माझं कुणाला ओझं नको
मला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये .... हल्ली ह्या एका विधानाने प्रचंड स्तोम माजवल आहे. आणि ह्या विधानाचा एका अजून दृष्टीकोनातून विचार. प्रचंड अहंकार आहे ह्या विधानात. ह्यात अनेक सुप्त विधानं अंतर्भूत आहेत --मी स्वयंभू आहे, --मी पैसे मिळवले, --मी कुणाला उत्तरदायी नाही, --मी अजूनही लोकांसाठी काही करू शकतो पण कुणाला एक छदाम मदत मागणार नाही. --मी इतरांची सेवा करतो तो माझा मोठेपणा पण इतरांनी माझी सेवा करायची वेळ आली तर ते माझं जणू मरणच ...नकोच ते अधिकार पदावरून (अधिकारपद किंवा कर्तेपण हे मी कौटुंबिक / सामाजिक/व्यवसायिक वगैरे सर्वत्र म्हणतोय) गेलो तरी मी आहे तो पर्यंत मी म्हणीन ती पूर्व, करीन तो कायदा, म्हणीन ते नियम आणि ह्यात कुणी विरोध केला कि मी आता ओझं झालोय हि भावना आणि ती नको म्हणून माझं कुणाला ओझं नको हा हट्ट
मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन
असा विचार का नको ?
ह्याच एक कारण, आयुष्यात आपल्या उमेदीत आपण कर्तेपणा सांभाळताना, मिरवताना, गाजवताना (प्रत्येक क्रियापद तेवढेच महत्वाचे) जे काही विपरीत केलय त्याची परतफेड मला मी कर्ता नसताना भोगावी लागू नये हा एक सुप्त भाव आहे ....आणि तो मुख्य आहे
माझे अधिकार पद गेल्यावर मला त्याच ठिकाणी तसाच मान मिळावा हि अपेक्षा म्हणून ठीक आहे परंतु ते तितके सोपे नाही. त्यासाठी आपल्या अधिकाराचा (इतरांना त्रासदायक असा ) आपण गैरवापर केलेला नाही ह्याची खात्री हवी. योग्य प्रकारे आपण जर माणसे (घरी दारी सगळी कडे) जोडून ठेवली असतील तर आपल ओझं तर कुणाला वाटणार नाहीच पण उलट एक हवेहवेसे घटक म्हणून आपण शेवटपर्यंत राहू शकतो.
आपण आपल्या आयुष्यात लोकांकडे गेल्यावर आपल्याला कशी वागणूक मिळते, आपण त्यांना कशी वागणूक देतो. ह्यात आपल्यावर पैशा मुळे मान देणारे कोण आणि आतड्याची जवळीक कुणाशी हे कळायला फार वेळ लागू नये.
मला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये ..खरं आहे , 'दुसर्यांवर' 'ओझे' बनण्याची मजा तरुणपणीच येत ;) #सेक्रेड्_गेम्स्_ईफेक्टमला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये.यात चुकीचं काय आहे ???!!! हे एक वास्तव म्हणून स्विकारणेच बुद्धीचे लक्षण आहे. काही अपवाद वगळता, वृद्धापकाळी कुणावर ओझं बनणार्या माणसाचे आपल्या जीवनाचे व्यवस्थापन फसले आहे, असेच मानावे लागेल. १. "आपल्या मुलांनी आपले भविष्य सर्वोत्तम बनवावे" अशी इच्छा करतानाच, त्याच दमात, "माझ्या मुलांनी माझ्या म्हातारपणाची काठी बनावे" किंवा "त्यांनी सतत आमच्या भल्याबुर्या आर्थिक व मानसिक गरजा पुरवित राहणे हे त्यांचे कर्तव्य आहे" असा हट्ट धरणार्यांना, त्यांच्या या दोन विचारतली विसंगती दिसत नसेल, तर ही त्यांच्या समजुतीतली कमतरता आहे, यात संशय आहे काय ?! भर जोमाने प्रगतीपथावर धावण्याच्या वेळेस, मुलांवर आपली जबाबदारी टाकण्याने, आपणच त्यांच्या पायात बेड्या अडकवत असतो, हे कटू असले तरी सत्य आहे. "आमच्या मुलांनी सर्वोत्तम भविष्य बनवावे" ही इच्छा मनापासून असल्यास, ती खरी होण्यासाठी, त्यांना त्यांच्या आवडीच्या गाव-शहर-देशामध्ये, त्यांच्या आवडीच्या नोकरी-व्यवसायाच्या आकाशात, निरंकुश भरार्या मारायला केवळ पूर्ण परवानगी असायला हवी असेच नाही तर तसे करण्यासाठी पालकांचा सक्रिय पाठिंबा असायला हवा. पूर्णविराम. २. आपल्या वृद्धापकाळासाठी आर्थिक व मानसिक तरतूद करणे ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत जबाबदारी आहे. ते न जमणार्यांनी, आपल्या अर्थ-मानसिक व्यवस्थापनातल्या कमतरतेबद्दल इतरांना दोष देणे अयोग्य आहे. मुलांना त्यांचे जीवन त्यांना हवे आहे तसे जगण्याचा हक्क आहे, त्यावर आक्षेप घेण्याचा पालकांना हक्क नाही... कारण, मुलांना जन्म देण्याआधी पालक त्यांच्याकडून "तुम्ही माझ्या म्हातारपणाची काठी बनणे आवश्यक आहे" अशी मागणी मान्य करून घेत नाहीत. किंबहुना, जन्म देण्यासाठी मुलांनी पालकांवर जबरदस्तीने केलेली नसते किंवा मुलांचे मतही विचारात घेणे शक्य नसे... म्हणजेच, मुलांना जन्म देणे ही पालकांनी स्वमताने व स्वानंदासाठी केलेली कृती असते. त्यामुळे, (अ) मुलांच्या उत्कर्षाला पूर्ण ताकदीने हातभार लावणे व (आ) त्यात अडथळा न बनणे, ही पालकांची मूलभूत कर्तव्ये आहेत. "म्हातारपणासाठी काठी मिळावी" या कारणासाठी मुलांना जन्म देणे, हा भविष्यातल्या फायद्यासाठी केलेला एक व्यापारी गुंतवणूकीचा व्यवहार होईल. कितीही कटु किंवा गैरसोईचे वाटले, तरी हे सत्य आहे. ३. याचा असा अजिबात अर्थ नाही, की मुले व पालकांत कोणताच बंध असू नये. तसे म्हणणे मानवी भावनिक वस्तूस्थितीला धरून होणार नाही. त्याऐवजी, वरची परखड सत्य वस्तूस्थिती जाणून घेतल्यावर, मुले व पालकांनी सामोपचाराने, एकमेकाला शक्य तेवढी सुकर, सुखद व सोईस्कर अशी मध्यममार्गी व्यवस्था मान्य करणे, दोन्ही बाजूंसाठी योग्य आणि आनंदाचे होईल. अन्यथा, पालक व मुले, केवळ स्वतःचा विचार करत, एकमेकाच्या दु:खाचे कारण होतील."म्हातारपणासाठी काठी मिळावी" या कारणासाठी मुलांना जन्म देणे, हा भविष्यातल्या फायद्यासाठी केलेला एक व्यापारी गुंतवणूकीचा व्यवहार होईल.पण दुर्दैवाने आपल्या सरकारला तेच अपेक्षित आहे ! हे पहा >>>>>मी स्वयंभू आहे, --मी पैसे मिळवले, --मी कुणाला उत्तरदायी नाही, --मी अजूनही लोकांसाठी काही करू शकतो पण कुणाला एक छदाम मदत मागणार नाही. --मी इतरांची सेवा करतो तो माझा मोठेपणा पण इतरांनी माझी सेवा करायची वेळ आली तर ते माझं जणू मरणच ...नकोच तेयात आहे. अशी कितीतरी उदाहरणे मी डोळ्यानी पाहीली आहेत. त्यापेक्षा या लोकांनी नव्या पिढीच्या चिंता , त्यांची स्पर्धा, भावनीक ओढाताण समजून घेऊनमला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीनअसा विचार का करीत नाहीत?आपल्याला तरुणपणात मागच्या पिढीचं काय काय बोचत होतं ते विसरून पुढच्या पिढीशी नकळत तस्साच वागत जातो असं वाटतं.अटेंशन सीकिंग ही मुळात खोलवर पक्की रुजलेली नैसर्गिक जीवनावश्यक प्रवृत्ती असावी. आपण महत्वाच्या पोझिशनमध्ये असलं पाहिजे ही इच्छा सर्व वयांत राहतेच..जे पुरुष किंवा स्त्रिया घरात कर्तृत्ववान म्हणून मान्यता पावलेले आहेत त्यांच्या बाबतीत ही प्रवृत्ती जास्त असते कारण जगासमोर कायम आपण खंबीर व स्वयंपूर्ण अशी प्रतिमा निर्णाण केलेली असते व ती जपण्याचाच त्यांचा अट्टहास असतो. माझ्या आईच्या मैत्रिणीची आई निवृत्त सरकारी कर्मचारी. पेंन्शनमुळे आर्थिकदृष्ट्या कुणावर अवलंबून नव्हती. अर्धा तासाच्या अंतरावर असलेल्या शहरात 2 मुले व 2 मुली राहात होत्या तरी कुणाकडेही राहायला तयार नव्हती. कारण हेच की माझा कुणाला त्रास नको. सर्व मुलांचा जीव तुटायचा तिच्यासाठी हीच्या आजारपणात मुले व मुली आळीपाळीने हीच्याकडे सेवेला जाऊन राहायची पण ही पठ्ठी काही घर सोडायला तयार नव्हती. शेवटी अती झाल्यावर मुले-मुली चिडल्या तेव्हा कुठे ही बाई एका मुलाकडे राहायला तयार झाली. त्याचा बंगला 5 खोल्यांचा . हीची स्पेशल रुम . तर हीला टिव्हीचा, नातवंडांच्या मित्र मैत्रिणींचा त्रास व्हायचा. मग परत हीची कुरकुर की मला वृद्धाश्रमातच राहायचाय. मग सर्वांनी मिळून एका उत्तम वृद्धाश्रमात हीची रवानगी केली. 4 च महिन्यात हिने कुणाला तरी मेलेलं बघून घरच्यांना घेऊन जाण्यासाठी फोन केला. परत आणल्यावर 6 महिन्यांनी तापाचं निमित्त होऊन ती बाई गेली.ह्याला फार पुर्वीच उपाय सुचवला होता आपल्या पुर्वजांनी. सनातन धर्मात सांगितले होते तसे चार आश्रम व्यवस्थित प्रश्थापित करणे ! एकदा का पोराबाळांची लग्ने झाली की हळु हळु मन संसारातुन काढुन घेणे , अलिप्त राहुन केवळ साक्षीस्वरुप राहुन नातवंडांच्या बाललीला अनुभवणे हा खरा वानप्रस्थाश्रम ! ही खरी संन्यासाची तयारी ! आपला आजचा समाज गृहस्थास्रमाच्या पुढे सरकतच नाही ! वानप्रस्थाश्रम आलाच नाही तर संन्यासाश्रम कसा येणार ? प्रपंचात गुंतलेली वासना सुटतच नाही मग काय करणार ???अगदी अगदी. हल्लीच्या पालकांना स्वताचा अहंकार, स्वाभिमान व घरात अपेक्षित असलेले मानाचे स्थानही सोडायचे नाहीय आणि मुला-सुनांच्या संसाराची व नातवंडांना सांभाळण्याची जबाबदारीही नकोय. वर हे लोक वृद्ध म्हणून समाजाची सहानुभूती यांनाच. थोडक्यात काय तरुणपणी स्वताच्या मुलांना करीयरच्या नावाखाली वेळ द्यायचा नाही व म्हातरपणी जेव्हा त्यांच्या करीयरचा काळ असतो तेव्हा मदत करायची नाही पण आपले हक्क मात्र व्यवस्थित उपभोगायचे. माझा कुणाला त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात न राहता वेगळे एकटे राहणारे लोक ढोंगी असतात. कारण त्यांना माहित असतं की वेळ आली की मुलंमुली येतीलच. आजवर माझा त्रास कुणाला नको म्हणून आत्महत्या करणारे किंवा स्वताचा त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात आनंदाने राहणारे लोक मी पाहिले नाहीत. वृद्धाश्रमात राहणारे लोक पण मुले नातवंडे जवळ नसण्याचे दुख बाळगून असतात. त्यामुळे माझा त्रास कुणाला नको असे म्हणणारे लोक निव्वळ ढोंगी असतात व त्यांच्यात प्रचंड अहंकार असतो असे माझे स्पषअट मत आहे. वद्धांसाठी समुपदेशनाची व्यवस्था असणारी केंद्रे उघडण्याची भविष्यात खूप गरज भासेल असे वाटते. कारण वद्धांनी असा नकारात्मक दृष्टीकोन बाळगणे त्यांनाही व त्यांच्या परिवारालाही घातक आहे.मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीनअशा पद्धतीने कुटुंबातच सकारात्मकपणे व समंजसपणे राहावं हा आहे. दुर्दैवानं तो बहुतांशी दिसत नाही.