Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चुलत,आत्ये,मामे,मावस भाऊ विवाह आणि वैद्यकीय, जनुकीय आणि सामाजिक प्रश्न

म
माहितगार
Wed, 06/20/2018 - 05:14
🗣 208 प्रतिसाद
* मराठीतील म्हणी वाच्यार्थाने नव्हे लक्ष्यार्थाने घ्यायच्या असतात . म्हणी या मराठी भाषेची भाषिक संपत्ती आहेत . त्याचे अर्थ समजले नाही तर चुकीचे निष्कर्ष काढण्यापुर्वी संबंधीत लेखक भाषातज्ञांकडून नीट समजावून घ्यावे धागा चर्चेत शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातल्या उणीवा झाकू इच्छित आमच्याही घरात उणिवा आहेतच की म्हणण्यसाठी आले आहेत आणि त्यांचे म्हणणे बरोबरच आहे हे आम्ही मोठ्या मनाने स्विकारतो पण तरीही आम्हाला त्यांच्या व्याह्यांच्या तबेल्यातील उणीवा दिसतातच त्यास आमचा नाईलाज आहे. ते असो धागा चर्चेत आमचे पुरोगामी आणि नास्तिक मित्र आलेच आहेत तर त्यांच्या साठी आम्ही काही अधिक चर्चांचे आयोजन केले आहे तेथेही त्यांना सादर निमंत्रण आहे. * कितीसा पुरोगामी आहेस ? * Where the mind is without fear कवितेचा अनुवाद हवा आहे. * मुस्लीमांमधली पडदा पद्धती योग्य आहे काय ? (खर म्हणजे तो धागा एकालच टार्गेट करून लिहिलेला नाही पण एकाला टार्गेट नाही केले तर समाज सुधारणांची चर्चा पुरोगामी नास्तिक पुढे नेत नाहीत कारण ते एकतर्फी अंधश्रद्धात गुरफटलेले असतात असा आमचा दावा आहे, म्हणून पुरोगामी आणि नास्तिकांसाठी त्या लेखाचे शीर्षक तात्पुरते बदलत आहे. * पुरोगामी आणि नास्तीकांची वैचारीक भूक शमवण्यासाठी 'मुस्लीम सत्यशोधक समाज' असा एक धागा चर्चा काढणार आहे पुरोगामी आणि नास्तिकांनी धाग्यावर वैचारीक भूक शमवण्याची पूर्वतयारी करून ठेवण्याचे आवाहन आहे. * ज्यांची पुरोगामी वैचारीक भूक कमी आहे त्यांच्या साठी सुद्धा चर्चा धागे आहेत ** संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ** 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ** कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ? ** आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान ** १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश *** इतर धागा निमंत्रण जाहीरात समाप्त *** *** या धागा लेखाचे आधीचे शीर्षक : चुलत विवाह आणि वैद्यकीय व जनुकीय प्रश्न *** या धागा चर्चेतून आता पर्यंत पुढे आलेली माहिती * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहातून होणार्‍या संतती जन्मतः व्याधीग्रस्त होण्याचा बर्‍यापैकी संभव असतो. * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह खरेच प्रेम विवाह असतील आणि संतती व्याधीग्रस्त न होण्याची काळजी घेतली असेल तर - खरे म्हणजे अशी काळजी घेण्याची वैज्ञानिक सुविधा या चर्चेतून तरी पुढे आलेली नाही म्हणजे विज्ञान अद्याप तेवढे पुढे गेलेले नाही - तर हरकत नाही. ** एक पुरोगामी १०-२० वर्षांनतर येणार्‍या कृत्रिम जनुकीय बदलाच्या तंत्रज्ञानाचे गाजर घेऊन आले आहेत पण त्या बद्दलच्या दाखवलेल्या साशंकतांबद्दल अद्याप तरी तथ्य वाटते. मुख्य म्हणजे तंत्रज्ञान सिद्ध होऊन सर्वसामान्यांच्या हातात येत नाही तो पर्यंत टाळ्या वाजवायच्या का काय ते समजत नाही. * या धाग्यात व्यक्त झालेली काही तथाकथित नास्तिक पुरोगामी मते ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाह कर्त्यां नी आधी भ्रूण तयार होऊ द्यावे मग पोटत असताना व्याधीग्रस्त असल्याचे लक्षात आल्यास गर्भपात करून घ्यावेत असे काहीसे आहे. * ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे एक अजब समर्थन कंपल्शन तर नाही ऑप्शनल तर आहे असे आहे . त्यांना अशा वैवाहीक संतती व्याधीग्रस्त असण्याची शक्यता मोठी असल्याचेही मान्य आहे पण तरीही मागच्या दाराने घरातील वडीलधार्‍यांकडून अंढश्रद्धेतून घडवल्या जाणार्‍या ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहांच्या अनीष्ठ प्रथेचे समर्थनही करायचे . या दोन परस्पर विरोधी भूमिकेत समन्वय कसा साधला जातो ते धागा लेखकास अद्याप उमजलेले नाही. * भारतातील सर्व समाजात ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन आहे , प्रदेश आणि सधर्म, जात धर्मवार कमी जास्त आहे, पण अ‍ॅव्हरेज मुस्लीम समाजात ८% ते दुप्पट ने अधिक असावे असे संदर्भ दिसत आहेत. या बद्दल अधिक ताजी आक्डेवारी संदर्भासहीत आली तर हरकत नाही. * पुरोगामी / नास्तिकांच्या मते मुस्लीमांमधील ( चुलत,आत्ये,मामे,मावस) भाऊ-बहीण विवाहाचे प्रचलन हिंदूंमधील विवाहांप्रमाणेच सर्वसाधारण रूढी आहे,मुस्लीम धर्मातील घ्रंथ प्रामाण्या ने येणार्‍या अंधश्रध्दांचा संबंध नाही असे अंधश्रद्धा विरोधकांना वाटते . आता मुस्लिम समाजातील स्वधर्मीय अंधश्रद्धा निर्मुलक आणि समाज सुधारक येऊन गैरसमज दूरकरत नाहीत तो पर्यंत अंधश्रद्धा विरोधकांना त्यांच्या सोयीच्या अंधश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहेच. खरे म्हणजे अल्प प्रमाणात मामे-आते भाऊ बहीण विवाह या पलिकडे एकपरीवारीय विवाहांचे हिंदूमध्ये प्रमाण कमी असते , पण शांततामयी मुस्लीम धर्मीयात चुलत भावंडांच्या विवाहाचे प्रमाण बरेच असल्याचे ऐकुन आहे. शांततामयी विज्ञान संपन्न (?) ग्रंथातून त्याचे समर्थन होते पारिवारीक संपत्तीचे विभाजन टाळणे हा मुख्य आर्थीक हेतु असल्याचे ऐकुन आहे (चुभूदेघे). तसे चुलत भावा बहिणींना एकमेकांचे वैवाहीक (शारिरीक) आकर्षण कसे वाटू शकते हा भाबड्या मनाला प्रश्न पडतोच, कदाचित पडदा पद्धतीमुळे परिवार बाह्य स्त्रीचे दर्शन कमी होते आणि मग परिवारातल्या चुलत बहीण भावंडांशी जमवून घेण्या पलिकडे मार्ग उरत नाही असे काही होते का माहित नाही. अशा वेळी मानसिक ओढाताण काय होत असेल त्याचा मानसशास्त्रीय अभ्यास फारसा वाचनात आलेला नाही. चुलत भावाबहिणीशी वैवाहीक जोडीदार म्हणून जुळवून घेण्यातील मानसशास्त्रीय ओढाताण बाजूला ठेवली तरी, अपेक्षित संततीवर जनुकीय वैविध्यावर मर्यादा पडल्यामुळे नेमक्या कोणत्या वैद्यकीय समस्या येतात , कोणत्या चाचण्या केल्या जाताता, या कारणाने संतती जन्मतः शारिरीक-मानसिक अपंग होऊ नये असे काही वैज्ञानीक शोध लागले आहेत का ? हे मिपावरील डोक्टर मंडळी आणि जनुकशास्त्र जाणत्यांकडुन जाणून घ्यायचे आहे. धागा लेखाचा ह मुख्य चर्चा विषय आहे (आणि दर पिढी काही टक्के संततीवर असे शतको न शतके समस्या पुढे गेलेल्या असतील तर या कुटूंबांची आनि समुदायाची मानसशास्त्रीय स्थिती नेमकी कशी असते हा पुन्हा अजून एक वेगळा विषय) मी या विषयाचा जाणता नाही केवळ जिज्ञासू म्हणून चर्चा धागा काढला आहे. माझ्या मांडणीत काही तांत्रिक उणीवा असतील तर चुभूदेघे. बेसिकली अत्यल्प प्रमाणात का होईना बाह्य धर्मीय शांततेचा धर्म स्विकारताना दिसतातर, त्या समुदायाची संस्कृती स्विकारताना पुढच्या पिढ्यांना पारिवारीक विवाह संस्कृती नकळत लादणे कितपत योग्य असू शकते याची माहिती आमच्या सारख्या अनभिज्ञांना होऊ शकेल तर बरे हा धाग्याचा एक उद्देश्य. दुसरे असे की दुसर्‍या ताज्या घडामोडी धाग्यावर वैद्यकीय अभ्यासक डॉ. मंगऊ त्यांच्या राजकीय आणि धार्मीक संस्थांकडून गरीबांना कशी आर्थीक मदत केली जाते याचे कौतुक चालू होते . तर या धाग्यात चर्चीलेल्या कारणाने येणार्‍या जनुकीय आणि वैद्यकीय समस्यांच्या संदर्भाने कोणती आर्थीक मदतीची साखळी , जनुकीय चाचण्यांची उपलब्धता इत्यादी त्यांच्या राजकिय आणि धार्मीक संस्थांनी उभी केली आहे याची माहिती सुद्धा डॉ. मंगऊ यांना शेअर करण्याची संधी मिळावी असा धाग्याचा उप उद्देश्य आहे. *** When Cousins Marry (Family Documentary) - Real Stories *** *** या धागा चर्चे नंतर याच विषयावर स्वतंत्र धाग्यात झालेली चर्चा *** * आत्ते-मामे भावंडे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 318269 views

🗣 चर्चा (208)
M
manguu@mail.com Sat, 06/23/2018 - 17:15 नवीन
http://genomesunzipped.org/2011/04/inbreeding-genetic-disease-and-the-royal-wedding.php रॉय्ल फॅमिली आणि हिमोफिलिया ..
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 06/23/2018 - 17:22 नवीन
The royal families of Europe were inbred in the late 19th and early 20th centuries, to the extent that they were passing on genetic diseases. Since then, many royals have chosen to marry both outside of royalty, and outside of Europe. Monaco had a princess from America, and now has a South African. Britain has many “commoners” marrying in (the Queen Mother, Diana, Fergie, Kate, Sophie), and is about to have an American. The Dutch Queen is Argentinian. The Crown Princess of Denmark is Australian. The gene pool has now been significantly widened. If, for instance, one of the younger princesses of the Netherlands chose to marry Viscount Severn, any degree of relationship between them would be fairly slight. https://www.quora.com/How-inbred-are-todays-royal-families
  • Log in or register to post comments
C
charming atheist Sat, 06/23/2018 - 19:14 नवीन
बाकी जेव्हा जातव्यवस्था तयार केली गेली तेव्हा आकाराने छोटे जातसमुह या population bottleneck परीणामाला बळी पडले. याचाही संदर्भ कुठे मिळाला तर बरं होईल. >>>>> bottleneck effect समजला असता तर हा प्रश्न पडला नसता. १००० विविध गुणधर्माचे लोक ज्यांच्यामध्ये रंग ,रुप ,उंची ,आरोग्य याचं वैविध्य आहे अश्यांपैकी फक्त शंभर जण सिलेक्ट केले तर काही एक्स्क्लुझिव्ह ट्रेट्स त्या शंभरांमध्ये येतील,चांगले वा वाईट,त्यांचे पुढे सिलेक्टीव्ह ब्रिडींग केले तर कालांतराने तेच ते गुण ,अवगुण दिसत राहतील कारण मुळच्या १००० जणांमध्ये जे जनुकीय वैविध्य /genetic variation होते ते या १०० जणांच्या सिलेक्शनमुळे कमी झाले. बहुतांश म्युटेशन्स ही न्युट्रल असतात. बाकीची बर्याचदा हानिकारकच असतात .रिसेसिव्ह डिसऑर्डर्स या डॉमिनंट डिसऑर्डर्सपेक्षा संख्येने अधिक असल्याने समुहाची संख्या कमी असेल तर अशी म्युटेशन साठत राहतात व तो समुह अधिक रोगट बनत जातो. bad mutation पेक्षा beneficial mutations चा रेट जास्त असता तर जातव्यवस्थेचा फायदा झाला असता पण मामला नेमका उलटा आहे. हिंदू जातव्यवस्था हे सिलेक्टीव्ह ब्रिडींगच आहे.जे अज्ञान व द्वेषातून केलेले segregation आहे.याचा हिंदूंना फायदा शून्य व तोटा अधिक झाला आहे.पण जातव्यवस्थेच्या आधी जो हिंदू समाज होता त्याची गुणवैशिष्टे आज अनेक जातीत विखुरली आहेत,ती परत दिसावीत व समाज एकजिनसी व्हावा यासाठी हिंदूंनी आंतरजातीय विवाहांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. (हा प्रतिसाद चर्चा वाचणार्या सामान्य वाचकांना समजावे म्हणून लिहले आहे,अतिहुच्च सर्वज्ञानी हुशार लोकांसाठी नाही आहे याची संबंधितांनी नोंद घेणेचे करावे!)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/25/2018 - 06:07 नवीन
बहुतांश म्युटेशन्स ही न्युट्रल असतात. बाकीची बर्याचदा हानिकारकच असतात या आपल्या विधानाला काय शास्त्राधार आहे?

mutations are "random".

bad mutation पेक्षा beneficial mutations चा रेट जास्त असता तर जातव्यवस्थेचा फायदा झाला असता पण मामला नेमका उलटा आहे. जातीव्यवस्थेत फक्त वाईट उत्परिवर्तनाचा गुणाकार होतो

या आपल्या गृहीतका ला आपल्या कडे कोणताही आधार नाही.

उदाहरणार्थ जर उंचीची जीन्स (अप्रभावी) रिसेस्सीव्ह असली तर दोन्ही माता पित्याची गुणसूत्रे एकत्र होऊन होणारे अपत्य जास्त उंचीचे असेल. आपले मूळ गृहीतक हे आहे कि चांगली गणसुत्रे प्रभावी(dominant) असतात आणि वाईट गुणसूत्रे (अप्रभावी) रिसेस्सीव्ह असतात. असे काहीही नसते. हे तुमचे सोयीस्कर गृहीतक आहे. आणि आपले म्हणणे समर्थन करण्यासाठी आपण कोणत्याही टोकाला( माझ्या पदवी आणि व्यवसायाची पातळी विचारण्यापर्यंत) जात आहात. आणि सगळेच जनुकीय आजार केवळ तोट्याचेच आहेत हेही आपले गृहीतक चुकीचे आहे. उदा सिकल सेल ऍनिमिया हा मलेरिया विरुद्ध संरक्षण करतो. Protective Effect of Sickle Cell Trait Against Malaria-Associated Mortality And Morbidity https://www.cdc.gov/malaria/about/biology/sickle_cell.html मूळ गृहितकच(पाया) चूक असल्याने कळस अर्थातच चुकणार.
  • Log in or register to post comments
C
charming atheist Mon, 06/25/2018 - 09:01 नवीन
नीट वाचत चला डॉक्टर.चांगले गुण कोणते यावर चर्चा चालू नाही ,वाईट गुणधर्म जे जनुकीय आहेत त्यावर धागा आहे.आणि bad mutations चा रेट beneficial mutations पेक्षा जास्त आहे हे माहित असूनही जातव्यवस्थेचे समर्थन करत असाल तर मग अवघड आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/25/2018 - 09:30 नवीन
जातिव्यवस्थेचे समर्थन कुठे आणि केंव्हा केले हे दाखवता येईल का? याच धाग्यावरच अगोदर मी खाप पंचायती वर दिलेला प्रतिसाद आपण वाचलेला दिसत नाही. मी परत एकच सांगतो आहे कि mutations are RANDOM bad mutations चा रेट beneficial mutations पेक्षा जास्त आहे या आपल्या विधानाचा

एक तरी स्पष्ट पुरावा

आपल्याला देता येईल का? हे गृहीतक मुळातच चूक आहे कारण अन्यथा सर्व प्राणिमात्र नष्ट झाले असते हा साधा नियम आहे. उलट जी उत्परिवर्तने वाईट होती त्यातील बहुसंख्य काळाच्या ओघात नष्ट झाली आणि जितकी चांगली होती ती बहुसंख्य टिकून राहिली.म्हणूनच प्राणिमात्र उत्क्रांत होत होत विकसित होत गेले. यालाच जीवशास्त्राचा मूलभूत नियम SURVIVAL OF THE FITTEST म्हणतात. केवळ आपली चुकीची मते रेटण्यासाठी आपण काहींच्या काही गोष्टी लिहीत आहात आणि त्याच्या समर्थनासाठी नुसती आपलीच मते पुढे करीत आहात. आपण लिहिलॆल्या एका तरी गोष्टीचा स्पष्ट पुरावा आपल्याला देता आला आहे का? मी माझ्या गोष्टीचे खंडन करताना स्पष्ट पुरावे दिलेले आहेत.त्याचा आपल्याला प्रतिवाद करता येत नाही म्हणून असे वितंडवाद घालत आहात एवढेच म्हणेन.याला काही जण स्वमतांध दांभिकता असे म्हणतात. असो या पुढे आपल्याशी वितंडवाद घालण्यात मला कोणताही रस नाही. आपल्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
C
charming atheist Tue, 06/26/2018 - 07:55 नवीन
http://discovermagazine.com/2013/julyaug/07-most-mutations-in-the-human-genome-are-recent-and-probably-harmful
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 06/23/2018 - 23:01 नवीन
डोळे पाणावले. जय मिपा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा