Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भिडे गुरुजींना झालंय काय ?

स
सोमनाथ खांदवे
Mon, 07/09/2018 - 15:19
🗣 118 प्रतिसाद
भिडे गुरुजींनी शिवप्रतिष्ठान संस्थेच्या अंतर्गत खेडेगावात शेकडो सभा घेऊन शिवप्रेमी निर्माण करण्याचे सतत कार्य केले . त्यांच्या एका सभेला मी सुद्धा उपस्थीत होतो , वक्तृत्व कौशल्य नसले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराज आणि त्यांचे गडकोटांचे महत्व वाढवण्यासाठी घालवले असल्या मूळे हजर असलेल्या प्रत्येक जण भिडे गुरुजींना मनोमन नतमस्तक होत असतो . अशा आदरणीय सुशक्षित माणसाला अचानक काय झालंय हे समजेनासे झाले आहे , काही दिवसांपूर्वी त्यांनी " आमच्या बागेतील आंबे खाल्ल्याने मुलं होतात " असे वादग्रस्त वक्तव्य केले . त्याचा धुराळा बसण्या अगोदरच " संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता " असे दुसरे वादग्रस्त वक्तव्य भिडे गुरुजींनी केले आहे . त्यामूळे विधानसभेत मुख्यमंत्री साहेबांना कारवाई करण्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले . कोरेगाव भीमा च्या प्रकरणांत पोलीस दप्तरी भिडे गुरुजींनी चे नाव असतांना अशी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतः च्या समोरील अडचणी का वाढवत आहेत ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38689 views

🗣 चर्चा (118)
ख
खिलजि Mon, 07/09/2018 - 15:26 नवीन
भिडे गुरुजी आहेत तिथेच आहेत , मीडियाला झालय तरी काय हे विचारलं पाहिजे . हे साले कधी कुणाला कुठे नेऊन ठेवतील, त्याच गणित टी आर पी वर अवलंबून असते .. कधी बलात्कार अश्या ठिकाणी नेऊन ठेवतात कि आपल्याला आपणच षंढ वाटायला लागतो , कधी लहान मुलांवरील अत्याचार, कधी अजून काही .. हे सर्व त्यांचं वेगळाच गणित असत .. एकदम आपल्या डोक्याबाहेरच सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Mon, 07/09/2018 - 17:14 नवीन
मलाही हाच प्रश्न पडलाय. पण जोपर्यंत पुर्ण व्हिडीओ आपण पहात आणि एकत नाही तोपर्यंत या विषयावर मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. एकतर पहिले आंब्याच्या संदर्भातील वक्तव्य चु़किच्या पध्दतीने पसरवले असावे असे वाटते. एकतर भिडे गुरुजींची स्वताची अशी फार प्रॉपर्टी नाही. त्यांचे शेत असावे असे वाटत नाही आणि मुख्य म्हणजे नाशिकची ती सभा फेसबुक लईव्ह केली होती असा शिवप्रतिष्ठानचा दावा आहे. तेव्हा सत्य काय ते बाहेर यायलाच पाहिजे. दुसरा मुध्दा भिमा-कोरेगाव प्रकरणाचा. इथे भिडे गुरुजी उपस्थित होते याचा कोणताही पुरावा नाही. मुळात राज्यात असलेल्या स्थिर सरकारला आणि मुख्य म्हणजे फडणविसांना त्रास देण्यासाठी अनेक मुद्दे काढले जात आहेत, त्यापैकी हा प्रकार असावा. तेव्हा जंगली महाराज मंदिरातील त्यांच्या पुर्ण भाषणाचा व्हिडीओ एकेपर्यंत तरी मी मत बनवणार नाही.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 07/09/2018 - 17:21 नवीन
कुणाच्या तरी वॉल वर मी आंब्याचा व्हिडीओ पाहिलाय. आणि ते खरंच तसं बोललेत. कुठे पाहिलंय आठवत नाहीये पण मी शोधायचा प्रयत्न करते. त्यात "आंबा खाऊन मूल होतं, मुलगा हवा असेल तर मुलगा होतो" असं स्पष्ट विधान आहे. व्हिडीओ एडिटेड वाटला नाही. कारण केमेरा त्यांच्यावरच आहे. आवाजही त्यांचाच आहे.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 07/09/2018 - 18:36 नवीन
  • Log in or register to post comments
द
दासबोध.कॊम Tue, 07/10/2018 - 09:46 नवीन
नशीब शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारला आणि त्याचे लेखी पुरावे मागे ठेवले नाही तर त्याला मारण्यापूर्वी शेवटचे जे पत्र त्यांनी लिहिले होते ज्यात ते म्हणाले होते की मी तुम्हाला घाबरलो आहे आणि तुम्ही मला पितृतुल्य आहात त्यावरून तेवढेच पत्र उचलून लोकांनी इतिहास लिहिला असता की अफजल खानाला शिवाजी महाराज वडिलांप्रमाणे मानत होते. भिडे गुरुजी जर असे म्हणाले की मला एक जण म्हणाला आणि पुढे काही वाक्य बोलले तर ते गुरुजींचे वाक्य कसे काय ठरेल ?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 07/10/2018 - 14:06 नवीन
दासबोध काका, एकसाईट होऊ नका. मी ह्या वर दिलेल्या व्हिडीओ बद्दलच बोलतेय आणि मी तेवढंच बोललेय. कुठे तरी अशी चर्चा होती की गुरुजी असं बोललेच नाही. तर तसे विधान मी व्हिडीओ मध्ये पाहिले आहे इतकेच माझे म्हणणे. मला त्यांच्याविषयी राग लोभ काहीही नाही. जे सत्य असेल तितकेच समोर यावे. मला त्यांची बोलायची स्टाईलही माहिती नाही. पुढे मागे काहीही विधान केलं तरी त्यांनी ज्या श्रद्धेने हे विधान केले आहे ते बघून आश्चर्य वाटलं. मग भले त्यांनी पुढे उपमा अलंकार वापरून काही वेगळा विषय मांडला असेल. पण त्यांना ते आंब्याचं पटलं आहे हे दिसतंय. आणि मला ते विनोदी वाटतं.
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 07/09/2018 - 17:47 नवीन
खिलजी साहेब , जाणत्या लोकांनी धूर येऊ न देण्याची काळजी घ्यायची असते . थोडासा सुद्धा निष्काळजीपणा झाला तर मीडिया तयार आहेच आगडोंब उसळवायला . ज्या वेळेस एखादी व्यक्ती असामान्य कार्य करून सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करते त्यानंतर ते स्थान टिकवणे त्या व्यक्तीच्याच हातात असते . आपले विचार , आचरण ठीक असेल तर पोलीसांनी दबावाखाली कितीही केस टाकल्या तरी सामान्य माणूस पाठीमागे खंदा समर्थका सारखा उभा राहू शकतो . अशा वक्तव्या मूळे समर्थक झपाट्याने कमी होऊन अण्णा हजारे चीं पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाटत आहे. संभाजी भिडें विरोधात संभाजी ब्रिगेडकडून पोलिसांकडे तक्रार https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-brigade-has-filed-complaint-against-sambhaji-bhide-1710434/ Shared via Loksatta Android App
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 07/09/2018 - 19:41 नवीन
दोन एक वर्षापुर्वी पर्यंत मी त्यांचे नाव सुद्धा ऐकले नसेल - माझ्या अज्ञाना बद्दल क्षमस्व. अशात युट्यूब वरुन जी काही थोडीफार भाषणे (की प्रवचने?) अभ्यासण्याचा प्रयत्न केला त्यावरुन माझी धारणा पुढील प्रमाणे झाली. आजचा तरुण तसा पुरेसा सुशिक्षीत असावा, संभाजी भिडेचा अनुयायी वर्गासही त्यांच्या मर्यादा सहज लक्षात येण्याची शक्यता वाटते. त्यामुळे संभाजी भिडे काही बोलले म्हणून तरुण वाहून गेले अशी शक्यता त्यांच्या युट्यूबवर उपलब्ध भाषणे पाहून तरी कमी वाटते. (माझ व्यक्तीगत मत) त्यांच्या प्रवचनातील बरेचसे संदर्भ जुने झाले असून अद्ययावत होण्याचे बाकी असावेत , त्यांच्या कार्य, कार्यशैली आणि वय पहाता त्यांच्या भूमिकांना अद्ययावत तर्कसुसंगत होण्याची संधी ही कमी असेल. त्यांच्या भाषणात दिशेचा आव असला तरी आजच्या काळासाठी प्रत्यक्ष व्यवहारात अमलात आणता येतील अशा नेमक्या दिशांचा अभाव वाटतो. तरुणांच्या एका वैचारीक-गटास संघटन आणि दिशा सांगू शकणार्‍या कळकळ असलेळ्या, प्रेरणादायी प्रचारक प्रवचनकाराची मानसिक पोकळी भासत असावी - जी संभाजी भिडेंमुळे भरुन निघत असावी. त्यांचे मर्यादीत परिघातील पुर्वाश्रमी परंपरावदी वाचन आणि मनन राहीले असावे, -जे आधूनिक काळास जुळेलच असे नाही -तत्वज्ञानाच्या लेव्हलवर स्वतःचे नवे विचार फारसे नसावेत -पण संघटन कार्यात झोकून दिलेल्यांचे जे होते तसे लेखन आणि इतर विचारांचे वाचन संवाद कमी होत असल्याने प्रगल्भतेस मर्यदा पडत असाव्यात. महाराष्ट्रातील एकुण किर्तनकार आणि प्रचारकांची संख्या पाचेक हजार तरी असेल यातील हजार अधिक सक्रीय धरले तरी त्यातील मूठबर उच्च विद्या विभूषित सोडले तर उर्वरीतांची एकुण श्रद्धा-अंधश्रद्धा परंपरवाद हा संभाजी भिडेंपेक्षा वेगळा असण्याची शक्यता कमी असावी. त्यांनी स्वतःस धारकरी म्हणवून घेणे आणि पश्चिम महाराष्त्रात थोडाफार तरुण अनुयायी वर्ग मिळणे , (प्रत्यक्ष उपद्रव क्षमते बद्दल किंवा खरी धार असण्याबद्दल केवळ साशंकताच असलेली) जराशी टोकाची कललेली भाषा ज्याचा माध्यमांना गाजावाजासाठी उपयोग करुन घेता येऊ शकतो असे स्वरुप दिसते आहे. भाषणांमध्ये कललेली टोके पुन्हा पुन्हा उठून दिसत असली तरी आता पर्यंत अभ्यासलेल्या चार-सहा व्हिडीआँवरुन तरी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापलिकडे जाऊन कायद्यांचे उल्लंघन होत असण्याची मोठी शक्यता नसावी. त्यांच्यावर गरजे पेक्षा अधिक फोकस करण्याने केवळ राजकीय धृवीकरण करु इच्छिणार्‍यांच्या आपमतलबा पलिकडे काय हशिल होऊ शकेल या बाबत साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/09/2018 - 21:22 नवीन
भिडे गुरुजी सध्या तरी एकदम ट्रेंडिंग टॉपिक आहेत =)))) भिडे गुरुजी न्युज असा एखादा युट्युब चॅनेल काढला तर वर्शाभरात मिलियन सबस्क्राईबर्स घेईल ह्यात शंका नाही =)))) बाकी भिडेगुरुजींचे विडिओ पाहिले आहेत ! एकदमच बाळबोध श्रध्दाळु हिंदुंचे प्रतिनिधित्व करताहेत असे वाटते ! ते बत्तीस मण सोन्याचे सिंहासन वगैरे ऐकुन तर हसुच येते ! इम्प्रॅक्टिकॅलिटीचा कळस झाला ! आज्च्या घडीला खुद्द थोरले महाराजसाहेब असते तर ते ही हसले असते ह्यावर. काय दुनिया कोठे चालली आपण कोठे चाललोय ? गोल्ड सँडर्ड हटवुन जमाना झाला , आता तर फियाट करंसी चा ही जमाना संपत आलाय ! बिटकॉईन्स चे सिंहासन करा म्हणावं ! इकडे दुनिया आय.वी.एफ , स्पर्म डोनेशन , एग्ग प्रिझर्वेशन , सरोगसी मार्केट बिझनेस च्या पुढे गेली अन आमच्याकडे अजुनही आंबे खाऊन पोरं होत आहेत =)))) पण असो. भिडे गुरुजींना दोष देता येणार नाही , वयाचा दोष आहे , ते अजुनही १९७० -८० च्या दशकात जगत आहेत असे वाटते . पण त्यांना मिळाणारा तरुणांचा पाठिंबा आश्चर्यकारक आहे. खरंच हिंदु आजही इतके बाळबोध , भोळे भाबडे आहेत का ? छ्या , फारच निराशाजनक आहे हे असे असेल तर ! कोणीतरी मनावर घेवुन ही असली बाळबोधी #जपहोश्याम टाईप भोंगळ हिंदुत्वाची जळमटं काढुन परत एकदा खणाखणीत प्रॅक्टिकल सनातनी हिंदु धर्माला वर काढलं पाहिजे ! पोरं होत नसतील तर एकवेळ नियोग करा पण आंबे नको . =)))) पण असो. भिडे गुरुजी " भारत तेरे टुकडे होंगे इन्शाला इनशाला " असे म्हणात नाहीत तोपर्यंत तरी हे असले बाळबोध क्लेम्स चालवुन घ्यावे लागणार आहे असे दिसते. अवांतर : आमच्या घरातल्या झाडाच्या कैर्‍या पोरं चोरुन नेतात , ते थांबवण्यासाठी झाडावर आता मी ही " हे आंबे खाल्ले कि पोरं होतात " अशी टुम सोडावी की काय असा विचार करत आहे !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/10/2018 - 04:52 नवीन
अवांतर : आमच्या घरातल्या झाडाच्या कैर्‍या पोरं चोरुन नेतात , ते थांबवण्यासाठी झाडावर आता मी ही " हे आंबे खाल्ले कि पोरं होतात " अशी टुम सोडावी की काय असा विचार करत आहे !
तुम्ही आंबे तोडून मार्केट रेट पेक्षा जास्त भावानी विकणार असाल आणि त्यासाठी स्वतः अधिकृत टूम म्हणजे सं.भि. गुरुजी टाईप जाहीरात करणार असाल तर कायदा हातात घेऊन सं . ब्रि. तुमच्या मागे लागू शकते :) (ह.घ्या. हे वे सा न ल)
...पण त्यांना मिळाणारा तरुणांचा पाठिंबा आश्चर्यकारक आहे. खरंच हिंदु आजही इतके बाळबोध , भोळे भाबडे आहेत का ?
भाबडेपणाची शक्यता कमी वाटते पण त्यातले काही सश्रद्धेने भोळे झालेले आणि अगदी बाळबोधही असू शकतात . पण तो महत्वाचा प्रश्न नाहीए, शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतलेल्या अँग्री यंग तरुणाईला धाडसाची भाषा हवी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पाठीशी काही तरुण मंडळी मिळणे आश्चर्याचे वाटत नाही, त्या शिवाय वरवर मतपेटीसाठी लांगूलचालन केले तरी काँग्रेसी-राष्ट्रवादीगट आतून सॉलीड परंपरावादी असू शकतात, त्यात लोकसंख्या वाढल्यामुळे राजकीय महत्वाकांक्षा असल्यामुळे कुटूंबात काँग्रेसची पार्श्वभूमी असली तरी स्वतःचे वेगळे राजकीय घोडे दामटण्यासाठी भाजपा सोडून द्या काँग्रेसी-राष्ट्रवादीगटातूनही पडद्या आडून मदत पोहोचवली जाणार नाही असे नसावे - पडद्या मागच्या दुहेरी खेळीत काँग्रेसी तसे वाकबगार असतात - संभाजी भिडे राजकारण करण्यात इच्छूक असोत अथवा नसोत- असा अंदाज वाटतो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/10/2018 - 05:08 नवीन
+१ पडद्या मागच्या दुहेरी खेळीत मीही थोडेसे स्पष्टीकरण देणारच होतो. भिडे गुरुजींच्या भाषाणाचे जमतील तितके विडीयो शोधुन पाहिले , युट्युबवरही जितके मिळाले ते नीट पाहीले, बहुतांश सारेच व्हिडीओ अर्धवट आहेत . एकही संपुर्ण व्हिडीओ मला तरी अजुन सापडलेला नाही. भिडे गुरुजींच्या अनुयायांपैकी " चौगुले" नावाच्या एका व्यक्तींने देखील गुरुजींचे व्हिडीयो अर्धवट दाखवुन आणि सिलेक्टीव्ह अर्थ काढुन अपप्रचार केला जात आहे असे विधान केले आहे ! तस्मात मी माझ्या वरील प्रतिसादाबाबत जरा माघारच घेत आहे . जोवर संपुर्ण व्हिडीओ पहायला मिळत नाही तोवर काहीही कॉमेन्ट करणे योग्य नाही ! कादाचित हा देखील "जळगाव जोशी कांडा"सारखा फुसका बार निघु शकतो ! पण बाकी ते ३२ मणाचे सिंहासन हा प्रचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि तो बाळबोध पणाअच आहे ह्या मतावर मात्र ठाम आहे ! एवढी जर प्रसिध्दी आहे तर ३२ मण सिंहासन करण्यापेक्षा ३२ मिलियन हिंदुंना रोजगाराच्या संधी उपलब्ध्द करुन द्या , हिंदुत्वाचं प्रदर्शन एका रायगडावर का ? ३२ जिल्ह्यात रायगड तयार करुन दाखवा - आमचे सनातनी हिंदुत्व सांगते !
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Tue, 07/10/2018 - 07:09 नवीन
आता पर्यंत एका ही वक्तव्यावरून गुरुजींनी घुमजाव केलेले नाही असे असताना ' चौघुले ' , मार्कस किंवा माझ्या सहित इतर मिपाकरांनीं ते व्हिडिओ अर्धवट आहेत असं प्रमाणापत्र देऊन काय उपयोग ? आपण किती ही गुरुजी चें लटके समर्थन करत बसलो तरी , विरोधी पक्षांना चघळायला विषय भाजप आणि भाजपचे समर्थक देतात हे सत्य आहे . सध्या गुरूजी ची वक्तव्य तर गेले तीन चार वर्षे देशपातळीवरील साक्षी महाराज, उमाभारती, शत्रुघ्न आणि यशवंत सिन्हा यांचे बोलने सुध्दा वादग्रस्त होते . आता 2019 मध्ये पुन्हा मोदीलाटे मूळे भाजप बहुमताने निवडुन येण्याची शक्यता कमी असताना इतरांनी विनाकारण शंख वाजवत बसू नये . ताजी बातमी - बहुचर्चित डी एस के प्रकरणात मराठे च्या जामिनावर मुंबईतील प्रज्ञा सावंत आणि श्रीधर ग्रामोपाध्ये यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली .
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 07/10/2018 - 12:38 नवीन
आवडला प्रतिसाद सोमनाथ भाऊ!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/10/2018 - 14:02 नवीन
गुरुजी चें लटके समर्थन आर यु किडिंग मी ???? मी कुठेच गुरुजींचे समर्थन केलेले नाहीये आणि कसलेही प्रमाणापत्र दिलेले नाहीये , उलट ते बाळबोध , इम्प्रॅक्टिकल बोलतात्त , त्यांचे हिंदुत्व ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ आहे अशी खिल्लीच उडवली आहे त्यांच्या विचारसरणीची. मात्र जेव्हा त्यांच्या व्हिडीओतले मुद्दे अर्धवट उचलुन वापरल्याचे दिसले तेव्हा " संपुर्ण व्हिडीयो पाहिल्या शिवाय काहीही मत बनवणे चुक आहे" असा मी सावध पवित्रा घेतला आहे ! कारण स्वयंघोषित पुरोगाम्यांसारखे तोंडावर पडाणे चांगले नव्हे ! संपुर्ण व्हिडीयो पाहुन बोलुयात .
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Tue, 07/10/2018 - 14:43 नवीन
कै नै वो तयार चिमटा काढयची हुक्की आली व्हती !!!!
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Mon, 07/09/2018 - 23:16 नवीन
भिडे गुरूजींच्या क्लिप्स यावर्षी कोरेगाव भीमा नंतर काही पाहिल्या. ते ७०-८० वर्षांचे आहेत आणि अजून थोड्या जुन्या काळात आहेत असे दिसते. ते म्हणजे काही रॅशनल, लिबरल विचारांचे प्रतिनिधी नव्हेत. पण ते जे म्हंटले ते हास्यास्पद असणे, त्याच्याशी कोणीही सहमत नसले तरी अगदी त्या मनू बद्दलच्या वक्तव्यांवर "कारवाई" ची मागणी कोणत्या कायद्याखाली करणार? असे काय आहे त्यात? बाकी त्यांनी कोरेगाव भीमा मधे तरूणांना फूस वगैरे लावली का यावर अजून कोणताही पुरावा बाहेर आलेला दिसत नाही. जेथे कोणत्याही गोष्टीच्या असंख्य क्लिप्स युट्यूब वर एका दिवसांत येतात तेथेही अजून कसलीही क्लिप नाही. गावकर्‍यांच्या मुलाखतींमधेही कसलाही उल्लेख नाही. त्यांनी काही केले असेल तर करा कारवाई पण इथे गेले ६ महिने मीडिया ट्रायल ऑलरेडी झालेली आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/10/2018 - 04:13 नवीन
या माणसाची चिथावणी घेऊन लोक दंगा करतात म्हणणे हेसुध्दा हास्यास्पद वाटतं.
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 07/10/2018 - 06:45 नवीन
मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी मनूचे आणि मनुस्मृतीचे समर्थन करण्याची ही पहिली वेळ नाही. अस्पृश्यता, स्त्री-दुय्यमत्व आणि जात्यंधतेसारख्या भयानक प्रथांचा ज्यांना तिरस्कार वाटतो त्यांना मनुस्मृतीची भलामण करण्याच्या प्रकारांचा निषेध करायलाच पाहिजे. ज्यांना अशा गुलामगिरी आणि मानव्यविरोधी अनिष्ट गोष्टींचा धर्म-संस्कृतीच्या नावाखाली अभिमानच वाटतो त्यांना भिडे यांची वक्तव्ये बाळबोध वाटून सोडून द्यावीत असे वाटणे स्वाभाविक आहे. भिडे यांच्यावर कायद्याने काय कारवाई होईल ती होईल. परंतु समाजात तथाकथित सनातन धर्म किंवा संस्कृतीरक्षणाच्या आणि इतिहासाच्या जाज्वल्य अभिमानाच्या पुनर्स्थापनेच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती वाढवण्याचा जो खटाटोप चाललेला असतो त्याला कसा आळा घालायचा हे एक समाज म्हणून आपल्याला फार मोठे सामाजिक आव्हान आहे. हे वेळीच थांबले नाही तर हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/10/2018 - 07:43 नवीन
@ एस आधी डिसक्लेमर मी आपला प्रतिसाद व्यक्तिगतरित्या घेत नाही पण आमचे प्रतिसाद व्यक्तिगत रित्या घेतले जाऊ नयेत म्हणून आधी डिसक्लेमरचे प्रयोजन मी शब्दपूजा पुस्तक पूजा व्यक्ती पूजा करत नाही. मनुस्मृती मधील जन्माधारीत विषमतेच्या मुद्द्यावर मिसळपावर क्ठोर आणि भरीव टिका बर्‍याच जणांनी केली आहे अशी टिका करण्यात मीही सहभागी होतो आहे आणि राहीन. प्रत्येक ग्रंथ/साहित्य/चित्रपट साक्षेपी टिका आणि समिक्षेसहीत प्रकाशित व्हावी पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकतम असावे या मताचा आहे. मनोहर उर्फ संभाजी भिडेंच्या डोळे झाकून समर्थनातही रस नाही. आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडीओत , जन्माधारीत विषमतेवर आणि अनीष्ठ प्रथांवर सुस्पष्ट टिका करताना भिडे दिसले नाहीत, हे मान्य करतानाच त्यांच्या संघटनेतले कार्यकर्त्यांचे म्हणणे खरे असेल तर त्यांच्या संघटनेत जातपात अस्पृष्यता पाळली जात नसावी. भिडेंनी मनूस्मृतीचे नाव काढणे पॉलीटीकली राईट नसेल (मनूस्मृतीत इतर काही चांगले आढळले तरी ते मनूचे नाव न घेता सांगणे आजच्या काळात अधिक शहाणपणाचे असावे अर्थात निर्णय ज्याचे त्याचे , पण त्यांनी दिलेला मनूस्मृतीचा कालचा संदर्भ जातीयवादाच्या समर्थनार्थच आहे ह्याची आपण खात्री केली आहे का ? ) मी थोडक्यात.कॉमने ३४.०९ मिनीटांची व्हिडीओ लावली आहे त्यात मनू अमुक मराठी संतांच्या एक पाऊल पुढे आहे असे म्हटले आहे - पण त्यात जातीयवादाचे समर्थन किमान या व्हिडीयोत आढळले नाही. संतांच्या मार्गदर्शनाने चांगली व्यक्ती बनता येते पण त्यापलिकडे जाऊन राष्ट्रकर्तव्येही महत्वाची असतात असा काहीसा संदेश त्यांना द्यावयाचा असावा असे प्रवचन ऐकताना वाटून गेले. त्यांची मांडणी प्रगाढ हिंदू विद्वानाप्रमाणे नाही तर अध्यात्मिक आणि धार्मीक पातळीवर बाळबोध स्वरुपाची असावी असे काहीसे मिपाकर मार्कस यांना म्हणावयाचे असावे. त्याचा कोणत्याही बाजूने तिसरा काही अर्थ काढणे प्रस्तुत वाटत नाही. राष्ट्रकर्तव्येही महत्वाची असतात या संदेशात बाळबोध किंवा अयोग्य गोष्टीचे समर्थन असलेच पाहिजे असा अर्थ करणे. मूळ संदर्भ नीट न तपासता ट्रायल बाय मिडीया आणि ट्रायल बाय सोशल मिडीया करणे कित्पत श्रेयस्कर आहे या बद्दल साशंकता वाटते. मनोहर उर्फ संभाजी भिडेंचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले तरीही हिंदू धर्म धोक्यात येण्याची शक्यता म्हणून नाही कारण हिंदू धर्म एका मनोहर भिडेंवर अवलंबूनही नाही.
परंतु समाजात तथाकथित सनातन धर्म किंवा संस्कृतीरक्षणाच्या आणि इतिहासाच्या जाज्वल्य अभिमानाच्या पुनर्स्थापनेच्या नावाखाली एकमेकांचा द्वेष करण्याची प्रवृत्ती वाढवण्याचा जो खटाटोप चाललेला असतो त्याला कसा आळा घालायचा हे एक समाज म्हणून आपल्याला फार मोठे सामाजिक आव्हान आहे.
हा वेगळ्या सविस्तर चर्चेचा विषय आहे. भिडे गुरुजींपुरते त्यांचे आकलन कमी पडते असण्याची शक्य्ता सर्वसाधारणपणे स्विकारली जात असण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या शक्य प्रभावा पेक्षा मिडिया आणि सोशल मिडिया ट्रायल वाढवून दाखवत नाहीएना अशी एक शंका वाटते.
...हे वेळीच थांबले नाही तर हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे.
ह्या वाक्याचा काँटेक्स्ट कळणे जरा कठीण गेले - आपला काँटेक्स्ट भिडेंपुरता मर्यादीत नसावा. आपल्याला नेमके काय म्हणायचे ते वेगळ्या धाग्यातून मांडलेले श्रेयस्कर असावे असे वाटते म्हणजे स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. भिडेंच्या इतर वक्तव्ये आणि कृतींचे माहित नाही पण ह्यावेळी तरी टिकाकारांचा त्यांच्यावरचा नेम हुकत असण्याची प्राथमिक शक्यता वाटते चुभूदेघे. ज्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत त्यांची बाब वेगळी.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 07/10/2018 - 08:52 नवीन
माहितगार, तुमची संदेशाशी सहमत आहे. पूज्य भिड्यांनी मनु ज्ञानेश्वरांपेक्षा चांगला होता असं कुठेही म्हंटलं नाहीये. त्यांचं म्हणणं इतकंच की ज्ञानेश्वरांनी निजी (=प्रायव्हेट) साधना सांगितली, तर मनुने यापुढील पायरी म्हणजे राष्ट्रधर्माची साधना सांगितली. इथे श्रेष्ठकनिष्ठत्वाचा प्रश्न आलाच कुठे? न्यूटनने जे गतीचे नियम सांगितले त्याच्या पुढे जाऊन आईनस्टाईनने अतिप्रचंड गतीचे नियम सांगितले. बदनामीकारांच्या मते आईनस्टाईन न्यूटनपेक्षा श्रेष्ठ हवा. याला म्हणतात फालतूपणा. प्रस्तुत प्रसंगी मात्र मी यांस हलकटपणा म्हणेन. कारण की माध्यमं पूज्य भिड्यांच्या मागं खलप्रवृत्तीनं लागलेली असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/10/2018 - 07:45 नवीन
भिडेंचे थोडक्यात डॉटकॉमने युट्ञ्बवर दिलेले पूर्ण चर्चीत भाषण
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/10/2018 - 14:50 नवीन
संपुर्ण व्हिडीयो शेयर केल्याबद्दल धन्यवाद ! व्हिडीयो पाहिला . हेही प्रकरण जळगाव जोशीकांड व्हर्जन २ असल्याचे दिसुन येत आहे . गुरुजींनी कोठे ही मनु ज्ञानेश्वर महाराज तुकोबांच्या पेक्षा श्रेष्ठ होता असे म्हणालेले मला तरी दिसले नाही ! गुरुजींचा कोट पुढील प्रमाणे : " धर्माचार साध्य कसा होईल हे ज्ञानोबा तुकोबांनी संत परंपरेने ऋषीमुनींनी शिकवले आहे . आत्मोध्दार , आत्मौन्नती ह्याच्यातुन साध्य होतात . पण मनु त्यांच्यापुढे एक पाऊल आहे आणाखी ! हा धर्म व्यक्तिगत पातळीवरचा धर्म . आपण देश म्हणुन जगतो , भारत म्हणुन जगतो , हिंदुस्तान म्हणुन जगतो .........जीवनाचा उद्देश कळला पाहिजेल. तसं ह्या भारत मातेच्या कुटुंबातील तुम्ही आम्ही सगळीजणं भावंड आपलं राष्ट्र आपला धर्म आपला देश आपले पुर्वज आपलं कर्तव्य आजचा वर्तमान काळ उद्याचा भविष्यकाळ ह्याची जाणीव असलेला असला पाहिजेल . तर हे अध्यात्म वेदांत धर्म हे शिकवण्याची भुमी असलेला हा देश टिक्ले !....." एकुणच ज्ञानोबा तुकोबांनी वैयक्तिक अध्यात्मिक उध्दराचा मार्ग दाखवला आणि मनु ने एक राष्ट्र म्हणुन उध्दाराचा मार्ग दाखवला म्हणुन तो एक पाऊल पुढे आहे अशा अर्थाचे हे विधान आहे ! ह्यात काहीही चुकीचे दिसत नाहीये ! ह्यात कोठेही मनुस्मृतीतील वर्णाश्रमाचे , स्त्रीयांविषयींच्या विषमतेचे उदात्तीकरण दिसत नाहीये. उलट पुढच्याच वाक्यात भारतमातेच्या कुटुंबातील आपण भावंडं आहोत अशा अर्थाचे स्पष्ट वाक्य आहे . मीडीयाने मात्र ते जाणीवपुर्वक टाळल्याचे दिसत आहे ! आणि उगाचच भिडे गुरुजींनी " भारत तेरे टुकडे होंगे इन्शाल्लाह इन्शाल्लाह " ह्या धर्तीवर काही विधान केल्याचा आव आणुन केलेला आकांड तांडव केल्याचे दिसते! एकुंणच भिडे गुरुजींवर काही कारवाई होईल असे काहेही दिसत नाहीये ह्या भाषणात. मनु , मनुस्मृती क्वोट करणे कायद्याने गुन्हा नाही आणि पाप ही नाही . मनुस्मृय्रीतील वर्णाश्रमाचे समर्थन करणारे श्लोक क्वोट करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य न ठरता कदाचित गुन्हा ठरु शकेल पण इथे तरी गुरुजींनी तसे केल्याचे दिसत नाही ! थोडक्यात काय तर हाही जळगाव जोशीकांडासारखाच फुसका बार दिसत आहे ! आता पाहुयात सरकार भिडे गुरुजींवर काय कारवाई करते ते ! अवांतरः व्यक्तीगत उध्दारापेक्षा राष्ट्र उधार जास्त महत्वाचे आहे अशा अर्थाचे अजुन एक वाक्य आठवले ! जेव्हा चंद्रगुप्त मौर्याने जैन श्रमण व्हायचा निर्णय घेतला तेव्हा आर्य चाणक्य त्याला म्हणाले : चन्द्रगुप्त तुम नीजी मुक्ती के पिछे दौद रहे हो | इस संस्कृती के अभिषाप ने तुम्हे भी ग्रसलिया | समाज की मुक्ती के और से तुम ने आखे मोड लियी | https://www.youtube.com/watch?v=s6OEcw5uQ6w =))))
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/10/2018 - 08:20 नवीन
उन्हे उनके हाल पे छोड दो।
  • Log in or register to post comments
द
दासबोध.कॊम Tue, 07/10/2018 - 08:32 नवीन
भिडे गुरुजींबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया वाचण्याची आता सवय झाली आहे. यातील बहुतांश लोक त्यांना प्रत्यक्ष कधीही भेटलेले नसतात किंवा फार फार तर त्यांनी गुरुजींचे एखाददुसरे व्याख्यान प्रत्यक्ष किंवा youtube वर ऐकलेले असते. गुरुजी कसे जगतात हे पाहण्याचे भाग्य त्यांना फारसे लाभलेले नसते. ते भाग्य सुदैवाने लाभल्यामुळे लिहिण्याचे दुस्साहस करत आहे. लिखाणाचा नाममात्र हेतू इतकाच आहे की ज्यांना गुरुजींबद्दल काहीच माहिती नाही त्यांचे मन भ्रमित होऊ नये. मी गुरुजींचा प्रवक्ता वगैरे कोणीही नाही किंवा त्यांना तसा कोणी प्रवक्ता लागत सुद्धा नाही याची कृपया आधीच नोंद घ्यावी .एकेक मुद्दा घेऊन प्रतिवाद करू. १ ) गुरुजींचे आंबा विधान. गुरुजी सुमारे अर्धशतक संघाचे प्रचारक राहिलेले आहेत. संघ म्हणजे काय याबाबतीत प्रत्येकाचे आकलन वेगवेगळे आहे त्याबद्दल आता बोलणे नको. परंतु या संघ विचारांशी फारसे न जुळल्यामुळेच गुरुजी संघातून बाहेर पडले असावेत असे मानावयास पुरेसा वाव आहे. संघाचे प्रचारक असताना गुरुजींना धाराशिव जिल्ह्यामध्ये मायभाते नामक एक शेतकरी भेटला होता ज्याने त्याच्या शेतात असे आंब्याचे झाड असल्याचा दावा केला होता. गुरुजींचे नाशिक मधले व्याख्यान हे त्या आंब्याची जाहिरात करण्यासाठी नसून त्यांनी केवळ उदाहरण म्हणून तो प्रसंग सांगितला व पुढे ते असे म्हणाले की जर एखादा आंबा खाऊन पुरुषाचे नपुंसकत्व जात असेल तर शिवछत्रपती आणि संभाजीमहाराज यांच्या विचारांचे ग्रहण करणाऱ्या हिंदूंचे पिढ्यानुपिढ्या आलेले राष्ट्रीयत्वाचे नपुंसकत्व का जाणार नाही. इथे केवळ उदाहरण म्हणून त्या आंब्याचा गुरुजींनी उल्लेख केला जो तितकाच उचलून माध्यमांनी जणूकाही गुरुजी स्वतःच्या शेतातील आंब्यांची जाहिरात करत आहेत असे भासविले व यावर विश्वास ठेवणारी माणसे ही किती अल्प बुद्धीची असतील हे देखील त्यानिमित्ताने सिद्ध होऊन गेले . २ ) मनू बद्दल गुरुजी काय बोलले मुळात मनू कोण होता, मनू बद्दल ज्ञानेश्वरांचे वारकरी संतांचे विचार काय आहेत हे जाणून न घेता बडबड करणाऱ्या लोकांच्या मुळे हा सर्व उपद्व्याप होतो आहे. *मनू म्हणजे नक्की काय ?हा कोण होता ? मनुस्मृति म्हणजे काय ?* आपल्या धर्मशास्त्रांमध्ये श्रुती वांङ्गय आणि स्मृती वाङ्मय असे वाङ्मयाचे मुख्य प्रकार आहेत. जे ज्ञान कधीच बदलत नाही ते श्रुतीं मध्ये मोडते. हे ज्ञान शाश्वत आहे. आणि जे ज्ञान हे एका विशिष्ट काळापुरते लागू केले जायचे त्याला स्मृती असे म्हणतात. स्मृती या नावातच त्याचे सार सामावलेले आहे. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाले तर भारताचे संविधान हे स्मृती या प्रकारात मोडणारे लिखाण आहे. कारण ते आताच्या काळाला लागू असून त्यामध्ये अनेक बदल वेळोवेळी करण्यात आलेले आहेत ते शाश्वत नाही. भारतीय धर्मशास्त्राने काळाची अप्रतिम व्याख्या केलेली असून पृथ्वीवर पुन्हा पुन्हा प्रलय होऊन नवीन मानवी संस्कृतीचा जन्म होत असतो व अशा अनेक संस्कृती आजवर निर्माण होऊन लोप पावलेल्या आहेत. हा सर्व कालखंड मोजण्याचे अत्यंत अचूक मोजमाप आपल्या कडे आहे. त्यातील सध्याचे जे मन्वंतर सुरू आहे त्या मन्वंतराचा अधिपती विवस्वान नावाचा एक राजा होऊन गेला. हा तो राजा असतो ज्याला परमेश्वर प्रत्यक्ष येऊन संस्कृती, धर्म ,राज्य ,मानवी व्यवस्था कशा चालवायच्या याचे ज्ञान थेट देतो. कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला ब्राह्मण लोक देश काल वर्तमानस्थिती चा उल्लेख करतात तो नीट ऐकत चला. त्यामध्ये कलियुगे भरत वर्षे भरतखण्डे गोदावर्या: अमुक तीरे हे सांगताना वैवस्वत मन्वंतरे असा उल्लेख करून आपल्याला जाणीव करून देत असतात की हे विवस्वान नावाच्या मनूचे मन्वंतर सुरू आहे. थोडक्यात आज आपल्याला जे जे म्हणून धर्माचे ज्ञान प्राप्त झालेले आहे ते थेट परमेश्वराने मनू द्वारे आपल्यापर्यंत पोहोचविलेला आहे. आता हे आम्ही म्हणतो का तर तसे नाही हे स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या सुरूवातीलाच आपल्याला सांगतात. *इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् । विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥* अर्थात भगवंत सांगतात की अर्जुना हे सर्व ज्ञान जे मी तुला आज देतो आहे ते या युगाच्या प्रारंभालाच मी विवस्वान नावाच्या मनूला दिलेले असून त्याने पुढे ते ज्ञान इक्ष्वाकु वंशामध्ये प्रक्षेपित केले .इश्वाकु वंशा पासूनच रामाचा रघुवंश उत्पन्न झालेला आहे ,हे लक्षात घेण्यासारखे आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेवर केलेली टीका आहे. नवीन पिढीसाठी पुन्हा एकदा सांगतो टीका करणे या अर्थाने मराठी मध्ये आपण जो शब्द वापरतो त्याचा या टीकेची काही संबंध नाही. एखाद्या ग्रंथाचे विस्तृत विवेचन करणे त्यावर स्वतःचे भाष्य करणे याला टीका करणे असे म्हणतात. असो तर ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतात ? *मग देव म्हणे अगा पंडुसुता l हाची योगु आम्ही विवस्वता | कथिला परी ते वार्ताI बहुवा दिसांची ॥* *मग तेणे विवस्वते रवी I हे योगस्थिती आघवीI निरोपिली बरवी मनू प्रति॥* *मनूने आपण अनुष्ठिली I मग इक्ष्वाकुवा उपदेशिली I ऐसी परंपरा विस्तारिलीI आद्य हे गा॥* थोडक्यात माऊली आपल्याला स्पष्टपणे सांगतात की परमेश्वराने त्याचे सर्व ज्ञान सर्वप्रथम विवस्वान याला दिले. त्याने तेच ज्ञान त्याच्या पिढीमध्ये पुढे प्रसारित केले. व हे सर्व ज्ञान ज्या मनूला प्राप्त झाले त्याने स्वतः तो योगमार्ग अंगीकारला ,त्याचे अनुष्ठान केले व तो योग सिद्ध झाल्यावर तोच योग त्याने इक्ष्वाकु ला देऊ केला. आणि हेच ज्ञान रघु वंशांमध्ये पुढे प्रसारित झाले. हे ज्ञान देण्याची पद्धत पूर्वी ग्रंथरूपात ग्रथित केली जात असे. तो ग्रंथ म्हणजेच मनुस्मृती होय. ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्यापर्यंत विस्तारलेली हिंदू धर्माची परंपरा जी आहे तिचे मूळ मनू पासून सुरु होते असे स्वतः माऊली सांगतात. यातील *आद्य* हा माऊलींनी वापरलेला शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा तोच शब्द आहे ज्याने ज्ञानेश्वरी ची सुरुवात माऊली करतात. *ओम नमोजी आद्या l वेद प्रतिपाद्याl जयजय स्वसंवेद्याl आत्मरूपाll* इतक्या महत्त्वाच्या शब्दाचा गैरवापर स्वतः ज्ञानेश्वर माऊली तरी करणार नाहीत. जो शब्द थेट आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यासाठी माऊली वापरतात, त्याच शब्दांमध्ये ते मनूचा देखील गौरव करतात यामध्येच सर्व सार आले. मग मनुस्मृतीला नंतरच्या काळामध्ये इतका विरोध का झाला असेल? त्याचे कारण इंग्रजांनी आपल्या स्वकीयांना हाताशी धरून केलेला मनुस्मृतीचा अपप्रचार होय. ह्या मनुस्मृतीमध्ये मुद्दाम होऊन काही अश्लाघ्य श्लोक घुसडण्यात आले व केवळ त्यांचाच प्रसार करून मनुस्मृती कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला. आत्तासुद्धा भिडे गुरुजींच्या संपूर्ण भाषणातील केवळ एखादेच वाक्य उचलून त्याचा जसा गहजब माध्यमे करतात अगदी तीच पद्धत हे लोक त्या काळामध्ये वापरत होते. संदर्भाशिवाय जर आपण अशी आधली मधली वाक्ये उचलायला सुरुवात केली तर त्याने अर्थाचा अनर्थ होत असतो हे सांगायला कुठल्या तज्ञाची आवश्यकता नाही. इतिहासामध्ये एकदा अनैतिहासिक गोष्टी घुसडल्या की हळूहळू शेकडो वर्षांनी त्या इतिहासाचाच भाग होऊन जातात. आज ब्रिगेडी इतिहासकार शिवछत्रपतींची इतिहासाची जी मोडतोड करत आहेत ती पाहता तुमच्या सहज लक्षात येईल की अजून सात-आठशे वर्षांनी शिवाजी महाराज हे मुसलमान राजा होते असा सुद्धा इतिहास कायम होऊ शकेल. असो ज्या लोकांनी साक्षात ज्ञानेश्वर माऊलींना सोडले नाही तुकोबारायांना सोडले नाही शिवछत्रपतींना सोडले नाही त्या प्रवृत्ती भिडे गुरुजींना सोडतील अशी अपेक्षा करणेच गैरलागू आहे. सुदैवाने तुकोबारायांनी त्यांना तत्कालीन पुरोगामी लोकांकडून होत असलेल्या त्रासाचे रीतसर वर्णन करून ठेवलेले आहे ते मुळापासून वाचण्यासारखे आहे आणि तुकाराम महाराज त्या लोकांचे पुढे काय होईल ते सांगता ते ही वाचावे. *पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथे मी विठ्ठला काय बोलो ॥ १ ॥* *कांद्याचा खाणारा चोजवी कस्तुरी । आपण भिकारी अर्थ नेणे ॥ २ ॥* *न कळे ते मज पुसती छळूनी । लागता चरणी न सोडती ॥ ३ ॥* *तुझ्या पायाविण दुजे नेणे काही । तूची सर्वांठायी एक मज ॥ ४ ॥* *तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलो भांडा वादकांशी ॥ ५ ॥* कलियुगी कवित्व करिती पाखांड । कुशल हे भांड बहू झाले ॥ १ ॥ द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी । मुखे बडबडी कोरडेचि ॥ २ ॥  दंभ करी सोंग मानावया जग । मुखे बोले त्याग मनी नाही ॥ ३ ॥ वेदाज्ञे करोनी न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनि ॥ ४ ॥ तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसे ॥ ५ ॥ नाहीं आह्मी विष्णुदास । करीत आस कोणांची ॥1॥ कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥ असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥3॥ तात्पर्य हेच की गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे कोणाला चांगले वाटावे म्हणून काही बोलत नाहीत. तर जे जे आपल्या पूर्वजांनी चांगले ,उत्तुंग, उदात्त विचार मांडून ठेवले आहेत तितकेच ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. आत्ता भिडे गुरुजींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे लोक हे तुकाराम महाराजांचे किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे समर्थक नसून हे तेच लोक आहेत हे एकेकाळी ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण असल्यामुळे वारकरी संत असू शकत नाहीत असे म्हणून ज्ञानदेव तुकाराम म्हणायच्या ऐवजी नामदेव तुकाराम म्हणा असा वारकऱ्यांना सल्ला देत होते. आज स्वतःला बुद्धिवादी समजणारे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही लोक समाजामध्ये दिसतात जे संविधानालाच आपला धर्मग्रंथ मानतात आणि देशालाच देव मानतात त्या लोकांना असेच आवर्जून सांगावेसे वाटते की आपण केवळ देशापुरता विचार न करता अखिल मानवजातीचा विचार केला पाहिजे. *हे विश्वची माझे घरl ऐसी मती जयाची स्थिरl किंबहुना सचराचर l आपणचि जाहलाll* असे कळवळून सांगणाऱ्या माऊलींचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला अजिबातच नाही. केवळ काही लोक मनुस्मृती जाळतात हे लक्षात ठेवणाऱ्या तुम्ही कधी मनु सुद्धा वाचलेला नाही ,ज्ञानेश्वर सुद्धा वाचलेले नाहीत आणि तुकाराम सुद्धा तुम्हाला कळलेले नाहीत. त्यामुळे भिडे गुरुजी काय आहेत हे जाणण्याचा तुम्हाला अधिकारच नाही .कारण तुम्हाला कळलेले भिडे गुरुजी हे अलीकडच्या दोन-तीन वर्षांच्या माध्यमातील गदारोळामुळे कळलेले आहेत, तर आम्हाला कळलेले गुरुजी हे वर्षानुवर्षांच्या सहवासातून आणि त्यांच्या प्रत्यक्ष *बोले तैसा चाले* या आम्हाला आलेल्या अनुभवातून जाणिवेत उतरलेले आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही गुरुजींना उपदेशाचे डोस पाजत बसण्यापेक्षा गुरुजींच्या पायाशी बसून किंवा त्यांच्या सोबत सह्याद्रीच्या गडकोटांची भटकंती करून थोडेफार ज्ञान पदरामध्ये पाडून घेता आले तर तुम्ही गुरुजींचे समकालीन असल्याचा काही लाभ करून घेतला असे म्हणता येईल, नाहीतर तुकाराम महाराजांच्या समकालीन धर्ममार्तंडां मध्ये आणि तुमच्या मध्ये फारसा काही फरक राहणार नाही. गुरुजी नेहमी म्हणतात ते या प्रकारांमुळे पटते. विश्वाचा आकार केवढा?ज्याच्या-त्याच्या मेंदू एवढा ! आता वरील प्रतिक्रिया वाचून त्यावर प्रतिक्रियांचा महापूर कोणाला लुटा वयाचा असेल तर तो अवश्य लुटावा परंतु त्यातील एकही प्रतिक्रिया वाचली जाईल याची शाश्वती बाळगू नका कारण आपला वेळ वाया घालवू नये ही गुरुजींची शिकवण आम्ही तंतोतंत पाळत असतो. राहता राहिला विषय सुवर्ण सिंहासनाचा तर त्याबाबत सर्वांनी एकच गोष्ट लक्षात घ्यावी. रयतेचे कल्याण करावे हे शिवाजी महाराजांना सुद्धा कळत होते तरीसुद्धा त्यांनी 32 मण सोने खर्च करून सिंहासन उभे केलेच . कारण सिंहासन हे प्रतीक असते. भारताच्या राष्ट्रपतींना राहण्यासाठी एवढा मोठा 40 दरवाजे असलेला महाल कशाला हवा आहे ? कारण राष्ट्रपती हे प्रथम नागरिकाचे प्रतीक असते. त्याचप्रमाणे राजा हा संपूर्ण प्रजेचा पालक मानला जातो त्यामुळे सिंहासन व त्याची सर्व बिरुदे ही प्रतीकात्मक असतात. आपल्या देशावर परकीयांनी आक्रमणे केली हे जर मिसळपावच्या वाचकांना मान्य असेल तर त्यांनी ठरवून पृथ्वीराज चव्हाणचे सिंहासन तुकडे तुकडे करुन फेकून दिले हे मान्य करायला हरकत नाही. व तीच सल तीच बोध मनात बाळगत शिवछत्रपतींनी पुरेशी ताकद प्राप्त झाल्यावर हिंदूंचे तख्त पुन्हा एकदा विश्वामध्ये उभे करून दाखविले ते या सिंहासनाच्या रूपाने. शिवछत्रपतींच्या माघारी झुल्फिकारखानाने त्या सिंहासनाचे पुन्हा तुकडे-तुकडे करून टाकून दिले. हे तुकडे सिंहासन नावाच्या एका फर्निचर चे तुकडे नसतात तर ते तुमच्या प्रतीकाचे पर्यायाने तुमच्या अस्मितेचे स्वाभिमानाचे तुकडे असतात. अर्थात ज्यांना स्वाभिमान वगैरे गोष्टी समजतात त्यांना त्यातले वर्म कळू शकेल. केवळ सिंहासन उभे राहिल्यावर गुरुजींचे काम संपणार नसून उलट ती कार्याची सुरुवात आहे. दररोज प्रत्येक तालुक्यातील दोन हजार मुले जेव्हा सिंहासनाला जागता पहारा देण्याच्या निमित्ताने रायगडावर अनवाणी चढत येतील आणि तिथल्या मातीचा स्पर्श त्यांच्या शरीराला होईल सकाळी भरघोस व्यायाम करून नंतर शिवचरित्राचे पारायण करून एक संपूर्ण दिवस निर्व्यसनी राहून उदात्त विचारांच्या संपर्कात ती मुले जेव्हा राहतील तेव्हा निश्चितच त्यांच्या आयुष्याला काहीतरी नवी दिशा मिळेल आणि कुठल्याही कार्यात हात घातल्यावर यश मिळवण्याची एक विजिगीषू वृत्ती त्यांना तेथे प्राप्त होईल जी कुठल्याही एका फडतुस नोकरीपेक्षा कैकपटीने श्रेष्ठ आहे. गुरुजींचे धारकरी आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये यशस्वी आहेत. फक्त त्याची कुठे जाहिरात ना धारकरी करतात ना गुरुजी करतात. आज गुरुजींना जो काही विरोध होतो आहे त्याचे महत्त्वाचे कारण सिंहासनाचा हा प्रकल्प हाच आहे. आजपासून पन्नास वर्षांनी दिसणारा महाराष्ट्र हा पूर्णपणे वेगळा असेल आणि त्याचे मूळ स्थान हे 32 मण सोन्याचे सिंहासन असणार आहे यात आम्हाला कोणतीही शंका वाटत नाही. गुरुजींना विरोध करण्यापेक्षा गुरुजींच्या या उदात्त कार्यामध्ये जर आपण सर्व सहभागी झालो तर ते कार्य अधिक गतीने पूर्णत्वाला नेता येईल. कारण तुम्ही विरोध केलात तर तुमच्या शिवाय हे कार्य तडीला जाणार आहेत यात शंकाच नाही. मनुस्मृति ज्यांना वाचायची असेल ती खालील दुव्यावर उपलब्ध आहे. www.dasbodh.com
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/10/2018 - 09:30 नवीन
* ३२ मण सोन्याचे सिंहासन एखाद्या देखण्या सिंहासनाचे प्रतिक उभारण्यास काहीच हरकत नाही, थोडे फार सोनेही वापरण्यास हरकत नाही पण अगदी ब्रिटीश काळात भारताच्या एक्सपोर्ट पेक्षा इंपोर्ट वाढून बॅलन्स ऑफ ट्रेड निगेटीव्ह झाला तेव्हा पासून भारतीयांनी आयात सोन्याचे प्रेम सोडणे अभिप्रेत होते कारण भारतात मोठ्या प्रमाणावर सोने खाणि नाहीत हे रहस्य नाही. वस्तु उत्पादनास आवश्यक गोष्टीची आयात सोडून परकीय खाणीतून निघणार्‍या सोन्यावर पैसा आणि जीव लावणे खर्‍या देशहिताच्या व्याख्येत कितपत बसू शकते या बद्दल अर्थशास्त्रीय बाजूने साशंकीत आहे. मी हि साशंकता या बाबीतच व्यक्त केली आहे असे नाही भारतीयांच्या सोने प्रेमा च्या देशहित लक्षात घेता आर्थीक सयुक्तते बद्दल साशंकता व्यक्त करणारा धागा चर्चा पुर्वीही काढली आहे. पण भारतीयां च्या सोने प्रेमापुढे प्रत्येक अर्थशास्त्र जाणता केवळ __/\__ एवढेच करु शकला असावा. *** ***
संविधानालाच आपला धर्मग्रंथ मानतात आणि देशालाच देव मानतात त्या लोकांना असेच आवर्जून सांगावेसे वाटते की आपण केवळ देशापुरता विचार न करता अखिल मानवजातीचा विचार केला पाहिजे. *हे विश्वची माझे घरl ऐसी मती जयाची स्थिरl किंबहुना सचराचर l आपणचि जाहलाll* असे कळवळून सांगणाऱ्या माऊलींचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला अजिबातच नाही.
मुद्दा चांगलाय यावर इतर दिग्गज मिपाकर असताना मी स्वतःचे भाष्य करण्यापेक्षा त्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा करतो. तुम्ही त्यांचे शंका निरसन करावे. *** ***
मनू आणि मनूस्मृती
त्यांचे बाकीचे कोणतेही योगदान चर्चा करण्या पुर्वी मनुप्रणित जन्माधारीत विषमता नाकारत असल्याबद्दल सुस्पष्ठ नि:संदिग्ध विधान हवे तरच त्यांचे इतर योगदान लक्षात घेतले जाण्याची काही तरी शक्यता उरु शकते अन्यथा केवळ मुठभर लोक मांस चढवण्या इतपत मनुच्या बाजूने बोलतील, पण बहुसंख्य ह्या कानाने ऐकुन दुसर्‍या कानाने सोडतील किंवा विरोध करत असतील. * आता जरा तुमच्या बाजूने (पण आधी डिस्क्लेमर उत्तरदायित्वास नकार देऊन) ** तुकाराम गाथेतून तुकाराम गाथेत मला दोन अभंगात 'मनु' हा शब्द दिसला, ते अभंग प्रक्षिप्त आहेत किंवा नाही , तो शब्द कोणत्या अर्थाने येतो याची मला कल्पना नाही. मला आंतरजालावर जे मिळाले ते मी खाली कॉपी पेस्टवत आहे. * १३१९ अनुभवें अनुभव अवघा चि साधिला । तरि स्थिरावला मनु ठायीं ॥१॥ पिटूनियां मुसे आला अलंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥धु॥ एक चि उरलें कायावचामना । आनंद भुवनमाजी त्रयों ॥२॥ तुका म्हणे आम्ही जिकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥3॥ * ४२९ मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी। पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥ म्हणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥ सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण । कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥ पुढें भक्तिनें धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य धर्म येती । स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सद्धि आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥ केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय । धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥ होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव । तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥५॥ ** याचा फेसबुकवर एक सार्थ दुवा दिसतोय , तोच अर्थ बरोबर आहे का याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 07/11/2018 - 08:48 नवीन
खर तर अशा प्रतिसादांवर काही लिहायची इच्छा होत नाही आता कारण आपलंच वेळ वाया जातो आणि समोरचा शब्दांना गोलगोल फिरवत बसतो. असेही, पानभर प्रतिसाद लिहून आपला वेळ किती अमूल्य आहे हेही आपण लिहिले आहेच. त्यामुळे तुम्हाला समोरच्याला सांगायला भरपूर वेळ दिसतो पण ऐकायला मात्र दिसत नाही असे वाटते.
आता वरील प्रतिक्रिया वाचून त्यावर प्रतिक्रियांचा महापूर कोणाला लुटा वयाचा असेल तर तो अवश्य लुटावा परंतु त्यातील एकही प्रतिक्रिया वाचली जाईल याची शाश्वती बाळगू नका कारण आपला वेळ वाया घालवू नये ही गुरुजींची शिकवण आम्ही तंतोतंत पाळत असतो.
" महापूर वगैरे नाही आला कि हो, असो... आधी काही प्रश्न: याची उत्तरे कोणीही द्यावीत, म्हणजे जे काही गोंधळ निर्माण करणारे मुद्दे आहेत ते तरी दूर होण्यास मदत होईल. १. भिडेचें शिक्षण काय आहे? (फेबु वरती समर्थकांनी अगदी पीएचडी, फिजिक्स मध्ये गोल्ड मेडल, १०० च्या वरती शोधनिबंध असे बरेच काही लिहिलेले मी स्वतः देखील पहिले आहे. एके ठिकाणी तर ते नासा ला मदत करत होते वगैरे लिहिलेले होते! ते वाचून या सगळ्यांचीच सत्यता पडताळून घ्यावी वाटली) २. भिडे फर्ग्युसन मध्ये शिकवायला कधीपासून होते? आणि मग त्यांनी ते सोडून संघ प्रचार वगैरे नक्की कधी सुरु केला? आता त्यांनी शिक्षणाचे दाखले द्यायची गरज काय हा प्रश्न विचारला जाईल, पण जेव्हा सार्वजनिक जीवनात तुमच्याबद्दल काही गोष्टी "चांगल्या" म्हणून पसरवल्या जात असतील तर त्याचा पुरावा तुमच्याकडे असण्याची आवश्यकता असते असे मला तरी वाटते. हे पुरावे कधी कोणी पाहिल्याचे मला माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर तर त्यांनी सांगावे. बर, आता प्रतिसादातील काही मुद्दे: १ ) गुरुजींचे आंबा विधान: वरती व्हिडीओ दिला आहे, त्यात भिडे स्पष्ट बोलताना दिसत आहेत आंब्याविषयी! "मुलगा पाहिजे तर मुलगाच होतो" हेही ऐकू येतंय तरी काही समर्थक लोकांनी सगळ्या सोशल मीडियावर ते हे वाक्य बोललेच नाहीत हा प्रचार लावला होता. तुम्हीदेखील सोयीस्कर बगल दिलीच आहे. त्याला विरोध झाला कि मग ते जे बोलले ते "रूपक" होते असा प्रचार सुरु झाला. या गोष्टी खूपच ऑर्गनाइज्ड पद्धतीने सुरु होत्या त्यावरून नक्की कोण हे पसरवत होत अशी शंका आली. पण आता प्रकरण त्यांच्या अंगाशी येईल असे दिसतंय. संभाजी भिडे चौकशीत दोषी: http://zeenews.india.com/marathi/maharashtra/nasik-mahapalika-investigation-on-sambhaji-bhide/437803 "शिवप्रतिष्ठान' या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे नाशिक महापालिकेच्या रडारवर आलेत. 'आंबा खाऊन संतती' होण्याच्या वक्तव्यावर नाशिक पालिकेच्या चौकशीत दोषी आढळलेत. 'प्रसूतीपूर्व लिंग निदान तंत्र अधिनियम समिती' पीसीपीएनडीटीच्या प्राथमिक बैठकीत सदस्यांच्या चित्रफीत चौकशी अहवालात संभाजी भिडे दोषी आढळलेत. उल्लेखनीय म्हणजे, चौकशी दरम्यान महापालिकेनं संभाजी भिडे यांना दोन वेळेस नोटीस देऊनही भिडे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खुलासा करणं टाळलं होतं." २ ) मनू बद्दल गुरुजी काय बोलले: इथं मी ते काय बोलले यापेक्षा तुम्ही काय बोललात ते पाहत होतो.
मग मनुस्मृतीला नंतरच्या काळामध्ये इतका विरोध का झाला असेल? त्याचे कारण इंग्रजांनी आपल्या स्वकीयांना हाताशी धरून केलेला मनुस्मृतीचा अपप्रचार होय. ह्या मनुस्मृतीमध्ये मुद्दाम होऊन काही अश्लाघ्य श्लोक घुसडण्यात आले व केवळ त्यांचाच प्रसार करून मनुस्मृती कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला.
याचा काही पुरावा कि उचलली जीभ? मनुस्मृतीवर भरपूर चर्चा झाली आहे मिपावर आणि काही इतके घाणेरडे आणि फालतू नियम आहेत त्यात कि बनवणाऱ्याच्या मानसिकतेची लाज वाटावी! मग यावरसुद्धा मनुस्मृती चांगलीच होती कालसुसंगत होती पण नंतर तिला वाईट बनवले गेले हे असले गोलमोल प्रचार करायचे! आमचा हिंदू धर्म किती भारी त्यात सगळंच किती चॅन चॅन होत. कोणावर अत्याचार झाले नाहीत, विधवाना जाळलं गेलं नाही त्यांचं शोषण केलं गेलं नाही, अस्पृश्याना जनावरांपेक्षा खराब वागणूक दिली गेली नाही, त्यांना शिक्षण पैसे यांची कधी कमी नव्हती असे देखील प्रचार होतील. हे पण इंग्रजांनी पसरवले असतील समज! फाळणीमध्ये सगळं काही गमावलेल्या परिवारासमोर जाऊन फाळणी झाली ते बर झालं, डोक्याची कटकट गेली अशी विधान केल्यावर काय प्रतिक्रिया येईल? तशाच प्रतिक्रिया जुना हिंदू धर्म किती चांगला हे बोलल्यावर काही लोकांकडून आल्या तर त्यात गैर ते काय? अनेक समाजसुधारकांनी समाज ढवळून काढल्यावर कुठे आता जरातरी बरी परिस्थिती आहे . पण काही लोकांना ते जून जे होत तेच परत हवे आहे असे वाटू लागलय, त्याला वेळीच थोपवायलाच हवे! टीका हि जरुरीचं असते आणि लोकशाहीत तो हक्क आहे त्यामुळे आपल्याला खपत नसेल तर इतरांची बुद्धी काढण्यापेक्षा स्वतःचा संयम वाढवा! ३. ३२ मण सिंहासन: हे तर अडाणीपणाचे लक्षण वाटते. सध्या सोन्याचा भाव ३२००० पकडला तर या कार्यासाठी अंदाजे 3276800000 इतके पैसे लागतील! याशिवाय २००० लोक पहारा देणार म्हणे! यापेक्षा १ कोटी फंडिंग करून २००-३०० मराठी कंपन्या बनवा आणि हजारो मराठी तरुणांना कायमस्वरूपी राजगोर देऊन मराठी "उद्योग साम्राज्य" निर्माण करायचा ध्यास घेतला तर काहीतरी कल्याण होईल लोकांचं. तुम्हाला नोकरी हि "फडतूस" वाटते त्यामुळे असो! पण आम्हाला इतिहासच पाहिजे फक्त ध्रुवीकरण करायला! ४. एखादा मुस्लिम नेता व्यासपीठावरून हिंदूंना हरामखोर, देशद्रोही अशी विशेषणे वापरत असेल तर त्याचा उल्लेख आपण कसा कराल हे ऐकायला आवडेल. मग हिंदू असलेला एक माणूस जर मुस्लिमांबाबत असे बोलत असे तर काय करायचे? हा माणूस जाहीरपणे अशा गोष्टी करून समाजाला कलुषित करत आहे आणि ध्रुवीकरण करत आहे. कशाला पाहिजेत तलवारी कुठल्याही जनसमुदायाकडे? आहेत ना पोलीस आणि सैन्य भारतात? कि दहशत निर्माण करायची आहे? एखादा माणूस चप्पल न घालता गडकिल्ले फिरतो, संघटन करतो तर त्यासाठी त्याचे कौतुक होईल पण हि असली जातीय तेढ निर्माण करण्याची मानसिकता असेल तर टीका देखील व्हायलाच हवी!
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 07/11/2018 - 11:18 नवीन
धन्यवाद शब्दसाहेब! परंतु श्रध्दाळू डोक्यांमध्ये त्याने किती प्रकाश पडेल, ते ‘त्याला’च माहिती.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 07/10/2018 - 09:07 नवीन
या वादावरची संत साहित्य अभ्यासक मा. सदानंद मोरे यांची या संदर्भातली ताजी मुलाखत : मनू व मनूस्मृतीमधील फरक मनू व मनूस्मृतीमधील फरक (एबीपी माझा वरील सदर व्हिडियोवर राईट क्लिक केले असता "copy embed code" हा मेनू दिसला नाही, त्यामुळे हा व्हिडियो मी या प्रतिसादात एम्बेड करू शकलो नाही, कुणी मदत करु शकेल का ?)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/10/2018 - 10:26 नवीन
हम्म @ दासबोध.कॉम
ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतात ? *मग देव म्हणे अगा पंडुसुता l हाची योगु आम्ही विवस्वता | कथिला परी ते वार्ताI बहुवा दिसांची ॥* *मग तेणे विवस्वते रवी I हे योगस्थिती आघवीI निरोपिली बरवी मनू प्रति॥* *मनूने आपण अनुष्ठिली I मग इक्ष्वाकुवा उपदेशिली I ऐसी परंपरा विस्तारिलीI आद्य हे गा॥* थोडक्यात माऊली आपल्याला स्पष्टपणे सांगतात की परमेश्वराने त्याचे सर्व ज्ञान सर्वप्रथम विवस्वान याला दिले. त्याने तेच ज्ञान त्याच्या पिढीमध्ये पुढे प्रसारित केले. व हे सर्व ज्ञान ज्या मनूला प्राप्त झाले त्याने स्वतः तो योगमार्ग अंगीकारला ,त्याचे अनुष्ठान केले व तो योग सिद्ध झाल्यावर तोच योग त्याने इक्ष्वाकु ला देऊ केला. आणि हेच ज्ञान रघु वंशांमध्ये पुढे प्रसारित झाले. हे ज्ञान देण्याची पद्धत पूर्वी ग्रंथरूपात ग्रथित केली जात असे. तो ग्रंथ म्हणजेच मनुस्मृती होय.
तुमच्या उपरोक्त विधानातील / समजुतीतील "हे ज्ञान देण्याची पद्धत पूर्वी ग्रंथरूपात ग्रथित केली जात असे. तो ग्रंथ म्हणजेच मनुस्मृती होय." हा भाग प्रा. सदानंद मोरे नाकारत असावेत. ते भगवदगीता आणि मनुचा संबंध स्विकारतात, मनु आणि मनुस्मृतीचा संबंध म्हणजे वारकरी संप्रदायासाथी मनुस्मृती स्विकारत नाहीत तसेच त्यांना ज्ञानदेव तुकारामांपेक्षा ईतर कुणिही मोठे नाही असे काहीसे वरील मुलाखतीतून सुचवताहेत असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
R
Rahul Sable Tue, 07/10/2018 - 10:17 नवीन
विश्वाचा आकार केवढा?ज्याच्या-त्याच्या मेंदू एवढा !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Tue, 07/10/2018 - 12:46 नवीन
मला एक माणूस म्हणाला होता/माझा एक मित्र अमुक अमुक आहे तो म्हणतो/आमच्या ओळखीचे एक असे म्हणालेत वगैरे वाक्यं डिस्क्लेमर सारखी विधानाच्या आधीच जोडून मी वाटेल ते बोललो तर त्या विधानाच्या परिणामांचे उत्तरदायित्व घेणे मला लागू होईल का?
गुरुजींना, तो कोण मराठवाड्यातील शेतकरी भेटला होता, किंवा गुरुजी जे काही "मला एक माणूस बोलला होता" म्हणतात त्यांना त्या त्या विधानांचे उत्तरदायित्व लागू असेल का नसेल ? असले तरी गुरुजींनी सरळ त्या त्या विधाने करणाऱ्यांना जगासमोर आणावे अन सगळ्यांचीच तोंडे गप करून टाकावीत की. मला गुरुजींच्या गडसंवर्धन कार्याबद्दल अतिशय जास्त आदर आहे, ह्या वयातही डोंगरदऱ्या तुडवून इतिहास जपायची वृत्ती पण भारीच, फक्त तितकं एकदा गुरुजींनी त्यांच्यावर आलेलं किटाळ "हा सूर्य अन हा जयद्रथ" प्रमाणे एक घाव दोन तुकडे करून टाकावेत ही मनापासून इच्छा आहे, ज्यामुळे पुढे गुरुजींना आपले शिवकार्य चालवताना असल्या बिनकामी फंदात पडायची गरजच उरणार नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/10/2018 - 13:10 नवीन
मला अबकड व्यक्ती हळक्षज्ञ म्हणाली, पण अबकड व्यक्तिची खासगीपण जपायचे असल्यामुळे अबकड बद्दल अधिक माहिती देणे शक्य नाही, असे होऊ शकते आणि अशी माहिती देण्याचा कायदेशीर दबाव टाकता येत नसतो. समजा अबकडने स्वतःहून येऊन स्वतःस सादर केले तर वेगळे.
...शिवछत्रपती आणि संभाजीमहाराज यांच्या विचारांचे ग्रहण करणाऱ्या हिंदूंचे पिढ्यानुपिढ्या आलेले राष्ट्रीयत्वाचे नपुंसकत्व का जाणार नाही...
असे विचार संभि नी मांडले असे मिपासदस्य दासबोध . कॉम म्हणतात. या विधानाच्या योग्यते बद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल पण हे वाक्य सिद्ध करण्यासाठी उदाहरणातील अनेकवर्षापुर्वी भेटलेला खरा /काल्पनिक आंबेवाला समोर आणून उभा करण्याची गरज वाटत नाही असे माझे व्यक्तिगत मत.
  • Log in or register to post comments
ए
एमी Tue, 07/10/2018 - 21:39 नवीन
हे जळगाव-जोशी आता वीस लाख-ट्रक सारखं होऊ लागलंय. जोशी ब्राह्मण नाहीतच, पुरोगाम्यांचा कस्सा पचका झाला करणार्यांनी जोशी नक्की कोणत्या जातीचे आहेत तेपण सांगून टाक. त्याचसोबत जमलंतर खैरलांजीमधले आरोपी कोणत्या जातीचे आहेत तेपण सांगा. म्हणजे त्याच्या पावत्या कोणाच्या नावाने, का फाडल्या जातात तेपण कळेल....
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 07/12/2018 - 21:16 नवीन
अच्छा.. म्हणजे तुम्ही मनुवादी मनुवादी म्हणून ओरडायला हरकत नाही. लं आम्ही ट्रक फिरवला की चालत नाही काय?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 07/11/2018 - 10:33 नवीन
धिस थ्रेड गॉट नो चिल
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/11/2018 - 14:25 नवीन
शब्दबम्बाळ, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. मला काय वाटतं ते लिहितो. १.
१. भिडेचें शिक्षण काय आहे? (फेबु वरती समर्थकांनी अगदी पीएचडी, फिजिक्स मध्ये गोल्ड मेडल, १०० च्या वरती शोधनिबंध असे बरेच काही लिहिलेले मी स्वतः देखील पहिले आहे. एके ठिकाणी तर ते नासा ला मदत करत होते वगैरे लिहिलेले होते! ते वाचून या सगळ्यांचीच सत्यता पडताळून घ्यावी वाटली)
याचा पूज्य भिड्यांच्या कार्याशी कसलाही संबंध नाही. नसलेली कामे पूज्य भिड्यांच्या गळ्यात मारणे ही हितशत्रूंनी उठवलेली अफवा दिसते आहे. २.
पण जेव्हा सार्वजनिक जीवनात तुमच्याबद्दल काही गोष्टी "चांगल्या" म्हणून पसरवल्या जात असतील तर त्याचा पुरावा तुमच्याकडे असण्याची आवश्यकता असते असे मला तरी वाटते.
नसलेल्या पदव्या पूज्य भिड्यांच्या गळ्यात मारणे ही हितशत्रूंनी उठवलेली अफवा दिसते आहे. ३.
त्यात भिडे स्पष्ट बोलताना दिसत आहेत आंब्याविषयी! "मुलगा पाहिजे तर मुलगाच होतो" हेही ऐकू येतंय
ही पूज्य भिड्यांनी ऐकलेली वदंता आहे. पूज्य भिड्यांचा दावा नव्हे. ४.
त्याला विरोध झाला कि मग ते जे बोलले ते "रूपक" होते असा प्रचार सुरु झाला.
कारण की ते रूपक आहेच मुळी. ज्याप्रमाणे विवक्षित आंबा खाल्ल्याने निपुत्रिकास पुत्रप्राप्ती होते त्याप्रमाणे पूज्य भिड्यांची शिकवण आचरणात आणली की उदासीन माणूस उत्साही बनतो (किंवा तत्सम काही). ५.
'आंबा खाऊन संतती' होण्याच्या वक्तव्यावर नाशिक पालिकेच्या चौकशीत दोषी आढळलेत.
ही कसली चौकशी म्हणायची? चौकशी पोलीस करतात असं ऐकून आहे. ६.
'प्रसूतीपूर्व लिंग निदान तंत्र अधिनियम समिती' पीसीपीएनडीटीच्या प्राथमिक बैठकीत सदस्यांच्या चित्रफीत चौकशी अहवालात संभाजी भिडे दोषी आढळलेत.
आंबा खाऊन मुलगा होण्याचा गर्भलिंग निदानाशी काडीमात्र संबंध नाही. आणि स्त्रीभ्रूणहत्येशी तर नाहीच नाही. पूज्य भिड्यांना त्रास देण्यासाठी उगीच बादरायण संबंध जोडला आहे. ७.
काही इतके घाणेरडे आणि फालतू नियम आहेत त्यात कि बनवणाऱ्याच्या मानसिकतेची लाज वाटावी!
एखादा नियम मिळेल काय? मूळ संहितेत हवा. ८.
तशाच प्रतिक्रिया जुना हिंदू धर्म किती चांगला हे बोलल्यावर काही लोकांकडून आल्या तर त्यात गैर ते काय?
शिंदे व होळकर याच पद्धतीतनं पुढे आले ना? नारायण गुरूंनी याच धर्मातून केरळातली अस्पृश्यता नष्ट केली ना? सावरकरांनी याच हिंदू धर्मात राहून रत्नागिरी सुधरवली ना? पूज्य भिडे हा माणूस याच मार्गाने जातोय ना? मग त्याच्यावर इतकी आगपाखड का? त्यातूनही हिंदू धर्माचा इतकाच द्वेष करायचा असेल तर जा पाकिस्तानात राहायला. तुमच्या कल्पनेतला स्वर्ग आहे ना तिथे. तुम्हाला तेच चांगलंय. ९.
पण काही लोकांना ते जून जे होत तेच परत हवे आहे असे वाटू लागलय, त्याला वेळीच थोपवायलाच हवे!
ते काही लोकं म्हणजे तुम्ही स्वत:च आहात. तुम्हांस सतत रडायची सवय लागली आहे. (संपादित) तो मोदी बघा डिक्की पुढे आणायला बघतोय. आणि तुम्ही आजूनही मनुस्मृती कवटाळून बसलाय. १०.
यापेक्षा १ कोटी फंडिंग करून २००-३०० मराठी कंपन्या बनवा आणि हजारो मराठी तरुणांना कायमस्वरूपी राजगोर देऊन मराठी "उद्योग साम्राज्य" निर्माण करायचा ध्यास घेतला तर काहीतरी कल्याण होईल लोकांचं
अरे वा ! हे भिड्यांनी करायचं. मग तुम्ही काय करणार? मनुस्मृती अशी आणि तशी आहे, भिड्यांनी ह्यंव करायला पाहिजे आणि त्यंव करायला पाहिजे, म्हणून हुकूम सोडंत बसणार? मुलखाचे आळशी आहात तुम्ही. ८०+ वर्षांचा अकिंचन म्हातारा अविश्रांत कार्य करतोय त्याचं कौतुक सोडा, नुसता द्वेष करायचा. तो ही हिंदुद्वेष्ट्यांच्या बातम्या ऐकून. पारतंत्र्याकडे छानपैकी वाटचाल होते आहे. ११.
मग हिंदू असलेला एक माणूस जर मुस्लिमांबाबत असे बोलत असे तर काय करायचे?
याविषयी माहित नाही. आपला पास. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 07/11/2018 - 17:17 नवीन
संपादक कारवाई करतील का? गापै, आपण आपल्या पातळीवर आलात हे बरे झाले! एक तर भिडेंना संपूर्ण प्रतिसादात मी काहीही अपशब्द वापरले नाहीयेत त्यामुळे तुमचा मेंदू इतका ठण ठण का करतोय ते बघून घ्या! तुमच्याच पद्धतीचा छानपैकी प्रतिसाद दिला असता पण असल्या माणसावर वेळ कशाला वाया घालवा! विचारांची पातळी वाढवा जरा जमलं तर! (संपादित)
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 07/12/2018 - 08:26 नवीन
माझ्या इथल्या संपादित प्रतिसादामध्ये गापै यांचेच वाक्य मी "कोट" करून टाकले होते ते संपादकांकडून उडवण्यात आले आहे. ते वाक्य म्हणजे मला दिलेली धमकी आहे का हे ही विचारले होते. मी असंसदीय काहीही बोललेलो नव्हतो. या (संपादनामुळे)कोणाला गैरसमज नसावेत यासाठी हा प्रतिसादप्रपंच! संपादकांनीही खरंतर संपादन करताना, त्याच धाग्यावर प्रतिसाद्कर्त्याला तेथेच समज दिली गेली तर वाचणाऱ्याचा "माहितगारांचा" उडाला तसा गोंधळ उडणार नाही.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 07/11/2018 - 20:56 नवीन
जबरी प्रतिसाद !
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Wed, 07/11/2018 - 17:09 नवीन
गा.मा. जी हा मात्र तुम्ही मोठा बॉम्ब टाकलाय , अगोदरच मुलींची संख्या कमी असतांना " आंबा खाऊन मुलगा होण्याचा गर्भलिंग निदानाशी काडीमात्र संबंध नाही. आणि स्त्रीभ्रूणहत्येशी तर नाहीच नाही " अस बोलून तुम्ही मुलगाच हवा या जनतेच्या विचारांना पाठिंबा देताय . अहो जस व्हिडिओ मध्ये ऐकू आल्या प्रमाणे परमपूज्य भिडे गुरूजींच्या आणि तुमच्या प्रतिसादा प्रमाणे आंबा खाऊन मूलगेच होत असतील तर का करायचे गर्भलिंग निदान ? फक्त त्या ' अबकड ' व्यक्तीच्या बागेतील आंबे खायचे . खरं म्हणजे गुरूजींनी " सध्या मुलगा होण्यासाठी काही माणसं त्यांच्या बागेतील आंबा खाण्याचा सल्ला देतात , त्या मुळे मुलींची संख्या अजून कमी होऊन भारतातील जनसंख्ये चा समतोल बिघडून जाईल म्हणून सरकार ने त्या 'अबकड ' व्यक्तीवर कारवाई करावी " अस जर म्हणाले असते तर त्यांची उंची जनमानसांत अजून वाढली असती .
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 07/12/2018 - 05:05 नवीन
आंबा विषयक गैरसमजुती आणि लिंगपरीक्षण ह्यांचा इथे काडीचाही संबंध नाही. उलट आईवडिलांना जर मुलगाच हवा असेल तर आंबा खाण्यात बेकायदेशीर नाही. बंदी फक्त सोनोग्राफी वर आहे. इतर सर्व मार्ग वापरण्याचा पूर्ण अधिकार लोकांना आहे. मुलगा पाहिजे किंवा मुलगी हा जोडप्यांचा खाजगी प्रश्न असून गामा काय किंवा मी काय कुणालाही ह्यांत नाक खुपसण्याचा अधिकार नाही. कायदा फक्त सोनोग्राफीला लागू होतो. प्रार्थना, भावना, इच्छा, आंबा इत्यादींना नाही. उद्या मुलगा पाहिजे म्हणून एखाद्या जोडप्याने देवळांत जाऊन प्रार्थना करायला भटजीला सांगितले तर भटजी ला जेल मध्ये टाकायचे काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/11/2018 - 17:29 नवीन
हां तर कसं आहे की .... कितीही चर्चा झाली , काथ्याकुट झाल तरीही काहीही उपेग नाही. भिडे गुरुजी त्यांच्या मुद्द्यांवर ठाम आहेत , भिडेंचे विरोधक त्यांच्या विरोधावर ठाम आहेत ! एकदम स्पष्ट डायकोटॉमी आहे ही. इर्रीकन्साईलेबल !! तस्मात आता कोर्टाला काय निर्णय घ्यायचाय ते कोर्ट घेईल , तोवर आपण वाट पहाणेच इष्ट ! जर ह्या देशात " छिनके लेंगे आजदी" "भारत तेरे टुकडे होंगे इन्शाल्लाह इन्शाल्लाह " सारर्ख्या विधानांवर कारवाई होत असेल तर " आंबा खाऊन पोरं होतात" "धर्मकर्तव्य सांगण्यात मनू ज्ञानोबा तुकोबांच्या एक पाऊल पुढे आहे " ह्या विधानांवरही सुयोग्य कारवाई होईल च की नै !! ख्यॅ ख्यॅ ख्यॅ इत्यलम =))))
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 07/11/2018 - 21:00 नवीन
फक्त आंबा खाऊन अपत्य प्राप्ती होते का इतर नेहमीची धडपड सुद्धा करणे आवश्यक आहे ? मी हल्ली आंबे खात असल्याने त्यातील एखादा आंबा ह्या बागेतला असला तर उगाच पंचायत व्हायची. तेंडुलकरला त्याच्या संस्कृत च्या ज्ञानाविषयी विचारायचे, संस्कृत पंडिताला क्रिकेट बद्दल विचारायचे, शिवाजी महाराजांच्या केमिस्ट्री ज्ञानावर प्रबंध लिहायचा, तुकोबांच्या भूगोलाच्या ज्ञानावर किस पाडायचा असलेच खटाटोप घेऊन आपली मीडिया बसते आहे. भिडे गुरुजी आणि त्यांचे प्रजनन विषयक सल्ले ह्याला जास्त महत्व द्यायचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/11/2018 - 21:46 नवीन
सोमनाथ खांदवे,
अहो जस व्हिडिओ मध्ये ऐकू आल्या प्रमाणे परमपूज्य भिडे गुरूजींच्या आणि तुमच्या प्रतिसादा प्रमाणे आंबा खाऊन मूलगेच होत असतील तर का करायचे गर्भलिंग निदान ? फक्त त्या ' अबकड ' व्यक्तीच्या बागेतील आंबे खायचे .
तेच तर मी म्हणतोय. आंब्याचा गर्भलिंगनिदानाशी कसलाही संबंध नाही. हां पण जर लोकांच्या मनोवृत्तीशी जोडायचा असेल तर हरकत नाही. अर्थात, आंबा वगैरे लोकांची समजूत आहे. तो पूज्य भिड्यांचा दोष नव्हे. भिड्यांनी नेहमी शहरी मध्यमवर्गीय लोकांना रुचेल पटेल अशीच विधानं का म्हणून करायची! पूज्य भिड्यांनी चंद्र बघा म्हणून खाली तलावाकडे बोट दाखवलं. खाली तळ्यात चंद्राचं प्रतिबिंब आहे. एकतर ते बघा किंवा वर विरुद्ध दिशेने आकाशात प्रत्यक्ष चंद्र बघा. यापैकी काहीही न करता जर चंद्रदर्शनार्थ कोणी खाली जमीन उकरीत बसेल, तर ते चंद्रदर्शन नव्हे. ती लबाडी आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/11/2018 - 22:21 नवीन
शब्दबम्बाळ, १.
गापै, आपण आपल्या पातळीवर आलात हे बरे झाले!
माझी आणि पातळी? काहीही हं शब्दबम्बाळ! मला कसलीही पातळी नाही हे मोठ्या नम्रपणे नमूद करू इच्छितो. २.
एक तर भिडेंना संपूर्ण प्रतिसादात मी काहीही अपशब्द वापरले नाहीयेत त्यामुळे तुमचा मेंदू इतका ठण ठण का करतोय ते बघून घ्या!
भिड्यांवर बेछूट आरोप करतांना लाज नाही वाटली तुम्हांस? आंब्याविषयी बोललं ती लोकांची समजूत आहे. शिवाय काय, की भिड्यांनी २०० कंपन्या खोलल्या पाहिजेत म्हणे. तुम्ही का नाही खोलंत? ३.
तुमच्याच पद्धतीचा छानपैकी प्रतिसाद दिला असता पण असल्या माणसावर वेळ कशाला वाया घालवा!
द्या की मग. कोणी अडवलंय! ४.
विचारांची पातळी वाढवा जरा जमलं तर!
आजिबात वाढवणार नाही. पूज्य भिड्यांचं मनुसंबंधी वक्तव्य चर्चेस घ्यायचं सोडून मनुस्मृतीवर घसरायची काय गरज होती? मनुस्मृतीच्या नावाने खडे फोडणाऱ्यांचा प्रतिवाद केलाच पाहिजे. आयुष्यभर ज्याला धंद्यातला ध माहित नव्हता त्या म्हाताऱ्याने वयाच्या ऐशीव्या वर्षी म्हणे २०० कंपन्या उघडायला मदत करायची. फार सुंदर प्रस्ताव आहे. नेमक्या याच कारणासाठी मला तुमच्या पातळीस यायची कणभरही इच्छा नाही. तुमची पातळी तुम्हांस लखलाभ होवो. उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा. आ.न., -गा.पै
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 07/12/2018 - 07:26 नवीन
प्रतिसाद फाट्यावर मारण्यात येत आहे. आपल्या प्रिय मनुस्मृतीबद्दल जी काय घालायची असेल ती भर "स्त्री : रुढी परंपरा ..मनुस्मृती आणि आपली भूमिका !" आणि "मनुस्मृति भाग (३)" इथे घाला! आणि डोळ्यांनी नीट वाचता येत असेल तर मनुस्मृतीचा विषय दासबोध नि काढला आणि त्यांचं वाक्य कोट करून मी प्रतिसाद दिला हे आपल्याला दिसेल कदाचित...
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/12/2018 - 05:54 नवीन
* आधी दोघेही परंपरावादी आणि कथित पुरोगामी
"जन्माधारीत विषमता नाकारण्याची अपेक्षा करतो" आणि "जन्माधारीत विषमता नाकारतो" या दोन विधानांमध्ये संपण्याची चर्चा व्यक्तिगत होऊन कुठल्याकुठे येऊन पोहोचली आहे ?
* परंपरावादी सावरकरांनी विज्ञानवाद स्विकारुन शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारण्यास शतकपुर्ती समारोह अजून किती वर्षांवर आहे हे मोजण्याची वेळ असताना, "जन्माधारीत विषमता नाकारतो" हे तीन शब्द बोलण्या लिहीण्यासाठी जीभ अथवा बोटे अडखळण्याचे खरे म्हणजे कारण नसावे. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारण्याची गरज सावरकरांना सुमारे शंभर वर्षांपुर्वी उमजली, या मागे काही विचार असेल की नाही तो विचार समजून घेण्याचा परंपरावादी काही प्रयत्न करतात की नाही. शब्द आणि ग्रंथ प्रामाण्य नाकारल्याने आणि आधुनिकीकरणाने हिंदू धर्म आणि संस्कृतीवर कोणतेही आभाळ कोसळण्याची शक्यता नाही. दुसर्‍या बाजूला तुमच्या मनाला सदोदीत छ्ळणारे स्पर्धक धर्म संस्कृती ग्रंथ प्रामाण्यावर आधारीत आहेत आणि ग्रंथप्रामाण्य नाकारल्या शिवाय त्याबाजूची कोंडी सुटण्याची शक्यता नाही. ग्रंथ प्रामाण्य आणि जन्माधारीत विषमता सुस्पष्टपणे नाकारत रहाण्यात नुकसानी पेक्षा फायदा सावरकरांना अधिक दिसला असावा तो इतर परंपरावाद्यांना का दिसत नसेल ? * आता कथित पुरोगामी वरच्या शब्दबंबाळ यांच्य प्रतिसादात काही रिकाम्या जागा भरतो .
याचा काही पुरावा कि उचलली जीभ? अबकड ग्रंथांवर भरपूर चर्चा झाली आहे ....आणि काही इतके घाणेरडे आणि फालतू नियम आहेत त्यात कि बनवणाऱ्याच्या मानसिकतेची लाज वाटावी! मग यावरसुद्धा ............ चांगलीच होती कालसुसंगत होती पण नंतर तिला वाईट बनवले गेले हे असले गोलमोल प्रचार करायचे!
जन्माधारीत विषमता नाकारण्यासाठी एक ग्रंथ प्रामाण्य नाकारण्याचे शब्दबंबाळ यांचे स्वागत पण अशा सुस्पष्ट पद्धतीने इतर धर्मीय ग्रंथांचे ग्रंथप्रामाण्य नाकारण्यास ते तयार आहेत का ? की त्या बाबत काही अडचण आहे ? प्रतिसादाची प्रतिक्षा असेल.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 07/12/2018 - 07:18 नवीन
ते "कथित पुरोगामी" वगैरे विशेषण लावायची काही आवश्यकता होती का? का हल्ली विशेषणे लावल्याशिवाय चर्चा होत नाहीत? त्या गपै आयडीने आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक प्रतिसाद देऊनसुद्धा त्याचा साधा निषेध होत नाही इथे! असो... तर तुम्हाला ज्या गाळलेल्या जागा हव्या होत्या त्या आधी एक धाग्यात भरलेल्या आहेत. "मनुस्मृति भाग २" हा तो धागा! आणि खाली त्यातला मी श्रीगुरुजींनी दिलेला प्रतिसाद इथे देत आहे.
सहमत! याचसाठी हिंदू धर्म हा अभिनंदनास पात्र ठरतो कारण नको असलेल्या गोष्टी टाकून देण्याची सुरु झालेली चळवळ हि अजूनही चालू आहे. बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या जात आहेत काही ठिकाणी अजूनही संघर्ष आहे पण समाज सुधारणावादी झालेला आहे. तुम्ही बहुदा कुराण बद्दल बोलत आहात, पण मग संदिग्ध का बोलायचं? त्यातही जे चुकीचं आहे ते लोकांनी सोडून दिलेच पाहिजे. पण त्यासाठी लोकशिक्षण आणि चळवळीची गरज लागेल ते कोणी करायचं हा मोठा प्रश्न झालेला आहे!
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/12/2018 - 07:47 नवीन
...विशेषण लावायची काही आवश्यकता होती का?
आपण पूर्ण निरपेक्षता पाळत असल्यामुळे कथित हे विशेषण तुर्तास आपल्या पुरते मागे घेऊ इच्छितो . ( तसा कथितच्या मागे 'तथा' हा उपसर्ग टाळलेला होता :) -बघा माहितगार जरा जरा काळजी घेतात :) ) आपल्या प्रमाणे इतर पुरोगामी पूर्ण निरपेक्ष होणार नाहीत तो पर्यंत त्यांच्यासाठी मात्र ' कथित' , 'तथाकथित' चा उपयोग प्रसंग परत्वे चालू राहील. या निमीत्ताने माझ्या इतर बर्‍याच पुरोगामी घाग्यात आपला सहभाग असावा असे सांगावेसे वाटते.
...त्याचा साधा निषेध होत नाही इथे!
माझ्या वरच्या प्रतिसादात चर्चा व्यक्तिगत होत चालली असल्याकडे निर्देश केला आहे, अर्थात मी दोहोंनाही एकाच पारड्यात तोलले ( संपादकांनी सुद्धा दोघांचेही प्रतिसाद संपादीत केल्याचे दिसेल) आपल्याही 'मनुस्मृती विषयक' प्रतिसादात "जन्माधारीत विषमता नाकारण्याची अपेक्षा करतो" या पाच शब्दा पलिकडे जाऊन आवश्यकते पेक्षा अधिक सरसकटीकरण नाहीना याची आपणच पुनश्च खात्री करावी. ज्याचे माप त्याच्या पदरी नक्की घालावे प्राचीन ग्रंथात कालपरत्वे प्रक्षिप्तता येत गेल्या असण्याच्या शक्यता आपण डोळे झाकून नाकारत नाही ना ? स्गळच वाईट किंवा सगळेच चांगले हा ब्लॅक अँड व्हाईट वाला अट्टाहास एक वेळ परंपरवाद्यांनी करणे ठिक पुरोगाम्यांनी टाळणे श्रेयस्कर असे माझे मत आहे. असो.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 07/12/2018 - 08:28 नवीन
आपला गैरसमज झाला आहे. ( संपादकांनी सुद्धा दोघांचेही प्रतिसाद संपादीत केल्याचे दिसेल) मी इथे उत्तर दिल आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा