Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

छायाचित्रण कलेचा आस्वाद

श
श्रीरंग_जोशी
Mon, 08/20/2018 - 00:23
🗣 79 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, बऱ्याच काळापासून या विषयावर चर्चेचा धागा काढायचे मनात होते. शेवटी आज जागतिक छायाचित्रणकला दिवसाच्या मुहूर्तावर ते प्रत्यक्षात आणतोय. आंतरजाल सहजपणे उपलब्ध होण्यापूर्वी माझ्यासारख्यांच्या दैनदिन आयुष्यात (आस्वाद घेण्याजोग्या) छायाचित्रांची उपलब्धतता आजच्या तुलनेत नगण्यच होती. दर्जेदार कागद अन छपाई असणारी इंग्रजी मासिके, कधी कुणाच्या घरी पोस्टर म्हणून लावलेले एखादे उत्तम छायाचित्र इत्यादी. गेल्या एक दीड दशकात हे चित्र वेगाने पालटले. इतरांनी काढलेली उत्तमोत्तम छायाचित्रे पाहिली की आपणही कधी अशी छायाचित्रे काढू शकू का हा विचार मनात पूर्वी यायचा. त्या दिशेने थोडे फार प्रयत्न केल्यावर उमजले की उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले. अन या मार्गाने उपलब्ध वेळेचा उपयोग उत्तमोत्तम छायाचित्रे पाहण्यात घालवून स्वतःसाठी एक दालनच उघडले. छायाचित्रे हे असे माध्यम आहे की आस्वाद घेणाऱ्याला फार वेळ घालवायची गरज नाही. उपलब्ध असणाऱ्या अन जालाला जोडलेल्या अनेक उपकरणांवर आपण छायाचित्रे बघू शकतो. छायाचित्रांतून इतिहास, भूगोल, संस्कृती, नव्या घडामोडी यांची माहिती आपोआप सहजपणे होत राहते. छायाचित्रणकला स्वतः तर एक कला आहेच पण इतर अनेक कलांचा अन शास्त्रांचा आरसा म्हणूनही ती महत्त्वाची भूमिका पार पाडते. माझ्या दिवसाची सुरुवात बिंग. कॉमवरचे रोज बदलणारे छायाचित्र पाहून होते. दिवसभरात अन रात्री झोपण्यापूर्वी फेसबुक फोटोग्राफी पेजेस, फ्लिकर, इन्स्टाग्राम इत्यादींवर विविध विषयांवरच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद मी घेत असतो. मिपावर देखील अनेक प्रवासवर्णनांमधे , छायाचित्रणकला स्पर्धांमधे अन इतरही लेखनांत मिपाकर छायाचित्रकारांची दर्जेदार छायाचित्रे बघायला मिळतात. मिपावर अन जालावर इतरत्रही अशा कलाकारांचे छायाचित्रणाबाबतचे अनुभवकथन वाचणे ही देखील पर्वणी असते. माझ्यासारखीच आवड असणाऱ्या मिपाकरांना विनंती करतो की त्यांनी आवडत्या छायाचित्रांचे दुवे प्रतिसादांत द्यावेत. तसेच आवडत्या छायाचित्रांबाबत अन छायाचित्रकारांबाबत लिहावे. मी माझ्या परीने भर घालणार आहेच. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. या विषयावरचे बिंगचे एक होमपेज जालावरून साभार - या निमित्ताने, आपल्या कलेद्वारे माझ्यासारख्या अनेकांचे अनूभूतीविश्व संपन्न करणाऱ्या ज्ञात व अज्ञात छायाचित्रकारांना वंदन करतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 41580 views

🗣 चर्चा (79)
क
कंजूस Mon, 08/20/2018 - 02:05 नवीन
लेख आणि विचार आवडले. उत्तम व दर्जेदार छायाचित्रे काढणे हे त्या प्रकारची चित्रे पाहण्याच्या तुलनेत खूपच अवघड आहे. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी जशी जमतील तशी छायाचित्रे काढावीत अन इतरांच्या उत्तमोत्तम छायाचित्रांचा आस्वाद घेताना 'आपल्याला जमेला का' असे प्रश्न अजिबात मनात आणायचे नाहीत असे मी ठरवले. बरोबर. छायाचित्रांना १)काळानुरूप आणि २)परिस्थितीप्रमाणे महत्त्व प्राप्त होत जाते. तांत्रिकदृष्ट्या त्यांचे मुल्यमापन होत नाही. कुटुंबातली चित्रे (१) आणि युद्ध,दंगली,आपत्ती,विशेष घटना हे (२) प्रकारातील असतात.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 08/20/2018 - 15:29 नवीन
उत्तम धागा.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/20/2018 - 16:53 नवीन
काही दिवसांपूर्वी बरखाजींनी फिनलँड विषयी लिहिलेल्या लेख मालिकेतील हेलसिंकी सांबा कार्निवल च्या भागातील सर्वच छायाचित्रे सुंदर आहेत. रंगसंगती आणि सहभागी झालेल्या युवतीच्या चेहऱ्यावरील भावांमुळे मला त्यातले विशेष आवडलेले छायाचित्र खाली देत आहे.
Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 08/21/2018 - 17:38 नवीन
सुंदर कल्पना ! कालच काढलेले ताजे चित्र. का कोणास ठाऊक पण, पावसाळ्यात पारिजातकाच्या खाली पडलेला नाजूक द्विरंगी फुलांचा सडा पाहिला की मन प्रसन्न होते... Image removed.

Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 08/23/2018 - 13:44 नवीन
लाल फुलांच्या लिपीतला हा लेख मला कळला अंगणी पारिजात फुलला !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/28/2018 - 07:51 नवीन
पारिजातकाचा सडा छानच दिसतोय. ह्या वर्षीच्या जानेवारीत मुन्नार (केरळ) येथील रोज गार्डन मध्ये काढलेल्या असंख्य फुलांच्या फोटोंमधील दोन फोटो टाकण्याचा मोह आवरत नाहीये.
Image removed.
Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/30/2018 - 16:59 नवीन
मस्तं ! सुंदर फुलांचे सुंदर फोटो मन प्रसन्न करून जातात !
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 08/21/2018 - 20:53 नवीन
कंजूस, पद्मावति, टर्मीनेटर, डॉ. म्हात्रे प्रतिसादांसाठी धन्यवाद. टर्मीनेटर - तुम्ही वर दिलेला हेलसिंकी सांबा कार्निवलमधला फोटो आवडला. डॉ. म्हात्रे - तुम्ही काढलेले पारिजातकाच्या फुलांचे फोटो पाहून प्रसन्नता लाभली. मला भावलेल्या काही फोटो कलेक्शन्सचे दुवे:
  • गेल्या महिन्यात जाहिर झालेले यंदाचे आयफोन फोटोग्राफी अवॉर्ड्स
  • Adobe Introduces Their “Rising Stars of Photography” for 2018
आजचे बिंगचे होमपेज Image removed. कॅलिफोर्नियातल्या सॅन्टा मोनिका पीअरचा हा फोटो काढला आहे Chris Fabregas यांनी.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Wed, 08/22/2018 - 15:47 नवीन
मी काढलेले एक छायाचित्र... नाणेघाट ! Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 08/22/2018 - 18:16 नवीन
नाणेघाटाचे छायाचित्र आवडले. दक्षिण भारताच्या नकाशाशी साधर्म्य साधणारा आकार वाटला. नुकताच वाचलेला एक लेख - Review: Contemplating 'a Handful of Dust' at the California Museum of Photography.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/24/2018 - 19:10 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/28/2018 - 08:04 नवीन
प्रत्यक्षात बघितलेल्या नाणेघाटाचे वेगळेच दर्शन ह्या फोटोतून घडले. सुंदर फोटो. कुंभलगढ (राजस्थान) च्या जगप्रसिद्ध ३६ कि.मी. लांबीच्या तटबंदीचे २०१६ च्या एप्रिल मध्ये काढलेला फोटो.
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा Wed, 08/22/2018 - 18:27 नवीन
मला वेळ मिळेल तसा बॉस्टनग्लोब वरील बिग पिक्चर या मालिकेचा आस्वाद घेत असतो. एक थीम घेउन छायाचित्रे एकत्र केलेली असतात आणि त्यांच्या कॅप्शन्सच्या माध्यमातुन स्टोरी टेलिंग सारखा अनुभव येतो. वानगीदाखल हे पहा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 08/23/2018 - 07:03 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 08/23/2018 - 13:41 नवीन
कडक ? छे नीतळ ! एकदम ब्यास !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/28/2018 - 08:13 नवीन
खूप सुंदर आलाय हा जीवधन-वानरलिंगीचा फोटो. काश्मीर मधल्या पहेलगाम पासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या आणि वर्षाचे जवळपास बारा महिने बर्फाच्छादित असणाऱ्या सिंथन टाॅप इथे २०१७ च्या जून महिन्यात काढलेला एक फोटो.
Image removed.
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar गुरुवार, 08/30/2018 - 16:48 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 08/23/2018 - 13:57 नवीन
खालील फोटो १२०० एक एम झूम असलेल्या माझ्या नव्या कॅमेर्याने घेतला आहे. गुगल अर्थ प्रमाणे कॅमेरा व हे साइन यातील अंतर ९३० मीटर आहे . इंदिरानगर नासिक येथील एका बाल्कनी तून हा उद्योग करून पाहिला . यु ट्यूब मधील एका डेमो नुसार गुरू व त्याचे उपग्रह याचाही फोटो या सोनी कॅमेर्याने काढता येतो . मात्र शनी साठी निकोन ९०० पी हा कॅमेरा लागतो . Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 08/23/2018 - 14:02 नवीन
सदर फोटो ट्रायपौड न वापरता घेतला आहे ! तो वापरलयास अधिक उत्तम !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/28/2018 - 08:27 नवीन
९३० मीटर्सच्या अंतरावरून सुद्धा ग्लोसाइन वरची अक्षरे एवढी सुस्पष्ट दिसणारा फोटो काढणाऱ्या तुमच्या कॅमेऱ्याला सलाम. जानेवारी २०१८ ला बाहुबली फेम अथीरापल्ली फॉल्स (केरळ) चा सुमारे ८०० मीटर्स अंतरावरून झूम करून काढलेला एक फोटो.
Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/29/2018 - 09:30 नवीन
भारी प्रयोग, भारी कॅमेरा, भारी कॅमेरामन !
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 08/24/2018 - 17:55 नवीन
अंतु बर्वा - बॉस्टन ग्लोबच्या दुव्यासाठी धन्यवाद. प्रचेतस - जीवधन-वानरलिंगीचा फोटो भारी आहे. चौरा - झूम करुन काढलेला सुस्पष्ट फोटो आवडला. सेल्फी हा मला व्यक्तिशः न आवडणारा प्रकार. परंतु या प्रकारातला हा खूप आवडलेला एक फोटो. Image removed. A cockpit selfie taken by a British RAF pilot has been nominated for a photography award आजचे बिंगचे होमपेज. सेन्ट लुईसच्या गेटवे आर्चचा प्रतिबिंबासकटचा फोटो. Image removed. कॅमेरा सेन्सरवर अथवा लेन्सवरच्या धुलीकणांमुळे फोटोतल्या आकाशातल्या भागावर डाग दिसत आहे. असे जेव्हा माझ्या फोटोसोबत घडते तेव्हा शक्यतोवर एडिटींगमध्ये दुरुस्त केल्याशिवाय मी फोटो प्रकाशित करत नाही. परंतु या फोटोत ती दुरुस्ती न करताही बिंगने तो प्रकाशित केला आहे अन प्रथमदर्शनीतरी फोटोत दिसणार्‍या सौंदर्याला बाधा आलेली वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/28/2018 - 08:20 नवीन
कॉकपिट सेल्फी आणि सूर्यग्रहणाचे फोटो खूप आवडले.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/27/2018 - 06:12 नवीन
.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/27/2018 - 06:12 नवीन
.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 08/27/2018 - 06:11 नवीन
इच्छाशक्तीला अनोळखी लोकांची साथ अन अथक परिश्रम यांची साथ मिळाल्यावर निघणारा हा सूर्यग्रहणाचा अप्रतिम फोटो. Image removed. This Is the Most Amazing Photo Ever Taken From a Commercial Airplane. Now, a Southwest Passenger Explains How He Did It या अवलिया कलाकाराचे नाव आहे - Jon Carmichael.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 08/28/2018 - 05:40 नवीन
निशब्द !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/27/2018 - 09:52 नवीन
Cosmic ‘Winter’ Wonderland Image removed. (Courtesy : NASA)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 08/27/2018 - 10:55 नवीन
हा तार्‍यांचा जन्मसोहळा आहे काय? हबलने घेतलेला 'निर्मितीच्या स्तंभांचा' (Pillars of Creation) हे छायाचित्र माझ्या अतिशय आवडीचे. Image removed. १९९५ साली हबलने घेतलेल्या ह्या छायाचित्राची आठवण म्हणून हबलनेच २०१४ साली घेतलेले हे हाय रिझोल्युशनचे छायाचित्र. Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/27/2018 - 21:26 नवीन
हा तार्‍यांचा जन्मसोहळा आहे काय? होय. अश्याच महामहामहास्फोटात प्रचंड आकाराचे, प्रचंड धगधगते वस्तूमान, एकत्र येऊन तारे जन्मतात... या तर तारे बनवणार्‍या फॅक्टर्‍या ! अश्याच एका फॅक्टरीत दिसलेला हा "देवाचा हात (Hand of God)" :) Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/27/2018 - 22:10 नवीन
ही विश्वाची फॅक्टरी तशी काहिशी विनोदीही आहे. तिने तिच्या कामात लुडबूड करणार्‍या मानवाला दाखविलेले हे मधले बोट... =)) =)) =)) Image removed.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Mon, 08/27/2018 - 20:42 नवीन
मी स्वतःच गगनबावडा, कोल्हापुर येथे हे छायाचित्र काढलेलं आहे. हिरवागार डोंगर आणि समोर दाट धुक्याने वेढलेली दरी. फारच प्रेक्षणीय जागा होती ती. Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/27/2018 - 21:28 नवीन
मस्तं. ते गवत आता वार्‍याने सळसळू लागेल असे वाटते !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/28/2018 - 08:34 नवीन
मेघनादजी फोटो दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद गुरुवार, 08/30/2018 - 22:22 नवीन
आता बघा छायाचित्र दिसतंय का. पिकासा बंद झाल्यापासून छायाचित्र डकवणे फार जिकिरीचे झाले आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Fri, 08/31/2018 - 06:15 नवीन
मेघनादजी अजूनही छायाचित्र दिसत नाहीये. गुगल फोटोज किंवा फेसबुक वरून डकवून बघा.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/31/2018 - 09:12 नवीन
Access to doc-08-7k-docs.googleusercontent.com was denied You don't have authorization to view this page. HTTP ERROR 403 असा संदेश येतो. यावरून तुम्ही चित्राला "पब्लिक अ‍ॅक्सेस" दिलेला नाही असे दिसते... तो दिल्याशिवाय मिपावर चित्र दिसणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Mon, 09/03/2018 - 09:05 नवीन
आता हा शेवटचा प्रयत्न. :-) Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/03/2018 - 10:22 नवीन
मिपावर चित्रे प्रसिद्ध करण्याची कृती, हा लेख उपयोगी ठरू शकेल.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Mon, 09/03/2018 - 22:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Mon, 08/27/2018 - 20:51 नवीन
माझ्या आवडत्या फोटोग्राफर्स पैकी एक म्हणजे स्टिव्ह मॅककरी. नॅशनल जिओग्राफिक मॅगझीनसाठीचा त्याचा आयकॉनिक फोटो सगळ्यांनाच माहित असेल. इउरी म्हणून एक धमाल आईसलँडर फोटोग्राफर आहे. त्याचे फोटोज खालच्या लिंक वर बघता येतील. http://www.iuriebelegurschi.com/
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/27/2018 - 21:36 नवीन
भारी आहेत सगळी चित्रे ! अशी चित्रे पाहिली की आपण या पृथ्विची कित्येक रुपे पाहिलीच नाही याची प्रकर्षाने जाणीव होते :(
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/28/2018 - 05:06 नवीन
अगदी. निर्विवादपणे देखणी.
  • Log in or register to post comments
न
निशाचर Wed, 08/29/2018 - 03:54 नवीन
अप्रतिम आहेत एकेक फोटो. आइसलँडबद्दल तर काही बोलायलाच नको.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 08/28/2018 - 07:20 नवीन
आता खरा यौवनात आला हा धागा. एक से बढ के एक फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
प
प.पु. Tue, 08/28/2018 - 15:23 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प.पु. Tue, 08/28/2018 - 15:49 नवीन
https://photos.app.goo.gl/HuXp2aSv2EeQYzTy7
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/28/2018 - 15:56 नवीन
सुंदर फोटो, लिंक देण्या ऐवजी इथेच टाका ना हा फोटो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 08/29/2018 - 02:32 नवीन
सर्वच फोटो छान आहेत. चौकटराजा, कॅम्रा भारी आहे. प.पु. यांचा फोटो Image removed.
  • Log in or register to post comments
प
प.पु. गुरुवार, 08/30/2018 - 06:14 नवीन
धन्यवाद कंजूसजी, प्रयत्न केला होता फोटो इथेच टाकण्याचा पण जमले नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा