CPT IPCC CA Final ह्यांचे गौड बंगाल !
सी ए होण्यातल्या cpt / IPCC / CA फायनल ह्या परीक्षा
सध्याच्या कॉमर्स शाखेतील एक मोठा विद्यार्थ्यांचा गट ह्या दुष्ट चक्रात अडकलेला आहे ...
काही दिवसांपूर्वी सी ए झालात असे सांगून काही तासात तुम्ही सी ए झालेले नाही आहात असा निर्णय दिला : शेकडो विद्यार्थी भ्रमिष्ट व्हायचे बाकी होते
काल सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२० (फक्त १ टक्का) विद्यार्थी IPCC चे दोन्ही ग्रुप पास झाले ..झाले नाही केले
ह्या संस्थे वर कुणाचाही कंट्रोल नाही कायद्याने, ह्यांच्या निर्णयाला म्हणे कोर्टात सुद्धा अपील करता येत नाही !
ह्यांचे पेपर तपासणारे अधिकृत सी ए तपासनीस आपले पेपर्स अन्य कुणाकडून तपासून घेतात अशी वदंता आहे
सी ए आर्टिकल शिप करणारे बहुतेक तरुण मुळे मुली त्यांच्या सिए फर्म्स कडून अत्यंत अल्प दरात पिळून घेतले जात आहेत आणि ह्यावर कुणाचेहि अपील नाही ..
हे सगळे काय चालू आहे ? अजून किती दिवस ? आणि का हि मनमानी चालू आहे ? ह्याच्यावर उपाय काय ?
फेसबुक वार ह्या वेळच्या सिए टोपर चा इंटरव्यू बघितला (तो खरा टोपर असेल तर) त्याचे एकंदर अवतार आणि भाष्य बघून हसावे कि रडावे कळत नव्हते
भारतीय सिए लोकांच्या सही ला आंतरराष्ट्रीय स्तरावर "फक्त सिए" म्हणून कितपत किंमत आहे ?
मुळात किती सिए हवे आहेत, एकूण उत्तरांमध्ये नेमके काय अपेक्षित आहे ? मार्क मिळाले तर का मिळाले आणि कापले तर नक्की का कापले ह्याचे कुठलेहि उत्तर कुणीही कधीही देत नाहीत
माकेंझी सारख्या लोकांनी सिए ह्या क़्वलिफ़िकेश्न्ल मान्यता देणे बंद केले आहे हे खरे का ??
ह्या सगळ्यात काही पारदर्शकता का येऊ शकत नाही ?
तज्ञांचे काय मत आहे ??
शेकडो हजारो तरुण उत्साही विद्यार्थ्यांच्या मनस्थिती शी हा अक्षम्य खेळ कुणीतरी आवरलाच पाहिजे
मीच बरोबर
म्हणून फाटे फोडताय आणि आम्ही म्हणत नाहीये त्या गोष्टी आमच्या तोंडी घालताय?नजरिया
नक्की काय आहे हेच जाणून घ्यायचे आहे. आपण मुलांच्या भविष्याशी खेळतो आहोत याची कुणालाच खंत नाही? मी अनेक सी ए लोकांशी बोललो. परंतु त्यातील एकालाही याचे नक्की समर्थन देता आलेले नाही. दोन विषयात ४९ गुण आणि दोन विषयात ५० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही नापास करता (सरासरी ५० नाही म्हणून) म्हणजे विद्यार्थ्याचे ज्ञान किती आहे हे समजून घेण्यापेक्षा किती लोकांना नापास करता येईल याचाच विचार होतो आहे हे सुस्पष्ट आहे. सी ए चे विशिष्ट पातळीचे ज्ञान असलेच पाहिजे यात शंकाच नाही. परंतु संस्था घेत असलेली परीक्षा पद्धती अत्यंत चुकीची आणि एकांगी आहे हे समजून उमजून कुणालाच काही करावेसे वाटत नाही उलट त्याचे समर्थन होते आहे याचेच आश्चर्य वाटते. माझी समजूत संपूर्ण चुकीची असेल किंवा मला सांख्यिकीचे तेवढे ज्ञान नाही हे समजून कुणी सी ए मला यात काय बरोबर आहे आणि माझे काय चुकते आहे हे समजावून सांगेल का? माझ्या दोन मित्रांची हुशार मुले असे सी ए अर्धवट सोडून दिशाहीन फिरताना पहिले आणि त्यातील एकाने मला कळकळीने मुलाला सीए सोडू नको हे समजावण्यास सांगितले तेंव्हा मला हा सर्व प्रकार लक्षात आला.