सर्जीकल स्ट्राईक रिटर्न
शत्रू सीमेच्या आत येईपर्यंत गाफील राहणे हे भारतीय इतिहासाचे व्यवच्छेदक लक्षण. (अर्थात यास नक्कीच सन्माननीय अपवाद आहेत)
आमचा आदर्श हनुमानाचा. पण तोही समुद्राकाठी आपली शक्ती विसरून हतबल झालेला.
वरून आदर्शवादाची पांघरलेली फाटकी चादर फारच उठून दिसायची. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असा आमचा सत्य अहिंसा दया करूणाचा अर्थ. कोट्यावधींची शस्त्रे विकत घेऊन ती केवळ पुजत ठेवुन कुजवण्यातच आम्हा कोण आनंद!
पुर्वी सागरी सिमा अोलांडल्या की पाप समजले जायचे. नंतर काही युद्धातही सीमा न अोलांडून आपण कोण मर्यादा राखली होती.
या प्रतिमेला छेद देणारी आजची घटना आहे. काहींना हे उदात्तीकरण वाटण्याची शक्यता आहे पण अशा गोष्टींचे उदात्तीकरण व्हायलाच हवे.
यावेळसा स्ट्राईक सर्वार्धाने वेगळा होता. यावेळेस पाकिस्तानला पुर्ण कल्पना होती की असे काही होणार आहे. थोडक्यात पाकिस्तान अलर्टवर असूनही आपण हा हल्ला साधारण २० मिनिटात करून दाखवला आहे.
या हल्यात भारतीय वायुसेनेने इंटरनॅशनल बॉर्डर पार केल्याचे दावे करण्यात आले आहेत. म्हणजे पी.अो.के च्याही पलीलडे जावून पाकिस्तानात हल्ला झाला आहे. कदाचित आधीच्या बैठकीत याची कल्पना इतर देशांना देण्यात आली होती.
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व विमाने सुखरूप परत आणणे.
यातही आपली जागतिक प्रतिमा जपताना कोणताही नागरिक वा पाकिस्तानी सैनिक , सैन्यअड्डे यावर हल्ला न करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.
गुप्त माहिती मिळवणे आणि त्यावर कारवाई करणे यासाठी वेगवेगळ्या सरकारी विभागांना एकत्र काम करणे अर्थात आवश्यक असते. विभागातील समन्वय यावेळी अजून उठून दिसत आहे.
वायूसेना ही बंद केलेल्या जिनीसारखी होती असे माझे ब-याच दिवसापासुन मत होते. या जिनला बाहेर काढले आणि त्याने दिलेले काम चोख केले.
विषारी झाडाची आपण केवळ एक फांदी तोडली आहे ह्याचे मात्र भान हरपता कामा नये. संपूर्ण झाड कधी उपटून निघेल हे बघणे अौत्युक्याचे ठरेल. सद्ध्या पुढचे काही दिवस मात्र राजकिय चिखलफेकीत जाणार एवढेच आपण ठामपणे सांगू शकतो.
🗣 चर्चा
(109)
य
यशोधरा
Tue, 02/26/2019 - 10:57
नवीन
पाकिस्तानी अतिरेकी आणि त्यांचे पाठीराखे ह्यांना धडा शिकवला ह्याचे कौतुक आहेच, पण त्यांच्याही नागरिकांना तोशीस लागू दिली नाही, ह्याचे खूप कौतुक वाटले!
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Tue, 02/26/2019 - 11:34
नवीन
दहशतवाद्यांना धक्का, पाकिस्तानात घुसुनपण लष्कर किंवा सामान्य नागरिकाना धक्का न लावता, स्वताची विमाने सुरक्षित परत आणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही आक्षेप येणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन भारताने एकाच तीरात अनेक निशाणे साधली आहेत. भारतीय लष्कराचे व सर्व संबंधईत यंत्रणांचे करावे तितके कौतुक कमीच. आणि देशवासियांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने ताबडतोब प्रत्युत्तर देण्याची हिंमत दाखविली हेदेखील अभिनंदनीय. मला वाटते अशावेळी यात राजकारण आणू नये.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 02/26/2019 - 11:47
नवीन
भारतिय वायुसेनेचे अभिनंदन. पाकिस्तानी सैन्य 'हाय अॅलर्ट वर आहे हे माहित असूनही हे करता आले हे विशेष.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 02/26/2019 - 12:15
नवीन
वायूसेनेस आदेश गो कोण देते माई?
तुझ्या ह्यांचे काय मत आणि?
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 02/26/2019 - 15:22
नवीन
"तीन्ही सेनांना हवी तेव्हा कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे" असे मोदीच म्हणाले होते ना?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 02/26/2019 - 15:31
नवीन
म्हणजेच कोण गो उभे राहिले सेनेसोबत?
तुझ्या ह्यांना विचारून बघ ना गो माई.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 02/26/2019 - 16:26
नवीन
हल्ला झाला किंवा पाकिस्तानी अतिरेक्यांनी (द्विरूक्ती बद्दल क्षमस्व) तर अनुक्रमे मोदी, सरकार,गुप्तचर यंत्रणा जबाबदार.आणि त्याकरीता त्यांच्या समर्थकांना खिजवायचे,हिणवायचे असते.(आपले पक्षीय हितसंबंध लपवून) आपण कसे पक्षनिरपेक्ष आहोत ते दाखवण्यासाठी.
आणि एखाद्याने सरकारी धोरणांचे, पंतप्रधानांचे,मुख्यमंत्रयांचे अभिनंदन केले तर तात्काळ शिक्कामोर्तब करायचेच असा माईसाहेब यांच्या स्वारींचा आणि स्वारी दरबारींचा रिवाज आहे.
माईंच्या अगाध ज्ञान प्रकाशाने दिपून गेलेला चिल्लर वाचकांची पत्रेवाला नाखु
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Tue, 02/26/2019 - 12:02
नवीन
अभिनंदन.
साधारण एका आठवड्याने कोल्हेकुई चालू होईल.
- Log in or register to post comments
व
विनिता००२
Tue, 02/26/2019 - 12:22
नवीन
खूप खूप कौतुक भारतीय वायुसेनेचे __/\__
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 02/26/2019 - 12:45
नवीन
लै भारी काम,
भारताचे जवान मग ते आर्मीचे असो की सीआरपीएफचे, सामान्य नागरिक असोत की व्हीआयपी, ते काय रस्त्यावर पडलेले नाहीत. त्यांना हात लावला की मुळापासून उखडण्याची क्षमता हिंदुस्तानात आहे हे पाकिस्तानला निदान समजलं तरी बास झालं. आंतरराष्ट्रीय दबाव म्हणा की आर्थिक नाकेबंदी, राजकीय मजबूरी कुठल्याही कारणाने ह्या असल्या पाकपुरस्कृत दहशलवाद्यांचे पितृत्व पाकीस्ताननेच उघड नाकारले तर त्यासारखी चांगली बात नाही. दहशतवाद्यांनाही कळले पाहिजे आपण काय औकातीच्या आसर्याने आहोत. भारतीय सेनेने ती वेळोवेळी दाखवून दिली आहे. पाकीस्तानने पाळलेल्या भस्मासुराचा हात पाकीस्तानच्याच डोक्यावर एक दिवस बसावा, एवढीच मनोमन इछ्छा.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/26/2019 - 13:19
नवीन
किंबहुना आपल्या समस्येवर हाच अॅक्चुअल उपाय आहे. भस्मासुराचा हात 'काहि' ठिकाणि पोळुन काढतही असेल पाकला... ते त्यांना कळतही असेल...पण वळत नाहि.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 02/26/2019 - 14:59
नवीन
भारतीय वायुदलात मिराज २००० १९८५-८६ पासून आहेत. भारतीय वायुदलाचे वैमानिक तेंव्हाही शूर वीर होतेच.
मग आताच एकदम हा हल्ला का झाला? इतके दिवस का नाही?
त्यांना तुम्ही लढा, भारतीय जनता सर्व शक्तीनिशी तुमच्या पाठीशी आहे हे सांगणारा कोणी तरी आहे.
शस्त्र आणि अस्त्र कितीही शक्तिशाली असले तरी तो चालवणारा हात आणि त्याला आदेश देणारा मेंदू हा जास्त महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
स
स्वलेकर
Tue, 02/26/2019 - 16:22
नवीन
मस्त प्रतिसाद
- Log in or register to post comments
ह
हरवलेला
Wed, 02/27/2019 - 04:48
नवीन
अक्षरशः हेच लिहिणार होतो.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/27/2019 - 10:17
नवीन
+१००
लोकशाहीमध्ये सामरिक निर्णयाची जबाबदारी सर्वोच्च मुलकी प्रशासनाची असते आणि त्यावर आधारलेल्या केलेल्या कारवाईची जबाबदारी सैन्याची असते. लोकशाहीत मुलकी राजकिय नेतृत्व सर्वोच्च असते. त्यामुळे, सैन्य कितीही बलवान असले तरी, दुर्बल राजकिय इच्छाशक्ती असलेल्या नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेच्या अभावामुळे, सैन्याचे बल पडिक (अनप्रूव्ह्ड) राहते.
यामुळेच, आंतरराष्ट्रिय स्तरावर, यशाचे/अपयशाचे श्रेय, निर्णय घेणार्या देशाच्या सर्वोच्च नेत्याला प्रथम व सैनिकी प्रशासनाला नंतर दिले जाते.
तेथे, भारतीय राजकारणासारखे, "स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत, जिकलो तर नेत्याचे यश व हरलो तर कार्यकर्त्यांचे अपयश" आणि "विरोधी पक्षांच्या बाबतीत, जिंकला तर जनतेची दिशाभूल केली आणि हरला तर हे आमच्या नेत्याचे यश आहे", अशी एकांगी व्यक्तीपूजा होत नसते.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Tue, 02/26/2019 - 15:20
नवीन
(खालील संवाद पूर्णतया काल्पनिक, पण पूर्वानुभव बघता सत्यात येऊ शकतात, हलकेच घेणे)
: अंअंअं, असे हल्ले आम्ही आमच्या काळात कित्येक केले होते. पण आम्ही ह्याची कुठेही वाच्यता नाही केली.
: मृतात्म्यांना श्रद्धांजली.मला त्यांची नावे कळवा, रुग्णवाहिकेला द्यायचीत.
: ह्या हल्ल्यांमागे आरएसएस आहे.
: ग्वालियर वरून विमाने उडाली आणि तिथे आमचे सरकार आहे. मोदी सरकार ह्याचे फुकट श्रेय घेत आहे.
: २६/११ चा हल्ला झाला तेव्हा मी होतो, गप्प राहिलो. माझ्या डोळ्यांदेखत माझा अध्यादेश फाडला, मी गप्प राहिलो. माझ्या बुडाखाली हजारो कोटी
रुपयांचे घोटाळे झाले, मी एक चकार शब्द काढला नाही. आता मात्र मी गप्प बसणार नाही.(बरोबर बोललो ना मॅडम?)
: दिल्लीमध्ये एवढे सगळे घडत असताना मला काहीच माहित नाही? केंद्र सरकार मला काहीच सांगत नाही? हा भेदभाव का?सर्वाना विश्वासात घेण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.
: आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुमचे जवान मिराजमध्ये इंधन भरू शकले ह्याची जाण ठेवा. माझ्या पैश्यावर हवेत उडता काय ?
: काल रात्री ग्वालियर वरून उडालेली विमाने दिल्लीवरून गेली. त्यामुळे सगळीकडे धूळ उडाली आणि मला परत मफलर कानटोपी घालून बसायची पाळी आली.मला धुळीमुळे इतका सर्दी खोकला होतो हे काय ह्यांना माहित नव्हते?मुद्दामहून त्रास देतात.
: मोदी सरकारने पाकिस्तानवर हल्ला केला हे योग्यच, पण, हा प्रश्न असा सुटणारा नाही.काहीतरी करून दाखवण्यासाठी मोदी कुठल्याही थराला जाऊ शकतात.मेमनांच्या याकूबला फाशी दिल्यानंतर मी जो अस्वस्थ झालो आहे तो आता अजूनच अस्वस्थ होतो आहे. हे सरकार देशाला युद्धखोरीकडे नेत आहे.असहिष्णुता वाढली आहे.नोटबंदी आणि विकासातले अपयश ह्यावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी 'काहीतरी' करून दाखवणे गरजेचे होतेच.देशात युद्धज्वर निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. मोदींनी सापाच्या शेपटावर पाय दिला आहे. भविष्यात ह्याचे भीषण परिणाम होतील.(मी तेव्हापर्यंत राज्यसभेत गेलेलो असेन म्हणा !)
: आईभवानीच्या आशीर्वादाने आमचा मनसुबा आज सफल झाला.सरकारला हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या आमच्या नाक्यानाक्यांवरच्या हजारो ढाण्या पेन्ग्विनांचेच हे श्रेय आहे. आमच्या गर्जनांनी दिल्लीचे तख्तही हादरले आणि सरकारने हा निर्णय घेतला.मिराज विमानांचे ह्यापुढे संताजी-धनाजी असे नामकरण करण्यात यावे अशी आमची मागणी आहे.
:आम्ही सगळे देशाबरोबर, जवानांबरोबर आणि जनतेसोबत आहोत(सरकारबरोबर आहोत असं पण म्हणायचं का ग मम्मा?). हे सरकार जरी असहिष्णू, हिटलरशाही लादणारे, सगळ्या संस्थात आरएसएसचे लोक घुसवणारे, दलित विरोधी, शेतकरीविरोधी, गरिबांना लुटून श्रीमंतांचे घर भरणारे, चोर असले तरी त्यांचे (शेवटी एकदाचे!)अभिनंदन.
: दहशतवाद्यांचा निषेध.मुळात दहशतवादाला धर्म नसतोच.पुलवामा हल्ल्यात स्वतःला उडवून घेणारा निधर्मी दहशतवादी रशीद गाझी हा मुळात धार्मिक प्रवृत्तीचा होता.काही लोकांनी त्याला भडकवले आणि ह्या हल्ल्यासाठी त्याला तयार केले.तो बिचारा गरीब होता हो. सरकारने अतिरेक्यांना प्रत्युत्तर दिले हे योग्यच केले. पण ह्या देशातील भगव्या, कडव्या, अतिजहाल हिंदू अतिरेक्यांना त्याचा उन्माद चढू देता कामा नये.बरं, मी जरा समोरच्या बाकावर बसून दहीभात खाऊन घेतो.
: मुझे पत्ता है कि हाफिज सैद साहेब को इस जबाबी हमले से बहुत दुःख पहूचा होगा.
: मोदीजी के नेतृत्व मी देश को दिख रहा है विकास का तारा |
दुसरा सर्जिकल स्ट्राईक करके पाकिस्तान के बजा दिये बारा ||
स्तुती करून करून थकलो, आली आता मला फीट |
लवकर द्या ना मला एक राज्यसभेची सीट ||
- Log in or register to post comments
श
शब्दानुज
Tue, 02/26/2019 - 15:59
नवीन
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. आवडल.
- Log in or register to post comments
M
mayu4u
Tue, 02/26/2019 - 16:33
नवीन
मस्त लिहिलंय!
- Log in or register to post comments
श
शलभ
Tue, 02/26/2019 - 17:26
नवीन
एकच नंबर लिहिलंय.
लोकसत्ता आणि सामना अग्रलेख तर तुम्हीच लिहायला घ्या आता.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 02/27/2019 - 01:06
नवीन
एक नंबर तेजस!
युवराज आणि इतर सगळेच विरोधक अजून धक्क्यातून सावरायचे आहेत. एकदा सावरले की मग विरोधकांच्या खऱ्या प्रतिक्रिया येऊ लागतील, उदा. -
- पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे हा हल्ला अयशस्वी झाला आहे.
- किती अतिरेकी मेले याचा काहीच पुरावा नाही. एकदा ० पासून ते ३०० पर्यंत काहीही सांगितला जातोय, यावर कसा विश्वास ठेवायचा?
- यात मोदींनी काहीच केलं नाही.
- हा हल्ला निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आला.
- मोदी या हल्ल्याचा राजनैतिक फायद्यासाठी वापर करणार/ करत आहेत.
- आमच्या काळातही आम्ही असे अनेक हल्ले घडवून आणले, पण आम्ही जाहिरात नाही केली. यातले काही हल्ले एवढे गुपचूप केले की सैन्याला सुद्धा कळले नाहीत.
- LoC असे उल्लंघन करणे हे एखाद्या देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला आहे, इम्रान खानने बोलून प्रश्न सोडवू अशी साद घालूनही लगेच हा हल्ला करण्याचे कारण काय?
- हल्ला झाला तेव्हा मोदी आपल्या XX लाखांच्या किंग साईझ बेड वर एसी चे तापमान १८ करून काश्मिरी रजई घेऊन घोरत होते.
- १३ दिवस थांबण्याचं काय कारण होतं? या दिवसात सगळ्या विरोधकांनी आणि जनतेने दबाव आणला म्हणून मोदींना काहीतरी कारवाई करायला लागली. पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे मुद्दामून फार नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
- हल्ला करणे ठीक आहे पण त्यानंतर होत असलेला जास्तीचा राष्ट्रवाद हा धोकादायक आहे. यातून अल्पसंख्याकांना चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि तो त्यांना अतिरेकी बनण्यास प्रवृत्त करू शकतो.
- आणि शेवटची पण खतरनाक: निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून मोदी, शहा, डोवाल, आरएसएस यांनी मुद्दामून पुलवामाचा हल्ला घडवून आणला आणि आता जंगलात बॉम्ब टाकून अतिरेकी तळ उध्वस्त केले म्हणून खोटा प्रचार करत आहेत.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Wed, 02/27/2019 - 10:21
नवीन
+१
साधारण उद्याच्या शुक्रवारपासून वरचे वाक्य वेगवेगळ्या माध्यमांतून सतत लोकांच्या मनात बिंबवले जाईल.सगळ्यातले सगळे कळणारे एक लाडके संपादक ह्यात आघाडीवर असतील.
असहिष्णू गॅंग : तसंच, ह्यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला किंवा पाकिस्तानकडून आगळीक किंवा काश्मीरमध्ये काहीही घडले तरी ती मोदींच्या जहाल राष्ट्रवादाने निर्माण केलेल्या उन्मादाची पाकिस्तानकडून आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया असेल.
संपादकाच्या डुलक्या : वायुसेनेच्या मिराज विमानांनी ग्वालियरमधून उड्डाण केल्याच्या सरकारच्या दाव्यावर आमच्या प्रतिनिधीने अधिक चौकशी केली असता ही सरकारने केलेली निव्वळ धूळफेक असल्याचे सिद्ध झाले आहे.ग्वालियर विमानतळाजवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या अबक नामक व्यक्तीने आपण त्या रात्री एकही विमान उडाल्याचे पाहिलेले नाही असा दावा आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.अबक हे ८० वर्षाचे असून जन्मजात रातांधळेपण आणि वयपरत्वे दोन्ही डोळ्यात झालेला मोतीबिंदू ह्यामुळे सतत चिडचिड होत असल्याने रात्रीची झोप फारशी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. आता ह्या सरकारच्या अतिरंजित, कडव्या, जहाल राष्ट्रवादी भावनेने उन्मादी वातावरण निर्माण करून निवडणुकीत लाभ उठवण्याच्या प्रयत्नांना किती साथ द्यायची ते जनताच ठरवेल.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Wed, 02/27/2019 - 11:55
नवीन
२०१४ लोकसभा निवडणुकांच्या आधी अजमल कसाबला झटपट फाशी देण्यात कुठल्या सरकारच्या डोळ्यांपुढे निवडणूक नव्हत्या?
मोदी सरकार गेल्याशिवाय भारत पाक शांतता चर्चा पुनर्स्थापित होऊ शकणार नाही असे पाकिस्तानात जाऊन म्हणणारे मणिशंकर अय्यर यांच्या डोळ्यांपुढे निवडणूक नव्हत्या का?
कुठल्याशा पुस्तक प्रदर्शनाला माजी आयएसआय प्रमुखाला बोलावून तावातावाने समारंभ करणाऱ्या ममता बॅनर्जी आणि केजरीवाल ह्यांच्या डोळ्यांपुढे कुठला उदात्त विचार होता म्हणे ?
मोदी आवडत नसतील किंवा ते एक नंबरचे खोटारडे आणि नालायक आहेत असे म्हणणार्यांनी त्यांच्यापेक्षा कमी खोटारडा उमेदवार जाहीर करावा आणि मोदींचा खोटारडेपणा पुराव्याने शाबीत करावा.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Wed, 02/27/2019 - 11:43
नवीन
समोरच्या बाकावरूनचा संदर्भ जर कोणाला कळला नसेल तर खालील लेख शांतपणे वाचावा.मोदी निवडून आल्यापासून समोरच्या बाकावरून ह्या प्रकारचे लेख दर आठवड्याला अधिकृतरीत्या पेपरात प्रसिद्ध होतात. एकीकडे विरोधकांचा आवाज दाबला जातोय म्हणत दुसरीकडून असे हल्ले चढवायचे ही ह्या गॅंगची मोडस ऑपेरांडी .भारतीय सैन्याने हवाई हल्ले केल्यावर एका तासाने खालील लेख छापायला गेलेला आहे.काही वाक्ये मी ठळक केलेली आहेत.
"February 26, 2019 04:32 am "
https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/pulwama-attack-jem-crpf-masood-azhar-grief-anger-but-no-wisdom-1847712/
============================================
पी. चिदम्बरम
ज्युलिओ रिबेरो, लेफ्टनंट जनरलपदावरून निवृत्त झालेले डी. एस. हुडा व एस. ए. हासनैन, माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन हे सारे जण अनुभवातून आलेले शहाणपण सांगत आहेत.. त्यांचे ऐकूनही न घेता, आपल्या वेदना आणि संतापच महत्त्वाचे मानल्यास परिणाम काय होतील?
जानेवारी २०००मध्ये भारताने मसूद अझरला सोडून दिले त्याचे पश्चात-धक्के नियमितपणे बसत आले आहेत. पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेला दहशतवादी हल्ला हा त्याचाच एक भाग, या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले. यातील प्रत्येक धक्का हा देशाला भाजपप्रणीत एनडीए सरकारने आयसी १८४ विमानाचे प्रवाशांसह अपहरण करण्यात आल्यानंतर मसूद अझरला सोडून दिल्याच्या कृत्याची जाणीव करून देणारा आहे. त्या वेळी शेकडो विमान प्रवाशांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते, तत्कालीन संरक्षणमंत्री जसवंत सिंह हे दहशतवाद्यांना सोडण्यासाठी त्यांच्याबरोबर काबूलला गेले होते याची छायाचित्रे अजूनही त्या कटू स्मृती जाग्या करतात.
मसूद अझरला सोडून देण्यात आल्यानंतर जैश ए महंमद ही संघटना स्थापन केली. जैशने पहिला हल्ला केला तो १९ एप्रिल २००० रोजी. त्यात मानवी आत्मघाती दहशतवाद्याचाच वापर केला होता. श्रीनगर येथे १५व्या कोअरच्या परिसरात हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर नियमित कालांतराने जैशने दहशतवादी हल्ले केले आहेत. त्यात जम्मू-काश्मीर विधिमंडळ संकुल, संसद यांना लक्ष्य करण्यात आले. कुपवाडा, बारामुल्ला व श्रीनगरमध्ये या दहशतवादी संघटनेने सातत्याने हल्ले केले.
घुसखोरी व भरती
जैश ए महंमद ही संघटना दोन पातळ्यांवर कारवाया करते, एक म्हणजे दहशतवाद्यांना भारतीय प्रदेशात घुसखोरीच्या माध्यमातून पाठवले जाते. त्यांना विशिष्ट ठिकाणी हल्ले करण्याचे लक्ष्य दिलेले असते. पठाणकोट, उरी व नाग्रोटा येथील हल्ले याच प्रकारातील होते. दुसरे म्हणजे स्थानिक युवकांना भरती करून त्यांना आत्मघाती बॉम्बर म्हणून वापरण्यात येते. पुलवामा येथील हल्ला या प्रकारातील होता. त्यात अदिल अहमद दर याने आत्मघाती स्फोट घडवून आणला, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे त्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांवर कार धडकावून स्वत:ला उडवून दिले. त्यात ४० जवान शहीद झाले होते.
दुर्दैवाने २०१५ पासून घुसखोरांची संख्या वाढली असून स्थानिक व्यक्तींचा दहशतवादी कारवायांत सहभागही वाढला आहे, जास्तीत जास्त स्थानिक युवक दहशतवादी कारवाया करीत आहेत.
जम्मू-काश्मीरबाबत माझी मते सर्वज्ञात आहेत. पाकिस्तानातील नागरी सरकार कमकुवत आहे. तेथील लष्कराने आतापर्यंत काही धडा घेतलेला नाही, कुठलाही देश न मानणाऱ्या दहशतवाद्यांनी सतत जम्मू-काश्मीरला लक्ष्य केले आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी आर्थिक थडगे त्यांनी खणून ठेवले आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याच वेळी दुसरीकडे काश्मीरमध्ये सरकारने जी दंडशक्ती व लष्करी बळाचा वापर चालवला आहे त्याला माझा विरोध आहे. केंद्र सरकारनेही बळाचा वापर करून काश्मीरमधील लोकांनाच लक्ष्य केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने अनेक बाबतीत देशाला तोंडावर पाडले आहे. एक तर या सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण व घातक स्वरूपाचे जम्मू-काश्मीर धोरण यांचे ते परिणाम आहेत. याच स्तंभात १५ मे २०१८ रोजी मी म्हटले होते की, भारताने एक देश म्हणून एकता, अखंडता, विविधता, धार्मिक सहिष्णुता यांचे पालन करतानाच लोकांप्रति जबाबदार राहिले पाहिजे, मतभेद दूर करण्यासाठी चर्चा केली पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये या तत्त्वांची परीक्षाच आहे, कारण देश म्हणून आपण या परीक्षेत नापास झालो आहोत.
पुलवामा हल्ल्यानंतर सरकार व अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्यांनी एक राक्षस उभा केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने त्याचा बळी दिला जाईल. दुसरीकडे काश्मीरमधील व्यापारी, विद्यार्थी यांच्यावर जम्मू व देशाच्या इतर भागांतील शहरात हल्ले होत आहेत. त्यांना वसतिगृहांतून हाकलण्यात आलेले आहे. समाजमाध्यमांवर काहींनी देशद्रोहाची भाषाही केली आहे. पाकिस्तानशी व्यापार-उदिमाबरोबरच क्रीडा संबंध तोडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यघटना शिरोधार्य मानण्याची जबाबदारी असलेल्या मेघालयच्या राज्यपालांनी तर काश्मीरलाही कुणी भेट देऊ नये, अमरनाथ यात्रेला जाऊ नये, काश्मिरी व्यापाऱ्यांच्या वस्तू ते जेव्हा हिवाळ्यात येथे येतात तेव्हा खरेदी करू नयेत, असे आवाहन केले आहे. युद्धज्वराचे हे चुकीचे सूर आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या दु:खात सगळा देश सहभागी आहे, त्यांच्या कुटुंबांचे दु:ख प्रत्येकाला जाणवत आहे, पण दुसरीकडे आपण काही प्रश्न विचारणे विसरून गेलो आहोत- देशाच्या सुरक्षेला जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे काही अपयश होते का? एकाच वेळी दोन हजारांहून अधिक जवानांना एकीकडून दुसरीकडे हलवणे ही गंभीर चूक नव्हे काय? अदिल दर या २२ वर्षांच्या युवकाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा बळी घेणारा भीषण हल्ला का केला असावा?- असे अनेक प्रश्न यात आहेत, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोवर त्याच त्या चुकांची पुनरावृत्ती करण्याच्या आपल्या या सवयीला इतिहासात माफी नाही.
शहाण्यांचे आवाज
सुदैवाने अनेक लोक प्रश्न विचारत आहेत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एस. ए. हासनैन यांनी म्हटले आहे की, काश्मिरी लोकांचा आपण शारीरिक छळ करीत राहिलो, त्यांना समाजमाध्यमांवर सतत डागण्या देत राहिलो तर आपण काश्मीर प्रश्नातील धोरणात्मक उद्दिष्टे कधीही साध्य करू शकणार नाही. तेथील अल्पसंख्याकांची नाराजी आणखी वाढतच राहील.
निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, आपण काश्मीर प्रश्नाकडे डोळेझाक करता कामा नये, सरतेशेवटी ज्या दहशतवाद्याने पुलवामातील हा महाभयंकर हल्ला केला तो स्थानिक दहशतवादी आहे हे विसरता येत नाही. त्यामुळेच काश्मीरमध्ये अंतर्गत प्रश्न आहेत.
निवृत्त परराष्ट्र सचिव श्याम सरण यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे की, काश्मीर प्रश्नाचा विचार एकंदर भारतासहच करावा लागेल. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंतच्या सर्वात कडक सुरक्षा प्रतिबंधांनी खूप यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे काश्मीर प्रश्नाचे देशांतर्गत व बाह्य़ पैलू यांचा एकाच वेळी विचार करून त्यावर तोडगा काढला पाहिजे.
निवृत्त आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी लिहिले आहे की, दहशतवादी ज्या समुदायाचे आहेत त्या समुदायाची मने आपण जिंकली नाहीत तर त्यांना सतत त्यांच्या सहधर्मीयांकडून रसद पुरवठा होत राहील, एक दहशतवादी मेला तर त्याची जागा लगेच दुसरा घेईल. किंबहुना भावनांच्या अतिरेकातून आणखी जास्त दहशतवादी काम करू लागतील.
मी वर उल्लेख केलेल्या व्यक्तींचे काश्मीर प्रश्नाचे व तेथील दहशतवादाचे हे विश्लेषण बरेच काही सांगून जाणारे आहे. असे असताना लष्कराने जुनीच बळाची भाषा वापरली. लेफ्टनंट जनरल कंवलजित सिंग धिल्लाँ हे चिनार कोअरचे कमांडर आहेत. त्यांनी १९ फेब्रुवारी रोजी असे सांगितले की, काश्मीरमध्ये जो कुणी बंदूक उचलेल त्याने शरणागती पत्करली नाही तर आम्ही त्याला ठार मारू.
१४ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्याच्या कटु स्मृती विसरता येणार नाहीत, त्यात संताप व नैराश्य येणार हेही स्वाभाविक आहे, पण म्हणून आपण आशा सोडून चालणार नाही. सध्या देशातील सरकार जे करीत आहे त्यातून आपण अधिक मोठय़ा आपत्तीकडे जाऊ यात मला शंका नाही, कारण त्यातून लोकांचा एकमेकांवरचा विश्वास उडेल. जम्मू-काश्मीरमधील लोक मनाने आणखी आपल्यापासून दूर जातील. प्राणहानीचे दुष्टचक्र सुरू राहील. त्यातून आपण हा प्रश्न सुटण्याच्या जवळपासही जाऊ शकणार नाही. यात जे शहाणेसुरते लोक आहेत त्यांचे म्हणणे ऐकले जाईल व पुढचे सरकार अधिक समज, शहाणपण दाखवून चांगल्या नेतृत्वाचे उदाहरण घालून देत काश्मीर प्रश्नी राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Wed, 02/27/2019 - 14:03
नवीन
सदर लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत असं तुम्हीच किंवा मूळ लेखात म्हंटले असेल कदाचित...
माझं खुलं आवाहन आहे सर्व भारतीय जनतेला कि त्यांनी खुशाल काश्मीर मध्ये फिरायला जावे, (मी जम्मू बद्दल नाही बोलत आहे कारण तो हिंदुबहुल आहे) कोणाची टाप नाही तुमच्या केसालाही धक्का लावायची. हे मी स्वानुभवावरून सांगत आहे, गेल्या वर्षीच्या १२ दिवसांच्या काश्मीर सहलीबद्दल मी लिहिले नाहीये कारण मिपावर ह्या ठिकाणाबद्दलचे अनेक धागे आहेत.
कशासाठी काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ह्याची प्रचीती आल्या शिवाय राहणार नाही.... बाकी बातम्या वाचून/बघून ट्रीप प्लॅन करणारे कधीच हा स्वर्गीय अनुभव घेऊ शकत नाहीत हे हि तितकेच खरे. पण एकदा जाऊन बघा, कुठलाही त्रास नं होता तुमची सहल पार पडेल ह्याची खबरदारी तिथली स्थानिक जनता कशी घेते हा खरंच एक अनुभव आहे.
मान्य आहे जवळपास ३०% लोकं म्हणतात आम्हाला ना भारतात रहायचय ना पाकिस्तानात, आम्हाला आमचं स्वतंत्र राष्ट्र हवंय, पण बहुसंख्य लोकांना भारताबरोबर राहणे उचित वाटतंय....
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Wed, 02/27/2019 - 14:06
नवीन
कृपया हे वैयक्तिक घेऊ नका... हे आवाहन समस्त मिपाकरांसाठी आहे.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Wed, 02/27/2019 - 17:39
नवीन
मी हा लेख फक्त घरभेदी आणि फुटीरतावादी मानसिकता स्पष्ट करण्यासाठी टाकला आहे.सत्ता हि सर्वोच्च आणि देश शेवटी असे असणारे कोण आहेत हे लोकांना कळण्यासाठी.
काश्मीरमधला पर्यटनाशी ह्याच काहीही संबंध नाही.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 02/26/2019 - 15:29
नवीन
इंजिनिअरिंगला असताना काही विद्यार्थी तीन वर्षे अभ्यासाचा कंटाळा करत कसे बसे द्वितीय वा उच्च-द्वितीय (हायर सेकंड) श्रेणी मिळवून पास व्हायचे . पण शेवटच्या वर्षी आटापिटा करुन प्रथम श्रेणी मिळवायचे..मग बायोडेटावर चार वर्षांची सरासरी न लिहिता केवळ शेवटच्या वर्षाचा निकाल B.E. - First Class असं काहीसं लिहायचे.
- Log in or register to post comments
त
तेजस आठवले
Tue, 02/26/2019 - 16:30
नवीन
प्रचंड हुशार असणारा माझा अभियांत्रिकीमधला जाड चष्मेवाला शीख मित्र आठवला.अभियांत्रिकीची पहिली दोन वर्ष त्याने भरपूर अभ्यास करून डिस्टिंक्शन मिळवले आणि नंतर फाजील आत्मविश्वास दाखवत अभ्यास न केल्याने सटासट केट्या लागल्या आणि मग ड्रॉपच लागला की हो त्याला.
- Log in or register to post comments
M
mayu4u
Tue, 02/26/2019 - 16:35
नवीन
चांगल्या डॉक्टर ला दाखवा. वेळीच उपचार झाले तर कदाचित बरे व्हाल.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 02/27/2019 - 01:38
नवीन
29 September 2016 ला पण एक सर्जिकल स्ट्राईक झाला होता याचं तुम्हाला विस्मरण झालेलं दिसतंय. तेव्हा कुठली निवडणूक होती बरं?
बाकी पाकिस्तानला जगात एकटं पडायचे प्रयत्न गेल्या ४ वर्षात जोरात चालू आहेत -
Modi corners Pakistan on terrorism, advises China not to impinge sovereignty through OBOR
2018 foreign policy - team Modi goes beyond non alignment corners
G20 summit: World leaders vow to fight terrorism and its funding; PM Modi corners Pakistan again
Will approach India for Balochistan's freedom: Baloch leader
अजून शोधले तर सापडतील. बघा प्रयत्न करुन!
बादवे: २००८ मध्ये पाकिस्तानी अतिरेकी पार मुंबई पर्यंत येऊन हल्ले करून गेले. त्यावेळेलाही आपले एअरफोर्स, आर्मी आणि नौदल इतकेच सक्षम होते. पण कदाचित त्यावेळचा विद्यार्थी अर्थशास्त्राचा असल्याने आणि त्यातूनही ते रिमोटवर चालवले जात असल्याने काहीच केलं नसावं, काय म्हणता? २००९ ची निवडणूक एकहाती जिंकता आली असती की.
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 02/27/2019 - 06:36
नवीन
पण....
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 02/27/2019 - 06:38
नवीन
Finally terrorist camps in POK hit by Laser Guided Bombs from IAF Mirage 2000. We were about to hit POK camps in Muzzafarrabad after Mumbai attacks in 2008. Finally the Govt did not decide. Our Sukhoi Sqn under my Command was involved. Der Aaye Par Durusht Aaye. Cheers!!
— Mohonto Panging (@MontyPanging) February 26, 2019
मोहंतो पेगिंग या निवृत्त वैमानिकाने या संदर्भातले ट्विट केले आहे. भारतीय वायुसेनेने मिराज 2000 विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानवर हवाई हल्ला केलाच हे बरे झाले. उशीर झाला पण हरकत नाही. 2008 मध्ये जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा आम्ही मुजफ्फराबाद या ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांवर आम्ही हल्ला करणार होतो. मात्र त्यावेळी देशातील सरकारने आम्हाला त्याची संमती दिली नाही म्हणून ती मोहीम रद्द झाली असंही मोहंतो पेंगिग यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने करवाई करण्यास नकार दिल्याने 2008 मध्ये ही कारवाई होऊ शकली नाही. वायुसेनेकडे कायमच चांगली क्षमता आहे. मात्र असा एअर स्ट्राईक करायचा असेल तर राजकीय इच्छाशक्तीची गरज लागते. त्यावेळच्या सरकारने ती दाखवली नाही.
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Wed, 02/27/2019 - 02:58
नवीन
मराठी लेखक यांचा प्रतिसाद याठिकाणी पूर्णपणे अप्रस्तुत वाटतो.
दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल भारतीय सेना, गुप्तचर यंत्रणा आणि सर्व सम्बंधितांचे मनापासून अभिनन्दन.
आणि हो, मोदींचे देखील अभिनन्दन. इतकी वर्षे आम्ही भारतीय - तीव्र निषेध, आमचा संयम म्हणजे आमचा दुबळेपणा समजू नये असलंच काही तरी ऐकायचो. निदान आताचे पंतप्रधान ज्यांनी केलंय त्यांना धडा शिकवू असं स्पष्ट तरी बोलताहेत आणि लगेच अंमलबजावणी सुद्धा होताना दिसते आहे.
मी बीजेपी समर्थक नाही, पण जे चांगले दिसतेय त्याला चांगलेच म्हटले पाहिजे.
- Log in or register to post comments
झ
झेन
Tue, 02/26/2019 - 15:44
नवीन
इंजिनिअरींगच्या परीक्षा पूर्व नियोजित असतात, शत्रू राष्ट्र आणि अतिरेकी आधी तारखा देत नाहीत. सरकार, पक्ष सोडा निदान सेनेचे तरी निर्मळ मनान अभिनंदन करा.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 02/26/2019 - 16:31
नवीन
निर्मळ मन काय करील साबण,असं सुभाषित आमच्या गावाकडे शाळेतील आढ्यावर लिहीलेले होते खरे.
मुदल्लातला वाचकांची पत्रेवाला नाखु
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Tue, 02/26/2019 - 23:29
नवीन
ते वचन "नाही मन निर्मल काय करील साबण" असे आहे.
- Log in or register to post comments
द
दिगोचि
Tue, 02/26/2019 - 23:42
नवीन
ते वचन "नाही मन निर्मल काय करील साबण" असे आहे.
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
Tue, 02/26/2019 - 16:12
नवीन
भारतीय हवाईदल, सेना आणि सरकारचे मन:पूर्वक आभार!
जिगरबाज सैन्याचे पाय न ओढता त्याच्या पाठीशी ठामपणे उभं असणारं राजकीय नेतृत्वं असलं की काय होतं हे दिसून आलं!
कुत्सितपणाच्या आणि कोत्या मनोवृत्तीच्या परंपरेला जागून या हल्ल्याचं श्रेय फक्तं हवाईदलाचं आहे, यात मोदी किंवा डोवाल यांचं काही कर्तृत्व नाही असा सूर लावणारे निपजतीलच, त्यांना फक्त एकच प्रश्न आहे, १९७१ च्या बांग्लादेश निर्मितीच्या युद्धाचं श्रेयही फक्तं भारतीय सैन्याला दिलेलं त्यांन खपेल का?
फेसबुकवर आजच्या या हल्ल्याचं श्रेय राजीव गांधीना देण्याचाही एक प्रयत्न झालेला दिसला. कारण काय तर ही विमान फ्रान्सकडून घेण्याचा करार १९८४ मध्ये राजीव गांधींनी केला होता! ही विमानं तेव्हापासून भारतीय विमानदलात आहेत तर २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने ती अंडी उबवायला ठेवली होती का?
सगळ्यात वांधे झाले ते मात्रं केजरीवालचे....
सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे यावेळी पुरावा मागायला तोंड उचकटलं तर लोक दाभण घालणार आणि आमरण उपोषणाकडे 'मर एकदाचा' म्हणून कोणीही बोंबलायला लक्षच देणार नाही! झाकली मूठ म्हणून उपोषण मागे घेतल्याचं जाहीर करुन पुन्हा एकदा स्वहस्ते तोंड फोडून घेतलं!
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/26/2019 - 16:55
नवीन
=)) =)) =))
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Tue, 02/26/2019 - 17:24
नवीन
तुमचा हा प्रतिसाद जर केजरीवाल ने जर वाचला तर तो रोज तोंड फोडून घेईल !!! = )
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Tue, 02/26/2019 - 23:38
नवीन
त्या हलकट प्रवृत्त्या या धाग्यावर नाहि येणार
- Log in or register to post comments
ग
गणेश.१०
Tue, 02/26/2019 - 16:59
नवीन
पाकिस्तानच्या प्रॉक्सि-वॉर स्ट्रॅटेजीला उशिरा का होईना पण उत्तर शोधलं जातंय हे खूप महत्वाचं आहे.
१) या कारवाईने पाकिस्तानचं प्रमुख अस्त्र -- दहशतवादी -- हे बोथट होणार आहे.
२) प्रत्यक्ष युद्धभूमीतल्या यशापेक्षाही पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या मनात *कायमची भीती* निर्माण करण्यात आलेलं यश हे खूप मोठं आणि दूरगामी परिणाम करणारं आहे.
३) या कारवाईतून मिळालेला अनुभव हा आपल्या सैन्यासाठी अत्यंत ,मोलाचा आहे.
- Log in or register to post comments
श
शुचि
Tue, 02/26/2019 - 18:33
नवीन
- Log in or register to post comments
श
शब्दानुज
Tue, 02/26/2019 - 18:39
नवीन
मिसाईल हल्ल्याबाबत कोण सांगू शकेल काय ?
म्हणजे आपण थेट विमाने न पाठवता फक्त मिसाईलने हल्ला करु शकतो का ? याचे फायदे तोटे काय असतील ?
- Log in or register to post comments
ग
गणेश.१०
Tue, 02/26/2019 - 20:22
नवीन
१) क्षेपणास्त्र हल्ला अणुहल्ला म्हणून समजला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कदाचित त्याचा विचार होत नसावा.
२) आणि विमानातून केलेले हल्ले हे जास्त अचूक असावेत.
... असं वाचलंय.
- Log in or register to post comments
इ
इन्दुसुता
Tue, 02/26/2019 - 20:33
नवीन
जय हिन्द ! जय हिन्द की सेना !!
आज अगदी हमसुन रडले. उभ्या आयुष्यात हा दिवस बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं.
आपण दरच वेळी मार खातच राहणार!! शक्य असून सुद्धा आपल्या देशाकडून काहीतरी होईल या बद्दल आशा सोडून किती तरी वर्षं झाली असतिल.
आज मात्र भारतानी जे करून दाखवलं त्या साठी एक कडक सॅल्युट!!
आजी सोनियाचा दिनु, वर्षे अमॄताचा घनु
- Log in or register to post comments
C
Chandu
Wed, 02/27/2019 - 12:56
नवीन
+11111
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
गुरुवार, 02/28/2019 - 04:46
नवीन
अहो, इथे सोनिया कुठून आली ?
आजी मोदीयाचा दिनु, वर्षे कौतुकाचा घनु असे म्हणा हवे तर.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Wed, 02/27/2019 - 02:17
नवीन
फक्त सीमित हल्ला करून दहशतवादी निर्माण करणारे तळ उध्वस्त केल्या बद्दल भारतीय वायुदलाच्या सर्व शुर योध्यांच अभिनंदन .
आणि गंभीर भूमिका घेवून अत्यंत धाडसी निर्णय घेतल्या बद्दल भारत सरकार च अभिनंदन.
आणि ह्या भारताच्या हल्लात शत्रू राष्ट्राच्या सुधा सामान्य जनतेचे बिलकुल नुकसान झालं नाही आणि जगाला माहीत झालं की भारत हा अतिशय ताकदवान देश आसला तरी संयमी सुधा आहे .
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 02/27/2019 - 05:21
नवीन
या दोन प्रतिहल्ल्यां नंतर मोदी सरकार बद्दल अपेक्षा जास्ती वाढल्या आहेत. दोन्ही सर्जिकल स्ट्राइक ह्या आपल्यावर झालेल्या हल्ल्यांच्या केवळ प्रतिक्रीया होत्या.
पण आता केवळ अशा प्रतिक्रीया देत बसण्या ऐवजी "जर आमच्या कडे डोळे वर करुन बघायचा विचार जरी केलात तरी डोळे काढून घेउ" अशी दहशत बसवणारी कारवाई करण्याची वेळ आता आली आहे.
भारत केवळ प्रतिहल्ला नाही तर आक्रमणही करु शकतो हे जेव्हा जगाला समजेल तेव्हाच भारता कडे वाकडा डोळा करुन पहाण्या आधि १००० वेळा विचार केला जाईल.
अशी कारवाई करण्याची ताकद आणि हिम्मत मोदी सरकार मधे आहे हे आता सिध्द झालेच आहे.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »