Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

तुळजा भवानी - घाणीतले कमळ

व
विटेकर
Fri, 11/09/2018 - 03:28
🗣 67 प्रतिसाद
चंद्रपूर हे शहर जसे कोळश्याच्या निखाऱ्यावर आहे तसे तुळजापूर हे शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभे आहे ! आणि हा अनुभव मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेत आहे! प्रशासनापेक्षा मला तुळजापूरकरांचे आश्चर्य वाटते , याच घाणीत ते नांदतात, संसार होतात, लेकरं मोठी होतात ! कुणाला काही काही वाटत नाही ! ती जगज्जननी मात्र या साऱ्या कोलाहळापासून शेकडो मैल दूर आहे ! ती यात आहे पण आणि नाही पण ! तिच्या त्या दोन - अडीच क्षणांच्या दर्शनासाठी हे सारे सहन करायचे ! त्यातून आपली ऊर्जा साठवायची ! देवाचिया द्वारी उभा क्षणभरी । तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।। यावर्षी एक नवीन प्रकार ! प्रत्येक दर्शनार्थी ला तिकिटाची सक्ती आहे , विनाशुल्क आहे पण अनिवार्य आहे . पण त्यामुळे पूर्वी मंदिरात, केळाच्या साली , कागदाचे कपटे, तेलाच्या रिकाम्या बाटल्या या कचऱ्यामध्ये आता या तिकिटाच्या कपत्यांची भर पडली ! भाविक लोकांचा स्वच्छतेचा सेन्स अफाट आहे अगदी दर्शनाच्या बारीत देखील लोक पान खाऊन थुंकले आहेत ... केळाच्या साली , चॉकलेटचे रॅपर, प्लास्टिक च्या पिशव्या, आणि असंख्य कागदाचे कपटे त्या संपूर्ण दर्शन रांगेत पसरले आहेत, गेल्या २ आकटोबर नंतर तिथे झाडू फिरला नसावा ! दर्शनाच्या बारीची ही कथा तर अभिषेकाची वेगळीच ! रात्री पावणेबारा पासून अभिषेकाच्या पाससाठी उभा आहे , अभिषेक पास किती वाजता मिळणार याबाबत वाचमन आणि अन्य स्टॅफ यांच्यात प्रचंड मतमतांतरे आहेत, कोण म्हणतो १ वाजता , कोण म्हणतो ३ वाजता ! अभिषेक पहाटे ५ पासून सुरू होणार ! प्रशासनाने कोठेही कसलाही फलक लावलेला नाही , माहिती सांगण्यासाठी कोणीही अधिकारी व्यक्ती उपलब्ध नाही , आपल्या क्षेत्र पुजाऱ्याने जी माहिती दिली , त्याआधारे आम्ही रांगेत उभे आहोत ! आम्हाला आता तिकिट मिळाले , रात्री १ वाजून १० मिनिटानंतर ! आम्हां चौघांचे फोटो काढले आणि दोन पास दिले ! सिस्टीम चांगलीय पण रात्री १ वाजता ज्यांना अभिषेकाला यायचे आहे त्या सर्वांनी तिथे उपस्थित रहायचे ??? काय हा अन्याय ! ,आम्ही दिवसभर पुण्यातून गाडी हाणत पोचलोय , थकलोय, आता रात्री विश्रांती होणार नाही , उद्या सकाळी मंदिरात जायचे आहे अभिषेकासाठी ! आमचे जाऊदे, आबालवृद्ध या अभिषेकाच्या रांगेत आहेत .. त्या सगळ्यांची हीच स्थिती आहे ...मुकी बिचारी कुणीही हाका ! अभिषेक फक्त १००० होणार , आत्ताच रांगेत तितके लोक आहेत म्हणजे यानंतर येणाऱ्या कोणालाही आज पहाटे अभिषेक करता येणार नाही ! असले तुघलकी निर्णय कोण घेते ? पूर्वी पुजारी मंडळींचा खूप उपद्रव असे , अतिरिक्त पैसे घेऊन ते लोकांना अभिषेक रांगेत लोकांना घुसवत असत ! त्याला चाप बसावा म्हणून कदाचित हा उपाय योजला असावा ! पण हे तर व्याधीपेक्षा औषध जालीम झाले ! मला शंका आहे की मंदिर व्यवस्थापनाचा पुरेसा अभ्यास केलेले आणि अनुभव असणारे लोक निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात का? मंदिरातील आणि आसपासच्या गल्ल्यांच्या स्वच्छतेचे दायित्व कोणाचे आहे ? या सगळ्याची तक्रार कोणाकडे करावी ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23870 views

🗣 चर्चा (67)
य
यशोधरा Sun, 11/11/2018 - 16:30 नवीन
काल लेख वाचताना गोंदवल्याचीच आठवण आली होती.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 11/11/2018 - 18:06 नवीन
अज्ञानातच सूख असते .... मी एकपण शनिवार किंवा एकादशी किंवा पौर्णिमा , संध्याकाळी घरी राहू शकत नाही... या एखाद्या शनिवारी... (गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांच्या त्रासाने गांजलेला) मुवि
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Sun, 11/11/2018 - 16:40 नवीन
देवी देवळातुन बाहेर येऊ शकत नाही कचरा उचलायला. रोज हजारो लोक जातात तीथं. प्रत्येकाचा १ थेंब आणि १ कण म्हटले तरी गांवभर घाण होते. ती घाण करायची येणारांनी वर अपेक्षा गावातले लोक ते साफ करतील. प्रशासन करेल. हे सारं लिमीटेड मधे होतही असेल, परंतु अपेक्षित पेक्षा कमी प्रमाणात आहे. त्यापेक्षा जाणारांनी स्वतः मुळे कसलाच कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण तुम्ही केलेली घाण साफ करायला तिथले लोक वा प्रशासन तुमचे आईबाबा नाहीत, आणि बाहेरून दर्शन घेण्यासाठी येणारे कुक्कुल बाळ नाहीत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 11/11/2018 - 16:49 नवीन
गावातल्या लोकांनी देवस्थानात होणारा कचरा साफ करावा असे कुठे लेखात लिहिल्याचे दिसत नाहीये, पण काही दर्शनार्थी रांगेत उभे राहून घाम करतात, लोक मंदिर परिसरात थुंकतात हे तर खरेच आहे. ह्यावर मंदिर प्रशासनाने (असे प्रशासन असल्यास) काही ठोस उपाययोजना करायला हवी, असे वाटते. तुळजापूरकर ग्रामस्थांनी मंदिर प्रशासनावर दबाव आणता येईल का? आपले गाव, आपल्या गावातले दैवत, त्या आसपासचा परिसर हे चांगल्या स्थितीत असावे, ह्यासाठी असा दबाव गट निर्माण करू शकतील तर उत्तम.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sun, 11/11/2018 - 17:05 नवीन
लेख आणि अभिजित यांचे डायलॉक दोन्ही भारी. अजूनही विचार करतोय.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 11/12/2018 - 03:29 नवीन
मिपाकर म्हणजे सुशिक्षित जमात असं मी तरी समजतो !!!! तर अशा या सुशिक्षित लोकांनी डोंगर दऱ्या मध्ये भटकावे , परदेशी पर्यटन करावे , अगदीच थोडंस म्हणलं तर सायकलिंग करावी . एकमेकांचे पाय खेचत राजकीय विषयांवर वाद घालावेत . थुंकत असतील लाईन मध्ये थांबणारे !! गावंढळ आहेत ते !!!!!! जाऊ द्या आपल्याला काय करायचे ? आपण सुशक्षित आहोत ना ? मस्त पैकी कुटुंबाबरोबर निसर्गविहार करावा , जाताना वेगवेगळे खाद्यपदार्थ ज्या प्लास्टिक ब्याग्स मध्ये प्याक करून नेले होते त्या आणि पाण्याच्या बाटल्या मनसोक्तपणे निसर्गा मध्ये उधळण करत याव्यात , जमलंच तर बियर च्या बाटल्या / कॅन पण टाकावेत . घरी आल्या नंतर पुन्हा आंतरजालावर स्वच्छ भारत या विषयावर मोठे लेख लिहायला घ्यावेत = )
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 11/12/2018 - 05:19 नवीन
आहेतच. सगळ्यांना लिहिता वाचता येते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 11/12/2018 - 07:46 नवीन
इयत्ता चौथी शिकलं तरी लिहता वाचता येत हो !! पण असलं काय कामाचं ? जर उच्च शिक्षित जमात प्लास्टिक बंदी ला मनापासून विरोध करून हाणून पाडत असेल तर गावंढळ लोकांना काय समजवणार ? मंदिरात व त्या गावा मध्ये घाण करणाऱ्या भक्तात आपणच असतो , आणि ती घाण वाढवायची नसेल तर जाऊ नये तिकडे , आपोआप घाण कमी होईल .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/12/2018 - 08:20 नवीन
मूळ श्रेणी तीन आहेत. १) साक्षर- ज्यांना अक्षर ओळख आहे आणि जे थोडे फार लिहू वाचू शकतात २) सुशिक्षित-- ज्यानी चांगले शिक्षण घेतले आहे. लौकिकार्थाने पदवीधर द्विपदवीधर त्रिपदवीधर इ आहेत. ३)सुसंस्कृत -- ज्यांच्या वर चांगले संस्कार झाले आहेत. (ता. क. -- याचा आणि शिक्षणाचा किंवा आपण राहतो कुठे नि किती पैसे मिळवतो संबंध नाही) यामुळेच भरपूर शिकलेले किंवा श्रीमंत लोक यांचा त्यांच्या वागण्याशी काहीही संबंध नसलेला आपण पाहत असतो. याउलट अशिक्षित/ निरक्षर लोक अत्यंत सज्जनपणे वागत बोलताना आढळतात.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/12/2018 - 05:38 नवीन
१) एखाद्या छोट्या गावात किती लोक बाहेरून येऊ शकतात याच्या मर्यादेवर साधे गणित आहे. तेच गणित दिल्लीला केजरीवालने वापरले होते पण लोकांनी विरोध केला. सम / विषम तारखांना त्या नंबरप्लेटवाल्यांनी शहरात यायचे. पण यातही अडचणी आहेतच. २) दुसरा एक उपाय म्हणजे याच देवतेच्या दुसऱ्या एका गावातल्या देवळात जाण्याचा परिपाठ ठेवणे. ३) फार न पटणारा जालीम उपाय - कुलदैवतच बदलणे. शेवटी आपली सोय आणि सहजता याची सांगड घालणे हा व्यवहारी उपाय.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/12/2018 - 05:59 नवीन
श्री देवी तुळजा भवानीच्या मंदिरात प्रवेशासाठी रुपये ५०( रु १०० लावले तरी चालेल) प्रवेश शुल्क लावावे. कोणतीही सोय फुकट मिळत नाही याची सामान्य जनतेस सवय लावणे आवश्यक आहे. फारतर पिवळे रेशन कार्ड घेऊन आल्यास रुपये १५ प्रवेश शुल्क लावा. उगाच गरिबीच्या नावाने दुहाई देणे बंद केले पाहिजे. सामान्य शेतमजुरांस विड्या दारू पिण्यासाठी पैसे असतात तेंव्हा सामान्य गरीब लोकांचे उमाळे न काढता सरसकट पैसे लावले तरच स्वच्छता आणि पावित्र्य यासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल. सर्वत्र सी सी टी व्ही लावा. कोणीही थुकताना दिसला केल्याच्या साली टाकताना दिसला तर सरळ रांगेतून बाहेर काढून त्याने केलेली घाण स्वच्छ करेपर्यंत प्रवेशास बंदी. एकदा नियमाची अंमलबजावणी कडक होते आहे असे जाणवले तर भाविक लोक सुद्धा आपोआप सरळ होतील. शेवटी कितीही काथ्याकूट करा शिस्तीचा बडगा नसेल तर काहीही होणार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 11/12/2018 - 10:03 नवीन
गुटख्यावर महाराष्ट्रात टोटल बॅन आहे (मिळतो सर्वत्र ही गोष्ट वेगळी) मंदीरात जाताना प्रवेशद्वारापाशीच कर्मचारी तंबाखू, मावा जप्त करतात. तिथली बुट्टी भरलेली असते तंबाखू पुड्यांनी. ह्याउप्पर थुंकणार्‍याला ५०० काय ५०००० दंड करावा जागीच. पण मंदिरात प्रवेश शुल्क नको. खिशात अडका नसताना चालत येणारे भाविक पाहिलेले आहेत. त्यांच्यावर अन्याय नको. मंदीराच्या दानपेटीतून भाविकासाठी सुधारणा करायला भरपूर पैसा आहे तो वापरावा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/12/2018 - 13:47 नवीन
फारतर पिवळे रेशन कार्ड घेऊन आल्यास रुपये १५ (अगदी पाच रुपये लावा). प्रवेश शुल्क लावा. फुकट गोष्टींची किंमत नसते हि वस्तुस्थिती आहे. मग तो अत्यंत गरीब माणूस असला तरी. आणि देवस्थानची स्वच्छता ठेवण्यासाठी अतिरिक्त शुल्क लागू केले कि हे उत्पन्न कुणाचे यावर न्यायालयात वर्षानुवर्षे चालू असलेला वाद मध्ये येण्याचे कारण नाही. माथेरान महाबळेश्वर येथे जसा गिरिस्थान कर लागू आहे तसाच मंदिर परिसरात येणाऱ्या लोकांना आणि वाहनांना लावा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 11/12/2018 - 06:01 नवीन
अजून एक आहे...कुलदेव किंवा कुलदेवता बदलायची गरज नाही... कुलदेवतेची घरीच पूजा करायची.असे माझे विचार आहेत. आपली भक्ती जर खरी असेल तर खांबातून पण देव प्रकट होतो. चूकीचे असतीलही पण, त्यामुळे अनावश्यक प्रवास, रांगेत उभे राहणे, आणि स्व-आरोग्य तर नक्कीच सांभाळल्या जाते. कुठे शोधीशी रामेश्र्वर अन कुठे शोधीशी काशी...हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी झाड फुलांनी आले बहरून तू न पाहिले डोळे उघडून वर्षाकाळी पाउसधारा तुला न दिसला त्यात इशारा काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा कधी न घेवून नांगर हाती पिकाविलेस मातीतून मोती हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उंच पिकातून कधी होवुनी देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधीतोस आकाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/12/2018 - 10:37 नवीन
कधी काळी आपल्या कुळातील एक पुर्वज कोणत्यातरी राजाकडे देशपांडे/कुळकर्णी/नाझर/देशमुख वगैरे पदावर होता. त्याची नेमणूक एखाद्या वतनावर झाली. तिकडे तो झाला स्थायिक आणि गावातल्याच एखाद्या देवतेला वार्षिक देणगी देऊ लागला. तीच देवता मग त्याच्या कुळाची कुळदेवता झाली. मग आता आपण का बदलू नये कुळदेवता? मुंबईत/ पुण्यात/ नाशिकमध्ये/ बोईसर/ सूरत जिथे असाल तिथे एखादे देऊळ निवडावे. प्रत्येक गोष्टीत सरकार किती लक्ष घालणार?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 11/12/2018 - 12:16 नवीन
बरोबर आहे !! सरकार प्रत्येक गोष्टीत किती लक्ष घालणार ? सार्वजनिक ठिकाणी वावरताना स्वच्छते बाबत नागरिकांची शिकवण करण्याची वेळ येते च का ? आपल्या भारतातील नागरिकांचे आईवडिल स्वच्छते बाबत संस्कार करण्यात कमी पडले की काय अशी शंका येते . डॉक्टरांनी वर्गीकरण केल्या प्रमाणे फक्त अशिक्षित लोक च नीट वागू शकतात . मंदिराचे पावित्र्य जपू शकतात कारण ते अशिक्षित असल्या मुळे देवाची त्यांना भीती असते याच्या उलट अर्धवट शिक्षित आणि सुशिक्षित लोक धर्म ,पावित्र्य स्वच्छता पायदळी तुडवायला एका पायावर तयार असतात . त्यांना कितीही कानीकपाळी ओरडले तरी सार्वजनिक ठिकाणी व मंदिरात घाण करणारच !!! काल व्हाट्सएप वर या दिवाळीतील पुण्यातील सारसबागेचा दिवाळी पहाट च्या दुसऱ्या दिवशीचा फोटो आला होता !! लाज वाटत होती तो फोटो बघताना पुणेकर असल्याची , किती कचरा केलेला होता बागेत . आता तो फोटो पाहून घाण पसरवणाऱ्या रसिकांचे वर्गीकरण कसे करणार ? तात्पर्य !! घाण पसरवणाऱ्यांना जात , धर्म ,शिक्षण , पेठ आणि गाव यांच्या सीमारेषा नसतात .
  • Log in or register to post comments
झ
झेन Mon, 11/12/2018 - 14:21 नवीन
घाण पसरवणाऱ्यांना जात , धर्म ,शिक्षण , पेठ आणि गाव यांच्या सीमारेषा नसतात .
तसे पण मोठ्या शहरातील/पेठेतील बरेच लोक बाहेरून आलेले असतात, उगाच कुणाकडे कशाला बोट दाखवा. आहेरे आणि नाहीरेचा संघर्ष आणि आपण बाय डिफॉल्ट नाहीरेंंची बाजू घेतो. थोडसं अवांतर..कालच्या सकाळ मधे १८३९ मधल्या ऐतिहासिक प्रसंगावरील स्पिलबर्ग च्या 'अमिस्टाड' चित्रपटाबद्द्ल आलं आहे. मनुष्य स्वभाव शहर/पेठ सोडा, देश आणि काल बदलून सुद्धा मुळात कसा असतो त्याचं सुंदर चित्रण. https://www.esakal.com/saptarang/amistad-movie-appreciation-pravin-tokekar-154055
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा