Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एकाच माळेचे मणी

ज
जेडी
Mon, 05/14/2018 - 06:58
💬 69 प्रतिसाद
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते. पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले. बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या. पुलंच्या बटाट्यांच्या चाळीतल्या उपवासाचा आणि समाजाच्या भूखेचा संबध जोडला. अरेरे! पुलंचा विनोद त्यांना कळला नसेल असे मी समजून घेतले. पुढे बाई “हिरवेहिरवे गार गालिच्यावर घसरल्या ”, बालकवींची लायकी काढली, ही कविता शालेय अभ्यासक्रमात असू नये असे त्यांचे म्हणणे ; कारण मराठवाड्यात दुष्काळ आहे तर कोठून येणार हिरवे हिरवे गार गालिचे? अरे बाई मराठवाड्यातल्या लोकांना कमीत कमी कवितेत तरी गार गालिचे बघू देत कि असे मला म्हणावे वाटले. पुढे हे सर्व नको तर काय शिकवायला हवे ? नारायण सुर्वेंची, “भाकारीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली”, ही कविता शिकवायला हवी असे त्या म्हणाल्या . पण ती तर आधीच अभ्यासक्रमात आहे हे बहुधा त्या विसरल्यात. पुढे १०+२ +३ वर आल्या.. नंतर बाई इतिहास, साहित्यावरून गणितावर आल्या... कशाला हवे म्हणे कॉस थीटा मायनस साईन थीटा... आता मात्र माझे टाळके सटकले , बाईंना काय माहित कॉस थीटा मायनस साईन थीटा कशाला वापरतात... बाईना काय माहित कोणता इंजिनिअर हे सर्व वापरतो, बाईना काय माहित मंगळावर यान कसे पोहचले, किती गणिते करावी लागली? अजून बाईना काय माहित कि मोठ्या मोठ्या मशीन्स कशा बनतात , त्यात ह्या कॉस साईन Tan चा काय उपयोग, कसा माहित असेल? बाई कायद्याच्या पदवीधर होत्या, एखादी सायन्स रिलेटेड केस बाई कशा काय सोडवणार, ते जावूदे पण ज्या समाजाला त्या उद्देशून बोलत होत्या त्या समाजाने फक्त कामगार म्हणूनच जगावे आणि भाकरी मिळवावी अशी त्यांची भाषा होती, इंजिनिअर वैगेरे असली स्वप्ने पहा, किंवा साहित्यातले दर्दी व्हा असे सांगत नव्हत्या. असो, सांगण्याचा मुद्दा हा कि प्रत्यकाने अभ्यासून प्रकट व्हायला पाहिजे, जोरजोरात चुकीचे सांगू नये. समाज चुकीच्या दिशेला भरकटू शकतो. त्या रामतीर्थकर बाई काय किंवा ह्या बाई काय किंवा ते फक्त ईश्वर भक्तीत विलीन व्हा असे सांगणारे बुवा काय किंवा हाच एक पंथ बरोबर असे सांगणारे काय, किंवा आता श्रमदानावर टीका करणारे काय किंवा मोदी भक्त काय...सारेच एका माळेचे मणी. आपल्याला एवढे लोक फोलो करतात तर किमान त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नये इतकाही विवेक लोक ठेवत नाहीत. “अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27620 views

💬 प्रतिसाद (69)
च
चांदणे संदीप Mon, 05/14/2018 - 10:56 नवीन
एक्झॅटली पर्फेक्ट!! Sandy
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 05/14/2018 - 12:35 नवीन
सारेच एका माळेचे मणी म्हटल्यावर विषयच संपतो. तेवढी तुम्ही पाहिलेल्या विडियो ची लिंक दिली असती तर आमचे ही ज्ञानार्जन झाले असते.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Mon, 05/14/2018 - 18:49 नवीन
बाईंचे भाषण
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/16/2018 - 17:48 नवीन
विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही द्या ना ! ओफिसात काम नसेल तेव्हा पाहीन म्हणतो , इथे युट्युब लिन्क ओपन होत नाही आणि घरी जाऊन स्वतःचा अमुल्य वेळ असल्या गोष्टींवर कशाला वाया घाल्वा ! असो. सर्वसाधारण आशय लक्षात आलाय लेखनाचा ! हां तर असले काही वाचले की भारी वाटते . आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे समाजाचे क्लस्टरींग झाले आहे ! आणि लोकं काय बोलतात ह्याव्रुन साधारण ते कोणत्या समाजचे , कोणत्या विचार्धारेचे असतील ह्याचा अंदाज यायला लागलाय ! बाईंनी ज्या ज्या लोकांची लाय्की काढली त्यावरुन बाई कोणत्या समाजाचा आहेत हयचा सर्वसाधार्ण आंदाज येत आहे ! हे लोकं स्वतःच्याच समाजाच्या लोकांची दिशाभुल करत आहेत , " इतर" समजाचाचा फायदाच होत आहे , तस्मात ही इष्टापत्तीच आहे इतर समाजच्या लोकांसाठी =)))) युटुबवर " अमुकतमुक समाजाची वाघीन - पहा भिडे गुरुजीला कसे ठणकावले असले किंव्वा अमुकतमुक समाजाच्या वाघ: निखिल वागळेंना विचारला जाब " असले व्हिडीओ पाहिले आहेत , २२-२४ वर्षाची पोरं पोरी . ना धड इतिहासाचा अभ्यास ना ना तत्त्वज्ञान , ना समाज्शास्त्र , ना साहित्य संगीत कला . युट्युब फेसबुक सारखा फोरम मिळाला म्हणुन काय वाट्तेल ते बरळायचं , अन लोकंही त्याला पहाताहेत लाख लाख व्हुव्ह्ज ! पोरं पोरी लगेच हवेत ! सगळाच आनंद ! मजा आहे ! स्वतःच्याच समाजाला अधोगतीला घेवुन जाणार असले नेते ! अन मग ना धड शिक्षण ना नोकर्‍या मग परत बेरोजगारी अन गरीबी ! दुनिया कुठे चाललीये , आपण काय बोलतोय कशाचा ताळमेळ नाही ! मग काय जे स्वाभाविक आहे तेच होणार ! डार्विनप्पा म्हणाले ते खरेच - सरव्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट ! असो . आपण त्या अमुकतमुक समाजाचे नाही, आपण अलिप्त राहुन मजा पाहु , आपल्या समजाच्या लोकांना आपण कोणाचाही द्वेष करायला नको शिकवुया : सावरकर वाचा पण आंबेडकरही वाचा , गांधी वाचा पण गोडसेही वाचा . भारताची आगतिक फाळणी वाचा अन अमेरिकेचे फाळणी टाळायला केलेले सिव्हिलवॉरही वाचा. जगद्गुरु तुकाराम वाचा अन समर्थ रामदासही वाचा. साईन थीटा कॉस थीटा ही वाचा अन बिजनेस मॅनेजमेंटही वाचा ! आण्णि हो , जे वाचु नका म्हणत आहेत त्यांना शहाणे करायला जाऊ नका , ते तुम्हालाच चावायला येतील , त्यापेक्षा त्यांचे विडिओ पाहुन व्ह्युव्ह्ज वाढवा ते त्यात्चह खुष आहेत , त्यांना प्रोत्साहन द्या - है शाब्बास , जिकलस भावा , लढ तु , असे प्रतिसादही द्या वाटल्यास =)=)))) आपण आपले आपल्या पुरते पाहु: जे चांगले आहे ते घेवु , जे वाईट आहे ते टाकुन देऊ ! आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: !!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 05/16/2018 - 18:00 नवीन
परफेक्ट रे मारक्या. सध्याचे हे असले युट्युबावरचे व्हिडीओ पाहता केवळ हे आणि हेच करु शकतो. कीव, सहानुभूती, आदर,अभिमान असा कुठलाही भाव मनी न येता केवळ हेच वाटते. मरु दे तिज्यायला. अंबानीसारखे रोज दिड जीबी वाटताहेत. सुलभ हप्त्यावर स्मार्ट्फोनं धडाक्यात विकली जाताहेत. अगदी जोमात विष पेरले जातेय. विषाचेच पिक म्हनल्यावर ना किडीचा धोका ना उपटायची भिती. मरु दे तिज्यायला.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/17/2018 - 05:29 नवीन
आत्ता पाहिला बाईंचा व्हिडिओ ! एकच नंबर ! फॅनच झालो आपण मॅडमचा ! मॅडम तुम्ही अशीच भाषणे देत रहा तुमच्या समाजाला ! खरय , कशाला हवेत बालकवी अन केशवसुत ? कशाला हवे कॉस थीटा आणि साईन थीठा ? कशाला हवे आगरकर अन गोखले ? कशाला हव्यात एतद्देशीय भाषा अन संस्कृत फिंस्कृत ? तुम्ही तुम्हाला हवे ते शिका ! हे सगळे ब्राह्मणवाद्यांसाठी सोडुन द्या , त्यांचं त्यांना अभ्यासु द्या . बेस्ट आहे भाषण , कित्ती लोकं ऐकताहेत भाषण . पाहुन कसं रिलॅक्स वाटल ! असं काही ऐकलं की पुढच्या पिढ्यांना कराव्या लागणार्‍या संघर्षा बद्दलची काळजी थोडी कमी होते :) =))))
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/17/2018 - 09:47 नवीन
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन भागात दिले असावे . चुभूदेघे पहिल्या भागाची लिंक वर आलीच आहे. भाग दुसरा भाग तिसरा
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 05/14/2018 - 13:29 नवीन
जेडी,
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
अगदी, अगदी !! हे वैचारिक पशूच म्हंटले पाहिजेत. आहार, निद्र, भय, मैथुन सोडल्यास जास्त काही करायची यांची क्षमताच नाही. नाहीतरी, साम्यवादास अशीच गाढवं अभिप्रेत आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 05/14/2018 - 13:48 नवीन
मुद्दा त्यांनी काय सांगावे हा नाही आणि लोकांनी ते ऐकावे की नाही हाही नाही. मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जर त्या बाईंचे म्हणणे खोडून काढलेत तर तुम्हाला तेथेच मार पडेल. हे मी अनुभवले आहे, पाहिले आहे. त्यामुळे सुज्ञ "जाऊ दे मरु देत" अशी भूमिका पत्करतात. याच्यातच आपल्या समाजाच्या र्‍हासाची मुळे दडली आहेत... असे आपले मला वाटते...
  • Log in or register to post comments
ज
जेडी Tue, 05/15/2018 - 08:47 नवीन
खरयं, भक्त कुठल्या थराला जातील काही सांगता येणार नाही इतके त्यांचे ब्रेन वोशिन्ग केलेले असते ह्या नेते मंडळीनी....
  • Log in or register to post comments
श
शाली Tue, 05/15/2018 - 05:37 नवीन
काय बोलायचं?
  • Log in or register to post comments
ज
जेडी Tue, 05/15/2018 - 08:49 नवीन
काहीच नाही
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/15/2018 - 07:59 नवीन
हॉरिबल बोलतात त्या बाई ! लोक कसं काय ऐकून घेतात नवल आहे !
  • Log in or register to post comments
ज
जेडी Tue, 05/15/2018 - 08:48 नवीन
लोकांनी अक्कल गहाण ठेवलीय....
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/15/2018 - 09:15 नवीन
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला ठेवली, तर त्यांचा मुद्दा, की शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये, हा बऱ्याच अंशी व्यवहार्य आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 05/15/2018 - 09:24 नवीन
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला त्रास होत असल्यामुळे विडिओ तुकड्या तुकड्यात ऐकला. हा मुद्दा मला पण पटला. ==== बाकी वक्त्यां कडून जेवढे चांगले, फायद्याचे, उपयोगाचे आणि पौष्टिक घायचे असते. बाकी दुसरा कान दिला आहेच देवाने. पारावरच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी निरर्थक असतात असे नाही. त्यातून गावात काय चालले आहे हे पण समजते.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Tue, 05/15/2018 - 15:46 नवीन
त्या फक्त >>>"शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये"<<< असे म्हणाल्या असत्या तर ठीक पण गणितात काय शिकवु नये हे कसे काय सांगु शकतात?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 05/15/2018 - 15:50 नवीन
वक्त्याच्या सगळ्या गोष्टी शब्दशः घायचा नाहीत हा कान मंत्र आमच्या बॉस ने आम्हाला दिला होता.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 05/15/2018 - 09:29 नवीन
लोकं लय ७२ खोडींची असतात.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 05/15/2018 - 08:55 नवीन
ऐकताना संताप येतो पण जयंत सर म्हणतात त्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाही. स्वत:च्या वागण्यातून , प्रेमानेच मतपरिवर्तन होऊ शकतं.( ही संघाची शिकवण खरंतर .) यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 05/15/2018 - 09:26 नवीन
म्हणजे 'गोड बोलून गळा कापायचा' ही म्हण आठवली. (कृपया हलके घ्या)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/15/2018 - 13:10 नवीन
रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले. असो. सगळेच एका माळेचे मणी म्हणल्यावर काय...
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 05/15/2018 - 13:46 नवीन
या रामतिर्थंकर बाईंसारखेच वेगळे विचार ऐकायचे असतील तर सुशमा अंधारे याची भाषणे ऐका. या बाई पणं तुफान बोलतात पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जेडी Tue, 05/15/2018 - 13:46 नवीन
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय... >>>>>>>>>>> रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले. <<<<<<<< नकोच ह्या बाईचा अभ्यास...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/15/2018 - 13:53 नवीन
ओके मग वाहा विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी. नो प्रॉब्लेम.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Tue, 05/15/2018 - 13:58 नवीन
फक्त वाद घालायचा म्हणुन कमेंट करत आहात का?, तुम्ही मांडा त्यांच्याविषयीचा अभ्यास...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/15/2018 - 15:16 नवीन
फक्त वादच घालायसाठी धागेही काढत नाही की कॉमेंट ही करत नाही. जे माहिती आहे तेवढेच लिहितो. अपर्ण रामतीर्थकर बाईबद्दल माहीत नसेल तर तुमचा मिपाचा अभ्यास कमी पडतोय. बरेच सापडेल हुडकल्यावर. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास होईल कोण वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
ज
जेडी Tue, 05/15/2018 - 15:39 नवीन
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला अभ्यास करायची गरज वाटत नाही कारण मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 05/15/2018 - 16:13 नवीन
मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही
मग हा धागा म्हणजे काय आहे?
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 05/16/2018 - 06:42 नवीन
रामतीर्थकर बाईंबद्दल खालील धाग्यावर अतिशय तिखट आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती की अभ्यासेठ. adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती त्यांच्या भाषणांवर टीका करणारे लोक हे तथाकथित पुरोगामी दृष्टिकोनातून बघतात म्हणून त्यांना ती पटत नाहीत असे दिसते. सर्वसामन्य माणसांच्या मात्र ती हृदयाला भिडतात हे मी स्वतः अनुभवले आहे. उपस्थित लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना त्या चांगल्या प्रकारे मांडतात आणि प्रॅक्टिकली पॉसिबल उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सक्षमीकरणासाठी अमुक केले पाहिजे तमुक केले पाहिजे अशी पोकळ भाषणबाजी बरेच लोक करत असतात पण त्याने घरातली परिस्थिती बदलते असे दिसत नाही. काही बाबतीत त्यांची मते आत्यंतिक असली तरी ती सोडून बाकीचे ग्रहण करण्यास काय अडचण?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/15/2018 - 14:21 नवीन
जेडी,
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...
एके मुद्दे पाहूया : १. मुलींनी जास्त शिकु नये : स्वत: रामतीर्थकर बाई उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे जास्त शिकू नये हा मुद्दा गांभीर्याने घ्यायची गरज नाही. २. लवकर लग्न करावे : लग्नाच्या बाजारात मुलीच्या नशिबी फक्त पदावनतीच असते. विशीचा साधा मुलगा तिशीचा पण कमावता झाला तर ती पदोन्नती असते. याउलट मुलीच्या बाबतीत ती कितीही कर्तृत्ववान असली तरी वीस ते तीस ही पदावनतीच असते. हे असं का ते मला माहित नाही. रा.ती.बाईंना पण माहित नसेल बहुतेक. ३. नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये. ४. लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात. ५. पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... : प्रमाणाबाहेर हा शब्द राहिलेला दिसतोय. असो. रामतीर्थकर बाई वकिली शिकल्या असून विवाहविच्छेद होऊ नये म्हणून सल्लागार आहेत. बाईंची मतांचा हेतू कुटुंब एकसंध राखणे हा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 05/16/2018 - 08:58 नवीन
नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.
कुणी लग्न करू नये ? स्त्रियांनी की पुरुषांनी ? किती पुरुष बायको हेच आपले आयुष्य मानतात ? जे मानत नाहीत त्यांनी लग्न का करावे ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/16/2018 - 16:35 नवीन
स्नेहांकिता, ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. (मग ही व्यक्ती स्त्री असो वा समलैंगिक पुरुष.) आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 05/16/2018 - 19:14 नवीन
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या घायच्या नसतील, त्यांनी लग्न करू नये". असं सांगितलं तर सगळ्यांनाच पटेल ना. ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. मुलींनी या वाक्याचा विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. कारण सर्वस्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. लग्नानंतर नवरा + त्याच्या घरचे यांच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहित करून द्या -घ्या. स्वतःच करियर, आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, यांचं स्वतःला काय जमणार आहे हे नीट सांगा आणि सगळं सगळ्यांना पटलं तरच लग्न करा. "लग्नानंतर जोडीदाराला सर्वस्व मानायचा किंवा प्राधान्य द्यायच नसेल तर लग्न करू नका " हे वाक्य जास्त बरोबर नाहीये का?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 05/16/2018 - 08:59 नवीन
लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.
का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ? हां, आता एकमेकांकडे दुर्लक्ष करून आईवडिलांशी (दोघांच्याही) गप्पा मारू नये , असे म्हटले तर ठीके !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/16/2018 - 16:38 नवीन
स्नेहांकिता, आई (मुलीची मैत्रीण असली तरी तिच्या)शी जास्त गप्पा मारू नयेत. या वाक्यांत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याविषयीचे नियम वेगळे आहेत. मुलगी जर मुलाच्या घरी राहायला आली असेल तर तिने घराचे नियम पाळायला हवेत. दोघे वेगळे रहात असतील तर वेगळे नियम असतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 05/17/2018 - 06:40 नवीन
...का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?
हिचे किंवा त्याचे -नाती किंवा मैत्री- म्हणून नाही , एखाद्या संवादातून संसारांतर्गतची एखादी निर्णय प्रक्रीया प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावित होउन ती जोडीदारावर लादली जाऊ लागते , तेव्हा त्याची सोडवणूक क्लेषकारक ठरु शकते ही काहीवेळा चिंतनीय समस्या -खरेतर वेगळा धागा काड्।ऊन चर्चेस घेण्या जोगी असू शकते असे वाटते
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 05/17/2018 - 07:46 नवीन
पण काही वेळाच !! सरसकटीकरण करण्याची गरज नाही. शिवाय 'जोडीदार' म्हणणे योग्य आहे. केवळ 'नवरा' नाही.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Tue, 05/15/2018 - 20:39 नवीन
त्या बाई जे काय म्हणतात ते त्यांनी सगळ्यांना म्हटलं असतं तर त्यांना एवढे अनुयायी नक्की मिळाले नसते. कारण फक्त मुलींनाच बदलायला सांगणं आपल्या समाजात अजूनही जास्त प्रमाणात घडतं. जर त्या म्हणाल्या कि लग्न झाल्यावर मुलींनी आई बरोबर जास्त बोलू नये आणि मुलांनी रोज कट्ट्या वर जाऊन मित्रांबरोबर चकाट्या पिटू नये, दोघांनीही नीट जबाबदारीने संसार करावा तर जास्त अनुयायी मिळणं शक्य नाहीये :P
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/16/2018 - 08:34 नवीन
वीणा३, तुमचं बरोबर आहे. रामतीर्थकर बाई स्वत: स्त्री असल्याने पुरुषांनी काय करावं याचा सल्ला त्या कशा काय देणार? त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 05/16/2018 - 09:00 नवीन
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.
यू सेड इट ! त्यांचा मगदूर तेवढाच आहे !!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/16/2018 - 16:40 नवीन
स्नेहांकिता, अहो, अपर्णाबाईंचा मगदूर तोकडा आहे हेच तर केव्हापासून सांगताहेत त्या. तुम्हांस गरज नसेल तर त्यांच्याकडे आजिबात लक्ष देऊ नका. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 05/16/2018 - 18:57 नवीन
वरच्या लिंक मधला विडिओ अपर्णा रामतीर्थंकर बाईंचा नाहीये, दुसऱ्याच कोणीतरी आहेत. ह्या पण गमतीशीर आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जेडी Wed, 05/16/2018 - 19:54 नवीन
मी माझ्या लेखात रामतीर्थकर बाईंचा उल्लेख केलाय म्हणुन त्यांच्यावरच चर्चा .
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 05/16/2018 - 21:02 नवीन
अंधारे बाई इतक्या टाकाऊ सुद्धा नाही आहेत. त्यांचा राग समजून घेऊ शकतो आपण. पिढया न पिढ्या अन्याय झालेले लोक ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्या बद्दल असेच बोलणार. त्यात नवल काय? शिकण्याची मुभा मिळाल्या नन्तर, समोर जर ब्राह्मणी विनोद म्हणता येतील असे पुलंचे धडे आणि बालकवींच्या कविता येत असतील तर मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय? हा राग सिलेक्टिव्ह असेलही, अगदी मोजके धडे निवडून त्यावर केलेलं भाष्य असेलही. पण मुख्यतः मजुरीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मार्केट मध्ये उपयोगी शिक्षण मिळावे असे वाटले आणि ते हे नाही हे ही कळले बरोबर च आहे की. शिवाय शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने अभ्यासक्रमावर ब्राह्मणी छाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिरवे गार गालिचे किमान कवितेत तरी बघू द्या हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे म्हणजे हेमलकसा इथल्या आदिवासी मुलांना शिकवताना अ अ अननसाचा असं शिकवू तरी द्या म्हणण्या सारखं आहे. ह्याच्याशी रिलेट होता येत नाहीये ते शिकताना त्यांना वैताग येऊ शकतो. सुर्वेंची कविता सुद्धा नव्हती असं म्हणत नाहीयेत त्या, उशिरा आली असं म्हणल्यात. एखाद्या वक्त्याने जाहीर सभेत साइन thita चा काही उपयोगच नाही म्हणणं मात्र चुकीचं आहे. खासगी मध्ये मी वकील झाले, कशाला उगाच ते गणित शिकले म्हणणं ठिके. पण जाहीर सभेत हे बोलणं वेडेपणा आहे. शिवाय प्रमुख अजेंडा ब्राह्मणद्वेष धगधगता ठेवणं हाच असावा, त्यामुळे फायदा कुणाचाही होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त आपणही जातीयतेच्या चष्म्यातून बघत आहोत का हे तपासावे लागेल. कारण चुका झाल्या आहेतच. त्या मान्य करता येणं आवश्यक आहे. नुसतं पुलंचं नाव घेतलं म्हणून बिथरून चालणार नाही. (ते संपूर्ण भाषण नसावं, मी सुद्धा थोडंच ऐकलं आहे. मला तरी त्यांचे काही मुद्दे पटले. )
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/16/2018 - 22:49 नवीन
पिराताई,
मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?
एकदम मान्य. पण म्हणून संत ज्ञानेश्वर किंवा पुल यांची थेट लायकी काढायची गरज नाही. शिक्षण अनुचित असेल त्यात पुल किंवा ज्ञानेश्वर काय करणार. अंधारे बाईंचा शैक्षणिक क्षेत्राचा काही अभ्यास वगैरे आहे का? वक्तव्यावरनं दिसंत तरी नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/17/2018 - 04:41 नवीन
मला त्या बाईंचं समर्थन अजिबात करायचं नाहीये. मलाही पुलं आणि संत ज्ञानेश्वर तितकेच प्रिय आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांचा राग स्वाभाविक आहे. की बाबा पार रेडा सुद्धा शिकू शकतो, पण आम्ही माणसं असून नाही शिकू शकलो. ह्यात रडार वर ज्ञानेश्वर नसून बहुदा त्यांचा समाज आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच. असो..
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/17/2018 - 08:57 नवीन
पिराताई, टीका रचनात्मक हवी ना? नाहीतर तिला बदनामीचा वास येतो. रेड्याने नुसती पोपटपंची केली होती. इतकंही अंधारेबाईंना माहित नाही काय? त्या पशूला कोणीही काहीही शिकवायला गेला नव्हता, आणि तो पशू काहीही शिकला नाही. मग शिक्षणाच्या नावाने शंख कशासाठी? ब्राह्मणांच्या बदनामीसाठी म्हणून हा बनाव रचल्याचा संशय येणारंच ना? सांगायचा मुद्दा काय की हेतू कितीही स्तुत्य असला तरी टीका रचनात्मकच हवी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/17/2018 - 09:52 नवीन
रचनात्मक हवी हे मान्यच. पण तुम्ही फार शब्दशः घेताय. ब्राह्मणांची बदनामी करत आहेत, द्वेष वाढवत आहेत असं वाटलं तरी त्यांना ह्याच सिस्टिमने वंचित ठेवलं हे सत्य आहे. ते सुद्धा मान्य करा. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने सत्य बदलत नाही. मला कळत नाही की इतकी वर्षे अन्याय झाल्यावर कुणी आपल्याबद्दल अदबीने बोलेल ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांचे हेतू चुकीचे असतील, पण मूळ मुद्दा हा अभ्यासक्रम रिलेटेबल न वाटणे हा असून,तो मला मान्य आहे. आता आमच्या सावित्री मावशीला शिकवायला गेलो तर तिला हिरवे गार गालिचे जवळचे वाटणार की भाकरीचा चन्द्र. तुम्हाला कविता, पद्य शिकवण्यात रस असेल तर तिला समजेल ते उदाहरण द्यायला हवे ना. समाजातल्या मोठ्या भागाला ते समजत नसेल तर ठिके. त्यांनी पुलंचा विनोद समजून घ्यावा कारण आमच्या लेखी ते ग्रेट होते असं नाही म्हणू शकत आपण. त्यांना ज्ञानेश्वर सुद्धा तितके ग्रेट वाटत नसतील, तो त्यांचा चॉईस झाला. शिवाय त्या ज्ञानेश्वरांना बोलत नसून, समाजव्यवस्थेवर बोलत आहेत असा माझा समज आहे. रेड्याने पोपटपंची तरी केली, इतरांना तो तरी हक्क होता का? सावलीचा विटाळ मानला जात होता, तिथे वेद कानावर पडू तरी दिले जात होते का? तुम्ही एक सेकंद त्यांच्या बाजूने विचार करा ना. ब्राह्मणांना मिळालेला हेड स्टार्ट त्यांना नाहीच मिळालाय. सगळीकडचा उच्च वर्णीय प्रभाव त्यांना जास्त जाणवणार. तुम्हाला पुलं इतके खटकणार नाहीत. पण उपाशीपोटी झोपणाऱ्याला "उपास" हा धडा विनोदी वाटेल का? असो, माझा काही तत्कालीन समाजव्यवस्था वगैरे टाईप चा सखोल अभ्यास नाही. मला फक्त "आपण" आणि "ते" अशी दरी आहे हे समजतं आणि आजही मी ब्राह्मण आहे म्हणून माझा कुणाला राग येत असेल तर तो का हे ही समजतं. म्हणून मला अंधारे बाईंची भाषणं इतकी टाकाऊ वाटली नाहीत इतकंच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/17/2018 - 22:01 नवीन
पिराताई, हा वंचित म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आणि त्यांचा संबंध वेदांशी व ब्राह्मणांशी का म्हणून लावला जातोय? वेदपठण ही पोट भरायची विद्या नाही. मग वेद कुणी ऐकले काय अन न ऐकले काय, काय फरक पडतो? इंग्रजांनी जर कारकूनी नोकऱ्या निर्माण केल्या तर त्याचा दोष ब्राह्मणांकडे कसा काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा नाही. किंबहुना हे असे प्रश्न तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडंत नाहीत. म्हणून अंधारेबाईंसारख्या लोकांचं फावतं. वंचितांच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष जोपासता येतो. धनगर मागास जाती होती ना? आजूनही ती मागासच आहे. विशेषत: महाराष्ट्रातले धनगर मागास धरले जातात. मग अहिल्याबाई होळकर कुठनं उत्पन्न झाल्या? हे रचनात्मक जाती उत्थान का लोकांसमोर मांडलं जायला हवं. (मुघल भारतीय धरले तर,) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान मल्हारराव होळकर होते ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा