Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

संपादकीय : लिबर्ते

संपादकीय : लिबर्ते

दिवाळी अंक Mon, 11/05/2018 - 07:29

H
मराठीत आज ‘वाचायला’ म्हणाल तर चिक्कार लेखन उपलब्ध आहे. त्यासाठी मायबोली, मिपा, ऐसी यांसारख्या संस्थळांकडेच जायला हवं असं नाही, तर फेसबुकवरही बरंच चांगलं मराठी लेखन अस्तित्वात आहे. याचं श्रेय कोणाला द्यावं हा जरा वादाचा विषय आहे. पण साधारण वीस वर्षांपूर्वी जो साहित्यव्यवहार मूठभर नियतकालिकं आणि पसाभर प्रकाशकांपुरता सीमित होता, त्याचा विस्तार झाला हे मात्र निर्विवाद.

लेखनाचा विस्तार झाला, तरीही हे लेखन ज्या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकतं, ज्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचू शकतं, त्याचा मात्र संकोच होताना दिसतो आहे.

रात्रंदिन गळणार्‍या दूरदर्शन वाहिनीपासून सुरुवात केलेलं झी मराठी हळूहळू हातपाय पसरतं आहे. गाण्यांचे कार्यक्रम, नाटकं, चित्रपट, इतकंच काय - वधुवरसूचक मंडळ, गतवर्षी आलेला दिवाळी अंक आणि यंदा आलेला गणेशोत्सव अंक. झी मराठीचा अश्वमेध वारू थांबायचं नाव घेत नाही. काही वर्षांनी "मराठी संस्कृती म्हणजे झी मराठी दाखवतात ते" असं मत रूढ झाल्यास नवल वाटायला नको! (यात असूयेचा भाग नसून झी मराठीच्या आडाख्यांचं कौतुकच आहे.)

त्याचबरोबर मराठी नियतकालिकं अखेरचा श्वास टाकत आहेत. गेल्या वर्षी ‘अंतर्नाद’ बंद झालं. काही दिवसांपूर्वी ‘साहित्य सूची’ बंद होणार असल्याची बातमी (फेसबुकवर! आणखी कुठे!) वाचली.

म्हणजे - वाढत्या लेखनाबरोबर अभिव्यक्तीच्या मंचांचा संकोच होताना दिसतो आहे. काही वर्षांनी मराठी वाचायचं असेल तर फेसबुक किंवा झी मराठी यांशिवाय पर्याय राहणार नाही. अंकातला शैलेन्द्र यांचा 'प्रसारमाध्यमे - एका बदलाचा प्रवास' हा लेख या संदर्भात अवश्य वाचावा.

अशा स्थितीत मिपासारख्या मुक्त मंचाचं मूल्य आपण जाणलं पाहिजे. टोकदार पेनाने अधोरेखित केलं पाहिजे. मिपाबाह्य लोकांच्या मिपाविरोधी प्रतिक्रिया "मिपा? हॅहॅहॅ..." ते "आमच्या वेळचं मिपा राहिलं नाही" (ज्याला खफवर प्रेमाने ‘पुमिराना कॉम्प्लेक्स’ म्हणतात) अशा काहीही असतात. त्यांना सांगावंसं वाटतं, अरे बाबांनो, मिपा आहे हे लक्षात घ्या!

***
यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखनात विशेष लक्ष वेधून घ्यावं अशी आहेत प्रवासवर्णनं. क्रोएशिया आणि आल्प्स, ते दक्षिण गोवा आणि हिमालय. प्रवासवर्णन हा विभाग मिपावर कायमच समृद्ध राहिला आहे. अन्य लेखनांत लेख, कथा, कविता, पाककृती, व्यक्तिचित्रं असं सगळं आहे. यंदा विशेष विभाग नाही. विशेष विभाग होता तेव्हा "या विषयाव्यतिरिक्त तुम्ही काही घेणारच नाही का अंकात?" असं विचारणारे लोक होते, तसे विशेष विभाग नसताना "आता कशावर लिहू तेच कळत नाही" असं सांगणारेही भेटले! एकूण ‘सर्वांना सर्वकाळ समाधानी ठेवता येत नाही’ हेच खरं!

***
थोडं वैयक्तिक. मी संपादन केलेला हा सलग तिसरा अंक. आता थांबायचा निर्णय घेत आहे. अशा वेळी ‘वैयक्तिक कारणं’ किंवा ‘कार्यबाहुल्य’ वगैरे हवा करायचा प्रघात आहे. पण ते तसं नाही.

दिवाळी अंकाच्या संपादकासारखं पद ही खाजगी मालमत्ता बनून राहू नये असं वाटतं. अशा पदांवर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राहू नये. तीन वर्षं हाही हवेतून काढलेला आकडा नाही. पहिलं वर्ष सकारात्मक बदल करायचं, नवे वारे खेळवायचं. दुसरं वर्ष घडी बसवायचं. तिसरं वर्ष उत्तराधिकारी निर्माण करायचं. या वेळेच्या सासं मंडळाने अप्रतिम योजनाबद्ध काम केलेलं आहे. ती घडी आता बसली आहे.

शिवाय, सुनील गावस्कर म्हणाला होता त्याप्रमाणे : One should quit when people ask 'Why?'; and not 'Why not?'
याचा अर्थ मी मिपाखातं बंद करून तीर्थाटनाला जातो आहे असा नाही. (‘अरेरे!’ काही आवाज आले!) दिवाळी, आणि अन्य अंकांत सहभाग असेलच. शिवाय मिपावर नियमित लिहिण्याचाही संकल्प आहे. बघू या कसं जमतंय.

***
दिवाळीच्या आधी शंभर दिवसांपासून अंकाच्या निर्मितीची गडबड सुरू होते. आपल्या उपलब्ध वेळेतला मोठा वाटा देऊन या दिवाळी अंकाच्या निर्मितीत सहभागी झालेल्यांचा मी आभारी आहे. त्यांची नावं अकारविल्हे : अभ्या.., डॉ सुहास म्हात्रे, जव्हेरगंज, नीलकांत, पद्मावति, पैलवान, प्रशांत, प्रा.डॉ. दिलीप बिरुटे, यशोधरा, सुधांशुनूलकर, स्नेहांकिता. तसंच, दिवाळी अंकासाठी आवर्जून लेखन करणार्‍यांचाही मी आभारी आहे.

सर्वात शेवटी, वाचकहो, तुमच्याशिवाय तर कशालाच अर्थ नाही. तुमचे आभार आणि आम्हां सर्वांतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
H

  • Log in or register to post comments
  • 35694 views
  • Log in or register to post comments
  • 35694 views

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा