Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

तंदुरी सोया चांप

क
केडी
Fri, 02/23/2018 - 15:02

Soya Chaap-1

साहित्य

१ कप रात्रभर भिजवलेला सोया
१ कप सोया चंक्स
१ कप मैदा
१ कप गव्हाचे पीठ
१ मोठा चमचा प्रत्येकी, आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
१ चमचा प्रत्येकी, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला
४ ते ५ चमचे घट्ट दही
२ ते ३ चमचे तेल/तूप
चवीनुसार मीठ
आइस्क्रीम च्या काड्या, लागतील तश्या

Ingredients

कृती

एका मोठ्या भांड्यात पाणी तापवायला ठेवा. पाण्याला उकळी आली कि त्यात ३/४ चमचे मीठ टाकून, सोया चंक्स साधारण ५ ते १० मिनिटे उकळून घ्या.

Step1  Step2

चंक्स, गरम पाण्यातून काढून, गार पाण्यात थोडा वेळ गार करत ठेवा.

Step3  Step4

चंक्स गार झाले कि मग हाताने दाबून पाणी काढून, त्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्या.

Step5  Step6

रात्रभर भिजवलेले सोया, निथळून, मिक्सर मधून बारीक वाटून घ्या (लागल्यास थोडं पाणी घाला).

Step7  Step8

सोया चंक्स मध्ये हे वाटलेले सोया घाला. चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. ह्या मिश्रणात, आता हळू हळू मैदा, आणि पीठ घालून हे कणकेसारखं मळून घ्या. मळून झाला कि त्यावर ओलं फडकं टाकून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या.

Step9  Step10

ह्या मिश्रणाच्या आता आपल्याला जाडसर पोळ्या लाटायचा आहेत (मी ह्या साठी साधा रोटी मेकर वापरला, पण तुम्ही पोळपाट-लाटणे वापरून जराश्या जाडसर पोळ्या लाटून घेऊ शकता)

Step11  Step12

ह्या पोळ्यांचे लांब तुकडे कापून, ते आइस्क्रीम च्या काड्यांवर गोल फिरवून बसवा. सगळी कणिक अश्या प्रमाणे पोळ्या लाटून, तुकडे कापून चांप तयार करून घ्या. तयार चांप फ्रीज मध्ये १० ते १५ मिनिटे ठेऊन द्या.

Step13  Step14

एका मोठ्या पातेल्यात पाण्याला उकळी येऊ द्या [पाणी भरपूर घ्या]. पाण्याला उकळी आली कि सोया चांप गरम पाण्यात घालून, साधारण १५ ते २० मिनिटे उकळून, शिजवून घ्या. गरम पाण्यातून चांप काढून गार करून घ्या.

Step15  Step16

हे असे तयार चांप हवाबंद पिशवीत घालून फ्रीजर ला ठेऊ शकता. लागतील तसे बाहेर काढून वापरू शकता. फ्रीजर मध्ये साधारण २० ते २५ दिवस सहज टिकतात.

एका भांड्यात घट्ट दही, आलं, लसूण, मिरची पेस्ट, सगळे मसाले, २ चमचे तेल/तूप आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

Step17  Step18

ह्यात चांप घालून मसाला सगळ्या बाजूने नीट लावून घ्या. हे साधारण ३० ते ४५ मिनिटे मॅरीनेट करत ठेवा.

Step19  Step20

ग्रिल पॅन गरम करून त्याला ब्रश ने थोडंसं तूप/तेल लावून घ्या. ग्रिल पॅन नसल्यास साध्या तव्यावर सुद्धा थोडं तेल/तूप लावून हे चांप दोन्ही बाजूने छान भाजून घ्या (साधारण ४ ते ५ मिनिटे दोन्ही बाजूने). ओव्हन असल्यास ओव्हन मध्ये ब्रॉईल मोड मध्ये भाजून घेऊ शकता.

शेवटी एकदा वरून ब्रशने तेल/तूप लावून गरम गरम तंदूरी सोया चांप, पुदिना चटणी, कांद्याचे काप, बारीक कोथिंबीर आणि लिंबू पिळून आणि तव्यावर केलेल्या गार्लिक नान मध्ये गुंडाळून खायला घ्या!

Step21  Step22

Step23  Step24

[ह्या चांप ला गरम कोळसा आणि तुपाची धुरी दिली तर अजून छान चव येते. धुरी कशी द्यायची हे मी मागे बिना ओव्हन तंदूरी चिकन च्या पाककृतीत दिलेलं आहे.]

[ह्या चांप चे अफगाणी सोया चांप पण मस्त होतात. तव्यावरचे नान आणि अफगाणी सोया चांप ची पाककृती टाकेन पुढे कधीतरी]

Soya chaap2


  • Log in or register to post comments
  • 19479 views


वाचनखूण लावा
| 19479 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ड
डॉ श्रीहास Fri, 02/23/2018 - 15:12 नवीन
तोंडाला पाणी सुटलंय .... एवढं बोलतो आणि खाली बसतो
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Fri, 02/23/2018 - 15:54 नवीन
केडी भो, तुमच्या हातात अन्नपूर्णेचा वास आहे सरजी, बल्लवकला पारंगत मिपा बल्लवकर्म शिलेदार केडी भाऊंचा विजय असो.
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 02/27/2018 - 11:15 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 02/23/2018 - 16:10 नवीन
वेगळीच पाकृ आहे. मस्त असणार. बाकी यावरुन हे आठवलं. हे काय असेल यावर चर्चा झाली होती: Image removed. धागा काहींना अजूनही आठवत असेल. आता या फटूतल्या इतर पदार्थांच्या पाकृ देखील मिळाव्यात.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 02/23/2018 - 16:19 नवीन
आहा!!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 02/23/2018 - 16:41 नवीन
व्हेज लॉलीपॉप म्हणून मिळते , या पद्धतीने करून पाहिल्यावर फोटू टाकण्यात येईल
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/23/2018 - 16:48 नवीन
स्लsssर्प !!! मांसाहारी लोकांबरोबरच शाकाहारी लोकांच्याही तोंडाला (अपराधीपणाची भावना न बाळगता) पाणी सुटायला हरकत नाही ! ;) :)
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 02/26/2018 - 11:50 नवीन
:-)) धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 02/24/2018 - 01:16 नवीन
अगदी मस्त
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 02/24/2018 - 05:55 नवीन
परवाच एका हाटेलात मेनुवर चिकन चाप हा पदार्थ पाहिलेला आणि हे काय असेल असा विचार केला होता. फोटो छान दिसतायत.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 02/24/2018 - 16:53 नवीन
छान
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/24/2018 - 19:47 नवीन
व्वाह! मजा आया.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sat, 02/24/2018 - 21:45 नवीन
हे समजले नाही. सोया चंक्स हे सोयाच्या दाण्यांच्या पेस्ट पासून बनवले जातात व ते मासाच्या तुकड्या ऐवजी शाकाहारी मंडळी वापरू शकतात अश्या समजुतीत मी आहे. हे जर खरे असेल तर अशा चंक्स ची पेस्ट करुन त्यात भिजवलेल्या सोयाबीन ची पेस्ट का मिसळावी लागते हे समजले नाही.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 02/25/2018 - 05:57 नवीन
सोया चंक्सचे तुकडे , चुरा एकमेकाना चिकटत नाही. भिजवलेल्या सोयाबीनची पेस्ट binder म्हणून काम करते . सगळे घटक एकत्र धरून ठेवते. नंतरचे मसालेदेखील त्यालाच चिकटून रहात असणार.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sun, 02/25/2018 - 06:36 नवीन
' चंक्स गार झाले कि मग हाताने दाबून पाणी काढून, त्याची मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्या.'
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 02/25/2018 - 07:46 नवीन
पण ते बुर्जीसारखी होइल , म्हणजे खिमा टाइप. पोळी लाटायला त्यात सोयाबीनची पेस्ट , कणीक , मैदा इ इ घालावे लागेल. पॅटीस करताना जसा उकडलेला बटाटा घालतात तसे .
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 03/04/2018 - 06:48 नवीन
चित्रात वर पांढरेशुभ्र आहे ती सोयाबीनची पेस्ट खाली भरड आहे ती चंक्सची भरड. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/25/2018 - 07:53 नवीन
सुरेख....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 02/25/2018 - 14:10 नवीन
असलं काही टाकत जाऊ नको रे. आम्हाला घरी ऐकून घ्यावं लागतं. :) बाकी प्रेझेंटेशन नेहमीप्रमाणेच एकदम भारी.
  • Log in or register to post comments
क
केडी Tue, 02/27/2018 - 11:16 नवीन
:-)) बाकी आभारी आहे!
  • Log in or register to post comments
श
शलभ Tue, 02/27/2018 - 15:12 नवीन
मस्त हो शेफ केडि..
  • Log in or register to post comments
द
देशपांडेमामा Wed, 02/28/2018 - 10:14 नवीन
काय दीसतेय डीश. तोंपासु ! पथ्यातुन मोकळा झालो की आधी तुमच्या घरी येणार :-)) देश
  • Log in or register to post comments
क
केडी गुरुवार, 03/01/2018 - 07:23 नवीन
या हो, केव्हाही या... :-)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 03/04/2018 - 05:11 नवीन
आईग्ग... करते आता
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sun, 03/04/2018 - 09:12 नवीन
त्यामुळे पोळी लाटून त्याच्या छोट्या वाटीने पुर्या केल्या. अर्धी दुमडून अर्धगोल केले. मॅरिनेट व पुढची प्रोसेस करायला हा आकार सोयीचा आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 03/05/2018 - 06:03 नवीन
वाह, आता ते चांप वापरून पाकृ कराल तर त्याचे फोटू नक्की टाका इथे..
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/05/2018 - 13:14 नवीन
व्हेज खाणार्‍यांची सोय झाली.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Mon, 03/05/2018 - 14:33 नवीन
वैच.
  • Log in or register to post comments
क
केडी Mon, 03/05/2018 - 16:27 नवीन
ह्या वर्षी (आणि निदान वर्षभरासाठी) अस्मादिक शाकाहारी झालेले आहेत, त्यामुळे घासपुस पाककृतीच टाकणार जास्तीतजास्त .....
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Sat, 03/17/2018 - 16:04 नवीन
बऱ्यापैकी खटाटोप आहे पण 'चांगलं चुंगलं खायचंअसेल तर मेहनत घ्यावीच लागते' असं आई म्हणत असे त्याची आठवण झाली. पाकृ खूप आवडलेली आहे हे वेगळे सांगणे नको.....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 35 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 40 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा