एकाच माळेचे मणी
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते.
पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले.
बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या. पुलंच्या बटाट्यांच्या चाळीतल्या उपवासाचा आणि समाजाच्या भूखेचा संबध जोडला. अरेरे! पुलंचा विनोद त्यांना कळला नसेल असे मी समजून घेतले. पुढे बाई “हिरवेहिरवे गार गालिच्यावर घसरल्या ”, बालकवींची लायकी काढली, ही कविता शालेय अभ्यासक्रमात असू नये असे त्यांचे म्हणणे ; कारण मराठवाड्यात दुष्काळ आहे तर कोठून येणार हिरवे हिरवे गार गालिचे? अरे बाई मराठवाड्यातल्या लोकांना कमीत कमी कवितेत तरी गार गालिचे बघू देत कि असे मला म्हणावे वाटले. पुढे हे सर्व नको तर काय शिकवायला हवे ? नारायण सुर्वेंची, “भाकारीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली”, ही कविता शिकवायला हवी असे त्या म्हणाल्या . पण ती तर आधीच अभ्यासक्रमात आहे हे बहुधा त्या विसरल्यात.
पुढे १०+२ +३ वर आल्या.. नंतर बाई इतिहास, साहित्यावरून गणितावर आल्या... कशाला हवे म्हणे कॉस थीटा मायनस साईन थीटा... आता मात्र माझे टाळके सटकले , बाईंना काय माहित कॉस थीटा मायनस साईन थीटा कशाला वापरतात... बाईना काय माहित कोणता इंजिनिअर हे सर्व वापरतो, बाईना काय माहित मंगळावर यान कसे पोहचले, किती गणिते करावी लागली? अजून बाईना काय माहित कि मोठ्या मोठ्या मशीन्स कशा बनतात , त्यात ह्या कॉस साईन Tan चा काय उपयोग, कसा माहित असेल? बाई कायद्याच्या पदवीधर होत्या, एखादी सायन्स रिलेटेड केस बाई कशा काय सोडवणार, ते जावूदे पण ज्या समाजाला त्या उद्देशून बोलत होत्या त्या समाजाने फक्त कामगार म्हणूनच जगावे आणि भाकरी मिळवावी अशी त्यांची भाषा होती, इंजिनिअर वैगेरे असली स्वप्ने पहा, किंवा साहित्यातले दर्दी व्हा असे सांगत नव्हत्या.
असो, सांगण्याचा मुद्दा हा कि प्रत्यकाने अभ्यासून प्रकट व्हायला पाहिजे, जोरजोरात चुकीचे सांगू नये. समाज चुकीच्या दिशेला भरकटू शकतो. त्या रामतीर्थकर बाई काय किंवा ह्या बाई काय किंवा ते फक्त ईश्वर भक्तीत विलीन व्हा असे सांगणारे बुवा काय किंवा हाच एक पंथ बरोबर असे सांगणारे काय, किंवा आता श्रमदानावर टीका करणारे काय किंवा मोदी भक्त काय...सारेच एका माळेचे मणी.
आपल्याला एवढे लोक फोलो करतात तर किमान त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नये इतकाही विवेक लोक ठेवत नाहीत.
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
💬 प्रतिसाद
(69)
म
माहितगार
Fri, 05/18/2018 - 04:42
नवीन
सुषमा अंधारेंचे भाषण सोईस्कर राजकीय भाषण आहे , ते त्यांची मतपेटी बळकट करून घेणारी राजकीय भूमिका म्हणून बघावे लागेल . त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली तर त्या काँग्रेस किंवा भाजपात जाणार नाहीत अशी शक्यता कमी वाटते .
१) वेद असो वा इतर धर्मग्रंथ त्यातील जन्माधारे न बांधली जाणारी समानसंधी महत्वाची होती आहे आणि राहील. फक्त अर्थार्जन नाही म्हणून समान संधीचे तत्व नाकारता येत नाही , आणि अगदी पुरोहित शाही पर्यंत तुम्ही समान संधी देता नाही तो पर्यंत टीकेला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही कारण टीकेत सामान संधी नाकारली गेल्याचे तथ्य शिल्लक राहाते
२) केवळ धार्मीक अभ्यासाच्या संधी नाकारल्या गेल्या नाहीत तर अप्रत्यक्षपणे त्याही पेक्षा महत्वाची असलेली साक्षरतेची संधी आणि तेही बहुसंख्य जनतेस नाकारली गेली , ज्यामुळे शिक्षणाच्या विविध शाखा विस्तार होणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे यास मर्यादा पडल्या
३) चातुर्वर्ण्याने व्यापाराचा विचार केला पण उत्पादकांचा विचार केलाच नाही दुसरी कडे कष्टकऱ्यास फारच तुच्छ लेखले गेले . बरे हा कष्टकरीच बहुसंख्य पायदळाचे क्षत्रियत्वाचेही काम करणार आहे हे लक्षातच घेतले गेले नाही .
४) देश आणि धर्माचे संरक्षण करणाऱ्या क्षत्रियांचाही आदर ठेवला नाही
५) मोक्ष तत्वाला अवास्तव महत्व दिल्याने अंधश्रद्धा बोकाळल्या जाऊन विज्ञानाची मर्यादित क्षेत्रे सोडली तर उत्पादन निगडित विज्ञान विकासावर भर देता आला नाही , ‘अर्थ ‘ या तत्वांकडे ज्यांच्या कडे ज्ञान होते त्यांचेच दुर्लक्ष होत होते .
एकूण देशाचा विचार केला तर परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहू इतपत अर्थ व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था बळकट होण्यात अडचणी आलेल्या आहेत . परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहाता येत नाही तर संस्कृतीच्या सुरक्षेचा प्रश्न दूरच राहातो .
एकूण चातृवर्ण्य हे स्वतः:च्याच देशाची संस्कृती अर्थ आणि संरक्षण व्यवस्था खिळखिळी करणारे तत्वज्ञानात रूपांतरित झाले होते असे म्हणता येते का ? त्यामुळे संस्कृतीत जन्माधारित विषमता पाळणारे अपतत्वज्ञान शिरणे शेखचिल्ली प्रमाणे स्वकीयांचे नुकसान करणारे होते . असो .
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 05/18/2018 - 05:43
नवीन
प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 05/17/2018 - 08:40
नवीन
संयत प्रतिसाद..!!
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 06:31
नवीन
मी माझ्या पाल्यांची मराठी भाषेची पुस्तके गेली दहा वर्षे चाळतो आहे -त्यातही अभ्यासपूर्ण सुधारणांची गरज असू शकते, पण केवळ 'ब्र' समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव अभ्यासक्रमावर असण्याचा काळ बर्या पैकी मागे पडला असावा - अर्थात हे एक ढोबळ विधान असल्या मुळे चुभूदेघे- सुषमा अंधारे अद्यापही त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणीत गुंतलेल्या असतील तर ते ही समजण्या सारखे असावे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 05/17/2018 - 09:13
नवीन
अंधारे किंवा तत्सम वक्त्यांचा पोटपाणी द्वेषावर अवलंबून आहे.
त्याचा इतिहास किंवा समाज प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 10:25
नवीन
अॅ . सुषमा अंधारे भाषणात उल्लेख करत असलेली ; म.गांधी, गोखले, आगरकर यांनी एकत्र बोलवलेली आणि संस्कृत भाषेची भलावण केलेली भाषा निती विषयक नेमकी सभा कोणती असावी ? १९१४ च्या आधी म.गांधी भारतीय राजकारणात फारसे सक्रीय नसावेत आणि आगरकरांचा देहांत १८९५ मध्ये झालेला दिसतोय. (चुभूदेघे)
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 10:33
नवीन
त्यांचे पुढचे वाक्य म्हणते म.फुल्यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही . म. फुल्यांचे निधन १८९० मध्ये झाले म्हणजे अशी काही सभा व्हायची तर १८९० च्या आधी व्हावयास हवी आणि १८९१ च्या आधी त्यांची वकीलीची डिग्री शिकून गांधी भारतात वापस सुद्धा आलेले नव्हते .
इतर कुणाची अशी एखादी सभा झाली असेल पण सहसा पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्या नेत्यांची नावे जोडण्या पुर्वी तथ्यांसाठी अंधारे मॅडमनी संदर्भ नमूद करावयास हवेत कारण खास करुन स्पर्धापरिक्षांसाठीचे त्या क्लासेस घेतात म्हटल्यावर अधिक नेमकेपणा असावयास हरकत नसावी असे वाटते.
- Log in or register to post comments
ज
जेडी
गुरुवार, 05/17/2018 - 11:01
नवीन
स्पर्धापरिक्षांसाठीचे क्लास.... अवघड आहे... कसे होणार त्या पोरांचे?
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 05/17/2018 - 11:57
नवीन
पुण्यात एक बहाद्दराने क्लासच्या बोर्डवर आपल्या नावाखाली FICWAI अशी डिग्री टाकली होती. वाटले टी"चर"(जर) Fellow मेंबर असेल इकवाय, पण परीक्षेच्या वेळेस पोरांच्या वर्गातच त्याचा नंबर आल्यावर कळले ते Fail मेंबर ऑफ ICWAI आहे.
अजून पास होतंय.!
====
चाणक्य वाल्या पोरांचं तरी काय होत असतंय, स्वतःलाच नीट करावा लागतो अभ्यास.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 10:56
नवीन
शिक्षण रोजगाराभिमूख न रहाणे आणि वाढत्या खाजगी करणाबद्दल त्यांच्या शंका रास्त आहेत -पण जिथे पर्याय उपलब्ध आहेत तेथेही लोक रोजगाराभिमूख शिक्षणाचे पर्याय दूर ठेऊन १०+२+३ च्या मागेच धावताना दिसतात त्यास केवळ शासनास कसा दोष देता येईल कदाचित कुठे तरी खापर फोडणे मॅडमसाठी आवश्यक असावे , शिवाय बेरोगारीस वाढत्या लोकसंख्येचे परिणामही आहे आणि इतर सर्व नेत्यांप्रमाणे लोक्संख्येचे परिमाण त्या लक्षात घेताना दिसत नाहीत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 11:04
नवीन
उद्योग धंद्याचे शिक्षण द्यावे असे सांगणारी १९४८ च्या म . गांधींच्या दिग्दर्शनाचा हवाला देऊन लगेच खापर फोडण्याचे कारण लक्षात येत नाही.
- Log in or register to post comments
ज
जेडी
गुरुवार, 05/17/2018 - 11:04
नवीन
+३ किती लोक शिकतात?
- Log in or register to post comments
ज
जेडी
गुरुवार, 05/17/2018 - 11:08
नवीन
मी ही पोष्ट जातीवादावर घसरण्यावर टाकलेली नाही... इतक्या समुदायासमोर चुकीचे सांगु नये ह्यासाठी टाकलेली आहे...
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 05/17/2018 - 12:09
नवीन
भारतात सभा, कीर्तने, सत्संग, भाषणं आणि तत्सम कार्यक्रमांवरती बंदी आणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.
सगळी माहिती डिजिटलाईज होत चालल्या आहेत. तयामुळे लोकांनी कोणत्याही विषयाचे ज्ञान स्वतः अधिकृत शिक्षण संस्थेत जाऊन अभ्यास करून घेतले पाहिजे. मग स्वतःचे मत बनवले पाहिजे.
कोणी काही सांगते आणि बावळे तेच खरे मानून ढोल पिटत बसतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 12:23
नवीन
बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / क्रिटिसिझम सोबत जोडणे आवश्यक करण्याची जरुरी असावी.
तो पर्यंत युट्यूब वरच्या तथ्य अथवा तर्काबद्दलची मतांतरेसुद्धा नीट संशोधन पूर्वक युट्यूबवर उपलब्ध करुन द्यावयास हवी. ईन एनी केस वाचक आणि श्रोत्यांनाही वेगवेगळ्या बाबी जाणवत असतात.
या युट्यूबच्या तिन्ही भागात ( दुव्यांमध्ये) स्टेजवर बसलेल्या श्रीयूत आणि श्रीमती यांची शारिरीक हालचाली (बॉडी लँग्वेज) मध्ये होत गेलेले बदल अभ्यासणे कमी वेळ असल्यास तिसर्या भागातील शेवट बघणे रोचक असावे.
- Log in or register to post comments
ज
जेडी
गुरुवार, 05/17/2018 - 18:58
नवीन
एक्दम बरोबर
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 12:29
नवीन
राष्ट्रगीताचा मुद्दा
या विषयावर अशातच माझी अजोंशी मिपाच्या कोणत्याशा धाग्यावर चर्चा झाली होती . ( दुवा सापडल्यास पहातो) एनी वे राष्ट्रगीतात मराठा हा शब्द महाराष्ट्रीय या अर्थाने आणि द्रविड मध्ये उर्वरीत दक्षिण भारत कव्हर होत असताना विंध्य पर्वत रांगांच्या उल्लेखाची सुषमा आंधारेंना जाणावणारी आवश्यकता नीटशी उमगली नाही.
काश्मिरचा काही भाग पाक व्याप्त असला तरी भारताचा दावा आहे आणि त्यातून सिंधू नदी वहाते तो पर्यंत सिंध शब्द काढण्याचा आग्रह केला पाहीजे का माहित नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 13:32
नवीन
राष्ट्रगीतातील 'जन गण मन अधिनायक' हा उल्लेख ब्रिटीश सम्राटासाठी मूळीच नव्हता असा स्पष्ट उल्लेख स्वतः रविंद्र नाथ टागोरांनी करुन ठेवलेला आहे . खालील परिच्छेद इंग्रजी विकिपीडियावरील जन गण मन लेखास भेट दिली तरी सुषमाजी अंधारेंना दिसला असता शिवाय रविंद्र नाथ टागोरांनी सर ही पदवी इंग्रज सरकारला वापस केल्याचे दिसले असते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/17/2018 - 13:40
नवीन
इथे मिपावर अरुण जोशींशी माझी झालेली उपचर्चा फॉर रेकॉर्ड संकलीत स्वरुपात देऊन ठेवतो.
टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत.
जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.
टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात.
*पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) .
* दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, )
* किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ?
* अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते.
असो
हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.)
जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2