Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

CPT IPCC CA Final ह्यांचे गौड बंगाल !

अ
अत्रन्गि पाउस
Mon, 07/30/2018 - 12:26
🗣 76 प्रतिसाद
सी ए होण्यातल्या cpt / IPCC / CA फायनल ह्या परीक्षा सध्याच्या कॉमर्स शाखेतील एक मोठा विद्यार्थ्यांचा गट ह्या दुष्ट चक्रात अडकलेला आहे ... काही दिवसांपूर्वी सी ए झालात असे सांगून काही तासात तुम्ही सी ए झालेले नाही आहात असा निर्णय दिला : शेकडो विद्यार्थी भ्रमिष्ट व्हायचे बाकी होते काल सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२० (फक्त १ टक्का) विद्यार्थी IPCC चे दोन्ही ग्रुप पास झाले ..झाले नाही केले ह्या संस्थे वर कुणाचाही कंट्रोल नाही कायद्याने, ह्यांच्या निर्णयाला म्हणे कोर्टात सुद्धा अपील करता येत नाही ! ह्यांचे पेपर तपासणारे अधिकृत सी ए तपासनीस आपले पेपर्स अन्य कुणाकडून तपासून घेतात अशी वदंता आहे सी ए आर्टिकल शिप करणारे बहुतेक तरुण मुळे मुली त्यांच्या सिए फर्म्स कडून अत्यंत अल्प दरात पिळून घेतले जात आहेत आणि ह्यावर कुणाचेहि अपील नाही .. हे सगळे काय चालू आहे ? अजून किती दिवस ? आणि का हि मनमानी चालू आहे ? ह्याच्यावर उपाय काय ? फेसबुक वार ह्या वेळच्या सिए टोपर चा इंटरव्यू बघितला (तो खरा टोपर असेल तर) त्याचे एकंदर अवतार आणि भाष्य बघून हसावे कि रडावे कळत नव्हते भारतीय सिए लोकांच्या सही ला आंतरराष्ट्रीय स्तरावर "फक्त सिए" म्हणून कितपत किंमत आहे ? मुळात किती सिए हवे आहेत, एकूण उत्तरांमध्ये नेमके काय अपेक्षित आहे ? मार्क मिळाले तर का मिळाले आणि कापले तर नक्की का कापले ह्याचे कुठलेहि उत्तर कुणीही कधीही देत नाहीत माकेंझी सारख्या लोकांनी सिए ह्या क़्वलिफ़िकेश्न्ल मान्यता देणे बंद केले आहे हे खरे का ?? ह्या सगळ्यात काही पारदर्शकता का येऊ शकत नाही ? तज्ञांचे काय मत आहे ?? शेकडो हजारो तरुण उत्साही विद्यार्थ्यांच्या मनस्थिती शी हा अक्षम्य खेळ कुणीतरी आवरलाच पाहिजे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21374 views

🗣 चर्चा (76)
अ
अत्रन्गि पाउस Fri, 08/03/2018 - 09:03 नवीन
बंद होऊन ४ दशके होऊन गेली आणि तेव्हा १ विषय राहिला तर सगळे विषय बसावे लागत हे जर खरे असेल तर मग ते नंतर बंद झाले कि अवांतर :मला वाटते एके काळी मॅट्रिकच्या परीक्षेत (एसएससी चं ठाऊक नाही) ह्यात आपल्याला मॅट्रिक आणि एस एस सी दोन्हीची खात्री नाही असं का सूचित करताय ?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/03/2018 - 12:40 नवीन
मॅट्रिकच्यावेळी होतं याची खात्री आहे. एसएससीत कधीपर्यंत असं होतं ते ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 08/02/2018 - 20:30 नवीन
यूपीएससी बद्दल काय मत आहे?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/03/2018 - 06:37 नवीन
साहेब यूपीएससी मध्ये किती सीट्स आहेत हे सुरुवातीलाच माहिती असते. साधारण जागांच्या तिप्पट मुलांना मुलाखतीला बोलावले जाते. गेली पाच वर्षे या जागा कमी कमी होत आहेत हेही त्यांच्या (यूपीएससीच्या)वेबसाईट वर उपलब्ध आहे. २०१८ मध्ये फक्त ७८० जागा आहेत. सगळं कारभार खुला आहे. गोपनीय वगैरे काहीही नाही. http://mrunal.org/2018/02/notification-upsc-cse-2018.html तसेच आय आय टीचे आहे जागा १०००० च्या आसपास आहेत. मग तुम्ही पहिल्या दहा हजारात आलात तर आत नाही तर परत परीक्षा द्या https://www.motachashma.com/articles/total-seats-in-iit-nit-and-iiit.php मेडिकल च्या खुल्या सीटस १२०० आहेत त्यात तुम्ही असलात तर ठीक आहे अन्यथा तुम्हाला रस्ता मोकळा आहे. ICAI चा साधा सरळ हिशेब आहे. एकदा आत घ्यायचे मग त्याला पिळून घ्यायचे. ग्रुप पासिंग चा मूर्खपणा. विद्यार्थ्याला ज्ञान किती आहे याचा आणि ग्रुप पासिंगचा काहीही संबंध नाही. निकाल ३ % लावायचा आहे ना मग एका ग्रुपमध्ये घाऊक प्रमाणावर मुलांना नापास करायचे. या सर्व गोष्टी जालावर उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 08/03/2018 - 04:14 नवीन
परत सगळे पेपर देण्यामागे काय लॉजिक आहे ते नाही कळलं. मी गणितात नापास झाले तर तो पेपर पुन्हा द्यावा अभ्यास करून हे ठिके. पण सोबत इ.भु.ना आणि विज्ञान सुद्धा द्या असं म्हणल्यासारखं आहे. एक तर त्यात मी पास झालेय तर पुरेसा अभ्यास झालाय हे मी सिद्ध केलंय. परत त्यात वेळ घालवून गणितात त्याचा कसा फायदा होणार? मला सगळ्यात आवडणारी पद्धत म्हणजे ऑटोनोमस कॉलेज मध्ये लगेच परत पेपर देता येतो. पूर्ण सेमिस्टर जात नाही. इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी म्हणून मला परत सगळे पेपर द्यायचे ह्या कल्पनेनीच अंगावर काटा येतोय!! म्हणजे चुकून मॅकेनिक्स सुटला असेल तर तो परत द्यायची रिस्क घ्यायची?? खरं तर निम्मे लोक मॅकेनिक्स पायी ती एक सेमिस्टर परत परत देत राहतील. हॉरर!!!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 08/03/2018 - 06:20 नवीन
मुंबई विद्यापीठाने सगळे पेपर परत द्यायचे हा नियम जर इंजिनिअरिंगला लावला तर M1 आणि M2 पोरांच्या आयुष्यात यम1 आणि यम2 बनतील. :)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/03/2018 - 06:28 नवीन
डॉक्टर लोकांना पण शिकत असताना वॉर्डस वगैरे असतात. त्यांना तर स्टायपेंडही मिळत नाही असे वाटते. आर्टिकलशिपमध्ये फार काही शिकायला मिळत नाही असं म्हणणं आहे का? ज्या कोर्सेसमध्ये असे नियम नाहीत त्या कोर्सेसमधून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची क्वालिटी काय आहे (इंजिनिअरिंग धरून) ते आपण पाहतोच आहोत. अवांतर : सीए सीडब्ल्यूए सीएस हे कोर्सेस असे आहेत जिथे बहुधा प्रवेश घेताना आरक्षण लागू नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/03/2018 - 07:10 नवीन
केवळ आपला मुद्दा पुढे रेटण्यासाठी वाद घालता आहेत असेच वाटते. पण त्या अगोदर वस्तुस्थितीची पूर्ण माहिती करून घेतली असतात तर बरे झाले असते. एम बी बी एस च्या तीन वर्षाना सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत नियमित वर्ग डिसेक्शन क्लिनिक इ शिकवून त्याची विद्यापीठाकडून परीक्षा घेतली जाते. हि स्थिती अभियांत्रिकी कॉमर्स आर्टस् कॉलेज सारखीच असते. एम बी बी एस पास झाल्यावर इंटर्नशिप करताना १६,००० रुपये "विद्यावेतन" मिळते. हे निदान त्या मुलाला आपले पोट भरण्यास पुरेसे असते. हि इंटर्नशिप पूर्ण झाल्याशिवाय त्या विद्यार्थ्याला पदवी मिळत नाही किंवा व्यवसाय करण्यास परवानगी नाही. आणि एम डी किंवा एम एस करत असणाऱ्या विद्यार्थ्याला विद्यावेतन म्हणून महाराष्ट्रात रुपये ५०,०००/- आणि दिल्लीत किंवा उत्तर भारतातील राज्यात रुपये ८५,०००/- मिळतात कामाचा सन्मान (DIGNITY OF LABOUR) हा शब्द काय आहे हे समजून घ्या. ३००० रुपये विद्यावेतन देणे हि ICAI संस्थेने घातलेली अट आहे. हि रक्कम किमान आत्मसन्मान म्हणून पुरेशी आहे का? ICAI संस्था कोणते नियमित क्लासेस घेतात किंवा आर्टिकलशिप करताना नक्की कोणता अभ्यासक्रम आहे का? नुसती काही मार्गदर्शक तत्वे दिली कि झाले का? एखादा विद्यार्थी एका खाजगी सी ए कडे आर्टिकल करतो तेंव्हा त्याला तीन वर्षे केवळ आयकर भरणे यापलीकडे काहीही अनुभव मिळत नाही या वस्तुस्थिती बद्दल आपण कधी विचार केला आहे का किंवा सीए च्या विद्यार्थ्यांशी आपले बोलणे झाले आहे का? मोठ्या संस्थेत आर्टिकल करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व विभागात फिरवले जाते परंतु वरिष्ठ कोणीही काहीही शिकवत नाहीत( एखाद्या संस्थेत शिकवत असतील तर तो अपवादच आहे)जे काही शिकतात ते त्यांचे सिनियर विद्यार्थीच. असो
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 08/03/2018 - 09:01 नवीन
एखादा विद्यार्थी एका खाजगी सी ए कडे आर्टिकल करतो तेंव्हा त्याला तीन वर्षे केवळ आयकर भरणे यापलीकडे काहीही अनुभव मिळत नाही
याबद्दल साशंक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Fri, 08/03/2018 - 08:57 नवीन
डॉक्टर पेशाशी तुलना होतेय तर मग थत्ते साहेब तुम्हाला काय वाटते सिए अर्तीक्ल्स आणि डॉक्टर लोकांची इंटरनशिप ह्यात जास्त चांगल काय ??
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Fri, 08/03/2018 - 08:58 नवीन
डॉक्टर पेशाशी तुलना होतेय तर मग थत्ते साहेब तुम्हाला काय वाटते सिए अर्तीक्ल्स आणि डॉक्टर लोकांची इंटरनशिप ह्यात जास्त चांगल काय ??
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 08/03/2018 - 07:20 नवीन
ती आधीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाला म्हणून तो सीए च्या नादी लागतो असे असले तरी नंतर इन्स्टीट्यूट त्याला सीए चा नाद सोडण्यापासून "जबरदस्तीने" रोखते की काय? दहावीत ७५ - ८०% मिळाले म्हणून सायन्सला जाऊन पस्तावणार्‍यांचीही संख्या कमी नाही. या पस्तावणार्‍यांच्या पस्तावण्याला दहावीची परीक्षा घेणारे जबाबदार आहेत का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 08/03/2018 - 08:18 नवीन
दहावीला नव्वद टक्क्यावर मार्क मिळणारे पैशाला पासरी आहेत आणि त्या सर्वाना वाटते कि आपण खूप हुशार आहोत आणि डॉक्टर इंजिनियर आय ए एस प्रथितयश वकील सहज होऊ आणि यानंतर ती मुले आणि त्यांचे पालक सुद्धा अशा मृगजळाच्या मागे धावत आहेत. ते चूकच आहे

पण

आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी दुसरा चूक आहे म्हणून माझी चूक माफ करा असेच आपण म्हणता आहात. कारण

तो

या धाग्याचा विषयच नाही.
  • Log in or register to post comments
U
urenamashi Mon, 08/13/2018 - 19:20 नवीन
ज्या दिवशी सुटी घेतली त्या दिवसाचा पगार नाही असे वेठबिगारी सारखे वागवतात ते आर्टिकलशीप करणाऱ्या उमेदवाराला. डॉ. खरे म्हणतात तसे जर खरे असेल तर परिस्थिती खरच खूप गंभीर आहे. बाकीच्या परिक्षे मध्ये जसे की व्हेरिफिकेशन / फोटोकॉपी करता येते तशी सोय नाही का सीए साठी? आता पर्यंत कोणीच कसे कोर्टात गेलें नाही त्या असोसिएशन विरुद्ध?(विचार करणारी बाहुली).
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/14/2018 - 01:37 नवीन
तीनचार हजार रु फार झाले. एकजण बाराशे - चौदाशे रु देतो. तीन वर्षांत विद्यार्थ्याने अभ्यास शिकून पास होणे अपेक्षित. नाही झाला तर एक कर्मचारी/अकाउंटंट म्हणून (जागा असल्यास) ठेवतो पगार देऊन. थोडक्यात सीए अभ्यासक्रम घोटुनघोटुन शास्त्रीय संगीत शिकणे नव्हे असे माझे मत झाले आहे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 08/14/2018 - 04:00 नवीन
१- सीए संस्थेने सुरुवातीच्या पहील्या पायरीवरच चाळणी लावणे , जे काय पर्सेंट मेंटेन करायचे ते करुन पुढच्या पायरीवर खेचुन अडकवण्याचा कार्यक्रम बंद करावा हा पर्याय अत्यंत योग्य आहे व्यवह्रार्य आहे असे मला वाटते. २- आर्टीकलशीप मध्ये कमी पैसे मिळतात पण जो उद्देश आहे तो मुळात पैसे नसुन कार्यानुभव घेणे हा आहे. आणि तो निश्चीतच यशस्वी होतो असे माझे मत आहे. ही मुलं प्रत्यक्ष व्यवहारीक जीवनाचा फार जवळून अनुभव फार योग्य अशा लवकर वयात घेतात. त्यात कामाच्या अनुभवात वेगवेगळ्या कंपनीत जाऊन ऑडिट करणे हा भाग ही आसतो. इतर फार कमी असे क्षेत्र आहे ज्यात इतक्या कमी वयात असे मार्केट प्रॅक्टीकल लाइफ चे एक्स्पोजर मिळते. ते एक्स्पोजर इटसेल्फ त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यात आपल्याला नेमके काय करता येइल काय नाही याचा निर्णय घ्यायला मदत करते. आर्टीकल मुले ही स्मार्ट- टफ असतात असे माझे व्य्क्तीगत निरीक्षण आहे. ते आपला सीए बॉस पासुन क्लाएंट पासुन विविध धंदे यांना अधिक जवळुन बघतात आर्टीकलशीप त्यांना तो अ‍ॅस्क्सेस देते. ३- सीए संस्थेचा सिलॅबस व्यावसायिकता कौशल्य पातळी भारतातल्या मोजक्या शैक्षणिक दर्जेदार पर्यायांपैकी एक आहे असे माझे मत आहे. यांचे पेपर कधी फुटले यांच्या डेट कधी बदलल्या असे कधीच ऐकले नाही. ४- जो मुलगा जरी सीए पुर्ण करु शकला नाही अर्धा रस्ता जरी चालुन गेला तरी ज्याने आर्टीकलशीप पुर्ण केली आहे , वा एखादा ग्रुप काढलेला आहे. तो एक उत्तम चार्टड जरी नसला तरी अकाऊंटंट नक्क्चीच बनु शकतो नव्हे बनतोच व आपला चरीतार्थ चालवतो असे अनेक आहेत. व ते काही फार वाइट परीस्थितीत नक्क्कीच नाहीत. हा जरी सीए इतका बेनेफिट जरी नाही तरी तो फार सहजतेने हा अनुभव आणि स्किल वापरुन व्यस्शित धक्क्याला लागु शकतो. इथे सीए झाला नाही तर आत्महत्या हा एकच पर्याय उरतो असा काहीसा गैरसमज मुबलक दिसतोय ५- या कोर्सचा जो एकुण आर्थिक खर्च आहे तो इतर अनेक इंजिनियरीग मेडिकल मॅनेजमेंट कोर्सेस पेक्षा तुलनेने नक्कीच कमी आहे. यात परीक्षेच्या तारखा सिस्टीम आखीवरेखीव आहे. अनेकजण रेग्युलर नोकरी धरुन ही या परीक्षा देत असतात. आषाढी कारतिकी फॉरमॅट असतो एक लंबा सफर है जो दम दम से तय करना है.. यात नोकरी चालु असते म्हणजे काम ही चालु असते व शिक्षण ही अर्थात हे फार हार्ड वर्कींग व चॅलेंजींग असते पण एक्सलन्स ला पर्याय नाहीतरी काय ? अजुन मुद्दे आहेत नंतर लिहीतो
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/14/2018 - 09:07 नवीन
मारवा साहेब दोन मुद्दे १) सी एस सारखे फायनल परीक्षा पास झाल्यावर आर्टिकलशिप करण्याचा पर्याय खुला का नाही? २) ज्या तर्हेने आर्टिकलशिप करणारे काम करतात ते पहिले तर तीन चार हजार रुपये हे सन्मान्य विद्या वेतन नक्कीच नाही. मी त्यांना पगार द्या असे म्हणत नाही परंतु आजची महागाई आणि स्थिती पाहिल्यास दहा हजार रुपये तरी विद्या वेतन असावे ज्यात बाहेरगावच्या विद्यार्थ्याला दोन वेळचे पोट तरी भरता येईल. ३) इथे सीए झाला नाही तर आत्महत्या हा एकच पर्याय उरतो असा काहीसा गैरसमज मुबलक दिसतोय या आपल्याच विधाना इतका फार मोठा गैरसमज दुसरा नसेल दीड लाख विद्यार्थी बसतात त्यातील ३-४ हजार सी ए होतात मग बाकी लाखावारी आत्महत्या व्हायला पाहिजेत. मी फक्त एवढेच म्हटले आहे कि लाखावर तरुण मुलांची तीन बहुमूल्य वर्षे केवळ आपल्या संस्थेला पैसे मिळवण्यासाठी फुकट घालवण्यासारखे दुसरे पातक नसेल.आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे बहुसंख्य सी ए लोक सुरुवातीला त्याचे समर्थन करताना आढळतात. नीट चर्चा केल्यावर त्यातील फोलपणा लक्षात येतो आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/14/2018 - 08:31 नवीन
मुद्दा क्र ४- अमच्या इथे एका ट्याक्स रिटन फाइलिंग इत्यादि कामे करणाऱ्याने "बी ए , सी ए अपिअर्ड " अशी पितळी पाटीच दारावर लावली आहे. ( याचे वडील सीएस होते आणि ही कामे करत.) मुलगा इतका शिकला नाही परंतू कामे करतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/14/2018 - 10:13 नवीन
अकरावी - बारावीत सिपिटी दिल्यावर आइपिसिसी आणि एकदम दहा हजार रु कोण देणार?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/14/2018 - 14:50 नवीन
आयपीसीसी पास होण्यासाठी काही तरी तर ज्ञान आवश्यक असतंय कि नाही? मग जर काहीही अनुभव नसलेल्या इंजिनियरला २५ हजार ते एक लाख पर्यंत पगार देतात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरला जर १६००० रुपये मिळतात तर आय पी सी सी झालेल्या मुलाला सन्मान्य इतके किमान विद्या वेतन देण्यासाठी इतका विरोध का आहे तेच मला समजत नाही. अगदी पहिल्या वर्षी ४००० दुसऱ्या वर्षी ८००० आणि तिसऱ्या वर्षी १२००० द्यायला तरी काही हरकत नसावी असे मला वाटते
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/14/2018 - 16:50 नवीन
इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरला जर ...... डॉक्टर इंटर्नशिप कधी करतो? शिकून एमबीबीएस झाल्यावर का अगोदर?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/14/2018 - 17:21 नवीन
वर लिहिलं आहे एम बी बी एस ची पदवी इंटर्न शिप पूर्ण केल्यावरच मिळते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/14/2018 - 18:33 नवीन
आर्टिकलशिप करत असताना पहिल्या/दुसऱ्या /तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यास स्वतंत्रपणे कंपन्यांचे हिशेब आणि सेक्रटेअरिअल कामकाज तपासून शेरा मारण्याइतकं ज्ञान प्राप्त झालेलंच असतं असं म्हटता येईल का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/14/2018 - 20:14 नवीन
इंटर्नशिप मध्ये त्या डॉक्टरला औषधाचे प्रिस्क्रिप्शन देण्याचे किंवा सर्टिफिकेट देण्याचे कोबतेही अधिकार नसतात तरीही सन्मान्य विद्यावेतन दिले जाते. आपण आपला मुद्दा पुढे ढकलण्यासाठी लंगडे समर्थन देत आहात असे वाटते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/14/2018 - 18:36 नवीन
तसं गिल्डला वाटत नसावं बहुतेक.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 08/14/2018 - 20:17 नवीन
संस्थेचे चालक आपल्या लोकांना स्वस्तात वेठबिगार मिळावेत म्हणून या विरुद्ध काही करतील असे वाटत नाही. कारण कितीही उदाहरणे दिली तरी त्यांना ते पटवूनच घ्यायचव नाही. मग आपल्या स्वार्थासाठी किती ही तरुणांचा बळी गेला तरी चालेल हीच आजची संस्कृती झाली आहे. मग ते शिक्षण क्षेत्र असो की राजकारण.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा