वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे मंदावली आहेत काय ?
रामराम मंडळी, मंडळी. कोणतीही नवीन गोष्ट काही दिवसच चांगली वाटते. सर्वसामान्य माणसांचा स्वभावच चंचल असतो. एका गोष्टीत तो फार काळ रमत नाही. मग ते मोबाईल, गाडी टीव्ही, किंवा काही नवीन उपयोगाची उपकरणे असोत की, लेखन करण्यासाठीची माध्यमं जशी की, फेसबूक, वाट्सअॅप, ब्लॉग की ड्रुपलवर आधारित असलेली मराठी संस्थळे असोत. काळाप्रमाणे त्याचा उपयोग कमी जास्त होत असतो. मराठी संकेतस्थळांना आता पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे, मराठी माणसं लालित्यपूर्ण लेखन करतात कमी आणि भांडतात जास्त असा माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. गेल्या काही वर्षात लेखनाच्या बाबतीत काही बदल झपाट्याने झाले आहेत. जसे अगदी सुरुवातीला ब्लॉग लिहिल्या जायचे, प्रत्येक लिहिता वाचता येणारा ब्लॉग लिहित होता, आता सर्वच ब्लॉग लिहित नसतील पण हे प्रमाण कधीकाळी खूप होतं. नंतर जिमेल चॅटींग जोरात सुरु झालं. बझर वगैरे. नंतर फेसबूकानं जोर धरला. आणि आत्ता वाटसअॅप.
वाटसअॅपने काही सुविधा खूप दिल्या आहेत. एखादे दोन उतारे असलेल्या पोष्ट्स, कुठल्या तरी पोष्टला तात्काळ उत्तर, आपली पोष्ट किती लोकांनी वाचली त्याच्या नोंदी, तात्काळ निरोप देवाण-घेवाण. प्रेमाच्या गोष्टी, लफडी आणि तत्सम गोष्टींनी वाट्सअॅप रात्रंदिवस बीझी झालं आहे. मोबाईल काही क्षण जरी इकडे तिकडे झाला की अरे, आत्ता तर मोबाईल इथे होता, कुठे गेला, अशी शोधाशोध सुरु होते. इतकं तंत्रज्ञानांनी माणसं व्यस्त होऊन गेली आहेत. आम्ही तर बॉ वाट्सअॅप पाहात सुद्धा नाही, अशी म्हणनारी माणसं असतीलच यात काही वाद नाही. पण, कधीकाळी ज्या मराठी संस्थळांनी अक्षरक्ष वेड लावलं होतं, ते वेड आता कमी झालंय का असे वाटायला लागले आहे. एखादी दुसरीच सुंदर कविता, त्यावर एकापेक्षा एक दिली जाणारी दाद, काही उत्तम कथा, काही उत्तम लालित्यपूर्ण लेखन, पर्यटन, गड किल्ले, यांची माहिती त्याची मात्र संख्या मंदावली आहे काय, असे वाटायला लागले आहे. काथ्याकूट मात्र जोरात असतो. पण तेवढ्यावर मराठी संस्थळे जगतील असे मला काही वाटत नाही.
माणसं येतात आणि जातात. नवी पिढी येते ती आपली काही वैशिष्टे घेऊन. तेव्हा नव्या काळात मराठी संस्थळे कशी असतील. त्यावर येणारे लेखन कसे असेल ? अशा संस्थळावर आपण केलेलं लेखन असतं, किती लोकांनी दाद दिली याची उत्सुकता असते. अनेकदा झालेलं विषयांतर आपलं लिहिण्याचा उत्साह घालवतो. काही आयडी सतत आनंदावर विरजन घालायलाच आलेली असतात, त्यापेक्षा वाट्सअॅप बरं असंही वाटू शकतं, त्यामुळेही लेखन कमी येत आहे, असे होऊ शकते. हे सर्व असूनही मराठी संस्थळे भविष्यात कशी असतील, नवनव्या तंत्र माध्यमात मिपासारख्या चहल-पहल असलेल्या संस्थळाला भविष्यात काय करावे लागेल, आणि अजून आपणास काय वाटते, आपली काय मतं आहेत ते समजून घेण्यासाठीचा हा काथ्याकूट तेव्हा आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय. स्वागत. :)
वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे मंदावली आहेत काय ?>>>> मते ह्या प्रश्नाचे उत्तर " होय" असे आहे. असे होण्याची अनेक कारणे आहे पं माझ्या मते सगळ्यात मोठ्ठे कारण म्हणजे तुम्हाला कोणाशी कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे / करायला आवडेल हे निवडाण्याचे स्वातंत्र्य ! आमचा वैयक्तिक व्हॉट्सॅप्प चा अनुभव असा आहे कि सुरुवातीला अनेक लोकं होतं कंपु मध्ये . जसे जसे मतभेद व्हायला लागले अन टोकाला जायला लागले तसे तसे एकेक करुन लोकं ग्रुप सोडुन गेले. आणि मग उरलेल्या ग्रुपमध्ये इतका कंफर्ट लेव्हल येत गेला कि आता कोणा नवीन माणासाला ग्रुप मध्ये अॅड करण्या आधी विचार केला जातो . आजच्या घडीला ग्रुपमध्ये मोजके १० मिपाकर आहेत ! आणि सगळ्यांची सगळीच मते जुळतात असे नाही. काही कट्टर भाजपा समर्थक आहेत तर काही भाजपापेक्षा राष्ट्रवादी बरी अशा विचाराचे !! चर्चा होतातच पण जिथे अति ताणले जात आहे तिथं थांबवण्याचा सारासार विवेक सगळ्यांकडे आहे ! कितीही मतभेद झाले तरी कोणीही कोणावर " अज्ञानमुलक , असमंजस , पुर्वग्रहदुषित" असले शब्द फेकत नाही. कोणालाही धर्मसुधारणा करायची नाहीये की समाजसुधारणा करायची नाहीये . आहे हे आहे असं इन्जोय करु असा साधा अत्तीतुडे सगळ्यांचाच असल्याने कसं भारी वाटतं !! देशी गांईचा गोठा, ग्लोबल वार्मिंग आणि ट्रेड वॉर , किल्ल्यांची रचना , पुढील ट्रिप चे प्लॅन , इन्व्हेस्टमेन्ट ऑपॉर्च्युनिटीज , ञ , ङ ह्यांचे उच्चार आणि मराठी चे व्याकरण सनीताई लिऑने, संक्लिद्य अनावृता , नेट्फ्लिक्स वरील सीरीयल्स , पुण्यातील खाडाडीच्या जागा , अशा आणि अनेक इतर विषयांवरील गप्पा होत असताना एकदम मिसळपाव खाल्ल्यासारखे वाटते तेही व्यक्तिगत अभिनिवेशाचे अन चिखलफेकीचे खडे नसलेली !! एकुणाच इतका कंफर्ट झोन तयार झाल्याने मिपावर धागा काढत बसण्या पेक्षा ग्रुपवर चर्चा करायला मजा येते ! :)