचं हात होता आणि तेलगी यांची नार्को टेस्ट झाली त्यात त्यांनी श्री शरद पवार आणि श्री छगन भुजबळ यांचे नावही घेतले होते. पण पुढे एकही आरोपीला शिक्षा झाली नाही. हा इतिहास आहेच. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/telgi-tattles-on-pawar-bhujbal-in-stamp-scam/articleshow/1964402.cms?from=mdr
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 04/16/2019 - 11:51 नवीन
निश्चलनीकरण आणि त्यानंतर नोटांचा छापच बदलल्यामुळे जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत. अर्थात अशीच स्थिती पाकिस्तानच्या आय एस आय ची पण आहे. त्यांचे पण जुन्या नोटा छापण्याचे साचे आणि यंत्रे पण निकामी झाली आहेत
काहीही. चक्क काहीही लिहायचे? साचे म्हनजेच आर्टवर्क सिलिंडर फक्त चेंज झाले. फार कष्ट अन खर्च नसतात हो त्यासाठी. असे ना तसे होशंगाबादहुन लागतातच सिलिंडर रेग्युलरली. ते फक्त डिझाइन चेंज झाले. बाकी नोटा चौकोनच आकारातील असल्याने सरळ रेषेतले कटिंग शिवाय दुसरे काही नसते. त्यासाठी कटिंग लेआउट चेंज होतो फक्त. ग्रेव्हीयरचे साचे चेंज करायचा खर्च सरकार रेग्युलरली करते. त्यात काही नवीन नाही. जास्त फरक पडला तो एटीएम मशीन्सना. इव्हन हा नव्या साच्याचा खर्च भारतातले सारे एटीएम मशीन्स कॅलिब्रेट करण्याच्या खर्चासमोर न के बराबर आहे. सो साचे निकामी झाले म्हणण्याला काही अर्थच नाही. यंत्रे निकामी झाली हे तर मोट्ठा विनोद आहे. अशी कोणती प्रोसेस आहे की ज्यामुळे जुनी यंत्रे आणि ती प्रोसेस निकामी झाली. ग्रेव्हियर, ईंटिग्लो आणि लिथो ह्या तीन तंत्रानीच नोटा प्रिंट केल्या जात होत्या आणि नव्या नोटाही ह्याच तंत्राने प्रिंट केल्या जातात. लहानसाहान अ‍ॅडऑन्स असतात पण ते रिसर्च आणि डिझाईन करतानाच केलेले असतात. मशीन्समध्ये अन प्रिंटिंगमध्ये मायन्त्युट चेंज करुन होतात ते. त्याने प्रोसेस अन मशीन बदलत नसते. बदल थोडासा कागदात झाला पण तो विषय वेगळा आहे. मशीन त्याच असतात. नोटाबंदीने नवीन मशीन आणल्या हा जोक आहे. नोटाबंदीनंतर फक्त डिमांड्मुळे मशीन लाइन्स वाढवल्या मिंटने. प्रोसेस तीच आहे. सेम असेच आयएसाअयने बसवलेल्या मशीनबाबत आहे. भारताच्या मशीन्स निकामी झाल्या त्यामुळे त्यांच्या मशीन्स निकामी झाल्या असले खोटे दावे करुच कसे वाटतात?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/16/2019 - 15:19 नवीन
माझा शब्द प्रयोग चुकला असेल पण तांत्रिक मुद्द्यावर वाद घालण्यापेक्षा मूळ मुद्दा लक्षात घ्या खालचा दुवा पूर्णपणे वाचून घ्या. The parliamentary panel was informed that the volume of FICN smuggled into India in 2010 was between Rs 1,500 and Rs 1,700 crore, which went up to Rs 2,500 crore in 2012 - a rise of 55 per cent. This year, fake currency worth Rs 1,200 crore has already infected the Indian economy till July. https://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-2488000/Pakistan-prints-fake-Indian-rupees-NIA-finds-counterfeit-cash-paper-Pakistans-legal-tender.html हे आकडे २०१३ चे काँग्रेसचे सरकार असतानाचे आहेत आणि अर्थात हे हिमनगाचे टोक आहे. हे आकडे निश्चलनीकरणाच्या समर्थनार्थ २०१७ नंतरचे किंवा मोदी सरकार आल्यानंतरचे नाहीत अडीच हजार कोटी रुपयात किती मोठ्या प्रमाणावर दंगे आणि अशांतता भडकवता येईल याचा विचार करा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 04/15/2019 - 09:45 नवीन
खरे डॉक्टर, तुमचं म्हणणं खरं दिसतंय. कालंच पुण्यातली बातमी वाचली की निवडणुका असल्या तरी दारू नेहमीसारखी वाहत नाहीये : https://www.loksatta.com/pune-news/alcohol-in-pune-1875688/ हे नोटाबंदीमुळेच झालंय. म्हणून कुणाकुणाच्या पोटात दुखतंय. हा एकमेव फायदा सुद्धा इतर साऱ्या तोट्यांना पुरून उरेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा