चालू घडामोडी - डिसेंबर २०१८
सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय.
परराज्यातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेनेनेही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, (किंवा अनेकजण शिवसेनेच्या बॅनरखाली स्वतः निवडणूक लढवत आहेत). अशाच एका उत्साही उमेदवाराच्या मिनिट्रकवर लावलेले हे प्रचारचित्र.
पण काय आहे कि या देशाचे सर्वच नागरिक सदोदित अहिंदूंबद्दल तिरस्कार बाळगू शकत नाहीया विधानाचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध आहे? जर तुम्हाला चर्चा त्या दिशेला न्यायची असेल तर जरा खऱ्या धार्मिक "दंगली" कधी झाल्या आणि त्यावेळेला कोणती सरकारे होती याचा शोध घ्या. सध्या होणाऱ्या जमावाने मारहाण करण्याच्या घटना म्हणजे दंगली नव्हेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात हे वारंवार सिद्ध झालं आहे की हिंदू हे अहिंदूंचा द्वेष करत नाहीत तर अहिंदूंच हिंदूंचा द्वेष करतात. मुस्लिम असो वा ख्रिश्चन विविध मार्गाने हिंदूंना बाटवण्याचे प्रकार कोण करतं? किती हिंदू इतरांना हिंदू बनवण्यासाठी नसत्या उठाठेवी करतात? एवढं होऊनही दुर्दैवाने हिंदूंना अजूनही जाग येत नाही. आपले वर्णन करायला परधार्जिणे हा योग्य शब्द आहे. वर्षानुवर्षे हिंदू इतर धर्मियांचे सण अगदी उत्साहाने साजरे करत आले आहेत. पण मुस्लिम व ख्रिश्चन आपली दसरा दिवाळी किंवा पाडवा साजरा करताना किती दिसतात? कधी दाखवण्यापुरते केले तर लगेच त्याचा उदोउदो होतो. काय बोलणार? जिथे मुस्लिमांच्या आक्रमणाविरुद्ध तेव्हाचे हिंदू राजे एकत्र येऊ शकले नाहीत. निदान एका प्रदेशात मुस्लिम आक्रमण झाल्यावर तिथली आणि तिथल्या लोकांची, विशेषतः स्रियांची, काय अवस्था झाली हे कळूनही इतरांना एकत्र येण्याची उपरती झाली नाही. ते आपल्या डीएनए मध्येच आहे त्यामुळे बदल होणे अवघड आहे.या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द काँग्रेसच्या राजवटीत गेली.म्हणूनच तर, ज्यांना तुलना करता येते त्यांनी ती करावी. फक्त अशांतता आणि दंगलींच्या फूटपट्टीवर बघितलं तरी काँग्रेसचा परफॉर्मन्स वाईट आहे. प्रगतीचं म्हणाल तर मी म्हणेन कि देशात यादवी माजू दिली नाही आणि बेअर मिनिमम प्रगती एवढंच काँग्रेसचं श्रेय म्हणता येईल. गरिबी हटाव चा नारा पहिला कधी दिला गेला बघा आणि नंतर ती हटवण्यासाठी काँग्रेसने काय प्रयत्न केला? पायाभूत प्रकल्पांचं महत्व यासाठी आहे कि त्यातूनच रोजगार निर्माण होतात तसेच त्या भागात प्रगती पण होते. सुवर्ण चतुष्कोन साठी वाजपेयी का यायला लागले? नदी जोड प्रकल्प १९७० पासून संशोधन होत असूनही ठोस काही व्हायला परत वाजयेयीच यायला लागले. पुढची १० वर्षे परत प्रकल्प बासनात गेला आणि मग आता मोदी आल्यावर देशांतर्गत जलवाहतूक पण सुरु झाली? मुळात प्रश्न काँग्रेस का भाजप यापेक्षा काँग्रेस म्हणजे राहुल गांधी... त्याच्यात पंप्र होण्याचे काय गुण आहेत? जाऊदे, प्रत्येकाचा आपला आपला दृष्टिकोन असतो. काहींची आवड राहुल गांधी असेल तर काय करणार? प्यार मे गधीभी परी लागती है अशी एक म्हण आहे.