Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नाना आणि तनुश्री

फ
फुकनी
Sun, 10/07/2018 - 22:07
🗣 151 प्रतिसाद
आत्ता सध्या तनुश्री दत्ता चे जे काही गरळ ओकणे चालू आहे त्या विषयी तू नळी वरती बऱ्याच काही चर्चा पाहण्यात आल्या. मला स्वतः ला नाना असे काही करेल असे वाटत नाहीं . तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल. https://www.youtube.com/watch?v=EDx1KywLLrQ&t=1969s

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 72013 views

🗣 चर्चा (151)
ज
जयन्त बा शिम्पि Mon, 10/08/2018 - 03:52 नवीन
येथे अमेरिकेत गेल्या महिन्यापासून सुरु असलेले, प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंम्प पुरस्क्रुत न्यायाधिश पदाचे उमेदवार , त्यांचेवर झालेले ३५ वर्षापूर्वीचे लैंगिक शोषणाचे आरोप, प्रत्यारोप,, टीव्ही व वर्तमानपत्राचे खुलासे-प्रतिखुलासे, हे सर्व तनुश्री ने जवळून पाहिले असण्याची शक्यता वाटते. नाहीतरी आपण भारतीय पाश्चात्यांचे , विशेषतः ,अमेरिकन लोकांचे , अनुकरण करण्यात बरीच धन्यता मानतो. त्यामुळे सध्या जो " नाना-तनुश्री " वाद-विवाद सुरु आहे, तो म्हणजे येथे अमेरिकेत अनुभवत असलेल्या वादाचा ' देशी-अवतार' च वाटतो.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Mon, 10/08/2018 - 04:02 नवीन
' त्या ' सिनेमाचे दिग्दर्शक यांची मुलाखत सुद्धा ऐकली. सेटवर कलाकार,तंत्रज्ञ,कॅमेरामन,स्पॉट बॉय,व इतर किमान शंभर लोक असतांना, नाना पाटेकरांकडून असे काही घडले असण्याची शक्यता वाटत नाही. आणि मुख्य मुद्दा हा की हे सर्व दहा वर्षापुर्वीचे, आत्ताच नेमके कसे आठवले ? त्याचवेळी बोंबाबोंब करण्यास कोणी रोखले होते काय ?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 10/08/2018 - 08:31 नवीन
मुख्य मुद्दा हा की हे सर्व दहा वर्षापुर्वीचे, आत्ताच नेमके कसे आठवले ? त्याचवेळी बोंबाबोंब करण्यास कोणी रोखले होते काय ?
आत्ताच आठवले आहे हे तद्दन खोटं आहे. हे असलं खोटं कसं बोलवतं तुम्हाला? तीने अनेक वर्षापूर्वीदेखील याबद्द्ल सांगितलेलं आहे.
In 2008, Tanushree accused Nana Patekar of sexually harassing her on the sets of the movie Horn 'Ok' Pleassss. In March 2008, she filed a complaint with 'CINTAA'(Cine & TV Artists Association) but no action was taken then. This allegation was repeated in 2013 in an interview[6] and then again in 2018.
आणि समजा आधी नाही, केवळ आत्ताच तिने हे सांगितलं तरी ते चूक कस काय. एखाद्या क्षेत्रातल्या प्रस्थापित माणसाविरुद्ध तक्रार करण्याचं करेज लगेच येईलच असं नाही. ही भीती चेपल्यावर तक्रार केली तर काय प्रॉब्लेम आहे? तीच गोष्ट इतर लोकांबद्दल. प्रत्येकाला आपपल्या करीयरची काळजी असते. सो तंत्रज्ञ वगैरे लोकांनी असल्या घटना घडताना पाहुन याबद्दल तक्रार न करणं नक्की पॉसिबल आहे. (अयोग्य आहे गप्प रहाणं, पण शक्य आहे.)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 10/08/2018 - 06:17 नवीन
मिडिया किंवा सोशल मिडिया ट्रायलची नव्हे तर वकिली उलट तपासणीस समोर जाव्या लागणार्‍या खर्‍या न्यायालयीन ट्रायलची गरज असावी. खरे म्हणजे खर्‍या न्यायालयीन ट्रायलच्या दृष्टीने दहा वर्षांचा काळ मध्ये जाणे सयुक्तिक नसावे पण न्यायासना समोर न जाता मिडिया ट्रायल करण्या पेक्षा न्यायासनासमोर सोक्ष मोक्ष करणे अधिक उत्तम. पण त्याही आधी २००८ मध्येच मिडिया समोर जाण्या आधी, तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकरांचा आपापसात संवाद साधून समज गैरसमजांबाबत चर्चेच्या एक राउंड होऊन जावयास हवा होता, आणि त्यानंतर तरीही गरज वाटली तर न्यायालयीन केसचा मार्ग तनुश्री दत्तांसाठी मोकळा होता.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 10/08/2018 - 11:18 नवीन
स्वतःच्या फायद्या साठी काही जणी पुरुषांना मोहात पाडण्याचा प्रयत्न करतात , आणि समस्त स्त्री वर्ग बदनाम होतो . नांना च्या केस मध्ये ती तनुश्री तब्बल 7 वर्ष गप्प बसली , तीन वर्षांपूर्वी सर्वात प्रथम तीने आवाज उठवला , पण नानांचे प्रस्थ मोठं असल्यामुळे ज्यास्त चर्चा झाली नाही . काल परवा तिने ट्विट करून पुन्हा एकदा मीडियाला साकडे घातले . पेज 3 मध्ये अशी ही वदंता आहे की तनुश्री बिगबॉस मध्ये भाग घेण्याअगोदर स्वतःचे ब्रँडिंग करत आहे . काल विकास बहल , चेतन भगत वर सुद्धा असेच आरोप झाले . जर आपले नाना निर्दोष आहेत तर त्या न्यायाने बहल , भगत आणि ब्रिगेड चे न्यायाधीश कोळसे पाटील सुद्धा निर्दोष आहेत असं म्हणावे लागेल . कला , क्रीडा , राजकारण आणि व्यवसाय यातील कुठल्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थानी मार्गक्रमण करताना आजूबाजूला मदनिकांचा वावर असतोच . त्याकडे आकर्षीत न होता पुढे जाणारा पुरुष शोधणे खूप अवघड आहे . देव आणि ऋषींना तो मोह सोडता आला नाही तिथे नाना काय करणार ? .
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 10/08/2018 - 11:30 नवीन
अच्छा म्हणजे हे सगळे सत्पुरुष आहेत हे नक्की आणि आजूबाजूला ह्या विश्वामित्रांच्या तपस्या मोडायला मेनका फिरत आहेत हे ही फिक्स. सेक्शयुल हरासमेंट होत नसतेच हे एकदाचं डिक्लेअर का नाही करून टाकत? खरं तर कायदा नावाची गोष्ट आहे. आणि सरसकट काही घडत नसतं असं मान्य करून एकेक केसचा स्वतंत्र तपास केला पाहिजे. त्यातून सत्य काय ते कळेलच. पण तेवढा वेळ कुणाला आहे ना..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/08/2018 - 17:55 नवीन
काय सांगता? खरंच की काय?
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Tue, 10/16/2018 - 08:49 नवीन
I think #MeToo should be applied in this case also. कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव {{ https://www.loksatta.com/pune-news/pimpri-youthopposed-asihwarya-bhat-for-playing-dandiya-who-campaigning-against-virginity-1772374/ }}
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 10/16/2018 - 11:19 नवीन
सहमत, सामाजिक प्रबोधन समाजाच्या विविध स्तरातून होण्याची मजल बरीच बाकी आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Mon, 10/08/2018 - 13:02 नवीन
आपला भाग कर आणि गप्प बस. पण उत्तेजनाच्या नावाखाली इकडे तिकडे हात साफ करून घ्यायचा. बाकी नानाने मनीषा कोईराला पासून , अर्थात तिच्या इछेनेच , कुठे कुठे हात साफ केले आहेत ते लोकांना माहित आहेच. उगाच धुतल्या तांदुळा सारखे आहोत सांगण्यात काही अर्थ नाही. बाकी केवळ नाना मराठी मधला मोठ्ठा नट , बॉलीवूड गाजवलेला , समाजसेवक पण ( नाम फौंडेशन ) केवळ याच कारणा करता त्याला पाठिंबा देणाऱ्या माणसांची किंवा येते. अरे उद्या तुझ्या बायको / बहिणी वर असाच एखाद्या नामवंत नट किंवा समाज सेवकाने हात टाकला तर त्याचे इतर मोठे / सुंदर काम बघून , त्याला माफ करणार का ? https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/tanushree-dutta-misjudged-nana-patekar-s-encouragement-says-director-rakesh-sarang-1350593-2018-09-27 Tanushree Dutta misjudged Nana Patekar's encouragement, says director Rakesh Sarang
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Sat, 10/20/2018 - 12:20 नवीन
अरे उद्या तुझ्या बायको / बहिणी वर असाच एखाद्या नामवंत नट किंवा समाज सेवकाने हात टाकला तर त्याचे इतर मोठे / सुंदर काम बघून , त्याला माफ करणार का ? १. माझी बायको/बहीण लगेच कानफडात ठेवुन देईल. आणि तिने हे केलंय कळल्यावर आसपासचे लोक आणि तदनंतर आम्ही येथेच्छ् बडवुन काढु. आणि तिने असे केलं म्हणुन तिला शाबासकी देऊ. येथील वाचकांना त्यांच्या बायका-बहीणींबद्दल अशी खात्री नक्कीच असेल. २. आपल्या फायद्या साटी नको ते पुरुषांना करु द्यायचे आणी नंतर सोयीने बोंब ठोकायची ह्याला काय अर्थ आहे? ३. #मीटु वाल्या बायकांना कल्पना आहे की नाही कोण जाणे- कुठलीही अशी बोंब/गोष्ट जी कायद्याने सिद्ध करता येत नाही ती ' चारित्र्यहनन ' या प्रकारांत मोडते. एखादा खटला जरी व्यवस्थीत उभा राहिला तर या सगळ्या बोंबा बंद होतील. ४. अश्या गोष्टी होऊ नये आणि त्यासाठी फिल्म इंड. ने योग्य ती काळ्जी घ्यावी/यंत्रणा उभी करावी पण ते होईल असे वाटत नाही . कारण या इंडस्ट्री चा पायाच हा आहे
  • Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक Sat, 10/20/2018 - 12:20 नवीन
अरे उद्या तुझ्या बायको / बहिणी वर असाच एखाद्या नामवंत नट किंवा समाज सेवकाने हात टाकला तर त्याचे इतर मोठे / सुंदर काम बघून , त्याला माफ करणार का ? १. माझी बायको/बहीण लगेच कानफडात ठेवुन देईल. आणि तिने हे केलंय कळल्यावर आसपासचे लोक आणि तदनंतर आम्ही येथेच्छ् बडवुन काढु. आणि तिने असे केलं म्हणुन तिला शाबासकी देऊ. येथील वाचकांना त्यांच्या बायका-बहीणींबद्दल अशी खात्री नक्कीच असेल. २. आपल्या फायद्या साटी नको ते पुरुषांना करु द्यायचे आणी नंतर सोयीने बोंब ठोकायची ह्याला काय अर्थ आहे? ३. #मीटु वाल्या बायकांना कल्पना आहे की नाही कोण जाणे- कुठलीही अशी बोंब/गोष्ट जी कायद्याने सिद्ध करता येत नाही ती ' चारित्र्यहनन ' या प्रकारांत मोडते. एखादा खटला जरी व्यवस्थीत उभा राहिला तर या सगळ्या बोंबा बंद होतील. ४. अश्या गोष्टी होऊ नये आणि त्यासाठी फिल्म इंड. ने योग्य ती काळ्जी घ्यावी/यंत्रणा उभी करावी पण ते होईल असे वाटत नाही . कारण या इंडस्ट्री चा पायाच हा आहे
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Mon, 10/08/2018 - 13:10 नवीन
https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/tanushree-had-filed-fir-2008-molestation-case-1357972-2018-10-07 Tanushree Dutta had filed an FIR in 2008. Tanushree-Nana row: FIR filed in 2008 does not mention Patekar or molestation FIR मध्ये नाव नाही म्हणून नाना स्वच्छ करून उगाच बोंब मारू नका. मुळात FIR दाखल करून घेतली हेच तनुश्रीचे मोठे नशीब.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 10/21/2018 - 14:03 नवीन
अभिजित - १, अभिनिवेश (पक्षी : टण्णूबाईची चमचेगिरी) थांबवा. तनुश्रीने २००८ साली जो प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट केला होता त्याची तारीख २३ मार्च आहे. आणि टण्णूबाईंच्या मते नानाने ३६ मार्च रोजी गैरवर्तन केलं. मग २३ मार्च रोजी अहवाल दाखल करतांना तिला नक्कीच भविष्यातल्या २६ मार्चचा दृष्टांत करवून देणारं स्वप्न पडलं असणार. बरोबर? इथे २३ मार्चच्या हल्ल्याचं चलचित्र आहे : https://www.youtube.com/watch?v=lfEeoCPJ7j4 हल्ल्याचं लक्ष्य ती नसून नसून तिचा सहायक आहे. कारण त्याने चुकीच्या पद्धतीने हाताळून एकाचा क्यामेरा फोडला. त्याचा बदल म्हणून त्याच क्यामेऱ्याने तो माणूस गाडीची काच फोडतांना दिसतो आहे. हा हल्ला घडतांना नाना पाटेकर आपल्या घरी निवांत होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 10/21/2018 - 14:18 नवीन
३६ मार्च ?? अजबच प्रकरण आहे सर्व.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 10/21/2018 - 21:56 नवीन
२६ मार्च आहे ते. चुकीबद्दल क्षमस्व! -गा.पै.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 10/08/2018 - 13:27 नवीन
वर आलेल्या प्रतिक्रिया नां अनुसरून आणि काही माझे वयक्तिक मत दिले होते हो !!! सेक्सयूएल हरेसमेंट होत असेल तर त्या स्त्री ने लवकरात लवकर आवाज उठवावा ही किमान अपेक्षा आहे . अमेरिका पासून भारतातील बऱ्याचशा घटना या 10 ते 40 वर्षा पृवीच्या सुद्धा निघाल्या . ज्या अमेरिकेत स्वैराचार अभिमानाने केला जातो तेथे सुद्धा काल सर्वोच्च न्यायाधीश पदी नियुक्त झालेल्या व्यक्तीस कॉलेज काळातील एका मैत्रिण ने लैगिंक अत्याचाराची केस ठोकली . पेज 3 च्या केसेस मध्ये सुद्धा संशयाला जागा खूप आहे पण कायदा हा ज्यास्त करून महिलांच्या हितासाठी केल्या मूळे चार चार वर्षे एकत्र राहून महिला पुरुषांवर बलात्काराची केस ठोकतात . 'दोन वर्षांपूर्वी गाडीवर बसवून देवदर्शनाला घेऊन जाऊया म्हणून ओळख वाढवली , गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या लॉज वर नेले आणि आता लग्नाला नाही म्हणतोय म्हणून बलात्काराची केस लावली ' अशा तथाकथित बलात्कार घडलेल्या पोलीस केस च्या बातम्या दर दोन दिवसांनी पेपर मध्ये येत असतात . या महिलांना अबला म्हणायचे का ? त्या अनुषंगाने मी ' काही जणी ' हा शब्द वापरला होता . तनुश्री ने सुद्धा इतक्या दिवस गप्प बसण्याचे कारण काय ? गेली 10 वर्ष स्ट्रगल करून सुद्धा बॉलीवूड च्या फोकस मध्ये न येता आल्यामुळे प्रसिद्धिझोतात राहण्यासाठी किमान ' त्या ' घटनेला पुन्हा एकदा उकळी आणण्याचा ती प्रयत्न करीत असावी असं माझं स्पष्ट म्हणणे आहे . कोळसे ,बहल,रजत कपूर, भगत , या सगळ्या घटना मध्ये सगळ्या महिला या पत्रकारिता क्षेत्रातील कशा ? हा एक माझ्या बालबुद्धी ला पडलेला प्रश्न !!! नीरा राडीया ही महिला पत्रकार असून तिची उठबस मंत्री, अधिकारी वर्गात होती . त्या वेळेस तिने केलेली 2 g घोटाळ्यातील स्वच्छ पत्रकारिता सर्वांच्या लक्षात असेलच . तरी बरं आहे त्या वेळचे फक्त आर्थिक घोटाळे बाहेर पडले आहेत आणि नीरा ने # me too वर स्वतःबद्दल काही लिहले नाही , नाहीतर राजकारणातील अजून एक ओंगळ स्वरूप समस्त भारतीय जनतेला दिसले असते .
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Mon, 10/08/2018 - 13:40 नवीन
ट्रम्प भाऊ .. नाव सार्थ केलंत . तुमचे आणि ओरिजिनल ट्रम्प चे विचार एकदम जुळतात !!
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 10/08/2018 - 14:43 नवीन
". अरे उद्या तुझ्या बायको / बहिणी वर असाच एखाद्या नामवंत नट किंवा समाज सेवकाने हात टाकला तर त्याचे इतर मोठे / सुंदर काम बघून , त्याला माफ करणार का ? " अशी जळजळीत प्रतिक्रिया देण्यास काही घरगूती कारण आहे का ? असे मी तुम्हाला तेंव्हाच विचारले का ? नाही विचारले . कारण वैयक्तिक हल्ले मला आवडत नाही !!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 10/09/2018 - 10:32 नवीन
tramp भावू तरी नशीब त्यावेळी मोदी सरकार नव्हते ँनाहितर अभिजित यांनी काय काय केलं असतं विचार करा .
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 10/08/2018 - 17:47 नवीन
कायदेभान हवे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Mon, 10/08/2018 - 13:38 नवीन
तनुश्रीनं नानांवर आरोप केल्यानंतर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. https://www.loksatta.com/manoranjan-news/tanushree-dutta-video-akshay-kumar-filed-a-complaint-to-cyber-police-1766988/ तनुश्री-नाना पाटेकर वादात विनाकारण नाव गोवलं गेल्यामुळे त्रस्त झालेल्या अक्षयनं सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. या वादात अक्षयनं कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही मात्र तरीही अक्षयचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अक्षय तनुश्री विरोधात बोलताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ जुना असून तो एडिट करून त्यात अक्षयच्या तोंडी तनुश्रीचं नाव टाकण्यात आलं आहे. या प्रकरणात अक्षयनं शनिवारी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान हा व्हिडिओ आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. जुन्या पत्रकार परिषदेत अक्षयला एका आघाडीच्या अभिनेत्रीविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील अक्षयच्या प्रतिक्रियेची एडिटींगद्वारे मोडतोड करून त्यांच्या तोंडी तनुश्रीचं नाव टाकण्यात आलं. मात्र अशी कोणतीही प्रतिक्रिया तनुश्रीच्या विरोधात आपण दिली नसल्याचं अक्षयचं म्हणणं आहे. त्यामुळे आता सायबर सेल या व्हिडिओ मागे असलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणुकीचा आरोप केला होता. तसेच अक्षय कुमार सारख्या ब़ड्या कलाकारांनी नाना पाटेकर यांच्यासारख्या कलाकारासोबत काम करणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे तरच Metoo सारखी मोहिम भारतात यशस्वी होईल असं तनुश्री म्हणाली होती. तनुश्रीनं नानांवर आरोप केल्यानंतर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 10/08/2018 - 14:48 नवीन
ज्यांना बायका खोट्या केसेस टाकून पुरुषांना परेशान करणार असं वाटतंय त्यांनी हा व्हिडीओ नक्की बघा. https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156173013313999&id=578143998
  • Log in or register to post comments
र
राजाभाऊ Mon, 10/08/2018 - 15:21 नवीन
कमिडियन्सचे शोज बघुन राजकिय्/सामाजिक मतं बनवणार्‍यांविषयी मला नेहेमीच आदर वाटलेला आहे. हल्लीच वाचलेलं कोबेअर शोच्या लेखिकेचं ट्विट याबाबतीत खुप बोलकं आहे. या बाई म्हणतात - वॉटेवर हॅपन्स, आयॅम जस्ट ग्लॅड वि रुइन्ड कॅवनॉज लाइफ... गो फिगर...
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/11/2018 - 09:13 नवीन
हे माझं राजकीय मत आहे असं म्हणता?! महान आहात! सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्यांविषयी मलाही फार आदर वाटतो! तो मनुष्य कॉमेडियन असला तरी म्हणून त्याचा मुद्दा चूक ठरत नाही. एवढे मोठे आरोप झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या नॉमिनीला ट्रम्प पाठीशी घालतो आणि पुरुषाचं आता काही खरं नाही, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बरबाद करू शकतं म्हणतो तेव्हा अजून काय वेगळी भूमिका घ्यायची असते? आणि आता आपली मतं एका कॉमेडियन सोबत जुळली तर काय मतं बदलून टाकायची की काय? सत्ता हातात असणारे पुरुष त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या स्त्रियांचा गैरफायदा घेऊ शकतात हे लोकांना सहज मान्य होत नाहीये पण स्त्रिया मात्र ह्या लोकांची करिअर , आयुष्य उद्ध्वस्त करणार ह्यावर चटकन विश्वास बसतोय! कारण ते सोयीस्कर आहे! तरी बरं ह्या जगात इन जनरल पुरुषांनी स्त्रियांवर केलेले अत्याचार काही कमी नाहीत. ढळढळीत डोळ्यांना दिसतात ही उदाहरणं. त्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड आहे. पण तरीही जेव्हा स्त्रिया फायनली बोलत आहेत तर चर्चा कसली? आता पुरुषाचं काही खरं नाही ब्वा! ह्या # चळवळींनी किती फरक पडणार, मीडिया ट्रायल्स उपयोगी की चळवळीला घातक हे वेगळे मुद्दे झाले. पण किमान चर्चा सुरू होतेय हे कमी आहे? आणि हे सगळं एक कॉमेडियन मांडतो म्हणून अग्राह्य?? कमाल आहे! स्वतःला इतकं उच्च समजत नाही मी अजून.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/11/2018 - 09:14 नवीन
बादवे, झाला हं तो सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश. कुणाचं आयुष्य नक्की "रुईन" झालं? गो फिगर...
  • Log in or register to post comments
र
राजाभाऊ गुरुवार, 10/11/2018 - 19:30 नवीन
>>स्वतःला इतकं उच्च समजत नाही मी अजून.<< माझी वरची कामेंट हे एक जनरल स्टेटमेंट होतं; नोआ, कोबेअर, स्टुअर्ट इ. च्या अनुयायांकरता. तुम्हि स्वतःच्या अंगाला लाउन घेतलंत, वर हा खुलासा दिलात याबद्दल धन्यवाद. आता कमिडियन्सच्या मुद्द्यांबाबत. मुद्दे सगळेच मांडतात, पण त्या मुद्द्यांमध्ये तथ्य किती, त्याची पार्श्वभूमी काय आहे याचा विचार करणे गरजेचं असते. कमिडियन्स साधारण त्यांच्या शोचा टिआरपी वाढावा याकरता नेहेमी लाइन क्रॉस करतात. एखाद्या घटनेचं सनसनाटी वर्णन करुन टाळ्या खेचणे, संबंधित व्यक्तिचं गुन्हेगारीकरण करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. एक उदाहरण देतो, बघा पटतं का - सेकंड अमेंडमेंट हा इथे कंझरवेटिव, लिबरल या दोघांचा अगदि जिव्हाळ्याचा विषय आहे. जेंव्हा जेंव्हा एखादा माथेफिरु सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करतो, तेंव्हा तेंव्हा गन कंट्रोल हा हॉट टॉपिक हे विनोदवीर ऐरणीवर आणतात. त्यांच्या शोज मधुन गन कंट्रोल कायदे कडक करा, सेकंड अमेंडमेंड रद्द करा वगैरे लिबरल्सच्या कानांना गोड वाटतील अशी विधाने एपिसोड मागुन एपोसोड मध्ये करतात. बट गेस व्हॉट - अमेरिकेत बॅकग्राउंड चेक्सचे नियम कठोर आहेत, ते सगळे नियम जर अंमलात आणले तर गुन्हेगारांना, मानसिक रुग्णांना बंदुका विकल्याच जाणार नाहित. पण इथे इंडिविजुअल स्टेट्सचे कायदे आड येतात. फेडरल गवर्नमेंट जेंव्हा स्टेट गवर्नमेंटकडे ह्या गुन्हेगारांचा/मानसिक रुग्णांचा डेटा शेअर करायला सांगते तेंव्ह्या स्टेट गवर्नमेंट ते करत नाहि. गो फिगर! सँक्च्युअरी सिटीज कडुन फेलन्स्चा डेटा शेअर करायला सांगते तर तिथेहि तोच प्रकार. गो फिगर!! सांगायचा मुद्दा हा कि, कमिडियन्स हे फॅक्ट्स सोयिस्कर रित्या टाळतात आणि फेडरल सरकारची खिल्ली उडवण्यातच धन्यता मानतात. म्हणुन शहाण्या माणसांनी कमिडियन्सचे मुद्दे आंधळेपणाने मान्य करु नये, हे सांगण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता. शेवटि, "लाइफ रुइन" झालं का या प्रश्नाबाबतीत. सिरियसली? कॅनवॉ निवडुन आले म्हणजे त्या आरोपांमुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अब्रु चव्हाट्यावर आलीच नाहि, त्यांना मानसिक त्रास झालाच नाहि असं तुमचं म्हणणं आहे का? तसं असेल तर, परत एकदा धन्यवाद...
  • Log in or register to post comments
त
तिरफळ गुरुवार, 10/11/2018 - 20:25 नवीन
राजाभाऊ यांचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 10/12/2018 - 14:06 नवीन
लाईफ रुईन होण्याची नक्की व्याख्या काय आहे तुमची? आरोप खोटे सिद्ध झाले तर एकवेळ ते म्हणताही येईल की हकनाक बदनामी झाली, मनस्ताप झाला. किंवा आरोप खोटे असूनही जज बनता आलं नसतं तरीही आयुष्य बरबाद झालं असं म्हणता येईल. पण ज्याची सकृतदर्शनी काही "किंमत" मोजलेली नाही त्याला अगदी लाईफ रुईन झाले असं म्हणता येईल? आणि तसं असेल तर फोर्ड बाईंचं काय? त्यांना त्रास नाही का झाला? त्यांची अब्रू चव्हाट्यावर नाही का आली? त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप नसेल झाला? समजा हे आरोप खरे असले तर तुम्ही त्यांना काय वाटत असेल ह्याची कल्पना करू शकताच. मग फक्त ब्रेट काकांचे आयुष्यच उध्वस्त झाले असे म्हणण्या मागचा उद्देश काय? कोणीही कुणावरही असे आरोप करेल तेव्हा हे मानसिक त्रास वगैरे दोन्ही बाजूंना होत असतातच. पण जेव्हा सत्य समोर येईल तेव्हाच कुणी कुणाचं आयुष्य नक्की "रुईन" केलं हे कळेल ना? आधीच ह्याचा निवाडा कसा केला? फोर्ड बैंचा ह्यात काडीचाही फायदा नव्हता. ना आर्थिक, ना मानसिक. कारण statute of limitations मुळे कारवाई तशीही होऊ शकत नाही. प्रसिद्धीसाठी हे करावं अशीही परिस्थिती नाही. इतकं करून तो मनुष्य जज होऊन बसला आहेच. ब्रेट काकांनी अशी आयुष्य बरबाद होण्याइतकी काय किंमत मोजली आहे ब्वा? चुकून पद हातून गेलं असतं तरी असं म्हणता आलं असतं एकवेळ की खरं खोटं माहिती नाही पण किंमत तर मोजली बुवा म्हणून.. इथे ते ही घडलं नाही. बाकी माझा मुद्दा हा पुरुषांना व्हिकटीम ठरवणे आणि फोकस हलवणे हा आहे. त्यावर तुम्हाला काही बोलायचे असेल तर बोलू.. नोआ तुम्हाला निव्वळ टाकाऊ वाटत असेल, मला वाटत नाही. त्याचा जो व्हिडीओ मी शेअर केलाय त्यातला मुद्दा मला पटला, तुम्हाला त्या मुद्द्याविषयी बोलायचं असेल तर बोलू. पण बाकी कॉमेडियन बद्दलची मतं इथे बोलण्यात मला स्वारस्य नाही कारण TRP वगैरे मला कळत नाहीये हे तुमचं गृहीतक वैयक्तिक होतंय आणि चर्चेचा तो मुद्दाही नाहीये. आणि हो, आमच्यात उपप्रतिसादाला अंगाला लावून घेतात. नसेल त्या माणसाला उद्देशून तर एक तर तसं लिहितात किंवा स्वतंत्र प्रतिसाद देतात. पळ मात्र काढत नाहीत. :)
  • Log in or register to post comments
र
राजाभाऊ Sat, 10/13/2018 - 00:41 नवीन
>>फोर्ड बैंचा ह्यात काडीचाही फायदा नव्हता.<< हे बाकि बरोबर. डॉ. फोर्डला डेम्स्नी वापरलं याचा तिला पत्ताच लागला नाहि. सगळा घटनाक्रम पाहिलात तर यात पद्धतशिरपणे, जाणुनबुजुन जज कॅनवॉ यांचा आणि अजाणतेपणि डॉ. फोर्ड यांचं कॅरेक्टर अ‍ॅसेसिनेशन करण्यात आलेलं आहे. हेतु काय तर जज कॅनवॉचं कांफरमेशन पुढे ढकल्ण्यात यावं, मिडटर्म इलेक्शन्स नंतर. यदाकदाचित सेनेटमध्ये मेजॉरिटी वाढली तर आपला माणुस त्या पदावर नेमता येइल, हि डेम्सची राजकिय खेळी. थोडक्यात त्या सर्कसमागे राजकारण होतं बाकि काहिहि नाहि. पण हे सगळं कमिडियन्स सांगत नाहित, महिलांचं अप्रेशन, बड्या व्यक्तिंची लफडी यावरंच तर त्यांचं दुकान चालत असतं. असो. क्लिपमधला नोआचा हुक (ट्रंप विल्डिंग विक्टिमहुड) अगदि कॅची आहे; बरेच मासे त्याने गळाला लावले असावेत... :) >>बाकी माझा मुद्दा हा पुरुषांना व्हिकटीम ठरवणे आणि फोकस हलवणे हा आहे.<< माझ्या मते या प्रकरणात डॉ. फोर्ड इतकंच जज कॅनवॉ यांचं हि विक्टमायझेशन झालेलं आहे. तुम्हाला पटत नसेल तर कॅनवॉ विरुद्ध मुद्दे मांडा, मी ते खोडायचा प्रयत्न करेन. शेवटी, #मीटू मुवमेंट मधुन बाहेर येणारी मेल विक्टिम्सची टक्केवारी नेग्लिजीबल असु शकेल पण आहे यावर दूमत नसावं...
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 10/14/2018 - 15:26 नवीन
मी कशाला विरोधी मुद्दे मांडू? इथे सत्य कुणालाच ठाऊक नाहीये. तुम्ही म्हणालात की त्याचं आयुष्य रुईन झालं, तर मी इतकंच पॉईंट आउट केलं की त्या लॉजिकने ते फोर्ड बाईंचं पण झालं. नक्की कुणाचं झालं हे बघायला ती केस लढली जकी पाहिजे जे होणार नाहीचे. उरला मुद्दा पुरुष सर्व्हयव्हरचा. ते नाहीत असं कुठे म्हणलं मी? पण ट्रम्प म्हणतो तसं "दिस इज या व्हेरी स्केअरी टाईम फॉर अस" म्हणतो ते चूक आहे. सांख्यिकी दृष्टीने अशी बोंब ठोकावी असं काही नाहीये. सध्या तरी सत्तेतल्या जास्तीत जास्त जागा पुरुषांनी occupy केलेल्या आहेत. त्यामुळे abuse of power पुरुषांकडून होणार हे नक्की. मग नगण्य केसेस साठी चर्चेचा रोख बदलावा का? त्या असणार हे कुणी नाकारलं? पण पहिली आणि प्रमुख प्रतिक्रिया असावी अशी परिस्थिती अजूनही नाहीये. पण अर्थात हे नोआने मांडलं आहे म्हणजे तुम्हाला पटण्याचा प्रश्नच नाहीये, हो ना! असो.. मूलभूत मतभेदावर इतका काथ्याकूट कशाला. तुम्हाला नाही ना नोआ आवडत, सोडा की. तुम्हाला कदाचित ट्रम्पचं पटतही असेल. मग तर ह्या जन्मी आपलं एकमत होणार नाहीये!
  • Log in or register to post comments
र
राजाभाऊ Tue, 10/16/2018 - 02:39 नवीन
>>पण अर्थात हे नोआने मांडलं आहे म्हणजे तुम्हाला पटण्याचा प्रश्नच नाहीये, << प्रश्न नोआने मांडण्याचा नाहि, तो प्रश्न किंवा त्या मुद्द्या मागच्या पार्श्वभूमीचा/रियॅलिटीचा आहे. एनीवे, माझा पॉइंट एव्हढाच आहे कि कोणतेहि मत बनवण्या अगोदर (व्हेन यु शेअर सम्थिंग, यु इन्डायरेक्टली जॉइन दॅट बँडवॅगन) त्या मागची पार्श्वभूमी समजुन घेणे आवश्यक आहे; अन्यत: ते अंधानुकरण होते. हे तुम्हाला अजुनहि पटत नसेल तर, आय थिंक आय हॅव फेल्ड टु आर्टिकुलेट माय पॉइंट...
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 10/16/2018 - 13:13 नवीन
आणि मी ती जाणूनच घेतलेली नाही (आणि अंधनुकरणच करतेय) हे तुमचे गृहीतक असेच चूक आहे हे सांगून मी थकले. ते माझं एक स्वतन्त्र (नोआ आणि इतर अनेक गोष्टी वाचून , बघून, अनुभवून बनवलेले) मत आहे हे तुम्हाला ना पटलं ना तुम्ही तसं सिद्ध केलंत. कॉमेडियन लोक TRP साठी शो करतात म्हणून हे मत चूक हे काही लॉजिक असू शकत नाही. कुणीही मांडला तरी तो मुद्दा योग्य असूच शकतो, माझ्यामते आहे. पण असं मत का च बनवलंत ह्याला कुणी प्रतिवाद का करावा? तुम्ही त्या नोआच्या पुढे आलाच नाहीत. माझ्या प्रतिसादाला त्यावर आलेल्या काही प्रतिसादाची पार्श्वभूमी आहे हे आपण समजून घेतलेत का? बहुदा नाही. (अन्यथा मी बाकी बरंच काही लिहितेय, त्यावर उत्तर नाही.) तेव्हा आपली परवानगी असेल तर मी माझे मत असेच ठेवू इच्छिते, ते नोआच्या व्हिडीओ मार्फत मांडले तरीही. इतकं बोलूनही तुम्हाला माझा आक्षेप कळत नसेल तर राहू देत. मला मत असण्याच्या आणि ते वाट्टेल तसं बनवण्याच्या मूलभूत हक्कावर मी कुणाशी चर्चा करावी असं मला वाटत नाही. माझ्या मताबद्दल "गृहीतके" मनात धरून त्यावर प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तीसोबत नक्कीच नाही. तुम्हाला याहून काही वेगळेच म्हणायचे असेल तर हो, नक्कीच तुम्हाला तुमचे मुद्दे नीट मांडता आलेले नाहीत. असो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 10/16/2018 - 13:27 नवीन
भरपूर चर्चा झालेली दिसतीए, पण माझ्या खालच्या प्रतिसाद कुणासही खोट्या आरोपास सामोरे का जावे लागावे ? अनुत्तरीत राहील्याचे जाणवल्याचे नोंदवून ठेवतो. ( आणि तसे पहाता निम्नोल्लेखीत प्रतिसादाची लांबीही यावेळी जराशी कमी होती )
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/16/2018 - 14:08 नवीन
आणि तसे पहाता निम्नोल्लेखीत प्रतिसादाची लांबीही यावेळी जराशी कमी होती ब्रुटली ऑनेस्ट, ब्रुटली ऑनेस्ट, म्हणतात ते हेच ! =)) (हघ्याहेवेसांन)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 10/16/2018 - 18:32 नवीन
उत्तर द्यावं असा काही विशेष वेगळा मुद्दा तुम्ही मांडलेला दिसला नाही. कॉमन सेन्स आहे तो, त्यात चर्चा करण्यासारखं काय आहे? बाकी मला काय म्हणायचं आहे हे विस्तृतपणे वर लिहिलेलं आहे, तरीही तुम्हाला प्रश्न पडतात ते केवळ तुम्हाला उत्तर का दिलं नाही म्हणून का?
  • Log in or register to post comments
र
राजाभाऊ Fri, 09/06/2019 - 16:08 नवीन
तर मंडळी, आता सत्य परिस्थिती उजेडात आलेली आहे. फोर्डबाईंचा तो सगळा तमाशा पोलिटिकली मोटिवेटेड होता (यातंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे, माहितगार ;) ). एका न घडलेल्या घटनेचा बाउ करुन, चारित्र्यहनन करण्याची पराकाष्ठा करणारे, ट्रेवर नोआ एट ऑल तोंडघशी पडलेले आहेत. आय फिल सॉरी फॉर मिसेस फोर्ड, ट्रेवर नोआ अँड देअर फॉलोअर्स... https://www.washingtontimes.com/news/2019/sep/5/thom-tillis-gop-senator-calls-probe-christine-blas/
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 10/08/2018 - 16:45 नवीन
आमेरीकेतील केस माहित नाही (खरेच ट्रॅक नाही) पण, ज्या प्रमाणे एकाही स्त्रीला खोट्या आरोपांना सामोरे जावे लागू नये तसे एकाही पुरुषाला खोट्या आरोपांना सामोरे जावे लागणे श्रेयस्कर नसावे किंवा कसे .
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 10/08/2018 - 15:12 नवीन
https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/crime/false-rape-cases-a-travesty-of-justice-says-bombay-high-court/articleshow/51186933.cms https://hindi.firstpost.com/india/false-rape-cases-is-the-feeling-of-being-cheated-something-that-can-be-explained-in-our-laws-tk-13585.html खोट्या केस सुध्दा केल्या जाऊ शकतात एव्हढच मला सांगायचे आहे .
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटण्या Mon, 10/08/2018 - 16:10 नवीन
हे जे काही प्रकरण चालू आहे ह्यातील महिलेने हा प्रकार झाला त्यानंतर FIR दाखल केली होती का ? केली होती तर त्याचे पुढे काय झाले ? आता तिने परत त्या व्यक्ती विरुद्ध तक्रार केली आहे असे ऐकण्यात आले आहे जर हे खरे असेल तर बघूया पुढे काय होते ते. आणि ह्या इतर नट-नट्यांच्या वक्तव्याकडे लक्ष दयायची काहीही गरज नाही आहे ही काही मोजकी मंडळी ह्या असल्या गोष्टीचा वापर फक्त त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करतात.बाकी जे काही खरे असेल ते लवकरच उजेडात येईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 10/08/2018 - 16:12 नवीन
१) आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या भानगडीत पडू नये श्री व्यंकटेश माडगूळकर -१९५० २) अपुऱ्या किंवा वादग्रस्त माहितीवर आणि अधिकार नसताना निवाडा करण्यास बसणे हे "कायद्याच्या दृष्टी"ने अयोग्य आहे. (SITTING ON JUDGEMENT OF DISPUTED OR INSUFFICIENT FACTS IS BAD IN EYES OF LAW)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 10/08/2018 - 16:49 नवीन
१) आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या भानगडीत पडू नये.
१००% सहमती
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 10/08/2018 - 16:52 नवीन
२) अपुऱ्या किंवा वादग्रस्त माहितीवर आणि अधिकार नसताना निवाडा करण्यास बसणे हे "कायद्याच्या दृष्टी"ने अयोग्य आहे. (SITTING ON JUDGEMENT OF DISPUTED OR INSUFFICIENT FACTS IS BAD IN EYES OF LAW)
सहमत
१) आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या भानगडीत पडू नये श्री व्यंकटेश माडगूळकर -१९५०
व्यंकटेश माडगूळकरांना __/\__ उपरोक्त वाक्याचे औचित्य केस टू केस अ‍ॅप्लिकेबल होण्याची शक्यता वाटते. आपल्याला या धागा चर्चेत या व्यंकटेश माडगुळक्ररांच्या औचित्य कसे जाणवले ते अद्याप उमगले नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 10/09/2018 - 06:37 नवीन
श्री व्यंकटेश माडगूळकर यांनी तमाशाच्या बाबतीत हे वाक्य लिहिलेले होते. त्यांच्या गावचा गणा महार तमाशात असतो त्याला ते तमाशाच्या बायकांच्या लफड्यांबद्दल विचारत असताना गणा त्यांना हे बोलुन दाखवतो. त्याचा सरळ अर्थ असा आहे कि तुम्ही कलाकारांची कला पहा त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू नका. एकंदर सिनेमा नाटक तमाशा( शो बिझनेस) मध्ये स्त्रीपुरुषांचे जवळीक, त्यांची नैतिकता आणि त्यांच्या साधनशुचितेची पातळी पहिली तर त्यांच्यात होणारे एकंदर संबंध यावर भाष्य न करणे हेच श्रेयस्कर ठरेल. सध्या श्री महेश भट आणि श्री अनुप जलोटा यांच्या बद्दल माध्यमात ज्या बातम्या येत आहेत ते पाहून मी जे म्हणत आहे ते आपल्याला कदाचित पटेल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 10/09/2018 - 08:53 नवीन
अंशतः मान्यय, ऋषीचे कुळ पाहू नये अशी म्हणही याच धर्ती वरची असावी. अर्थात कायद्याची उल्लंघने नसलेली प्रकरणे आणि कायद्यांचे उल्लंघन झालेली प्रकरणे यात फरक करावयास हवा. कायद्यांचे उल्लंघन टाळले जाण्याच्या दृष्टीने समाजाच्या नैतिक दबावाचे महत्व असू शकते अर्थात त्या सोबत आपण म्हणता तसे 'अपुऱ्या किंवा वादग्रस्त माहितीवर आणि अधिकार नसताना निवाडा करण्यास बसणे हे "कायद्याच्या दृष्टी"ने अयोग्य आहे.' हे लक्षात घेणे ही अगदी महत्वाचे असावे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 10/12/2018 - 12:39 नवीन
डॉक्टर , ५० वर्ष पूर्वीच्या काळातून बाहेर या. नानाने मनीषा कोईराला ची मिठाई खाल्ली. तिची इच्छा. जनतेला काय प्रॉब्लेम ? पण तनुश्री ची इच्छा नसताना तसा प्रयत्न ? तो गुन्हा आहे हे नक्की. बाकी तनुश्री ने कोणाला मिठाई खिलवावी हा तिचा वैयिक्तक मामला आहे. ४ चॉकलेट हिरो ना खिलवली मग माझा पण मिठाई खायचा हक्कच आहे. हे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/12/2018 - 16:30 नवीन
डॉक्टर , ५० वर्ष पूर्वीच्या काळातून बाहेर या. आपल्या घटनेचे मूलभूत तत्व "सत्यमेव जयते" हे उपनिषदातील आहे. म्हणजे इसवी सनापूर्वी ५०० ते ८००वर्षे आहे. म्हणजे जो माणूस हे वाचन उद्धृत करतो तो इसवीसनाच्या पूर्वीच्या काळात असतो का? उगाच स्कोअरसेटल करण्याचा असं प्रयत्न कशासाठी करताय? मी प्रथितयश लेखकाचे वाक्य उद्धृत केले आहे. त्याचा लौकिकार्थाने किंवा व्यंगार्थाने मिठाईशी संबंध नाही. नानाने मनीषा कोईरालाची मिठाई खाल्ली.याचा आपल्याकडे काही पुरावा आहे का? का इथेपण हवेतच गोळीबार? मुळात अशी वाक्ये लिहिणे आपली मनोवृत्ती दाखवतो आहे हे लक्षात घ्या अशी आपल्याला नम्र विनंती आहे. पहा जमतंय का? नाही तर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 16:47 नवीन
@ अभिजित - १, अर्थाचा अनर्थ करण्यासाठी आपले कौतुक करावे का ?
१) आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या भानगडीत पडू नये श्री व्यंकटेश माडगूळकर -१९५०
या वाक्याच्या औचित्या बद्दल मी सुद्धा डॉ. खरे यांना प्रश्न विचारला. त्यांनी त्यांच्या प्रतिसादातून, " ....तुम्ही कलाकारांची कला पहा त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करू नका..... " असा अर्थ सांगितला. डॉ. खरे यांनी स्त्री कलाकारांना मिठाई म्हणून संबोधल्याचे दिसत नाही. उलट तशा अर्थावर आपण हकनाक पोहोचताना दिसत आहात. असे करणे इतर स्त्रीवादी तनुश्री समर्थकांना पटते का ? पटत नसेल तर इतर स्त्रीवादी तनुश्री समर्थक अभिजित -१ यांना त्यांची गल्लत कुठे होते आहे हे लक्षात आणून देऊ शकतील का ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 10/12/2018 - 17:02 नवीन
मागा साहेब याच वाक्याचा संदर्भ मला एका ज्ञानवृद्ध माणसाने भारतरत्न श्री भीमसेन जोशी यांच्याबद्दल बोलताना दिला होता. त्यांनी दुसरे लग्न केले आणि पहिल्या कुटुंबाची आबाळ झाली त्याबद्दल त्यांच्या मुलाने( श्री राघवेंद्र) लिहिलेल्या पुस्तकाबद्दल बोलताना दिला होता. त्यां नी हेच म्हटले होते कि "त्यांनी दुसरे लग्न का आणि कोणत्या परिस्थितीत केले याच्याशी आपल्याला काय घेणे आहे? त्यांनी आपले कान तृप्त केले आणि आपली जाणीव समृद्ध केली हे आपल्यावर काय कमी उपकार आहेत? कलाकारांच्या खाजगी आयुष्यात आपण डोकावून पाहू नये."
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 10/12/2018 - 17:25 नवीन
तेचना तुम्ही चित्रपट आणि संगित इत्यादीतून मिळणार्‍या मनोरंजन आणि समाधानाला मिठाई म्हणत आहात, आणि अभिजितराव कलाकारांच्या जिवनातील स्त्रीयांना वस्तु प्रमाणे मिठाई असा अर्थाचा अनर्थ करताना दिसताहेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा