Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

माझं कुणाला ओझं नको

अ
अत्रन्गि पाउस
Mon, 07/16/2018 - 15:51
🗣 71 प्रतिसाद
मला वृद्धापकाळी कुणावर ओझ बनायचं नाहीये ..
.. हल्ली ह्या एका विधानाने प्रचंड स्तोम माजवल आहे. आणि ह्या विधानाचा एका अजून दृष्टीकोनातून विचार. प्रचंड अहंकार आहे ह्या विधानात. ह्यात अनेक सुप्त विधानं अंतर्भूत आहेत --मी स्वयंभू आहे, --मी पैसे मिळवले, --मी कुणाला उत्तरदायी नाही, --मी अजूनही लोकांसाठी काही करू शकतो पण कुणाला एक छदाम मदत मागणार नाही. --मी इतरांची सेवा करतो तो माझा मोठेपणा पण इतरांनी माझी सेवा करायची वेळ आली तर ते माझं जणू मरणच ...नकोच ते अधिकार पदावरून (अधिकारपद किंवा कर्तेपण हे मी कौटुंबिक / सामाजिक/व्यवसायिक वगैरे सर्वत्र म्हणतोय) गेलो तरी मी आहे तो पर्यंत मी म्हणीन ती पूर्व, करीन तो कायदा, म्हणीन ते नियम आणि ह्यात कुणी विरोध केला कि मी आता ओझं झालोय हि भावना आणि ती नको म्हणून माझं कुणाला ओझं नको हा हट्ट
मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन
असा विचार का नको ? ह्याच एक कारण, आयुष्यात आपल्या उमेदीत आपण कर्तेपणा सांभाळताना, मिरवताना, गाजवताना (प्रत्येक क्रियापद तेवढेच महत्वाचे) जे काही विपरीत केलय त्याची परतफेड मला मी कर्ता नसताना भोगावी लागू नये हा एक सुप्त भाव आहे ....आणि तो मुख्य आहे माझे अधिकार पद गेल्यावर मला त्याच ठिकाणी तसाच मान मिळावा हि अपेक्षा म्हणून ठीक आहे परंतु ते तितके सोपे नाही. त्यासाठी आपल्या अधिकाराचा (इतरांना त्रासदायक असा ) आपण गैरवापर केलेला नाही ह्याची खात्री हवी. योग्य प्रकारे आपण जर माणसे (घरी दारी सगळी कडे) जोडून ठेवली असतील तर आपल ओझं तर कुणाला वाटणार नाहीच पण उलट एक हवेहवेसे घटक म्हणून आपण शेवटपर्यंत राहू शकतो. आपण आपल्या आयुष्यात लोकांकडे गेल्यावर आपल्याला कशी वागणूक मिळते, आपण त्यांना कशी वागणूक देतो. ह्यात आपल्यावर पैशा मुळे मान देणारे कोण आणि आतड्याची जवळीक कुणाशी हे कळायला फार वेळ लागू नये.

बघा विचार करून


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 23035 views

🗣 चर्चा (71)
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/18/2018 - 14:17 नवीन
या धाग्यावर व्यक्त होणारे विचार पाहता भरपूर माल असलेल्या लोकांना इच्छामरण साठी कॅलिफोर्निया हे एक ऑपशन आहे , पण त्या साठी व्हिसा मिळणार का ? https://navbharattimes.indiatimes.com/world/america/california-to-become-sixth-us-state-to-allow-euthanasia/articleshow/48902312.cms
  • Log in or register to post comments
ए
एमी Wed, 07/18/2018 - 14:20 नवीन
स्वित्झर्लंड हादेखील एक पर्याय आहे http://www.dignitas.ch/?lang=en वन वे विजा मिळतो.
  • Log in or register to post comments
ए
एमी Wed, 07/18/2018 - 14:17 नवीन
< वृद्धांनी म्हातारपणी बदलले्या सामाजिक परिस्थितीचे भान स्विकारुन मला ओझ बनायचं नाही ह्यापेक्षा माझं ओझं वाटणार नाही अस मी सतत वागीन अशा पद्धतीने कुटुंबातच सकारात्मकपणे व समंजसपणे राहावं हा आहे. >>> मला वाटतं मूळ विषय "आत्ता मध्यमवयातच असलेल्यांनी 'मला दुसर्यावर ओझं बनायचं नाहीय त्यापेक्षा मी मरण पत्करेन' असा विचार करणे कसे अयोग्य आहे" हा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/19/2018 - 05:13 नवीन
तुमच्याकडे डस्ट्बीन आहे का? हा विवाहेच्छुक मुलीने विचारलेला प्रश्न अनेक किश्श्यांमधे आपण ऐकला असेल. बाकी माहित नाही पण प्रश्नाने लोकांना खडबडून जाग आली.
  • Log in or register to post comments
ए
एमी गुरुवार, 07/19/2018 - 06:10 नवीन
ऐकला आहे पण खरंच तो प्रश्न विचारला जातो का शंका आहे. खरंतर मराठी आंजवर जी लग्नाळू मुलांची किरकिर चालू असते "आजकालच्या मुली सहा आकडी पगार, स्वतःचे घर, नो डस्टबिन असल्याशिवाय लग्नच करत नाहीत" हा प्रॉब्लेम जात स्पेसिफीक आहे अशी मला जबरदस्त शंका आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 07/19/2018 - 06:40 नवीन
प्रॉब्लेम जात स्पेसिफीक हा प्रश्न जात स्पेसिफिक नसून हुच्च्भ्रू स्पेसिफिक आहे. कारण मुलीला लहानपणापासून सासू हि वाईट आणि तू कशी स्वतंत्रच राहा असेच शिकवून वाढवणारी पिढी आता "मुले असे बोलू लागली" म्हणून रडारड करताना दिसतात त्यात चूक स्वतःच्या पिढीची आहे हे मान्य करायचा मोठेपणा नाही हि पण वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/19/2018 - 06:49 नवीन
हा प्रश्न जात स्पेसिफिक नसून हुच्च्भ्रू स्पेसिफिक आहे.
हॅहॅहॅ अगदी अगदी
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 07/19/2018 - 06:54 नवीन
निर्विवाद बहुमत ! जुन्या पिढीतील लोकांनीं खूपच प्रॅक्टिकल वागणं त्यांना शिकवलं व स्वतः ही तसेच वागले , पण आता ते बूमरॅगं होतंय म्हणून नव्या लोकांना शिव्या देण्यात काय अर्थ ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 07/19/2018 - 07:00 नवीन
निर्विवाद बहुमत ! जुन्या पिढीतील लोकांनीं खूपच प्रॅक्टिकल वागणं त्यांना शिकवलं व स्वतः ही तसेच वागले , पण आता ते बूमरॅगं होतंय म्हणून नव्या लोकांना शिव्या देण्यात काय अर्थ ?
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 07/19/2018 - 07:02 नवीन
बहुमत दाखवण्यासाठी दोन वेळा प्रतिक्रिया गेली वाटत.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/19/2018 - 06:25 नवीन
आयला !!!!! ह्यांच्या तर आता या नवीन पिढी च्या !!!! तरी बर हाये आईबापाने कष्ट घेऊन त्यानं जन्म दिला , शिकव्हल आन हे फोद्रीचे म्हाताऱ्या माणसाना डस्टबीन म्हणत्यात ? तपासणी नळीतुन जलामले आस्ते तर आजून काय म्हणाले आस्ते देवास ठाऊक . देवा उचल रे त्यांना लवकर , आमच्या आदी .
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 07/19/2018 - 09:11 नवीन
जरा मुलांकडून अपेक्षा ठेवणार्‍या आईबापाला इथे मराठी आंजावर असं काही सुनावलं जातं की बिचारे घाबरून जातात. दिनूच्या बिलाच्या कथेचा उल्लेख अश्या वेळी उपरोधाने होत असला तरी त्यातला गाभा पटण्यासारखाच असतो. आर्थिकदृष्ट्या सुस्थीर, मानसिक स्थैर्य असणार्‍या कुटुंबात बालपण घालवणार्‍या मुलाला आईबापाने आपल्या स्वत:च्या आकांक्षा, करीअरमधील संधी, वेळ खर्च करून जे दिलेले असते तयचा परतावा म्हणून काहीही मिळण्याची अपेक्षा करू नये हा आग्रह अतीरेकी नाही वाटत? आता स्वतंत्र झालो, आता माझ्यावर कसलेच बंधन नको आणि आईवडिलांनी त्यांचं त्यांचं बघावं ह्या वृत्तीला प्रॅक्टिकलापणा हा एकच आयाम प्राप्त झालाय असे दिसते. अर्थात किती अपेक्षा हा मुद्दा वादाचा असू शकतो, पण अपेक्षाच नको आणि परोपजीव्याच्या स्थीतप्रज्ञतेने मिळतेय ते घ्या आणि गप्प पडा हा अ‍ॅप्रोच मला तरी वृद्धत्वामुळे येणार्‍या मानसिक हळवेपणाच्या पार्श्वभुमीवर अन्याय्य वाटतो.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 07/19/2018 - 09:33 नवीन
आर्थिकदृष्ट्या सुस्थीर, मानसिक स्थैर्य असणार्‍या कुटुंबात बालपण घालवणार्‍या मुलाला आईबापाने आपल्या स्वत:च्या आकांक्षा, करीअरमधील संधी, वेळ खर्च करून जे दिलेले असते तयचा परतावा म्हणून काहीही मिळण्याची अपेक्षा करू नये हा आग्रह अतीरेकी नाही वाटत? मुलांकडे गुंतवणूक किंवा म्हातारपणाची काठी या भूमिकेतून बाहेर येऊन केवळ पालकांच्या भूमिकेत जगायला कधी शिकणार आपला समाज? हा तर निव्वळ देण्याघेण्याचा व्यवहार आहे ज्यात दुसऱअया बाजूचे कोणतेही मत विचारात घेतलेले नसते. एकतर स्वताची गरज म्हणून मुले जन्माला घालायची, स्वताचे स्टेटस व म्हातारपणाची तरतुद म्हणून त्यांना शिकवायचे व पायावर उभे करायचे. व नंतर म्हातारपणी सांभाळले नाही म्हणून रडत बसायचे. मुलांना जन्माला घातल्यानंतर त्यांना वाढवणे, शिकवणे व वेळ देणे पालकांचे कर्तव्यच आहे. मी नोकरी केली, खस्ता खाल्या, संधी वाया घालवल्या तडजोडी केल्या यासाठी स्वताच्या मर्जीने जन्माला घातलेल्या मुलांना कसे काय जबाबदार धरु शकता ?
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 07/19/2018 - 09:55 नवीन
हे निव्वळ आणि निव्वळ प्रेम व त्याची तीव्रता यावर अवलंबून आहे. मुले व पालक या दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा असतात. मुले बऱ्याचदा लहान असल्याने आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करु शकत नाहीत. व पालक याबाबतीत अनभिज्ञ राहतात. ज्या पालक व मुलांमधअये पुरेसा संवाद आहे , एकमेकांबद्दल खूप ऑटाचमेंट आहे, जे एकमेकांना भावनिक आधार देतात त्यांना वद्धापकाळी फारसा प्रश्न येऊ नये. कारण मुलांना त्यांच्या पालकांनी त्यांच्याविषयी काय केलेय याची पुरेशी जाणीव असते. त्याहीपेक्षा आपल्या पालकांना आपल्याला हे दिले ते दिले किंवा दिले नाही याचा विचार न करता मला माझे आईबाबा कायम जवळ हवेत असाच विचार करतात. पण जे पालक मी यांव केले त्यांव केले किंवा करतोय अशी मानसिकता घेऊन मुलांशी वागतात ते म्हातारपणी देखील हाच अहंकार बाळगून राहतील पुढचे काही बोलायलाय नको
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/19/2018 - 12:48 नवीन
एका महत्त्वाच्या सामाजिक व्यवस्थेसंबंधी आतापर्यंत दोन्ही बाजूंनी चांगली आणि बहुतांश सामंजस्यपूर्ण चर्चा चालू आहे, हे खूप आनंदाचे आहे. पालक व मुले या दोघांच्या बाजूंचा समतोलपणे व सामंजस्याने विचार केला तर खालचे मुद्दे महत्त्वाचे ठरतात... १. गेल्या दोन-तीन पिढ्यांपर्यंत होते तसे सद्याच्या पिढीचे क्षितिज घर-गावापर्यंत मर्यादित राहिलेले नाही. त्यामुळे, एकत्र कुटुंब पद्धती शहरांत जवळ जवळ नाहीशी झाली आहे आणि गावांतही ती हळू हळू संपुष्टात येत चालली आहे. विशेषतः गेल्या ५० वर्षांत या जगात इतके क्रांतिकारी बदल झाले आहेत की त्यांची तुलना पृथ्वीच्या कोणत्याही ५० किंवा १०० वर्षांच्या कालखंडाशी होऊ शकत नाही. अगदी एकदोन पिढ्या मागे गेलो तरी गाव सोडून शहरात जाणे किंवा देशातल्या एका शहरातून दुसर्‍यात स्थित्यंतर करणे या गोष्टी धाडसाचे निर्णय होत्या. एखादा व्यवसाय (शेतकरी, सोनार, कुंभार, लोहार, चर्मकार, इ) पिढी दर पिढी चालत राहण्याची प्रथा नाहीशी होत आहे. हे केवळ कमी उत्पन्नांच्या व्यवसायांतच होत आहे असे नव्हे. उत्तम उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांची मुलेही शिक्षित होऊन स्वतंत्र विचाराने व्यवसायाची क्षितिजे विस्तारित आहेत किंवा अधिक फायद्याचा पूर्णपणे वेगळा व्यवसाय किंवा नोकरी स्विकारत आहेत. यामुळे, पालक व मुलांची राहण्याची ठिकाणे वेगवेगळ्या गावांत-शहरांत-देशांत असणे अपवादात्मक राहिले नाही. या पार्श्वभूमीवर, सद्याच्या पिढीला गवसणी घालण्यासाठी अवघे जग खुले आहे, हे जुन्या पिढीने समजून घेतले पाहिजे. जुन्या पिढीकडून नव्या पिढीला अश्या अपेक्षा आहेत* : (अ) मोठी स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य, (आ) ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रोत्साहन, जमल्यास व जमेल तेवढी आर्थिक-भावनिक मदत... आणि (इ) किमानपक्षी, दोन पिढ्यांच्या वस्तुस्थितीत झालेले क्रांतिकारक बदल समजून-उमजून घेऊन भावनिक अडथळे उभे न करणे. २. ठराविक (साधारण १८ ते २५ वर्षे... व्यक्तिसापेक्षाने यात थोडे कमी जास्त असून शकते) वयानंतर... कोणी मानो न मानो... मोठे झालेले मूल हे पालकांपेक्षा वेगळी व्यक्ती असते. ते वेगळेपण प्रत्यक्षात किती प्रमाणात व्यक्त होईल हे पालक व मुलाच्या सामाजिक, भावनिक व आर्थिक वस्तुस्थितीवर अवलंबून असते. ३. असे वेगळे असण्यात काहीच चूक नाही, किंबहुना, तसे असणे हेच मानवी प्रगल्भतेचे मुख्य लक्षण आहे. कोणतीही दोन माणसे दीर्घ काळासाठी एकसारखा (आयडेंटिकल) विचार व कृती करणारी असू शकत नाही, हे मानवी सत्य आहे. कितीही घट्ट प्रेम असले तरी सर्वकाळ, सर्व मते एकसारखी असू शकत नाहीत... तसे दिसले तर संशयास्पद परिस्थिती आहे असे खुशाल समजावे ! दीर्घ काळासाठी एकसारखा (आयडेंटिकल) असलेला विचार व कृती केवळ भावनिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक असाहाय्यतेतून / जबरदस्तीतून जन्माला येऊ शकतात... व कधी कधी त्याला समाजाच्या किंवा मनाच्या लाजेकाजेखातर "आमचे घट्ट प्रेम" असे लाडिक संबोधन दिले जाते. पालकांनी जबरदस्तीने वा भावनिक गैरफायद्याच्या (इमोशनल ब्लॅकमेलिंग) आधारे पाल्याला एकत्र राहण्यास भाग पाडणे जितके वाईट, तितकेच किंवा किंचित जास्तच पाल्यांनी आपला गोड गैरसमज (किंबहुना, ब्रेन वॉशिंग) करून एकत्र राहणे वाईट आहे... कारण जरी पाल्याला ते सुखाचे वाटत असले तरी, पाल्याच्या पती/पत्नीला ते बहुदा दु:खकारक असते. ४. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला त्यांचा एकांत (प्रायव्हसी) किती आवश्यक आणि किती प्रिय असते, हे त्या वयात असलेल्यांना किंवा त्या वयातून गेलेल्यांना सांगायला नकोच. तर मग, "आम्हाला तसा एकांत मिळाला नाही, त्याने आमचे काय बिघडले ?" असा विचार करून नवीन पिढीला शक्य असतानाही, तसे स्वातंत्र्य आणि एकांत नाकारणे, केवळ संकुचित मनोवृत्तीच नाही तर सरळ सरळ दुष्टपणा होईल. ५. "नवरा-बायको", "पालक-मूल" अश्या 'एकास-एक' व्यक्तीसंबंधांमध्ये वैचारिक चकमकी होऊ शकतात, होतात. तर, पिढ्यांचा आणि पालन-संवर्धनाचा फरक असलेल्या "पालकाचे कुटुंब-पाल्याचे कुटुंब" अश्या 'अनेकास-अनेक' व्यक्तीसंबंधांमध्ये संघर्षाचे किती छोटेमोठे प्रसंग उभे राहू शकतात, हे काय सांगायला हवेच काय ? 'दर वेळेस मुलाने आमचे मत घेतलेच पाहिजे' असे म्हणणे/मनात असणे आणि मत न घेतल्यामुळे होणारी भांडणे वाईट असतातच. पण, मत घेतले नाही याबद्दलचा आपला निषेध स्पष्टपणे न सांगता सतत धुमसत राहून धुसफूस करणे नातेसंबंधात जास्त कडवटपणा आणते. असे सतत ताणलेले संबंध दोन्ही बाजूंना मानसिकरीत्या अत्यंत दु:खकारक असतात आणि त्याचा बाह्यसंबंधांवर (कामाचे ठिकाण व समाजातला वावर) प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतोच होतो. जीवनातला सर्वात महत्त्वाचा काळ समोर असलेल्या पाल्यांच्या भविष्यावर यामुळे दुष्परिणाम होणारच. ६. असे संघर्ष घरातल्या क्षुल्लक कारणांपासून ते बाहेर संबंध असणार्‍या मित्र-मैत्रिणी व कामाच्या संबंधित माणसांशी असलेल्या व्यवहारापर्यंत असू शकतात. "आपण आपले बघावे व इतरांना त्यांच्या व्यवहारांबद्दल मोकळीक द्यावी" असे प्रगल्भ विचार असलेली, चार किंवा जास्त माणसे, एकाच छपराखाली, दीर्घकालासाठी एकत्र सुखाने नांदणे व्यवहारात पाहणे अती-अती-अपवादात्मक आहे, ही काय सिद्ध करायला लागेल अशी गोष्ट आहे काय ? जरा खोलवर निरीक्षण केले तर "वर वर सुखी दिसणार्‍या बहुतांश अपवादात्मक एकत्र कुटुंबात" त्या मुखवट्याच्या मागे भावनिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक असहाय्यता / जबरदस्ती दिसते... हा मुखवटा एखाद्या प्रसंगाने गळून पडतो आणि तडे दृश्य होतात. वरच्या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक कुटुंबाने आपापल्या मनाप्रमाणे, स्वातंत्र्याने, वेगवेगळे राहून एकमेकाला मधून मधून भेटणे आणि सौहार्दाचे संबंध ठेवणे केव्हाही सगळ्यांनाच जास्त सोयीचे व आनंदाचे ठरेल, नाही का ? ================================ टीप : वरच्या विश्लेषणात, खरोखरच सर्वकाळ समन्वय साधून असलेल्या अती-अती-अती-अपवादात्मक (असलीच तर) असलेली "आऊटलायर" ) एकत्र कुटुंबे जमेस धरलेली नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 07/19/2018 - 17:22 नवीन
एका महत्त्वाच्या सामाजिक व्यवस्थेसंबंधी आतापर्यंत दोन्ही बाजूंनी चांगली आणि बहुतांश सामंजस्यपूर्ण चर्चा चालू आहे, हे खूप आनंदाचे आहे. पूर्ण सहमत !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 07/23/2018 - 14:39 नवीन
@डॉ सुहास म्हात्रे बाडीस
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे गुरुवार, 07/19/2018 - 19:23 नवीन
मुलं जन्माला घालून त्यांच्या कडून अपमानास्पद वागणूक करून घेण्या पेक्षा दोन चार कुत्री मांजरी पाळलेली परवडली . ते मुके प्राणी मालकाला शेवट पर्यंत प्रेम देतात , एकाकीपणाची जाणीव होऊन देत नाही . 70 / 80 लाखा ची एफ डी करून मृत्यूपर्यंत च्या आर्थिक नियोजना साठी आणि मृत्युपत्रात ती रक्कम एखादया निराधार लोकांची सेवा करणाऱ्या आश्रमाला दान करण्या चा उल्लेख करणे हा सुद्धा उपाय चांगला आहे . डस्टबीन कन्सेप्ट ला जर आळा नाही बसला तर पारशी ( शून्य जन्मदर ) सारख दुर्मीळ होण्याची अवस्था सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या लोकांवर येणार हे निश्चित .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 07/20/2018 - 05:59 नवीन
दोन चार कुत्री मांजरी पाळलेली परवडली साहेब या प्राण्यांची नैसर्गीक आयुर्मर्यादा फार कमी असते (१०-१५ वर्ष) त्यामुळे ते मध्येच आपल्याला सोडून जातात आणि ते गेल्याचे दुःख पण फार त्रासदायक असते हे असे प्राणी पाळणाऱ्या माणसांना विचारून पहा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 07/21/2018 - 15:31 नवीन
केवळ मुल-पालकच नव्हे तर सर्वच मानवी भावनिक संबंधात "दुसर्‍याने स्वतः आणि/किंवा त्याच्याबाबतीत असलेल्या आपल्या अपेक्षा पुर्‍या कराव्या" हा अट्टाहासच बहुतेक दु:खाचे कारण ठरतो... आपल्या अपेक्षा दुसर्‍यावर लादू लागल्यावर तर त्यावर कळस चढतो. "आपण स्वतःबद्दलच्या अपेक्षा पुर्‍या कराव्या व त्याच मापाने, इतर सर्व प्रौढांना (यात मुलेही आली) त्यांच्या अपेक्षा पुर्‍या करण्याची पूर्ण मोकळीक द्यावी... त्यात जमल्यास मदत करावी, पण उगाच अनामंत्रित (अनइन्व्हायटेड) लुडबूड करू नये... भावनिक अडथळे (इमोशनल ब्लॅकमेल) तर अजिबात उभे करू नये" हे तत्व पाळले तर बिघडलेले/बिघडणारे अनेक सुहृदसंबंध रुळावर येऊन सुखद होतील. असे करताना, नातेसंबंध ही काही तत्वांची लढाई नाही, समोरच्याचे भले (उदा : पालकांसाठी मुलांचे भले) हीच आपली प्राथमिकता आहे, इतके ध्यानात ठेवले तरी खूप फरक पडेल. जेथे "मी आणि माझे विचार", "दुसरा आणि त्याच्या विचारांवर" विजय मिळवायचा प्रयत्न करतात, तेथे संघर्ष किंवा दु:खाशिवाय दुसरे काय हाती लागणार आहे ?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 08/07/2018 - 23:52 नवीन
कोणत्याही अपेक्षा न ठेवता जगता आले पाहिजे. निदान तसे जगण्याचा प्रयत्न तरी करत राहिले पाहिजे. बर्‍याच समस्या दूर होतात. असा माणूस सगळ्यांना हवाहवासा वाटतो. थोडक्यात असा माणूस कधीच एकटा पडत नाही. शब्दात मांडणे अवघड होतयं. थांबतो. असो. _/\_
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 19 hours ago
  • सुंदर !!
    2 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा