Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नाना आणि तनुश्री

फ
फुकनी
Sun, 10/07/2018 - 22:07
🗣 151 प्रतिसाद
आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल. https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 72013 views

🗣 चर्चा (151)
स
सुबोध खरे Mon, 10/08/2018 - 16:14 नवीन
प्रत्येक जण प्रतिक्रिया देतो ती स्वतःच्या असलेल्या विचारसरणी आणी पूर्वग्रहावर आधारित असते. त्याचा आणि सत्याचा संबंध असेलही किंवा नसेलही
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 10/09/2018 - 05:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 10/08/2018 - 19:17 नवीन
अजून एका विश्वामित्रावर आरोप https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156499299095560&id=544725559
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 10/09/2018 - 08:46 नवीन
वाचताना खरे आणि खेदजनक वाटते, (अर्थात हि स्त्री लेखिका दिसते, काल्पनिक घटना मांडणीची क्षमताही लक्षात घ्यावी लागते) स्त्रीयांनी अशा प्रसंगांना धिरोद्दातपणे कलाकार-दिग्द्रशक-निर्मात्यांच्या संस्थेच्या संबंधीता समक्ष आणि न्यायासना समक्ष वाचा नक्कीच फोडली पाहिजे. अर्थात सोशल मिडिया आणि मिडिया वरील वाचा फोडण्यास मिळणारा प्रतिसाद केवळ तात्कालीक प्रभावाचा असतो. (अगदीच निरुपयोगी म्हणायचे नाही जागृती होते त्याच व्यक्तीकडून पिडीत असलेल्या इतर व्यक्ती मोकळेपणाने बोलण्याची शक्यता असते) पण वृत्त माध्यमात काही वेळा बातमी होते बाकी वेळ रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती असते. तेव्हा कोड ऑफ कंडक्ट, कायम स्वरुपी आर्बीट्रेशन मेकॅनीझम, उशिराने व्यक्त होण्या एवजी आर्बीट्रेशन आणि न्यायव्यवस्थेसमोर वेळीच मनमोकळे करणे आणि तात्कालिक मिडिया आश्रयापेक्षा न्यायालयीन प्रक्रीयेचा आधार आणि आदर करणे याचे स्वतःचे महत्व असावे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 10/09/2018 - 16:40 नवीन
पिरा हा तर खराखुरा आधुनिक विश्वामित्र म्हणून प्रसिध्द होता की आहे म्हणु. खरंच काय खरं आणि काय खोटं समजतच नाहीये .
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/09/2018 - 05:55 नवीन
काल न्युज १८ लोकमतवर चर्चा होती . न्यायालय व सत्य याचा प्रत्येकवेळी संबंध असेलच असे नाही. सत्य जे काही असेल ते आपल्या जागी पण तनुश्री ची इतर विधाने, भाषा व देहबोली पाहता ही सकृतदर्शनी स्टंटबाजी वाटते. हे माझ्यापुरते मत आहे दावा नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 10/09/2018 - 08:29 नवीन
ईतर कॉर्पोरेटपेक्षा सिने आणि टिव्ही इंडस्ट्रीचे लिबरल आर्टचे स्वरुप लक्षात घेऊन , सर्व स्टेक होल्डर्सनी मिळून बनवलेल्या प्रॉपर कोड ऑफ कंडक्टची गरज असावी असे प्रथम दर्शनी वाटते. त्या शिवाय काँट्रॅक्ट ड्राफ्टींग च्या प्रमाण नमुन्यांची गरज असावी. मिडिया ट्रायलला घेण्याच्या आधी इंडस्ट्रीचा स्वतःचा आर्बीट्रेशन मेकॅनीझम हवा. तिथून पुढे आर्बीट्रेशन ने निकाली न निघालेल्या प्रकरणांची न्यायालयीन मार्ग. मिडिया ट्रायल सुरवातीस प्रभावी वाटतील पण मिडिया प्रसिद्धीची स्थिती एका पॉईंट नंतर रोज मरे त्याला कोण रडे अशी असते. मिडिया ट्रायल हा आदर्श मार्ग नक्कीच नसावा हे मिडियातील लोकांना आधी समजावयास हवे. ह्या गोष्टी भविष्यात होतीलही कदाचित. नाना तनुश्री प्रकरण लक्षात यावे म्हणून एका काल्पनिक चित्तर कथेचा विचार करु. कथा आणि पात्रे काल्पनिक, उत्तरदायीत्वास नकार लागू. 'एक नवासा प्रोडूसर पैसे लावतोय ज्याची आर्थीक जोखीम घेण्याची क्षमता मर्यादीत असावी. त्यामुळे त्या मुमेंटला सक्सेस मिळणार्‍या एंटरटेनमेंट फॉर्मॅट मधील मुव्हीला गो अहेड देतो, ज्यात बाकी फिल्मशी स्क्रीप्टशी खूप संबंध नसलेले आयटम साँग गल्लाभरुतेच्या दृष्टीने समावेशाचा निर्णय होतो. कमी बजेट मध्ये बसवायचे असल्यामुळे दुसर्‍या फळीतील नाना सारखाच एक जरासा देहाती मोकळा ढाकळा कलाकार मुख्य कलाकार लिड अ‍ॅक्टर म्हणून येतो, ज्याचा दांडगा अनुभवी नैसर्गिक स्वभाव उत्साही गुंतवून घेणारा आहे (किंवा नटी म्हणते तसे. ?) . गल्लाभरुतेच्या दृष्टीने समावेश करावयाच्या 'एकल /सोलो' आयटम साँगसाठी एका अल्पानुभवी (चित्रपट आणि खास करुन आयटम साँग बद्दल जरासा पुर्वग्रहीत तिटकाराच असलेली) नटीशी नृत्यांगना म्हणून करार केला जातो. ज्या करारात सोलो असल्यामुळे इतर कुणा कलाकारासोबत इंटीमेट रोलचा समावेश नाही. आता हि स्पेशल अ‍ॅपिअरन्स देणार्‍या नृत्यांगनेस आपण भारत सुंदरी असल्याचा इगो आहे, त्या शिवाय आपण गंवार/गावंढळ नसलेल्या एटीकेट पाळणार्‍या सुसंस्कृत कुटूंबातून असल्याचा अभिमान आहे. चित्रपट आणि खास करुन आयटम साँग बद्दल जरासा पुर्वग्रहीत तिटकारा असला तरी करीअर मध्ये पुढे पडण्यासाठी मनातून द्विधा मनस्थिती असताना ती तो आयटम साँग करार स्विकारते. खेड्यातून स्वानुभवावर मोठा झालेला लिड अ‍ॅक्टर किती लोकप्रीय असला तरी, शहरी नटीच्या दृष्टीने केवळ, एक शहरी एटीकेट माहित नसलेला गावंढळ आहे आणि मुख्य म्हणजे हिंदी चित्रसृष्टीतील पहिल्या फळीतला चॉकलेट हिरो नाही. (पहिल्या फळीतला चॉकलेट हिरो असता आणि इंटीमेट सीनचा करारात उल्लेख असता तर या नटीची मनःस्थिती द्विधा कशाला बरे झाली असती ? पण तसे झाले तर फिल्मच्या स्टोरीला टर्नस आणि ट्विस्ट मिळावयास जागा रहात नाही. ) आता एटीकेट नसलेला गावंढळ हिरो त्याचा अ‍ॅक्टींग आणि अनुभव किती का दांडगा असेना, त्याचे काम नसताना स्टेजवर का रहावे?, स्वतःला तिसमारखाँ समजत दिग्दर्शकाचा रोल स्वतःच्या ताब्यात घेत कॅमेराचा अँगल इथून नव्हे तिथून, तिथून नव्हे इथून अधिक बरोबर दिसतो असा विचार करत नृत्यांगनेस चक्क हाताला धरुन स्टेजवर वेगवेगळ्या स्थळावरुन नृत्य करावयास का लावावे ? सोबत स्वतःस नृत्य येत नसताना नृत्य शिकवण्याचा / शिकण्याचा बहाण्याचा विनोदाचा प्रयत्न शहरी नटीला आवडत नसला तरी का रेटावा ? लिड अ‍ॅक्टर असेल आणि त्याच्यावर चित्रपट अवलंबून असेल तर तो त्याचा दिग्दर्शकाचा आणि निर्मात्याचा प्रश्न , गेस्ट कलाकाराने त्याची चिंता का करावी ? आता पाहुण्या नटीने निर्माता, दिग्दर्शकांकडे लीड अ‍ॅक्टर च्या गुस्ताखी बद्दल तक्रार करणे सहाजिक आहे . ( त्या लिड कलाकाराशी सरळ संवाद साधून काय खुपतय हे तो शहरी एटीकेट नसलेला गावंढळ कलाकाराला कसे काय सांगणार, मिडियाच्या आधारा शिवाय न पटलेल्या गोष्टींबाबत निराकारण ती कसे काय करुन घेणार ?) आता निर्माता, दिग्दर्शकांकडे त्याची तक्रार केली तर लीड कलाकाराला तिथून घालवण्या एवजी उलटपक्षी आयटम साँग बाबत तसला सीन दुसर्‍या फळीतील कलाकारा सोबत करण्याची गळ, तेही करारात उल्लेख नसताना घातली जाते हे फारच झाले. दिग्दर्शक आणि सहकलाकार असले म्हणून काय झाले ? आणि हे सर्व करण्या मागे लीड कलाकाराचे उद्देश्य वेगळे असतील तर पाहुण्या नटीने नेमके काय करायचे? न्यायालये काहीच्या काही वेळ लावतात तेव्हा न्यायालयाचा आधार तिने का घ्यायचा हा तिचा प्रश्न रास्त नसतो का ?' कशी वाटली काल्पनिक कथा ? कथा काल्पनिकच आहे खर्‍या जगातील कोणत्याही व्यक्ती स्थळे प्रसंगांशी उपरोक्त कथेचा काहीही संबंध नाही. सर्व उत्तरदायीत्वास नकार लागू होत आहेत. सरते शेवटी कोड ऑफ कंडक्ट, आर्बीट्रेशन मेकॅनीझम, आणि तात्कालिक मिडिया आश्रयापेक्षा न्यायालयीन प्रक्रीयेचा आधार आणि आदर करणे हे बॉलीवूड स्टेक होल्डर्सना झेपू शकेल का ?
  • Log in or register to post comments
फ
फुकनी Tue, 10/09/2018 - 22:00 नवीन
<<"आणि हे सर्व करण्या मागे लीड कलाकाराचे उद्देश्य वेगळे असतील तर पाहुण्या नटीने नेमके काय करायचे? ">> ऐन वेळी कॉन्ट्रॅक्ट बदलल्याचे कारण देऊन निर्धारित रक्कम घेऊन निघून जावे. नंतर परत खेडूत हिरो असलेल्या चित्रपटात काम करू नये. कथाकथित पाहुण्या नटी ने तेच केलाय. इथे विषय संपू शकतो. पण नंतर दहा वर्षांनी येऊन पुन्हा त्या खेडुताला एटीकेटी शिकवायची काय गरज.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 10/09/2018 - 11:43 नवीन
{{https://www.loksatta.com/manoranjan-news/stree-actress-flora-saini-sexual-harassment-assault-producer-gaurang-doshi-1767587/}} Image removed.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 10/10/2018 - 11:50 नवीन
{{https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-sandhya-mridul-accusses-alok-nath-of-sexual-harassment-1768392/}} Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 10/10/2018 - 11:58 नवीन
वा बाबुजी वाह्ह्ह, प्रतिमेच्या बाहेर पडायचे धाडस खूप कमीजण दाखवतात.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/10/2018 - 13:16 नवीन
अलोकनाथ आणि एम जे अकबरचे इन्स्टन्सेस (आरोप) एका पेक्षाअधिक असावेत असे दिसते. अलोकनाथवरचे एम जे अकबर पेक्षा अधिक सिरीअस असावेत असे वाटते. एवढी वर्षे सिने आणि टिव्ही मालिका इंडस्ट्रीत कोड ऑफ कंडक्ट आणि प्रॉपर मॉनीटरींग प्रणालीचा अभाव होता, आणि ज्यांच्या कडे व्यक्त होण्याची न्यायिक प्रक्रीयेतून धसास लावण्याची, इंडस्ट्रीत सुधारणा घडवण्याची ताकद होती अशा स्त्रीयांनीही व्यक्त होण्यास एवढा अवधी घेण्याचे आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 10/12/2018 - 18:38 नवीन
i did not have sexual relations with that woman...... Image removed. ब्रेट्या लगा, लैच नशिब्वान तू .... च्यामारी कुणा ड्रेसवरच्या डागामूळ , म्हायी क्लीन इमेज खराब झाली... म्हाया तर् लैफ् रूईन जाला ना बाबो... गो फिगर यौर्स ट्रुली .. बिलीभौ सिगारवाले
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sat, 10/13/2018 - 13:30 नवीन
I extended my hand to him in gratitude, he shoved his 55-yr-old tongue down my 18-yr-old throat. https://twitter.com/MajliedePuyKamp
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 10/09/2018 - 18:17 नवीन
ह्या वादामुळे एका नविन ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे नविन वादाला तोंड फुटले आहे. आता पर्यंत आवार्ड वापसी करुन देश समाज व सरकार ईंन टॉलेरेंट असल्याचा दावा होत होता पण आता ईतक्या स्त्रीया पुर्वी झालेल्या गुन्हा बद्दल बोलत्या झाले ल्या आहेत की त्या वेळेलाच देश समाज व सरकार ईंन टॉलेरेंट होता आणी आता तोच देश समाज व सरकार झालेल्या घटने बद्दल गंभीर आहे हे प्रकर्शाने पुढे आलेले आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 10/09/2018 - 21:15 नवीन
ज्या वेगाने आरोप होत आहेत ते पाहता परिस्थिती अवघड आहे. एक गोष्ट समजली नाही की १०-२० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेला सिद्ध कसे करणार? जरी अगदी घटना घडली त्यावेळेला प्रत्यक्षदर्शी लोक असले तरी एवढी जुनी घटना जशीच्या तशी आठवणे अवघड नाही का? समजा काही वर्षांपूर्वी तुमची एखाद्या मुलीशी अगदी घट्ट मैत्री आहे, तुम्ही सतत बरोबर असता वगैरे वगैरे. पण नंतर काही कारणामुळे तुमच्यात वितुष्ट आलं आणि आता इतक्या वर्षांनंतर त्या मुलीने तुमच्यावर आरोप केला की तुमची मैत्री होती तेव्हा तुम्ही गैरफायदा घेतला. त्यावेळी उगाच जवळ येणे, खांद्यावर हात ठेवणे, हात पकडणे वगैरे केले आणि हे असभ्य वर्तन आहे असा आरोप केला, तर काय करणार? तुमचे एकमेकांबरोबर असलेले, खांद्यावर हात ठेऊन उभं असलेले आणि इतर पोझमधले मैत्रीमध्ये सामान्य वाटू शकणारे फोटो पुरावे म्हणून दाखल केल्यावर ते मॉरल पोलिसांच्या/ खऱ्या पोलिसांच्या नजरेला चुकीचे वाटू शकतात. मग आता तुम्ही काय करणार? किंवा ४-५ वर्षांपूर्वी ऑफिसच्या पार्टीमध्ये तुमच्या एका स्त्री सहकाऱ्याला थोडी जास्त झाल्याने आधार देत तुम्ही घरी सोडलं. आता ते आठवून ती सहकारी तुमच्यावर परिस्थितीचा फायदा घेतल्याचा आरोप करू लागली तर तुम्ही काय करणार? नाना पाटेकरांच्या केस मध्ये तनुश्री म्हणतेय की तिने तक्रार दाखल केली होती. मग त्यावेळेला चौकशी झाली का नाही? झाली तर काय निष्पन्न झाले तसेच नसेल झाली तर का नाही झाली? आणि केवळ त्यावेळेला तक्रार केली होती म्हणून आरोप खरेच आहे हे कसं मानायचं? तर अलोकनाथ केस मध्ये तक्रारदार स्वतःच भरपूर नशेत होती हे मान्य करतेय. मग आरोप सिद्ध कसा करणार? मुख्य म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या युगात बहुतेक वेळा आपल्याला एकत्र काम करायला लागते. कुठल्या ना कुठल्या कारणाने वादविवाद असू शकतात त्यामुळे नाराजी, स्पर्धा, ईर्ष्या वगैरे सर्व भाव असू शकतात. जर उद्या कोणी तुमच्या माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीवर असा (खोटा) आरोप केला तर काय होईल? या प्रथितयश लोकांकडे निदान पॉवर, पैसा आणि सपोर्ट तरी असतो. सतत लोकांना सामोरे जात असल्याने असल्या गोष्टींना कसे तोंड द्यायचे हे सुद्धा माहित असते किंवा दुसऱ्या शब्दात गेंड्याची कातडी असते. पण सर्वसामान्य माणसाने काय करावे? २०१५ सालची एक केस आठवत असेल तर सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराने आपल्याबरोबर असभ्य वर्तन केले असा आरोप एका मुलीने फेसबुक वर केला. यात त्या मुलाची बाजू कोणी ऐकली नाही व त्याला अटक करण्यात आली. कोर्टात केसही दाखल झाली. जामिनावर तो मुलगा बाहेर आहे पण समाजाने त्याला वाळीत टाकल्यासारखी स्थिती आहे. कोर्टाच्या चकरा मारून वैतागला आहे, नोकरी मिळत नाही. ती मुलगी नंतर कॅनडाला निघून गेली आणि कोर्टाच्या तारखांना हजर रहात नाही किंवा काही उत्तरही देत नाही. जरी कोर्टाने केस डिसमिस केली तरी त्या मुलाची बदनामी झाली, करिअर वाया गेलं याला कोण जबाबदार? कोणती मुलगी त्याच्याबरोबर लग्नासाठी तयार होईल का? मी स्वतः दोन्ही प्रकारचे लोक बघितले आहेत. आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हाताखालच्या मुलींना वापरणारे लोक बघितलेत तसेच आपल्या "असेट्स" चा वापर करून हवं ते पदरात पडून घेणाऱ्या मुली पण बघितल्या आहेत. कोण बरोबर आणि कोण चूक हे जुन्या केस मध्ये केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवरून ठरवणे अवघडच नव्हे तर चुकीचे पण आहे. मला कोणाचीच बाजू घ्यायची नाहीये किंवा मुली खोटं सांगतात किंवा मुलं कायम गैरफायदा उठवतात असा दावा करायचा नाहीये. पण काही वर्षांपूर्वी खरंच काय घडलं हे कसं शोधून काढणार? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सीमारेषा धूसर असणाऱ्या अमेरिकेमध्ये सुद्धा असे आरोप झालेल्यांची वाताहत झाली आहे. मग भारतासारख्या देशात असं झालं तर काय होईल याची सर्वजीतची केस म्हणजे एक उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/10/2018 - 17:12 नवीन
प्रत्यक्षात चांगल्या असलेल्या पुरुषांवर खोटे आरोप होणे हे उर्वरीत स्त्रीयांसाठी नुकसानीचे ठरण्याची शक्यता असावी. कारण प्रत्यक्षात चांगले असलेले पुरुष कमी आहेत असे मानले आणि खोट्या आरोपांनी ते बाजूस सारले गेले की स्त्रीयांसाठी उरलेले कोण असणार ? खोट्या आरोपबाजी बद्दल खरेतर स्वतंत्र धागा चर्चेस वाव असावा असे वाटते. आपल्या बर्‍याच मुद्द्यांशी सहमत
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/11/2018 - 06:24 नवीन
इथे प्रत्यक्ष अन्याय सहन करणार्‍यां स्त्रियांची संख्या ही गैरफायदा घेणार्‍यांपेक्षा कितीतरी जास्त आहे असा युक्तिवाद केला जातो. तो खरा देखील आहे. इथे खर तर मुद्दा समाजाच्या लैंगिक व्यवस्थापनेचा आहे. जो लैंगिक वर्तणुकीचे मानसशास्त्र व सामाजिक मानसशास्त्र इत्यादी विषयांशी निगडित आहे. पण त्या दृष्टीने चर्चा माध्यमात होताना दिसत नाही. आता बॅचरल ऑफ सेक्शुअल अ‍ॅडमिन्स्ट्रेशन व मास्टर ऑफ सेक्शुअल अ‍ॅडमिन्स्ट्रेशन अशा अभ्यासक्रमांची गरज आहे स्त्रीत्वाचे भांडवल विरुद्ध पुरुषत्वाचे वर्चस्व हा लढा कायद्याच्या तांत्रिक पातळीवर चालूच राहील. मी पुर्वीच्या जन्मात गोपी होती व तू कृष्ण होता त्यावेळी तु माझ्याशी गैरवर्तन केले हे आता मला समजतय म्हणून मी तुझ्यावर आता केस टाकते असे सकृतदर्शनी विनोदी वाटणारे मुद्दे भविष्यात आले तर नवल नाही
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 10/12/2018 - 08:45 नवीन
मला इथे उत्पल च्या या जगनच काय करायचं? या लेखाची आठवण येते. प्रत्येक क्षेत्रात हे जगन असतात.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 09:22 नवीन
उत्पलांचा लेख अधिक्याने पुरुषांच्या दृष्टीकोणातुन लिहिला असला तरी , विचारात घेऊन अधिक चर्चा योग्य आहे. काही प्रश्न मनात आले आपला आणि इतरांचा दृष्टीकोण मांडला गेल्यास अधिक विचार विमर्श होऊ शकेअ असे वाटते. १) आपण एम. जे. अकबर यांचे महिलागामी कतृत्व वाचले असल्यास एम.जे. अकबर च्या वागण्याचे विश्लेषण आपण कसे करु शकाल ? २) अलोकनाथ आणि एम. जे. अकबर या दोघांनीही आपापल्या क्षेत्रातील स्त्रीयांशी प्रेम - विवाह केले असे बातम्यांवरुन दिसते (चुभूदेघे) . हि व्यक्ती कशी वागू शकते (अ‍ॅप्रोच करते) याची अल्पशी तरी त्यांच्या पत्नींना कल्पना असणार. प्रेम विवाह असूनही संबंधीत पत्नींचे यांच्यावर गैरवर्तन होणार नाही असे प्रभाव का पडले नसावेत ? हि माणसे का अशी भरकटत असावीत
  • Log in or register to post comments
फ
फुकनी Tue, 10/09/2018 - 21:24 नवीन
ह्या साध्याशा घटनेला खूप सारे पैलू आहेत १) नाना विरुद्ध तनुश्री २) बॉलीवूड विरुद्ध मराठी चित्रपट सृष्टी ३) उत्तर भारतीय विरुद्ध मनसे ४) अमेरिकन "मी सुद्धा" आणि त्याची भारतीय अंमलबजावणी ५) स्त्री आणि पुरुष ६) अमेरिकन हिरवे ओळखपत्र ७) सोशल मीडिया ८) डिफामेशन केसेस साठी काही वयोमर्यादा असावी का? इत्यादी, इत्यादी... मकरंद अनासपुरे यांची एक बोलकी प्रतिक्रिया https://www.youtube.com/watch?v=LxEd_mgLVis शेतकऱ्यांच्या विधवांचा पाठिंबा https://www.youtube.com/watch?v=3S0AIlACmvk
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 10/10/2018 - 06:29 नवीन
मकरंद अनासपुरे खोटारडा आहे. दहा वर्षात तीन वेळा यावर तिने बोलुन झालेलं आहे. तक्रार करुन झाली आहे संघटनेकडे. काही उपयोग झालेला नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/10/2018 - 08:40 नवीन
मकरंद अनासपुरे नाना पाटेकरला गुरुस्थानी मानतो, मकरंद अनासपुरेची भूमिका उघड उघड नाना पाटेकरची बाजू घेण्याची आहे, आणि इतर अनेक नाना पाटेकर फॅन्सची असेल. तिच्या सुरवातीच्या तक्रारींकडे चित्रपट प्रसिद्धीचे तंत्र म्हणून पाहिले गेले असणे सहज शक्य आहे. आपण म्हणता तसे, तिने २००८ मध्येच (कोर्ट सोडून उर्वरीत) संबंधीतांसमोर तक्रार केली ह्यात तथ्य असावे. मिडिया समोर किती वेळा बोलली आणि पुढे किती वेळा बोलेले, ह्याला ती स्टेटमेंट बदनामी विषयक कायद्यात मोडतात की नाही एवढेच महत्व असावे चुभूदेघे. कोर्टात का नाही गेली या प्रश्नावर एकदा ती प्रक्रीया काय असते ते माहित नव्हते, तर एकदा कोर्ट प्रक्रीया वेळ खाऊ आहे असे वेगवेगळे बोलताना दिसते. कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा आहे हे तिला माहित नव्हते ?(जे वय १८+ पेक्षा मोठ्या प्रत्येक व्यक्तिस -आणि सुसाक्षर नक्कीच- माहित असणे अभिप्रेत असावे) किमान तिच्या वडीलांना ज्येष्ठत्वाच्या नात्याने माहित असणे अभिप्रेत असावे. किमान स्वनियूक्त तज्ञ वकिलाचा सल्ला तिने घ्यावयास हवा होता. भारतीय कोर्ट प्रक्रीया कितीही वेळ खाऊ म्हटली तरी तिने मिडियाला दिलेल्या मुलाखतींच्या संख्ये पेक्षा कमी तारखांनाच प्रत्यक्ष उपस्थिती नोंदवावी लागली असती. बाकीच्या तारखा पडणे हे वकील मंडळी बघून घेत असतात. बहुधा दहा वर्षात किमान प्रथम स्तरीय न्यायालयांचे निकाल हातात असते. -तसे पहाता २००८ नंतरच्या स्त्री विषयक अनेक खटले न्यायालयीन निकालाचे सर्वोच्च न्यायालया पर्यंतचे स्तर सुद्धा पार करुन झाले असतील -आता नुसतीच आरोपबाजी करण्या पेक्षा ती म्हणते त्यात तथ्य असले तर किमान प्रथम स्तरीय न्यायालयाचा निकाल हातात घेऊन २०१८ मध्ये ती मिडियात बोलू शकली असती असे वाटते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 10/10/2018 - 13:23 नवीन
आपले सर्वांचे आवडते पंतप्रधान , आपल्याला लहानपणी सतत त्यांचे गोजिरवाणे रूप दाखवले गेले . अशा आदरणीय व्यक्ति ज्या राजकारण नावाच्या क्षेत्रात होत्या त्या राजकारण क्षेत्रात # metoo कधी सुरू होतंय याची वाट बघतोय . जाऊ द्या कोणाचे नाव नको घ्यायला पण लैंगिक छळवणूक साठी सर्वात उत्तम क्षेत्र आहे ते म्हणजे राजकारण पण या क्षेत्रातील टाळ्या बऱ्यापैकी दोन्ही हाताने वाजतात म्हणून राजकारणातील काळा डोह शांत आहे . त्या काळ्या डोहातील सहसा बाहेर येत नाहीत , कारण अळीमिळी गुपचिळी !!
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 10/10/2018 - 13:43 नवीन
वाचतेय. राज कपूर, शम्मि कपूर, ए.आ.र. किर्दार ही मंडळी सुटली म्हणायची.! असो. आता एम.जे.अकबर ह्याण्च्याविरुद्ध सहा महिलानी तक्रार केली आहे. अकबर हे राज्यमंत्री आहेत व सरकारचे धाबे दणाणले असणार हे नक्कि. तनुश्रीच्या जवळपास सर्व मुलाखती पाहिल्या. २००८ साली ती जे बोलत होती तेच आताही बोलत आहे. ती खरे बोलत आहे असे आम्हाला वाटते. "नाना शेतकर्याना मदत करतो म्हणून नाना तसे करणे शक्य नाही" हा दावा हास्यास्पद वाटतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/10/2018 - 14:24 नवीन
एम.जे अकबर बहुधा परदेश दौर्‍यावर असावेत वापस आले की सोड चिठ्ठी दिली जाण्याची शक्यता असू शकते, निवडणूक काळात सरकार त्यांना जपून ठेवण्याची जोखीम नक्कीच घेऊ शकणार नाही. दुर्दैवाने एन डि ए कडे एम.जे अकबर सारखा दुसरा मुस्लिम चेहराही नाही म्हटल्यावर एम.जे अकबर शिवाय एन. डि. ए. सरकारची काही काळ तरी पंचाईत ठरलेली आहे. नाना शेतकर्याना मदत करतो, आणि दहा वर्षापुर्वी का तक्रार केली नाही हे मुद्दे कायद्यासमोर टिकणार नाहीत. दुसर्‍या बाजूला तनुश्रीच्या कार वरचा कॅमेरामन आणि पत्रकारांचा हल्ला आणि स्टेजवरील वितुष्ट यांचाही संबंध नसण्याची शक्यता बरीच दिसते. नाना पाटेकर आणि तनुश्री दत्तात तनुश्री म्हणते तसे बिघडल्याची शक्यता असू शकते. तनुश्रीच्या स्वतःच्या जबानीला निश्चितच किंमत असेल त्याच वेळी तिथे शेकड्याने माणसे असताना हात लावण्याबद्दल एकही प्रत्यक्ष दर्शी विटनेस न देता आल्यास तनुश्रीच्या विरुद्ध पाटेकरांची बाजू मजबूत होण्याची शक्यता असावी त्याच वेळी मकरंद अनासपुरेंनी नाना पाटेकरांची उघड बाजू घेतली तशी त्यांची इतर स्त्री सह-कलाकारांनी बाजू न घेतल्यास नानांच्या बाजूला वेटेज येणार नाही. राखी सावंतने नाना पाटेकरांच्या घेतलेल्या बाजूचे मुल्य मोजले जाण्याची शक्यता कमी असावी. अंदाजाधारीत विश्लेषण आहे प्रत्यक्षदर्शी माहिती नव्हे म्हणून माहिती आणि विश्लेषणाच्या अचुकतेचा कोणताही दावा नाही, चुभूदेघे उत्तरदायीत्वास नकार लागू
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 10/10/2018 - 14:43 नवीन
बाकी विश्लेषण चांगले पण खालील भाग:
राखी सावंतने नाना पाटेकरांच्या घेतलेल्या बाजूचे मुल्य मोजले जाण्याची शक्यता कमी असावी.
कोर्टात व्यक्तीनुसार साक्षीचं वेटेज बदलत असेल असं वाटत नाही. अमुक व्यक्तीने दिलेली साक्ष अधिक मजबूत किंवा तमुक व्यक्तीची साक्ष कमी विश्वासार्ह असं करता येत नसावं. भले न्यायाधीशांना व्यक्तिगत तसं इम्प्रेशन असलं तरी. विरोधाभास दाखवून दिला किंवा खोटेपणा उलटतपासणीत सिद्ध केला तरच साक्षीदार पूर्ण अग्राह्य सिद्ध होऊ शकेल. पण मूल्य / वेटेज असं काही नसावं.
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Wed, 10/10/2018 - 14:13 नवीन
१. सेटवर अनेक कलाकार, तंत्रज्ञ मंडळी असताना असे काही घडेल असे वाटत नाही. २. ज्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्त्री आणि पुरुशांनासुद्धा सेक्स चा वापर करावा लागतो आणि हे नीट माहिती असूनसुद्धा जे लोक या क्षेत्रात शिरतात त्यांनी असा कांगावा करावा हे आश्चर्य आहे. ३. १० वर्षांपूर्वी घडलेला गुन्हा आज कोण सिद्ध करू शकेल ? ४.एकूणच या मागील हेतूबद्दल शंका घ्यायला जागा आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/10/2018 - 14:47 नवीन
४.एकूणच या मागील हेतूबद्दल शंका घ्यायला जागा आहे.
सब्जेक्टीव्ह आहे, हेतू बद्दल शंका असूही शकतात पण त्याच वेळी केवळ हेतू वरील शंके मुळे न्याय नाकारला जातो असेही होऊ नये.
३. १० वर्षांपूर्वी घडलेला गुन्हा आज कोण सिद्ध करू शकेल ?
इतर विटनेसेसच्या आठवणी मिळवणे कठीण होऊ शकते म्हणून कठीण होऊ शकते पण अशक्य नव्हे.
२. ज्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी स्त्री आणि पुरुशांनासुद्धा सेक्स चा वापर करावा लागतो आणि हे नीट माहिती असूनसुद्धा जे लोक या क्षेत्रात शिरतात त्यांनी असा कांगावा करावा हे आश्चर्य आहे.
आपले हे वाक्य राज्यघटनेने दिलेल्या आधिकार आणि मुल्यांना अनुसरुन नसावे. मुद्दा 'कंसेंट' म्हणजे परवानगीचा आहे. संबधीत स्त्री/पुरुषाच्या 'कंसेंट' म्हणजे परवानगी ने झाले तर कायदेशीर आणि संबधीत स्त्री/पुरुषाच्या 'कंसेंट' म्हणजे 'परवानगी' शिवाय झाले तर बेकायदेशीर. तनुश्री सोबत झालेल्या लेखी करारात नाना पाटेकरांना भूमिका नव्हती असे दिसते. लेखी करारातील मर्यादांची जाणीव दिग्दर्शकाने नाना पाटेकरांना दिली की नाही आणि कल्पना नसून नाना पाटेकर इन्व्हॉल्व झाले का कल्पना असूनही इन्व्हॉल्व झाले ? असा प्रश्न कोर्टात उपस्थित होऊ शकतो . म्हणजे दिग्दर्शक आणि नाना पाटेकर दोघांना पूर्णपणे एकमेकांच्या बाजूने बोलणे अवघड होऊ शकते. अर्थात नाना पाटेकर स्टेजवर उपस्थित होते हा गुन्हा होऊ शकत नाही . स्टेजवर कोण कोण असावे हा दिग्दर्शकाचा प्रिरॉगेटीव्ह असावा. नाना पाटेकरांकडून आगळीक झाली का आणि नाना पाटेकरांचा हेतू अयोग्य होता का हे प्रश्न अधिक महत्वाचे आणि प्रत्यक्ष साक्षी पुरावे काय उभे रहातात यावर बरेच काही अवलंबून राहील.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 10/10/2018 - 16:17 नवीन
गाडीची तोडफोड होत असताना नाना व दिग्दर्शकाला त्याच परिसरात असून मदतीला जावेसे का वाटले नाही? ते म्हणतात-"आम्हाला माहित नाही बाहेर काय चालले होते ते". हे न पटण्यासारखे आहे. आपल्या सहकलाकारच्या गाडीची तोडफोड चालु आहे, आपण जवळच आहात, आणी आपण मदतीला गेला नाहीत? गेले नाहीत कारण ती गाडीत कोणत्या कारणाने बसली आहे हे नाना व दिग्दर्शक व नृत्य-दिग्दर्शकाला चांगले ठाउक होते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 10/10/2018 - 17:00 नवीन
...गाडीची तोडफोड होत असताना नाना व दिग्दर्शकाला त्याच परिसरात असून मदतीला जावेसे का वाटले नाही?...
हा मुद्दा नानास मिडियासमोर आणि कायद्या समोर नाना पेक्षाही दिग्दर्शकास त्रासदायक होऊ शकावा.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 10/11/2018 - 02:14 नवीन
काम मिळवण्यासाठी जर एखाद्या स्त्री समोर शय्यासोबतीची अट ठेवली तर ते 'कंसेंट' आहे म्हणून ग्राह्य धरले जाईल का? म्हणजे एक होतकरू मुलगी ऑडिशनला गेली आणि तिथल्या एखाद्या निवडीचे अधिकार असलेल्या व्यक्तीने तिला सांगितलं की तुला काम देईन पण त्याची इच्छा पूर्ण करायला लागेल. काम मिळवण्यासाठी नाईलाजाने का होईना पण तिला त्याची इच्छा पूर्ण करायला लागली. वर ती राजीखुशीने करत आहे असा अभिनय पण करायला लागला तर तिची 'कंसेंट' होती असं म्हणायचं का? दुसऱ्या बाजूने विचार करता तिला काम नाही मिळालं तरी चालेल पण असल्या तडजोडी करणार नाही असं म्हणायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही. तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला. तिचा आक्षेप या कृतीवर आहे. त्या चित्रपटात नाना व तनुश्री मुख्य भूमिकांमध्ये होते, मग तिला नानाची ही कृती अपमानास्पद वाटली असावी का? हा व्हिडिओ बघा यात नृत्य दिग्दर्शक आणि सिनेमा दिग्दर्शकाचे मत सांगितले आहे. पण त्याच बरोबर जे आरोप केले जातात की स्टुडिओच्या बाहेर पण तिच्या गाडीवर हल्ला झाला त्याबद्दल पण त्या कॅमेरामनचे (पवन भारद्वाज) म्हणणे मांडले आहे. त्या कॅमेरामनच्या सांगण्याप्रमाणे, तो त्याच्या एका स्त्री सहकार्यांबरोबर स्टुडिओच्या बाहेर न्यूज कव्हर करण्यासाठी थांबला होता. न्यूज काय, कोणाबद्दल आहे हे त्याला सांगण्यात आलं नव्हतं. सुमारे ४ तास थांबल्यानंतर तनुश्रीसाठी एक गाडी आली. त्याबरोबर तनुश्री व्हॅनिटी व्हॅन मधून बाहेर आली. म्हणून पवन आणि त्याची सहकारी शूट करण्यासाठी पुढे आले. त्यावेळेला तनुश्रीच्या वडिलांनी पवनचा कॅमेरा तोडला आणि पवनच्या महिला सहकार्याचे केस ओढून बाजूला ढकललं. नंतर गाडी पुढे नेताना ती पवन आणि त्याच्या महिला सहकार्याच्या पायावरून गेली. त्यामुळे दोघेही खाली पडले. पुढच्या गेटवर जमावाने गाडी थांबवली म्हणून पवन पुढे गेला आणि नुकसान भरपाई मागू लागला. ते दाद देत नव्हते म्हणून हवा सोडण्याचा प्रयत्न केला असे दिसते. अर्थात बाकी जमाव कोण होता हा प्रश्न विचारला जातोय आणि त्यातही एक पांढरा शर्टवाला गाडीवर नाचतोय हे दिसतंय. पण पोलीस आणि बाकीचे त्याला थांबवायचा प्रयत्न करत आहेत हे पण दिसतंय. स्टुडिओ मध्ये बरेच लोक उपस्थित असणं हे काही नवीन नसावं आणि त्या लोकांनी तनुश्रीच्या वडिलांनी केलेलं आणि या दोघांच्या पायावरून गाडी गेलेली बघितलं असावं, म्हणून त्यांनी पुढे गाडी अडवली असावी का? अश्या बऱ्याच शक्यता आहेत, त्यामुळे लगेच मीडिया ट्रायल करून दोषी फिक्स करू नये असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 10:48 नवीन
...त्यामुळे लगेच मीडिया ट्रायल करून दोषी फिक्स करू नये..
अगदी सहमत, पण एकदा मिडियात आले कि इतरांनी चर्चा करणे स्वाभाविक होते. अशी चर्चा संयमीत विवेकपूर्ण राहील या साठी तुमच्या माझ्या सारख्या जागरुकांनी आपण मांडणी प्रयत्न करता तसा संयमीत मांडणी प्रयत्न करणे रास्त असावे.
....स्टुडिओ मध्ये बरेच लोक उपस्थित असणं हे काही नवीन नसावं आणि त्या लोकांनी तनुश्रीच्या वडिलांनी केलेलं आणि या दोघांच्या पायावरून गाडी गेलेली बघितलं असावं, म्हणून त्यांनी पुढे गाडी अडवली असावी का? ....
असायला काय अगदी सही मागण्यासाठी थांबलेले फॅन सुद्धा असू शकतात ;) (वकिली उपहास ह. घ्या.) अगदीच फॅन मंडळी नसली तरी मुलाखतेच्छु पत्रकार किंवा अनेकविध व्यक्तिगत कारणांनी एकाच वेळी पोहोचलेल्या व्यक्ति किंवा तनुश्री आक्षेप घेते तसा ठरवून पाठवलेला जमाव हा चौकशीचा विषय असावा. पोलीस चौकशी या विषयावर पुढे गेली नसेल तर तोही कदाचित वेगळ्या चौकशीचा विषय असू शकेल. आणि न्यायालये आपली मते मांडतील निर्णय घेतील. वर माईंनी मांडलेल्या मुद्द्यातले तथ्य असे की तो जमाव स्टुडीओच्या आवारात असेल तर स्टुडिओच्या आवारातून अगदी काम सोडलेला व्यक्तीसुद्धा सुखरुप बाहेर पडेल हे बघण्याची दिग्दर्शकाची आणि प्रोड्यूसरची अप्रत्यक्ष जबाबदारी असू शकते. - बॉलीवूड फिल्म फेडरेशनने स्त्री कलाकार घरी पोहोचे पर्यंतच्या सुरक्षीततेची बाब या गाजावाजानंतर मनावर घेतल्या सारखे दिसते आहे- नाना पाटेकरांनाही समजा जमावा विरोधात लगेच मदत करता आली नाही तरी कळल्या नंतर सहकलाकार घरी सुखरुप पोहोचला का आणि आता कसा आहे हे चौकशी चिंता आणि कळकळ व्यक्त केली असल्यास कल्पना नाही .
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 11:09 नवीन
...तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला....
आधी, स्टेजवर हात धरला की नाही धरला ? , धरला या बाजूने कोण कोण विटनेस आहे , नाही धरला या बाजूने कोण कोण विटनेस आहे आणि त्यांची साक्ष साक्षीची उलट तपासणी या नंतर नेमके तथ्य पुढे येईल. हात धरला गेला असेल तर उद्देश्य आणि हेतूंच्या योग्या योग्यतेचा समज गैरसमजांबद्दल कोर्टापुढे बाबी मांडाव्या लागतील आणि कोर्ट उद्देश्य आणि हेतूंची निर्मळता स्विकारते का पहावे लागेल. नानांना अशी कोणती स्टेप माहित होती की जी नृत्य दिग्दर्शका कडून प्रशिक्षीत करुन घेता आली नाही हा तनुश्रीचा मोठा प्रश्न असावा. कारण द्यायचेच तर कॅमेराचा अँगल समजावण्याचे द्यावे स्वतःलाच नृत्य येत नसताना नृत्य शिकवण्यास निघाले हे अगदी निखळ विनोदाचा प्रयत्न म्हणूनही सांगता येईल पण नृत्य न येणारी व्यक्ती नृत्याच्या स्टेप सिरीयसली सांगत होती हे नेमके कसे स्विकारले जाऊ शकेल याची कल्पना नाही. नाना तिथे थांबलेच का ? हा तनुश्रीचा प्रश्न / भूमिका मात्र सहसा रास्त धरली जाऊ नये कारण स्टेजवर कुणि कुणि थांबावे हा दिग्दर्शकाचा प्रिरॉगेटीव्ह असावा. नृत्य करताना अभिनय सुद्धा करावा लागतो आणि तो अभिनय कसा असावा हे सांगण्याचा नानाचा अधिकार मोठा असू शकतो. किंवा नृत्याच्ता वेळी नाना प्रेक्षकात अथवा स्टेजवर आहे हे दिग्दर्शकास दाखवायचे असू शकते. अर्थात नानां किंवा अजून कुणाकडून कराराचा भंग अथवा गैर वर्तन झाल्याच्या नंतर अमुक एक व्यक्ती स्टेजवर नको असे कलाकारास सांगता यावे असे वाटते .
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/11/2018 - 11:27 नवीन
"तनुश्री प्रकरणात तिचं म्हणणं आहे की नाना सेटवर येऊन तिला हात धरून डान्स स्टेप्स शिकवायला लागले. त्या वेळेच्या नृत्य दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की तनुश्रीला बराच वेळ झाला तरी स्टेप्स जमत नव्हत्या. त्यामुळे वैतागून नाना सेटवर गेला आणि तिला हात धरून स्टेप्स करून दाखवू लागला. तिचा आक्षेप या कृतीवर आहे. त्या चित्रपटात नाना व तनुश्री मुख्य भूमिकांमध्ये होते, मग तिला नानाची ही कृती अपमानास्पद वाटली असावी का?" नाना त्याच्या अभिनयाबद्दल माहित आहे. त्याने तिला नृत्य शिकवावे ईतपत त्याच्याकडे नृत्यकला अवगत आहे का? तिने दिलेल्या मुलाखतीनुसार-नानाला हे सगळे करण्याची गरजच काय ?तो एक दिवस आधीच येउन तिच्याकडे रोखून बघत होता असे ती म्हणते. सुरुवातीला तिने आक्षेप घेतल्यावर "नाना ज्येष्ठ अभिनेता आहे. आम्ही काहीच करू शकत नाही. जरा सहन कर" असे दिग्दर्शक्/नृत्यदिग्दर्शक तिला म्हणाले. "मी मनात येइल ते बोलतो.. पटेल तेच करतो" असे म्हणणार्या लोकांबद्दल लोकाना एक आकर्षण असते. त्यामुळे नानाचे लोकाना तसे कौतुक वाटते. पण येथे त्याने मर्यादा ओलांडली . कुणी दुसरी अभिनेत्री असती तर सहन केले असते. पण कितीही नाके मुरडली तरी ती माजी मिस. इंडिया आहे. "माझी परवानगी न घेता मला स्पर्ष करून मला नाच शिकवणारा हा कोण?" असा प्रश्न तिला नक्किच पडला असणार. नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील?
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 11:41 नवीन
माईसाहेब आपण उपप्रतिसाद नक्की माझ्या प्रतिसादाला दिला आहे का ? की अनवधानाने ? माझ्या प्रतिसादात नेमके काय राहून गेले की आपण शेवटच्या परिच्छेदातील भावना माझ्या प्रतिसादाचा उपप्रतिसादात आली ? कुठे चुकले ते कळावे म्हणजे अधिक नेमके पणाने संवाद साधता येईल . कळावे संवाद साधावा हि नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 11:51 नवीन
...नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील?...
माईसाहेब मुद्दा कंसेंट कंसेंट आणि कंसेंटचाच आहे. पहिली कंसेंट ज्या व्यक्तीला नृत्य शिकवले जात आहे त्याची/तिची दुसरी कंटेंट घर/जागा मालक अथवा भाडेकरुची. कंसेट असेल तर रहावे नसेल हाकलावे , अर्थात घर या वास्तुच्या मालकाला वास्तुचा मालक या नात्याने ठेवण्याचे अथवा हाकलण्याचे अधिकचे आधिकार अंशतः असू शकतात. गुरु शिष्य नात्यात शुचितेचे दृष्टीकोण शिष्यांच्या व्यक्तिगत दृश्टीनुसार बदलते असू शकतात आणि त्यानुसार कंसेंट बदलू शकते. शिष्याची परवानगी असून गुरु स्पर्ष करत असेल तर आभाळ कोसळ्ले म्हणणारे नैतिक सुभेदारी करणारे काझी कोण ? कंसेंट नसेल तर अशा गुरुंना टाटा अगत्याने करावे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 11:54 नवीन
मायनर्स साठी कंसेंटचा ऑप्शन उपलब्ध नसण्याची मोठी शक्यता असू शकते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 10/12/2018 - 07:04 नवीन
" नाना तुमच्या घरी अभिनय शिकवायला आला आणी तुमच्या स्त्री सदस्याना सारखे स्पर्श करून नाच शिकवू लागला तर येथील पुरूष सदस्य काय करतील? हाकलून देतील की नाना तसा नाही म्हणून सहन करत राहतील? " माई , स्रियांवर होणाऱ्या अन्यायबद्दल तुमचा सात्विक संताप समजू शकतो पण आपले मुद्दे ' योग्यच ' आहेत हे सिद्ध करण्यासाठी या धाग्यावर चर्चा करणाऱ्या पुरुषांचा उद्धार करून काय फायदा ? वरील तुमचे वाक्य वाचून चाळीतील नळावर एकमेकांची धुणी धुणाऱ्या बायकांची आठवण झाली . भविष्यात सनी ताईवर असा धागा निघाल्यावर वरील वाक्य तुम्हाला उद्देशून कोणी वापरले तर चालेल का ? विचार करून च त्रास होतो ना ? तुमच्या श्रेष्ठत्वचा आब तुम्हीच ठेवला पाहिजे . रस्त्यावर चालताना एखादया मुलाने डोळा मारला तर त्याच्या कानफटात लावतील अशा स्वाभिमानी मुली आपल्याला पूर्वी आणि आताही भरपूर दिसतील , रस्यावरची मुलगी कानाखाली लावू शकते मग या महिलांनी त्याच वेळी अन्याय करणाऱ्याच्या कानाखाली का नाही लावली ? नाही लावली कारण बऱ्याचजनींनी स्वाभिमान गहाण ठेऊनच त्या क्षेत्रात प्रवेश केलेला असतो त्यामुळे तारकांची लाफडेबाजी व त्यावर शेरे मारताना विनाकारण इतर मिपासदस्यांना कस्पटासमान लेखू नका ही विनंती .
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 11:35 नवीन
...दुसऱ्या बाजूने विचार करता तिला काम नाही मिळालं तरी चालेल पण असल्या तडजोडी करणार नाही असं म्हणायचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही....
आपल्याला '...त्यामुळे दोष कोणा एकावर ठेवणे योग्य नाही....' या वाक्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते निटसे उमगले नाही.
....म्हणजे एक होतकरू मुलगी ऑडिशनला गेली आणि तिथल्या एखाद्या निवडीचे अधिकार असलेल्या व्यक्तीने तिला सांगितलं की तुला काम देईन पण त्याची इच्छा पूर्ण करायला लागेल. काम मिळवण्यासाठी नाईलाजाने का होईना पण तिला त्याची इच्छा पूर्ण करायला लागली. वर ती राजीखुशीने करत आहे असा अभिनय पण करायला लागला तर तिची 'कंसेंट' होती असं म्हणायचं का? ...
या बाबत नेमके कायद्यांचे बारकावे माहित नाहीत पण इंडियन काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसार इतर कायद्यानुसार बेकायदेशीर असलेले काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसारही सहसा अग्राह्य होते , आणि स्त्री पिळवणूक विरुद्ध कायद्यांनुसार आपण म्हणता तशी अट अधिकृतपणे घालणे बहुधा बेकायदेशीर ठरावे. आता एखाद्या स्त्रीने काम मिळवण्यासाठी स्वतःहून स्वतःस अर्पण केले तर त्यास कायद्याचा नाईलाज असेल कायद्यास तिथे प्रोटेक्ट करणे अवघड जाईल. उदाहरणार्थ सध्याच्या मीटू मध्ये एका लेखिकेचे मनोगत आले आहे ज्यात काही वेळा नटाने विदाउअट कंसेंट कृत्य केल्याचे म्हटले आहे , कंसेंट नसलेले नटाचे कृत्य बेकायदेशीर असेल. पण त्याच नटाकडे सध्या इतर काम नाही काम तर पाहीजे म्हणून लेखिका स्वतंहूनही एकदा गेली असे म्हणते, अशा वेळी तिने स्वतःहून कंसेंट दिली असे होते. कारण कायद्याच्या भूमिकेतून तो काम देत नसेल तर कायद्याचा मार्ग त्या स्त्रीने स्विकारावयास हवा होता अथवा दुसरे काही काम दुसरीकडे तिला शोधता आले असते. (आधीच्या एका मिपासदस्य सामान्य नागरीक या प्रतिसादकाचा हा दृष्टीकोण की चित्रपटात काम केलेल्या जवळपास सर्वच नट स्टेज बाह्य कंसेंटच्या मार्गाने चित्रपटसृष्टीत पोहोचत असणार हा अनावश्यक सरसकट दोषारोपणाचा आणि अस्पृहणीय आहे हे आधीच्या त्यांना दिलेल्या प्रतिसादातून नोंदवायचे राहीले आहे . चर्चा चालू आहे तर येथे नोंदवून ठेवतो) अर्थात पडद्या मागच्या कंसेंटची आपण हकनाक चर्चा करत आहोत असे वाटते. तनुश्री प्रकरणात स्टेज बाह्य कंसेंटचा प्रश्न नाही , स्टेजवरील कंसेंट बाबतच्या करारात काय होते आणि काय नव्हते हा प्रश्न असावा . चुभूदेघे . कायदे विषयक अचूकतेचा दावा आणि सल्ला नाही उत्तरदायीत्वास नकार लागू.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/11/2018 - 12:41 नवीन
नाच न येणार्या पुरूष अभिनेत्याने अभिनेत्रीला सारखा हात लावावा, ज्या नाचात त्या स्टेप्स नव्हत्या त्या घुसडवाव्यात.... कसला कन्सेण्ट घेऊन बसलात ? डोके ठिकाणावर असणारा दिग्दर्शक असता तर चार कान्फटात मारून नानाला हाकलून दिला असता . पण तो सारंग नानाचा जुना मित्र होता.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 14:06 नवीन
.....कसला कन्सेण्ट घेऊन बसलात ? .....
आपण तनुश्री दत्तांच्या सर्व मुलाखती नीटपणे पाहिल्यात का ? ती स्वतःपण कंसेंट बद्दलच बोलते आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटात इम्रान हश्मी हिरो होता. त्याच्या सोबतच्या शुटींग बद्दल तिचे काही आक्षेप दिसत नाहीत म्हणजे प्रोड्यूसर दिग्दर्शकाने करारात व्यवस्था केलेली असेल किंवा करार कंसेंटने बदलला असेल. या चित्रपटाच्या करारात पूर्व प्रावधान कंसेंट नव्हती एवढाच विषय आहे. (चॉकलेट हिरो नसल्याने नाना पाटेकरांना तिने कंसेंट व्यावसायिक दृष्टीने कंसेंट देण्याचे तिला टाळावयाचे असू शकते. दिग्दर्शक आणि नाना इरेला पडण्यात आणि तिने नाकारण्यात बहुधा इगो क्लॅश आणि व्यायसायिक गणित अधिक असावे. म्हणजे दिग्दर्शकाच्या अथवा नानाच्या काही चुका झाल्या असतील तर नाकारायच्या असे नव्हे. भारतीय लोक परंपरेने शुचितेच्या अंगाने विचार करत असावेत आणि स्वतः तनुश्रीची गणिते कंसेंट, व्यावसायिक गणित अधिक महत्वाचे असासोब, शुचितेचा मुद्दा बॅक ऑफ माइंड नसेलच असे नाही कारण त्या संबंधाने तिचे सिने सृष्टी बद्दल पूर्वग्रह असावेत आणि इम्रान हश्मी वगैरे तरुण स्मार्ट अ‍ॅक्सेप्टेबल हिरोंबाबत बाबत शुटींग करताना शुचितेचे मुद्दे करारात (कंसेंट) असेल तर तिने डायल्यूट होऊ दिले असावेत. असे तनुश्रीच्या निवड स्वातंत्र्याचा आदर ठेऊनही म्हणावेसे वाटते. तिला आधीच सिनेसृष्टीबाबत पुर्वग्रह होते त्यात आयटम साँगबद्दल अधिक पूर्वग्रह होते, असे तिच्या मुलाखतींवरुन जाणवते. त्यामुळे नाना पाटेकर किंवा इतर कुणाच्या अ‍ॅक्टींग कौशल्याने प्रभावित होणे झाले नसावे . ह्यामुळेच नानांसोबतच्या आता पर्यंतच्या इतर हिरॉईन स्त्री सहकलाकारांच्या तक्रारी आल्या नसाव्यात पण तनुश्री नानाच्या अभिनय कौशल्याने प्रभावित होण्या एवजी पुर्वसाशंकीत किंवा पुर्वग्रहीत असण्याची शक्यता असावी असे वाटते.
...पण तो सारंग नानाचा जुना मित्र होता....
दिग्दर्शक महोदयांना इतर पण मित्र असतील ना पण प्रत्येक मित्राचा आग्रह दिग्दर्शक पूर्ण करतो का ? चित्रपट आणि मालिका लीड कलाकारांवर अवलंबून असतात एकदा चित्रपटाच्या शुटींगचा मोठा भाग झाला की लीड कलाकार बदलणे छोट्या निर्माता दिग्दर्शकांना महागाचे असू शकते हा घटक मित्र असण्यापेक्षा अधिक प्रभावी असावा. दिग्दर्शक हा ही कलाकार असतो, चित्रपट निर्मिती ते नृत्य दिग्दर्शन एक कला निर्मिती प्रक्रीया आहे. कला निर्मिती प्रक्रीयेत एखाद्या दृश्य ते नृत्य यात बदल करण्याचा प्रिरॉगेटीव्ह दिग्दर्शकाचा असणे स्वाभाविक असते. - शक्य आहे कि नाना पाटेकरांना खूश ठेवण्यासाठीही बदल करण्याचा प्रयत्न असेल - पण कलाकार हे माझ्या करारार नाही किंवा करारत असुनही करार मोडू इच्छिते हे म्हणण्यस तनुश्री किंवा इतर कलाकार स्वतंत्र असू शकतात. पण करार बदलण्याची चर्चा करण्याचा नव्या स्टेप कलेच्या गरजेच्या दृष्टीने जोडण्याचा आधिकार दिग्दर्शकासही आहे. स्टेप्स बदलण्याची चर्चाच का केली हे म्हणणे सयुक्तिक नाही . करारात नसलेल्या स्टेप्स आहेत क्षमा करा मी निघाले एवढे तनुश्रीस करता येते. म्हणून इथे मतांतर होते.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/11/2018 - 14:35 नवीन
"करारात नसलेल्या स्टेप्स आहेत क्षमा करा मी निघाले एवढे तनुश्रीस करता येते. म्हणून इथे मतांतर होते. " तिने तेच तर केले आणी ती गाडीत जाउन बसली. त्या आधी नाच कसा करयचा हे नाना तिला शिकवू पाहात होता. नानाने जास्तच जवळीक करयचा प्रयत्न केल्यावर ती साहजीकच चिडली. आणी ईथेच नानाचा व दिग्दर्शकाचा ईगो दुखावला. मुख्य मुद्दा म्हणजे नृत्यदिग्दर्शक असताना नानाला तिला नाच शिकवायची काय गरज? कारण एकच "मी शहाणा" . नवतारका हे एकवेळ सहन करतील पण मिस. ईंडिया वगैरे जिंकलेल्या मुली हे सहन करणार नाहीत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 16:16 नवीन
आता एक बघा, समजा १) अगदी अशाच ( खर्‍या किंवा काल्पनिक) इतिहास कालीन घटनेवर एक दिग्दर्शक चित्रपट बनवतोय , आणि या चित्रपटात नाना पाटेकर आणि तनुश्री सह कलाकार आहेत. आणि दिग्दर्शकाच्या स्टोरी नुसार नाना पाटेकरने तनुश्रीला दंडाला धरुन स्टेजवर वेग वेगळ्या ठिकाणी जाऊन नाचण्यास सांगावयाचे आहे . आता कथा पटच तसा असेल तर तनुश्रीला नाना पाटेकरचा तो अभिनय स्विकारण्या वाचून प्रत्यवाय रहात नाही. समजा २) पटकथेत विनोदा खातर डान्स न येणारा हिरो नृत्यांगनेस चुकीच्या स्टेप कशा शिकवतो हे दाखवायचे आहे तर सह कलाकार म्हणून तनुश्रीस ते स्विकारावे लागले असते की नाही ? आता हे तिला ती संपूर्ण चित्रपटासाठी सहकलाकार असती तर स्विकारण्यावाचून पर्याय राहीला नसता कारण चित्रपट कलाकाराच्या कामाचा आणि कराराचा भाग राहीला असता. (त्याच वेळी स्टेजच्या बाहेर ही वर्तने संमती शिवाय झाली तर बे कायदेशीर ठरु शकतात) नाना पाटेकरांच्या सोबतच्या या केस मध्ये काँट्रॅक्ट अ‍ॅक्ट नुसार तिने केवळ सोलो डान्स साठीचा करार केला म्हणून प्रॉब्लेम झाला. या केस मध्ये मुख्य प्रॉब्लेम दिग्दर्शकाच्या अथवा प्रोड्यूसरच्या बाजूस ब्रीच ऑफ काँट्रॅक्ट आणि अंशतः ब्रीच ऑफ ट्रस्ट असू शकतो. नाना पाटेकर करार माहित असून तसे वागले अथवा करार महित नसून वागले या मुद्द्यास यामुळेच महत्व प्राप्त होते. कारण सर्वसाधारण परिस्थितीत स्टेजवर कलाकारांना आणि नानासाठी नानाचे वर्तन सामान्य ठरणारे असू शकते. आणि म्हणून ज्यांना तनुश्री ओव्हर रिअ‍ॅक्ट करते आहे असे वाटते त्यातही तथ्य आहे त्याच वेळी करारच्या मर्यादा माहित असून नानाचे वर्तन तसे राहिले असेल तर कायद्याचे बाजूलाही ठेऊन स्पृहणिय ठरेलच असे नाही. त्यामुळेच आधीच्या प्रतिसादातून मी या इंडस्ट्रीच्या लिबरल आर्टचे स्वरुप समजून घेऊन कोड ऑफ कंडक्ट आणि काँट्रॅक्ट चे अधिक आदर्श नमुन्यांच्या उपलब्धतेची गरज नमुद केलेली आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/11/2018 - 17:15 नवीन
कारण सर्वसाधारण परिस्थितीत स्टेजवर कलाकारांना आणि नानासाठी नानाचे वर्तन सामान्य ठरणारे असू शकते
इथे तसे नव्हते. तनुश्रीने जेव्हा प्रथम तकार केली तेव्हा दिग्दर्शक व ईतरानी तिला- " तुझा प्रोब्लेम समजू शकतो पण नाना ज्येष्ठ कलाकार आहे ना" थोडक्यात नानाला कोणी समज दिली तर नाना त्याच्या स्वभावानुसार चित्रपट सोडून गेला तर मोठे नुकसान. म्हणून "तू जरा सहन कर" म्हणजे नानाचे वर्तन त्यानाही मान्य नव्हते ते नाईलाजाने सहन करत होते.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 10/11/2018 - 18:11 नवीन
तनु आणि नानु अनुक्रमे माई आणि मागा आहेत असे उगीच वाटून गेले. . असतील ही, काही सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 18:18 नवीन
आमच्याकडे ज्येष्ठता आणि कला दोन्ही नाही , तो मक्ता आपणास सप्रेम भेट ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 18:45 नवीन
...नाना त्याच्या स्वभावानुसार चित्रपट सोडून गेला तर...
चित्रपट सोडून गेलातर ची भिती असू शकते , मान्यय. 'स्वभावानुसार' या बिरुदवली साठी काही आधार आहेत का ? मिडिया ट्रायल नाही ना ? ( चित्रपटांमध्ये माझी विशेष रुची नसते म्हणून विचारतोय )
...म्हणजे नानाचे वर्तन त्यानाही मान्य नव्हते ते नाईलाजाने सहन करत होते....
तसे असेल तर प्रोड्युसर आणि दिग्दर्शक दहा वर्षांनंतर कशाला सपोर्ट करत बसले असते ? असा एक प्रश्न शिल्लक रहातो . एका पाठोपाठ एका पेक्षा अधिक स्त्री कलाकार / पत्रकार अलोकनाथ आणि एम जे अकबर बद्दल बोलू लागले तेवढी संख्या आज या घटके पर्यंत तरी नाना पाटेकरांच्या वाटेला आलेली दिसत नाही. अर्थात इतर स्त्री सहकलाकारांचे उघड समर्थनही अद्याप नानांना मिळालेले दिसत नाही हे पण मान्य करावे लागेल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 10/11/2018 - 18:48 नवीन
स्त्री आणि पुरुष दोन्ही तारे तारकांच्या एवढ्या एक्सेंट्रीसिटीजना निर्माता दिग्दर्शकांना नेहमीच तोंड द्यावे लागत असणार. अर्थात इंडस्ट्रीत कामाला सुरवात होतानाच कोड ऑफ कंडक्टच्या क्लचरची सवय लावणे हाच यावर अधिक सुयोग्य उपाय असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 10/12/2018 - 23:28 नवीन
करारात काय कुठल्या स्टेप्स कुठल्या गाण्यात करणार इतक्या डिटेल मध्ये लिहिलेले असते का? काय काम असेल याची साधारण रूपरेषा, सर्वसाधारण कामाच्या वेळा याचबरोबर दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे काम करावे असे पण एक कलम असेल ना? स्त्री कलाकारांच्या साठी अंगप्रदर्शन करणार नाही, आयटम सॉंग करणार नाही वगैरे अधिकची कलमे असतील. पण पूर्ण सिनेमातले सगळे सीन व गाणी आणि त्यात कोण काय करणार असं कॉन्ट्रॅक्ट करणं अवघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक दृष्ट्या सामान्य माणूस आपल्या रोजच्या जीवनात आपण काही चला आज आता कोणाला तरी त्रास देऊ किंवा आज कोणाला तरी छेडू किंवा आज मारामारी करू अश्या उद्देशाने घराबाहेर पडत नाही. उद्या जर ऑफिसमध्ये एक स्त्री आणि पुरुष एकत्र काम करत असतील आणि त्या दोघांना मिळून आज एक काम पूर्ण करायचं आहे. त्या स्त्रीला जर एक काम जमत नाहीये म्हणून तो पुरुष सहकारी तिला समजावून सांगतो आहे. १० वेळा सांगून झालं तरी काम नीट होत नाही म्हणून वैतागून त्या पुरुष सहकाऱ्याने नुसतं तिला सहज खांद्याला हात लावून बाजूला केलं आणि स्वतः ते काम करायला बसला. यावर ती स्त्री नाराज झाली व त्यातून मला जमत नाही हे लपवायला आणि "हा कोण मला शिकवणारा" या भावनेने त्या मुलीने तक्रार केली की याने मला नको तिथे स्पर्श केला. मग बाकी सगळं राहिलं बाजूला आणि सगळे त्या पुरुषाच्या मागे लागतील. माझ्या वरच्या एका प्रतिसादात मी सर्वजीतची केस सांगितली आहे. तो काय आज एका मुलीला छेडू म्हणून घराबाहेर पडला असेल का? थोडक्यात सांगायचा उद्देश काय तर परिस्थिती तशी तयार होत जाते आणि मग प्रतिक्रिया म्हणून आपण काही तरी कृती करतो जी समोरच्याला काही कारणाने ऑफेन्सिव्ह वाटू शकते. इंटेन्शन काय आहे हे महत्वाचं. माझा एक म्यानेजर होता तो मुद्दामून मुलींना हात लावायचा, डेस्कवर अगदी चिकटून उभं राहायचा. त्याचा उद्देश उघड होता. मुख्य मुद्दा म्हणजे नृत्यदिग्दर्शक असताना नानाला तिला नाच शिकवायची काय गरज? कारण एकच "मी शहाणा" माई तुम्ही मी टाकलेला व्हिडीओ नीट बघितला का? ही बातमी पण वाचा. नृत्य दिग्दर्शकाने पण तिला बरेच वेळा स्टेप्स दाखवल्या. त्यात तिने Sexual Harassment सारखा गंभीर आरोप लावला आहे. समजा असं समजू की नाना सेट वर गेला आणि तिचा हात धरून तिला नाच शिकवू लागला. हे एकवेळ अशिष्ट वर्तन म्हणता येईल. नानाने काही अश्लील चाळे केले किंवा अश्लील बोलला असं काही दिसत नाही किंवा तनुश्री सुद्धा तसं काही म्हणत नाहीये. इथे मी शहाणा चा प्रश्नच येत नाहीये कारण नृत्य दिग्दर्शक, सिनेमा दिग्दर्शक आणि इतर सहाय्यकांनी पण तिला स्टेप्स दाखवायचा तसेच चेहऱ्यावर हावभाव आणावे म्हणून प्रयत्न केला. मी कोणाची बाजू घेतोय असं नाही पण प्रश्न हा आहे की १० वर्षांपूर्वीची गोष्ट सिद्ध कशी करणार? सहकलाकाराचा हात धरून नाचणे हा #मीटू इतका गंभीर गुन्हा कधीपासून झाला? तिने जरी १० वर्षांपूर्वी पण तक्रार केली होती तरी त्यातून काही सिद्ध झालं होतं का? त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे तक्रार केली म्हणजे समोरचा दोषीच असणार हा दृष्टिकोन का? तुम्ही एखादा व्यवसाय स्वीकारता तेव्हा त्यातील लिखित व अलिखित नियम तुम्हाला माहित पाहिजेत. सिनेमा क्षेत्रात असूनही अंगप्रदर्शन करणार नाही किंवा उत्तेजक दृश्य करणार नाही असे सांगून निभावणाऱ्या पण नट्या आहेतच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा