Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

छायाचित्रण कलेचा आस्वाद

श
श्रीरंग_जोशी
Mon, 08/20/2018 - 00:23
🗣 79 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, बऱ्याच काळापासून या विषयावर चर्चेचा धागा काढायचे मनात होते. शेवटी आज जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या मुहूर्तावर ते प्रत्यक्षात आणतोय. आंतरजाल सहजपणे उपलब्ध होण्यापूर्वी माझ्यासारख्यांच्या दैनदिन आयुष्यात (आस्वाद घेण्याजोग्या) छायाचित्रांची उपलब्धतता आजच्या तुलनेत नगण्यच होती. दर्जेदार कागद अन छपाई असणारी इंग्रजी मासिके, कधी कुणाच्या घरी पोस्टर म्हणून लावलेले एखादे उत्तम छायाचित्र इत्यादी. गेल्या एक दीड दशकात हे चित्र वेगाने पालटले. इतरांनी काढलेली उत्तमोत्तम छायाचित्रे पाहिली की आपणही कधी अशी छायाचित्रे काढू शकू का हा विचार मनात पूर्वी यायचा. त्या दिशेने थोडे फार प्रयत्न केल्यावर उमजले की उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले. अन या मार्गाने उपलब्ध वेळेचा उपयोग उत्तमोत्तम छायाचित्रे पाहण्यात घालवून स्वतःसाठी एक दालनच उघडले. छायाचित्रे हे असे माध्यम आहे की आस्वाद घेणाऱ्याला फार वेळ घालवायची गरज नाही. उपलब्ध असणाऱ्या अन जालाला जोडलेल्या अनेक उपकरणांवर आपण छायाचित्रे बघू शकतो. छायाचित्रांतून इतिहास, भूगोल, संस्कृती, नव्या घडामोडी यांची माहिती आपोआप सहजपणे होत राहते. छायाचित्रणकला स्वतः तर एक कला आहेच पण इतर अनेक कलांचा अन शास्त्रांचा आरसा म्हणूनही ती महत्त्वाची भूमिका पार पाडते. माझ्या दिवसाची सुरुवात बिंग. कॉमवरचे रोज बदलणारे छायाचित्र पाहून होते. दिवसभरात अन रात्री झोपण्यापूर्वी फेसबुक फोटोग्राफी पेजेस, फ्लिकर, इन्स्टाग्राम इत्यादींवर विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद मी घेत असतो. मिपावर देखील अनेक प्रवासवर्णनांमधे , छायाचित्रणकला स्पर्धांमधे अन इतरही लेखनांत मिपाकर छायाचित्रकारांची दर्जेदार छायाचित्रे बघायला मिळतात. मिपावर अन जालावर इतरत्रही अशा कलाकारांचे छायाचित्रणाबाबतचे अनुभवकथन वाचणे ही देखील पर्वणी असते. माझ्यासारखीच आवड असणाऱ्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी आवडत्या छायाचित्रांचे दुवे प्रतिसादांत द्यावेत. तसेच आवडत्या छायाचित्रांबाबत अन छायाचित्रकारांबाबत लिहावे. मी माझ्या परीने भर घालणार आहेच. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. या विषयावरचे बिंगचे एक होमपेज जालावरून साभार - या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 41580 views

🗣 चर्चा (79)
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/03/2018 - 10:25 नवीन
मिपावर चित्रे प्रसिद्ध करण्याची कृती, हा लेख उपयोगी ठरू शकेल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/04/2018 - 10:52 नवीन
तुम्ही फोटोच्या थंबनेलची लिंक टाकली होती. फोटो प्रसिद्ध करण्यासाठी, तो (थंबनेलवर डबल क्लिक करून मिळालेल्या) पूर्ण आकारात असताना घेतलेला "इमगे अड्रेस" वापरावा लागतो.
  • Log in or register to post comments
ए
एक छायाचित्रकार Tue, 08/28/2018 - 18:51 नवीन
माझी काही छायाचित्रे येथे टाकु शकतो का? मि एक हौशी छायाचित्रकार आहे. मला माहीत नाही माझि छायाचित्रे लोका॓ना आवडतील की नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/28/2018 - 18:55 नवीन
जरूर टाका.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Wed, 08/29/2018 - 03:48 नवीन
मस्त आहे हा धागा आणि फोटोज. नाणेघाटाचा फोटो विशेष आवडला.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 08/29/2018 - 09:01 नवीन
मॅग्नम फोटोज या प्रकाशचित्रणाला वाहिलेल्या संस्थेच्या वेबसाईटवर अनेक प्रसिद्ध प्रकाशचित्रकारांनी काढलेली ऐतिहासिक प्रकाशचित्रे आहेत. https://www.magnumphotos.com/
  • Log in or register to post comments
प
प.पु. गुरुवार, 08/30/2018 - 06:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Fri, 08/31/2018 - 07:17 नवीन
सायकलिंग सुरु केल्यापासून केलेली फोटोग्राफी. यातला शेवटचा फोटो तेवढा DSLR ने काढलाय. बाकी सगळे फोन कॅमेरा वापरून. सगळेच्या सगळे सकाळच्या वेळी काढलेत. मिपाच्या सायकल आणि पुस्तकाच्या कायाप्पा समूहातल्या सदस्यांनी याआधी पाहिलेले आहेतच. Image removed. हा गावाजवळील नदीवर असलेला एक जुना बंधारा कम पूल. Image removed. तानसा धरणात एका मासेमाराकडून तराफा उसना घेऊन एकट्यानेच भटकलो होतो तेव्हा मित्राने काढलेला फोटो. Image removed. Image removed. माहुली-भंडारगड Image removed. तानसा अभयारण्य परिसरात काढलेला एक फोटो.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 09/02/2018 - 15:04 नवीन
एक नम्बर फोटो उत्त्मच ! पुणेकराना असा काधायचा असेल तर येत्या हिवाळ्यात कवडीपाट ला भेट द्या बाकी सर्व लई भारी . माहुलीची स्काय लाईन लाजवाब !
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Mon, 09/03/2018 - 22:31 नवीन
पुलावर काढलेला सायकलचा फोटो अप्रतिम. धुक्यात हरवली वाट सारखं काहीसं
  • Log in or register to post comments
ल
लोनली प्लॅनेट Fri, 08/31/2018 - 08:43 नवीन
हा मी काढलेला माझ्या पुतणीचा चा फोटो कॅमेरा Nikon D5100 50mmF/1.8 http://i1067.photobucket.com/albums/u437/sandeep4animals/manva_zpsblsuk68z.jpg
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/31/2018 - 09:15 नवीन
वरचा 'लोनली प्लॅनेट' यांचा सुंदर "बोलका" फोटो Image removed.
  • Log in or register to post comments
ल
लोनली प्लॅनेट Sat, 09/01/2018 - 07:26 नवीन
माझ्या प्रतिसादात तो फोटो दिसत नव्हता म्हणून तुम्ही स्वतः तो पुनर्प्रकाशित केलात यासाठी खूप धन्यवाद म्हात्रे काका..
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 09/01/2018 - 17:40 नवीन
न्यूझिलंडमधील फिओर्डलँडमधील वाटेवरच्या नीरव "आरसी तळ्याचा (मिरर लेक)" एक फोटो...

Image removed.

  • Log in or register to post comments
प
प.पु. Sun, 09/02/2018 - 07:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 09/02/2018 - 09:48 नवीन
चित्र दिसत नाही. बहुतेक त्याला "पब्लिक अ‍ॅक्सेस" दिलेला नाही.
  • Log in or register to post comments
प
प.पु. Sun, 09/02/2018 - 10:15 नवीन
दिलेला आहे
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 09/02/2018 - 09:51 नवीन
छायाचित्रण दिन २०१८ निमित्त प्रसिद्ध झालेले एक चित्र (जालावरून साभार)... Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 09/02/2018 - 13:06 नवीन
सुंदर धागा... सुंदर प्रकाषचित्रे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, होय मैं तेरा ही ना रटना अड्डी मार के वेहदा पट्टना अज्ज मैं टल्ली होक हटना नि... :- Nawabzaade
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 09/03/2018 - 08:55 नवीन
+१ हा धागा खरेतर 'शिफारस' मध्ये हवा.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 09/04/2018 - 08:21 नवीन
मस्त धागा. सकाळी सायकलींगला जाताना माझ्या सारख्या अतिशय टुकार छायाचित्रकाराने काढलेली काही छायाचित्रे कोणाला आवडू ना आवडो स्वतःला आवडायला लागतात . सकाळच्या सुदंर वातावरणाचा आणि मोबाइल मधल्या कॅमेऱ्याचा परिणाम.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/04/2018 - 08:33 नवीन
भुलेश्वरच्या पठारावर टिपलेले हे छायाचित्र. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 09/04/2018 - 11:38 नवीन
रंग , फोकस रचना एक लम्बर !
  • Log in or register to post comments
म
मीता Mon, 09/10/2018 - 10:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/10/2018 - 19:37 नवीन
फ्लॉरेन्स: आर्नो नदीवरील एक पूल Image removed. इ.स. १४५८ साली बनलेल्या पित्ती/मेदिची-प्रासादातले एक दालनः Image removed. एक शयनकक्ष ऊर्फ बेडरूम (३२०,००० वर्गफुटाच्या घरातील एक खोली) Image removed. एका दालनातील छतावरील चित्रः Image removed. आंघोळीचे संगमरवरी घंगाळ आणि एक घड्याळ Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
फ
फोटोग्राफर243 Tue, 09/11/2018 - 12:44 नवीन
मागच्या काही वर्षा पासून छायाचित्रण शिकतो आहे, https://www.flickr.com/photos/ambarishphotography
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 08/19/2021 - 19:28 नवीन
सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या शुभेच्छा!! गेल्या हिवाळ्यात टिपलेली पक्षाची ही मुद्रा. Image removed. अनेक वर्षांनी साहित्य संपादकांनी छायाचित्रणकला स्पर्धा या उपक्रमाचे पुनुरुज्जीवन केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 08/21/2021 - 12:18 नवीन
सुंदर आहे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 08/21/2021 - 13:31 नवीन
क्या बात हैं !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा