FRDI विधेयक माघारी घ्यायची मोदी सरकार वर आलेली नामुष्की !!
FRDI विधेयक माघारी घ्यायची मोदी सरकार वर आलेली नामुष्की !!
आत्ता राज्यसभेत बहुमत नसल्याने मोदींना हे विधेयक माघारी घ्यावे लागले. बरीच राज्य जिंकल्या मुळे आता हळूहळू राज्यसभेत भाजपचे बहुमत निर्माण होत आहे. आता प्रश्न आहे फक्त २०१९ चा !! तर आपण सर्वानी भाजप ला प्रचंड मतांनी विजयी करू या. म्हणजे भाजप हे विधेयक पास करू शकेल. आपल्या खिशाला थोडा चुना लागला तरी काय हरकत आहे ? मोदींचे स्वप्न पूर्ण करणे हे आपलेच घरचे कार्य आहे !!
अजून एक - आता यापुढे देशात कोणतेही इतर सरकार येणारच नाहीए मुळी !! फक्त भाजप एके भाजप !! त्या मुळे या विधेयकाचा भविष्यात कोणी गैर वापर करेल हि शंकाही मनात बाळगू नका !!
थोडी जुनी माहिती वाचा. FRDI + bail in यावर
मोदी सरकार ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीपेक्षा मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते. किंबहुना यामुळे सर्वसामान्य बँक खातेदाराची कधीही नोटाबंदी होऊ शकते. या विधेयकाला केंद्र सरकारने जून २०१७ मध्ये मंजुरी दिली आहे. बुडित खात्यात गेलेल्या बँकांना यामुळे दिलासा मिळेल. मात्र याचा फटका बँकांच्या ग्राहकांना सोसावा लागेल.
‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’मुळे अनेकांच्या मनात भीतीची भावना आहे. यामुळे बँक बुडत असल्यास, त्यांच्याकडून ग्राहकांचा पैसा वापरला जाऊ शकतो. सर्वसामान्य बँक खातेदारांचा पैसा परत करण्यासाठी या पैशांचा वापर केला जाईल. हा कायदा बँकांसाठी तसा नवीन नाही. १९६१ मध्ये संसदेने ‘डिपॉजीट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ कायदा मंजूर केला होता. या कायद्यामुळे बँक बुडित खात्यात गेल्यास, बँक ग्राहकांना जास्तीत जास्त १ लाख रुपये खातेदारांना देणे लागते. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात १ लाखापेक्षा अधिक रक्कम असल्यास, ती संपूर्ण रक्कम बँक आपल्या ताब्यात घेऊन तिचा वापर करु शकते.
मोदी सरकारने ‘फायनान्शियल रिझोल्युशन अॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणल्यास बँकांना जास्त अधिकार मिळतील. यामुळे सरकारी बँका, खासगी बँका आणि विमा कंपन्यांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ होईल. त्याचा थेट फटका ग्राहकांना बसेल. यामुळे बँकांना ‘बेल-इन’चा अधिकार मिळेल. त्यामुळे बुडणाऱ्या बँकांना थेट खातेधारकांचा पैसा वापरता येईल. ‘बेल-इन’मुळे खातेधारकांचे त्यांच्या खात्यावर कोणतेही नियंत्रण राहणार नाही.
बाकी केवळ मोदींच्या जवळ असल्या मुलेअहो तो स्वतःच स्वतःच्या जवळ असणारच ना? निरव मोदी हा नरेंद्र मोदींच्या जवळचा आहे असं तुमचं म्हणणं असेल तर तुमच्या या प्रतिसादात दिलेल्या या लिंकमधील लेख तुम्हीच नीट वाचलेला दिसत नाहीये. या लेखात असं स्पष्ट म्हणलंय की, "राहुल गांधींची भेट घेणाऱ्या नीरव मोदीच्या गीतांजली जेम्सला १५५० कोटींचे कर्ज देण्यास विरोध केल्याबद्दल काँग्रेसच्या सत्ताकाळात अलाहाबाद बँकेचे तत्कालिन संचालक दिनेश दुबे यांना तेव्हाच्या वित्त सचिवांनी राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते". आता सांगा बघू कोण कोणाच्या जवळ होते आणि आहे?नीरव कसा साफ / शुद्ध चरित्राचा असून लोन फेडण्याचा त्याचा पूर्ण विचार होता हे ऐकून ज्याम हसू आले. त्याने किती लोकांना २/३ हजार चे हिरे लाखोंचे आहेत असे सांगून चुना लावलाय त्याचा पण शोध घ्या गुगल वरनिरव मोदीला कोणीच सोवळ्यातला म्हणत नाहीये. बाकी सगळेच हिरे, "मौल्यवान" खड्यांचा धंदा करणारे आणि सोनार सुद्धा सामान्य लोकांना कमी अधिक प्रमाणात फसवत असतातच. तुमच्या माहितीतील कोणी हिऱ्यांचा व्यापारी आणि सोनार अगदी सचोटीने व्यवहार करणारा असेल तर इथे त्याचे नाव पत्ता जाहीर करावे. समस्त मिपाकरांना फायदा होईल. सध्याच्या जगात फक्त जो सापडतो तो चोर आणि ज्याच्या नावाने न्यूज चॅनेल जास्त आरडाओरडा करतात तो मोठा चोर असं समजलं जातं. त्यामुळे निरव मोदीबद्दल मला तरी कळवळा नाही, तो पकडला गेलाच पाहिजे आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याने बुडवलेले पैसे वसूल व्हायला पाहिजेत.किंबहुना गापै यांचा मुद्दा काय आहे तर ११४०० कोटींचा घोटाळा आहे असं म्हणतात पण त्यातला खरा बँकेकडून गेलेला पैसा किती हे नक्की माहित आहे का?म्हणजे व्याज बुडाले, याचा अर्थ बँक चे पैसे बुडाले असा तुमच्या ( आणि गामा पै पण ) मते तरी होत नाहीए तर. ?? चालू द्या ..सावकार अशिक्षित वनवासींना पिळून काढतांना भरमसाट व्याज लावतात. जेणेकरून मुद्दलाची परतफेड शक्च होऊ नये. तसा काहीसा प्रकार झालेला तर नाही ना? खातरजमा करून घ्यायला हवी.हो हो अडाणी / गरीब आदिवासींना जसे फसवलं तसंच बिचाऱ्या नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल भाई याना फसवलं आपल्या PSU बँक नि !! तुम्ही लोक कोणती पातळी गाठाल ?? मोदी च्या डिफेन्स मध्ये ?? इतकी भक्ती कधी बघितली नव्हती !!मोदी च्या डिफेन्स मध्ये ??यात कुठल्या मोदींचा डिफेन्स मी किंवा गापै करत आहोत? निरव मोदी चोर आहे हे सगळ्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे. त्याने बँकेतल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गंडा घातला हे जगजाहीर झालं आहे. तुमचं म्हणणं जर नरेंद्र मोदींबद्दल असेल तर तुमचे लाडके रघुराम राजनच आता बँकांच्या या परिस्थितीला आणि एनपीएला UPA ला जबाबदार धरत आहेत. त्यामुळे आमच्या डिफेन्सपेक्षा जोरदार डिफेन्स कुठून आलाय बघा.म्ही कशाला बधिर माणसांना भगवद्गीतेचा अर्थ समजावून सांगताय?-------------- सहमत !