अडनिडी मुलं-३
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन . चारच दिवसात म्हणे , मला इथे ऍडमिशन नकोय, तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही . किंवा इथेच आर्ट्सला घे . इथलया शिक्षकांना काहीच येत नाही , कसले फालतू कॉलेज आहे . मी म्हणाले, आगं फी भरलीय आता ती मिळणार नाही तर तू अकरावी सायन्स कर आणि मग आर्टस् ला घे तर म्हणे नाही मी काहीही अभ्यास करणार नाही, क्लासला तर मुळीच जाणार नाही . मी माझ्या मतावर ठाम आणि ती तिच्या . झाले , अकरावी कशी बशी पास झाली. रिझल्ट बघून मी म्हणाले आता आर्टस् ला घे. तर म्हणे जमणार नाही, काय व्हायचे ते होऊदे पण मी आता आर्ट्सला ऍडमिशन घेणार नाही आणि अभ्यासही करणार नाही . क्लास लावणार नाही. तूच शिकवायचे . मी म्हणाले तू क्लास लाव मला आता तुला मॅथ्स शिकवायला जमणार नाही . तर म्हणे दहावीपर्यंत कशी शिकवत होतीस आणि आता का नाही जमणार ? फेसबुक , मिसळपाव ह्यातून टाइम मिळेल तेंव्हा मला शिकवशील ना ? मला खरेच ते व्याप जमणार नव्हते म्हणून मी कशालाही भीक न घालता ठाम नकार दिल्यावर १ लाख भरून क्लासला ऍडमिशन घेतले पण कोणत्याच क्लासला ना नीट गेली , ना नीट अभ्यास केला. काही म्हणाले तर तूच सायन्स ला ऍडमिशन घ्यायला लावलय, माझी इच्छा नवहती , आता तू बघच . वर्षभर मी अक्षरशः भीतीच्या
सावटात काढले. पोरीने काहीही अभ्यास केला नाही . सर्व करून पाहिले - प्रेमाने, धमकवून, पण काहीही उपाय नाही . फक्त एवढेच, तू नुसत्या अकरावीच्या फीचा एवढा विचार का केलास ? वाया गेली असती तर काय होणार होते? प्रॅक्टिकल कधी असायची ते हि माहीत नव्हते . इथले सर्व गावंढळच आहेत, त्यांना नीट इंग्लिशच बोलता येत नाही ... टीचर ला पण इंग्लिश बोलता येत नाही आणि मी कॉलेजलाही जाणार नाही आणि क्लासला हि जाणार नाही . अगदी कौन्सेलर ची मदत घेऊनही पहिली पण काहीच उपयोग नाही . अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे , माझी लेक कॉलेजला जायला नाही म्हणत होती कारण कोणीच बरोबर नवहते, सर्व कपल्स आहेत म्हणाली. माझ्या मैत्रिणींना पण आता बॉयफ्रेंड भेटलेत म्हणे . ते रोज कोठे ना कोठे फिरायला जातात , मी त्यांच्याबरोबर गेले कि माझी सिच्युएशन ऑकवर्ड होते . मी आपली समाजवात राहायचे , तू जा . त्यांच्यात मिक्स हो . एकदा सर्व पाषाण लेक ला गेले , तिथे माझी लेक एकटी बाहेर बसून राहिली. बाकी सर्व आत झाडी झुडपात जोडी जोडीने बसायला गेले . ती हताशपणे एकटी बाहेर बसून राहिली . बाकीच्या मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड सिगारेट ओढायला लावत , नाही म्हणले कि , "बस क्या यार , इतना भी प्यार नाही करती क्या मेरेसे ?" असे म्हणत ." तेंव्हापासून तर लेकीने मित्र मैत्रीचे नावच टाकले .
तिच्या वर्गात अजून एक शाळेपासूनची मैत्रीण होती. तिला एस वाय बीकॉम झालेला बॉयफ्रेंड मिळला . कॉलेजचे नाव सांगून त्यांच्यबरॊबर हि अकरावीची पोरगी नुसती फिरणार . बड्डे पार्टीला आपलय दोनच मैत्रिणी बोलावल्या मॅक डीला , त्यात माझी लेक आणि दुसरी एक मैत्रीण बाकी सर्व त्या मुलाचे मित्र . ह्या दोघी चार वाजताच निघून आल्या आणि हि त्या मुलांबरोबर कोठेतरी फिरायला गेली. तिच्या आईने फोन करून विचारल्यावर आमच्या घरी जात आहे असे तिने घरी सांगितले. तिच्या आईचा वाट पाहुन माझ्या लेकीला फोन . लेकीने सरळ सांगितले, आम्ही कधीच चार वाजतच घरी निघून आलोय म्हणून परत त्या मैत्रिणीचा लेकीला फोन, काहीही कर माझ्या आईला तू माझ्याबरोबर असल्याचे सांग. लेक अगदीच गोंधळून गेली. त्याच दिवशी त्या पोरीचा रात्री आठ वाजता छोटा अपघात झाला . सर्व ढोपरे फुटली. तिची आई माझ्या लेकीला झाप झाप झापली , कोठे गेला होतात म्हणून ?
नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . तिने आईला आमच्याकडे नोटबुक घ्यायला गेल्यावर बॅग स्कुटरला तशीच राहिली आणि त्यातून कोणी काढून घेतला असे सांगितले. तिच्या आईचा परत लेकीला फोन, तुमच्या सोसायटीत फोन हरवलाय तर आईला सांगून सीसी टीव्ही बघा म्हणे, वॉचमन असताना माझ्या लेकीचा फोन गेलाच कसा म्हणे ? माझ्या लेकीचे मला फोन वर फोन , तू लवकर घरी ये, मी तिच्या आईला खरे काय ते सांगतेय . होऊदे दे तिचे कॉलेज बंद . मी लेकीला म्हणले , तू थोडा वेळ थांब मी येऊन काय करायचे ते बघते .
घरी गेल्यावर मी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले कि तुमच्या मुलीचा फोन आमच्या सोसायटीत नाही हरवला . ती कोठेतरी बाहेर गेल्यावर हरवलाय पण भीतीपोटी तिने तुम्हाला मनघडत सांगितले आहे . तुम्ही तिला मारू नका पण नीट विचारलेत तर ती तुम्हाला सर्व सांगेल. बाप आय टी मध्ये मोठ्या पदावर . आई खास मुलींच्या शिक्षणासाठी घरीच. चांगल्या सोसायटीत फ्लॅट , कशाचीही कमी नाही. काय करणार आई बाप? मी तिच्या आईला , उद्या पॅरेण्ट टीचर मीट वेळी भेटू आणि मला तुम्हाला काही सांगायचे आहे असे सांगितले. मी गेले होते , सर्व तयारी करून पण पोरीने आईला माझ्याकडे फिरकून पण दिले नाही आणि आईही फिरकली नाही. काय बोलणार ?
काय करायच्या या मुलांचे ?
क्रमशः
व्यावहारिक म्हणाल तर माझी मुलगी नको इतकी व्यावहारिक झालीय असे मला वाटते . जसे कि पॉकेटमनी साठवणे . मला जर कधी अडीनडीला लागले तर त्यावर इंटरेस्ट घेणे . घरचे कामही पैशाच्या मोबदल्यात करणे . पणत्या , कानातले , ग्रीटिंग्स , बुकमार्क असले करून विकणे . आईला तुझ्या ऑफिसमध्ये सर्व दाखव म्हणून सेल्समन करतो तशी आर्जवे करणे . मेहंदी अतिशय चान्गली काढते तर ती कोणच्याही हातावर फुकट न काढणे . शाळा कॉलेजच्या मुलांना जर्नल प्रोजेक्ट करून देणे आणि त्याबदल्यात पैसे घेणे . असले बरेच उद्योग करते . अगदी कामवाल्याना बोलणे , मी बोलले नाही तर मला रागावणे असले उद्योग करते . अगदी माझीही तुलना माझ्या एखाद्या ऑफिसमधल्या माझ्या वयाच्या बाईशी करून तिने कसे स्वतःला मेंटेन केलेय ... असले बरेच उद्योग करते .व्यावहारिकता म्हणजे, योग्य वेळी योग्य कृती निवडण्याची आणि ती अंमलात आणण्याची क्षमता. मुलीने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर लहानसहान गोष्टी करून पैसे मिळवणे याला मी व्यावहारिकता न म्हणता, तिचा अभाव असे म्हणेन. कारण, यामुळे, तिचे शिक्षण व कौशल्य कमावण्यासाठीचा वेळ क्षुल्लक व गरज नसलेले पैसे कमावण्यात खर्च होत आहे व त्याने भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. माझे उदाहरण देऊन मी माझा मुद्दा जरासा विशद करतो. माझा मुलगा अमेरिकेत एमएस करायला गेला तेव्हा, "एमएस पूर्ण होईपर्यंत पैश्याकरिता काम करायचे नाही, सर्व खर्च मी करेन. पण, त्याने त्याचा पूर्ण वेळ उत्तम GPA मिळविण्यासाठी व पुढच्या करियरसाठी आवश्यक गोष्टींवरच खर्च करायचा" असा आमचा करार होता. तो त्याने कसोशीने पाळला आणि एक पाऊल पुढे जाऊन, एका वर्षाच्या तीन सेमेस्टर्समध्ये उत्तम GPA सकट एमएस पूर्ण केली. तिसर्या सेमेस्टरमध्ये आलेली नोकरीची ऑफर, आमच्या करारामुळे, त्याने मला न सांगता नाकारली. त्याच कंपनीने एमएस झाल्यावर परत संपर्क साधून ऑफर दिली, तेव्हाच त्याने मला ती कहाणी सांगीतली ! एमएस करताना, पैसे डोळ्यासमोर ठेवणे ही त्याची आवश्यकता नव्हती आणि तसे करून GPAवर प्रतिकूल परिणाम करून घेणे, ही कृती योग्यही झाली नसती. काम न केल्यामुळे मिळालेला वेळ वापरून त्याने २-५ वर्षे मुदतीचा अभ्यासक्रम एका वर्षात संपविल्याने राहण्याचा खर्च फक्त एका वर्षाचाच झाला (खर्च वाचला) आणि उत्तम GPAमुळे त्याला करियरमध्येही फायदा झाला व पुढे होत राहील. काम करून पैसे मिळविणे आणि त्यामुळे एमएसला २+ वर्षे घालवण्यापेक्षा हा पर्याय अनेक पटींनी फायद्याचा ठरला.परंतु जेडीपुत्रीच्या बाबतीत कशाचाच पत्ता नाही.हेच फार महत्वाचे आहे. तिने विचारशक्ती दाखवून काही मोठा प्रकल्प हाती घेतलेला असता तर तिला चाईल्ड प्रॉडिजी समजून, तुम्ही म्हणता ते, योग्य असते. पण वस्तूस्थिती तशी नाही. शिक्षण व कौशल्य मिळविण्यात खर्च करायचा वेळ, पैसे मिळवण्याच्या (तेही अनियमित आणि थोडेसे) मागे लागून व्यर्थ चालला आहे. इतकेसे पैसे कुठेही गुंतवले तरी पुढील जीवन स्थिर होईल इतके किमान ध्येय साध्य होणे कठीण आहे. चाईल्ड प्रॉडिजी सोडून इतर मुलांनी २५-२७ पर्यंत आपले मूलभूत (कमीत कमी बॅचलर्स) शिक्षण व कौशल्य मिळविणे आवश्यक असते. ३५ वर्षांनंतर कितीही मोठी डिग्री घेतली तरी, एज बार झाल्याने तिचा उपयोग होईलच असे नाही... झालाच तरी, लहान वयाची अनेक मुले तुमच्या पुढे गेलेली असतात... असा सर्वसाधारण अनुभव आहे."तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत जा. मला कोणीतरी ऐकायला हवं असतं. ती माझी गरज आहे. मधेच थांबवून समस्या सोडवायची घाई करत जाऊ नकोस. ती सुटेल. तू फक्त ऐक थोडा वेळ." हा अगदी अलिकडेच धाकटीकडून मिळालेला अहेर.तुम्ही नशीबवान आहात. तुमची मुलगी प्रगल्भ आहे !