Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट 2018

स
सोमनाथ खांदवे
Wed, 08/01/2018 - 03:09
🗣 266 प्रतिसाद
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते . आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.  सात जिल्ह्यात कलम १४४ लागू  हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. 

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 82317 views

🗣 चर्चा (266)
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 08/27/2018 - 21:31 नवीन
अत्यंत स्पृहणिय उपक्रम ! त्या सर्व भावांचे आणि डॉ. आर. रामचंद्रन यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल !
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 08/27/2018 - 12:01 नवीन
Biofuel Flight: जैवइंधनावर उडाले पहिले विमान नागरी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात भारतानं आज ऐतिहासिक भरारी घेतली. जैवइंधनाच्या जोरावर भारतातील पहिल्या विमानानं आज यशस्वी उड्डाण करण्यात आलं. या यशामुळं जैवइंधनावर विमान उड्डाणाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या गटात भारताला स्थान मिळालं आहे. स्पाइसजेटच्या 'क्यू ४००' या विमानात जैवइंधन भरून डेहराडून ते दिल्ली अशी चाचणी घेण्यात आली. डीजीसीए व स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांसह एकूण २० जणांनी या विमानातून प्रवास केला. तब्बल २५ मिनिटे हे विमान आकाशात होतं. आजच्या उड्डाणासाठी विमानात वापरण्यात आलेल्या इंधनापैकी २५ टक्के जैवइंधन होतं, अशी माहिती 'स्पाइसजेट'नं दिली आहे. जैवइंधनाच्या वापरामुळं कार्बनचं उत्सर्जन कमी होतं. शिवाय, सध्याच्या इंधनाच्या (एटीएफ) तुलनेत ते कमी लागतं,' असा दावा कंपनीनं केला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमनं जेट्रोफाच्या बियांपासून या इंधनाची निर्मिती केली आहे. आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांनी जैवइंधनावर आधारित विमानाचं उड्डाण केलं आहे. मात्र, विकसनशील देशांमध्ये अशी चाचणी घेणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. जगातील पहिल्या जैवइंधन विमानानं या वर्षी सुरुवातीलाच लॉस एंजलिस ते मेलबर्न असं उड्डाण केलं होतं.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 08/27/2018 - 16:35 नवीन
तीन मूर्ती स्मारकाबाबत मनमोहन सिंग यांचे मोदींना पत्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालय (एनएमएमएल) आणि तीन मूर्ती स्मारक यांच्यात केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या वास्तूंमध्ये बदल करून नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. या प्रकल्पातून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा आणि योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका सिंग यांनी केली. पत्रामध्ये सिंग यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, वाजपेयी यांनी नेहरूंच्या निधनानंतर संसदेत केलेल्या भाषणात नेहरूंबद्दल गौरवोद्गार काढले होते. नेहरूंसारख्या उत्तुंग आणि महान व्यक्तिमत्त्वाचे तीन मूर्ती भवनात पुन्हा वास्तव्य होऊ शकणार नाही, असे वाजपेयींनी म्हटले होते. सध्याचे सरकार मात्र नेहरूंचा अमीट वारसा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते तर ते संपूर्ण देशाचे होते. तीन मूर्ती स्मारक आहे तसे जतन केल्याने आपण वारसा आणि इतिहासाचा आदर करणार आहोत, असे सिंग यांनी पत्रात म्हटले आहे. दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध करावा हे काही कळले नाही !! काँग्रेसने देशावर ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केले. याचा अर्थ ह्यांचेच जास्तीत जास्त पंत प्रधान होऊन गेले तरीही केंद्र सरकारच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध करावा म्हणजे किती पराकोटीची व्यक्ती पुजा काँग्रेसवाले करत आहेत !!
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 08/27/2018 - 17:22 नवीन
दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे
साहजिकच आहे,तीन मूर्ती म्हणजे नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी इतकेच असा अर्थ लावून घेतला आहे!!! हे चुकीचे आहे हे मनमोहन मनोमन वाटत असूनही काहीच उपाय नाही. याव्यतिरिक्त इतर काही कांग्रेसी पंतप्रधान होते असा दावा करु नये (तशी त्या पक्षाच्या नोंदवहीत नोंद नाही) खुलाशी नाखु वाचकांची पत्रेवाला
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 08/27/2018 - 18:57 नवीन
तीन मूर्तीभवन मध्ये सध्या काय आहे ? काँग्रेस का विरोध करत आहे ? त्याबद्दल जरा स्पष्ट करून सांगा ना म्हणजे आम्ही पण काँग्रेस ला चार शिव्या ( मनात ) हासडू .
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Tue, 08/28/2018 - 14:43 नवीन
नरेंद्र मोदींच्या हत्येचा माओवाद्यांचा कट: पुणे पोलिसांचं देशभरात अटकसत्र पाच राज्यांमध्ये पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे मारले आहेत. पी वरावर राव, गौतम नवलखा, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, अनू भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट होता असा दावा करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला असून त्याच्याशी संबंधित या अटका आहेत. पुण्यामधून वरावर रावना अटक केल्यानंतर त्यांच्या हैदराबाद येथील घरावरही छापा मारण्यात आला. नवलखाना दिल्लीतून अटक करण्यात आली व साकेत कोर्टात हजर करण्यात आले. त्यांचा तांबा महाराष्ट्र पोलिसांकडे देण्यात येणार आहे. पोलिसांनी नवलखा यांच्या घरातून बॅग, लॅपटॉप व काही कादगपत्रं जप्त केली आहेत. मानवाधिवकारकार्यकर्त्या वकिल सुधा भारद्वाज यांना फरीदाबादमधून अटक करण्यात आली व महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर केले. भारद्वाज यांच्या बदरपूर येथील घरावरही छापा मारण्यात आला. त्यांची मुलगी अनू हिलाबी पोलिलांनी ताब्यात घेतले आहे. अरूण परेराना पुण्यातून अटक करण्यात आली असून परेरा यांनी आपण निष्पाप असल्याचा दावा केला आहे. आपण काही खटल्यांमध्ये सरकारविरोधी काम केल्याने अटक केल्याचा त्यांचा दावा आहे. आपली अटक म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/29/2018 - 03:26 नवीन
वृंदा करात , आणि गालावर गोड खळी वाले राजकुमार नीं त्या मुद्द्यावर भाजपा वर हल्ला केला आहे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 08/29/2018 - 15:44 नवीन
.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 08/29/2018 - 16:37 नवीन
All 5 human rights activists to be kept under house arrest till next hearing: SC कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेवर ठपका ठेवण्यात आला होता. यासंदर्भात तपासामध्ये एल्गार परिषदेशी संबंधित कार्यकर्त्यांचे व बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे लागेबांधे असल्याचे पोलिसांना आढळले होते. या प्रकरणी पोलिसांनी काल देशभरात विविध ठिकाणी कारवाई करत नक्षलींशी संबंध असल्याचा ठपका ठेवत पाच जणांना अटक केली होती. यामध्ये वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्सालवीस या पाच जणांचा समावेश होता. या पाचही जणांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. हे पाचही जण ५ सप्टेंबरपर्यंत नजर कैदेत राहतील असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे तथाकथीत डाव्या माओवादी संघटनांच्या लोकांना अटक सुरु झाल्या पासुन देशात " केंद्र सरकारने " ईमरजेंसीच लागु केली आहे व ह्या संघटनेवर अत्याचार होत आहे अशी हाकाटी पेटवायला सुरुवात झालेली आहे. अटक झालेले लोक विचारवंत , बुद्धी जीवी आहेत असा त्या लोकांचा दावा आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 08/29/2018 - 17:04 नवीन
तथाकथीत डाव्या माओवादी संघटनांच्या लोकांना अटक सुरु झाल्या पासुन देशात " केंद्र सरकारने " ईमरजेंसीच लागु केली आहे व ह्या संघटनेवर अत्याचार होत आहे अशी हाकाटी पेटवायला सुरुवात झालेली आहे. अटक झालेले लोक विचारवंत , बुद्धी जीवी आहेत असा त्या लोकांचा दावा आहे. ते सर्व ठीक आहे परंतु याच लोकांना काँग्रेच्या कार्यकाळात पण बऱ्याच वेळेस अटक झाली होती तेंव्हा

मानवाधिकाराचे उल्लंघन किंवा आणिबाणीसदृश्य परिस्थिती

अशी कोल्हेकुई ऐकली नव्हती. यापैकी वरवरा राव हे माओइस्ट आहेत आणि गौतम नवलखा हे काश्मीर मध्ये मानवाधिकार हक्काचे कार्यकर्ते आहेत आणि तेथे सार्वमत घ्यायचे आग्रही आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 08/29/2018 - 16:42 नवीन
एल्गार परिषद : आरोपींचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध – पुणे पोलीस नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्यांचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान पुणे पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सीपीआय माओवादीकडून एल्गार परिषदेला पैशांचा पुरवठा करण्यात आला असून परिषदेमार्फत जनतेला भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही सांगितलं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून यावेळी पेन ड्राईव्ह, कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत विविध पुरावे हाती लागले असून तपासात ई-मेल्स, पत्र असे भक्कम पुरावे हाती लागले आहेत. एल्गार परिषदेच्या आडून शासनाविरोधात जनतेला भडकवण्याचे नियोजन होते याचेही पुरावे हाती आले आहेत असं पोलिसांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी आरोपी वरवर राव नेपाळमधून शस्त्र विकत घ्यायचा अशी माहिती दिली आहे. हाती आलेल्या इलेक्ट्रिक पुराव्यांची पाहणी केली असता प्रतीबंधित सीपीआय-माओवादी संघटनेने व्यूहरचना आणि रणनीतीचा भाग म्हणून भारतात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यवस्था उलथून टाकण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा कट रचला आहे. अशा प्रकारचे संघटन तयार करण्याचा ठराव सीपीआय माओवादीच्या ईस्टर्न रिजनल ब्यूरोच्या बैठकीत संमत झाला आहे, आणि त्याबद्दल पुरावा उपलब्ध आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. ईस्टर्न रिजनल ब्यूरो सीपीआय माओवादीचा एक भूमिगत गट आहे. याच कटाचा भाग म्हणून महाराष्ट्रात एक फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे. सीपीआय माओवादीने रचलेल्या कटात सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांचा स्पष्ट सहभाग असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सीपीआय माओवादीच्या सदस्यांकडून बेकायदेशीर कृत्यांकरिता निधी जमवणे, शहरी भागातील विद्यार्थ्यांना, तरुणांना भडकावणे, शस्त्र जमवणे याबद्दलचा पुरावा उपलब्ध झाला आहे. या कटात वरिष्ठ सदस्यांचाचा सहभाग असल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. तपासादरम्यान सीपीआय माओवादी, त्यांचे वरिष्ठ सदस्य आणि हिंसाचार करणाऱ्या प्रतिबंधित संघटनांचं संबंध असल्याचं समोर आलं आहे. राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी विविध संघटना त्यांचे पदाधिकारी तसंच सर्वोच्च राजकीय पदाधिकाऱ्यांवर हल्ले करुन घातपात करण्याचा कट सीपीआय माओवादीने रचल्याचंही समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान २८ तारखेला नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुंबई, ठाणे, फरिदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद आणि रांची या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यावेळी हार्ड डिस्क, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, मोबाइल, सीम कार्ड तसंच गुन्ह्याशी आऱोपींचा संबंध असल्याचं स्पष्ट दर्शवणारी कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. तपासात आरोपींविरोधात भक्कम पुरावे हाती लागल्यानेच त्यांना अटक करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Wed, 08/29/2018 - 17:04 नवीन
आश्चर्य आहे !! अजून एक ही पुरोगामी कोकलात आला नाही . अटक केलेल्या पाच अर्बन टेररिस्ट पैकी तीन जणांना काँग्रेस सरकारने अटक करून , कोर्टात केस चालवून न्यायाधीशांनी 4 वर्षांची शिक्षा ठोठावली होती . अरुण फेरिरा (2007) 4 वर्ष वेरणोन गोंसलवीस (2007) 4 वर्षे गौतम नवलाखा (2011 ) 5 वर्ष
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 08/30/2018 - 17:03 नवीन
परस्पर निर्दोष असल्याचे निवाडापत्रक दिले सुद्धा
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 08/31/2018 - 16:13 नवीन
GDP Growth rate for 1st qrt is said to be 8.2%. for year 2018-19 https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/q1-gdp-at-8-...
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 08/31/2018 - 16:16 नवीन
अर्बन नक्षली मध्ये भिषण शांतता पसरलेली आहे !! रफाल विमान खरेदी प्रकरणात राहुल गांधींनी आपल्याच पायावर कुर्हाड मारुन घेतली आहे !!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 09/07/2018 - 21:57 नवीन
पिराताई,
अग्गो बाई! पुरुषांनी उभं केलं म्हणायचं का हे सगळं?! ग्रेट्च!
गेले कित्येक सहस्रके पुरुषांनी स्त्रियांवर पिढ्यानुपिढ्या अन्याय केल्याचं म्हंटलं जातं. खरंखोटं माहित नाही. पण जर खरं धरलं तर ही सर्वच व्यवस्था बहुधा पुरुषांनी उत्पन्न केलेली असावी असा निष्कर्ष निघतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा