अडनिडी मुलं-३
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन . चारच दिवसात म्हणे , मला इथे ऍडमिशन नकोय, तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही . किंवा इथेच आर्ट्सला घे . इथलया शिक्षकांना काहीच येत नाही , कसले फालतू कॉलेज आहे . मी म्हणाले, आगं फी भरलीय आता ती मिळणार नाही तर तू अकरावी सायन्स कर आणि मग आर्टस् ला घे तर म्हणे नाही मी काहीही अभ्यास करणार नाही, क्लासला तर मुळीच जाणार नाही . मी माझ्या मतावर ठाम आणि ती तिच्या . झाले , अकरावी कशी बशी पास झाली. रिझल्ट बघून मी म्हणाले आता आर्टस् ला घे. तर म्हणे जमणार नाही, काय व्हायचे ते होऊदे पण मी आता आर्ट्सला ऍडमिशन घेणार नाही आणि अभ्यासही करणार नाही . क्लास लावणार नाही. तूच शिकवायचे . मी म्हणाले तू क्लास लाव मला आता तुला मॅथ्स शिकवायला जमणार नाही . तर म्हणे दहावीपर्यंत कशी शिकवत होतीस आणि आता का नाही जमणार ? फेसबुक , मिसळपाव ह्यातून टाइम मिळेल तेंव्हा मला शिकवशील ना ? मला खरेच ते व्याप जमणार नव्हते म्हणून मी कशालाही भीक न घालता ठाम नकार दिल्यावर १ लाख भरून क्लासला ऍडमिशन घेतले पण कोणत्याच क्लासला ना नीट गेली , ना नीट अभ्यास केला. काही म्हणाले तर तूच सायन्स ला ऍडमिशन घ्यायला लावलय, माझी इच्छा नवहती , आता तू बघच . वर्षभर मी अक्षरशः भीतीच्या
सावटात काढले. पोरीने काहीही अभ्यास केला नाही . सर्व करून पाहिले - प्रेमाने, धमकवून, पण काहीही उपाय नाही . फक्त एवढेच, तू नुसत्या अकरावीच्या फीचा एवढा विचार का केलास ? वाया गेली असती तर काय होणार होते? प्रॅक्टिकल कधी असायची ते हि माहीत नव्हते . इथले सर्व गावंढळच आहेत, त्यांना नीट इंग्लिशच बोलता येत नाही ... टीचर ला पण इंग्लिश बोलता येत नाही आणि मी कॉलेजलाही जाणार नाही आणि क्लासला हि जाणार नाही . अगदी कौन्सेलर ची मदत घेऊनही पहिली पण काहीच उपयोग नाही . अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे , माझी लेक कॉलेजला जायला नाही म्हणत होती कारण कोणीच बरोबर नवहते, सर्व कपल्स आहेत म्हणाली. माझ्या मैत्रिणींना पण आता बॉयफ्रेंड भेटलेत म्हणे . ते रोज कोठे ना कोठे फिरायला जातात , मी त्यांच्याबरोबर गेले कि माझी सिच्युएशन ऑकवर्ड होते . मी आपली समाजवात राहायचे , तू जा . त्यांच्यात मिक्स हो . एकदा सर्व पाषाण लेक ला गेले , तिथे माझी लेक एकटी बाहेर बसून राहिली. बाकी सर्व आत झाडी झुडपात जोडी जोडीने बसायला गेले . ती हताशपणे एकटी बाहेर बसून राहिली . बाकीच्या मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड सिगारेट ओढायला लावत , नाही म्हणले कि , "बस क्या यार , इतना भी प्यार नाही करती क्या मेरेसे ?" असे म्हणत ." तेंव्हापासून तर लेकीने मित्र मैत्रीचे नावच टाकले .
तिच्या वर्गात अजून एक शाळेपासूनची मैत्रीण होती. तिला एस वाय बीकॉम झालेला बॉयफ्रेंड मिळला . कॉलेजचे नाव सांगून त्यांच्यबरॊबर हि अकरावीची पोरगी नुसती फिरणार . बड्डे पार्टीला आपलय दोनच मैत्रिणी बोलावल्या मॅक डीला , त्यात माझी लेक आणि दुसरी एक मैत्रीण बाकी सर्व त्या मुलाचे मित्र . ह्या दोघी चार वाजताच निघून आल्या आणि हि त्या मुलांबरोबर कोठेतरी फिरायला गेली. तिच्या आईने फोन करून विचारल्यावर आमच्या घरी जात आहे असे तिने घरी सांगितले. तिच्या आईचा वाट पाहुन माझ्या लेकीला फोन . लेकीने सरळ सांगितले, आम्ही कधीच चार वाजतच घरी निघून आलोय म्हणून परत त्या मैत्रिणीचा लेकीला फोन, काहीही कर माझ्या आईला तू माझ्याबरोबर असल्याचे सांग. लेक अगदीच गोंधळून गेली. त्याच दिवशी त्या पोरीचा रात्री आठ वाजता छोटा अपघात झाला . सर्व ढोपरे फुटली. तिची आई माझ्या लेकीला झाप झाप झापली , कोठे गेला होतात म्हणून ?
नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . तिने आईला आमच्याकडे नोटबुक घ्यायला गेल्यावर बॅग स्कुटरला तशीच राहिली आणि त्यातून कोणी काढून घेतला असे सांगितले. तिच्या आईचा परत लेकीला फोन, तुमच्या सोसायटीत फोन हरवलाय तर आईला सांगून सीसी टीव्ही बघा म्हणे, वॉचमन असताना माझ्या लेकीचा फोन गेलाच कसा म्हणे ? माझ्या लेकीचे मला फोन वर फोन , तू लवकर घरी ये, मी तिच्या आईला खरे काय ते सांगतेय . होऊदे दे तिचे कॉलेज बंद . मी लेकीला म्हणले , तू थोडा वेळ थांब मी येऊन काय करायचे ते बघते .
घरी गेल्यावर मी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले कि तुमच्या मुलीचा फोन आमच्या सोसायटीत नाही हरवला . ती कोठेतरी बाहेर गेल्यावर हरवलाय पण भीतीपोटी तिने तुम्हाला मनघडत सांगितले आहे . तुम्ही तिला मारू नका पण नीट विचारलेत तर ती तुम्हाला सर्व सांगेल. बाप आय टी मध्ये मोठ्या पदावर . आई खास मुलींच्या शिक्षणासाठी घरीच. चांगल्या सोसायटीत फ्लॅट , कशाचीही कमी नाही. काय करणार आई बाप? मी तिच्या आईला , उद्या पॅरेण्ट टीचर मीट वेळी भेटू आणि मला तुम्हाला काही सांगायचे आहे असे सांगितले. मी गेले होते , सर्व तयारी करून पण पोरीने आईला माझ्याकडे फिरकून पण दिले नाही आणि आईही फिरकली नाही. काय बोलणार ?
काय करायच्या या मुलांचे ?
क्रमशः
💬 प्रतिसाद
(94)
म
मराठी कथालेखक
Mon, 12/17/2018 - 19:35
नवीन
आर्टस् ला अॅडमिशन मिळाली नाही ? नवलंच आहे..
- Log in or register to post comments
ज
जेडी
Tue, 12/18/2018 - 08:01
नवीन
सायन्स पेक्शा जास्त मेरीट आर्टस ला लागले , ओपन मधुन, ते ही ९५% पेक्शा जास्त... आयफोनचा किपॅड..।
- Log in or register to post comments
स
सतिश म्हेत्रे
Tue, 12/18/2018 - 09:32
नवीन
आजकाल जास्त मार्क्स मिळणारे पण आर्ट्स घेऊ लागले की काय?? रच्याकने तुम्ही जे म्हणताय त्याचा काही संदर्भ मिळेल?
- Log in or register to post comments
ज
जेडी
गुरुवार, 12/20/2018 - 17:06
नवीन
अकरावीला प्रवेश घेताना एक बुकलेट मिळते (त्यातील माहितीनुसारच फॉर्म भरायचा असतो ). त्यात प्रत्येक कॉलेजची प्रत्येक शाखेची कात ऑफ लिस्ट लागलेली असते ती पहा
- Log in or register to post comments
व
वीणा३
Mon, 12/17/2018 - 20:39
नवीन
माझ्या घरी साधारण ८-९वीत असतानाच सांगितलं होता कि, तुझ्या गरजा आम्ही भागवू, ऐश आपल्या पैशानी करायची. आणि क्लास ला पण एक दिवस जरी बुडवलास तर मी ऑफिस मध्ये जाऊन पैसे परत मिळतायत का ते बघेन आणि त्यापुढे शिक्षणाला माझ्याकडून कुठलीही मदत होणार नाही.
तुला काय हवाय ते सांग, आम्हाला जेवढं बरोबर वाटेल आणि आम्हाला जे परवडेल तेवढंच आम्ही घेऊन देऊ.
मी ११वीत असल्यापासून पार्ट-टाइम काम करून पैसे मिळवले, स्वतःचा वॉकमन, पहिला नोकिया चा फोन, नंतर स्वतःची २ व्हेलर, पहिली विमान प्रवास, पहिला कॅमेरा सगळं स्वतःच्या पगारातून घेतलं. मुलगा ६ वर्षांचा आहे, पण आत्तापासून त्याला काहीही मागितलं कि, सगळीकडे किंमत बघ, प्रॉडक्ट रिव्यू बघ, सेल चा सिझन बघ, गरज आहे का बघ हे सगळं सांगत्ये.
मी तुम्हाला जज नाही करत आहे, आणि पालक होणं दिवसेंदिवस अवघड होतंय हे हि मान्य आहे आहे. माझ्या वडिलांनी जे केलं ते त्यांच्या आर्थिक परिस्थिती ला बरोबरच होत. मला तेवढं जमेल का नाही देव जाणे. पण मला खालील गोष्टी नाही पटल्या फारशा. मी तुम्हाला माझ्या बाबांचे उत्तर काय असेल ते सांगते, बघा देता आला तर, कधी कुठे कशाचा उपयोग होईल ते सांगता येत नाही.
१. तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही - माझ्या वडिलांनी जाऊ नकोस म्हणून सांगितलं असतं, १ वर्ष घरी बसल्यावर बाहेर जायचं महत्व कळलं असता कदाचित.
२. क्लास लावला - ती नको म्हणत असताना का लावला. कधीतरी आर्थिक स्रोत बंद करून बघितले आहेत का. सिनेमा ला जायला / नवीन ड्रेस घ्यायला इ पैसे का देऊ, तू माझं ऐकत नाहीस तर तुला मी का देऊ. किंवा "तुझ्या गरजांना आम्ही आहोत, ऐश आपली आपण करायची" असं करून बघितलंय का कधी
मुलांकडून काहीच प्रयत्न नसताना पैसे खर्च होऊ देणं हे फारसं बरोबर नाही वाटलं.
३. सर्व कपल्स आहेत म्हणाली - खरंच अक्ख्या वर्गात एकही मुलगी नाही जिला बॉयफ्रेंड नाही ??? - असं खरंच असेल तर अवघड आहे राव.
जेडी ताई /दादा - प्लिज समजून घ्या कि मला तुमच्या पालकत्वाच्या पद्धतीला नावं ठेवायची नाहीयेत, फक्त वेगळ्या पद्धतीने वागलं तर कदाचित चांगला फरक पडू शकेल, कारण तुमच्या सध्याच्या पद्धतीने अभ्यासात फायदा तसाही होत नाहीये असाच वाटतंय. अर्थात तिच्या बरोबर संवाद चालू आहे हा फायदाच म्हणावा लागेल. काय होतंय पुढे ते सांगा नक्की, मी सध्या सुपात आहे पण येईन जात्यात पुढच्या ५-६ वर्षात.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Tue, 12/18/2018 - 04:07
नवीन
वीणाताई तुम्ही सांगितलेले सर्व पर्याय मी वापरुन पाहिलेत, माझ्या मुलीशी माझा खुप चांगला संवाद आहे तरीही ही परिस्थिती आहे. माझीही मुलगी लहान असल्यापासुन स्वावलंबी आहे पण हे सर्व दहावीपर्यंत ऐकतात मुले , नंतर नाही. मी वरती नमुद केलय की मी काऊन्सेलरची मदत घेवुन पाहिली, तरीही काही उपयोग नाही.
मी स्वत: खुपच खडतर परिस्थितीतुन शिकलेय, पण सरळ म्हणते तुमचा जमाना वेगळा होता. जाऊच नकोस, घरीच बस हे बी हत्यार वापरुन पाहिलेय. परिणीती... १२ वी जेमतेम पास
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 12/17/2018 - 22:43
नवीन
मला एक असं नेहमी वाटतं की कोणीही अचानक विचित्र वागायला लागत नाही, स्पेशली मुलं. आईबाप जेव्हा म्हणतात की हा ऐकतच नाही किंवा ह्याला पिझ्झा बर्गरच लागतं किंवा गेमच खेळत बसतो... वगैरे वगैरे.. तेव्हा मुळात त्या लेकरचया हातात ह्या वस्तू देणारे पालकच असतात. त्यांना हवं ते करायची मुभा देणारे, त्यांच्या समोर नांगी टाकणारे.. तेव्हा मुलं अडनडी नसून, आईबापांची चूक आहे.
स्पष्टपणे बोलायचं तर तुमची मुलगी जसं बोलली (कॉलेज, क्लास वगैरे..) तसं तुम्ही खपवून कसं घेतलं हा प्रश्न मला पडला. मुलांचं शिक्षण म्हणजे ते अपल्यावर करत असलेले उपकार नव्हेत हे त्यांना कळायला हवं. नसेल कळत तर आपण ते सांगायला हवं. बसू दे घरी, होऊ दे नुकसान. बाकी खर्च बंद करा. आणि आता आपली पॉकेटमनीची सोय स्वतः करा असं सांगा. येईलच लक्षात की शिक्षण किती आवश्यक आहे.
काळ बदलत आहे, प्रश्न बदलत आहेत हे मान्य आहेच. पण पालक सुजाण असले तर मुलं सुजाण असतील. आणि मार्ग निघेलच. पण ह्या सगळ्यात मुलांना जबाबदारीची जाणीव हवीच.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Wed, 12/19/2018 - 04:43
नवीन
--------मला एक असं नेहमी वाटतं की कोणीही अचानक विचित्र वागायला लागत नाही, स्पेशली मुलं. आईबाप जेव्हा म्हणतात की हा ऐकतच नाही किंवा ह्याला पिझ्झा बर्गरच लागतं किंवा गेमच खेळत बसतो... वगैरे वगैरे.. तेव्हा मुळात त्या लेकरचया हातात ह्या वस्तू देणारे पालकच असतात. त्यांना हवं ते करायची मुभा देणारे, त्यांच्या समोर नांगी टाकणारे.. तेव्हा मुलं अडनडी नसून, आईबापांची चूक आहे.----
@@@@@आजकाल मुलांना पालकांनीच आणून दयावे लागत नाही , शाळेमध्ये सर्व कळते . मी माझ्या मुलीला निदान नववीपर्यंत तरी पिझ्झा बर्गरची चव दिली नवहती पण जसे जसे इतर मुलं डब्यातपण पिइझा बर्गर देतात किंवा बिस्कीट, नूडल्स तशी आपली मुलेही हट्ट करू लागतात . भाजी पोळीचा व्यवस्थित दाब देणाऱ्या माझ्यासारख्या दोन चारच आय होत्या हे वेगळे सांगायला नकोच . एखादीने दिलेच कष्ट करून तरी सरळ तो डबा कुत्र्यांना घालून कँटीन मध्ये खाणारी मुले कमी नाहीत
---------स्पष्टपणे बोलायचं तर तुमची मुलगी जसं बोलली (कॉलेज, क्लास वगैरे..) तसं तुम्ही खपवून कसं घेतलं हा प्रश्न मला पडला. मुलांचं शिक्षण म्हणजे ते अपल्यावर करत असलेले उपकार नव्हेत हे त्यांना कळायला हवं. नसेल कळत तर आपण ते सांगायला हवं. बसू दे घरी, होऊ दे नुकसान. बाकी खर्च बंद करा. आणि आता आपली पॉकेटमनीची सोय स्वतः करा असं सांगा. येईलच लक्षात की शिक्षण किती आवश्यक आहे.-------
@@@@@ तू माझ्यावर उपकार करत नाहीस शिकून, माझे त्यातून काहीही नुकसान होणार नाही , तू शिकली नाहीस तरी हे हि माझा पेशन्स टिकला तोवर सांगून झाले होते . त्यावर एकच उत्तर होते , मग घालायची होतीस मला चांगल्या कॉलेजला , शिकवायची होतीस मला जसे दहावीपर्यँत शिकवलंस तसे . हजार वेळा सांगून झाले, मला इंटिग्रेशन , डेरिव्हेटिव्हस आता आठवणार नाहीत, मी विसरली आणि जॉब , काम ह्यातून जमणार नाही , तर एकच पालुपद - ट्रिग्नॉमेट्रीच्या इतक्या अवघड आयडेंटिटी कशा जमत होत्या तुला, ते हि तू स्टेट बोर्ड ची असताना @@@@@
------काळ बदलत आहे, प्रश्न बदलत आहेत हे मान्य आहेच. पण पालक सुजाण असले तर मुलं सुजाण असतील. आणि मार्ग निघेलच. पण ह्या सगळ्यात मुलांना जबाबदारीची जाणीव हवीच------
@@@@@ पालक म्हणून निदान मी तरी खूप प्रयत्न केले असे मला वाटते. कदाचित अजून कमी पडले असेल म्हणून अजूनच अपारधी भाव किती दिवस वाटून घ्यायचा कोण जाणे @@@@
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/19/2018 - 07:01
नवीन
मला नक्की कळत नव्हतं की खटकतंय काय.. आज एकदम क्लिक झालं..
तुम्ही तिचे निर्णय तिलाच घ्यायला लावता का? 100%
म्हणजे तुमच्या प्रतिसादातून असं जाणवत आहे की ती तुमच्यावर टाकतेय सर्व जबाबदारी. आणि त्या निर्णयांच्या परिणामांना पण तुम्हीच जबाबदार, मग त्याला कसं निस्तरायच हे पण तुम्हीच बघायचे..
माझेही आयुष्यात शिक्षणाबाबत काही निर्णय चुकलेत. पण ते पूर्णपणे माझे होते त्यामुळे एकदाही इतर कुणाच्याही डोक्यावर खापर फोडता आलं नाही की जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकता आली नाही. दहावी नन्तर काय करायचं, कुठे ऍडमिशन घ्यायची, इंजिनिअर बनायचं, कुठलं कॉलेज, कुठली ब्रांच हे सगळं मी एकटीने ठरवलं, आई बाबांनी फक्त पैसे दिले. जाऊन ऍडमिशन पण मी एकटीने घेतली आहे. अगदी शाळेत सुद्धा साधा होमवर्क तर करून घेत नव्हते आई बाबा. नाही केलास तर शाळेत जाऊन खुशाल मार खा. त्यांचं लक्ष होत हे आज समजत आहे. आई तर शिक्षिका होती त्यामुळे ती बरोबर नजर ठेवायची. पण मागे लागून अभ्यास कर ग बाई, बाजूला बसून केलास का ग बाई वगैरे प्रकार कुणी केले नाहीत.
त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले तरी आई बापांनी आधार दिला पण त्या निर्णयांची जबाबदारी नाही घेतली. ती आमची आम्हीच उचलली.
तुमच्या बाबतीत असा काही इश्यू आहे का? तिने खावं म्हणून तुम्ही आटापिटा करून तिच्या मागे पळत होतात का? तिचा अभ्यास प्रोजेक्ट्स वगैरे तुम्ही लीड घेऊन करवून घेत होतात का? तिच्या करिअरच्या निर्णयात लीड कोण घेत आहे नक्की? जर ती तुम्ही घेतली असेल तर ती तुम्हालाच बोल लावणार (कारण अर्थात ते तिला सोयीचे आहे आणि ती लहान आहे).
अपराधीपणाचे म्हणाल तर तो येणारच. ती अत्यन्त यशस्वी झाली असती एखाद्या क्षेत्रात तर स्वतःचा अभिमान नक्कीच वाटला असता तुम्हाला. मग आता काही तरी हुकलय तर त्याचा अपराधीपणा पण वाटणारच की. ते सुटत नाही आता, जन्मभर राहणार सोबत. तुमची चूक असो वा नसो...
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 12/19/2018 - 07:19
नवीन
तुम्ही आणि मी बहुदा एकाच पिढीच्या प्रतिनिधी. माझ्याही graduation चे सर्व निर्णय मी स्वतः घेतले. पालक अगदी पालक सभेलाही कधी शाळेत आले नाहीत. पालकांनी कधीही अंगाला हात लावला नाही. प्रवेश प्रक्रियेचे सर्व सोपस्कार मलाच पार पडावे लागले. मी scholar असूनही एकदा 5 वि ला सहामाहित गणितात 100 पैकी 36 मार्क पडले तर वार्षिक परीक्षेला जरा अभ्यास कर इतकेच सांगितले गेले. एरवी प्रत्येक वेळी पहिला नं आला तरी छान इतकीच प्रतिक्रिया. एखाद्यावेळी कोणी ओरडला किंवा पालकांनी काही घेऊन दिलं नाही म्हणून त्यांचा राग करणारे किंवा घर सोडून जाऊ किंवा जीव देऊ असा विचारही कधी मनात आला नाही. बरोबरच्या मुलांच्या परिस्थितीत पण फारसा फरक नसायचा. त्यामुळे त्याच्याकडे ते आहे माझ्याकडे नाही किंवा एकूणच हीच गोष्ट करायचीय असा अट्टहास न्हवता. पण आता परिस्थिती खूप बादलीय. मुलांच्या आजूबाजूला असणारे वातावरण बदललंय. त्यामुळे आपण कितीही संस्कार केले तरीही या बाहेरच्या वातावरणाचा मुलांवर जास्त परिणाम होतो आणि तो समजून घेऊनच मुलांशी कसं वागायचं हे ठरवावं लागेल असं वाटतंय. माझा मुलगा आताशी 3 वर्षाचा आहे पण आतापासूनच याबाबत गोंधळून जायला होतंय.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Wed, 12/19/2018 - 08:28
नवीन
तिला लहानपणापासुन स्वत:चे निर्णय घेण्याचे पुर्ण स्वातंत्र दिलेय. क्लासला न जाण्याचा निर्णय तिचा स्वत:चा अगदी लहानपणापासुन होता त्याचा मी आदर केला. अगदी लहानपणापासुन ड्राॅईंग रिलेटेड काहीतरी करण्याचे तीने ठरवले , त्यालाही आम्ही सपोर्ट केला जरी आम्ही दोघे सायन्स स्ट्रिमचे होतो तरी. कधीही अभ्यास कर अशी जबरदस्ती केली नाही. आठवी नववीत माझ्या लकात आले, मॅथ्स मध्ये गाडं अडतय, मग मी टिचरला विचारले, तर टिचरनीच मला क्लासचा पर्याय दिला. मग मी स्वत:च लक्श देवुन शिकवले. दहावीला पिअर प्रेशर खाली क्लास लावला तरीही ती नीट गेलीच नाही. मुळात डिएवी शाळा लहान असताना वर्गातच प्रोजेक्ट करायला लावते त्यामुळे त्याचा काही प्रश्न आला नाही. मोठी झाल्यावर तीचे ड्राॅईंग चांगले असल्याने माझ्यावर कधीच प्रोजेक्ट करायची वेळ आली नाही. गणित सोडुन बाकीच्या सर्व विषयात चांगले मार्क्स मिळाले दहावीला.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/19/2018 - 09:30
नवीन
मग ती आता सगळा दोष तुम्हाला देऊन तूच काय ते माझं बघ असं का म्हणतेय? ती स्वतःच खूप घाबरलेली असेल का? टेन्शन आलं असेल म्हणून ती तुमच्यावर ते ट्रान्सफर करायला बघत असेल.
निर्णय तिलाच घेऊ द्यावा आणि काही झालं तरी आई बाबा भक्कम सोबत आहेत म्हणावं इतकंच मी सुचवेन.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 12/19/2018 - 11:50
नवीन
मला असं वाटतंय की तुम्ही आधी खुप लक्ष देत होतात आणि आता ऑफिसच्या निमित्ताने म्हणा किंवा आत्ताचा तिच्या अभ्यासाचा आवाका, तुम्हाला जास्त वाटल्याने म्हणा तुम्ही तिला क्लास ला जायला सांगताय. पर्यायी तुमच्या सोबत मिळणारा खास तिचा वेळ किंवा आई सगळं सोडून आपल्याकडे लक्ष देते ही तिची सुरक्षितता तिला मिळेनासी झालीये. एक तर तुमचं अटेन्शन मिळावं म्हणुन ही तिने तिच्या नकळत दिलेली पॅसिव अग्रेसिव प्रतिक्रिया असेल. दुसरं म्हणजे, बाहेर मैत्रिणी जर आपापल्या बॉफ्रे बरोबर रमल्या असतील तर हिला तिथे मजा येणार नाही. जर तिचा मैत्रिणींचा गृप असता आणि तिथे खुप धमाल करता आली असती, तर तुमच्याकडून अपेक्षा कमी झाल्या असत्या. या वयात उलट बर्याच पालकांना सतत फक्त मैत्रिणी लागतात, घरी थांबायचं नसतं, पालकांचं ऐकायचं नसतं पण मैत्रिणींनी तेच केलं की मात्र बरोब्बर पटतं वगैरे तक्रारी असतात. तुम्हाला उलट तक्रार आहे कारण आत्तापर्यंत तुम्ही तिच्या कलाने, तिच्या निर्णयाला मान देत वागलात, आता मात्र फीस भरलीये आता बस सायन्स ला हा तिच्यामते खुसपट इशु काढुन तिला एकटं टाकताय. कधी तरी या अँगलने पण तिच्या प्रतिक्रियाचा विचार करुन बघा . तुम्ही जे लिहीलअय त्यावरुन मला हे जाणवलं. तुमच्यापेक्षा जास्त कुणी समजू शकणार नाही तिला.
- Log in or register to post comments
झ
झेन
Tue, 12/18/2018 - 04:27
नवीन
फक्त तूमचा प्रश्न नसावा, एका पिढीचा आहे. आधिच आयुष्य आई वडिलांना घाबरत गेलं उरलेलं मुलांना.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 12/18/2018 - 05:11
नवीन
कठीण आहे. दोन्ही बाजूनी काही तरी चुकतं आहे.
- Log in or register to post comments
आ
आंबट गोड
Tue, 12/18/2018 - 08:59
नवीन
समजतं आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. तुम्ही मोकळेपणानी आपला प्रॉब्लेम सांगितला आहे. ऐकूनच कसे घेतले, क्लास का लावला आदी गोष्टी म्हणणे सोपे आहे..पण शेवटी आपल्या मुलांचे भवितव्य असते व त्यांनी काहीही बोलले तरी एकदम इस पार या उसपार असे वागून चालत नाही.
तिला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते ना....एफ सी ची अॅडमिशन खूप हाय जाते आर्ट्स ची! आताही काही ऑप्शन्स पहा... आर्किटेक्चर वगैरे...
हे वय खूप आडनेडे असते व त्यांना कॉलेज मधले शिक्षक- विद्यार्थी सुरुवातीलाच चांगले नसले तर अजिबात जमत नाही!
अवघड आहे...:-)
पण तिच्याशी सतत बोलत रहा, तिला पटवत रहा...हार्ड वर्कचे महत्व, चांगल्या डिग्रीचे महत्व.. ऑल द बेस्ट!
- Log in or register to post comments
स
सुचिता१
Tue, 12/18/2018 - 19:59
नवीन
अगदी .. सगळं कळत असून ही , टोकाचा निर्णय नाही घेता येत.
- Log in or register to post comments
व
विनिता००२
Tue, 12/18/2018 - 12:18
नवीन
मध्यंतरी मुलाच्या ग्रुपमधल्या काही मुलींचे वागणे पाहून खूप चिडचिड झाली. त्या मुली घरीच अशा वागतात, की तशीच विचारसरणी व सवय आहे हे तपासणे गरजेचे होते.
त्याला बोलले काहीच नाही. पण माझा राग त्याला जाणवत नक्कीच होता.
काही सार्वजनिक कार्यक्रमात पुर्ण ग्रुपला भेटायचा योग येत राहिला. जीवनपध्दती तशी आहे हे लक्षात आल्यावर मुलानेच विषय काढावा अशा पध्दतीने बोलत राहीले. समजवत राहीले. त्याला ते कळले, 'चुकले' म्हणुन मनातले बोलला. त्याला पण ते आवडले नव्हतेच. मळभ असे दूर झाले. :)
लगेचच रागाची प्रतिक्रिया दिली असती तर आई माझ्या मैत्रीणींना नावे ठेवते, म्हणून त्याने विचार पण केला नसता. माझ्यात आणी त्याच्यात भिंत उभी राहिली असती.
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Tue, 12/18/2018 - 16:05
नवीन
माझी भाची 11 वि व 12 वि गर्वारेत होती . भाचीने 10 वि ला 90 टक्केवर मार्क्स मिळवले पण आधीच सांगून टाकले मी कॉमर्स घेणार अणि cs किंवा mba करणार. तिला गरवारे कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला पण ती कॉलेज ला जात नसे. बरीचशी एकलकोंडी झाली ती त्याकाळात. वाहिनी चे आणि दादाचे तिच्याशी खूपच मित्रत्वाचे आणि ममत्वाचे नाते आहे. तिने त्यांना सांगितले वर्गातील मैत्रिणींना बॉयफ्रेंड असून त्या त्यांच्यासोबत असतात किंवा त्यांच्याबद्दल बोलत असतात. मला ते वतातवरणच आवडत नाही. तिला बारावीला यथातथाच मार्क मिळाले पण सिनियर कॉलेज चांगले मिळाले तिथे तुलनेने mature मित्र मैत्रिणी मिळाले मुख्य म्हणजे तिथल्या प्राध्यापकांची ती खूपच लाडकी होती. सर्व activity मध्ये तिने भाग घेतला आणि टॉप केले. त्यामुळे JD म्हणतात ते उदाहरण मी माझ्या डोळ्यासमोर पहिले आहे कारण मी त्यावेळी दादाकडेच राहत होते. बाकी हा विषय चर्चा करायला खूपच कठीण आहे.
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Tue, 12/18/2018 - 18:15
नवीन
मुलांच्या चुकिच्या(?) वागण्याला कारणीभूत म्हणून फक्त पालकांनाच झोडपणे योग्य नाही. कोणतेही सुजाण पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार, शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण मुले 7-8 वर्षांची झाली की काही केवळ घरातच घडत नसतात. शाळा-क्लासमधले सोबती तसेच टिव्ही, सोशल मिडिआ यांचा मुलांवर भरपूर प्रभाव पडतो.
माझ्या 'अडनिड्या' वयात (teenages) बाॅयफ्रेंड असणं म्हणजे महत्पाप मानलं जायचं. तेव्हाही काही मुलींचे बाॅयफ्रेंड्स असले तरी तो छुपा कारभार असे. आणि आपण त्या वाटेने न गेलेलेच बरे अशी धारणा असल्याने एकटे पडल्यासारखे वाटले नाही. नंतर अभियांत्रिकी करतांना जवळच्या मैत्रिणींचे बाॅयफ्रेंड्स होते पण जर्र्रा समज आल्याने फारसे जड गेले नाही.
हल्ली मात्र बाॅयफ्रेंड्स असण्यातली 'पाप-भावना' जावून त्याला 'कूल कोशंट' प्राप्त झाल्याने बाॅयफ्रेंड्स नसलेल्या मुली अश्या एकलकोंड्या किंवा बंडखोर होत असाव्यात असा अंदाज करता येतोय.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Wed, 12/19/2018 - 04:31
नवीन
अगदी अगदी , बंडखोर होतात . त्याविषयी पुढच्या लेखात लिहणारा आहे.
- Log in or register to post comments
व
विनिता००२
Wed, 12/19/2018 - 06:51
नवीन
मी बॉयफ्रेंड मिळवला नाही, कारण तुम्हांला आवडणार नाही, मग माझे बाकीचे सर्व हट्ट पुरवा. असा दृष्टीकोन असतो का? मला माहीत नाही म्हणून विचारतेय.
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 12/19/2018 - 07:33
नवीन
पण ज्यांना बॉयफ्रेंड नसतो त्यांना सगळ्यांमध्ये वावरताना अशा वेळी नक्कीच ओकवर्ड वाटत असणार. तसेच आपल्याला यातील अनुभव नाही म्हणून एक नूनग्नड देखील येत असण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला यात अजिबात रस नसण्याची किंवा यातला फोलपणा माहित असण्याची शक्यता आहे. अशा तुलनेने mature व्यक्तीला अशा वतातवरणात राहणे नक्कीच असह्य होऊ शकते. या मानसिक घुसमटीचा परिणाम पालकांच्या बरोबर वागण्यात होऊ शकतो
- Log in or register to post comments
ज
जेडी
गुरुवार, 12/20/2018 - 17:09
नवीन
नाही , तसे काहीच नाही . अगदी लहान असल्यापासून सर्व बाबतीतला मोकळा संवाद , मैत्रिणीच्या बॉयफ्रेंड्स मुले त्यांची झालेली गोची हे सर्व पाहिल्याने बॉयफ्रेंड नाही याची खंत वाटत नसावी
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/19/2018 - 07:11
नवीन
हा बॉयफ्रेंड वाला मुद्दा खरंच अवघड आहे.
मुलं बाहेर जास्त असतात हे ही खरं. त्यावर मी माझ्यापुरता असा उपाय केला की जेव्हा जेव्हा मी इंग्रजी शाळांमध्ये गेले, मलाच खूप दडपण आलं. हे खूप हाय फाय आहे असं वाटलं. उद्या इथल्या मुलांसारख्या डिमांड माझा मुलगा नक्कीच करेल. मराठी शाळेत मला एकदम माझ्या शाळेसारखं वाटलं म्हणून मी तिथेच मुलाला घातलंय.
एकदम घरगुती वातावरण आहे. 200/- चा टीशर्ट घ्यायला सांगितला शाळेने तरी पालक भांडतात की इतका खर्च कशाला :)) पण मुद्दा हा की मध्यमवर्गीय जनता आहे. फार वाया जाणार नाही पोरगा असं आज वाटतंय.
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 12/19/2018 - 07:28
नवीन
शाळेत असताना तो असं काही करणार नाही पण उद्या कॉलेज मध्ये गेल्यावर इंग्रजी मराठी शाळा असा भेद आडवा येणार नाही त्याला. ;)(कृ.ह. घे.)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/19/2018 - 07:53
नवीन
छे!! जाज्वल्य अभिमान बाळगणार तो उलट!! इंग्रजी वाल्याना हटा सावन की घटा म्हणायला शिकवू आपण त्याला!
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 12/19/2018 - 08:10
नवीन
:D:D;)
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Wed, 12/19/2018 - 04:50
नवीन
लेखमाला. बहुतेक उदाहरणातल्या अननुभवी मुलांपेक्षा अनुभवी पालक जास्त अविचारी, अडनिडे वाटले. भावनिक बुध्दिमत्तेचा - इमोशनल इन्टेलिजन्सचा - अभाव प्रकर्षाने जाणवला. मुलांचे संगोपन या पालकांनी कमी गांभीर्याने घेतल्यासारखे वाटले. भावनिक बुद्धिमत्तेसंबंधी सोपे प्राथमिक पुस्तक 'डॅनिअल गोलमन'चे 'इमोशनल इन्टेलिजन्स'. पालक आणि मुले सार्यांनीच या विषयाची तोंडओळख करून घेणे गरजेचे आहे असे वाटते.
खूप बुद्धिमान असण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करणारे बहुधा जास्त यशस्वी ठरतात. नैतिक मूल्ये आणि संयम याविना बुद्धिमत्ता निरुपयोगी आहे. अल कपोनसारखा अट्टल गुन्हेगार देखील अतिशय बुद्धिमान होता. निर्णयक्षमता मात्र बहुधा निसर्गदत्त असते. शिवाय मिळालेले गुण हे त्या त्या प्रश्नपत्रिकेपुरते सत्य असतात. अजून एकाही उदाहरणात परीक्षेतली कॉपी हा विषय आला नाही म्हणून गंमत वाटली.
छान लेखमाला. पुभाप्र.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Wed, 12/19/2018 - 05:22
नवीन
---लेखमाला. ---
@@@@@सर्व एका दमात लिहिणे शक्य नसल्याने , हे तुकडूयात लिहावे लागले . असो. लेखमाला लिहिण्याइतका माझा अनुभव नाही किंवा पात्रताही नाही पण मलाही लोकांचे काय अनुभव असतात ते वाचायचे होते म्हणून हा प्रपंच , असो @@@@@
-----बहुतेक उदाहरणातल्या अननुभवी मुलांपेक्षा अनुभवी पालक जास्त अविचारी, अडनिडे वाटले. भावनिक बुध्दिमत्तेचा - इमोशनल इन्टेलिजन्सचा - अभाव प्रकर्षाने जाणवला. मुलांचे संगोपन या पालकांनी कमी गांभीर्याने घेतल्यासारखे वाटले. भावनिक बुद्धिमत्तेसंबंधी सोपे प्राथमिक पुस्तक 'डॅनिअल गोलमन'चे 'इमोशनल इन्टेलिजन्स'. पालक आणि मुले सार्यांनीच या विषयाची तोंडओळख करून घेणे गरजेचे आहे असे वाटते.----
@@@@@हे समजतंय , कमी पडलोय, चुकलोय पण इथे लिहिले नसते तर , "डॅनिअल गोलमन'चे 'इमोशनल इन्टेलिजन्स'." पुस्तक वाचून सुजाण पोलकं होता आले असते हे कळले . आता पुस्तक नक्कीच वाचेन @@@@@
-------खूप बुद्धिमान असण्यापेक्षा आपल्या बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करणारे बहुधा जास्त यशस्वी ठरतात. नैतिक मूल्ये आणि संयम याविना बुद्धिमत्ता निरुपयोगी आहे. अल कपोनसारखा अट्टल गुन्हेगार देखील अतिशय बुद्धिमान होता. निर्णयक्षमता मात्र बहुधा निसर्गदत्त असते. शिवाय मिळालेले गुण हे त्या त्या प्रश्नपत्रिकेपुरते सत्य असतात. -----
@@@@@ अहो , मान्य. आम्ही कमी बुद्धिमान ते @@@@@
--------अजून एकाही उदाहरणात परीक्षेतली कॉपी हा विषय आला नाही म्हणून गंमत वाटली.--------
@@@@@तिन्ही लेखातले अनुभव लेकीशी झालेल्या सवांदातून आणि अनुभवातून लिहिले आहेत. एकही किस्सा काल्पनिक नाही . माझी मुलगी स्वतः कॉपी करत नसल्याने , फरकही त्यावर लिहिण्यासारखे माझ्याकडे नाही @@@@@@
----शिवाय मिळालेले गुण हे त्या त्या प्रश्नपत्रिकेपुरते सत्य असतात-----
@@@@अहो निदान भारतात तरी सर्व काही मार्कांवरच मिळते , निदान कॉलेजच्या डिग्र्या वैगेरे , नोकरी सुद्धा @@@@@
-----छान लेखमाला. पुभाप्र.----
धन्यवाद
- Log in or register to post comments
ज
जेडी
Wed, 12/19/2018 - 05:26
नवीन
पोलकं ऐवजी "पालक" वाचावे
"फरकही त्यावर लिहिण्यासारखे माझ्याकडे नाही " हे"
फार काही त्यावर लिहिण्यासारखे माझ्याकडे नाही असे वाचावे
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/19/2018 - 07:17
नवीन
साधारणपणे मिपावर काही पर्सनल लिहिलं की कशाला लिहिलं असं वाटतच, असं माझं मत आहे. :)
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 12/19/2018 - 06:16
नवीन
तुम्ही लेखमाला लिहून अजिबात चूक केलेली नाही. मुलांच्या बाबतीत फार टोकाचा निर्णय घेऊन चालत नसते. खरोखरच एखाद्या मुलाचे 1-2 वर्ष शिक्षणाशिवाय वाया घालवूयातच मग येईल त्याला अक्कल म्हणणारे पालक खरंच तशी वेळ आली तर खंबीर राहतील का? याचा या धाग्यावर नको पण जाचा त्याने मनातच विचार केला तरी योग्य उत्तर मिळेल. कुणीही असली रिस्क आजच्या काळात घेणार नाही. आमच्या कार्यलयातील एका अधिकाऱ्याच्या मुलाने गाडी घेऊन देता कि नाही नाहीतर आत्महत्या करतो असा संदेश पाठवला. तो अधिकारी घरी पोचेपर्यंत त्याने आत्महत्या केलिही होती. अशावेळी कोणतेही पालक मुलांचे कुठेही आणि कितीही चुकत असले तरीही विशिष्ट मर्यादेपर्यंत ताणू शकत नाहीत आणि ताणूहि नये. उद्या मुले जीवानिशी गेली तर आपल्या कर्तुत्वाला, पैशाला, आणि जीवनाला काय अर्थ असणार आहे? याचा अर्थ या दडपणाखाली पालकांनी राहावे असे नाही परंतु किती तानावे याबद्दल आहे. पालकांच्या अट्टाहासापायी मुलांनी जीव दिल्याची 3 उदाहरणे डोळ्यासमोर आहेत माझ्या.
- Log in or register to post comments
व
विनिता००२
Wed, 12/19/2018 - 09:32
नवीन
मुलांच्या बाबतीत फार टोकाचा निर्णय घेऊन चालत नसते. >> हे अगदी खरं !!
मुलाशी कधी वाद झाला असेल, तर मला दिवसभर ऑफीसमधे अस्वस्थ वाटत रहायचे, मधून मधून फोन करुन त्याच्याशी उगीचच काहीतरी बोलायचे :(
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 12/19/2018 - 08:30
नवीन
हेच. अगोदरच्या एका लेखाच्या प्रतिसादात मी म्हटलेही होते की मुले अडनिडी वाटत नाहीयेत. पुढील लेख आता जसे येत आहेत त्यातून पालकांची भूमिका ही अधिक रिजिड वाटते आहे.
@जेडी, तुमचे प्रतिसाद पाहा, कोणीही तुमच्या मताविरुद्ध वा त्याला छेद देणारे असे काही मत लिहिले की तुम्ही लगेच बचावात्मक धोरण का स्वीकारत आहात? आणि तुमचेच मत ग्राह्य आहे असा एक प्रकारचा अट्टाहास का आहे? ज्या वयात तुमची पाल्य आहे, त्या वयात आजूबाजूच्या वातावरणाचा प्रभाव पडतोच. 24 तास कोणीही आई वडील आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवू शकणार नाही, पण हा प्रभाव वरचढ ठरू नये म्हणून सतत आणि संयमित संवाद हाच त्यावरचा कीचकट आणि लांब पल्ल्याचा मार्ग आहे. त्याला इतर काही पर्याय नाही.
तुमच्यात आणि पाल्यामध्ये संवाद आहे का? तिची वाद करण्याची स्टाईल तुम्ही जी वर्णन करता आहात ती आणि तुमची इथे प्रतिसादांना उत्तर देण्याची स्टाईल एकच वाटते आहे साधारण. मी म्हणेन तेच आणि तसेच टाईप.
पालकत्व सोपे होते कधी? पाल्याणा शिकवताना आपल्यालाही खूप शिकायला मिळते. फक्त ते स्वीकारायचा मोकळेपणा हवा.
- Log in or register to post comments
ज
जेडी
Wed, 12/19/2018 - 11:08
नवीन
काय बोलु ह्यावर?
कशावरुन रिजीड वाटले ते ही सांगा.
सोपं काहीच नाही हे मान्य. म्हणुन तर लिहितेय. लोक अनुभव शेअर करतील आणि मलाही समजेल. मी स्वत: पण सपुपदेशन करुन घेतलय, तसा फरकही करुन पाहिलाय स्वत:त. अजुन काही कमी पडत असेल तर तेही करेन.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 12/19/2018 - 12:55
नवीन
माफ करा, पण तुम्हांला टीका आवडत नाही ( टीका म्हणून इथे कोणी प्रतिसाद देत नसावेत, मी धरून) असा एकूण मला सुर वाटतो आहे. कांदळकर ह्यांच्या पोस्टला तुमचा प्रतिसाद पहा. इतर पोस्टीना सुद्धा. ह्यावरून एकूण रीजिड वाटले, चुकीचे सुद्धा असू शकेल.
मुलीचे वागणे बदलावे ह्यासाठी सकारात्मक काय काय केले हे सांगू शकता का?
- Log in or register to post comments
स
स्मिता.
Wed, 12/19/2018 - 13:18
नवीन
मला नाही वाटत तुम्ही आधी काही चूक केलीये किंवा इथे लिहूनही काही चूक केलेली नाहीये. मी आधीही लिहिलंय की कोणतेही पालक मुलांच्या योग्य भवितव्यासाठीच झटत असतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.
दुर्दैवाने ज्या वयात मुलांत अनेक शरिरीक, भावनीक बदल होत असतात तोच काळ त्यांच्या करियरकरता महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी भावनीक आणि व्यवहारीक गरजांचा समतोल साधला जाईलच असं नाही. हा फक्त तुमच्या घरातला प्रश्न नाहीये.
इथे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत, ती त्यांच्या बाजूने बरोबरही आहेत. तुम्हाला त्यातली कोणती तुमच्या परिस्थितीला योग्य वाटतात ती घ्यायची.
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 12/19/2018 - 13:22
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
क
किलबिल
Wed, 12/19/2018 - 16:48
नवीन
अगदी माझ्या मनातलं लिहिलंत.
प्रत्येक मुल वेगळं असणार आणि त्याचबरोबर त्याला हॅण्डल करायचे मार्गही वेगळे असणार. एकच फॉर्म्युला सगळीकडे लागू होणार नाही.
जेडी, मी तुमची परिस्थिती समजू शकते. घरात एक टीनएजर असल्याने अगदीच रिलेट करु शकले. चर्चा वाचते आहे. कदाचित मलाही माझा फॉर्म्युला मिळून जाईल. चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Wed, 12/19/2018 - 10:08
नवीन
ज्वलंत विषयावर लिहिताय!
तिन्ही भाग आत्ता वाचले, अगदी आजूबाजूला घडणाऱ्या घटना वाचायला मिळाल्या.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 12/19/2018 - 11:55
नवीन
अत्यंत मोलाच्या विषयावरची लेखमाला ! उत्तम आणि संयत चर्चा !! यासाठी लेखक व प्रतिसादक या दोघांनाही अनेक धन्यवाद !
या लेखमालेतून अनेकांना अनेक उपयोगी विचार मिळतील यात शंका नाही.
- Log in or register to post comments
त
तनमयी
Wed, 12/19/2018 - 12:36
नवीन
माझी काही निरीक्षणे:
काही तरी चुकतं आहे.
मुलगी जास्त negativity कडे जात आहे असे वाटते
तिला बाहेर काढा यातून
मोठ्यांची मदत घ्या
ती अति बोलतेय एवढ नको बोलायला थोड आज्ञे मध्ये असायला हवे
वयानुसार वागले पाहिजे
adjustment is rule of life
आपण कशासाठी कॉलेज ला चाललोय आपण काय करत आहोत याचे भान असायला हव
काशाल मित्र व मैत्रिणी लागतात अपोआप eventually होतील नाहीतर नाही
आता तिला बेस्ट प्लान द्या जेणेकरून ती स्वावलंबी होईल पुढे तुमच गरज तिला प्रत्येक वेळेला भासणार नाही
स्किल छोटेसे असले तरी चालेल पण ती आयुष्यात स्वावलंबी झाली पाहिजे
ओवर आल ती तुमची आहे ती सगळ्यात खूप महत्वाची आहे हे तिला पटवून द्या
ती आनंदी कशी राहील बुस्य कशी राहील हे बघा
थोडा वेळ द्या अशा गोष्टीना होईल सर्व निट.
time is answer
सर्व पालकांना आदर्श मुल नाही मिळत त्यामुळे करितो करे स्तोवर करणे पण tension न घेता करणे
आपण एखादा बक्क प्लान त्यांच्या साठी तयार ठेवावा इन टर्म्स ऑफ money ऑर else
- Log in or register to post comments
त
तनमयी
Wed, 12/19/2018 - 12:36
नवीन
माझी काही निरीक्षणे:
काही तरी चुकतं आहे.
मुलगी जास्त negativity कडे जात आहे असे वाटते
तिला बाहेर काढा यातून
मोठ्यांची मदत घ्या
ती अति बोलतेय एवढ नको बोलायला थोड आज्ञे मध्ये असायला हवे
वयानुसार वागले पाहिजे
adjustment is rule of life
आपण कशासाठी कॉलेज ला चाललोय आपण काय करत आहोत याचे भान असायला हव
काशाल मित्र व मैत्रिणी लागतात अपोआप eventually होतील नाहीतर नाही
आता तिला बेस्ट प्लान द्या जेणेकरून ती स्वावलंबी होईल पुढे तुमच गरज तिला प्रत्येक वेळेला भासणार नाही
स्किल छोटेसे असले तरी चालेल पण ती आयुष्यात स्वावलंबी झाली पाहिजे
ओवर आल ती तुमची आहे ती सगळ्यात खूप महत्वाची आहे हे तिला पटवून द्या
ती आनंदी कशी राहील बुस्य कशी राहील हे बघा
थोडा वेळ द्या अशा गोष्टीना होईल सर्व निट.
time is answer
सर्व पालकांना आदर्श मुल नाही मिळत त्यामुळे करितो करे स्तोवर करणे पण tension न घेता करणे
आपण एखादा बक्क प्लान त्यांच्या साठी तयार ठेवावा इन टर्म्स ऑफ money ऑर else
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 12/19/2018 - 15:11
नवीन
हा लेखच नव्हे तर या लेखमालेच्य निमित्ताने मला काहीसं व्यक्त व्हावसं वाटतंय.. "बिघडलेली वा वाट चुकलेली मुलं" असा काहीसा विषय इथे दिसतोय.
मला कुणाला चूक वा बरोबर ठरवायचं नाहीये. पण मी जे सहसा फारसं व्यक्त करत नाही ते लिहावंस वाटतंय.
आता मी चाळीशीच्या जवळ पोचलो आहे. शाळेत, कॉलेजात माझी प्रगती नेहमीच अतिशय चांगली होती. नेहमीच चांगला क्रमांक , टक्के ई. इंजिनिअरिंग केल्यावर नोकरी मिळाली. अगदी आई-वडीलांना अभिमान वाटेल असंच करिअर होतं.. पण.. लौकिक अर्थाने सारं काही छानच... पण मला मात्र काहीतरी हरवल्याची जाणिव नेहमीच होत राहिली, अजूनही तो सल आहेच काही प्रमाणात.
मध्यमवर्गीय असल्याने आई -वडीलांनी अगदी फक्त अन्न-वस्त्र-निवारा आणी शिक्षण ई गरजाच पुरवणार असल्याचं अनेक वेळा मनावर बिंबवलं होतं.. फारसा हट्ट करण्याचा प्रश्न नव्हताच. कोचिंग क्लासही थेट दहावीत प्रथम लावला. त्या आधीही (म्हणजे आधीच्या इयतांत) बहूधा चांगलेच गुण मिळायचे (निदान ८०% तरी) . पण वार्षिक वगळता इतर परीक्षांत एकेका विषयाची उत्तरपत्रिका एकेका दिवशी (शिक्षक जसे तपासतील तसे) हाती यायची. त्यामुळे एखाद्या विषयात जर कमी (म्हणजे ७०% वगैरे) गुण मिळाले तरी खूप बोलणी ऐकावी लागत..जरी पुर्ण परीक्षेची गोळाबेरीज चांगली असली तरी...
मी चौथीत असताना माझ्या वर्गात एक मुलगा होता, तो परिक्षेत पहिल्या क्रमांकावर असायचाच पण शाळेत कथाकथन , रेडिओवर नाटक ई गोष्टीही त्याच्या असायच्या.. खरंतर त्याच्या या यशामागे शिक्षिका असलेल्या त्याच्या आईचे खूप प्रयत्न होते. पण या मुलाचे सतत इतके काही कौतुक माझ्या घरात होत असे की जणू त्या मुलासमोर मी म्हणजे कुणीतरी अत्यंत यःकश्चित मुलगा. नकळत पणे त्या वयात मी त्या मुलाचा द्वेष करु लागलो होतो. माध्यमिक शाळेत त्याचे बाकी कर्तृत्व हळूहळू ओसरू लागले आणि अभ्यासातही तो दुसर्या फळीत गेला तर मी नेहमीच पहिल्या फळीतच होतो. पुढे आमची मैत्रीही झाली, ते असो.
वय वाढत होते तसे मनात फक्त एक गोष्ट पक्की होत होती की मला फक्त अभ्यास करायचा आहे.. मस्ती नाही की हट्ट नाही.. शिकायचे आणि स्वतःच्या पायावर उभे रहायचे इतकेच... माझ्या आईला वाटे की तिच्या मुलांना नेहमीच तिच्या इतर (सख्ख्या आणि चुलत्/मावस वगैरे) भावंडांच्या मुलांपेक्षा जास्त गुण असावेत जे सांगताना तिला नेहमी अभिमान वाटेल.. हे मी नेहमीच करु शकलो..
अकरावीत असताना माझा कल बदलला, मला इंजिनिअरिंग ऐवजी सायन्स (B Sc नंतर M Sc ई ) ला जावेसे वाटू लागले कारण मला संशोधनाची आवड निर्माण झाली होती. पण या गोष्टीला घरुन विरोध झाला.. 'नोकरी मिळणार नाही' ही मोठी भिती दाखावली गेली ..मी ही ठाम राहू शकलो नाही. मग इंजिनिअरिंगला जायचे ठरवले. पण तिथेही अट होतीच की फक्त 'फ्री सीट'ला प्रवेश घेता येईल,... फ्री सीटला इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला, सर्व वर्षांना अव्वल यश मिळवले.
पण हे सगळं करताना मोठा हट्ट मी फक्त एका सायकलकरिता (बारावीला) आणि कॉम्प्युटरकरिता (इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला) केला. या गोष्टी मिळाल्यात पण खूप दिवस हट्ट करत रहावे लागले.. सहज काही मिळाले नाही..इंजिनिअरिंगला असताना कॉलेजला बसने जाणे हे जास्त सोयीस्कर असतानाही मी लोकल ट्रेनने जायचो कारण लोकलचा पास खूप स्वस्त होता. त्या काळीही इंजिनिअरिंगला माझ्या वर्गात रोज बाईकवर येणारी अनेक मुले होती.
बरं काही हट्टांकरिता पैसे लागणार नव्हते.. जसे मला केस वाढवायची आवड होती पण त्यालाही घरातून खूप विरोध होता..
स्वतःच्या पायावर उभे राहू पर्यंत मी अभ्यासाशिवाय फारसे काही केलेच नाही ..मित्रांसोबत फिरायला जाणे तर दूर पण नातेवाईक घरी आल्यावरही एकदा नमस्कार करुन झाल्यावर "तु आत तुझा अभ्यास करत बस" अशीच सूचना असायची. कॅरम वगैरे खेळ मोठ्या परीक्षा संपल्यावर फक्त उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुटीत खेळता येत असंत.
एकविसाव्या वर्षी नोकरी मिळाली, स्वतःच्या पायावर उभे राहिलो.. खर्या अर्थाने आयुष्याची सुरुवात झाली असं वाटलं... तरी चोविसाव्या वर्षी स्वखर्चानेच पहिला मोबाईल घेताना घरुन झालेला विरोध आठवतो.. त्याच दरम्यान केव्हातरी अगदी चिकाटीने एखादा वर्ष केस वाढवलेत पण "कधी कापणार ? नेमके किती वाढवायचे आहेत ? वाईट दिसतायत...नातेवाईक /लोक काय म्हणतील ?..." वगैरे शेरे/ प्रश्न अनेकदा ऐकावे लागले..
अर्थात या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत.. मी फारशा व्यक्त करीत नाही.. 'जाऊ दे झालं ते झालं' म्हणत सोडून देतो. पण काहीतरी हरवल्याची भावना कधीकधी दाटून येतेच...असो.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 12/19/2018 - 15:40
नवीन
आपण फार सालस मुलगा होता पण आपले पालक जास्त नियंत्रण ठेवणारे(कॉन्ट्रॉलिंग) होते असे वाटते आहे. मी पण तसा सालसच आणि हुशारही( पहिला दुसराच नंबर असायचा) होतो म्हणजे कोणतेही व्यसन वायरट पण वगैरे न करताच लहानाचा मोठा झालो परंतु आमच्या पालकांनी आम्हाला भरपूर स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे मनात काही किल्मिष राहिलेले नाही.
एकदा आयुष्यात वारा प्यायलेल्या वासरासारखा उ:शृंखल पणा आणि अनाठायी खर्च करून पहा. मनातील जळमटे स्वच्छ होतील. 'जाऊ दे झालं ते झालं' याची खंत वाटणं थांबेल. एकच आयुष्य मिळतंय. मन स्वच्छ ठेवून जगा.
(सल्ला आगाऊपणाचा वाटला तर सोडून द्या)
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 12/20/2018 - 08:17
नवीन
आता करतो खर्च स्वकमाईने... पण कधी कधी काही गोष्टी पालकांकडून मिळण्यात वेगळा आनंद असतो असे वाटते... हट्ट पुरवले जाण्याचा आनंद. अगदी खूप महागडे हट्ट नाही पण निदान काही प्रमाणात आणि बजेटमध्ये बसू शकतील असे काही.
- Log in or register to post comments
स
सुचिता१
Wed, 12/19/2018 - 19:12
नवीन
मनाला भीडणारा प्रतीसाद आहे तुमचा. मुलांना त्या त्या वयात छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता यायला हवा , शिस्ती चा ही अतिरेक नको , या वेगळ्या मुद्द्या कडे लक्ष वेधले तुम्ही .
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
गुरुवार, 12/20/2018 - 09:40
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 12/20/2018 - 15:12
नवीन
म.क.,
तुमच्या एकंदरीत कथनावरनं वाटतंय की तुम्हाला तुमच्या पालकांनी त्यांच्यासाठी वापरून घेतलंय. त्यांना बरं वाटावं, प्रतिष्ठा लाभावी, वगैरे साठी.
पण असं असलं तरीही ती समस्या नाही. कारण की तुमचा वापर तरी होत होता. यथावकाश स्वत:चा वापर स्वत:साठीच कसा करायचा ते तुम्ही शिकलात.
फक्त काहीतरी हरवल्याची भावना जी येते तिचा निकाल लावायचाय. याचं कारण तुम्हीच सांगितलंय. छोटेछोटे हट्ट पालकांनी पुरवायचं जे समाधान असतं ते तुम्हाला बालपणी मिळालं नाही. मला वाटतं की तुमच्या मुलांचे असे किरकोळ हट्ट पुरवून तुम्हाला ते क्षण परत जगता येतील.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »