Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - डिसेंबर २०१८

व
वामन देशमुख
Sat, 12/01/2018 - 07:27
🗣 144 प्रतिसाद
सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय. परराज्यातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेनेनेही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, (किंवा अनेकजण शिवसेनेच्या बॅनरखाली स्वतः निवडणूक लढवत आहेत). अशाच एका उत्साही उमेदवाराच्या मिनिट्रकवर लावलेले हे प्रचारचित्र. a

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 55790 views

🗣 चर्चा (144)
म
मार्मिक गोडसे Sat, 12/15/2018 - 07:33 नवीन
राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक घोषणापत्रात शेती कर्जमाफीचा उल्लेख करू नये,त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, असे रघुराम राजन यांचे मत आहे व तसे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कर्जमाफी हा शेती समस्येवर एकमेव उपाय नाही हे राहुल गांधींनी बोलून दाखविले आहे. परंतू एखाद्या सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असेल आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल अशा वेळेस विरोधी पक्षाकडे कर्जमाफी देऊन अर्थव्यवस्थेसंबंधी ठोस धोरण असल्यास, निवडणूक आयोगाने रोखणे चुकीचे ठरेल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 12/15/2018 - 08:14 नवीन
..... .........एखाद्या सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणामुळे... ..........
टर्मिनॉलॉजी सब्जेक्टीव्ह आणि संधी आणि सत्तासाधू पण असू शकते. पण रह्गुराम राजन असे का म्हणाले ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 12/15/2018 - 08:14 नवीन
*रघुराम राजन असे वाचावे
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 12/15/2018 - 10:45 नवीन
टर्मिनॉलॉजी सब्जेक्टीव्ह आणि संधी आणि सत्तासाधू पण असू शकते. अगदी बरोबर. उगाच निवडणूक आयोगाला डोकेदुखी. पण रह्गुराम राजन असे का म्हणाले ? एखाद्या पक्षाने असे आश्वासन दिले व निवडून आल्यास जनतेच्या दबावामुळे पूर्ण करावे लागते अर्थात चूनावी जुमला म्हणून दुर्लक्ष करूही शकतात. पण तसे न करता आल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ,बँकांवर ,राज्यातील गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो आणि ही कर्जमाफी गरीब गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, असे राजन ह्यांचे मत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 12/15/2018 - 13:46 नवीन
हि उपरती आता झाली का?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/16/2018 - 08:43 नवीन
Sindhu defeats Okuhara to clinch maiden BWF World Tour Finals title बॅडमिंटनच्या World Tour Finalsमध्ये सुवर्णपदक पटकावून पी व्ही सिंधूने आपल्या मुकुटात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. हा मान पटाकावणारी सिंधू ही पहिलीच भारतिय खेळाडू आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 12/16/2018 - 15:34 नवीन
महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये ८ लाख बनावट लाभार्थी महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक अंगणवाड्यांमध्ये कमीत कमी ८ लाख बनावट लाभार्थी असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये एकूण ६१ लाख लाभार्थी आहेत. महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक अंगणवाड्यांमध्ये कमीत कमी ८ लाख बनावट लाभार्थी असल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये एकूण ६१ लाख लाभार्थी आहेत. पण यातील ८ लाख लाभार्थी बनावट आहेत, असं अधिकाऱ्याने सांगितलं. लाभार्थी आधारशी जोडले गेल्याने बनावट लाभार्थ्यांचा पर्दाफाश झाला आहे. प्रत्येक मुलासाठी केंद्र सरकार दिवसाला ४.८ रुपये आणि राज्य सरकार ३.२ रुपये अनुदान देतं. यामुळे देशातील नोंदणीकृत अंगणवाड्यांमधील बनावट लाभार्थ्यांची ओळख करून त्यांना हटवण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/8-lakh-fake-beneficiaries-in-maharashtra-anganwadis-says-woman-and-child-welfare-ministry/articleshow/67115451.cms
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/18/2018 - 10:06 नवीन
Top 10 List of Most Corrupt Political Party in the World 2018 बीबीसी न्यूजने प्रसिद्ध केलेली ही जगातल्या सर्वात जास्त भ्रष्ट १० राजकिय पक्षांची यादी पाहणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 12/18/2018 - 11:24 नवीन
नाव राखल पठ्ठ्याने गांधी कुटूंबाच . बिबिसीच्या पानावर फोटो व पक्षाच नाव दुसर्या नंबर वर !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 12/18/2018 - 12:45 नवीन
तुम्ही दिलेली १० भ्रष्ट राजकिय पक्षांची यादी जर पाहायला रोचक ठरणार असेल तर त्याच वेबसाईटने काही महिन्याआधी अश्याच एका सर्वेची, एक यादी दिली होती तर खालील यादी बद्दल तुमचे मत काय आहे ? -- Top 10 Most Corrupt Prime Minister In The World 2018 -- मला वाटते त्या bbc news hub ही वेबसाईटच्या सर्वेची विश्वासर्हता शून्य आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/18/2018 - 16:34 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचून जरासे जालोत्खनन केले तेव्हा तुमचे मत खरे असावे असेच दिसते.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 12/19/2018 - 01:07 नवीन
आजकाल आनंदोत्सव खुपच क्षणिक ठरतो आहे. घर फिरलं की वासे पण फिरायला लागतात. असो ...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/20/2018 - 08:57 नवीन
कोणताही झेंडा खांद्यावर घेतलेला नसल्याने, दणकून काहीही सोईस्कर ठोकून द्या असे मी करत नाही. (ती बातमी दुसर्‍यांना ताडून घेता यावी यासाठीच मीच दुवा दिला होता, हे नजरेतून सुटले का?) आणि त्याचमुळे, यदाकदाचित, जर स्त्रोतामध्ये गडबड आढळून आली तर, सत्य जाणून घेऊन त्या माहितीला चूक म्हणायलाही मला वाईट वाटत नाही ! हे पूर्वी सांगूनही झाले आहे आणि तुमच्यासारख्या विचारी माणसाच्या ध्यानात आले असेल असा अंदाज होता. तरीही, आडून आडून लेबले लावणार्‍यांच्या पंगतीत बसण्याची घाई केलीत, हे काही बरे दिसले नाही. असो, तुमची मर्जी. हे जग असेच मजेशीर आहे :)
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 12/20/2018 - 12:14 नवीन
खुलासा केलात ते छान केले. ... नोटेड. भविष्यात पुनवृती होणे नाही.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Wed, 12/19/2018 - 03:12 नवीन
सध्या Oasis च्या शोधात मिराजच जास्त दिसतात.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 12/21/2018 - 08:39 नवीन
तीन राज्यातील पराभवाने भाजपा चांगलाच जमीनीवर आणलाय. -- एकेकाळी बहुमताच्या व सत्तेच्या नशेत मित्रपक्षांकडे ढुंकूनही न पाहाणार्‍या, मोदी अ‍ॅंड कंपनीला आता तरी 'आमच्याशी युती करा' म्हणून त्याच मित्रपक्षांच्या हातापाया पडावे लागत आहे. असेच व्हायला हवे यांच्यासोबत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 12/21/2018 - 12:40 नवीन
शीत युद्धाच्या काळात पाकीस्तान, आमेरीका आणि चीन एका बाजूला असणे नवल नव्हते. आमेरीकन परराष्ट्रखात्याने झिया उल हक कालीन काही गोपनीय कागदपत्रे उघड केलीत , त्यात चीनची डिप्लोमसी कशी आकार घेते याचा अंदाज येण्यास मदत व्हावी. * US turned blind eye to Pakistan's nuclear programme in 70s after China's intervention: Documents -इकॉनॉमीक टाईम्स वृत्त
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/21/2018 - 13:20 नवीन
राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि परराष्ट्रमंत्री किसिंजर यांच्या कार्यकालात, (अ) कम्युनिस्ट चीनशी व्यापारी-आर्थिक संबंध सुधारणे व त्याला आपल्या पंखाखाली घेणे, आणि (आ) चीनला रशियापासून दूर ठेवणे, या दोन उद्येशांनी अमेरिकेने अनेक तात्कालीक स्वार्थी व अतर्क्य गोष्टी केल्या होत्या... त्या "पिंग पाँग डिप्लोमसी" म्हणून प्रसिद्ध आहेत. ते करताना त्यांनी चीनच्या अनेक कारवायांकडे डोळेझाक केली. त्यात युरोपियन देशांचाही हात होता, कारण, अणूइंधन व अणूबाँब बनविण्यासाठी लागणारी अनेक महत्वाची संवेदनाशील उपकरणे युरोपिय देशांतून, त्यांच्या माहितीने, खरेदी केली गेली. यामागे अमेरिकेची जगातील एकमेव सुपरपॉवर बनण्याची महत्वाकांक्षा होती. अमेरिकेच्या वरच्या दोन्ही उद्येशांचा पुरेपूर गैरफायदा घेत, चीनने ते मुद्दे अमेरिकेवरच उलटवले आहेत... (अ) चीनने, अमेरिकेच्या वरदहस्ताखाली न राहता, स्वतःची व्यापारी-आर्थिक भरभराट करून घेतली आहे, किंबहुना अमेरिकेशी आर्थिक-सामरीक टक्कर देण्याची महत्वाकांक्षा बाळगू शकेल इतकी क्षमता मिळविली आहे. (आ) USSRचे विभजन, पूर्व युरोपिय देशांना रशियन प्रभावाखालून मुक्त होण्यासाठी फूस देत असलेले पाश्चिमात्य देश, खालावलेली आर्थिक स्थिती, आणि सद्या ट्रंप सरकारच्या रशियाविरोधी कारवाय, या सगळ्यामुळे रशिया अमेरिकेवर नाराज होऊन चीनच्या गटात झुकत चालला आहे. एकंदरीत, अमेरिका तिच्या दोन्ही उद्येशांत असफल झाली आहे... तेल गेले, तूप गेले, हाती राहीले धुपाटणे, अशी तिची अवस्था झाली आहे. ब्रेकिंग न्यूज... ट्रंप यांनी सिरिया व अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेण्याची घोषणा केली आहे. १. सिरियातून सैन्य मागे घेणे म्हणजे, मध्यपूर्वेत पराजय स्विकारणे असे मानले जात आहे. आता तेथे, अगोदरच असलेला, रशिया आणि चीनचा प्रभाव अनिर्बंध होईल. २. अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेणे हा एक प्रकारे भारताचा विश्वासघात आहे. कारणे, गेली अनेक अमेरिकन प्रशासने भारताने अफगाणिस्तानमध्ये जास्त जास्त लक्ष घालावे यासाठी प्रयत्नशील होटी. भारताने अफगाणिस्तानमध्ये फार मोठी गुंतवणूकही केली आहे. ट्रंप यांचा हा आतताई निर्णय, खरोखरच पूर्णपणे अंमलात आला तर, जागतिक राजकिय पटलावर, लक्षणिय परिणाम करणारा ठरणार आहे. विशेषतः, आताच्या घोषणेप्रमाणे अफगाणिस्तानातिल १५.००० अमेरिकन सैनिकांपैकी निम्मे पुढच्या दोन महिन्यात माघारी बोलविले जाणार आहेत. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 12/21/2018 - 13:18 नवीन
शेवटी सर्वजण निर्दोष सुटले !!!!! आता काँग्रेस पुन्हा cbi भाजप चे बाहुले असल्या मुळे ह्या केस चा निकाल भाजप च्या मनासारखा लागला अशी बोम्ब मरायला मोकळी . काँग्रेस च्या काळात सुद्धा cbi अमित शाह व इतरांना दोषी ठरवू शकली नव्हती . सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता http://mtonline.in/fwF_CZ/dga via @mataonline: http://app.mtmobile.in
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/28/2018 - 08:45 नवीन

Dollar out - India, UAE to trade in their currencies

२५ डिसेंबर २०१८ रोजी भारत आणि संयुक्त अमिराती यांच्यामध्ये (अमेरिकन डॉलरमध्ये नाही तर) एकमेकाच्या चलनात व्यापार करण्याचा करार झाला. इराण व सौदी अरेबिया यांच्याशी मर्यादित प्रमाणात (मुख्यतः खनिज तेल खरेदी संबंधात) भारताने भारतिय चलवापरून व्यवहार या अगोदर केला आहे. पण, एकमेकाचे चलन वापरून सर्वसमावेशक व्यापार करण्याचा भारताने कोणत्याही देशाबरोबर केलेला हा पहिला करार आहे. अमेरिकन आर्थिक वर्चस्वाला (फिनान्शियल हेजेमोनी) हा एक धक्का आहे असे म्हणता येईल... व भारताच्या दृष्टीने, आपले आर्थिक महत्व अधोरेखित करणारी एक घटना ! सद्याचा भारत-संयुक्त अमिराती व्यापार सुमारे रु३,५०,००० कोटी (सुमारे $५० बिलियन) इतका आहे व दरवर्षी वाढत आहे. शिवाय, त्यांच्या परस्परांच्या देशांत अनेक लक्षणिय गुंतवणूकी आहेत व त्या दरवर्षी वाढत आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/28/2018 - 08:56 नवीन
Hunt for 'dog' given a 'bone' in Agusta case अगुस्ता वेस्टलँड खटल्यामध्ये दाखल केलेल्या एका पुराव्यात, The note thanks GH (Guido Haschke) for the lunch "yesterday", while saying "hope the dog liked the bone". असा उल्लेख आला आहे ! अर्थातच, ते 'हाड' म्हणजे काय आणि 'कुत्रा' कोण याबाबत उत्खनन सुरु झाले आहे ! मात्र, इतक्या खालच्या स्तरावर येऊन उल्लेख करावा असे ख्रिस्तियन मायकेलला वाटले, यावरून त्याच्याशी बोलणी करणार्‍या लोकांची काय पात्रता होती आणि अथवा कसे वागणे होते, याची झलक दिसल्याशिवाय रहात नाही ! :(
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 12/28/2018 - 09:07 नवीन
"hope the dog liked the bone". हे एका ब्रिटीश नागरिकाने लिहीलेले असल्याने त्याचे खास महत्व आहे ! भारतातल्या नागरिकांना कुत्रा संबोधणे ब्रिटीशांना काही विषेश नाही. फक्त त्यामुळे कृृृृतज्ञ कुत्राचा अपमान होतो हे ते लोक विसरतात!! त्यागी बंधु व वायुदलातले काही अधिकारी क्रिश्चन मिशेलच्या पे लिस्टवर अगोदरच असल्याने हे कुत्रा हे विषेशण कॉंग्रेस मधल्या उच्चपदस्थाबद्दल आहे ह्या बद्दल दुमत नसावे !
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/28/2018 - 09:30 नवीन
कोल्हा काकडीला राजी असे म्हणतात
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 12/28/2018 - 09:09 नवीन
हळु हळु भारतीय जनतेचे डोळे उघडोत ही प्रार्थना !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 12/28/2018 - 09:33 नवीन
"hope the dog liked the bone". -- मला वाटते कॉंग्रेसी नेते/समर्थकांची लायकीच ती आहे. मात्र कुत्र्यासारख्या इमानी प्राण्याची तुलना, घोटाळे व भ्रष्टाचारात बुडालेल्या कॉंग्रेसी नेत्यांशी करुन ख्रिस्तियन मायकेलने कुत्रा प्रजातीचा फार मोठा अपमान केला आहे.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Sun, 12/30/2018 - 09:01 नवीन
मिखाईल मामाचं आन मायेचं नाव काल पेप्रात आल्यापासनं माह्या पप्याला लै आनंद झाल्ता, त्यानं रातीला इटालियन पद्धतीनं बनिवल्येलं चायनीस खाऊ घातलं लोकहो. शत्रू चा शत्रू तो आपला मित्र असं जेव्हापासून त्येला कळ(व)लंय त्यो चायनीस काही सोडत न्हायी. बाकी आता कट्टाळा आल्यानं त्यानं रा(फेल) ची जी (रा)हुल उठावल्येली ती समदी बंद क्येली.
  • Log in or register to post comments
B
Blackcat (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/28/2018 - 09:42 नवीन
चार वर्षे भिक्षा मागून झाली, स्वच्छ भारत कर , जी एस टी , गैसचे कन्सेशन सोडा, आता ह्या महिन्यात----- वीज बिल माफ गुजरातेत, कर्ज माफीचा विचार सुरू. सातवे वेतन आयोग लागू कंत्राटी लोकांना पगारवाढ
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 12/28/2018 - 12:13 नवीन
काँग्रेसने देशाला कस लुटल ! निरव मोदी सारखे लुटेरे कसे निर्माण केले त्याचा व्हिडीयो सध्या वायरल होत आहे ! https://www.youtube.com/watch?v=zAsnJfJUpHU https://www.youtube.com/watch?v=t_v-mNT6A2k&t=8s २०१४ साली देश निवडणु कीला सामोरा जाण्याच्या काही दिवस अगोदर काँग्रेसला एक भन्नाट आयडीया सुचली ! देशातल्या नामी सोनार कंपनीना चोक करुन त्यांच्या मार्फत निवडणुक निधी निर्माण करण्याची आयडीया ! देशात दर वर्षी ५०० ट्न (५०० X १००० किलो = ५००,००० किलो ) सोन आयात केल जात. जर ह्या आयातीवर बंदी आणली तर सर्व सोनार ज्वेलर्स रस्त्यावर येणार. त्या दृष्टीने काँग्रेसने १० जुन २०१३ मध्ये चिदंबरम यानी सोन्याच्या आयातीवर बंदी आणली, त्या दरम्यान २०१४ च्या निवडणुकांची घोषणा झाली. त्या नंतर दहा दिवसात २१ जुन २०१३ ला सरकारने ( पक्षी चिदंबरम यानी ) ही सोन्याच्या आयातीवरची बंदी हटवली . त्या दहा दिवसात निवडणुकीला लागणारा पैसा काँग्रेसने उभा केला. नंतर नविन ८०:२० स्किम आणली. पुढे निरव मोदी सारखे लोक कसे निर्माण केले मलिकार्जुन खर्गेच्या समोरच भाजपाच्या खासदारांनी भा षण केल पण खर्गेच्या तोंडातुन एक शब्दपण आला नाही. काँग्रेसने देशाला कस लुटल हे जनतेला सांगण्यात भाजपाला अपयश आलेल आहे. आता तरी भाजप हे काम करेल !
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 12/28/2018 - 13:02 नवीन
NPS कि म्युच्युअल फंड्स?? शक्यतो म्युच्युअल फंड्स हे आपल्या भविष्यातील गरज ध्यानात घेऊन त्यावेळी अपेक्षित असलेली रक्कम ठरवून खरेदी केले जातात. अश्या गरजांपैकी महत्वाची अशी एक म्हणजे निवृत्ती वेतन! आता समजा ३० वर्षांनंतर निवृत्तीवेतन हवे असेल तर तर त्या वेळेच्या महागाईला पकडून जी लागणारी रक्कम आहे त्यासाठी आत्तापासूनच ठराविक गुंतवणूक करावी लागेल. पण म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीसाठी टॅक्स मधून काही सवलत मिळत नाही (ELSS सोडून) त्याशिवाय आता नफ्यावरती १लाख सोडून वरच्या रकमेवरती १०% कर आहे. मग जर फक्त निवृत्तिवेतनाचा विचार केला तर NPS फायद्याची आहे का? NPS मधल्या (tier १) गुंतवणुकीला ५०,००० पर्यंत करसवलत आहे. म्हणजेच ८०सी सेक्शन मधले दीड लाख सोडून तुमच्या उत्पन्नामधले अजून ५०,००० करमुक्त होऊ शकतात. याचा अर्थ जर कोणी २०% करपात्र उत्पन्न मध्ये असेल तर टॅक्समधून जाण्यापासून वर्षाला १०,००० वाचतील! आणि ३०% मध्ये असाल तर वर्षाला १५,००० वाचतील! पण आता समजा ३०वय असल्यापासून NPS सुरु केली आणि ६० वर्षांपर्यंत सुरु ठेवली तर ती म्युच्युअल फंड्स पेक्षा फायदेशीर होईल का? दुर्दैवाची गोष्ट अशी कि ६०वय असताना NPS पासून मिळणारी रक्कम हि पूर्णतः करमुक्त नाही! ६० व्या वर्षी जितकी रक्कम मिळेल त्यापैकी ४०% रक्कम करमुक्त असेल जी एकदम काढता येईल, उरलेली रक्कम annuity मध्ये गुंतवावी लागेल आणि त्यावर जेव्हा पेन्शन मिळायला सुरुवात होईल त्या रकमेनुसार कर आकारला जाईल. पण NPS ही म्युच्युअल फंड इतकी फ्लेक्सिबल नाही आणि परतावा अंदाजे ९-१०% दरम्यान देऊ शकते. म्युच्युअल फंड्स ची परतावा देण्याची क्षमता ११-१५% पकडता येईल (३०वर्षे पकडून) मग या दोहोंमध्ये कोणता पर्याय जास्त उपयोगाचा वाटतोय? दोन्ही बद्दल कोणाला अधिक माहिती असेल किंवा वरती दिलेल्या माहितीत काही चुकी असेल तर भर घालावी! (हे प्रश्न/माहिती टाकायला योग्य धागा सापडला नाही म्हणून इथे टाकावा लागला, वाटल्यास योग्य ठिकाणी हलवावा.. )
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Mon, 12/31/2018 - 20:24 नवीन
मी याच्यावर बराच अभ्यास केला. अर्थात मी कुणी नोंदणीकृत सल्लागार नाही आणि लाखो रुपये अक्कलखाती टाकून माझ्या स्वतःसाठी असा प्लॅन तयार केला. मी चार वर्षापुर्वी एनपीएस खातं (दोन्ही टिअर) उघडलं. आणि डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅन्स पकडून म्युच्युअल फंड्स सात वर्षापासून सुरू आहे. अनेक गोष्टींचा विचार केल्यावर माझे खालील निश्कर्ष आहेत. १. शॉर्ट टर्म (०-५) आणि लाँग टर्म (५-१५) गोल्स साठी म्युच्युअल फंड (डेट, बॅलेन्स्ड आणि इक्विटी) २. निवृत्तीसाठी एनपीएस सर्वात चांगले. हा प्लॅन इवॉल्व होत आहे. वीसएक वर्षांनी खूप मचुअर्ड इन्स्ट्रूमेंट होईल. पारदर्शकता आणि आकारण्यात येणारं शुल्क हे म्युच्युअल फंडापेक्षा सरस आहे. इतर त्रुटी आहेत पण त्या माझ्यासाठी तितक्याश्या महत्वाच्या नाहीत. उ.दा. अ‍ॅन्युऐटी, पेन्शनवर लागणारा कर, निर्गुतवणुक, जास्तित जास्त इक्विटी एक्स्पोजर, पीओपी आणि फंड मॅनेजर बदल वगैरे. ३. सगळे म्युअच्युअल फंड्स डायरेक्ट करा. मी किमान पाच एजंटांकडून रेग्युलर प्लॅन्स घेतले आहेत. आपण केलेल्या गुंतवणीवर यांचे कमिशन ठरले असते आणि मिळणार्‍या परताव्यावर नाही. रेग्युअलर घ्यायचा असेल तर स्मॉल कॅप आणि मिडकॅप घ्या. ४. पारदर्शकता माझ्यासाठी महत्वाची आहे. इथेच मिपावरच्या ओळखीने (माझ्याच मुर्खपणाने) अडीच लाखाचं शेअर्समध्ये लुस्कान झालयं (ते साडेतीन टक्के नाही :) ). त्यामुळे पिएमस माझ्याकडून बाद. अजून खूप लिहू शकतो पण या चार गोष्टी महत्वाच्या.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/01/2019 - 07:11 नवीन
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) बद्दल सोप्या शब्दात माहिती वाचण्यासाठी खालील दुवा पाहावा https://cleartax.in/s/nps-national-pension-scheme
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/01/2019 - 07:17 नवीन
दुर्दैवाची गोष्ट अशी कि ६०वय असताना NPS पासून मिळणारी रक्कम हि पूर्णतः करमुक्त नाही! आता जी ६० % रक्कम आपण काढू इच्छिता ती आता करमुक्त केली आहे. https://www.thehindubusinessline.com/markets/eee-tax-status-will-encourage-retail-participation-in-nps-says-pfrda-chief/article25719388.ece
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 12/28/2018 - 15:56 नवीन
दीड शहाण्यांपैकी ( ०.५,०.५,०.५ ) एकजण सुधारायचा प्रयत्न करत आहे. https://www.google.co.in/amp/s/www.financialexpress.com/economy/no-more-12-18-gst-slab-heres-what-fm-jaitley-says-could-happen/1423773/lite/
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/28/2018 - 16:02 नवीन
He said that India will eventually have a standard tax rate, which can be created by merging 12% and 18% tax rates, for commonly used goods. However, this does not mean a single GST rate. Essential items will continue to be taxed at 0% and 5%, while luxury, sin and demerit goods will attract a higher tax rate.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 12/28/2018 - 16:36 नवीन
सुधारायचा प्रयत्न करत आहे. अनेक स्लॅब असताना 'one nation one tax' म्हणणारे ,एक स्लॅब कमी करून चूक सुधारत असतील तर त्याचे स्वागत करायला हवे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 12/29/2018 - 07:37 नवीन
CBI wanted to implicate netas in Sohrabuddin Shaikh case, says special court Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/67294716.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst भाजपाच्या नेत्यांना अडकवण्यासाठी काँग्रेस कोणत्या थराला गेलेली ह्याचा उलगडा आता कोर्टाला झालेला आहे. श्री अमित शहा यांना तडीपार म्हणुन हिणवणार्या लोकांच्या तोंडावर जबरदस्त चपराक कोर्टाने मारलेली आहे. गॅंग वॉर मध्ये मारला गेला गुंड काय किंवा आग लागलेली असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवायला जाताना मारला गेलेला अग्निशमन दलाचा जवान एकाच पातळीवर आहेत असे समजणार्यां लोकांच्या डोक्यात क धीही प्रकाश पडणार नाही !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 12/29/2018 - 07:44 नवीन
CBI हा काँग्रेसचा बोलका पोपट होता हे वेळोवेळी सिद्ध झालेल आहे. त्यामुळेच काँग्रेसवर दाखल केलेल्या प्रत्येक गुन्ह्याच्या तपास कामात अक्षम्य दिरंगाई झालेली आहे. सर्व केसेस मध्ये सर्व आरोपी सुटलेले आहेत. अपवाद आता शिक्षा मिळालेल्या सज्जन सारख्यांचा. त्यात ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेता जगदिश टायटलर सारख्याला शिक्षा मिळालेली नाही.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 12/29/2018 - 19:00 नवीन
ट्रेन18 च्या धमाकेदार आगमनानंतर आता ICF Chennai नविन रेल्वे ची भेट घेउन आलेली आहे ! ट्रेन18 ही 180 Km/Hr च्या स्पीड ने जाणारी पहिली संपुर्ण भारतीय बनावटीची (under Make in India) रेल्वे आहे. DRDO ने रेकॉर्ड वेळेत ट्रेन18 ची टेस्टींग पुर्ण केलेली आहे . ट्रेन18 आता आपली सेवा द्यायला तत्पर आहे. भारतात सध्या प्रत्येक मोठ्या शहरात मेट्रो च काम चालु आहे आणी त्यासाठी लागणारी मेट्रो रेल्वे ही परदेशातुन आयात केली जाते. ट्रेन18 ही या मेट्रो रेल्वेपेक्षा जास्त Advanced आहे त्यामुळे मेट्रो रेल्वे सुद्धा ICF ला बनवणे शक्य होणार आहे . सध्या मुंबई व दिल्लीत EMU लोकल ट्रेन चालवल्या जातात. वातानुकुलीत लोकल ट्रेनला बर्याच वर्षाची मागणी होती. ICF ने ह्या दोन शहरांकरता दोन वेगवेगळ्या EMU तयार केलेल्या आहेत व त्यांची टेस्टींग फेब्रुवारी मध्ये पुर्ण होईल. Make In India स्किमची ही मोठी देणगी आहे. एका Visionery Leader मुळे प्रगती कशी साध्य होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. https://youtu.be/Dn-sTe1o-hE
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 12/30/2018 - 14:52 नवीन
मध्यप्रदेशात कॉंग्रेसच पितळ अखेर उघड पडलच !! लाखो शेतकर्यांना कर्ज माफीच गाजर दाखवल, आता फक्त ८०० शेतकर्यांची कर्ज माफ होणार आहेत म्हणे !!! मध्यप्रदेशात व राजस्थानमध्ये कॉंग्रेस युरीयाचा घोटाळा करायला बघत आहे अशी बातमी आहे !!
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sun, 12/30/2018 - 16:55 नवीन
मध्यप्रदेशात कॉंग्रेसच पितळ अखेर उघड पडलच !! लाखो शेतकर्यांना कर्ज माफीच गाजर दाखवल, आता फक्त ८०० शेतकर्यांची कर्ज माफ होणार आहेत म्हणे !!! असं कर्नाटकात झालं असं कोणीतरी फेकतेय,आणि तुम्ही खुशाल ते म. प्र. मध्ये आणून टाकताय.
  • Log in or register to post comments
ग
गब्रिएल Sun, 12/30/2018 - 17:09 नवीन
In Madhya Pradesh, police had to be deployed for distribution of urea in Vidisha on Friday, while they resorted to lathicharge in Shivpuri and Raisen districts after desperate farmers turned unruly.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 12/30/2018 - 19:39 नवीन
असं कर्नाटकात झालं असं कोणीतरी फेकतेय कर्नाटक राज्य सरकारनेच मान्य केलंय की फक्त ८०० शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा फायदा झाला. कर्नाटक सरकारचा हे फेकण्यात काय फायदा असावा बरं? बाकी अश्या कर्जमाफीमुळे मप्र सकट इतर ३ राज्यांमध्ये काय होणार आहे ते बघा. मध्य प्रदेश मधील एनपीए २४% वाढला आहे. आता आश्वासन दिलंय पण ते पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणणार? म्हणून आता इतर योजना म्हणजे ५ एकर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त २०० रुपयात वीज दिली जायची किंवा आदिवासी लोकांना वैद्यकीय सुविधा तसेच तेथील मुलांना शालेय शिक्षण देण्याची योजना अश्या अजून काही योजना बंद करण्यात येणार आहेत. बाकी युरियाचा काळाबाजार चालू झालाच आहे, पोलीस शेतकऱ्यांवर लाठीमार सुद्धा करत आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/01/2019 - 08:44 नवीन

इथे जीएसटीबद्दल काही समजूतीने किंवा गैरसमजूतीने अज्ञानमूलक टीप्पण्या आल्या आहेत म्हणून थोडे काही...

एखाद्या चांगल्या गोष्टीचे अज्ञानाने किंवा स्वार्थी हितसंबंधासाठी मातेरे करण्यात आपण भारतियांचा हात जगात कोणी धरू शकणार नाही. आपला असा खाक्याच आहे की... "भले माझा बंगला मोडला तरी हरकत नाही पण मी विरोधकाची झोपडी जाळणार !" १. आतापर्यंत सर्व माध्यमांत झालेल्या चर्चेनंतर, "वन नेशन वन टॅक्स" म्हणजे "देशात होणार्‍या सर्व विक्रिवर एकच करदर" या विरोधकांनी केलेल्या चलाख टीपण्णीला कोणी व्यक्ती अजूनही बळी पडत असली तर, ती धन्य आहे ! कारण, देशात होणार्‍या सर्व विक्रिवर एकच करदर असणे व्यवहार्य नाही आणि म्हणून तसा 'वेडा महमुदी कायदा' जगात कोणत्याही देशात केलेला नाही. तांदूळ-डाळ-तेल यांचा आणि एसयुव्ही गाड्यांवरचा करदर समान असावा असे कोणाला वाटेल काय?! जीएसटी संबंधात, "वन नेशन वन टॅक्स" याचा अर्थ, "एकाच वस्तूच्या विक्रिवर, अनेक नावांखाली व अनेक (स्थानिक, राज्य व केंद्र) प्रशासनांव्दारे वसूल केले जाणारे अनेक करदर * जाऊन, त्याऐवजी दर वस्तूवर संपूर्ण देशात एकच करदर लागू करणे, असा आहे. * : जीएसटी अगोदरचे करः State VAT, Central Sales Tax, Luxury Tax, Entry Tax (all forms) , Entertainment and Amusement Tax (except when levied by the local bodies), Taxes on advertisements Purchase Tax Taxes on lotteries betting and gambling State Surcharges and Cesses so far as they relate to supply of goods and services Central Excise duty Duties of Excise (Medicinal and Toilet Preparations) Additional Duties of Excise (Goods of Special Importance) Additional Duties of Excise (Textiles and Textile Products) Additional Duties of Customs (commonly known as CVD) Special Additional Duty of Customs (SAD) g. Service Tax Central Surcharges and Cesses so far as they relate to supply of goods and services. etc. (मद्य, वीज, पेट्रोल, इत्यादीसारख्या राज्यसकारांच्या विरोधामुळे जीएसटीत सामील न केलेल्या गोष्टी सोडून) कोणत्याही एका गोष्टीच्या विक्रिवर, यापैकी लागू असलेले सर्व कर जाऊन, आता फक्त जीएसटी हा एकच करदर लागू झाला आहे. २. जीएसटीसाठी भरायच्या फॉर्मबाबतही असाच गदारोळ हितसंबधियांनी ऊडवून दिला होता. एका वर्षात, "जीएसटीसाठी भरायला लागणारे फॉर्म्स" आणि "वरच्या अनेक करांमधील लागू असणार्‍या करांसाठी भरावे लागणारे एकूण फॉर्म्स" यांची तुलना करण्यासाठी व त्यांत कोणती व्यवस्था जास्त सोईची आहे, हे सांगायला, सीएची गरज नाही. याशिवाय, 'अनेक करसंकलन विभागांतील निरिक्षकांकडे प्रत्यक्ष फेर्‍या मारण्याऐवजी', 'फक्त एकाच (जीएसटी) कराचा ऑनलाईन भरणा करण्यात' करदात्याचा किती फायदा आहे हे सांगायलाही फार हुशारीची गरज नाही. अर्थातच, जीएसटीविरुद्ध खालील लोकांचा विरोध अपेक्षित होता... (अ) राजकारणाने प्रेरीत विरोध करणारे (आ) एकाच कराच्या आणि त्यातही ऑनलाईन करसंकलनामुळे, ज्या बर्‍याच मध्यस्तांची दुकाने हळू चालू लागली किंवा बंद झाली ते दलाल, करतज्ज्ञ, इ (इ) अवैध कारवाया करून कर चुकवणारे लोक, ज्यांच्या कारवायांवर मोठी बंधने आली व त्यांना करचुकवणे कठीण झाले राजकिय विरोधक व अवैध कारवायांत सामील असणारे लोक गदारोळ करणारच. शेवटी भारत लोकशाही राष्ट्र आहे, इथे चोरालाही उलट्या बोंबा मारायची परवानगी असते!!! ;) :) ३. जीएसटीच्या दरांत बदल होत राहणे... कोणत्याही करप्रणालीत तिच्या पहिल्या पाच वर्षांत, लोकांच्या मागण्या आणि नवीन करप्रणालीचा अनुभव यावर आधारीत, जास्त वेळा बदल होतात. त्यानंतरही, ठराविक काळाने, करप्रणालीला बदलत्या स्थितीशी जास्तीत जास्त व्यवहार्य ठेवण्यासाठी बदल केले जातातच. कारण, कोणतीही करप्रणाली देवाचा शब्द नसते, की जी लोकांच्या भल्याकरताही बदलली जाऊ शकत नाही... ती एक लोकाभिमुख व लोकांच्या भल्यासाठी केलेली व परिस्थितीनुसार बदलणारी व्यवस्था असणे अपेक्षित असते. असे करताना... (अ) सुरुवातीला करदर जास्त ठेवून नंतर तो योग्य पातळीपर्यंत खाली आणणे आणि (आ) सुरुवातीला करदर कमी ठेवून नंतर तो वाढवत जाणे या दोनपैकी कोणता पर्याय लोकांच्या जास्त पचनी पडेल, हे सांगायला फार मोठ्या हुशारीची गरज नाही. कोणत्याही सरकारने (आता बोंबा मारणारे पक्ष सत्तेत असते तर त्यांनीही) पहिला पर्यायच निवडला असता. मात्र, "भारतिय जनतेला उल्लू बनवणे आपल्या डाव्या हाताचा मळ आहे" असा ठाम विश्वास असल्याने, "बघा, बघा, कसे पटापट करदर बदलत आहेत. जीएसट फेल गेली." असा विनोदी प्रचार करण्यात विरोधकांना, जनाची आणि मनाचीही, काहीच वाटत नाही. आताश्या, याचे आश्चर्य वाटणे बंद झाले आहे. :( वरची विधाने पटत नसणार्‍यांनी, दुसर्‍या एका भारतिय करकायद्यात, "आयकर कायदा (IT Act 1961)" मध्ये, कधी व किती फेरबदल (अमेंडमेंटस) केले गेले आहेत याची तपासणी केली तर, चक्कर यायला लागून, मुद्दा लगेच स्पष्ट होईल ! :) असो. अपप्रचार करणार्‍यांना हे माहित नसेल, असे नाही. पण, ते त्यांचे हितसंबंध साधण्यासाठी अपप्रचार करत रहाणारच, शेवटी, भारतात लोकशाही आहे ! म्हणून, त्यांच्यासाठी हे पालथ्या घड्यावरचे पाणी ठरणेच अपेक्षित आहे. मात्र, ज्यांना खरी वस्तूस्थिती जाणून घ्यायची आहे त्यांच्या करिता हा लेखनप्रपंच !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/01/2019 - 11:54 नवीन
एक कांचन गुप्ता म्हणून कुणाचे ट्विट वाचनात आले : हे नेमके काय प्रकरण आहे कुणास ठाऊक आहे का ? In 2006 eight Indian officials were allegedly paid $18.5 million in 'bribes' by an Ukrainian oligarch on behalf of Boeing to access titanium. This @nytimes expose should have caused ripples in Govt. But everybody's busy promoting himself/herself on SM. Why bother?
धाग्याची तारीख संपली पण वेगळा एकोळी धागा टाकण्या पेक्षा इकडेच टाकतोय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा