आधारचा निकाल लावला :) जबडा ठेवा पण दात नकोत !!
भारतीय घटनेच्या अनुच्छेद २१ ची व्याप्ती वाढवून खासगीपणाच्या आधीकाराला सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच खासगीपणाचा आधिकार घटनात्मक असल्याचे सांगितले होते. अगदी अलिकडे म्हणाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी, समाजकारण-राजकारण- कायदेमंडळे आपले कायदे व्ययव्स्थित बनवण्यात कमी पडल्यामुळे न्यायालयांवर निर्णय सोडत असल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. हि टिका अगदिच चुकीची आहे असे नाही पण जिथे कायदामंडळे व्यवस्थित काम करतात तेथेही न्याय व्यवस्थतेची दखलंदाजी अनाकलनीय आहे. आज आधार कार्ड बाबतचा निर्णय येतो आहे. या पुर्वीच मतदार यादीशी आधारकार्ड जुळणी न्यायव्यवस्थेने नाकारली होती. खासगीपणा बाबतचा निर्णय आधीच झाल्या मुळे निकालाची दिशा सर्वसाधारण पणे काय असणार याचा अदमास होता नाही असे नाही. पण राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालय केराची टोपली दाखवेल असे वाटले नव्हते, ते काम आजच्या निकालाने एकदाचे केले. अलिकडे भारताच्या न्यायव्यवस्थेलाही तथाकथित पुरोगामी म्हणून मिरवून घेण्याची जरा जास्तच घाई झाल्यासारखे वृत्तपत्रिय बातम्यांवरुन वाटत आहे.
डिटेल मधील निकाल वाचून सविस्तर मत काळाच्या ओघात देता येईल पण मतदार यादीशी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याशी सांगड घालू न देणे , सीम कार्ड आणि इतर क्षेत्रात आयडी म्हणून सांगड घालू न देणे पटलेले नाही. शासन यंत्रणा दातांनी चुकीचे चावे घेत असेल तर शासन यंत्रणेला शिस्त लावणे न्यायालयाची जबाबदारी आहे हे मान्य, खासगीपणाचा आधिकार मान्य पण राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा काहीही मोठे असू नये; जबडा ठेवा पण दातच नको अशा पद्धतीने कोणतीही शासकीय यंत्रणा कसे काम करु शकेल ? असा विचार या निकालाचे प्राथमिक वृत्त वाचून मनात येऊन गेला. असो.
#AadhaarVerdict — key points संदर्भ
Welfare schemes ✔️
I-T returns ✔️
Linking to PAN card ✔️
Banks accounts ✖️
SIM cards ✖️
Private companies ✖️
School admissions ✖️
NEET, UGC, CBSE ✖️
उत्तर दायीत्वास नकार लागू
आता परत हा काहीतरी कायदा करू बघतोय
श्री अरुण जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते. ते आपले लंगोटी यार असावेत म्हणून आपण अशी भाषा वापरता आहात असे मी गृहीत धरतो.जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते.तोच तर प्रश्न आहे ना. आत्ता त्याला काहीच आधार नाही कायद्याचा. SC ने निक्काल लावला मूर्खपणाचा. म्हणुन ते आता तसा कायदा बनवु बघत आहेत. ४ वर्ष अशीच गेली. आता तरी काही करून दाखवा , खरे जण कल्याणकारी. नाहीतर काही खरे नाही. चाय / पकोडा धंदा काढावा लागेल .