Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी : नोव्हेंबर २०१८

ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/01/2018 - 16:14
🗣 106 प्रतिसाद
शक्ती अवतरला ! IIT-Madras creates ‘Shakti’, India’s first microprocessor आयआयटी (मद्रास) ने भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला आहे. या मायक्रोप्रोसेसरमध्ये जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान (cutting edge of technology) वापरलेले नसले (शक्तीचे १८०nm तंत्रज्ञान विरुद्ध अमेरिकेचे 20nm तंत्रज्ञान) तरीही, त्याचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू होऊ शकल्यास तो भारतिय तंत्रज्ञानातील एक महत्वाची पायरी ठरेल, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे, केवळ मायक्रोप्रोसेसरच्या आयातीची गरज कमी होईल असेच नाही, तर सायबर अ‍ॅटॅक्सवर ताबा ठेवणे सोपे होईल. "शक्ती" असे नामकरण केलेल्या या मायक्रोप्रोसेसरचा दळणवळ व संरक्षण communication and defense sectors) या क्षेत्रांत खास उपयोग होईल असे म्हटले जाते.  (जालावरून साभार)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 44090 views

🗣 चर्चा (106)
ड
डँबिस००७ गुरुवार, 11/01/2018 - 16:27 नवीन
Well Done IIT-M !! Its proud moment, Although late !!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 11/02/2018 - 05:21 नवीन
आता सर्वरही बसवा नीरा, धोंडाइच खडकाळ भागात कमी पावसाच्या जागेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/02/2018 - 10:11 नवीन
US agrees to give oil waivers to India, 7 other nations under Iran sanctions पूर्वी इथे वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे अखेर, भारताने इराणकडून खनिज तेल विकत घेतल्यास, त्याला बंदीला (सँक्शन्स) तोंड द्यावे लागणार नाही, असे अमेरिकेने जाहीर केले. :) हे अनेक दृष्टींनी भारत (आणि अमेरिकेच्याही) फायद्याचे आहे... ते कसे ते वरच्या दुव्यावर अगोदरच विशद केले आहेच. ट्रंपतात्यांनी त्यांची आडमुठी स्टाईल सोडून नरमाईचे धोरण स्वीकारले, ही गोष्ट भारताच्या दृष्टीने सकारात्मक आहे... अर्थातच, तसे करायला भाग पाडण्यासाठी त्यांच्याच तार्कीक विचार करणार्‍या संरक्षण आणि परराष्ट्र खात्याच्या सेक्रेटरींचा दबाव कामी आला आहे. भारताला फार दुखावून आपलाच (विशेषतः इंडोपॅसिफिक क्षेत्रातला) परराष्ट्रीय दबदबा कमकुवत होईल, हे ट्रंप प्रशासनाला पुरेपूर माहीत आहे ! तेव्हा, अनेक प्रकारचे दबाव (उदा : आर्थिक व राजकिय कारवाईच्या गर्भित धमक्या, इ) विफल झाल्यावर अमेरिकेने हा निर्णय घेतलेला आहे. या रस्सीखेचकाळात, अमेरिकन दबावाला बळी न पडता, "देशहितासाठी योग्य ती पाऊले भारत उचलेल" असे उघडपणे सांगत, रशियाशी वाढवलेली घसट ( S400 क्षेपणास्त्रे खरेदी करार, इ) आणि बंदीला तोंड देण्यासाठी उपायांची चर्चा करण्यासाठी चीनशी चालू केलेली प्राथमिक स्तरावरची बोलणी, इत्यादी भारतीय मोर्चेबंदीही बरीचशी कामी आली आहे. :) इराणि तेलखरेदीची ही सूट भारताबरोबरच जपान, दक्षिण कोरिया आणि इतर पाच देशांना मिळालेली आहे. इराणवरची अमेरिकन बंदी ५ नोव्हेंबरला सुरू होत आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/07/2018 - 05:35 नवीन
US exempts India from certain sanctions for development of certain sanctions for development of Chabahar port in Iran इराणी तेलखरेदीबरोबर, अपेक्षेप्रमाणे, भारताला "इराणचे छाबाहार बंदर व ते अफगाणिस्तानला जोडणारी रेल्वे" यासंबंधीही सूट मिळाली आहे. अर्थातच, ही दुसरी सूट न देणे अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्यासारखे झाले असते. या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, अमेरिकेने, युरोपियन देशांसह इतर देशांना आपल्या मनमानीच्या दबावाचे बळी केले होते. "पूर्वीसारखा दबाव टाकून पाहू, जमले तर जमले, नाहीतर सोडून देऊ", असा धरसोडीचा मामला आपल्या अनेक दोस्तराष्ट्रांना दुखवत आहे, हे अमेरिकन प्रशासनाच्या अजून पुरेसे ध्यानात आलेले दिसत नाही... किंबहुना, ध्यानात आले असले तरी जुनी खोड सहज सुटत नाही, असेच दिसते आहे ! आंतरराष्ट्रिय पटलावरची बदलती आर्थिक-राजकिय-सामरिक परिस्थिती विचारत घेऊन अमेरिकेने आपल्या धोरणांत फेरबदल केले तर ते अमेरिकेच्या व एकंदर सर्व जगाच्या फायद्याचेच होईल. अर्थातच, हे सगळे सद्यातरी ट्रंपतात्यांच्या मनस्थितीवर अबलंबून आहे ! :) ;)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 11/02/2018 - 18:31 नवीन
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/diwali-gift-for-msmes-loans-up-to-rs-1-crore-in-59-minutes-announces-pm-modi/articleshow/66477871.cms ही योजना जर खरोखरच प्रत्यक्षात आली तर फार उत्तम.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 11/02/2018 - 19:48 नवीन
ही योजना जर खरोखरच प्रत्यक्षात आली तर फार उत्तम.
सर्वसामान्य लघु उद्योजकांसाठी असे कर्ज मिळण्याची शक्यता ०% आहे. योजनेची सफलता दाखवण्यासाठी काही (लोन फिक्सिंग केलेल्या) लघुउद्योगांना असे कर्ज मिळाल्याचा देखावा छानपैकी रंगवण्यात येईलच. राजकीयदृष्ट्या भाजप आणि कॉंग्रेस मध्ये तसं पाहील तर काहीच फरक नाहीये त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी मोदी साहेबांना अशा गाजर दाखवणाऱ्या घोषणा स्वतःला पटतं नसल्या तरी करणे भागच पडत असणार. स्टार्टअप इंडिया सारखीच हि पण एक निव्वळ आकर्षक घोषणा ठरणार ह्यात काहीच संशय नाही. अर्थात भाजपवर आणि कुठल्याही योजना मातीमोल करणाऱ्या बाबुशाहीवर काडीचाही विश्वास नसला तरी पुढील पाच वर्षे देखील (कुठलाही तोलामोलाचा पर्याय उपलब्ध नसल्याने) स्थिर सरकार देऊ शकणारे खंबीर नेते म्हणून नरेंद्र मोदींनाच संधी मिळाली पाहिजे हे माझे वैयक्तिक मत आहे. टीप: मला राजकीय चर्चांमध्ये काडीचाही रस नसून केवळ ज्या क्षेत्राशी संबंधित अशी हि योजना वा घोषणा आहे त्या क्षेत्रातला एक लहानसा घटक म्हणून हा प्रतिसाद दिला आहे बाकी अशी (अशक्य) योजना जर खरोखरच प्रत्यक्षात आली तर आनंदच आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 11/02/2018 - 20:36 नवीन
"टीप: मला राजकीय चर्चांमध्ये काडीचाही रस नसून केवळ ज्या क्षेत्राशी संबंधित अशी हि योजना वा घोषणा आहे त्या क्षेत्रातला एक लहानसा घटक म्हणून हा प्रतिसाद दिला आहे बाकी अशी (अशक्य) योजना जर खरोखरच प्रत्यक्षात आली तर आनंदच आहे." अगदी माझ्या मनातले बोललात...
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 11/03/2018 - 15:16 नवीन
टर्मीनेटरजी, सर्वसामान्य लघु उद्योजकांसाठी असे कर्ज मिळण्याची शक्यता ०% आहे. अस आपण का म्हणत आहात ? आतापर्यंत लघु उद्योजकांसाठी कर्ज मिळत नव्हते का ? कोणालाही कर्ज देताना कागद पत्रे द्दावी लागतात ! कर्ज देणारी संस्था त्या कागदपत्राची व्यवस्थित छाननी करुन कर्ज देता येईल का नाही हे ठरवत असते ! आता बँक अकॉंउट आधार कार्डाशी संलगन केल्यामुळे ती प्रक्रिया आता सुलभ झाली अस काही असेल का ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/03/2018 - 16:25 नवीन
एखादी उत्तम सामाजीक योजना, प्रत्यक्षात यायचे स्वप्न उराशी बाळगणे, कधीच सोडून दिले आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 11/03/2018 - 16:40 नवीन
विकांता निमित्त कुटुंबा समवेत बाहेर असल्याने सविस्तर प्रतिसाद अत्ता देतां येत नसल्याबद्दल (मोबाईलवर एक एक शब्द टाईप करायला फारच त्रास होत असल्याने) क्षमस्व. उद्या रात्री किंवा परवा सकाळी स्पष्टीकरण देतो.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 11/05/2018 - 09:12 नवीन
सर्वसामान्य लघु उद्योजकांसाठी असे कर्ज मिळण्याची शक्यता ०% आहे. अस आपण का म्हणत आहात ?
वरील वाक्यातील सर्वसामान्य लघु उद्योजकांमध्ये MSME (Ministry of Micro, Small & Medium Enterprises) कडे नोंदणीकृत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक असा अर्थ अभिप्रेत आहे. देशातील अशा क्षेत्रातील उद्योजकांची (स्वेच्छा) नोंदणी करून विविध सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी, व्यवसायाच्या सुलभीकरणा साठी तसेच त्यांची अधिकृत आकडेवारी मिळवण्याच्या उद्देशाने २००६ सालच्या The Micro, Small and Medium Enterprises Development (MSMED) Act मध्ये सुधारणा करून 'उद्योग आधार' नावाची अतिशय चांगली योजना सप्टेंबर २०१५ मध्ये सरकारने सुरु केली. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हि नोंदणी करणे बंधनकारक आहे. कुठल्याही मध्यस्थाशिवाय https://udyogaadhaar.gov.in ह्या पोर्टलवर विनामुल्य नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त करता येणाऱ्या 'उद्योग आधार' योजने अंतर्गत सप्टेंबर २०१५ पासून आत्तापर्यंत ५४,८४,३५३ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, ज्यात साधे फळे,भाजीपाला विक्रेते, देवळाच्या बाहेर नारळ, फुले, विकणारे, चणे-फुटाणे विक्रेते, इस्त्रीवाले, प्लंबर, सुतार, गवंडी ,कडिया काम करणाऱ्यांपासून कित्येक लहान मोठ्या वस्तूंची निर्मिती, विक्री, दुरुस्ती करणाऱ्या लोकांनी स्वेच्छेने नोंदणी केली आहे. उद्योग लहान असो वा मोठा त्यात केवळ कर्ज मिळवण्यासाठीच नव्हे तर व्यवसायातील दैनंदिन व्यवहार करण्यासाठीही बँकेत चालू खाते (Current Account) असणे आवश्यक असते. बँकेत व्यवसायासाठी चालू खाते उघडायचे असेल तर गुमास्ता (Shop Act License) सारखी कालबाह्य खर्चिक नोंदणी असणे अनिवार्य होते. तो नियम शिथिल करून सरसकट सगळ्याच उद्योगांना अशी नोंदणी करणे बंधनकारक नसल्याचा निर्णय झाला. व्यवसायासाठी असे खाते उघडताना 'उद्योग आधार' प्रमाणपत्र हे व्यवसायाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरणे बँकांकडून अपेक्षित होते. परंतु शहरी व उपनगरीय विभागातील सहकारी, राष्ट्रीयकृत बँका अजूनही कमीत कमी दोन सरकारी नोंदणी असलेल्या कागदपत्रांची मागणी करतात (व्यावसायिक बँका तर तीन कागदपत्रे मागतात) त्यामुळे असे कित्येक लघु उद्योजक बँकेत चालू खाते उघडण्यापासून वंचित राहिले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशा सरकारी योजनांचा लाभ घेऊन कर्जे घेऊन बुडवण्याची एक मानसिकता मागल्या काही दशकांमध्ये तयार झाली आहे. प्रधानमंत्री रोजगार हमी योजना (PMRY) हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ह्या योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत आणि व्यावसायिक बँकांनाही वर्षातून ठराविक संख्येत कर्जे देणे बंधनकारक होते व आहे. पण अशी कर्जे बुडीतखात्यात जाण्याचे प्रमाण बरेच जास्त असल्याने बँकांचे नुकसानही भरपूर झालेले आहे. हल्ली बँकांनी नियमाचे पालन करण्यासाठी आवश्यक असल्याने केवळ टार्गेट पूर्ण करण्याच्या हेतूने शक्यतो बँकेचे व्यवस्थापक/ अधिकाऱ्यांच्या नातलग वा परिचितांना जे खरोखर गरजवंत नसले तरी त्यांच्याकडून वसुली होण्याची शक्यता जास्त असल्याने अशा (योजनांवर आधारित) कर्जांचे वाटप करण्याची पळवाटही शोधून काढली आहे. (बँकेचे व्यवस्थापक/ उच्चाधिकारी खाजगीत हि गोष्ट मान्य करतात)
आतापर्यंत लघु उद्योजकांसाठी कर्ज मिळत नव्हते का ? कोणालाही कर्ज देताना कागद पत्रे द्दावी लागतात ! कर्ज देणारी संस्था त्या कागदपत्राची व्यवस्थित छाननी करुन कर्ज देता येईल का नाही हे ठरवत असते !
१००% सहमत. आपल्याकडे जमा असलेल्या ठेवीदारांच्या पैशातून वाढीव व्याज दराने कर्जे देणे आणि त्यातून नफा मिळवणे हा बँकेचा मुख्य व्यवसायच आहे. कर्ज मागणीसाठी अशी परिपूर्ण कागदपत्रे सादर केल्यावर, त्यांची व्यवस्थित छाननी करून कर्जदाराची क्षमता तपासून कर्जवसुलीची किमान खात्री पटल्यावर बँका कर्ज देतात. पण ती वेळखाऊ प्रक्रिया आहे ५९ मिनिटांत ती पूर्ण होणे कदापि शक्य नाही.
आता बँक अकॉंउट आधार कार्डाशी संलगन केल्यामुळे ती प्रक्रिया आता सुलभ झाली अस काही असेल का ?
अजून डिजिटलायझेशन पूर्णत्वास पोचले नसल्याने बँक अकाउंट आधार क्रमांकाशी संलग्न, आधार क्रमांक पॅन शी संलग्न ह्या गोष्टी सरकारी अनुदाने बँक खात्यात थेट जमा करणे आणि आयकर खात्यातर्फे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यापुरत्या मर्यादित आहेत. आणि डिजिटलायझेशन पूर्णत्वास पोचल्यावर सुद्धा अशा स्वरूपाचे कर्ज ५९ मिनिटांत पर्यायाने १ तासाच्या आत मिळण्यासाठी बँक अकाउंट आधार क्रमांकाशी संलग्न असण्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. कारण अशी कर्जे मिळवण्यासाठी कित्येक गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते. त्यात कर्जासाठी अर्ज करताना प्रकल्प अहवाल (Project Report) देखील सादर करावा लागतो. त्या अहवालात कर्ज मंजूर झाल्यानंतर त्या मिळालेल्या पैशांचा वापर कशासाठी केला जाणार आहे ह्याचे सर्व तपशील व्यवस्थित द्यावे लागतात. परतफेड कशी करणार ते नमूद करावे लागते, सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्यापासून कित्येक गोष्टींचा उल्लेख त्यात केलेला असतो, हा अहवाल चार-पाच पानांपासून चाळीस-पन्नास पानांचा असू शकतो. तात्पर्य: दफ्तरदिरंगाईची सवय असलेली व्यवस्था इतक्या वेगवान पद्धतीने कर्ज वितरण करणे बाजूलाच राहूदे ते नुसते मंजूर करूनही "लघुउद्योगांसाठी ५९ मिनिटांत मिळणार १ कोटींचं कर्ज" अशी घोषणा प्रत्यक्षात उतरवेल अशी अपेक्षा मी तरी नाही करू शकत. मी भाजप समर्थक नसलो तरी मोदी विरोधकही नाही. चांगल्या गोष्टींना चांगलं म्हंटलच पाहिजे. पण मतांच्या राजकारणासाठी अशा स्वप्नवत घोषणा करून विद्यमान आणि भावी उद्योजकांना आशेला लावणे आणि त्यांनी तसे प्रयत्न केल्यावर त्यांच्या पदरी निराशा पडेल अशा घोषणांचे कौतुक करणे मला पटत नाही. मुळात कित्येक योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि काही प्रसंगी तिचे लाभार्थी त्या मातीमोल करून टाकतात. स्टार्टअप इंडिया हि योजना/घोषणाही अशीच खोटी आशा दाखवणारी होती, त्याबद्दल पुन्हा कधितरी. तुम्हाला आणि सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 11/05/2018 - 12:26 नवीन
तुमच उत्तर बर्याच अंशी पटलय ! तुम्हाला ह्या मुद्द्याची दुसरी बाजु माहीती असल्याने ती बाजु उजेडात आणल्या बद्दल धन्यवाद ! मुळात कित्येक योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि काही प्रसंगी तिचे लाभार्थी त्या मातीमोल करून टाकतात. = ...... १०० % लघुउद्योगांसाठी ५९ मिनिटांत मिळणार १ कोटींचं कर्ज" ही घोषणा ही मतांच्या राजकारणासाठी असेल अस वाटत नाही पण अशी स्वप्नवत घोषणा करून विद्यमान आणि भावी उद्योजकांना आशेला लावणे हे मात्र खरच दुखःदायक आहे. भारताचा ग्रॉस डोमेस्ट्क प्रॉडक्शन ज्या प्रमाणात वाढल पाहीजे त्या प्रमाणात वाढत नाही. त्याच बरोबर बेरोजगारीचीही वाढती समस्या जनतेला भेडसावत आहे व त्याची झळ सरकारला बसत आहे. यशस्वी उद्योगासाठी चांगले ईन्फ्रास्ट्रक्चर असणे आवश्यक आहे. ह्या ईन्फ्रास्ट्रक्चर मध्ये चांगले रस्ते, वीज पुरवठा, दळणवळणाची स्वस्त साधने, स्कील्ड वर्क फोर्स लागतो. भारत अश्या ईन्फ्रास्ट्रक्चर डेवलोपमेंट मध्ये मागे होता, पण आता वेगाने पुढे जात आहे. भारतात क्वॉलीटी वस्तु निर्माण करणारे लघु उद्योग वर यायला पाहीजे होते त्या मानाने तस झालेल नाही. त्या विरुद्ध थोड्याच प्रॉडक्टमध्येच जास्त उत्पादक स्पर्धक निर्माण होत आहेत. त्यामुळे वस्तुची क्वॉलीटी खाली जात आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 11/04/2018 - 02:15 नवीन
ओनलाइन धंधा वाढतोय त्यामुळे दुकानातले गिऱ्हाइक कमी होतय. दुकानदारांनी बराच माल मागवून डिलिवरी घेतली नाही, माल परत. आता अमेझोनवाले ट्रॅक करतील किंवा दोनशे तिनशे रु अडवान्स घेतील.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 11/04/2018 - 16:40 नवीन
सोळा कंटेनर असलेले मालवाहू जहाज कोलकातावरून वाराणसीला रवाना झाले. अश्या प्रकारची जलवाहतूक जर व्यवस्थित सुरु झाली आणि चालू राहिली तर त्याचे वाहतूक व्यवस्थेवर बरेच दूरगामी परिणाम होतील. तसेच महामार्गांवरील वाहतूक, इंधन बचत आणि त्याबरोबरच प्रदूषणही कमी होण्यास हातभार लागेल. नितीन गडकरी हे एक असे मंत्री आहेत की जे प्रसिद्धीच्या मागे न लागता त्यांचे काम चोख करत राहतात. वाहतूक क्षेत्रात सुधारणा हे त्यांचे आवडते क्षेत्र आहे. नेहमीप्रमाणेच या महत्वाच्या बातमीला मात्र कुठल्याच वृत्तपत्राने वा वृत्तवाहिनीने फारसे महत्व दिल्याचे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/05/2018 - 13:06 नवीन
India gets nuclear triad: INS Arihant completes deterrence patrol अरिहंत या भारताच्या आंतरखंडीय अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या पहिल्या पाणबुडीने तिची प्रथम "प्रतिबंधक गस्त (deterrent patrol)" यशस्वीरित्या पूर्ण केली... म्हणजे ती पूर्ण शक्तिनिशी कार्यरत झाली आहे. आतापर्यंत भारताकडे जमिनीवरून (अग्नी क्षेपणास्त्र) व (मिराज२००० विमाने वापरून) हवेतून अण्वस्रांचा हल्ला करू शकण्याची ताकद होती. त्यामध्ये आता अरिहंत पाणबुडीच्या रुपाने पाण्याखालून अण्वस्रांचा मारा करू शकण्याच्या ताकदीची भर पडली आहे. अश्या तर्‍हेने अण्वस्त्रांचे तिहेरी कवच भारताला प्राप्त झाले आहे. या तिहेरी कवचामधली पाण्याखालून अण्वस्रांचा मारा करण्याची क्षमता अतीविशेष समजली जाते, कारण ती क्षमता मिळवणे खूप कठीण तर असतेच पण विशाल सागराच्या पोटात फिरणार्‍या/लपलेल्या पाणबुडीला शोधून काढणे शत्रूसाठी गवताच्या मोठ्या ढिगार्‍यातून सुई शोधण्यापेक्षा अनेक पटींनी जास्त कठीण असते. ही घटना, भारताच्या जागतिक स्तरावर महत्वाचा संरक्षण भागिदार होण्याच्या मार्गावरील, मैलाचा दगड आहे. ही गोष्ट, भारतिय संरक्षक दलांना आणि सर्व भारतियांना निश्चितच अभिमानस्पद आहे!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 11/05/2018 - 13:27 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 11/05/2018 - 13:41 नवीन
डॉ सुहास म्हात्रे , खास माहिती ! भारतीय नौदलाच अभिनंदन !! मला वाटत की ह्या पाणबिडीच्या यशस्वी चाचणीमुळे भारताकडे सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी आता उपलब्ध झालेली आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/05/2018 - 15:37 नवीन
"प्रतिबंधक गस्त (deterrent patrol)" यशस्वीरित्या पूर्ण केली याचा खरा अर्थ असा आहे कि केवळ पाणबुडीची चाचणी पूर्ण झाली असे नाही तर त्यावर अणूबॉम्ब तैनात असलेली क्षेपणास्त्रे सुद्धा वापरता येण्याच्या योग्यतेची आहेत याची खात्री झाली. पाणबुडी प्रतिबंधक गस्त घालते म्हणजे शत्रूच्या प्रदेशात खोलवर जाऊन तेथून शत्रूच्या मर्मावर आघात करण्याची क्षमता आहे हे दाखवून देणे असते. येथे माझ्या तर्काप्रमाणे अरिहंत हि दक्षिण चीनच्या समुद्रात गस्त घालून आली असून तेथून संपूर्ण चीनच्या भूप्रदेशात अणुक्षेपणास्त्र डागण्यासाठी (K -४ क्षेपणास्त्र ३००० किमी टप्पा) लागणारी माहिती (लॉक ऑन) गोळा करून आली असावी. K हे आद्याक्षर डॉ अब्दुल कलाम यांच्या आडनावाचे आद्याक्षर घेऊन त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. अरिहंत वर १२ (K १५) सागरिका क्षेपणास्त्रे (७५० किमी टप्पा) किंवा ४ (K -४ क्षेपणास्त्र ३००० किमी टप्पा) नेता येतात. या गस्तीमध्ये दक्षिण चीनच्या समुद्रात असलेले प्रवाह खोल पाण्यात असलेल्या टेकड्या, घळी, बेटे तेथे असणारे पाण्याचे प्रवाह, तापमान, जलचर या सर्वांची अत्यंत महत्त्व पूर्ण माहिती मिळवून ती साठवून ठेवली जाते. चीनच्या पाणबुड्या जशा हिंदी महासागरत गस्त घालत आहेत तसेच आता आपण त्यांच्या उरावर जाऊन बसू शकतो हि त्यांना दिलेली "ताकीद" आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 11/05/2018 - 17:11 नवीन
"चीनच्या पाणबुड्या जशा हिंदी महासागरत गस्त घालत आहेत तसेच आता आपण त्यांच्या उरावर जाऊन बसू शकतो हि त्यांना दिलेली "ताकीद" आहे." हे तर फारच उत्तम...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/06/2018 - 07:26 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/06/2018 - 11:40 नवीन
Bangladesh Prime Minister Sheikh Hasina Ends Reservation In Government Jobs After Angry Protests: 10 Facts बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी सरकारी नोकरीत राखीव जागा (आरक्षण) ठेवण्याची पद्धत मोडीत काढण्याची घोषणा केली आहे. आता भारताने... मुख्यतः भारतीय जनता व आरक्षणवादी नेत्यांनी याबाबतीत धडे घेण्यासाठी बांगलादेशचा "अभ्यासदौरा" करायला हरकत नाही !
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 11/06/2018 - 14:05 नवीन
2019 च्या निवडणूका एकदा होऊन जाऊद्यात. मग आरक्षणविरोधी जनता आणि नेत्यांनी त्या बद्दल ब्र काढावा. नाहीतर 2050 पर्यंतच 'राज करंगे' च स्वप्न हे स्वप्नच राहिल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/07/2018 - 04:49 नवीन
मग आरक्षणविरोधी जनता आणि नेत्यांनी त्या बद्दल ब्र काढावा. नाहीतर 2050 पर्यंतच 'राज करंगे' च स्वप्न हे स्वप्नच राहिल. आरक्षण आणि तत्सम भूलथापा सांगून जनतेला सहज उल्लू बनवणे शक्य होते आणि राजकार्णी स्वार्थ साधण्यासाठी त्याचा फायदा उठवतात, हेच तर भारताचे सर्वात मोठे दुर्दैव आहे !
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/07/2018 - 05:23 नवीन
भारताच्या सुदैवानं आरक्षण अजून तरी अबाधित राहिलं आहे. म्हणून तर प्रत्येक समाजगटाला प्रतिनिधित्व करायला संधी लाभली आहे. ....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/22/2018 - 10:24 नवीन
सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/06/2018 - 12:08 नवीन
प्रसारमाध्यमांचे एक भयानक रूप... ही आहे टीव्ही न्युज क्रूसाठी चाललेली "विष पिण्याच्या ब्रेकिंग न्यूजची रिहर्सल आणि रिटेक्स" ! :( :( :( (कपाळावर हात मारणार्‍या अनेक स्मायल्या कमी पडतील इथे) (कायप्पावरून साभार)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/07/2018 - 06:14 नवीन
हाॅरिबल...!! 'कुठं नेऊन ठेवलाय देश' या बिकाऊ मिडियावाल्यानी.??
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/22/2018 - 10:26 नवीन
हे सर्व मोदीसरकार आल्यापासून सुरु आहे, सर्व फेक. खोटं. पूर्वी असं नव्हतं. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/22/2018 - 10:31 नवीन
तुम्ही म्हणताय तर ते तसं असेलच ! कारण तुम्हाला सर्वकाळातील सगळे सगळे बरोब्बर माहीत असतेच ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/07/2018 - 06:12 नवीन
भाजप राज्य सरकारांची शहरांची नामकरणं ह्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण समाजोपयोगी योजनेला पाठबळ ..!! https://www.loksatta.com/desh-videsh-news/ready-to-rename-ahmedabad-as-karnavati-says-gujarat-government-1785798/ https://www.thehindubusinessline.com/opinion/columns/why-rename-cities/article24007588.ece
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/22/2018 - 10:28 नवीन
गाव, शहरं, जिल्हे, पाणवठे,विहिरी, आणि मग माणसांची नावे. असा प्रवास सुरु होईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 11/10/2018 - 09:21 नवीन
कर्नाटक सरकार सुरक्षा घेर्यात 'टिपु जयंती ' साजरी करत आहे. लाखो हिंदुच्या कत्तली केलेल्या व ब्रिटीश सरकार विरुद्ध मरे पर्यंत सशस्त्र लढा दिलेल्या टिपु सुलतानला काँग्रेस सरकार गेल्या काही वर्षांपासुन आपल मानत आहे. फक्त हिंदु विरुद्ध मुसलमानांना उभ करण्यासाठी पुर्वी कधीही न खेळलेला खतरनाक खेळ गेले काही वर्षे काँग्रेस खेळत आहे. मुळात मुसलमान जयंत्या साजर्या करत नाहीत , तरीही कर्नाटकातले मुसलमान फक्त हिंदुंना डिचवण्यासाठी टिपु सुलतानची जयंती साजरी करत आहेत. मुळात हिंदु द्वेष भावना ह्या काँग्रेस वाल्यांनी किती खोलवर रुजवलेली आहे हे ह्यावरुन दिसेल. ऐरवी काही छोट्या बाबतीत फतवा काढणारे मुसलमान मुल्ले टीपु सुलतानची जयंती मुसलमान साजरी करतानाही मुग गिळुन गप्प बसलेले आहेत. केरळ मधल्या अय्यप्पा देवस्थानात पुर्वी निषीद्ध असलेल्या सर्व वयोगटातील स्त्री प्रवेशासाठी सुप्रिम कोर्टात एका मुसलमान ऐडव्होकेटने याचिका दाखल केलेली होती त्याचा निकाल गेल्या महीन्यात लागला. ह्या निकाल लागेपर्यंत ह्या याचिकेमागे एक मुसलमान वकिल होता हेच केरळमधल्या पर्यायाने देशातल्या हिंदुं समाजाला माहिती नव्हते. एका मुसलमान वकिलाला अश्या प्रथेमुळे का य त्रास होत होता हे त्या मुसलमान वकिला सांगता आले नाही. त्या निकालानुसार दोन महीला पुर्ण सुरक्षा घेर्यासकट अय्यप्पा देवस्थानात घुसण्यासाठी सज्ज झालेल्या होत्या. वाटेवरच्या जंगलातुन अगदी देवस्थानच्या दारा पर्यंत पोलिसांनीच त्या दोन महिलांना पोहोचवले. देवस्थानच्या दारात महिलाच नाव विचार ल तेंव्हा कळल की एक केरळ मधली क्रिश्चन पत्रकार तर दुसरी फातिमा, एक दुय्यम दर्ज्याच्या चित्रपटात काम करणारी मुसलमान कलाकार होती. त्या दोघींनां नाव कळल्यावर पोलिसांनीच दारातुन परत पाठवल . त्या दोघीं अय्यप्पा देवस्थानात जाण्यासाठी का आतुर झालेल्या होत्या ? हा प्रकार झाल्या झाल्या केरळ मधल्या मुसलमान ग्रुपने त्या फातिमाला मुसलमान धर्मातुन बडतर्फ करुन टाकल. हेच मुसलमान टीपु सुलतानची जयंती मुसलमान साजरी करताना मात्र फक्र महसुस करतात . ऐरवी गांधी विचारसरणीचा पुरस्कार करणारी काँग्रेस टीपु सुलतानची जयंती मुसलमान साजरी करता ना मात्र गांधीजींना सोईस्कर रित्या विसरते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 11/14/2018 - 12:53 नवीन
त्या दोन स्रियां वरून सिद्ध होते की मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक व्यवस्थित प्लॅनिंग करून हिंदु धर्म आणि हिंदू लोकांना बुडवायला निघाले आहेत तरी आपल्याच हिंदू धर्मातील काही लोकं टेऱ्या बडवत पप्पू च्या खांग्रेस ची तळी उचलून धरण्यात धन्यता मानत आहेत . भाजपा च्या छोट्या छोट्या चुकांना आभाळा इतके मोठे करून सुतकी चेहरे करण्यात आपलेच हिंदू पुढे आहेत .
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/14/2018 - 18:40 नवीन
क्षमा करा वैयक्तिक वाटून घेऊ नका, तुमच्या घरातील माताभगिनींचा आदर ठेवून विचारतो,खरंच 100% विटाळ पाळला जातो का?? आमच्या घरात तर सगळा दिखावा असतो. मग मला प्रश्न असा पडतो की नसेल पाळला जात तर आपण आपल्या हिंदू धर्म बुडवायला निघालो आहोत का? .... शबरीमालाचा प्रश्न उगाच जास्त ताणला जातोय असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 11/15/2018 - 06:02 नवीन
...खरंच 100% विटाळ पाळला जातो का??
या बद्दल महाराष्ट्रातील नेमकी सद्यस्थिती ची कल्पना सहज येणे अवघड आहे, सगळीकडे सारखीच सुधारणा असेलच असे नाही नाही तर मंदिरप्रवेशाचे भिजत घोंगड्या च्या चर्चा करण्याची वेळ आली नसती या विषयावर स्वतंत्र विसृत चर्चा व्हावी म्हणून मासिक पाळी, शरीर विज्ञान आणि अंधश्रद्धा हा स्वतंत्र चर्चा धागा काढला आहे त्या आपण आणि इतर सर्वांना चर्चेतही सहभाग विनंती आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 11/17/2018 - 11:27 नवीन
आमच्या घरी विटाळ अजिबात पाळला जात नाही !! पण इतर मंदिरातील प्रथानां कंटाळून मी मंदिरात जाणे बंद केले आहे . घरी लहान मुलांना आपल्या सणांची ओळख राहावी म्हणून सगळे सण साजरे करतो . पण शबरीमला चा वाद पाहता हिंदू धर्मिय मंदिरात बदल घडविण्यासाठी मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांची गरज नाही . त्यांनी अगोदर स्वतःच्या धर्मातील तोंडी तलाक , कन्फेकशन रूम वैगरे बंद करावेत मग हिंदू धर्मात लुडबूड करावी .
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 11/17/2018 - 12:18 नवीन
Ok. Great.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/10/2018 - 12:46 नवीन
Bajrang Punia becomes World Number One in 65kg Wrestling Category United World Wrestling (UWW) या जागतिक स्तराच्या कुस्ती प्रशासकिय संस्थेच्या वर्गवारीत भारताच्या बजरंग पुनियाला ९६ गुणांसह प्रथम क्रमांक दिला गेला आहे. विशेष म्हणजे दुसर्‍या क्रमांकाच्या रशियाच्या Akhmed Chakaev याचे याला फक्त ६६ गुण मिळालेलेआहेत. या संस्थेच्या जागतिक क्रमवार्‍यांमध्ये पहिल्या दहांत असणारा २४ वर्षिय पुनिया हा भारताचा एकुलता एक खेळाडू आहे. Image removed. (जालावरून साभार)
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 11/11/2018 - 12:26 नवीन
ट्रम्पतात्या सध्या पॅरिसला गेलेत. तिकडे बारकासा पाऊस पडतोय. सोनेरी केस भिजतील म्हणून बहुतेक ट्रम्पतात्यांनी, व्हेटरन डे सेमेटरीतला मेमोरियलचा कार्यक्रम बुडवला (ट्रुडो, मॅक्राँ आणि अन्य अनेकांनी मात्र हजेरी लावली). आता पॅरिसमध्ये हाटिलात बसून, ट्विटरवर कॅलिफोर्नियात लागलेल्या आगींबद्दल बडबड चालू आहे. तीदेखील सहानुभूती किंवा आत्तापर्यंत दगावलेल्या पंचवीस व्यक्तींबद्दल शोक वगैरे नसून यात कॅलिफोर्नियाचाच कसा दोष आहे आणि फेडरल गव्हर्मेंट मदत कशी रोखणार आहे, याबद्दल! अर्थात, यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. एकतर, ट्रम्प आणि फॅक्ट्स यांचा काही परस्परसंबंध नसतो. दुसरं, म्हणजे मिडटर्म्समध्ये रेसिस्ट बोंबा मारूनही मतदार बधले नाहीत आणि अगदी कॅन्सस-ओक्लाहोमा-मोन्टानामध्येही वैयक्तिक प्रतिष्ठेची बाब करूनही सालटी काढली - याकडून लक्ष दुसरीकडे वळवायचं आणि मुख्य म्हणजे, अध्यक्षीय निवडणुकीत कॅलिफोर्नियाची मतं मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने चाललेला हा थयथयाट आहे. (या पार्श्वभूमीवर, ओबामा आणि ओबामा प्रशासन हरिकेन सँडीच्या वेळेला साऊथ कॅरोलायनासारख्या कट्टर रिपब्लिकन राज्याच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहिलं होतं, ते आठवण्याजोगं आहे.) (बाकी, ट्रम्पच्या समर्थनाला तस्त घेऊन धावण्यापूर्वी, भक्तांनी कॅलिफोर्नियातल्या बहुतांश जंगलांची मालकी आणि देखरेख ही फेडरल गव्हर्मेटच्या अखत्यारीत येते, हे ध्यानी घ्यावं - यात राज्य सरकारचा काही संबंध येत नाही! ट्रम्पतात्यांनी ह्या फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या बजेटमध्ये कपात केली होती.) बातमीचा दुवा (फॉक्स न्यूज*चा आहे हो, मग 'फेक न्यूज' असा निर्बुद्ध आरडाओरडा नको): https://fox40.com/2018/11/10/trump-threatens-to-withhold-federal-payments-to-california-in-tweet-about-deadly-wildfires/ त्याच दुव्यातलं, कॅलिफोर्निया प्रोफेशनल फायरफायटर्सच्या अध्यक्षाचं प्रतिपादन:
"The president’s assertion that California’s forest management policies are to blame for catastrophic wildfire is dangerously wrong. Wildfires are sparked and spread not only in forested areas but in populated areas and open fields fueled by parched vegetation, high winds, low humidity and geography. Moreover, nearly 60 percent of California forests are under federal management, and another two-thirds under private control. It is the federal government that has chosen to divert resources away from forest management, not California.
"Natural disasters are not “red” or “blue” – they destroy regardless of party. Right now, families are in mourning, thousands have lost homes, and a quarter-million Americans have been forced to flee. At this desperate time, we would encourage the president to offer support in word and deed, instead of recrimination and blame."
*(मिडटर्म निवडणुकांपूर्वी ट्रम्पतात्यांची एक रेसिस्ट प्रचारजाहिरात, फॉक्स न्यूजने चक्क नॉट फॅक्च्युअल आणि रेसिस्ट आहे, म्हणून नाकारली. हे म्हणजे, भारत-पाकिस्तान लाहोर कसोटी सामन्यात पाकिस्तानी अंपायरने इंझमामला एलबीडब्ल्यू आऊट देण्यासारखं झालं!! चिमत्कारच की हो!!!)
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 11/15/2018 - 00:03 नवीन
ट्रम्पच्या समर्थनाला तस्त घेऊन धावण्यापूर्वी, भक्तांनी कॅलिफोर्नियातल्या बहुतांश जंगलांची मालकी आणि देखरेख ही फेडरल गव्हर्मेटच्या अखत्यारीत येते, हे ध्यानी घ्यावं मिपावर ट्रम्पतात्यांचे भक्त आहेत आहेत का? अमेरिकेचे ट्रम्प आणि आपल्या मिपावरचे ट्रम्प यांच्यात गल्लत तर होत नाही ना?
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 11/15/2018 - 01:26 नवीन
मिपावर ट्रम्पतात्यांचे भक्त आहेत आहेत का?
काही चाहते आहेत, काही भक्त आहेत. काही भक्त असले तरी, उद्या अंगाशी आलंच तर - चाहतेपणाच्या पळवाटीचा पूल तयार ठेवून आहेत. काही इथलेच आहेत. काही अन्य संस्थळांवरून आयात झालेले आहेत.
अमेरिकेचे ट्रम्प आणि आपल्या मिपावरचे ट्रम्प यांच्यात गल्लत तर होत नाही ना?
छे हो, मिपावरचे ट्रम्प बर्‍यापैकी सेन्सिबल वाटतात :). आता नावावर काय जायचं? (क्लिंटन नावाचा सत्प्रवृत्त आयडीही आहे की ;))
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 11/17/2018 - 11:16 नवीन
तुम्हा दोघांना साक्षात दंडवत / \ आणि एक एक कटिंग चहा !!!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/15/2018 - 06:08 नवीन
It’s official, Indian-made stents as good as the best भारतिय कंपन्यांनी बनवलेले (हृदयाच्या रक्तवाहिन्या रुंदावण्यासाठी वापरले जाणारे) स्टेंट, परदेशी कंपन्यांनी बनवलेल्या स्टेंटच्या तोडीचे आहेत. जर्मन संशोधकांनी २६०३ रुग्णसंखेवर केलेल्या १० वर्षे मुदतीच्या संशोधनानंतर काढलेला हा निष्कर्ष अमेरिकन हार्ट असोशिएशनच्या सभेत जाहीर केला गेला आहे. आता तरी, दिशाभूल करणारी विधाने आणि व्हॉट्सअ‍ॅप ज्ञानाकडे दुर्लक्ष करून, भारतियांनी निर्धास्त मनाने भारतिय स्टेंट्सला होकार देऊन वर आपले अमुल्य धन वाचवायला हरकत नसावी. "पश्चिमेकडून येणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते... तिलाही पारखूनच मग स्विकारावी" हे सत्य परत एकदा अधोरेखित झाले आहे... तेही पाश्चिमेकडून आलेल्या शास्त्रिय संशोधनामुळे ! ;) :)
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 11/15/2018 - 06:18 नवीन
खूप छान अभिनंदनीय आनि कृतज्ञता योग्य
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/15/2018 - 15:56 नवीन
No lesson learned from Dussehra tragedy, Chhath Puja on rail tracks गेल्या १९ ऑक्टोबरला ६१ माणसे रेल्वेखाली मारली गेली, त्याला महिनाभरही झाला नसताना, त्याच राज्यात तेथून फार दूर नसलेल्या भटिंडा-मालौत रेल्वेमार्गावर उभे राहून छटपूजा केली गेली !!! रेल्वे अधिकार्‍यांच्या अनेक विनविण्यांकडे दुर्लक्ष करत ही पूजा केली गेली. अपघात झाल्यावर रेल्वे, सरकारी अधिकारी आणि राजकीय पक्षांवर टीकास्त्र सोडणार्‍या राजकारण्यांना, लोकांची खरी काळजी असली तर, त्यांनी लोकांना किमान शिस्त शिकविण्याची धमक दाखवली पाहिजे... ते होण्याची आशा अर्थातच नाही... कारण, दुर्घटनेचाही फायदा घेत, विपक्षाला दूषणे देणे आणि आपल्या पोळीवर तूप ओढणे केवळ याच नादांत असलेल्या राजकारण्यांना, ना शिस्तीची पर्वा आहे ना लोकांच्या भल्याची ! :(
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/16/2018 - 15:59 नवीन
नकली बँक अकाउंट शोधून काढल्यामुळे शेतकरी कर्जमाफीतील १२५०० कोटी रुपये चोरांच्या हातात जाण्यापासून वाचले. https://indianexpress.com/article/cities/mumbai/one-year-of-farm-loan-waiver-scheme-with-25-lakh-ghost-bank-accounts-identified-govt-saves-rs-12500-cr-5435440/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/16/2018 - 16:30 नवीन
कॅलिफॉर्निया मध्ये मोठे अग्नि तांडव झाले आहे. आपले कोणी मिपाकर त्या भागात असतील तर ते सुखरुप असावेत अशी प्रार्थना करतो. कोणाला या बद्ध्ल माहिती असल्यास ती जरुर कळवावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Akh Lad Jaave... :- Loveyatri
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/17/2018 - 06:07 नवीन
In big win for India, UK court says Tihar safe for extraditing fugitive "तडीपार केलेल्या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी तिहार तुरुंग सुरक्षित आहे" असा निर्णय ब्रिटिश न्यायालयाने दिल्यामुळे आता मल्ल्यासारख्या भारतातून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या गुन्हेगारांकडील एक महत्वाचा मुद्दा बाद झाला आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 11/17/2018 - 15:46 नवीन
१७ जानेवारी २०१८ ला काश्मिरमधल्या कठुआमध्ये एका लहान मुलीवर ( आसिफा बानो) बलात्कार केला गेला व आसिफा बानोला ठार मारल गेल. आरोपी हिंदु व मुलगी मुस्लिम असल्याने ह्या केस मध्ये विरोधी पक्षासकट लेफ्टीस्ट, कॉमी, काश्मिर फुटिरवादी अश्या सर्वांनाच ईंटरेस्ट होता. त्या प्रमाणे सर्वच लोक आपापल्या परीने ह्या केस वर बोलत होते, आपापली काडी टाकत होते. प्रामुख्याने तीन व्यक्ती ह्या सर्व प्रकारात आघाडीवर होत्या. १. दिपीका सींग राजावत ( वकिल ) २. शैहला राशिद (जे एन यु मध्ये शिकणारी , लेफ्टीस्ट, कॉमी, काश्मिर फुटिरवादी अ‍ॅक्टीव्हीस्ट ) ३. तालिब हुसैन (वकिल , साक्षिदार) १. दिपिका सींग राजावत ही एक वकील आहे. ही केस म्हणजे प्रसिद्धी मिळण्यासाठी एक चांगली संधी आहे हे दिपिका सींग ने वेळीच ओळखले व त्यानुसार आसिफा बानोच्या गरीब कुटूंबासाठी आपण ही केस फुकट लढणार आहोत हे सर्व मिडीयाच्या समोर जाहीर केल. ह्या गोष्टीची दखल आंतरराष्ट्रीय मिडीया ने घेतली व रातोरात दिपिका सींग राजावत आंतरराष्ट्रीय मिडीया वरची फ्रंट पेज मॉडेल बनली. तीला ईतकी फेम मिळाली की एमा व्हॉटसन नावाच्या हॉलीवुडच्या अ‍ॅक्टरनी तीला ट्वीटरवर फॉलो केल. २. शैहला राशिद : हिंदु माणसाने रेप केलेल्या मुसलमान गरीब मुलीला न्याय मिळण्यासाठी भारतातल्या प्रमुख मिडीयाच्या मदतीने भारताची नालस्ती आंतरराष्ट्रिय पातळीवर केली. त्यात भर म्हणुन बॉलीवुडच्या तारकानी प्लॅकार्ड सकट सोशल मिडीयावर आपापली जवाबदारी पार पाडली. भारत स्त्रीयांसाठी किती असुरक्षीत आहे हे जगाला दाखवल. आसिफा बानोची फॅमिली गरीब असल्याने त्यांना केस लढण्यासाठी पैश्याची मदत करण हे शैला राशिदच परम कर्तव्यच होत. भारतभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीची हाक देऊन लाखो रुपये गोळा केले गेले. एकुण ह्या मदतीच्या ओघात लोकांकडुन ४१ लाख रुपये गोळा करण्यात आले. ४१ लाख रुपयांची गरज आसिफा बानोच्या गरीब कुटुंबाला नसल्याने व ही केस कोर्टात लढण्यासाठी १० लाख रु ची मदत ह्या आलेल्या ४१ लाख रु मधुन देणार व ऊरलेली रक्कम दुसर्या रेप केस मध्ये (उन्नाव केस) वापरली जाईल अस जाहीर केल . दोन दिवसापुर्वी आसिफा बानोच्या आई वडीलांनी कोर्टाला आपला वकिल दिपिकासींग राजावतला बदलायचा आहे त्या बदल्यात दुसरा वकिल नेमावा असे निवेदन केले. पुढे एका मुलाखतीत त्या आसिफ बानोच्या आई वडीलांनी आपली बाजु मांडली की ही केस कोर्टात केस उभी झाल्यापासुन आपली बाजु मांडण्यासाठी वकिल दिपिकासींग राजावतला एकदाही वेळ मिळालेला नाही. एकुण ११० वेळा कोर्टाच्या तारखा पडल्या व कोर्टात साक्षी झाल्या पण फक्त दोनचदा वकिल दिपिकासींग राजावतला कोर्टात यायला वेळ मिळाला. पुढे ह्या आसिफ बानोच्या आई वडीलांनी खुलासा केला की त्यांच्या गावातुन कोर्टा पर्यंत प्रवास खर्चासाठी प्रत्येक वेळेला त्याम्ना आपला एक पाळीव प्राणी विकावा लागलेला आहे. शैला राशिद कडुन एका पैश्याचीही मदत त्यांना मिळालेली नाही. ह्याचा अर्थ ह्या रेप केसचा आधार घेऊन मदत म्हणुन मिळवलेले ४१ लाख रुपयाचा घपला ह्या शैला राशिदने केलेला आहे. शैला राशी द ही जे एन यु मध्ये राहुन आपल शिक्षण (PHD) पुर्ण करत आहे. तीला सरकार कडुन शिष्यवृत्ती मिळते. तिला अश्या पैश्याची गरज नाही पण तीचा काश्मिर फुटीरवाद्यांशी असलेला संबंध, काश्मिरात नोटबंदीनंतर उप्तन्न झालेल्या पैश्याची चणचण ह्या मुळे पैश्याची दुसरी सोय करण तिला भाग होत. ह्याच प्रमाणे देशातले NGO नॉन प्रॉफीट ऑरगॅनाईझेशन काम करत असतात. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार कडुन चाप बसल्याने त्यांना मिळणार्या पैश्याच्या ओघात कपात झालेली असल्याने आता दुसरी कडुन अशी खेळी खेळली जात आहे. विदेशातुन NGO साठी येणार्या पैश्याला चटावलेल्या व त्यासाठी देश विकायला मागे पुढे न पहा णार्या लोकांचे खेळ कसे चाललेले आहेत त्याची ही एक झलक मात्र आहे. हल्लीच देशाच्या पंत प्रधानाना मारण्याचा कट एका पत्र व्यवहार सापडल्याने उघड झालेला होता. हा पत्र व्यवहार देशातल्या दोन प्रसिद्ध कार्यकत्याम्ध्ये झालेला होता. ह्या दोन व्यक्ती शिवाय ईतरही काही व्यक्ती ह्या कटात सामिल असा व्यात असा संशय असल्याने एकुण पाच लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे. ह्या एकुण प्रकरणात संम्मीलीत अर्बन नक्षल, लेफ्टीस्ट, कॉमी लोकाम्ची संघटीत लॉबी काम करत आहे हे प्रकर्षाने समोर आलेल आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 11/19/2018 - 16:35 नवीन
कटात आता कॉंग्रेसच्या जेष्ठ नेते श्री दिग्विजय सींग यांचे नाव जोडले गेलेले आहे ! अर्बन नक्षल लोकांनी आपापसात लिहीलेल्या पत्रव्यवहारात दिग्विजय सींग यांचे नाव व मोबाईल नंबंर आढळलेला आहे . ह्या वरुन कॉंग्रेस किती खालच्या स्तरावर घसरलेली आहे हे कळतेय!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा