भारतीय न्यायपालिकेची विक्षिप्तता
कदाचित कोणतंच नियंत्रण नसल्यामुळं भारतीय न्यायपालिका रसातळाला गेलेली असू शकते. कदाचित इतर देशांच्या मानाने खूप चांगली असू शकते. कदाचित इतर अन्य संस्थांपेक्षाही बरबटलेली असू शकते. देशात न्याय आहे अशी सर्वसाधारण जनभावना केवळ एक चालत आलेली प्रथा म्हणून जीवंत असावी. तसं न्यायपालिकेच्या बाबतीत "संस्था विथ डिफरन्स" नावाचा काही प्रकार नसावा. मला इथे विक्षिप्त म्हणजे चांगल्या, वाईट, लॉजिकल, इल्लॉजिकल, परस्परविरोधी, आपल्याच अन्य न्यायालयाच्या वा बेंचच्या विरोधी, संविधानविरोधी, देशविरोधी, इ इ घटना अभिप्रेत आहेत.
===============
आदर्शतः न्यायधिशांच्या वर्तनांच्या काय सीमा आहेत नि त्या पाळल्या जातात का? त्यांच्या गुन्ह्यांस कशी शिक्षा होते. चुकीचे उत्तरदायित्व ते कसे नि कोणाला रिपोर्ट करतात?
त्यांची संस्थाच ठीक आहे का? त्यांची निवड कशी होते? ते निष्पक्ष आहेत हे ठरवायला कोणती चाचणी होते?
आरोप, प्रत्यारोप, पुरावे, साक्षीदार, वकील, वाद, कायदे, संविधान हे सगळे तेच असले तर न्याय द्यायला न्यायाधीश का लागतो? वा कोणत्याही न्यायाधीशाकडून तोच निकाल आला पाहिजे. मग तो का येत नाही?
=========================
न्यायाधीशांना ज्या विषयावर न्याय द्यायचा आहे त्या विषयाचं सखोल ज्ञान असतं का? कोणत्याही तज्ञाचे मत घेताना विषय योग्य निवडला आहे का, पार्श्वभूमी नीट माहीत आहे का, सर्व संभावनांचे निष्कर्ष काय काय असू शकतात, तज्ञाच्या चाचणीच्या रिलायेबिलिटिचे ज्ञान त्यांना असते का?
===============
केसेस कशा हाताळाव्यात याचे लॉजिस्टीक्स सांभाळायचे ज्ञान जजांना का नसते? सर्व पक्ष सर्व तयारी एकत्र करून केसेस हातासरशी का करत नाहीत? सारे निकाल जज स्वतःच्या हाताने टाइप करतात का? पेंडेंसी पाहता जजेस शिफ्टमधे का काम करत नाहीत?
================================
जज ज्या शिक्षा देतात त्या इतक्या अबसर्ड का असतात? हजार कोटीचा फ्रॉड करणारास १०००० रु दंड? आणि काही वर्षे जेल?
सरकारने मला जेलमधे घालून माझ्यावर अन्याय केला आहे असे म्हणण्याचे स्वातंत्र्य गुन्हेगारास असणे किती विचित्र आहे? याला सजा नको का?
==================================
न्याय मागण्यासाठी वरवरच्या जजांकडे जाण्याचे लॉजिक काय? ते काय शिक्षण आहे का मोठ्या शहरातल्या शाळेत नीट मिळते? आणि असेच असेल तर भारतीय सर्वोच्च न्यायालयात हारलेले खटले लंडन वा न्यू यॉर्क वा स्वितझर्लँड मधे न्यावेत. खालच्या जजाने चूक निर्णय दिला म्हणून त्याला कोणती शिक्षा होते? त्याला कोणते ट्रेनिंग मिळते?
=========================
जजेस पैसे खातात का? ते खाऊच नयेत अशी काय व्यवस्था केली आहे? का म्हणून विश्वास ठेवायचा कि त्यांनी खाल्लेच नाहीत? हे जज पूर्वाश्रमीचे वकील असतात नि त्यावेळी त्यांनी बर्याच वाईट लोकांची बाजू घेतलेली असते. जे लोक वाईटांना वाचवायचे वकिलीचे पैसे घेऊ शकतात ते न्यायदानात वाईट लोकांचे पैसे कशावरून घेणार नाहीत? भारतीय जजांच्या, नातेवाईकांच्या संपत्तींचा (आणि इकडे तिकडे चिटकल्याचा) सर्वे झाला आहे काय?
=============================
देशाचे जज कोण बनावे यात लोकांचा से का नसावा? असेंब्ली आणि एक्झिकूटिव ब्यूरोक्रॅटीक पद्धतीने आणि जजेस डेमोक्रॅटिक पद्धतीने का निवडू नयेत? वा दोन्ही?
नियंत्रण नसलेल्या पद्धतीने निवडलेल्या लोकांनी लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधिंनी काढलेला अर्थ खोडून काढावा याला काही अर्थ आहे का?
जजांना आपलं धुणं धुवायला वेळ नसताना ते नेहमी लेगिस्लेचरचे अधिकार का कमी कमी करत नेतात? हे असंच होत गेलं तर एखादं अतिबहुमत्तालं सरकार यांचे खूपसे आवश्यक अधिकार ही काढून घेईल.
============================
कोणत्याही केसच्या निर्णयानंतर न्याय होत आहे कि नाही हे न्यायपालिका कसे ठरवते. झालेली केस तर एक संक घटना असते. न्यायदान हे भविष्यात शिस्त राखण्यासाठी असते. पण केसेसच्या निर्णयांची पब्लिसिटी कुठे होते? सलमान, रामरहिम, आसाराम, इ केसेस सोडल्या तर लोकांना केस संपलीय कि चालू आहे हे देखील माहीत नसतं. झालेली घटना, झालेली केस, झालेला निर्णय, त्यावर दोन्ही पक्षांचं मत, न्यायालयांचं प्रेस नोटीस असलं काही नको?
================================
न्यायाधीश गीतेची शपथ का घेत नाही?
========================
हा केस लॉ कित्ती चुकीचा प्रकार आहे! न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा संदर्भ प्रचंड वेगळा असतो. तो संदर्भ लागू आहे कि नाही याची चर्चा जवळजवळ होतच नाही. तोच प्रकार दुसर्या देशाच्या कायद्याचा संदर्भ द्यायचा.
========================
न्यायाधीशांना स्पेशल सन्मान कशाला द्यायला हवा? मी जशी एक नोकरी करती तशीच तो देखील एक करतो. मग त्याला यूवर ऑनर, माय लॉर्ड, आल्यावर उभे राहणे, ऑर्डर ऑर्डर, हे काय आहे? न्यायाधिश एक साधा होमो सेपियनच असतो ना? कि काही ईश्वरतत्त्व, देवतत्त्व, राजतत्त्व असतं त्याच्या देहात जे आम्हा सामान्यांत नसतं? आम्ही आमची नोकरी जर व्यवस्थित करत असू तर आम्हालाही यूवर ऑनर म्हणायला पाहिजे. Giving justice is a just another job. This job has no intrinsic merit in it. It is considered a benevolent job only because the stakes are decided and generally without challenge.
=============================================================
हा लेख सर्व मिपाकरांसाठी न्यायपालिकेच्या विविध पैलूंवर आपापले मत मांडण्याचा, अनुभव मांडण्याचा, विचित्र बातम्या देण्याचा, विचित्र संदर्भ नि अभ्यास देण्याचा आहे.
======================================================================
एका व्यक्तिने कोर्टात संताप व्यक्त केला म्हणून कोर्टाने त्यास आपले तेवर दाखवत मेंटल हॉस्पिटलात टाकले. (संपादित)
https://www.financialexpress.com/india-news/72-year-old-delhi-man-sent-to-mental-hospital-for-losing-temper-hc-apologises/1148701/
Ram Kumar was on his own fighting a 10-year-long motor accident claim dispute, and on November 3 last year allegedly got into an altercation with the opposing side and used unparliamentary language during the proceedings.He was then sent to police custody to Dr Baba Saheb Ambedkar (BSA) Hospital for psychiatric evaluation on the orders of the Presiding Officer of the Motor Accidents Claim Tribunal (MACT). Later in the day, he was produced before a Metropolitan Magistrate (MM) who ordered that he be sent to the Institute of Human Behaviour and Allied Sciences (IHBAS) to be kept under observation for 24 hours.On November 5, 2017, his stay at IBHAS was extended by another 15 days by a duty magistrate.
जरासा संयम सुटल्यावर माणसाला २० दिवस मनोरुग्णालयात ठेवले जात नाही/ जाऊ नये.
त्यांना --जर त्यांची मुले उच्च न्यायालयात गेली नसती तर --२० जानेवारी पर्यंत मनोरुग्णालयात ठेवले गेले असते. https://www.indiatimes.com/news/india/72-yo-healthy-man-sent-to-mental-asylum-for-arguing-too-much-with-lawyers-334829.htmlआपण हा मुद्दा क्षुद्र आहे असे भासवताय (trivialisation).
On Thursday, in its final verdict, a bench of Justices S Muralidhar and I S Mehta apologised to the man, who is a heart patient, saying his case presented“a dismal failure of our system
, which includes the police, the judiciary and the mental health professionals, to protect the fundamental rights of an individual”. बातमी नीट वाचली तर एक लक्षात येईल कि हा माणूस हृदय रोगी आहे आणि Following his release, Kumar underwent a heart procedure on November 29. या कालावधीत या माणसाला हृदयरोगाचा झटका येऊन काही बरे वाईट झाले असते तर त्या न्यायिक अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला भरला असता का. असे खटले डॉक्टरच्या निष्काळजीपणानंतर भरलेले मी आपणास डझनानी दाखवू शकेन. १०० % नाही कारण लोकशाहीत सगळे लोक समान असतात पण काही लोक जास्त समान असतात. उच्च न्यायालयाने हे २ लाख रुपये जबाबदार व्यक्तींच्या पगारातून वळते करून घ्या असा आदेश का दिला नाही? अशी "चौकशी आणि कारणे दाखवा नोटीस" सरकारी नोकरांना शेकड्यानी दिली जाते. याचाच अर्थ काय आपण एकदा न्यायपालिकेत अधिकारी झालात कि आपल्याला कायदा वेगळ्या तर्हेने लागू होतो. आपल्या म्हणण्यानुसार खालच्या न्यायिक अधिकाऱ्याकडून झालेल्या अन्यायाबद्दल दाद मागण्यासाठी वरील न्यायालये उपलब्ध आहेत. किती लोकांना ते आर्थिक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या परवडते हे पण एकदा सांगून टाका. अशाच गोष्टींमुळे खालच्या न्यायिक अधिकाऱ्यांनी केलेले गैरवर्तन हे अतिशय गंभीरपणे घेतले गेले पाहिजे आणि अशा बाबतीत कठोरपणे या न्यायिक अधिकाऱ्यास चौकशी होईपर्यंत निलंबित केले गेले पाहिजे. आणि दोषी आढळले तर नॊकरीतून बडतर्फ केले पाहिजे कारण असा भावनावश होणारा (impulsive) अधिकारी न्यायालयात निवड करण्यास लायक नाही असाच यातून अर्थ निघेल.पुन्हा चूक गृहीतक.
. उच्च न्यायालय राज्य सरकारला अशा न्यायिक अधिकाऱ्यांच्या बरखास्तीची शिफारस करू शकते आणि करतातच. त्याला संसद आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही. http://www.livelaw.in/compulsory-retirement-12-district-judges-jharkhand-hc-notes-dubious-conduct/ हा दुवा पूर्ण वाचून घ्या. उच्चं न्यायालयातील वरिष्ठाने उद्दाम पणा दाखवला अथवा दुर्लक्ष केले असे काही केले नाही परत चुकीचे गृहीतक उच्च न्यायालयाने उद्दाम पण दाखवला असे मी कुठेही म्हटलेले नाही. परंतु हे २ लाख रुपये सरकारच्या तिजोरीतून जाण्याच्या ऐवजी या न्यायिक/ पोलीस/ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगारातून कापून दिले असते तर परत असे करण्याच्या अगोदर सरकारी अधिकारी चार वेळेस विचार करतील. असे अधिकार सर्व लवाद, आयोग आणि उच्च न्यायालयांना असतात http://indianexpress.com/article/cities/ahmedabad/violation-of-rti-act-info-panel-slapped-rs-8-8-lakh-fine-on-govt-officials/ यात उपकाराची भाषा कुठे आणि कशी आली ते समजत नाही. न्याय नुसता करणे आवश्यक नाही तर तो दृश्य हि असला पाहिजे हे एक कायद्याचे मूलभूत तत्व आहे.मूळ आपला संपूर्ण प्रतिसाद चुकीच्या माहितीवर आणि चुकीच्या गृहीतकांवर आधारित
आहे म्हणून तो वेगळ्याच दिशेने गेला आहे.पण न्यायालयात झालेल्या अन्यायासाठी दाद मागण्याची कोणतीही परिणामकारक यंत्रणा नाही
. यामुळेच न्यायपालिकेने जास्त जागृत राहणे हि जनतेची अपेक्षा आहे. २) भारतीय न्यायपालिकेत सहसा जे करेक्टीव्ह मेकॅनीझम्स आहेत , ते सहसा वर्क होतात सहसा काम करेपर्यंत कालापव्यय इतका आहे किअंती सत्याचा जय होतो म्हणेस्तोवर सत्याचा अंत
व्हायची वेळ आलेली असते. ३) जिथे करेक्टीव्ह मेकॅनीझम साठी कायद्याचे पाठबळ नाही अशी स्थिती असेल तर ती संसदेची जबाबदारी आहे, करेक्टीव्ह मेकीनीझम बाबतच्या कायद्यात त्रुटी असल्यास अथवा अनुपलब्धता असल्यास त्याची जबाबदारी संसदेची आहे . परत बैलाचे दूध काढायला बसा ४) अपवादावरुन नियम सिद्ध करु नयेतमी दिलेलं दुवे अपवाद नसून नियम आहेत समजून घ्या.
५) न्यायपालिका संबंधीत बर्याच सुधारनांची जबाबदारी अप्रत्यक्ष पणे शासन आणि कायदे मंडळाची असावी न्यायपालिकेने न्यायाधीश नेमण्यापासून सर्वच्या सर्व अधिकार ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निकालान्व्ये स्वतःकडे घेतलेले आहेत. त्याच्या वर केलेली घटनादुरुस्ती सुद्धा ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ४-१ अशी रद्दबातल ठरवली आहे.या दोन्ही गोष्टी निदान ९ किंवा ११ किंवा १३ न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने करायला हवी होती असे बऱ्याच वरिष्ठ कायदे पंडितांचे मत आहे.
तेंव्हा शासन आणि कायदेमंडळ यात सुधारणा करण्याचा प्रयत्न न्यायासनाच्यानिष्पक्षतेची दुहाई
देऊन हाणून पाडला आहे. त्याचे हकनाक खापर एकट्या न्यायपालिकेवर फोडून न्यायपालिकेस हकनाक बदनाम करु नये . टाळी एका हाताने वाजत नाही हे येथील विवीध प्रतिसादातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ते असताना न्यायासनाने आपल्या वस्त्रावर डाग पडला जाणार नाही याची अतीव काळजी घेतली पाहिजे. वरील केस मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे ज्यात श्री रामकुमार याना भरपाई मिळते आहे परंतु जे गुन्हेगार आहेत त्यांना शासन होताना दिसत नाही.न्याय हा फक्त केला गेला पाहिजे असे नाही तर तो दृश्य असला पाहिजे हि एक कायद्याची मूलभूत संकल्पना आहे.
५) उपकारांचा प्रश्न आपल्या धागालेखक अजोंचे या धागाचर्चेतील मूळ संशोधन आहे, त्यांचे प्रशस्ती पत्र त्यांना घेऊ द्यावे :) यावर पासन्यायदान देऊ शकेल अशी संगणक प्रणाली विकसित करण्यात येत नाही?तो दिवस फार दूर नाही. आयबीएम वॉटसन हे सॉफ्टवेअर त्यासाठी तयार केले गेले आहे. सद्य स्थितीत वकीलाला बाजूला करून हे तंत्रज्ञान वापरावे एवढे प्रगत झाले नसले तरी अजून प्रगत बनवणे चालू आहे. Artificial Intelligence वा BOTs वापरून नुसता डेटा फीड केला की त्याचा relevant historical डेटा शोधून analysis ई मुळे येत्या काही वर्षातच बराच बदल बघायला मिळेल. अर्थात हे भारतात कधी होईल ते सांगता येणं अवघड आहे. यातले मुद्दा नं. २ बघा - एका ब्रिटिश मुलाने पार्किंग तिकीटच्या केसेस लढण्यासाठी एक सॉफ्टवेअर फुकट उपलब्ध करून दिले आहे. तर मुद्दा नं. ३ आणि ४ हे पुढे जाऊन वकील आणि जज कसे कालबाह्य होतील याची थोडी माहिती देतो.